Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिवसेना..... ???

व
विजुभाऊ
Tue, 07/11/2017 - 16:33
🗣 329 प्रतिसाद
शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष. छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही. सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी. मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही. पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती. सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर. बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्‍या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले. त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला. सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही. याबद्दलही काही विचारायचे नाही. लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची. सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे. शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती. शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत. हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती, राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते. या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते? एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे. मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे. १९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले ( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
119176 वाचन

💬 प्रतिसाद (329)
स
सुज्ञ Wed, 07/12/2017 - 15:00 नवीन
"गुंडगिरी करू शकत नाहीत कारण त्यासाठी मनगटात रग असावी लागते." या एकाच वाक्यातून भाजप सोडून सर्वजण गुंडगिरी करतात हे तुम्ही मान्य केले ते बरे झाले . बाकी कळफलक बडवून शाब्दिक बोलणे किंवा चर्चा करणे ( ज्यास आपण गुंडगिरी असे म्हटले आहे) आणि खरीच गुंडगिरी एखाद्याला झोडपणे यातील फरक आपल्याला कळणार नाहीच कारण त्यासाठी काहीतरी कुठेतरी असावे लागले असे असावे .
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 07/13/2017 - 07:29 नवीन
<<<या एकाच वाक्यातून भाजप सोडून सर्वजण गुंडगिरी करतात हे तुम्ही मान्य केले ते बरे झाले>>> ==> मला हे मान्य नाही. सबसे बडा गुंडा तर जुमला पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. <<<<बाकी कळफलक बडवून शाब्दिक बोलणे किंवा चर्चा करणे ( ज्यास आपण गुंडगिरी असे म्हटले आहे)>>> ==> त्याला मी झुंडगिरी म्हंटले आहे. गुंडगिरी करायला मनगटात दम लागतो (नुसत्या काठ्या आपटून चालत नाही). हे मी कुठे चुकीचे बोललो. <<<<यातील फरक आपल्याला कळणार नाहीच कारण त्यासाठी काहीतरी कुठेतरी असावे लागले असे असावे .>>> ==> "काहीतरी कुठेतरी" कुठे मिळेल हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
स
सुज्ञ गुरुवार, 07/13/2017 - 07:51 नवीन
करा अजून गुंडगिरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
त
तेजस आठवले Wed, 07/12/2017 - 15:14 नवीन
गुंडगिरी करू शकत नाहीत कारण त्यासाठी मनगटात रग असावी लागते.
आणि त्याबरोबर १०.१० मि. वेळ दाखवणारे घड्याळ किंवा ढाण्या वाघाचे छायाचित्र. बाकी शिवसेना संपेल असे अजिबात वाटत नाही. आपल्याकडे बापजाद्यांच्या पूर्वपुण्याईवर पुढच्या बऱ्याच पिढ्या तगवण्याची भावनिक परंपरा आहे. असो, दुसऱ्यांसाठी खणलेल्या खड्ड्यात उडी मारण्याची सुप्त इच्छा असू शकते खणणाऱ्याला! - २०१४ निवडणुकीत भाजपने स्वतंत्र उमेदवार उभा न केल्याने नाईलाजाने शिवसेनेला मत द्यावे लागलेला बालेकिल्ल्यातील एक नागरिक.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 07/13/2017 - 07:36 नवीन
<<<<आणि त्याबरोबर १०.१० मि. वेळ दाखवणारे घड्याळ किंवा ढाण्या वाघाचे छायाचित्र.>>> ==> नाही हो. आता ते कमळाचा स्टिकर लावतात. पुणे- पिंपरी चिंचवड मध्ये फॉर्च्युनर गाड्या मला तर खूप दिसतात. <<<<बाकी शिवसेना संपेल असे अजिबात वाटत नाही. आपल्याकडे बापजाद्यांच्या पूर्वपुण्याईवर पुढच्या बऱ्याच पिढ्या तगवण्याची भावनिक परंपरा आहे. >> ==>> सहमत <<<२०१४ निवडणुकीत भाजपने स्वतंत्र उमेदवार उभा न केल्याने नाईलाजाने शिवसेनेला मत द्यावे लागलेला बालेकिल्ल्यातील एक नागरिक.>> ==> तुम्ही नाटो वापरायला पाहिजे होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 07/13/2017 - 08:17 नवीन
तुम्हाला नोटा म्हणायचे असेल बहुतेक! (भाजपने उमेदवार दिला नाही म्हणून नाटोला बोलावयाचे कि काय असे एक क्षण उगाच वाटून गेले :D :D ).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 07/13/2017 - 08:26 नवीन
मात्रा चुकला वाटतं. नोटा च म्हणायचं होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
अ
अनुप ढेरे गुरुवार, 07/13/2017 - 11:36 नवीन
आता ते कमळाचा स्टिकर लावतात. पुणे- पिंपरी चिंचवड मध्ये फॉर्च्युनर गाड्या मला तर खूप दिसतात.
