Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिवसेना..... ???

व
विजुभाऊ
Tue, 07/11/2017 - 16:33
🗣 329 प्रतिसाद
शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष. छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही. सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी. मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही. पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती. सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर. बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्‍या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले. त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला. सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही. याबद्दलही काही विचारायचे नाही. लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची. सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे. शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती. शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत. हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती, राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते. या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते? एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे. मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे. १९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले ( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
119176 वाचन

💬 प्रतिसाद (329)
र
रामदास२९ Mon, 07/17/2017 - 08:01 नवीन
निरा आता व्यन्गचित्राकार केव्हापासून झाले. का धापले कुठून? :) .. सगळेच आजकाल बाळासाहेब होउ बघतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गामा पैलवान Tue, 07/18/2017 - 18:28 नवीन
श्रीगुरुजी,
Within this time, he said, they should send a delegation to Amritsar instructing the high priests to issue a hukumnama against the extremists; else he would enforce a social and economic boycott of them.
यालाच ठाकरी पद्धत म्हणतात. ही खूपश्या मराठ्यांना आवडते. भारतातल्या अनेकांना ती आवडू लागलीये. मात्र सगळ्यांना आवडावी असा आग्रह नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/19/2017 - 12:45 नवीन
ठाकरी पद्धत, ठाकरी भाषा, राडा संस्कृती, शिवसेनेच्या पद्धतीने प्रश्न सोडवू, वाघाचा पंजा इ. शब्द आता हास्यास्पद झाले आहेत. मातोश्रीवर सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात वातानुकुलीत खोलीत बसून वाईनचे घुटके घेत आणि पाईप चोखत काहीही बरळायचं आणि त्याचं ठाकरी भाषा म्हणून कौतुक करायचं हा विनोदी प्रकार आहे. २०१२ ला बाळ ठाकरे गेल्यानंतर १८-१९ वर्षांच्या दोन मुलींना धमकावण्यात या वाघांना मर्दुमकी वाटली होती. आता हे वाघ मलिष्काच्या मागे लागले आहेत. मलिष्काच्या घराची तपासणी करून तिथे डेंगूच्या अळ्या वगैर सापडल्या हे सेनेने जाहीर करणे अपेक्षितच होते. शिवसेना किती खालच्या थराला जाऊ शकेल याला मर्यादा नाही. अशीच तपासणी मातोश्रीची केली तर तिथे डेंगूच्या अळ्यांच्या बरोबरीने मेंदूत वळवळणार्‍या अळ्या आणि किडे सुद्धा सापडतील. मलिष्काच्या एका साध्या विडंबन रॅपचा शिवसेनेला प्रचंड धसका बसलेला दिसतो. बाळ ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्रातून उपहास दाखविणे, हसतखेळत टीका करणे हे व्यंगचित्रकाराचे काम असते. उधोजींना ती समज दिसत नाही. मलिष्काच्या गाण्यामुळे त्यांचा तिळपापड झालेला दिसतोय. तिने जर हे रॅप तयार केले नसते तर तिच्या घरी बंदुका आणि बाँब असते तरी ते ह्यांना सापडले नसते. पण तिने हे गाणे प्रसिद्ध