लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????
लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते.
तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते.
आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात.
प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही.
दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे.
तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?
२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?
३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?
चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.
💬 प्रतिसाद
(253)
म
मराठी_माणूस
गुरुवार, 06/08/2017 - 07:14
नवीन
सहमत. प्रतिवाद करताना संबध आड येउ शकतात.
(एका चिकीत्सा करणारार्याला "अरे प्रतिवाद करताना वर कोणी लिहले आहे ते तर पहा" अशा प्रकारची कॉमेंट वाचल्याचे आठवते)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 06/06/2017 - 08:54
नवीन
स्व गवसलेल्या आणि आत्मज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीने इतक्या क्षुल्लक गोष्टीच्या बाबतीत भोचकपणा करणे बरे दिसत नाही.
ते एक असो. तुमच्या उजेड पाडणाऱ्या वेबसाईटचे काय झाले? मी सदस्यत्व घेण्यास उतावीळ आहे. आधी मी कुठेतरी तरी वाचले होते की तुमचे अध्यात्मावरील मराठीतील एकमेवाद्वितीय असे पुस्तक येणार आहे. मी लगेच एमेझॉन आणि फ्लिपकार्टवर तुमचे पुस्तक ऍडव्हान्स बुकिंगला आहे का पाहीले. ते नाही कळल्यावर आणि नंतर तुम्ही पुस्तक लिहीणार नाही कळल्यावर माझा भ्रमनिरास झाला. मात्र तेव्हाच तुमची पायऱ्या-पायऱ्याने उजेड पाडणारी वेबसाईट येणार आहे म्हटल्यावर हायसे वाटले.
त्यामुळे असल्या फुटकळ गोष्टींकडे लक्ष न देता उजेड पाडणारी वेबसाईट बनवण्याकडे लक्ष द्या अशी आपणास नम्र विनंती.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 06/06/2017 - 08:19
नवीन
ओके.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6