आधी अशी चिन्ह हि घड्याळ किंवा वाघ ही असायची. पंजा वाल्या गाड्या देखील फार कमी दिसतात. गाड्यांवर कमळं दिसणं हे पक्षाचं गुंडगिरीकरण सुरू असल्याचं चिन्ह आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 07/12/2017 - 16:22 नवीन
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 07/12/2017 - 17:10 नवीन
या धाग्याचा वापर मुख्य मुद्द्यावर चर्चा ना करता शिवसेनेवर ओकाऱ्या काढण्यात काही आयडी करणार . आणि त्यांचा अजेंडा राबवणार चिखलात डुकरासोबत मस्ती/कुस्ती करू नये अशी इंग्रजी म्हण आहे
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 07/12/2017 - 18:50 नवीन
गुगलुन पाहिल्यावर सरपोतदारानी ५००० चा जमाव घेवून वांद्र्यात फेरी काढली वगैरे माहिती मिळाली पण तीही अत्यंत तोकडी आणि व्हेग आहे. खरे काय झाले होते किंवा झालेच नव्हते ते समजतच नाही बाकी मुद्दे बोलायचे तर कोंग्रेसच्या अगदी छोट्या नेत्यानीही गावोगावी स्वतःच्या फायद्यासाठी का होईना शाळा इंजीनिअरिंग कॉलेजे, सहकारीसाखरकारखाने. सूतगिरण्या, सहकारी दूध संघ, पतसंस्था वगैरे सुरू केलेले आहे शिवसेनेच्या आमदार खासदारानी अशी काही कामे केलेली ऐकिवात नाही. त्यांच्या ग्रामीण भागात काम करु शकतील असे कोणतेच नेतृत्व नाही. नको तेथे विरोध करत बसल्यामुळे सेनेने सुरेश प्रभुं सारखा मोहरा अलगद भाजपाच्या हातात सोपवून टाकला. ( अवांतरः वाजपेयी सरकार चा एकाच मताने पराभव झाला होता त्यावेळेस सेनेचे एक खासदार आजारी असल्या मुळे संसदेत पोहोचले नव्हते त्यांचे नाव आठवत नाही. बहुतेक रमेश प्रभू असावेत)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/12/2017 - 19:17 नवीन
>>> ( अवांतरः वाजपेयी सरकार चा एकाच मताने पराभव झाला होता त्यावेळेस सेनेचे एक खासदार आजारी असल्या मुळे संसदेत पोहोचले नव्हते त्यांचे नाव आठवत नाही. बहुतेक रमेश प्रभू असावेत) हे १९९३ मध्ये नरसिंहराव सरकार विरूद्ध असलेल्या अविश्वास ठरावावरील मतदानाच्या वेळी घडले होते. तो ठराव रावांनी जेमतेम १४ मतांनी जिंकला होता (२५९ वि. २४५). त्यावेळी सेनेचे मोहन रावळे अनुपस्थित होते. झामुमच्या ५ खासदारांनी प्रत्येकी १ कोटी लाच घेऊन रावांच्या बाजूने मत दिल्याचे नंतर सिद्ध झाले. जनता दलाच्या २० पैकी ७ खासदारांनी सुद्धा रावांच्या बाजूने मत दिले होते. त्यावेळी राव सरकार फोडाफोडीमुळे थोडक्यात वाचले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/13/2017 - 07:19 नवीन
हो ते मोहन रावलेच. नरसिंह राव सरकारवरील जुलै १९९३ मधील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार होते त्याच्या आदल्या दिवशी रावलेंनी दिल्लीत मित्र आणि इतर काहींबरोबर चिकन पार्टी केली आणि त्यामुळे त्यांचे पोट बिघडले असा त्यांनी दावा केला होता. या ठरावावर मतदान रात्री झाले होते पण रावले दिवसभर अनुपस्थित होते. त्यानंतर मोहन रावले बाळासाहेबांच्या मर्जीतून उतरले. चिकन पार्टी आणि त्यामुळे पोट बिघडणे हा दावा बाळासाहेबांना मान्य नव्हता. त्या कारणावरून रावलेंना शिवसेनेतून काढण्यात आले नाही पण त्यानंतरचे जवळपास दोन-अडिच वर्षे ते सेना नेतृत्वापासून दूर गेले होते. १९९५ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळीही त्यांना कोणी विचारले नव्हते. पण राज्यात युतीचे सरकार आल्यावर काही महिन्यात मोहन रावले आणि शिवसेना नेतृत्वात समेट झाला. त्यानंतर रावले १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ मध्येही दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेवर निवडून गेले होते. वाजपेयी सरकारवरच्या एप्रिल १९९९ मधील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी (या मतदानात वाजपेयींचे सरकार एका मताने पडले होते) असा गोंधळ झालेले खासदार शिवसेनेचे नव्हते तर ते होते अण्णा द्रमुकचे सेदापत्ती आर. मुथय्या. या ठरावावर सुरवातीला आवाजी मतदान झाले आणि त्या मतदानात सरकारचा विजय झाला असे अध्यक्ष जी.एम.सी बालयोगी यांनी जाहिर केले. पण अशावेळी एका तरी लोकसभा सदस्याने मागणी केल्यास ठरावावर मतदान घ्यावे लागते. त्याप्रमाणे या ठरावावर मतदान घेतले गेले. सुरवातीला इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मतदान घेतले गेले पण त्यात काही खासदारांनी आपली मते नोंदली गेली नाहीत अशी तक्रार केल्यावर चिठ्ठ्या टाकून पेपरवर मतदान घेण्यात आले. मुथय्यांनी चिठ्ठीवर सरकारविरोधी मत नोंदवले. या चिठ्ठ्या सभागृहातील नोकरांकरवी लोकसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. ५४५ सदस्यांच्या चिठ्ठ्या गोळा करायला अर्थातच वेळ लागला. मधल्या काळात मुथय्यांनी आपली चिठ्ठी खिशात ठेवली आणि ते ती द्यायला विसरलेच. मधल्या काळात ते इतर खासदारांशी बोलायला म्हणून आपल्या आसनापासून दूर गेले होते आणि म्हणून ते चिठ्ठी द्यायला विसरले हे समजत नाही. इतक्या महत्वाच्या वेळी खासदार या महत्वाच्या पदावरील व्यक्ती 'विसरते' हे विश्वास ठेवायला तसे कठिणच आहे. अर्थातच जयललितांनी त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही. मुथय्यांनी वाजपेयी सरकारबरोबर 'डिल' करून मुद्दामून मतदानात भाग घेतला नाही असा ग्रह जयललितांनी केला आणि मुथय्यांना पक्षातून काढले. त्यानंतर काही वर्ष मुथय्या राजकारणातून बाहेर फेकले गेले होते. २००८ मध्ये त्यांनी द्रमुकमध्ये प्रवेश केला आणि अजूनही ते द्रमुकमध्येच आहेत. पण अर्थातच अण्णा द्रमुकमध्ये असताना त्यांना महत्वाचे स्थान होते ते काही द्रमुकमध्ये मिळालेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
द
दशानन Wed, 07/12/2017 - 19:42 नवीन
बर, ते बेळगावचे काय झाले?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/12/2017 - 19:53 नवीन
जे खिशात ठेवलेल्या राजीनाम्यांचं आणि भूकंपाचं झालं तेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 07/12/2017 - 20:03 नवीन
का बुआ शेवटचा मराठी माणूस जिवंत असेपर्यंत बेळगावचा लढा सुरु राहील असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही का ठेवायच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित गुरुवार, 07/13/2017 - 07:12 नवीन
मुख्यमंत्री कुठे महाराष्ट्राचे आहेत. ते तर विदर्भाचे, हे विसरून चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/13/2017 - 11:26 नवीन
बेळगाव आता परत महाराष्ट्रात येणे अशक्य आहे. मागील ५७ वर्षांपासून तो कर्नाटकचा भाग आहे. बेळगाव परत आणण्यासाठी अधूनमधून आंदोलने करण्यापलिकडे महाराष्ट्रातून फारसे काही झालेले नाही. नेहरूंनी ज्या असंख्य गंभीर घोडचुका केल्या त्यात मराठीबहुल बेळगाव व आजूबाजूचा भाग बळजबरीने कर्नाटकात समावेश करणे ही पण एक चूक होती. दस्तुरखुद्द नेहरूंच्या निर्णयाविरूद्ध जाण्याची महाराष्ट्रातील नेत्यांची हिम्मतच नव्हती. त्यांनी तो निर्णय निमूटपणे मान्य केला. 'महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत' हे तर यशवंतराव चव्हाणांनी जाहीर सांगितले होते. बेळगाव कर्नाटकात अधिकृतरित्या गेल्यानंतर महाराष्ट्राने जवळपास ५० वर्षांनी त्याविरूद्ध न्यायालयात दाद मागितली. परंतु तेव्हा खूपच उशीर झालेला होता. हा खटला सर्वोच्च न्यायालयात अजूनही प्रलंबित आहे व नजीकच्या किंवा दूरच्या भविष्यकाळात न्यायालय निर्णय देण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे आहे हीच परिस्थिती अजून बरीच वर्षे कायम राहील. न्यायालयाने निकाल द्यायचे ठरविले तरी १९६० ची परिस्थिती आता ५७ वर्षांनंतर बदलली असल्याने न्यायालय जुना निर्णय फिरविण्याची शक्यता अत्यल्प आहे. न्यायालय जैसे थे परिस्थितीच चालू ठेवावी असाच निर्णय देण्याची दाट शक्यता आहे. फारतर न्यायालय स्वतः निर्णय न घेता निर्णयाचा चेंडू केंद्र सरकारच्या हातात टोलवून केंद्रालाच अंतिम निर्णय घ्यायला सांगतील. कोणतेही केंद्र सरकार आहे ती घडी विस्कटण्याची किंवा बेळगाव महाराष्ट्राला देण्याचा निर्णय घेऊन कानडी नागरिकांचा रोष ओढवून घेण्याची तसेच प्रशासकीय गोंधळ निर्माण करण्याची सुतराम शक्यता नाही. अगदी मराठी माणूस पंतप्रधान झाला तरी बेळगाव महाराष्ट्रात परत येणे अशक्य आहे. बेळगाव कर्नाटकात असल्याने महाराष्ट्रातील इतर नागरिकांना फारसा फरक पडलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु बेळगाव कर्नाटकातून गेले तर कानडी नागरिकांचा रोष होईल व त्यावेळी जे सरकार राज्यात/केंद्रात असेल त्यांना त्याचा फटका बसेल. म्हणूनच कोणत्याही पक्षाचे सरकार महाराष्ट्रात/केंद्रात आले व अगदी मराठी, मराठी म्हणून नाचणार्‍या शिवसेनेचा पंतप्रधान व मुख्यमंत्री झाला तरी आहे त्या परिस्थितीत बदल होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 07/13/2017 - 12:19 नवीन
हे माहित असताना उगाच मोठी वक्तव्ये करून लोकांना आशा लावायच्या कशाला हा मुद्दा आहे आणि त्यात सगळे एका माळेचे मणी आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/13/2017 - 17:24 नवीन
कदाचित त्यांनाही वास्तविकता समजत नसेल किंवा समजून घ्यायची नसेल किंवा मराठी माणसांनी हा मुद्दा इतका भावनिक बनवून ठेवला आहे की बेळगाव आता परत महाराष्ट्रात येणे अशक्य आहे हे समजून घ्यायची इच्छा नसेल. म्हणून अशी वक्तव्ये येत असावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
अ
अद्द्या गुरुवार, 07/13/2017 - 07:14 नवीन
एकुणात महाराष्ट्राची हालत बघता नकोच ते . त्यापेक्षा केंद्रशासित करा ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
व
विजुभाऊ Wed, 07/12/2017 - 20:42 नवीन
शेवटचा मराठी माणूस जिवंत असेपर्यंत बेळगावचा लढा सुरु राहील
म्हणजे तोपर्यन्त प्रश्न सुटणारच नाही याची खात्री आहे म्हणा की
  • Log in or register to post comments
र
रश्मिन गुरुवार, 07/13/2017 - 06:31 नवीन
विजुभौंनी एक वास्तव अधोरेखित केले आहे. आपल्या देशात एका मोठ्या राज्याचे दोन भाग झालेले आहेत (बहुतेक भाजप प्रणित राज्यांमध्ये) मात्र एखाद्या राज्याचा भाग विलग होऊन दुसऱ्या राज्याला जोडला जाणे हे अशक्यप्राय आहे असे वाटते.जाणकारांनी प्रकाश टाकावा ( किंवा उजेड पाडावा ! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सुज्ञ गुरुवार, 07/13/2017 - 06:26 नवीन
प्रसाद सर . आपणच खरे शिवसैनिक. स्वगत : च्यायला जमाना सारक्याजम चा आहे तर
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 07/13/2017 - 08:31 नवीन
मी शिवसैनिक नाही भक्त नाही कि खांग्रेसी नाही (सारक्याजम का काय)! जे आहे ते बोलावं ना! उगीच काहींच्या काही गोष्टींचं क्रेडिट भाजपला देण्याच्या उपद्वव्यापामुळे भाजपने केलेल्या खऱ्या चान्गल्या गोष्टींवर सुद्धा पाणी फिरायला लागते बऱ्याच वेळेस! शिवसेनेच्या सद्याच्या बऱ्याच गोष्टी न पटण्याजोग्या आणि आडमुठ्या भूमिकेतून असल्याचं दिसत राहतं आणि ते स्पष्ट आहे. पण म्हणून लगेच शिवसेनेने ५१ वर्षात काय केले असा प्रश्न मला तरी पडत नाही. प्रत्येक पक्षाने त्यांच्या राजकारणाची एक दिशा आणि धोरण ठरवलेले आहे आणि हे गेले कित्येक वर्षांपासून आहे. सगळ्याच पक्षांची धोरणे आणि राजकारण शेवटी फोडाफोडी ह्या एकमेव तत्वावर आधारलेले बऱ्याच वेळेस दिसते. म्हणून तो एक धागा पकडून एखाद्याच पक्षाला बडवणे मला पटत नाही. बाकी आपण सुज्ञ आहातच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 07/13/2017 - 08:31 नवीन
मी शिवसैनिक नाही भक्त नाही कि खांग्रेसी नाही (सारक्याजम का काय)! जे आहे ते बोलावं ना! उगीच काहींच्या काही गोष्टींचं क्रेडिट भाजपला देण्याच्या उपद्वव्यापामुळे भाजपने केलेल्या खऱ्या चान्गल्या गोष्टींवर सुद्धा पाणी फिरायला लागते बऱ्याच वेळेस! शिवसेनेच्या सद्याच्या बऱ्याच गोष्टी न पटण्याजोग्या आणि आडमुठ्या भूमिकेतून असल्याचं दिसत राहतं आणि ते स्पष्ट आहे. पण म्हणून लगेच शिवसेनेने ५१ वर्षात काय केले असा प्रश्न मला तरी पडत नाही. प्रत्येक पक्षाने त्यांच्या राजकारणाची एक दिशा आणि धोरण ठरवलेले आहे आणि हे गेले कित्येक वर्षांपासून आहे. सगळ्याच पक्षांची धोरणे आणि राजकारण शेवटी फोडाफोडी ह्या एकमेव तत्वावर आधारलेले बऱ्याच वेळेस दिसते. म्हणून तो एक धागा पकडून एखाद्याच पक्षाला बडवणे मला पटत नाही. बाकी आपण सुज्ञ आहातच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
स
सुज्ञ गुरुवार, 07/13/2017 - 09:15 नवीन
"सगळ्याच पक्षांची धोरणे आणि राजकारण शेवटी फोडाफोडी ह्या एकमेव तत्वावर आधारलेले बऱ्याच वेळेस दिसते." फोडाफोडी म्हणजे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 07/13/2017 - 10:15 नवीन
विभागणे या अर्थाने, किंवा लौकिकार्थाने "पोलरायझेशन".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
व
विजुभाऊ गुरुवार, 07/13/2017 - 14:40 नवीन
प्रत्येक पक्षाने त्यांच्या राजकारणाची एक दिशा आणि धोरण ठरवलेले आहे
सेनेची आनि भाजपची दिशा आणि धोरणे बरेच वेळा बदलली आहेत. ती ही १८० अंशातून उदा : गांधीविरोधापासून ते गांधीवादी समाजवादापर्यन्त आणि त्या नंतर स्वदेशी पासून ग्लोबल इंडिया पर्यन्त. सेनेची दिशा आणि धोरणे गुप्त ठेवलेली आसावीत ती नक्की काय आहेत हे मिलिंद आणि उधोजीच जाणोत. सेनेने वसंत सेना या पासुन सुरू करून लुंगी हटाव पुंगी बजाव , मराठी माणसाचा आवाज पासून मी मुंबईकर . हिंदुत्व हे नाणे अचानक कधीतरीच काढत असतात. रच्याकने सेनेची दिशा आणि धोरणे नक्की काय आहेत हे इथे सांगाल का प्रसाद भाऊ/ताई?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 07/14/2017 - 08:32 नवीन
तुम्ही धोरणे आणि विषय यात गल्लत करत आहात असे मला वाटते. अशा काही विषयांवर १८० अंशात वळणे हि सर्व राजकीय पक्षांची खोड आहे. भाजप शिवसेनेने हिंदुत्व सोडून सेकुलर धोरण घेतले नाही किंवा विरुधार्थने काँग्रेसने नसे काही केले नाही या अर्थाने माझे म्हणणे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
र
रामदास२९ गुरुवार, 07/13/2017 - 08:58 नवीन
शिवसेना आणि भाजपा आपापसात भान्डत बसून ऑवैसी साठी महाराष्ट खुला करत आहेत असा वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर गुरुवार, 07/13/2017 - 09:32 नवीन
शिवसेना आणि भाजप ला हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी ओवेसीची गरज आहे आणि ओवेसीला मुस्लिम मतांसाठी. आधी हेच काम अबू आझमी करायचा. आणि त्याच अबू आझमीला शिवसेना-भाजपच्या संयुक्त सत्तेने मुंबई महानगरपालिकेत मांडीवर बसवून भागीदार करून घेतला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/13/2017 - 11:29 नवीन
ओवैसी आणि अबू आझमी हे दोघेही नगण्य आहेत. महाराष्ट्रात किंवा इतरत्रही त्यांच्यामुळे अत्यल्प फरक पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९
स
सतीश कुडतरकर गुरुवार, 07/13/2017 - 09:29 नवीन
अडवाणी आणि चेले आग लाऊन स्वतः कडीकुलुप घालून घरात लपून बसले आणि आता विचारतायत कोणी काय केले.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 07/13/2017 - 11:00 नवीन
कोणाचही सरकार असेना , अतिशय पारदर्शी (?) व्यवहार असलेला टोल मात्र बिनबोभाट चालु रहातो.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 07/13/2017 - 11:27 नवीन
खुप छान धागा ! अतिशय मौलिक माहिती मिळाली. अगदी मिपाच्या (हल्लीच्या) परंपरेस साजेशी. साहित्य प्रकाराच्या टॅब अंतर्गत चिखलफेक / धुळवड / लठ्ठालठ्ठी यासारख्या एखाद्या नावाने एखादे सदर चालु करावे अशी संपादकांना नम्र विनंती ! વિજુભાઈ, નાટક, સિનેમા પર કાંઈ લખો ! આ શું લઈને બેઠા છો ?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 07/13/2017 - 14:43 नवीन
नक्की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
व
वरुण मोहिते गुरुवार, 07/13/2017 - 11:40 नवीन
ह्याशिवाय ह्या धाग्याला काडीमात्र महत्व नाही .
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 07/13/2017 - 11:51 नवीन
त्यात नवल काय? कधी पंढरीची वारी, कधी शिवसेना असले विषय घेऊन काड्या टाकायच्या, अशी ना तशी भाजप्यांना असलेली सेनेची गरज संपलीय, मग ऑटोमेटीक सेनाद्वेषाच्या ओकार्‍या सुरु होतात. ह्या माहीतीतून धागालेखक काय दिवे लावणारेत तेही माहीते अन प्रतिसादक काय लिहिणारेत तेही पाठ झालेय अगदी. . तिळगुळ घ्या, गोड बोला अन तुमची* तिकडेच घाला. . . . *पुचाट करमणूक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
विजुभाऊ गुरुवार, 07/13/2017 - 14:49 नवीन
दिवे लावणे वगैरे लिहून कृपया वैयक्तीक पातळीवर घसरू नये ही विनंती. सेनेने काय केले हे कोणीच सांगितले नाही. अर्थात जिथे मुद्दलातच काही नाही तेथे काही सांगण्यासाअरखे मिळेल असे असणार नाही हे सिद्धच झाले. तुम्ही सुसंस्कृत आहात. तुमच्या प्रतिसादातील गलीच्छ भाषेबद्दल काही बोलावे इतकीही त्याची दखल घ्यावी असे वाटत नाही. दुर्लक्श्य हाच एकमेव प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/13/2017 - 14:57 नवीन
>>> सेनेने काय केले हे कोणीच सांगितले नाही. अर्थात जिथे मुद्दलातच काही नाही तेथे काही सांगण्यासाअरखे मिळेल असे असणार नाही हे सिद्धच झाले. + १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सौन्दर्य गुरुवार, 07/13/2017 - 20:46 नवीन
मी वर लिहिल्याप्रमाणे पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की १९८० च्या दशकात शिवसेनेने 'स्थानीय लोकाधिकार समिती'द्वारे हजारो स्थानीय तरुणांना रोजगार मिळवून दिला होता. बहुसंख्य सरकारी आस्थापनांना स्थानीय तरुणांना नोकरी देण्यास भाग पाडले होते. ८०% नोकऱ्या स्थानीय लोकांना मिळाल्या पाहिजेत हा आग्रह शिवसेनेने धरला होता आणि तो पूर्ण पण केला. त्या काळातील सेनेच्या शक्तीमुळे मुंबईतील पर प्रांतीय, स्थानिक लोकांना थोडे वचकूनच होते. मराठी माणसाला (घाबरून का होईना) थोडाफार मान मिळायला लागला होता. 'स्थानिक मराठी माणूसाचे भले' ह्या तत्वापासून त्यांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला तरी मराठी माणूस शिवसेनेला धरून होता. मात्र ज्या क्षणी शिवसेनेने मराठी माणूस सोडून इतर लोकांना जवळ करायला सुरवात केली त्याच वेळी शिवसेनेची विश्वासहर्तता उतरणीस लागली. शिवसेनेची झुणका-भाकर केंद्रे, वडापावाच्या गाड्या, एस टी डी/पिसिओ बुथ्स , हे साउथ इंडियन, उत्तर प्रदेशीय मंडळी चालवायला लागली आणि लोकांचा शिवसेनेवरचा विश्वास कमी होऊ लागला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 07/14/2017 - 11:22 नवीन
स्थानीय लोकाधिकार समिती किंवा १९९३ च्या दंगलीत काही लोकांना सेनेने बदडून काढलं ही मोठी कामे आहेत हे क्षणभर गृहीत धरलं तरी या व्यतिरिक्त ५१ वर्षात त्यांनी अजून काही केलं आहे का? या दोन तथाकथित 'मोठ्या' कामांचा त्यांना कामाच्या तुलनेत कितीतरी प्रचंड मोबदला मिळालेला आहे. १९९३ नंतर मागील २४ वर्षात त्यांनी काही केले आहे का? कोणत्याही पक्षाचे भवितव्य तो पक्ष सध्या काय करतो व भविष्यासाठी त्याच्या काय योजना आहेत यावर अवलंबून असते. कॉंग्रेस २०१७ सालातही दांडी यात्रा, चलेजाव चळवळ इ. पुढे जातच नाही. सेनेकडे वर्तमानकाळासाठी व भविष्यासाठी कोणत्या योजना आहेत? सेनेची आर्थिक धोरणे काय आहेत? शेती, उद्योगधंदे इ. च्या विकासासाठी त्यांच्याकडे काही योजना आहेत का? सेनेकडे स्वत:चे आर्थिक, सामाजिक, राजकीय, उद्योग, शिक्षण इ. साठी धोरण असल्याचे आजवर दिसलेले नाही. कोथळा, तलवार, खंजीर, भाला, थडगं, आदिलशहा, शाहिस्तेखान इ. व्यतिरिक्त त्यांच्याकडे सांगण्यासारखे काय आहे? यांचे शेती धोरण म्हणजे कर्जमाफी. त्यापलिकडे यांना काहीही माहिती नाही. १९८५ पूर्वी सेनेला मुंबई-ठाण्याच्या बाहेर सेनेला फारसे कोणी ओळखत नव्हते. भाजपशी युती झाल्यामुळे सेना मुंबई-ठाण्याच्या बाहेर लोकांना माहिती झाली. भाजपने तळागाळात आपला विस्तार केला, परंतु त्याचा सर्वाधिक फायदा सेनेला झाला. युतीचे यश हे आपल्यामुळेच आहे या भ्रमात सेना अजूनही वावरत आहे. सेना कोणत्या विकासकामांमुळे, नवीन विचारांमुळे किंवा एखादे मोठे काम केल्यामुळे ओळखली जात नसून राडा, तोडफोड, कोणाच्यातरी प्रतिमेला चपलेने बडवणे, कोणाचे तरी पुतळे जाळणे, ह्याला झापडला, त्याला सटकावला, ठाकरी भाषा या पलिकडे सेनेची ओळख नाही. सेना हे नाव काढल्यावर पोकळ फुशारक्या, अर्वाच्य भाषा, उर्मटपणा, मूर्खपणा याशिवाय दुसरे काही डोळ्यांसमोर येतच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य
व
विशुमित Fri, 07/14/2017 - 12:00 नवीन
<<<<कोणत्याही पक्षाचे भवितव्य तो पक्ष सध्या काय करतो व भविष्यासाठी त्याच्या काय योजना आहेत यावर अवलंबून असते.>>> ==> प्रचंड सहमत. अशा काही योजना शिवसेनेकडे असाव्यात याबद्दल शंका आहे. शाखा पातळीवर सामान्य जनतेची चुटुरफुटूर कामे करण्यात शिवसैनिक सगळ्यांपेक्षा आघाडीवर असतात तेवढीच काही जमेची बाजू. <<<कॉंग्रेस २०१७ सालातही दांडी यात्रा, चलेजाव चळवळ इ. पुढे जातच नाही.>>> ==>> ये थोडा लंबा फेका. हजम नही हुआ. दुसऱ्याच्या (काँग्रेसच्या) योजना ढापण्यात भाजपचा हात कोणताच पक्ष धरू शकत नाही. भाजप वाले अजून गोरक्षा/गोप्रेम (गाय रडली आणि परत आली नाही), योगिक शेती, पूर्वज विमान उडवत होते, वगैरे वगैरे च्या पुढे गेले नाहीत. बाकी बहुतांश प्रतिसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
र
राजाभाऊ गुरुवार, 07/13/2017 - 15:45 नवीन
>>सेनेने काय केले हे कोणीच सांगितले नाही. << सांगायला कशाला हवं? तुम्ही मुंबईतच रहाता ना? गेल्या दोन वर्षांमध्ये तुमच्या चष्म्यावर चढलेली सेना द्वेशाची पुटं/जळमटं झटकलीत तर चित्र स्पष्ट दिसेल. नव्वदिच्या दशकात सत्तेवर असुनहि सेनेने काहिच केलं नाहि हे तुमचं मत असेल तर समजुन घेण्याच्या मनःस्थितीत तुम्ही नाहि आहात असं गृहित धरायला वाव आहे. बाळासाहेब गेल्यावर सेना नेतृत्वात पोकळी निर्माण झालेली आहे याबद्दल शंका नाहि. पण याचा अर्थ असा निघत नाहि कि सेनेने गेली ५० वर्ष काहिच केलं नाहि. शेवटी काय, तर वक्त वक्त कि बात है. आज मंत्री झालेले बिजेपीचे आमदार काल पर्यंत शाखाप्रमुखांचे पाय चाटतानाचे चित्र अजुन लक्षात आहे. आणि इथे एका बाजुने भक्त सेनेवरची भडास काढत असताना तिकडे शहा/मोदिंना अजुनहि मातोश्रीला भेट द्याविशी वाटते यातच सर्व काहि आलं... ;) बाय्दवे, शिवसैनिक ९३ च्या बाँब्स्फोट साखळी (मार्च '९३) नंतर ताकदिनिशी रस्त्यावर उतरला होता. भेंडिबाजार जवळच्या एका पोलिस इमारतीतल्या रहिवाश्यांच्या सुटके व्यतिरिक्त समाजकंटकांना जबरदस्त चोप देण्याचं काम त्यांनी केलं होतं. गंमतीची बाब म्हणजे एरव्हि आपत्कालात मदतीसाठी धाउन जाणारे हाफ चड्डीवाले त्यादिवशी नेमके कुठल्याशा बिळात घाबरुन दडले होते. मेहता मेहल, चर्नी रोडवर माझं ऑफिस त्यावेळी अस्ल्याने हा सगळा आँखोदेखा हाल आहे, गुगल करुन सिलेक्टीव माहिती दिलेली नाहि... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/13/2017 - 17:21 नवीन
भेंडिबाजार जवळच्या एका पोलिस इमारतीतल्या रहिवाश्यांच्या सुटके व्यतिरिक्त समाजकंटकांना जबरदस्त चोप देण्याचं काम त्यांनी केलं होतं. चला, सेनेने ५१ वर्षात केलेले १ काम सापडलं. अजून अशी काही कामे आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाऊ
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 07/13/2017 - 17:43 नवीन
हि २ कामे होतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/13/2017 - 19:00 नवीन
LOL
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
व
विशुमित Fri, 07/14/2017 - 10:19 नवीन
शिवसेनेचे हे तिसरं काम-- http://www.loksatta.com/maharashtra-news/sewer-cleaning-by-shiv-sena-corporator-1511179/ स्वच्छ भारत सेस घेऊन काय स्वच्छतेची काम करतात हे कोणत्या वर्षा पासून जनतेला समजणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अभ्या.. Sat, 07/15/2017 - 12:12 नवीन
सुसंस्कृत तर आहोतच पण आमची संस्कृती हिच सर्वश्रेष्ठ आणि बाकी चिल्लर असला नीचपणा नाहीये अंगात. राहता राहिला वैयक्तिक पातळीचा भाग तर काय गरज आहे सेनेने आजपर्यंत काय केले ह्याचा आढावा असा सार्वजनिक संस्थळावर घ्यायचा? वैयक्तिक मत बनवणार असाल तर आजपर्यंत इतके धागे आलेले आहेत, इतकी आगपाखड झालेली आहे, सेनेचे नाव घेताच फसफसणारे आकडेमोडतज्ञ मिपावर आहेत ही वस्तुस्थिती आपणासारख्या ज्येष्ठ्श्रेष्ठ सदस्याला माहीत नसावी ह्याचे नवल आहे. बरं ह्यापेक्षा आपण काही विषयाचा अभ्यास केलेला किंवा रस असावा/ दिसावा म्हणले तर तेथेही दिवाच आहे. आता हे पाहा शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष. राष्ट्रीय पातळीवर छोटाच आहे पण राज्यपातळीवर सत्तेत बसलेला, प्रथम क्रमांकाच्या पक्षापेक्षा थोडीशी कमी मते मिळालेला, कित्येक वर्षे सत्ताधारी पक्षाशी लढणारा पक्ष आहे. टोटल संसदेत नगण्य असला तरी इतर प्रादेशिक पक्षांपेक्षा बरीचसे सातत्य ठेवून लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची ताकद असलेला पक्ष आहे. छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही. दुसरे अज्ञानी विधान, जरा आमदारांची लिस्ट काढून पहा, कोकण, मराठवाडा, विदर्भ प. महाराष्ट्रात देखील सेनेचे आमदार आहेत आणि कित्येक जण १५ वर्षाहूनही अधिक वर्षे कट्टरपणे सेनेशी एकनिष्ठ आहेत. सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. अवश्य. पण चष्मा चढवून आणि आधीच वर्तूळ काढून बाण मारणे नको. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. इतके वर्षे हिंदुत्वाचा जयघोष करुन वेळोवेळी प्रातःस्मरणीयांची यादी अपडेट करुन आता विकासाचा अजेंडा मिरवण्यामागील कारणे तशीच बाहेर येत नसतात. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी. असणारच. मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही.पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती. संबंधही नाही, नुसती पुणे मुंबई आणि गिरण्या म्हणजे आक्खा महाराष्ट्र नव्हे. सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर. अर्थात. स्थानिक राजकारणात जनतेची काय अपेक्षा असते ते जनतेने दाखवून दिले. बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्‍या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले. असतेच. विटा आणि कमंडलूसाठी कोण हिंडले हो आधी? प्रस्तावित रामंदिराची चित्रे हेडगेवारांची जन्मशताब्दीचे मुहूर्त साधून कोणी पोहोचवली? राम ह्या विषयावरील बहुतांशी हिंदूची जुळलेली नाळ कोणी राजकारणात एनकॅश केली? त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला. त्याच्या आधीपासून सेनेचे बोर्ड अगदी गावोगावी होते, शाखाही अन कार्यकर्तेही. सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही. याबद्दलही काही विचारायचे नाही. अंदाजपंचे विधान, आपणास इंटरेस्ट असेल तर या एक्दा मराठवाड्यात अथवा प. महाराष्ट्रात. दाखवेन कित्येक संस्था. आता वेबवरील बातम्या अन लिंका ह्यावरच विश्वास ठेवून पूर्वग्रहाला मुंबईत बसून कुरवाळयाचे असेल तर नाईलाज आहे. लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची. प्रोब्लेम काये? ह्यापेक्षा जहाल उपमा वापरल्या गेल्या आहेत. सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे. शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती. शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत. जे सांगतात त्यांना विचारायचे. इथे दंगलीत सापडलेले कुणी आहेत का? हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती, राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते.या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते? एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे. तत्कालीन राज्यकर्त्यांचे धोरण आणि अशा इमर्जन्सीत घडलेल्या तो घटनांचा परिपाक आहे. सेना अथवा पुलीस हे हुकुमाचे ताबेदार असतात. सेनेच्या कार्यकर्त्यांचा लोकल लेव्हलवर चांगला जनसंपर्क असल्याने त्यांनी काय भुमिका घेतली होती, त्याकाळात अ‍ॅक्चुअली काय घडले ह्याचे बरेचसे अहवाल वगैरे प्रकाशित आहेत, त्याची लिंक पण दिलेली आहे त्याचा अभ्यास करावा अथवा स्वतः एखादा अहवाल बनवावा. मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे. १९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले वरील सेम उत्तर. ( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय ) का हो? सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर दाखल गुन्ह्याची जितकी सरासरी असते तितकीच सेनेच्या नावावर पण असणार आहे. केवळ गुंडाचा पक्ष हिच टिका असेल तर महाराष्ट्रातील जनतेने आजपर्यंत इतके आमदार खासदार निवडूनच दिले नसते. त्यामुळे मुंबईत जाऊन उघडपणे बिनधास्त विचारा. जास्तीत जास्त काय होईल? वेडा म्हणतील. ह्यापेक्षा काही नाही. उंच ग्यालरीत बसून कुत्र्यांना छू करुन भुंकवून वैचारीक श्रीमंती दाखवणार्‍यानी असल्यांची पत्रास कशाला बाळगायची? . ............... आता बघा पटते का ते. केवळ पुणे मुंबई ठाणे इतकेच राजकारण माहीत असणार्‍यांनी सेनेच्या नावाने खडे फोडू नयेत. गिरणी कामगारांची आता कदाचित दुसरी तिसरी पिढी तरुण असेल. त्याकाळच्या राजकारणांचे संदर्भ आता उगाळून शिळ्या कढीला उत आणणे आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचे लेबल लावणे चूक आहे. अगदी माझ्या गावात सुद्घा वर्षानुवर्षे शिवसेनेचे राजकारण करणारे आमदार खासदार मी पाहतोय ते गिरणीकामगारांवर नव्हे तर लोकल प्रश्नांवर वेळोवेळी दिलेला लढा आणि प्रभावी जनसंपर्क ह्यावर निवडून आलेले आहेत. जनता ही स्त्रीसारखी असते म्हणतात. तिला शेपूट घालणारा अन वैचारिक काथ्याकूट करणारा नेता नको असतो. तिच्या प्रॉब्लेम्सना समजून, सामोरे जाऊन, काहीही करुन सोडवणारा नेता हवा असतो. साधे परवाचेच उदाहरण घ्या. गावात डुकरांचा प्रचंड त्रास झाला. लहान मुलांना पण हि डुकरे चावू लागली. निवेदने देऊन, मोर्चे काढूनही प्रशासन ढिम्म. सेनेच्या एकाने उचलले डुकराचे पिलू अन ठेवले आयुक्ताच्या केबिनात. तीन दिवसात जवळपास सर्व डुकरे पक्डली गेली. पिल्लू सोडणार्‍यांनी केसेस घेतल्या अंगावर पण मार्गी तर लागला ना प्रश्न. किती दिवस कागदी घोडे नाचवणार? आता अशा आंदोलनांचा विषय म्हणाल तर लहानपणापासून माझ्या जिल्ह्यात अन शेजारील चार पाच जिल्ह्यात शहरी जनतेसोबत, शेतकरी, कामगार अशा अनेक आंदोलनात मी सेनेचे नाव ऐकतोय. पाहतोय. आणि आम्ही मुंबईपासून चारपाचशे कीमी तरी दूर आहोत. मग सेनेने मुंबई दंगलीत काय केले हा प्रश्न जितका फिजूल आहे तितकाच मंदीर आंदोलनात इतर पक्षांनी काय केले हा प्रश्न. अगदी भाजपाचे उदो उदो चालू असले तरी राजकारणात सुरुवात शेटजी भटजींचा पक्ष म्हणूनच हिणवला गेला होता आणि ते संबोधन खरे असावे अशीच वाटचाल होती. मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचे मोहोळ असणारा मुंडेसाहेब सोडले तर दुसरा नेता सांगा. मुंडेसाहेबांचे राजकारण ही सेनेला जवळपास जाणारेच होते. ग्रामीण पार्श्वभुमीमुळे त्यांना महाराष्ट्रातील शेतकरी अन ग्रामीण जनतेच्या प्रश्नांची जाण होती. स्व. महाजन साहेबांनी व त्यांनी सेनेशी नाळ जोडली. हिंदुत्व ह्या एकाच मुद्द्यावर ही युती झालेली होती. तेंव्हाची जनता ही बहुसंख्य हिंदूंचे प्रश्न व अन्यधर्मीयांचे लांगूलचालन अशा तत्कालीन राजकीय धोरणांना कंटाळून युतीच्या मागे उभी राहीली. त्याकाळातही भाजपाकडे कार्यकर्त्यांची वानवाच असायची, ते पुरवले सेनेने. राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अरेरावीला तसेच उत्तर द्यायची ताकद सेनेकडे होती. नुसता भाजपा कदापिहि ग्रामीण भागात उभा राहू शकला नसता. कित्येक भाग तर असे आहेत की ह्या ५-१० वर्षात भाजपा गावात नसायचा. फक्त माहीत असायचा. अर्थात आपले काम साधले की शिव्या देत देत पध्दतेशीरपणे मदत करणार्‍यांना विसरायचे हा टिपिकल भाजपी खाक्या आता दिसून येतोय. अगदी बलराज मधोकांपासून आडवाणींजीपर्यंत जे झाले ते आता सेनेबाबतीत होतेय. गोध्रा प्रकरणापासून मोदीकार्ड चालू शकेल हा अंदाज आला की बाकी सगळ्या गोष्टी विसरुन राजधर्म पाळता न येणार्‍या मोदींना लॉन्च केले गेले. आता विकास अन आक्रमक धोरणांचे जनता स्वागत करतीय ते केवळ हा माणूस आपले प्रश्न सोडवू शकेल, आपली प्रगती घडवू शकेल ह्या विश्वासाने. ह्यात भाजपाच्या धोरणांचा अन पक्षाचा विजय आहे असे समजण्यात गल्लत करु नये. इंदिरा इज इंडीयाला कसे प्रजेने शिस्तीत रस्ते दाखवले हेही विसरु नये. आता विचारसरणीबाबत म्हणले तर मी शिवसैनिक नाही की दुसर्‍या कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता. पण युजअ‍ॅन्डथ्रोची जी पॉलीसी अत्यंत गलिच्छ पणे राबवली जातीय अन ती कशी योग्यच आहे याचा उदोउदो करुन विरोधी विचारसरणी नसतानाही एकेकाळी गळ्यात गळे घालणार्‍या मित्रपक्षांना आता गरज संपली की असे झोडपले जाते त्याचा राग येतो. ह्या पॉलीसीला सपोर्टिंग ही जी सामूहिक हननाची मोहीम राबवली जातीय ती अत्यंत गलिच्छ आहे. स्वतं:ला माहीत असलेले तेवढे पूर्णसत्य असे मानणार्‍या विद्वानांकडून जी एकतर्फी आकडेवारी सादर करुन ह्या विचारसरणीला आंतरजालावर पसरवण्याच्या पध्दतीला गोबेल्सनीतीशिवाय दुसरी उपमा नाही. इतका द्वेष अन त्रास असेल तर सरळ सरळ काडीमोड घेऊन मोकळे व्हावे. सेना काय जबरदस्ती घुसणार नाहीये. पण एका घरात राहून संसाराचे वाटोळे गावभर करणार्‍याला गावाकडे काय म्हणतात ते वेगळे सांगणे नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा