Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिवसेना..... ???

व
विजुभाऊ
Tue, 07/11/2017 - 16:33
🗣 329 प्रतिसाद
शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष. छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही. सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी. मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही. पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती. सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर. बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्‍या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले. त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला. सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही. याबद्दलही काही विचारायचे नाही. लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची. सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे. शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती. शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत. हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती, राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते. या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते? एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे. मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे. १९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले ( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
119176 वाचन

💬 प्रतिसाद (329)
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 07/12/2017 - 14:11 नवीन
हाहा! तेच तेच परत परत विचारताय! शिवसेनेच्या आमदारांनी काहीच कामं केली नाहीत हे वक्तव्य करताना तुम्ही सांगा ना काय अभ्यास केला? जलयुक्त शिवार सारखीच (जिला तुम्ही चान्गल्या कामामध्ये गणत आहात) शिवजलक्रांती योजना होती हे मान्य करायला अडचण कसली? आधी सरसकट वक्तव्य केलं आहे तर ते नीट विस्कटून सांगा तरी? बहुधा मागे एकदा कधीतरी विचारलं होतं पण तरीही अजून एकदा, तुमच्या भागाच्या आमदाराने किंवा खासदाराने काय चांगलं कामं केलं हे कसं ठरवता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Wed, 07/12/2017 - 14:29 नवीन
जलयुक्त शिवार यशस्वी नाही आहे. अशास्त्रीय पद्धतीने खड्डे खणून त्यात पाणी साठवणे आणि खड्ड्यातील पाण्यावरून गावात रणकंदन माजवणे एवढेच त्याचे फलित. रणकंदन च्या बातम्या पेप्रात येत नाहीत, हे आधी नमूद करू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
श
श्रीगुरुजी Wed, 07/12/2017 - 14:45 नवीन
>>> शिवजलक्रांती योजना होती हे मान्य करायला अडचण कसली? आधी सरसकट वक्तव्य केलं आहे तर ते नीट विस्कटून सांगा तरी? बहुधा मागे एकदा कधीतरी विचारलं होतं पण तरीही अजून एकदा, तुमच्या भागाच्या आमदाराने किंवा खासदाराने काय चांगलं कामं केलं हे कसं ठरवता? ही शिवजलक्रांती योजना म्हणजे शिववडापाव सारखं काही आहे का? या योजनेमुळे नक्की काय फायदा झाला? ही योजना नक्की किती ठिकाणी सुरू आहे? शिवसेनेने मागील ५१ वर्षात नक्की काय काम केले हे सांगता का जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 07/12/2017 - 19:09 नवीन
प्रश्नावर प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही केलेल्या सरसकट वक्तव्यावर काय अभ्यास होता तेवढे सांगितलेत तर चर्चा मुद्देसूद होऊ शकते, कसे? आणि राहता राहिला प्रश्न शिवजलक्रांतीचा तर जलयुक्त शिवाराचे फायदे शोधलेच असतील (त्याशिवाय ती योजना म्हणजे चांगले काम होते असे कसे म्हणणार?) ते लागू करा. अजून माहिती मिळवण्यासाठी गूगल करायला हरकत नसावी. आतापूरता हा सदा दुष्काळी असणाऱ्या तालुक्याचा रिपोर्ट बघितला तरी हरकत नाही. https://youtu.be/yXzTOs17DW0
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 07/12/2017 - 19:24 नवीन
