शिवसेना..... ???
शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष.
छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही.
सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी.
मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही.
पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती.
सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर.
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.
त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला.
सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही.
याबद्दलही काही विचारायचे नाही.
लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची.
सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे.
शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती.
शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत.
हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती,
राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते.
या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते?
एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे.
मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे.
१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले
( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )
मी कुठल्याही साईटवरून कॉपी करतोय याच्याशी काहीही संबंध नसावा त्यामुळे त्याचा उल्लेख तुम्हाला ह्या योजना काय होत्या याची माहिती नकोच आहे त्यामुळे तुम्ही फाटे फोडता या मताकडे घेऊन जातो.संबंध आहे. शिवसेनेच्या संकेतस्थळावरून उचलून इथे जे लिहिले आहे त्याच्यावर मी किंवा इतरांनी डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी अपेक्षा आहे का? मी कोणत्याच पक्षाच्या संकेतस्थळावर/मुखपत्रात काय लिहिले आहे त्यावर डोळे झाकीन विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तुम्ही इथे शिवसेनेच्या संकेतस्थळावरून उचललेली शिवसेनेच्या भरीव (!) कामांची यादी इथे टाकली आहे त्यावर आंधळेपणाने निदान मी तरी विश्वास ठेवणार नाही. शिवसेनेची एक गंमत तुम्हाला माहिती नसावी. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात (चुकलो. वचननाम्यात असा शिवसेनेचा शब्द होता. जसे सेनेने जलयुक्त शिवार या योजनेचे आपल्यापुरते शिवजलक्रांती असे नामांतर केले आहे, तसेच इतर पक्ष ज्याला जाहीरनामा म्हणतात त्याला शिवसेना वचननामा असे संबोधते) आपल्या सरकारने १९९५-९९ या काळात १९९५ मधील वचननाम्यात दिलेली ८०% आश्वासने पूर्ण केली आहेत असा दावा केला होता. नंतर २००४ च्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या वचननाम्यात आपल्या सरकारने १९९५-९९ या काळात १९९५ मधील वचननाम्यात दिलेली ९०% आश्वासने पूर्ण केली आहेत असा दावा केला होता. हे १९९९-२००४ या काळात सत्तेवर नसताना ही जास्तीची १०% आश्वासने कशी काय पूर्ण केली हे खुदा जाने. सांगायचा मुद्दा असा की राजकीय पक्षाने स्वत: केलेल्या दाव्यांवर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नये.चला मान्य करू कि शिवसेनेने कामे केलेली नाहीत. आता हा भाजपचा धागा नाहीये वगैरे पळपुटेपण तुम्ही करणारच नाहीत, त्यामुळे सांगा बरं पटापट कि कुठली भाजपची कामे तुम्हाला आवडतात.अजून किती वेळा सांगायचं की हा धागा भाजपवर नसून शिवसेनेवर आहे. भाजपच्या कामासंदर्भात मिपावर अनेक धागे निघाले आहेत व काही अजूनही जिवंत आहेत. तिथे भाजपच्या कामगिरीवर प्रचंड दळण दळले गेले आहे. वाटल्यास त्या धाग्यांच्या उरल देतो, पण इथे ते पुन्हा टाकणे योग्य होणार नाही. त्यामुळे धाग्याचा शिवसेना हा विषय भरकटून भाजप हा विषय चघळला जाईल.बाकी तुम्ही कॉम्पुटर लिटेरेट असालच असा माझा कयास आहे त्यामुळे उगाचच वायफळ (अज्ञानमुलक) फाटे फोडण्यापेक्षा त्या योजनांबद्दल माहिती तुम्ही काढू शकालच याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाहीये. त्यामुळे माहिती शिवसेनेच्या साईटवर आहे म्हणून खोटी वगैरे अंध विरोधकांची लक्षणे पण तुम्ही दाखवणार नाहीत याबद्दल खात्री आहेच.मी वर दिलेल्या शिवसेनेच्या भरीव (!) कामांची माहिती काढायचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ "क्रीडापीठ" हे नक्की काय आहे हे बराच वेळ गुगलून पाहिल्यावर त्याबद्दल काहीच मिळाले नाही. तुम्ही शिवजलक्रांती या योजनेची दिलेली चित्रफीत सुद्धा २-३ वेळा पाहिली. शिवसेनेने केलेल्या भरीव (!) कामांची माहिती कोठे मिळेल (शिवसेनेचे संकेतस्थळ व वचननामा सोडून इतरत्र) ते सांगा.फक्त एक निरीक्षण नोंदवतो आणि रजा घेतो, तुमच्यासारख्या अभ्यासू आयडीचा ग्रामीण महाराष्ट्रातील अभ्यास कमी पडतोय. ते झुणका भाकरी योजनेचा अभ्यास करणे तर फार गरजेचं आहे. काय आहे एखाद्या पक्षाचा विरोध करणं वेगळं आणि त्या पक्षाच्या एखाद्या चांगल्या योजनेचा विरोध करणं वेगळं! अशातूनच लोकं मागच्या सरकारच्या 108 योजनेचा पण अंधपणे विरोध करतात.झुणका भाकरी योजना किंवा वडापावच्या गाड्या (दोन्ही गोष्टी बेकायदेशीर जागेत) ही सेनेच्या रोजगारनिर्मितीची सर्वोच्च कल्पना. असल्या गोष्टी करण्याऐवजी सेना नेत्यांनी सहकारी कारखाने, महाविद्यालये, डेअर्या अशा गोष्टी सुरू केल्या असत्या तर कितीतरी जास्त प्रमाणात स्थायी स्वरूपाची रोजगार निर्मिती झाली असती. झुणका भाकरी केंद्रात आधी लिहिल्याप्रमाणे झूणका भाकरी ऐवजी बिसलेरीच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्यांची माळ, बिस्किटांचे पुडे अशा गोष्टी दिसायच्या. यातली बहुसंख्य केंद्रे १९९९ नंतर बंद झाली. बाबा आढावांनी १९७५ मध्ये सुरू केलेले मंडईतील मूळ झुणकाभाकरी केंद्र अनेक दशके सुरू होते (ते बहुतेक अजूनही सुरू आहे). त्याचीच नक्कल करून कोपर्याकोपर्यावर उभी केलेली बेकायदेशीर झुणकाभाकर केंद्रे केव्हाच बंद झाली.मी तुम्हाला मुद्दे सांगितले, तेही तुम्ही स्वतःहून कुठलाही अभ्यास न करता पूर्वग्रहदूषित मते मांडत आहात म्हणून.मी आधीच सांगितलंय की शिवसेनेच्या भरीव कामांचे जे दावे केले जात आहेत ते मी तपासून त्यातील सत्यता तपासायचा प्रयत्न केलेला आहे. उगाच हवेत बाण मारलेले नाहीत.मग काढायचे काय जाहीरनामे मागचे सगळ्यांचे (हा शिवसेनेचा धागा आहे वगैरे कारणे द्यायची असतील दुसरा धागा काढा किंवा कुठल्याही राजकीय धाग्यावर जिथे या विषयाशी संबंधित चर्चा होईल तेव्हा टाका नाहीतर उगाच एकांगी टीका काय कोणीही करतं)?काढा की सगळ्यांचे जाहीरनामे. मी कधी त्याला विरोध केलाय? हा शिवसेनेचा धागा आहे हे सत्यच आहे. इथे भाजपची कामगिरी, शेकापची कामगिरी, अद्रमुकची कामगिरी, मनसेची कामगिरी इ. गोष्टी दळायला सुरूवात केली तर धागा त्या दिशेने भरकटत जाईल.क्रीडापीठ: १९९५ सालच्या किती गोष्टी आंतरजालावर आधारित आहेत हो? हि योजना बदलत बदलत आजच्या सरकारच्या क्रीडा खात्यात आहे काय कि बंद पडली किंवा दुसऱ्या नावाने सुरुच आहे याची कुठे माहिती मिळतेय का बघा, मला वाटते माहिती मिळत नाही नाही म्हणून एखादी गोष्टच खोटी वगैरे असले पोकळ दवे सहज करता येतात. म्हणजे मी तरी तसंच करतो माहिती मिळत नाही म्हणजे दोनही बाजू असू शकतात, चालली नाही योजना किंवा चालली. दोन्हीची शक्यता गृहीत धरायला अडचण कसली? बाकी इतर बाकीच्या योजनांची माहिती मिळाली कि नाही?१९९५ च्या बर्याचश्या गोष्टी आंतरजालावर नाहीत हे सत्य आहे. परंतु त्या काळात घडलेल्या (किंवा त्यापूर्वीची घडलेल्या) महत्त्वाच्या घटनांबद्दल किंवा त्या काळात सुरू झालेल्या व अद्यापही सुरु असलेल्या योजनांबद्दल आंतरजालावर वाचायला मिळते. आता ही क्रीडापीठ नावाची योजना तितकी महत्त्वाची नसेल, किंवा त्या योजनेमुळे फारसे काही घडलेच नसेल किंवा काही काळानंतर त्या योजनेचा बोजवारा उडून ती लगेचच संपुष्टात आली असेल तर आजच्या काळात त्या योजनेविषयी वाचायला मिळणे अवघड आहे. ज्या योजनेबद्दल शिवसेनेच्या संकेतस्थळाशिवाय इतरत्र उल्लेख नाहीत ती योजना खरोखरच अस्तित्वात होती किंवा शिवसेनेने केलेले ते एक भरीव काम होते यावर कसा विश्वास ठेवायचा?झुणका भाकरी आणि शिवसेनेचे सहकारी कारखाने वगैरे - पुरावे कशाचेही नाहीत, स्वतःच्या घराबाजूची कुठली टपरी बेकायदा होती वगैरे पुरावे तर नसतीलच वरून महाराष्ट्रभर तहसील कार्यालयाच्या आत उघडण्यात आलेली झुणका भाकर केंद्रे सुद्धा बेकायदेशीरच, दुर्दैवाने तुमच्या गल्लीच्या पलीकडेही महाराष्ट्र आहे! टपरी आणि गुटख्याच्या माळा! त्या टपरीचालकाने काय ठेवावे हे सरकारच्या योजनेत लिहायला हवं होतं? हास्यास्पद पूर्वग्रहदूषित मते! एखाद्या पक्षाच्या नेत्याने स्वतःच्या फायद्यासाठी काढलेल्या संस्था म्हणजे त्या पक्षाचे रोजगारनिर्मितीचे धोरण? महाराष्ट्रातल्या कोणत्या डेअऱ्या, कारखाने कोणत्या नेत्याचे आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत याचा अभ्यास असेल तर तो टाका इथे. नाही म्हणजे हा भाजपचा धागा आहे वगैरे पळपुटेपणा तुम्ही करणार नाहीत असे वाटले होते पण शेवटी तुम्ही फाटा फोडलातच. जरा भाजपच्या किंवा इतर दोन मुख्य पक्षांच्या आतापर्यंतच्या ५-५० वर्षाच्या कामगिरीचा कोणता धागा तुम्ही संदर्भासाठी वापरात आहेत त्याची लिंक द्याल का प्लिज? वाचून घेतो. आणि हो, झुणका भाकर योजनेचा अभ्यासही राहिला आहे. झुणका भाकर आणि रोजगार निर्मिती? झुणका भाकरी केंद्रे का बंद झाली १९९९ नंतर याचा अभ्यासही गरजेचा आहेच, त्यामुळे अभ्यास वाढवा!झुणका भाकर केंद्राचे निमित्त करून कोपर्याकोपर्यावरील सार्वजनिक जागा ढापल्या गेल्या होत्या. या केंद्राचा मूळ उद्देश १ रूपयात झुणकाभाकरीचे पोटभर जेवण देणे हा होता. प्रत्यक्षात काही काळातच या केंद्रांचे रूपांतर इतर गोष्टी विकणार्या टपरींमध्ये झाले. कोणत्याही नेत्याने स्वतःच्या स्वार्थासाठी एखादी डेअरी, कारखाना, शिक्षणसंस्था काढली तरी त्याचा इतरांना फायदा होतोच. पुण्यात येऊन पंतगराव कदमांनी भारती विद्यापीठ सुरू करून आपल्या गावाकडच्या अनेकांना तिथे नोकर्या दिल्या. पुण्यातील देखील अनेकांना तिथे नोकर्या मिळालेल्या आहेत. पंतगरावांनी तिथे बक्कळ कमावले ही गोष्ट खरी आहे, पण इतरांना देखील त्याचा फायदा झाला हे नाकारता येईल का? शिवसेनेने निदान स्वतःच्या स्वार्थासाठी असे काही केले का? झुणका भाकर केंद्रे, वडापावच्या गाड्या जागा दिसेल तिथे उभे करणे व त्याला स्थानिक नेत्यांचे पाठबळ असल्याने कारवाईची भीति यातून काय साध्य झाले? सरकार बदलले अशा गाड्यांवर/केंद्रांवर कारवाई सुरू होते. पोलिसांची, स्थानिक दादांची खंडणी तर असतेच. बाकी भाजपच्या कामगिरीविषयी वाचायचं असेल तर अगदी अलिकडेच "मोदी सरकारची ३ वर्षे" या शीर्षकाचा धागा निघाला आहे. तिथून वाचायला सुरूवात करा. नंतर नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्रातील शेतकर्यांचा संप, तुकाराम मुंढे, करण जोहरच्या सिनेमावरील बंदी इ. विषयांवर अनेक धागे आहेत. ते नजरेखालून घाला. मोदींच्या पहिल्या वर्षानंतर मीच एक धागा काढला होता. तो धागा तब्बल १ वर्षे वाहत होता. त्यात केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारच्या कामगिरीवरही प्रतिसाद आहेत. भाजपच्या बरोबरीने इतर पक्षांच्या संदर्भातही दळण दळले गेले आहे. तेही वाचा.मित्र पक्षांना संपवुन मग पुढे काय ?मित्रपक्षांना संपविण्याची गरज नाही. ते स्वतःहूनच आत्मघात करून घेत आहेत. मित्रपक्षांना जिवंत रहायचे असेल तर त्यांनी आंधळा मोदीद्वेष सोडून, मोदींना विरोधासाठी विरोध करणे सोडून, मोदींना अपशकुन करण्यासाठी देशाच्या शत्रूंबरोबर हातमिळवणी करणे सोडून विधायक भूमिका घेणे व स्वतःची विश्वासार्हता वाढविणे आवश्यक आहे.एकहाती सत्ता.....मग पुढे काय?सर्व विरोधी पक्ष स्वतःहून आत्मघात करीत असल्यामुळे सत्ता एकहातीच राहणार.