केल्यामुळे यांची सटकली आणि लगेच तिच्या घराची तपासणी झाली. हे दिवसरात्र मोदी व फडणविसांच्या नावाने अत्यंत असभ्य भाषेत शंख करीत असतात. पण यांना एक शाकाहारी विडंबन गीत चालत नाही. एकंदरीत भारतामध्ये नाटकीपणाला व ढोंगीपणाला सीमा नाही हे केजरीवालांवरून दिसून येते. भारतामध्ये पोरकटपणाला सीमा नाही हे राहुलवरून समजते. भारतात आचरटपणाला सीमा नाही हे दिग्विजय सिंग वरून समजते. तसेच भारतात मूर्खपणाला सीमा नाही हे टी-गँग वरून समजते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Tue, 07/18/2017 - 19:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 07/18/2017 - 19:20 नवीन
'उठा'ला विनोद नावडे, सेनेला चेष्टेचे वावडे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पुंबा Wed, 07/19/2017 - 07:11 नवीन
मुंबईचे नागरिक सव्वाशे कोटी?? काहीच्च्या काही.. अक्कलशुन्यपणा आहे हे असलं काही करणं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विजुभाऊ गुरुवार, 07/20/2017 - 18:57 नवीन
सेना नेत्याना प्रत्येक गोष्टीत "डाव " का दिसतो? एकुणच या सरवणकर महोदयांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. बाकी ते " मैद्याचं पोतं , बारामतीचा पैलवान , खंडोजी खोपडे , नारोबा ," या पदव्यांना काय म्हणायचे? तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढीला.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुज्ञ Wed, 07/19/2017 - 11:08 नवीन
आत्ता च वाचलेल्या बातमीनुसार या RJ च्या घरी महानगरपालिकेच्या लोकांनी जाऊन झडती घेतली व तिथे डास अळ्या वगैरे शोधल्या म्हणे . म्हणजे ज्या गाण्यात साधं शिवसेनेचं नावही घेतल नाही व विनोदाने जे गाणे तयार केले त्यातही आता हे चिवसैनिक घाणेरडे राजकारण करत आहेत. म्हणजे महानगरपालिकेविरुद्ध काहीही बोलण्याची कुणाला परवानगी नाही नाहीतर ह्यांचे गुंड तयार आहेतच . यातूनच शि(व)सेना हा बौद्धिक व राजकीय दृष्ट्या किती नीच पातळीला पोचलेला पक्ष आहे हे दिसून आले. सैनिकांनी आता RJ किंवा महानगपालिकेविरुद्ध बोलणार्याला धमकवणे हे काम सेनेने केलेल्या कामच्या यादीत टाकण्यास हरकत नाही
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/19/2017 - 12:00 नवीन
सैनिकांनी आता RJ किंवा महानगपालिकेविरुद्ध बोलणार्याला धमकवणे हे काम सेनेने केलेल्या कामच्या यादीत टाकण्यास हरकत नाही सेनेचे अजून एक भरीव काम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
इ
इरसाल Wed, 07/19/2017 - 15:04 नवीन
भाजप+शिवसेना वि. कॉन्ग्रेस मधुन कॉन्ग्रेस बाजुला होवुन जेव्हा भाजप आणी शिवसेना असा प्रकार झाला तेव्हा एकत्रित युतीला नाव ठेवणारे आता फक्त आणी फक्त भाजपला दुषणं देत आहेत. कमाल है भाई (और बहन भी) !
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ Wed, 07/19/2017 - 17:32 नवीन
'बीएमसीवर भरवसा नाय काय' या झी २४ तासच्या विशेष कार्यक्रमात आज आमदार नितेश राणे, मनसेचे संदीप देशपांडे आणि भाजपचे केशव उपाध्ये यांनी अत्यंत मुद्देसूद आपले विचार मांडले. शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकरने झी २४ तासच्या चर्चेतून पळ काढला. नक्की येतो सांगितलेल्या पेडणेकर बाईंची खुर्ची शो संपेपर्यंत संपादक उदय निरगुडकर यांनी रिकामी ठेवली. आणि यांचा पळपुटेपणा जनतेसमोर आणला. खरंतर या बाईंना आजवर मी कधी मुद्द्यावर बोलताना बघितलं नाही. समोरच्याना अरेतुरे करून हमरीतुमरीवर येऊन शो मध्ये वाद घालायचे हीच या बाईंची आजवरची प्रवक्तेगिरी. दुसरीकडे म्हणे या पेडणेकर बाईंनी मलिष्काला उत्तर द्यायला गाणे रचले. आम्ही पाहिले ते गाणे. धड गाणं पण बनवता येत नाही या बाईंना. ना सूर, ना ताल, ना कुठले यमक जुळले. ते गाणं पण मुंबईतल्या नालेसफाई सारखं आणि खड्ड्यांसारख खडबडीत...
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 07/19/2017 - 18:26 नवीन
ह्यावेळी सेनेचे चुकलेच राव, त्या आरजेची काय राजकारणाची समज असणारे, बरं ब्रॉडकास्टिंगचा अधिकार असला तरी एफएम चॅनलने राजकीय भाष्ये करू नयेत, निदान मनोरंजनाच्या चॅनेल्स नी तरी , हा अलिखित संकेत तिला माहीत नसावा. शिवाय चॅनेल डीबी ग्रुपचे, मग तर बोलायलाच नको. एकवेळ प्रहार परवडला पण डीबी नको असा प्रकार आहे. बरं हाये क्रियेटीव्हीती तिच्यात तर तिलाच सुपारी देऊन "मोदी, तुमचा पब्लिक वर भरोसा नाय काय" अशीही व्हर्जन काढून एटीम, बँका, पंप, ग्यास एजंसया अशा ठिकाणी रेग्युलरली वाजवता आली असती. अवघड आहे राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
अ
अनुप ढेरे गुरुवार, 07/20/2017 - 07:10 नवीन
आयला, खराब रस्त्यांबद्दल एका गाण्याच्यामार्फत तक्रार करणे हे राजकीय भाष्य?? बर या आख्या गाण्यात शिवसेनेचं कुठेही नाव देखील नव्हतं घेतलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मोदक गुरुवार, 07/20/2017 - 10:38 नवीन
+११ अभिव्यक्तीस्वातंत्र्याची शिवसेनेची व्याख्या काय आहे..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
व
विजुभाऊ गुरुवार, 07/20/2017 - 19:16 नवीन
अभिव्यक्तीस्वातंत्र्याची शिवसेनेची व्याख्या काय आहे..?
लोकाना खंडोजी खोपडे , लखोबा लोखंडे , नार्‍या , अफझलखान म्हणणे , लोकाना शाई फासणे म्हणजे अभिव्यक्ती स्वतन्त्र्य असे त्याना म्हणायचे असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
इ
इरसाल Fri, 07/21/2017 - 09:07 नवीन
तलवार, वाघनखे, दांडपट्टा, बिचवे, गद्दार, पिसाळ झालच तर बांबु, पोकळ बांबु गुप्त्या, कोयता हे राहिले काय ??????????????????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ
अभ्या.. गुरुवार, 07/20/2017 - 11:16 नवीन
अर्थात, रुल किंवा नियम नाहीये तसा आणि आहे तो इतका अंधुक आहे की त्यातून पळवाटा काढणे खुप सोपे आहे. कम्युनिटी रेडीओजवर आणि एफेमचॅनेल्सवर ट्राफिक सोडून न्युज म्हणूनच अलाऊड नाहीयेत. ते चॅनेल सुरु करताना एज्युकेशनल अथवा मनोरंजन अशा पध्दतीनेच चालवावे अशी अपेक्षा असते. एजुकेशनलवाल्यांना जाहीराती न घेण्याचे बंधन आहे. कारण कमर्शिअल व्ह्यु असु नये म्हणून. पोलिटिकल पार्टीज ना पण अलाऊड नाहीये चॅनेल चालवणे. सोशल इश्श्युज रेज करणे चालतेच पण बीएमसी हे कोण चालवते ते सर्वाना माहीतीये. रस्त्यात झोल हा सरळ आरोप झाला. ऑथॉरीटीजची पोलखोल करा हे आवाहन मनोरंजनाच्या नावाखाली ब्रॉडकास्ट करणे, एंटरटॅनमेंट लिसनरचा आधार घेऊन सर्वत्र करणे हे पटत नाही. प्रुव्ह करा रस्त्यात बीएमसीने झोल केला मग गाणे काय श्रुतिका पण चालेल. हेच गाणे एखाद्या चित्रपटात सेन्सॉर चालू देईल का ह्याचा विचार करा. मग ब्रॉडकास्टिंग फॅसिलिटी आहे म्हणून त्याचा वापर असा करणे पटत नाही. एखाद्या ग्रुपने ते बनवून युट्युबवर टाकणे वेगळे आणि चॅनेलच्या एम्प्लॉयी आरजेने ते एंंटरटेनमेंट चॅनेलथ्रु ब्रॉडकास्ट करणे ह्यात निश्चितच फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/20/2017 - 11:40 नवीन
तसं असेल तर मग सेनेने रडीचा डाव खेळणे सोडून आणि बालिशपणा सोडून रेड एफएम विरूद्ध रीतसर पोलिसात किंवा न्यायालयात तक्रार करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
व
विजुभाऊ गुरुवार, 07/20/2017 - 19:19 नवीन
प्रुव्ह करा रस्त्यात बीएमसीने झोल केला
कृष्णा देसाई / रमेश किणी प्रकरण , बोफोर्स ही सुद्धा कधीच प्रुव्ह झाले नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/20/2017 - 10:33 नवीन
ब्रॉडकास्टिंगचा अधिकार असला तरी एफएम चॅनलने राजकीय भाष्ये करू नयेत, निदान मनोरंजनाच्या चॅनेल्स नी तरी , हा अलिखित संकेत तिला माहीत नसावा. अलिखित संकेत म्हणजे कायदा नव्हे. घटनेच्या कोणत्या कलमानुसार मनोरंजनाच्या वाहिन्यांनी राजकीय भाष्य करायला बंदी घातली आहे ते सांगता का जरा? मुळात मलिष्काच्या त्या विडंबन गीतात राजकीय भाष्य नव्हतेच. असले तर कोणत्या ओळीत राजकीय भाष्य आहे ते सांगा. मुंबईतील रस्ते, वाहतूक इ. च्या दुरावस्थेवर तिने विंडबन केले होते. या गीतावर शिवसेना इतकी का चवताळली आहे हे अनाकलनीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 07/20/2017 - 10:40 नवीन
अत्यंत बालिश प्रकार! या प्रकारावर खरंतर सेनेच्या नेतृत्वाने त्यांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना समज देणे गरजेचे होते, तिथे हे नेतृत्व स्वतःही तेच करत आहे. काहीही कारणच नव्हते मुळी त्या विडिओवर/गाण्यावर बोलण्याचे! त्याच गाण्यात मुंबईच्या लोकल व्यवस्थेवर आणि पर्यायाने भाजपच्या अखत्यारीतील रेल्वे खात्यावर पण टीका आहेच ना. कुठली गोष्ट दुर्लक्ष करण्यात फायदा आहे ही साधी गोष्ट कळू नये? वरून कायदेशीर कारवाई करण्याचे ते पत्र हास्यास्पद प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सुज्ञ Wed, 07/19/2017 - 17:35 नवीन
थोडक्यात शिवसेना या पक्षाची बौद्धिक कुवत आज दिसून आली. एका मलिश्काने अक्खी शिवसेना गार केली..... असे म्हणायला हरकत नाही. वाघ डरकाळ्या वाघनखे वगैरे यांचीच यांच्या.. ... . असो .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/19/2017 - 17:51 नवीन
हे वाघबिघ नसून दुगाण्या झाडणारी आणि भेसूर रेकणारी गाढवे आहेत. हे कायम शेपटीला लवंगीचा सर लागल्यासारखे दुगाण्या झाडत, भेसूर रेकत सैरावैरा धावत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
अ
अभिदेश Wed, 07/19/2017 - 17:54 नवीन
तरी ह्यांच्या पाय पकडायला काही दिवसांपूर्वी अमित शाह आले होते. बहुदा लाथा खायला आवडतात त्यांना .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 07/19/2017 - 19:01 नवीन
"अडला नारायण . . ." ही म्हण ऐकली असेलच. जोक्स अपार्ट, अडेलतट्टू गाढवाला पाठीत रट्टा घालूनच उठवावे लागते. शहांनी मातोश्रीवर जाउन वाघोबांच्या पाठीत रट्टा घालून त्याला सुतासारखे सरळ केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
अ
अभ्या.. Wed, 07/19/2017 - 19:22 नवीन
हिहीहीही, भलतेच कॉमेडी ब्वा तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अभिदेश Wed, 07/19/2017 - 19:44 नवीन
शहांनी मातोश्रीवर जाउन वाघोबांच्या पाठीत रट्टा घालून त्याला सुतासारखे सरळ केले. .... आतापर्यंत तुम्ही लिहिलेल्या मेगाबायटी , गिगाबायटी प्रतिसादात हा सगळ्यात विनोदी प्रतिसाद. अख्या महाराष्ट्रात फक्त तुमच्याच कानात शहांनी हे सांगितलेले दिसतंय. मदतीच्या याचनेला तुमच्या भाषेत पाठीत रट्टा घालणे म्हणतात वाटत. "अडला नारायण . . ." ही म्हण ऐकली असेलच. ... पण तुमच्या सगळ्या मेगाबायटी , गिगाबायटी प्रतिसादा नुसार , तुम्ही अडलेले नाही आहात ना? मग कशाला पाय धरताय ? आणि एकदा पाय धरण्याचेही म्हणताय आणि लगेच पाठीत रट्टा घालून त्याला सुतासारखे सरळ केले , असंही म्हणताय . नक्की काय बोलायचे ते एकदा शहांना विचारा बुवा. नाहीतरी तुमची हॉट लाईन आहेच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 07/19/2017 - 20:30 नवीन