मी याचे उत्तर आधीच दिले आहे. सेनेने ५१ वर्षात केलेले कोणतेही भरीव काम अनेकदा शोधून सुद्धा सापडत नाही. मात्र सेनेची इतर फालतूगिरी सुरवातीपासूनच दिसते. मी अनेक वेळा विचारूनसुद्धा सेना समर्थकांना सेनेने केलेले एकही भरीव काम सांगता येत नाही यावरून काय ते समजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 07/12/2017 - 19:39 नवीन
बरं मग ते शिवजलक्रांतीचं झालं का मग सेटल? तुम्हाला माहिती काढयाचीच नाही हे स्पष्ट दिसत आहे. बरं शिवसेनेचं सोडा भाजपच्या कोणत्या कामांना तुम्ही चांगले म्हणता असे विचारले तर तुम्ही संयुक्त सरकारचे जलयुक्त शिवार आणि गृहखातं भाजप कडेच असताना दोन चार नेत्यांवर झालेल्या कारवाईंचे उदाहरण देता. तरीही शिवसेनेला क्रेडिट देता येतील अशी मी काही उदाहरणे टाकायचा प्रयत्न मी करेन. तुम्ही अजून भाजपची (भाजपचीच) काही उल्लेखनीय कामे शोधायचा प्रयत्न करा! काही वाचाळ नेत्यांच्या वायफळ बडबडीमुळे आणि संयुक्त सरकारमधील अडेलतट्टू धोरणामुळे सद्यस्थितीतील शिवसेना नक्कीच टिकेस पात्र होत आहे पण वरील मुद्दे हे इतर पक्षांनाही तितकेच लागू होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 07/12/2017 - 19:41 नवीन
>>> आतापूरता हा सदा दुष्काळी असणाऱ्या तालुक्याचा रिपोर्ट बघितला तरी हरकत नाही. ते काम जलयुक्त शिवार योजनेचंच आहे. चित्रफितीत एके ठिकाणी तसा उल्लेख सुद्धा आहे. सेना फक्त श्रेय ढापायचा प्रयत्न करीत आहे. कर्जमाफी आमच्या मुळेच झाली (ती सुद्धा लंडनमध्ये बसून) असे सेनावाले श्रेय घेतात किंवा २००८ च्या कर्जमाफीचे श्रेय राष्ट्रवादीवाले पवारांना देतात, तसाच हा श्रेय ढापण्याचा प्रकार आहे. यापुढे जाऊन जलयुक्त शिवार ही खरी आमचीच योजना असेही सेनावाले सांगताना दिसतात. जर सेनेची खरोखरच अशी योजना होती, तर ६३ आमदार असूनही इतरत्र कोठेही या योजनेचे नामोनिशाण का नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 07/12/2017 - 19:58 नवीन
दंडवत घ्या गुरुजी! तरी बरं हामी टिकडलेच हाव! तुम्हाला बातम्या हव्या तशा समजून घेता येतात याचा आधीही अनुभव आलाय म्हणा! महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या जलसंवर्धनांपैकी एका उदाहरणाची आपल्याला माहिती नाहीये तेव्हा जलयुक्त शिवार आणि शिवजलक्रांती दोन्हीचाही अभ्यास वाढवा!! भाजपला भाजपने केलेल्या कामाचं क्रेडिट द्या आणि इतर पक्षांना त्यांच्या कामाचं! शिवजलक्रांती शिवसेनेने स्वखर्चातून मराठवाड्यामध्ये केलेला उपक्रम आहे तर जलयुक्त शिवार हि भाजप शिवसेना संयुक्त सरकारची योजना आहे हे एवढे समजले तरी पुरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/13/2017 - 11:56 नवीन
जलयुक्त शिवार ही योजना महाराष्ट्र सरकारने जून २०१५ मध्ये अधिकृतरित्या सुरू केली. सुरवातीपासूनच या योजनेत बर्‍यापैकी काम सुरू झाले होते. या योजनेमुळे फडणविसांचे कौतुक होऊ लागल्याने शिवसेनेची जळजळ सुरू झाली. या कामाचे श्रेय एकट्या भाजपला मिळणार हे सहन होत नसल्याने सप्टेंबर २०१५ मध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची शिवजलक्रांती ही योजना जाहीर केली. एकाच सरकारमध्ये असलेल्या दोन पक्षांनी एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या योजना जाहीर करणे हा वेडेपणा होता. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बराच निधी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला. या योजनेची फळे २०१६ मध्ये दिसायला लागली. पावसासाठी तहानलेल्या लातूरमध्ये जून २०१६ मधील पहिल्या २-३ पावसातच भरपूर पाणी साठले. शिवजलक्रांती हा जलयुक्त शिवार योजनेचाच भाग आहे. वरील चित्रफितीत एका ठिकाणी तसा उल्लेखसुद्धा आहे. दुर्दैवाने शिवसेनेला दुसर्‍याने केलेल्या कामाचे श्रेय स्वतःकडे ओढून घ्यायची घाण सवय आहे. त्यामुळे आम्हीच हे केले अशी प्रौढी मिरविणे सुरू आहे. वरील चित्रफितीत सेना नेते असे सांगताना दिसतात की जलयुक्त शिवार ही मुळात त्यांचीच योजना आहे व ही योजना त्यांनी २०१२ मध्येच सुरू केली होती. असे असेल तर सप्टेंबर २०१५ मध्ये उद्धव ठाकरेंनी या योजनेच्या उद्घाटनाचा समारंभ का केला? जर ही त्यांचीच योजना होती तर सेनेच्या ६३ आमदारांपैकी फक्त एकच आमदार कसा काय यो योजनेवर काम करतो? इतर ६२ जण काय करीत आहेत? नुकत्याच झालेल्या शेतकरी संपाच्या वेळी उधोजी व आदूबाळ महिनाभर लंडनमध्ये मजा मारत होते. फडणविसांनी पुढाकार घेऊन शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी अनेकदा चर्चा करून कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्यावर, आमच्यामुळेच ही कर्जमाफी झाली, आम्हीच यांच्या कंबरड्यात लाथा घालून कर्जमाफी करायला लावली अशा फुशारक्या सेना नेते मारत होते. 'कर्जमाफी केल्याबद्दल उधोजींना धन्यवाद' असे लिहिलेले फ्लेक्स रस्त्यांवर लावले गेले होते. उधोजी लंडनमध्ये राहून कशी काय कर्जमाफी करीत होते खुदा जाने! आमच्या संघर्ष यात्रेमुळेच कर्जमाफी झाली अशा फुशारक्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीनेही मारल्या. पूर्वी अनेकदा असे दिसून आले आहे की जेव्हा जेव्हा एखादा उड्डाणपूल किंवा मोठा रस्ता तयार होतो, तेव्हा तेव्हा शिवसैनिक उद्घाटन होण्यापूर्वीच स्वतःच समारंभ करून आम्हीच हे काम केले असे सांगून स्वतःचीच पाठ थोपटून घेतात. मागील वर्षी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर "पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करा असे उद्धवजी अनेकदा सांगत होते. शेवटी मोदींना त्यांचेच ऐकावे लागले." अशा फुशारक्या सेना नेते मारत होते. अगदी अलिकडचं उदाहरण म्हणजे अमरनाथ यात्रेवरील हल्ला. तो हल्ला झाल्यानंतर सेना नेत्यांची मुक्ताफळे पहा. "पूर्वी २००३ मध्ये एकदा असाच हल्ला झाला होता, तेव्हा म्हणे बाळ ठाकर्‍यांनी सांगितले होते की परत हल्ला झाला तर मुंबईतून हाजसाठी एकही विमान उडू देणार नाही. त्यांच्या इशार्‍यामुळे आजवर कधीही हल्ला झालेला नव्हता. " असे सेना नेते सांगत आहेत. म्हणजे मातोश्रीवर सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात बसून वातानुकुलीत खोलीत पाईप चाखत वाईन पिता पिता बाळ ठाकर्‍यांनी 'सामना'त काही तरी खरडले. ते पाकिस्तानमधील अतिरेक्यांनी वाचल्यावर त्यांची तंतरली आणि म्हणून नंतर बरीच वर्षे अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचे त्यांचे धाडस झाले नाही, असा सेना नेत्यांचा दावा दिसतो. म्हणजे भारतीय लष्कर, पोलिस, निमलष्करी दल इ. मुळे हल्ले थांबलेले नव्हते, तर बाळ ठाकर्‍यांच्या 'सामना'तील धमकीमुळे ते थांबले होते. स्वतः काही न करता दुसर्‍याने केलेल्या कामाचे श्रेय ढापण्यापेक्षा सेनेने अगदी थोडे असले तरी स्वतः काहीतरी करून दाखवावे. मुंबईत सलग २० वर्षे सत्तेत असून ज्यांना अजून खड्डे बुजविता आले नाहीत किंवा नाले साफ करता आले नाहीत, ते आयुष्यात दुसरे काही करणे अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 07/13/2017 - 12:12 नवीन
दंडवत वर घातला आहेच! चत्रफितीत जलयुक्त शिवार चा उल्लेख करणारे कोण आहेत, भाजपचे किती आमदार जलयुक्त शिवार मध्ये सहभागी होते, शिवसेनेच्या किती आमदारांनी जलयुक्त शिवार योजनेचा फायदा घेतला आणि किती जणांनी स्वखर्चाने शिवजलक्रांती योजना राबवली याची काही माहिती असेल तर सरसकट विधान करणे अभयासाला धरून असेल, असो! सरकारी योजनेला स्वतःची योजना म्हणून प्रोजेक्ट करण्याची जळजळ शिवसेनेला सहन न होऊन त्यांनी स्वतःची योजना सुरु केली असे म्हणून तुम्ही भाजप या सरकारी योजनेचे श्रेय स्वतःकडे ओढत होता हे साधारणपणे मान्य केलेले दिसते. मला वैयक्तिकरित्या त्या चित्रफितीतील शीर्षक महत्वाचे वाटते, "दोघांच्या चुरशीत महाराष्ट्राचा पाण्याच्या प्रश्न सुटणार" असेल तर त्यात वाईट वाटण्याचे काय कारण असावे बुवा? बाकी त्या शेतकरी संपाच्या आणि अमरनाथ यात्रेच्या मुद्द्याचं प्रयोजन कळलं नाही! त्यांच्या आजकालच्या अडेलतट्टू भूमिका आणि वायफळ वक्तव्यांमध्ये हे आहेच यात शंका आहे का काही? मुंबईतील भाजप नगरसेवकांच्या प्रभागातील रस्ते गुळगुळीत असतात काय असा प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी विचारला गेला होता, त्याचे उत्तर नाही ते एक असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/13/2017 - 12:23 नवीन
मूळ योजना जून २०१५ मध्ये सुरू झालेली असताना मुद्दाम सप्टेंबर २०१५ मध्ये त्या योजनेचे स्वतःपुरते नाव बदलण्याचे काय कारण होते? आम्हीच हे करत आहोत हे दाखविण्यासाठीच हे केले होते ना? अशी खरोखरच भरभक्कम योजना सेनेकडे होती, तर सेनेच्या ६३ पैकी किती आमदारांनी जलयुक्त शिवार ऐवजी शिवजलक्रांती ही योजना आपल्या मतदारसंघात यशस्वीपणे राबविली आहे? मुळात दोन वेगवेगळी नावे असलेल्या या दोन योजनांमध्ये काही फरक आहे का? शेतकरी संप व अमरनाथ यात्रेचा संदर्भ एवढ्यासाठीच दिला की सेना अशी काही कामे आपण स्वतःच केली आहेत अशी स्वतःचीच पाठ कशी थोपटून घेते (प्रत्यक्षात स्वतःचा सहभाग शून्य असला तरी) हे दाखवायचे होते. हा शिवजलक्रांती प्रकार हा तसाच श्रेय ढापण्याचा प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 07/13/2017 - 12:47 नवीन
वरील प्रतिसाद नीट वाचा! भाजपने श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्यामुळेच वेगळी योजना काढावी लागली असे आपल्याच वक्तव्यातून ध्वनित झाले आहे. जर शिवसेनेने या भावनेतून योजना काढली आणि तीही स्वखर्चातून तर यात वावगे ते काय? सरकार जलयुक्त शिवार या योजनेवर काही मुक्त हस्ताने पैसे उधळणार नव्हतेच, त्याला शिवसेनेच्या योजनेने मदत झाली तर यात दुःख ते काय? एकाच प्रकल्पावर दोन्ही लोकांनी काम केले आणि मग श्रेयवाद झाला तर गोष्ट वेगळी आहे. संपुआसारख्याच योजना रालोआने आणल्या तर त्यांनी श्रेय ढापले असे म्हणणे जेवढे अविचारी आहे तेवढेच हेही आहे. शेवटी योजना राबवली कशी आणि यश मिळाले कि नाही यावर काही अवलंबून असू नये का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
L
lakhu risbud गुरुवार, 07/13/2017 - 19:01 नवीन
उस्मानाबाद मधील या कथित शिवजलक्रांती शी उधोजींचा तेवढाच संबंध जेवढा एखादा क्रिकेटचा सामना जिंकण्यात १२ व्या खेळाडूचा असतो. सावंतांना राजकारणात प्रवेश करायचा होता,त्याची पार्श्वभूमी म्हणून आधी काहीतरी भरीव काम दाखवणे गरजेचे होते. उस्मानाबाद मधील य शिवजलक्रांतीचा पूर्ण खर्च त्यांनी स्वतःच्या खिशातून केलेला आहे. त्याच्याशी सेनेचा बादरायण संबंध नाही. राजकारणात प्रवेशासाठी launchapad म्हणून या योजनेचा सावंतांनी वापर केला आहे. त्यांना या नंतरच विधानपरिषदेची उमेदवारी शिवसेने तर्फे यवतमाळ मधून देण्यात आली . win win situation दोंघांसाठी आहे. पण त्याची फुकाची बढाई सेना आत्ता मारत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 07/13/2017 - 19:30 नवीन
प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन असतो. सावंतांनी राजकारणात यायचं म्हणून केलं आणि इतर पक्षांचे नेते काय पक्षासाठी करत असतात का? त्यांनी अधिकृतरित्या शिवसेनेच्या बॅनरखाली आणि शिवजलक्रांती उपक्रमांतर्गत हे काम केलं हे दुर्लक्षून त्यांनी हे कशासाठी केलं हे चर्चिण्यात काय अर्थ? आणि तसे पाहता विधानपरिषदेची उमेदवारी देतो तेवढं जलसंधारणाचं काम तुमच्या खिशातून करा असं कुठल्या पक्षाने म्हटले तर ते स्तुत्यच नाहीका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
आ
आदूबाळ गुरुवार, 07/13/2017 - 13:02 नवीन
नुकत्याच झालेल्या शेतकरी संपाच्या वेळी उधोजी व आदूबाळ महिनाभर लंडनमध्ये मजा मारत होते.
गोष्ट खरी आहे, पण उधोजी नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
आ
आनंदयात्री Fri, 07/14/2017 - 22:25 नवीन
=)) =)). उधोजींचे लंडनच्या विकासात काही काही म्हणून योगदान नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अनुप ढेरे Wed, 07/12/2017 - 10:32 नवीन
मराठवाड्याच्या विकासात शिवसेनेचे भरीव योगदान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील
श
श्रीगुरुजी Wed, 07/12/2017 - 10:59 नवीन
नक्की काय योगदान आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Wed, 07/12/2017 - 13:08 नवीन
सरकॅझम समजैना का काय गुर्जी तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 07/12/2017 - 13:28 नवीन
फिदी फिदी फिदी . . . लोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
श
श्रीगुरुजी Wed, 07/12/2017 - 11:28 नवीन
शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि २० खासदार आहेत. आणि ह्यातले ६४ आमदार हे या पक्षाने एकटे लढून आलेत. केवळ मुंबई ठाणे अणि नाशिक एवढ्याच भागातून नाही
२०१४ मध्ये सर्वच पक्ष एकटे लढले होते. शिवसेना एकटी लढली त्यात विशेष काहीही नाही. त्यावेळी महाराष्ट्रात कॉंग्रेसविरोधी प्रचंड लाट होती. त्या लाटेचाच फायदा शिवसेनेला झाला. त्यानंतर झालेल्या बहुसंख्य निवडणुकांमध्ये शिवसेनेला फारसे यश मिळालेले नाही (उदा. अलिकडेच झालेल्या निवडणुकीत १६ महापालिकांमध्ये फक्त २ महापालिकात शिवसेनेचा महापौर झाला आहे. ११ महापालिकांमध्ये भाजपचा तर ३ मध्ये कॉंग्रेस आहे). २०१९ मधील निवडणुकीत शिवसेनेची अवस्था अत्यंत दारूण होणार आहे. जर त्यांनी वस्तुस्थिती मान्य करून भाजपबरोबर युती करून स्वतःच्या ताकदीएवढ्याच जागा मान्य केल्या (म्हणजे विधानसभेत ९० च्या आसपास व लोकसभेत १०-१२) तरच शिवसेना जिवंत राहू शकेल. अन्यथा मनसेसारखीच शिवसेना संपुष्टात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील
ए
एकुलता एक डॉन Wed, 07/12/2017 - 11:40 नवीन
कॉंग्रेसविरोधी लाट असती तर राष्ट्रवादी आणि इतर पक्षांना पण फायदा झाला असता ,का नाही झाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 07/12/2017 - 13:28 नवीन
अज्ञानमूलक प्रश्न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
व
विशुमित Wed, 07/12/2017 - 13:31 नवीन
मीच लिहणार होतो हे पण शब्द सुचत नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
I
IT hamal Wed, 07/12/2017 - 13:09 नवीन
जाऊ द्या हो.. २०१९ ला पूर्ण बहुमत मिळेल भाजपाला .... महाराष्ट्रातले सगळे " Election Managers " म्हणजे कॉंट्रॅक्टर्स , बिल्डर्स , गावोगावचे एकगठ्ठा नोटा वाटून थप्पीने मते विकत घेणारे किव्वा थप्पीने नोटा वाटून एकगठ्ठा मते विकत घेणारे टगे लोक सगळे आता वाल्मिकी झालेत.. सगळे आता घड्याळा ऐवजी कमळाच्या पाट्या लावून फिरतात स्कॉर्पिओ आणि तत्सम गाड्यांवर ... हाच वर्ग महाराष्ट्राचे सत्ताधारी कोण हे ठरवत असतो...बाकी मतदान वगैरे जस्ट एक फॉर्मॅलिटी असते... सत्ता मिळाली कि त्या पक्षाची असे मांडवली किंग विकत घ्यायची ताकद वाढते आणि त्यातून परत परत सत्ता मिळवता येते.....तुम्ही आम्ही कळफलक बडवून काही होत नाही.. जस्ट चिल !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील
च
चिनार गुरुवार, 07/13/2017 - 10:47 नवीन
स्कॉर्पिओ जुनी झाली हो आता ....कार्यकर्तेसुद्धा वापरत नाही.. आता फॉटनर वापरतात (हे Fortuner चं नामकरण आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: IT hamal
I
IT hamal गुरुवार, 07/13/2017 - 11:54 नवीन
साहेबांच्या दहीहंडीत सर्वात खालच्या थरात उभे राहणारे ही आजकाल स्कॉर्पिओ त बसायला लाजतात....पुण्यातल्या दुबईत तर आजकाल चार बांगड्यावाली गाडी ही outdated झालीय.. कमळाच्या आश्रयाला गेलेले सगळे घड्याळवाले तर फक्त जग्वार आणि तत्सम चारचाक्यात बसतात ....pcmc ची एवढी ५ वर्षाची मुदत संपत येईतो ४/५ तरी हमर येतील आमच्या पुणेरी दुबईत ...हाय काय न नाय का !!! अन लोकांना वाटतेय कि नोटबंदी आणि GST मुले सगळे ब्लॅक वाले सरळ होणार !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
I
IT hamal गुरुवार, 07/13/2017 - 11:55 नवीन
साहेबांच्या दहीहंडीत सर्वात खालच्या थरात उभे राहणारे ही आजकाल स्कॉर्पिओ त बसायला लाजतात....पुण्यातल्या दुबईत तर आजकाल चार बांगड्यावाली गाडी ही outdated झालीय.. कमळाच्या आश्रयाला गेलेले सगळे घड्याळवाले तर फक्त जग्वार आणि तत्सम चारचाक्यात बसतात ....pcmc ची एवढी ५ वर्षाची मुदत संपत येईतो ४/५ तरी हमर येतील आमच्या पुणेरी दुबईत ...हाय काय न नाय का !!! अन लोकांना वाटतेय कि नोटबंदी आणि GST मुले सगळे ब्लॅक वाले सरळ होणार !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
इ
इरसाल कार्टं गुरुवार, 07/13/2017 - 13:10 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: IT hamal
म
मराठी_माणूस Wed, 07/12/2017 - 08:02 नवीन
http://www.loksatta.com/thane-news/shiv-sena-shakha-pramukh-gulabrao-patil-shiv-sena-crime-1509085/
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Wed, 07/12/2017 - 10:00 नवीन
सध्याच्या शिवसेनेची हालात, सतत काहितरी बडबडत राहणार्‍या वेड्यासारखी झाली आहे. एकिकडे समृद्धी महामार्गासाठी यांचेच मंत्री एकनाथ शिंदे, ह्या प्रकल्पात जमीनी जाणार्‍या शेतकर्‍यांना भेटून 'हा महामार्ग शेतकर्‍यांच्यासाठी कसा हिताचा आहे' हे पटवून देत आहेत तर दुसरीकडे सेनेचे कार्यध्यक्ष ह्या प्रकल्पाला जोरदार विरोध करा, असा आदेश शिवसैनिकांना देत आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/12/2017 - 11:17 नवीन
+१ उद्धव, राऊत, कदम इ. शिवसेनेचे नेते जे रोज बोलतात त्याचे बेताल बरळणे या दोन शब्दातच वर्णन करता येईल. युती सरकारमध्ये आपल्याला दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली आहे व सत्तेची हाव असल्याने सर्व अपमान गिळून आपल्याला सत्तेत रहावे लागत आहे हे शिवसेनेला इतके झोंबत आहे ही त्यांना आता जळीस्थळीकाष्ठीपाषाणी फक्त मोदी आणि भाजपच दिसतो. मोंगलांच्या सैनिकांच्या घोड्यांना संताजीधनाजी पाण्यात दिसायचे असे म्हणतात. तसेच शिवसेनेला सर्वत्र मोदी आणि भाजपच दिसतात. केंद्राच्या व राज्याचा प्रत्येक निर्णयाला कडाडून विरोध (आणि ते सुद्धा स्वतः दोन्हीकडे सत्तेत राहून), अत्यंत अभद्र भाषेत टीका, पोकळ बढाया इ. मुळे उद्धव, राऊत व सेनानेते हे लाफिंग स्टॉक बनले आहेत. आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत, पुढील महिन्यात आम्ही भूकंप करणार आहोत, आम्हीच यांच्या कंबरड्यात लाथा घालून कर्जमाफी करायला लावली इ. बेताल बडबड ऐकून फक्त करमणूक होते. पुढील निवडणुकीत सेनेला फार मोठा फटका बसणार आहे. शिवसेना सत्तेत असल्याने त्यांना जनता विरोधक मानत नाही आणि शिवसेना सत्तेत असून सुद्धा सातत्याने सरकारवर टीका करीत असल्याने सरकारच्या चांगल्या कामाचे श्रेय त्यांना मिळत नाही. अशा तर्‍हेने दोन्ही बाजूने मते मिळणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
श
श्रीगुरुजी Wed, 07/12/2017 - 11:06 नवीन
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्‍या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले. बाळ ठाकर्‍यांचे ते वाक्य हे जबाबदारी स्वीकारणे नसून उलट आम्ही हे केलेले नाही असेच सांगणारे होते. जेव्हा जेव्हा एखाद्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात तेव्हा तो नेता "मी जर भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले तर मला जाहीर फाशी द्या" किंवा "मी जर भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले तर मी राजकारणातून कायमचा निवृत्त होईन" असे जेव्हा सांगतो तेव्हा तो नेता केलेल्या भ्रष्टाचाराची जबाबदारी घेत नसून "मी भ्रष्टाचार केलेलाच नाही" असे ठासून सांगत असतो. बाळ ठाकर्‍यांचे जर-तरच्या स्वरूपातील वरील वाक्य मशीद शिवसैनिकांनी पाडली याची जबाबदारी स्वीकारणारे नसून ती जबाबदारी नाकारणारे आहे. जर बाळ ठाकरे केलेल्या कृत्याची जबाबदारी घेण्याइतके निर्भीड होते तर श्रीकृष्ण अहवालात त्यांच्यावर जोरदार ठपका ठेवल्यानंतर दंगलीची जबाबदारी न स्वीकारता त्यांनी तो अहवाल फेटाळून का लावला होता?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 07/12/2017 - 18:11 नवीन
मला ही तेच म्हणायचे होते. बाळासाहेबानी ते वाक्य म्हंटले की जर केलेले असेल तर.... या नरोवा कुंजरोवाचा अर्थ लोकांनी वेगळाच घेतला. दुर्दैवाने भाजपने त्यावेळेस नेहमीसारखीच अत्यंत सोयीस्कर म्हणजे" हे आम्ही केलेले नाही. कोणी केले ते आम्हाला माहीत नाही. विश्व हिंदू परिषदे ने केले असेल तर विश्व हिंदु परिषद म्हणजे संघ नव्हे . संघ म्हणजे भाजप नव्हे " अशी भूमीका घेतली होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
द
दशानन Wed, 07/12/2017 - 18:29 नवीन
कारसेवक (?) कोणाच्या हाकेला आले? घर घरसें इट! ही घोषणा, किंवा सर्वधर्म परिषद मध्ये कोणी एकमताने निर्णय घेतला की राम मंदिर वही बनेगा! याची उत्तरे मिळाले तर धनी कोण सहज समजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सुज्ञ Wed, 07/12/2017 - 13:00 नवीन
सोडा गुर्जी कशाला नादाला लागताय . आपलेआपण खड्डयात जाणारा पक्ष आहे तो . केजरीच्या आप सारखा . विकासाची कुठलीही कामे नाहीत, कोणतीही दिशा नाही , कोणत्याही नावे घेण्यासारख्या ठोस योजना यांनी कधीही दिल्या नाहीत. (ज्या किमान इतर पक्षांनी नक्कीच दिल्या) . केवळ भावनिक/ भाषिक राजकारण आणि महत्तम कर्तृत्व दंगलीत लोकांना वाचवलं हे . ते ही का कसे ते नक्की नाही . बास झाल्या या असल्या गोष्टी . द्या सोडून . राऊत आणि उधोजीराव लावतीलच वाट
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/12/2017 - 13:53 नवीन
+१ अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार व राजकारण, संरक्षण क्षेत्र इ. क्षेत्रात ज्ञानी असलेला एकतरी माणूस आहे का शिवसेनेत? यातल्या कोणाला जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था, प्रशासन इ. विषयातील काही समजते? रोज एका नवीन विषयावर आंदोलन करणे, दगडफेक, तोडफोड, जाता येता शिवाजी महाराजांचे नाव घेणे, प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीला शिवाजी महाराजांचे नाव देणे (उदा. शिववडापाव, शिवजलक्रांती, छत्रपती शिवाजी टर्मिनस इ.)., दर दोन मिनिटांनी आम्ही वाघ आहोत अशा फुशारक्या मारणे, स्वतःकडे कोणतेही ज्ञान व माहिती नसताना जगातील यच्चयावर प्रत्येक गोष्टीवर आपली अक्कल पाजळणे, आपल्याला विरोध करणार्‍या प्रत्येकावर अत्यंत खालच्या थरावर जाऊन शिवराळ व असभ्य भाषेत टीका करून त्यांचा उपहास करणे इ. पलिकडे शिवसेनेने आजवर काही केले आहे का? शिवसेनेने आजवर एकतरी शिक्षणसंस्था, सहकारी संस्था, एखादा कारखाना इ. गोष्टी निर्माण केल्या आहेत का? पूर्वी बाळ ठाकरे सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात 'मातोश्री'त वातानुकुलीत खोलीत बसून पाईप ओढत आणि श्वेत वाईनचे घुटके घेत 'मला फक्त एक दिवस पंतप्रधान करा. २४ तासांच्या आत काश्मिर प्रश्न सोडवितो.' असल्या गफ्फा 'सामना'तून हाणायचे. राणेला शिवसेनेतून काढल्यानंतर बाळ ठाकर्‍यांनी त्याच्याबद्दल जी घाण भाषा वापरली ती लाज वाटण्यासारखी होती. उद्धव व राजकडे त्यांचाच वारसा आला आहे. उद्धवची भाषणे म्हणजे 'वाघनखे खुपसू, कोथळा बाहेर काढू, मुसक्या बांधू, तुटुन पडू, भाला, बरची, तलवारीने गर्दन मारू, हात कलम करू, बोटे तोडू, कबर बांधू, थडग्यात गाडू, शाहिस्तेखान, अफझलखान, आदिलशहा . . . ' या पलिकडे काहीही नसतं. ज्याप्रमाणे राहुल दिग्विजय, सिब्बल, खुर्शीद इ. चांडाळचौकडीसहाय्याने काँग्रेसला संपविण्याच्या मार्गावर आहे, त्याचप्रमाणे उद्धवसुद्धा राऊत, कदम इ. चांडाळचौकडीच्या सहाय्याने शिवसेनेला संपविणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
प
प्रविन ९ Wed, 07/12/2017 - 13:06 नवीन
हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही........... मुंबईत मिसल पाव कोनि वाचत नहि अस कि काय ???
  • Log in or register to post comments
प
प्रविन ९ Wed, 07/12/2017 - 13:08 नवीन
तशी गर्दी अनेकांच्या अंत्ययात्रेला जमते. त्यात काहीही विशेष नाही.......... उदाहरन ???
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/12/2017 - 13:19 नवीन
बुर्‍हान वाणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रविन ९
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 07/12/2017 - 14:14 नवीन
अज्ञानमूलक उत्तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ज
जयन्त बा शिम्पि Wed, 07/12/2017 - 13:15 नवीन
सुज्ञ यांच्या मताशी १०० % सहमत.
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ Wed, 07/12/2017 - 13:19 नवीन
यातच खरेतर सर्वकाही आले. निव्वळ गुंड/ झुंडगिरी च्या जोरावर हा पक्ष टिकला/ वाढला. छत्रपतींसारख्या दाढ्या वाढवून फिरणारे यांचे सैनिक पाहिले की वाटत जग कुठे चालले आणि हे कुठे चाललेत . तुम्ही शिवसैनिक आहात, शिवसैनिक डरत नाही वाघासारखा धाऊन जातो वगैरे बाष्कळ बडबड आणि डोकी भडकवणारी टाळ्याखाऊ वाक्ये पूर्वी चालायची. किंबहुना यावरच यांच्या प्रमुखांनी स्वतःची घरे पोसली पण हास्यास्पद झालंय आता सगळं . . असो . यांच्या करकीर्दीस शुभेच्छा
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 07/12/2017 - 13:49 नवीन
हीच झुंडगिरी आता कळफलक बडवणाऱ्या भाजपच्या समर्थकांनी सुरु केली आहे. गुंडगिरी करू शकत नाहीत कारण त्यासाठी मनगटात रग असावी लागते. बाष्कळ बोलण्यात आणि टाळ्याखाऊ भाषणाची शिवसैनिकांची जागा आता भाजप वाल्यानी घेतली आहे. आमचं चांगलं चालाय शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा. हीच विचारधारा शाश्वत लोकशाहीला मजबूत ठेवील हा विश्वास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
म
मोदक Wed, 07/12/2017 - 14:17 नवीन
शाश्वत लोकशाहीची तुमची व्याख्या काय आहे..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ज
जेम्स वांड Wed, 07/12/2017 - 15:00 नवीन
नका ताणू दादा, लोकशाहीत शाश्वत फक्त मतपेटी अन ईव्हीएम असते अन बाकी सगळे मोहमाया ;) प्रत्येकाला आपण 'शाश्वत लोकशाही देऊ' अशी स्वप्ने विकायची असतात, मग महापुरुष वेठीस धरले जातात. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
विशुमित गुरुवार, 07/13/2017 - 08:18 नवीन
शाश्वत लोकशाही ची माझी व्याख्या "न्याय, स्वतंत्र, समता आणि बंधुता" ही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
श
श्रीगुरुजी Wed, 07/12/2017 - 16:58 नवीन
आमचं चांगलं चालाय शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा. हीच विचारधारा शाश्वत लोकशाहीला मजबूत ठेवील हा विश्वास आहे. जातीयवादी काड्या, मनसोक्त भ्रष्टाचार हीच शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Wed, 07/12/2017 - 17:10 नवीन
तुम्ही शिवसैनिक आहात, शिवसैनिक डरत नाही वाघासारखा धाऊन जातो वगैरे बाष्कळ बडबड आणि डोकी भडकवणारी टाळ्याखाऊ वाक्ये पूर्वी चालायची. किंबहुना यावरच यांच्या प्रमुखांनी स्वतःची घरे पोसली पण हास्यास्पद झालंय आता सगळं . . शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे आणि त्यांचा मराठी बाणा सुद्धा एक शुद्ध फसवणूक आहे. एकीकडे मराठी, मराठी करताना दुसरीकडे यांनी प्रितिश नंदी चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, संजय निरूपम, राम जेठमलानी यांना राज्यसभेच्या खासदारकीची तिकिटे विकली. उत्तर भारतीय, बिहारींना विरोध करताना 'दोपहरका सामना' हे हिंदी वृत्तपत्र काढून संजय निरूपम या बिहारीला त्याचा संपादक केले. यांची मुले कॉन्व्हेंट मध्ये शिकली. मुंबईत येणार्‍या अमराठींना शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, आधार पत्र, निवासी दाखला, रिक्षा चालक परवाना, टॅक्सी चालक परवाना इ. मिळवून देण्यात इतर पक्षांप्रमाणे यांचे नगरसेवक सुद्धा होते. मुंबई महापालिकेची बहुसंख्य कंत्राटे अमराठींना देण्यात हेच पुढे होते. वाघाचा पंजा, डरकाळी असले हास्यास्पद शब्द वापरून हे स्वतःचेच हसे करून घेतात. आता तर २० कोटींचा ६ मजली 'मातोश्री २' हा नवीन बंगला बांधत आहेत. हे शेतकर्‍यांच्या नावाने सारखा हंबरडा फोडत असतात. आत्महत्या केलेल्या प्रत्येक शेतकर्‍याच्या कुटुंबाला यांनी या २० कोटीतून प्रत्येकी १ लाख रूपये दिले असते, तर २००० कुटुंबांना आधार मिळाला असता. पण स्वतः खिशातून १ रूपया सुद्धा द्यायचा नाही, लंडनमध्ये जाऊन महिनाभर मजा मारायची आणि आम्हीच शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळवून दिली अशा गफ्फा हाणायच्या यात हे वाकगबार आहेत. बाळ ठाकरे गेल्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार शिवाजी पार्क मैदानावर केले. त्यानंतर यांनी हे संपूर्ण मैदानच स्मारकासाठी बळकावण्याचा प्रयत्न केला होता. अंतिम संस्कारानंतर जवळपास महिनाभर दहनासाठी उभारलेला चौथरा तसाच ठेवून रोज त्यावर हार, फुले वाहून त्या चौथर्‍याचे समाधीस्थळ करण्याचा यांचा प्रयत्न होता. महापालिकेने किंवा अतिक्रमण विभागाने चौथरा काढू नये यासाठी शिवसैनिक २४ तास पहारा देत होते. शिवाजी पार्क स्मारकासाठी देऊन टाका अशाही मागण्या होत होत्या. शेवटी केतन तिरोडकर व इतर काही जण याविरूद्ध न्यायालयात गेल्यानंतर चौथरा काढून टाकून मैदान फक्त खेळासाठी वापरण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर शेवटी पोलिस बंदोबस्तात तो चौथरा हटविण्यात आला. तसे झाले नसते तर ते मोठे मैदान यांनी गिळंकृत केले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
क
कुंदन Fri, 07/14/2017 - 19:07 नवीन
मग 'मातोश्री १' मध्ये स्व. बाळा साहेबांचे स्मारक होणार तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा