लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????
लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते.
तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते.
आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात.
प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही.
दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे.
तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?
२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?
३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?
चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.
तुम्ही, तुमची बायको, तिच्या मैत्रिणी व त्यांचे नवरे यांना प्रेफरन्स लिस्ट करून जोड्यांची अदलाबदल का करत नाहीत? देर से आये पर दुरुस्त आये होईल. आणि अशीच अदलाबदल दर वर्षभराने करण्याची व्यवस्था केली तर सगळेच सुखी होतील.क्या कहेने ! तो धागा ७ वर्षांपूर्वीचा आहे, अशी उपाय योजना कुणी करुन पाहिलीये का ? इतक्या टुकार चर्चेला गंभीर म्हणणारे सांप्रत चर्चेला कंटाळणारच.बाकी औरसत्व एक अत्यंत वाईट संकल्पना आहेकधी अनाथालयाला भेट देऊन पाहिली आहे का ? ज्यांचं संगोपनच होऊ शकत नाही अशा मुलांच्या आयुष्याची काय वाताहत होते याची तुम्हाला कल्पना सुद्धा करता येत नसेल तर वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल. स्वतःला कधी अशा परिस्थितीत कल्पून बघा, इट इज ड्रेडफुल ! ज्यांना आई-वडीलांचं प्रेमच मिळू शकलं नाही, ज्यांना घराचा आधारच नाही, अशी मुलं आयुष्यात उभी राहाणंच अवघड. अनौरसत्त्वाचं शल्य मानवी मुलाच्या सायकीत इतकं खोलवर जाऊन बसतं की ते मूल आयुष्यात कधी कोसळेल सांगता येत नाही. ३)माझ्या स्पर्मने जन्म झालेले प्रत्येक मुल माझेच असेल. माझेच ! औरस / अनौरस असला फरक नाही !हा तुम्हाला ज्योक वाटत नाही काय ? `तुमचं मुल' म्हणजेच त्या मुलाचं `औरसत्व' आहे याची तुम्हाला कल्पना नाही का ? ४)आनंदाचा आणि डोपामाईनचा फारसा संबंध नाही !तुम्ही थोडं फार अध्यात्म वाचलं जरी असेल (कळायची गोष्ट सध्या बाजूला ठेवू) तरी आनंद ही स्थिती आहे, ती उचंबळून येणारी भावना नाही. तस्मात, डोपामाईन (किंवा काय असेल ते) हा `कॉन्सिक्वन्स' आहे 'कॉज' नाही. आनंद ही कायम स्वतःशी कनेक्टिविटी आहे आणि डोपामाईन हा त्याचा रिझल्ट आहे. तुम्ही शरीरशास्त्राच्या आधारावर घोडा गाडीच्या मागे जोडतायं :) !डोपामाईन च्या ऐवजी क्ष्य्झ नावाची १७६० केमिकल्स असतील प्रेमाला कारण ! ती असतील तेव्हा त्याला प्रेम म्हणु , नसतील तेव्हा प्रेम संपले असे म्हणु !!तोच तर माझा मुद्दा तुम्ही टाळलायं ! ही संप्रेरकं तुम्हाला सिक्रीट होतायंत आणि तिला होत नाहीत तर आता किती दिवस वाट पाहायची ? बरं या बेसिसवर एक स्थिर रिलेशनशिप तयार होणंच शक्य नाही कारण संप्रेरकांचा काय भरवसा ? आणि मग अपत्य झाली असली तर त्यांच्या संप्रेरकांचं काय ? ती म्हणायला लागली की तुम्हाला एकत्र बघितलं तरच आमची संप्रेरकं सिक्रीट होतात (आणि तीच वस्तुस्थिती आहे !), तर तो लफडा कसा सोडवणार ? २)औरस अनौरस ही संकल्पना फार फार ऊशीरा आलीये , आणि त्याने निश्प्पाप लोकाचे नुकसानच केले आहे ! अगदी शिवकालातही अनौरस मुलांना राजांनी टाकुन दिल्याचे दिसत नाही पण केवळ अनुरस आहेत ह्या एका उल्लेखाने त्यांचे जन्मसिध्द अधिकार हिरावल्याचे दिसुन येते ! ....माझ्या १० अब्ज शुक्राणूंनी १० अब्ज अपत्य जन्माला आली तरी ती सर्वच्या सर्व माझीच असतील अस्से मी म्हणत आहे ! त्यातीक कोणीही अनौरस नसेल इतकेच मी म्हणले आहे !उल्लेखाचं एकवेळ जाऊं द्या. वास्तविकात मुल स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत त्याचा सांभाळ कोण करणार ? तुम्ही ऐतिहासिक दाखले देऊन वास्तव कसं हाताळणार ? उद्या तुमच्या उदात्त कल्पनेप्रमाणे विवाह संकल्पना लयाला गेली, कुणीही कुणाशीही रत होतंय अशी कल्पना करा (अर्थात, ज्याच्या त्याच्या डोपोमाईनप्रमाणे :) ! ) मग भसाभसा मुलं व्हायला लागली, तीही तुमच्या औदार्यशिल विचाराप्रमाणे सगळी औरसच आहेत..... आता ती सांभाळायला कोण घेणार ? इथे तुमची डोपोमाईन थिअरी लावायची तर पब्लिक म्हणणार या मुलांकडे बघून आमचं नाही सिक्रीट होत ! मग ते सर्व प्रचंड लफडं कोण निस्तरणार ?(संपादित)
लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????१) आंबे, बाजीराव वगैरे उदाहरणं सोडा. समलिंगी, ब्रह्मचारी तुमच्या दृष्टीनं कितीही थोर असोत, ते या चर्चेचा विषय नाहीत. एकानी अनेकींशी किंवा एकीनं अनेकांशी लग्न बेकायदा आहे. ओके ? आता सरळ प्रश्नाकडे या : नॉर्मल स्त्री आणि पुरुषांनाएकत्र जगण्याचाविवाह किंवा लिव-इन सोडून तिसरा पर्याय कोणता ? २)मी वारंव्वर म्हणतोय की मुल बापाचेच असते आणि औरसच असते , मग त्याची आई विधीवत लग्न झालेली असो की नसो. लग्नाचा औरसत्वाशी संबंध नाही !!तुम्ही माझे प्रतिसाद न वाचताच उत्तरं देतायं ! पुन्हा नीट वाचा : (औरसत्त्वाच्या) उल्लेखाचं एकवेळ जाऊं द्या.मुल स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत त्याचा सांभाळ कोण करणार ? तुम्ही ऐतिहासिक दाखले देऊन वास्तव कसं हाताळणार ? उद्या तुमच्या उदात्त कल्पनेप्रमाणे विवाह संकल्पना लयाला गेली, कुणीही कुणाशीही रत होतंय अशी कल्पना करा (अर्थात, ज्याच्या त्याच्या डोपोमाईनप्रमाणे Smile ! ) मग भसाभसा मुलं व्हायला लागली, तीही तुमच्या औदार्यशिल विचाराप्रमाणे सगळी औरसच आहेत..... आता ती सांभाळायला कोण घेणार ? इथे तुमची डोपोमाईन थिअरी लावायची तर पब्लिक म्हणणार या मुलांकडे बघून आमचं नाही सिक्रीट होत ! मग ते सर्व प्रचंड लफडं कोण निस्तरणार ? ३)वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल.पुन्हा तुम्ही प्रतिसाद नीट न वाचताच सुटला आहात ! आता तरी नीट वाचा : "कधी अनाथालयाला भेट देऊन पाहिली आहे का ? ज्यांचं संगोपनच होऊ शकत नाही अशा मुलांच्या आयुष्याची काय वाताहत होते याची तुम्हाला कल्पना सुद्धा करता येत नसेल तर वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल. स्वतःला कधी अशा परिस्थितीत कल्पून बघा, इट इज ड्रेडफुल ! ज्यांना आई-वडीलांचं प्रेमच मिळू शकलं नाही, ज्यांना घराचा आधारच नाही, अशी मुलं आयुष्यात उभी राहाणंच अवघड. अनौरसत्त्वाचं शल्य मानवी मुलाच्या सायकीत इतकं खोलवर जाऊन बसतं की ते मूल आयुष्यात कधी कोसळेल सांगता येत नाही." आणि आता तुमची विचारसरणी किती पक्की आहे ते या प्रश्नाला नेमकं उत्तर देऊन दाखवून द्या : ज्या मुलांची जवाबदारी घ्यायला पालक तयार नाहीत त्यांना अनौरस म्हणतात. याचा अनौरस मुलांना बाप नसतो असा अर्थ तुम्ही कुठून काढला ? जर आई-बाप जवाबदारी घ्यायला तयार नसतील तर ती मुलं अनाथालयात जातात इतकी किमान गोष्ट तुम्हाला माहिती असायला हरकत नाही. तर प्रश्न असा आहे :तुमच्या दृष्टीनं आदर्श असलेल्या `विवाहशून्य समाजात' अपत्य संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ?`विवाहशून्य समाजात' अपत्य संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ? मुलाचा नैसर्गिक बाप ! ज्याच्या स्पर्म ने मुलाचा जन्म झाला तो !म्हणजे एकतर तुमचे विचार ठाम नाहीत. दुसरी गोष्ट, तुमच्या दृष्टीनं जोडप्यातल्या सहचर्याचा सगळा खेळसंप्रेरकांवरअवलंबून आहे. म्हणजे विचारातली दुफळी हळूहळू स्पष्ट होते आहे. आता स्वतःच्या विचारांशी पक्के राहून या प्रश्नांचं उत्तर देऊ शकाल काय ? अ) जन्मदातीनं मुलावर हक्क सांगितला आणि तीनं बापाकडे बघून तिची संप्रेरकं सिक्रीट होत नाहीत म्हटलं तर बाप काय करणार ? ब) शिवाय अपत्याच्या सुयोग्य संगोपनासाठी दोघांची आवश्यकता असते, जर बापाला मुलाच्या आईकडे बघून डोपामाईन निघत नाहीत असं लक्षात आलं तर तो मुलावरचा हक्क सोडणार की मुलाच्या आईला सोडणार ? क) कायद्यानं मुलाच्या पाचव्या वर्षापर्यंत जन्मदाती हीच योग्य पालक आहे असा नियम आहे. पाच वर्षानंतर अपत्यानं बापाकडे जायला नकार दिला तर बाप काय करणार ? ड) तुमच्या मुक्त संभोग व्यवस्थेत एक बाप हा दहा मुलांच्या जन्माचा नरपुंगव आहे असं निष्पन्न झालं आणि ती सर्व मुलं तथाकथित स्त्रीयांनी त्या थोर बापाच्या दारात आणून ठेवली तर ओशोंच्या ज्या `स्वातंत्र्याच्या सर्वोच्चतेचा' तुम्ही पाठपुरावा करतायंत ते महत्त्वाचं ठरवणार की मुलांचं संगोपन ?अजुन चर्चा? बापरेप्रगो रितसर लग्न करायचा विचार करत नाहीत तोपर्यंत चर्चा जारी राहील :)साला टंकाळा कसा येत न्हाय लोकास्नी काय म्हाईत गेला बाजार इतका येळ कुठून येतो खरडत बसायला ते पण समजत नाहीत्याचं असं आहे की ज्यांना वैचारिक क्लॅरिटी आहे त्यांना आपल्या प्रतिसादांच मूल्य माहिती असतं आणि त्यांचे विचार त्यांच्या लेखनातून सहज प्रकट होतात. त्यांना आपला वेळ चाललायं असं वाटत नाही तर आपण मांडलेले विचार कित्येकांचे गैरसमज दूर करु शकतात याची कल्पना असते आणि संकेतस्थळाचा एक महत्त्वाचा उद्देश विचारांचं आदान-प्रदान आहे हे देखिल त्यांना माहिती असतं. याउलट काही नुसता टिपी करणारे सदस्य असतात ज्यांना वैचारिक बैठकच नसते, ते अशा चर्चेत भागच घेऊ शकत नाहीत. मग त्यांचे दोन विभाग होतात. एका टाईपचे सदस्य इतके खंतावतात की धागा भरकटवून ते स्वतःची सुटका करवून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून त्यांचा वैचारिक कोतेपणा आणखीनच उघडा पडतो. दुसरा टाईप काहीही वेडगळ प्रतिसाद देऊन चर्चा कशी थांबेल हे पाहतो कारण आपल्याला काहीही कंट्रीब्यूट करता येत नाही ही अस्वास्थ्याची भावना त्यांना व्यथित करत असते.