पाय धरलेच नव्हते. हिसका दाखवायला गेले होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नेहमीप्रमाणे दगाबाजी करायचा विचार होता. मनाला येईल ती नावे सुचवित होते. आधी प्रणव मुखर्जींंनाच परत राष्ट्रपती करा म्हणत होते. नंतर मोहन भागवतांचं नाव आणलं. नंतर स्वामीनाथन् यांचं नाव आणलं. नंतर म्हणायला लागले की आधी नाव सांगा. त्यानंतर पाठिंब्याचं ठरवू. जेव्हा रामविलास पास्वान म्हणाले की हे नाव ठरविण्याचे सर्वाधिकार मोदींना द्यावेत, तेव्हा यांनी विरोध केला आणि आम्ही आमच्या मताप्रमाणे कोणाला पाठिंबा द्यायचा ते नंतर ठरवू असे म्हणाले. नंतर शहांच्या भेटीनंतर लगेच कोणतीही खळखळ न करता विनाअट आपला पाठिंबा जाहीर केला. महिनाभर फुशारक्या मारणारा अडेलतट्टू एका भेटीत वठणीवर आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
अ
अभिदेश Wed, 07/19/2017 - 20:41 नवीन
गुर्जी , तुम्हाला वाटत नाही का तुमचे प्रतिसाद हास्यास्पद होत चालले आहेत ? नाव आधी सांगा ही मागणी चुकीची नाही ? नंतर शहांच्या भेटीनंतर लगेच कोणतीही खळखळ न करता विनाअट आपला पाठिंबा जाहीर केला. लगेच ? मला तरी असे काही वाचल्याचे आठवत नाही.राष्ट्रपतिपदाचा उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यावरच पाठिंबा दिला ना? आणि शहांनी त्यांना उमेदवाराचे नाव सांगितले नसेलच हे कशावरून ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अभ्या.. Wed, 07/19/2017 - 20:52 नवीन
गुर्जी, नका हो इतकी डिटेल माहिती ठेवू सेनेची. इतकी विरोधीभक्ती तुम्हाला पुढचा जन्म कट्टर शिवसैनिकांचा मिळेल बरे. आदित्यसाहेबांच्या मुलाची युवासेना अशाच एका कट्टर प्रवक्त्याची वाट बघतेय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
अ
अभिदेश Wed, 07/19/2017 - 20:59 नवीन
असल्यामुळे शिवसेनेची नाळ जुळलेली आहेच , पण पुढच्या पिढीचे काही खरं नाही. आदूबाळाला सांभाळायला आई भवानी शक्ती देवो ही तिच्या चरणी प्रार्थना. :-) जगदंब जगदंब !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/20/2017 - 10:57 नवीन
शिवसेना सांभाळायची वेळ आदूबाळावर येणारच नाही. त्यामुळे काळजी नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/20/2017 - 11:04 नवीन
सेनेला माझ्यासारख्या प्रवक्त्याची गरज नाही. इथे मिपावरच काही जण सेनेचे कडवे प्रवक्ते आहेत. ते या कामासाठी जास्त योग्य ठरतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/20/2017 - 10:54 नवीन
माझे प्रतिसाद हास्यास्पद नाहीत हो. शिवसेना हा पक्ष, त्या पक्षातील नेत्यांच्या फुशारक्या आणि या पक्षाच्या समर्थकांचे प्रतिसाद हेच हास्यास्पद आहेत. राष्ट्रपतीपद निवडणुक संदर्भात मागील काही महिन्यात शिवसेनेने घेतलेल्या भूमिका, वारंवार बदललेया भूमिका आणि कोलांट्या उड्या याबद्दल वाचा. सर्व गोष्टी स्पष्ट होतील. प्रणव मुखर्जींपासून नंतर मोहन भागवत आणि स्वामीनाथन् यांच्यानंतर सेनेचा प्रवास वळणे घेत, यूटर्न घेत कोविंद यांच्यापाशी कसा येऊन थांबला ते वाचा. "भाजप दलित मतपेढीचे राजकारण करीत आहे. कोविंद दलित आहेत म्हणून त्यांचे नाव पुढे आणले असेल तर आमचा त्यांना विरोध असेल." असे जाहीर करून २४ तासांच्या आत "आमचा पाठिंबा कोविंद यांनाच आहे" हे वळण सेनेने कसे घेतले तेही वाचा. म्हणजे "भाजप दलित मतपेढीचे राजकारण करीत नाही आणि कोविंद दलित आहेत म्हणून त्यांचे नाव पुढे आणले नसून ते योग्य उमेदवार आहेत म्हणून त्यांचे नाव भाजपने पुढे आणले आहे" याची ही कबुलीच समजायची का? आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत, मार्चमध्ये भूकंप होईल, एप्रिलमधील विधानसभेचे अधिवेशन अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करेपर्यंत आम्ही चालून देणार नाही अशा हास्यास्पद घोषण कोणी केल्या तेही वाचा. फेब्रुवारी २०१७ मध्ये १० महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर ९-१० मार्चच्या सुमारास लक्ष्मीरस्त्याच्या बाजूला बेडेकर मिसळीच्या जवळ शिवसेनेच्या कोणीतरी एक मोठा फलक लावला होता. त्यावर तो कार्यकर्ता, उधोजी इ. चित्रे होती व त्यावर "जाशील, परत वाघाच्या वाटेला जाशील?" असे काहीतरी हास्यास्पद लिहिले होते. फलकावर फडणवीसांचे अर्कचित्र होते. तो फलक बघून हसू आवरले नाही. पुण्यात सेनेच्या आमदारांची संख्या १५ वरून ९ वर आली, तर भाजपची संख्या २६ वरून ९८ पर्यंत पोहोचली. इतकी मानहानी होऊन सुद्धा यांचा माज कायम. अगदी मुंबईचा निकाल पाहिला तरी निकालाच्या दिवशी काही वेळाने सेना ९३ प्रभागांमध्ये व भाजप ५१ प्रभागांमध्ये आघाडीवर आल्याच्या बातम्या येत होत्या. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत थांबण्याची सुद्धा यांची तयारी नव्हती. सेना कार्यकर्त्यांंनी भाजपला खिजविण्याकरीता पुण्यातील भाजप कार्यालयासमोर दहादहा हजारांच्या माळा लावून विजयाच्या घोषणा द्यायला सुरूवात केली. काही वेळातच चित्र पालटले. सेनेचा विजयरथ ९३ वरच रूतला व मागे यायला लागला. भाजपचा रथ पुढे जाऊ लागला. शेवटी ८२ वि. ८४ असा निसटता फरक राहिला. आता या निकालाला वाघाच्या पंजाचा तडाखा असे सेनावाले समजत असतील तर त्यांच्या अकलेची कीव कराविशी वाटेल. यांच्यावर इतर पक्षांनी टीका केली तर यांना दमदाटी करता येत नाही. म्हणून हे इतरांवर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन अर्वाच्य टीका करतात. पण एखाद्या सामान्य नागरिकाने यांच्यावर टीका केली तर यांना ते अफझलखानाच्या फौजेतले सैनिकच वाटतात. यांच्या संतापाचा भडका उडतो आणि मग त्या नागरिकाला हे यांचा "ठाकरी हिसका" दाखवितात. २०१२ मध्ये पालघरमधील दोन तरूण मुलींना फेबु पोस्टवरून यांनी असाच हिसका दाखविला होता. आता हे मलिष्काच्या मागे लागले आहेत. या अख्ख्या वाघांच्या कळपाला मलिष्काने एका गाण्यात गारद केले. पालघरमधील दोन तरूणींविरूद्ध दंगाधोपा करून पोलिसात तक्रार दाखल करून त्यांना अटक करून त्यांना एक रात्र पोलिस कस्टडीत घालवायला लावणे, एका तरूणीच्या औषधाच्या दुकानाची मोडतोड करणे, मलिष्काविरूद्ध ५०० कोटींचा दावा दाखल करण्याची मागणी करणे, तिच्या घरी तपासाला महापालिकेचे कर्मचारी पाठविणे असे रडीचे डाव खेळणे हेच या वाघोबांचे शौर्य आणि हीच शिवसेनेची भरीव कामे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
म
मोदक Wed, 07/19/2017 - 19:53 नवीन
गुरूजी.. नका असले काहीतरी लिहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 07/20/2017 - 08:16 नवीन
Rokhthok | BMCvar Bharosa Nai Kay | 19th July 2017 https://www.youtube.com/watch?v=u1LPcGz8ync ह्या कार्यक्रमातील नितेश राणे, ह्यांची शिवसेनेबद्दलची मते ऐकण्यासारखी आहेत. :))
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 07/20/2017 - 08:18 नवीन
https://youtu.be/u1LPcGz8ync?t=1378
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
व
विशुमित गुरुवार, 07/20/2017 - 09:21 नवीन
नितेश राणे यांची मते कधी पासून श्रवणीय झाली आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/20/2017 - 09:26 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अनुप ढेरे गुरुवार, 07/20/2017 - 10:09 नवीन

This country needs more journalists like @fayedsouza pic.twitter.com/61kZdeGwJM

— SAGAR (@sagarcasm) July 20, 2017
  • Log in or register to post comments
अ
अत्रे गुरुवार, 07/20/2017 - 11:09 नवीन
जबरदस्त आहे! यांना मराठीत ऐकवायला हवे पण, जास्त बोचेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/20/2017 - 11:23 नवीन
खणखणीत !!! जेव्हा बहुतांश नागरिकांना आपल्या हक्कांची जाणीव असते आणि जरूर तेव्हा ते अशा स्पष्ट शब्दांत राजकारण्यांना/नोकरशहांना जाणीव करून द्यायला घाबरत नाहीत, तेव्हाच लोकशाहीचे सर्वोत्तम रूप... सहभागी लोकशाही (participatory democracy)... आस्तित्वात येते. मग असे राष्ट्र, विकसित राष्ट्र बनायला फार वेळ लागत नाही. नेता/पक्ष/खाजगी हितसंबध यांच्या वर उठून भारतातल्या सर्व गावा/शहरा/राज्यांतल्या नागरिकांना हे करण्याची सुबुद्धी व्हावी, अशी तीव्र इच्छा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
पुंबा Fri, 07/21/2017 - 08:57 नवीन
अप्रतीम.. जबरदस्त.. मलिष्का खरोखर भारी आहे.. ह्या गाण्यामुळे 'ऑथोरिटीची पोल खोल' करणे ट्रेंडी व्हावे. व्हायरल झाले की समस्या सुटण्यास मदत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/20/2017 - 10:29 नवीन
मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मोठे मराठी बाणे जपायला शिवसेनेला मते दिलेल्यांनाच या रस्त्यावरील खड्ड्यांचा आणि तुंबलेल्या पाण्याचा त्रास झाला असता तरच त्यांना खरा धडा मिळाला असता. पण दुर्दैवाने तसे होत नाही. यांचा मराठी बाणा जपायला अत्यंत बेजबाबदार आणि अकार्यक्षम लोकांना निवडून दिल्याचा त्रास सगळ्यांनाच होतो. कालपरवा उद्धव ठाकरे म्हणाले की मुंबईत पाऊस किती पडणार हे त्यांच्या हातात नाही. पण बांधलेल्या रस्त्यांचा दर्जा चांगला ठेवणे, नालेसफाई वेळेत पूर्ण करणे, कचरा वेळच्यावेळी साफ करणे या गोष्टी तरी यांच्या हातात आहेत की नाही? तेवढे केले तरी मुंबईतल्या बर्‍याच समस्या कमी होतील. पण होते कसे की या शिवसेनेने वर्षानुवर्षे 'मराठी बाणा' ही अफूची गोळी लोकांना देऊन ठेवली आहे. ती गोळी एकदा घेतली की महापालिकेचे खरे काम काय आहे, काय करणे अपेक्षित आहे, ते काम योग्य पध्दतीने केले जात आहे का वगैरे प्रश्न म्हणून पडत नाहीत लोकांना. मुंबईच्या अनेक भागात या अफूच्या गोळीचा प्रभाव अजूनही आहे पण इतर बर्‍याच भागातून कमी झाला आहे हेच त्यातल्या त्यात समाधान.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 07/20/2017 - 10:43 नवीन
यांचा मराठी बाणा, अजेंडा वगैरे जपायला अत्यंत बेजबाबदार आणि अकार्यक्षम लोकांना निवडून दिल्याचा त्रास सगळ्यांनाच होतो. याच्याशी १००% सहमत मुंबई ठाण्यामध्ये जसे नाले तुंबतात तसे नवी मुंबई मध्ये तुंबत नाहीत असे आमचे दादा पर्वा म्हणत होते. नवी मुंबईला पाऊस कमी पडतो का मुंबई पेक्षा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 07/20/2017 - 12:01 नवीन
नवी मुंबई हे वसवलेले शहर आहे. जुनी मुंबई वाढत गेलेले शहर आहे. म्हणजे ब्रिटिशांनी वसवले हे खरे पण गेली १५०-२०० वर्षे ते नुसतेच वाढते आहे. १०० वर्षांनी झोपड्यांनी आणि बेकायदा बांधकामांनी भरुन गेले की नवी मुंबई पण असेच असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 07/20/2017 - 10:53 नवीन
मला एक प्रश्न पडतोय कि नालेसफाई किंवा त्या त्या भागातील रस्ते व्यवस्थित ठेवणे हे एकूणच महापालिकेचे काम असते कि त्या भागातील नगरसेवकाचे? म्हणजे हे जर महापालिकेचे काम असेल तर मग सत्ताधाऱ्यांना झोडपायला हरकत नाही. पण नगरसेवकांचे असेल तर ज्यांना आपण झोडपत नाही त्या पक्षाच्या नगरसेवकांच्या भागातील नाले स्वच्छ असणार, रस्ते गुळगुळीत असायला हवेत नाही का? शिवाय दुसरा मुद्दा असा आहे की मुंबईतील सरसकट सगळे रस्ते महापालिकेच्या ताब्यात नाहीयेत असे माध्यमे दाखवत होती, मग नेहमी टीका महापालिकेवरच का होते? याचा अर्थ फक्त महानगरपालिकेच्या ताब्यातील रस्ते खराब आहेत का? आणि इतर संस्था (MMRDA वगैरे) यावर टीका का होत नाही? कोणी मुंबईकर यावर प्रकाश टाकू शकेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 07/20/2017 - 12:15 नवीन
एकूण २००० किमी चे रस्ते आहेत. पैकी १९०० किमीचे म्हणजे ९५% रस्ते बीएमसी च्या अखत्यारीत येतात. म्हणून बीएमसीवर ९५% टीका होते. बाकीच्यांवर ५%. रस्ते दुरुस्तीचे टेंडर स्थायी समितीत पास होते. खरे तर ते बंगल्यावरच पास होते तो भाग वेगळा. त्यामुळे जबाबदारी महापालिकेचीच असते. नगरसेवक अलॉटेड निधीतून प्रभागातला रस्ता दुरुस्त करु शकतो. पण असे क्वचितच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 07/20/2017 - 10:53 नवीन
मला एक प्रश्न पडतोय कि नालेसफाई किंवा त्या त्या भागातील रस्ते व्यवस्थित ठेवणे हे एकूणच महापालिकेचे काम असते कि त्या भागातील नगरसेवकाचे? म्हणजे हे जर महापालिकेचे काम असेल तर मग सत्ताधाऱ्यांना झोडपायला हरकत नाही. पण नगरसेवकांचे असेल तर ज्यांना आपण झोडपत नाही त्या पक्षाच्या नगरसेवकांच्या भागातील नाले स्वच्छ असणार, रस्ते गुळगुळीत असायला हवेत नाही का? शिवाय दुसरा मुद्दा असा आहे की मुंबईतील सरसकट सगळे रस्ते महापालिकेच्या ताब्यात नाहीयेत असे माध्यमे दाखवत होती, मग नेहमी टीका महापालिकेवरच का होते? याचा अर्थ फक्त महानगरपालिकेच्या ताब्यातील रस्ते खराब आहेत का? आणि इतर संस्था (MMRDA वगैरे) यावर टीका का होत नाही? कोणी मुंबईकर यावर प्रकाश टाकू शकेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 07/20/2017 - 10:55 नवीन
मला एक प्रश्न पडतोय कि नालेसफाई किंवा त्या त्या भागातील रस्ते व्यवस्थित ठेवणे हे एकूणच महापालिकेचे काम असते कि त्या भागातील नगरसेवकाचे? म्हणजे हे जर महापालिकेचे काम असेल तर मग सत्ताधाऱ्यांना झोडपायला हरकत नाही. पण नगरसेवकांचे असेल तर ज्यांना आपण झोडपत नाही त्या पक्षाच्या नगरसेवकांच्या भागातील नाले स्वच्छ असणार, रस्ते गुळगुळीत असायला हवेत नाही का? शिवाय दुसरा मुद्दा असा आहे की मुंबईतील सरसकट सगळे रस्ते महापालिकेच्या ताब्यात नाहीयेत असे माध्यमे दाखवत होती, मग नेहमी टीका महापालिकेवरच का होते? याचा अर्थ फक्त महानगरपालिकेच्या ताब्यातील रस्ते खराब आहेत का? आणि इतर संस्था (MMRDA वगैरे) यावर टीका का होत नाही? कोणी मुंबईकर यावर प्रकाश टाकू शकेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा