Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी: भाग ८

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 07/27/2017 - 17:12
🗣 215 प्रतिसाद
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद आल्याने प्रतिसाद एका पानात रहावे यासाठी नवीन धागा सुरु करीत आहे. धाग्याची सुरूवात http://indianexpress.com/article/india/gujarat-congress-three-mlas-join-bjp-rajya-sabha-elections-shankersinh-vaghela/ या बातमीने करीत आहे. गुजरातमध्ये वाघेलांपाठोपाठ अजून ३ कॉग्रेस आमदारांनी (बळवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल, पी आय पटेल) राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. डिसेंबर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला धक्के बसायला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या ३ आमदारांपैकी २ पटेल आहेत. मागील दीडदोन वर्षे पटेलांना राखीव जागा द्यावात यासाठी गुजरात पेटविण्याचे प्रयत्न झाले. त्याचा काहीसा फटका भाजपला बसला होता. या पार्श्वभूमीवर २ पटेल आमदारांनी भाजपत जाणे ही भाजपसाठी आनंदाची बातमी आहे.
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
42622 वाचन

💬 प्रतिसाद (215)
म
मोदक Tue, 08/08/2017 - 10:05 नवीन
सध्याची परिस्थिती अशी आहे की मोदींच्या वर्चस्वाला कोणी विरोधी पक्ष आव्हान द्यायच्या स्थितीत नाहीत. ते कमी करायचे काम कोणी करत असेल तर ही सत्तेचा माज चढलेली असली बांडगुळेच. सहमत. मोदी जी आणखी किती दिवस पुरणार आहेत देशासाठी. ही टर्म किंवा जास्तीत जास्त पुढची टर्म. ते एकदा सत्तरी पार झाले की राजकारणातून संन्यास घेतील. (सन्यास घेतील का ते दिसेलच बहुदा). मोदींसारखा ब्रँड होण्याच्या दुर्ष्टीने भाजप काही पाऊले उचलत आहेत का, हे कळायला मार्ग नाही. असा ब्रँड बनवण्यासाठी कमीत कमीत २० वर्ष तरी लागतील. तुम्ही गंभीरपणे हा प्रश्न विचारला आहे असे समजून उत्तर देत आहे. मोदींनी ऑक्टोबर २००१ पासून खुर्ची सांभाळल्यापासून ते १६ मे २०१४ पर्यंत उण्यापुर्‍या साडेबारा वर्षात इतिहास घडवला. त्यामुळे कमीतकमी वीस वर्षे हा दावा कशावरून केलात हे कळाले नाही. दुसरी गोष्ट, मोदींनी गुजरात मॉडेल यशस्वी केले आणि तो बेंचमार्क तयार झाला आहे, त्यामुळे आपल्या कामगिरीचे मूल्यमापन गुजरातच्या तुलनेत होणार हे सर्वांना माहिती असावे. हे माहिती असणारे भाजपाच्या दुसर्‍या फळीमध्ये भरपूर नेते आहेत आणि समजा तुमच्या मते ते कर्तबगार नसले तरी त्यांच्या पासंगाला पुरणारे नेते विरोधी पक्षात आहेत का..? बाकी मला विचाराल तर २०२४ मध्ये मोदी पंतप्रधान नसतील. फडणवीस / योगी किंवा एखादा तरूण चेहरा पुढे येईल. (सध्याच्या कॅबीनेटमध्ये तसे कोणी पंतप्रधानपदासाठी पुढे येईल असे वाटत नाही - गडकरी सोडले तर!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
च
चिर्कुट Tue, 08/08/2017 - 13:26 नवीन
नक्की काय आहे कुणी सांगेल का? आणि काय बेंचमार्क आहे त्याचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
विशुमित Tue, 08/08/2017 - 14:49 नवीन
तुम्ही गंभीरपणे प्रश्न विचारला असेल तरच उत्तर मिळेल? (हा. घ्या )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
A
arunjoshi123 Mon, 08/07/2017 - 09:21 नवीन
असली बांडगुळगिरी , वर शांत राहणे, वर गुन्हेगाराला वाचवणे बरेच महाग पडणार आणि पडावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 08/07/2017 - 14:56 नवीन
तर या कृत्याचा जाहिरपणे निषेध करणे आणि कायद्याप्रमाणे आपल्या मुलाला शिक्षा व्हावी एवढे तरी म्हणणे या वडिलांचे उत्तरदायित्व ठरते
हे बरोबर आहे पण कायद्याने तशी घटना घडली असे सिद्ध झाले तर. आरोप झाले, अटक झाली, जमीन झाला हि तर कायदेशीर प्रक्रियेची सुरुवात आहे. सिद्ध झाले आरोप तर या प्रदेशाध्यक्ष महोदयांनी जाहीर वक्त्यव्य करावे आणि जी काय शिक्षा कोर्ट देईल ती भोगू द्यावी.
तर ही सत्तेचा माज चढलेली असली बांडगुळेच.
असली कृत्ये करण्यासाठी सत्तेचाच मज असावा लागतो काय भारतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अभिदेश Mon, 08/07/2017 - 16:29 नवीन
हे भाजपच्या माणसाचे कृत्य आहे ...हेच जर दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या संबंधित लोकांनी केलं असतं तर ? जरा शिवसेनेचे नाव टाकून पहा बरं ? मिपावर वेगळा धागा निघाला असता , शेलक्या शब्दात प्रतिक्रिया लिहिल्या गेल्या असत्या ...कुठे गेले आता ते सगळे मिपाकर ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
व
विशुमित Mon, 08/07/2017 - 17:16 नवीन
भाजप मध्ये असल्यावर/गेल्यावर वाल्याचा पण वाल्मिकी होणार होते, ह्या प्रक्रियेला किती दिवस लागतात हो? पोरींच्या मागावर कसे राहायचे आणि त्यातून कशी सहीसलामत सुटका करून कशी घायची हा आदर्शच त्यांच्या समोर असेल तर ते तरी काय करणार म्हणा..!! ==================================================== कुठे गेले आता ते सगळे मिपाकर ??? त्यांनी दिवट्या पोराच्या बापावर जवाबदारी टाकून मोदींना सेफ केले आहे. संस्कार शिकवायला पाहिजे होते म्हणे बापाने पोराला. पोरगी इतक्या रात्री का फिरत होती हे पण एक मंत्र्याने तारे तोडले आहेत. -------------------------------------------------------------------------------------------- हायला त्या पाकिस्तानी बहिणीचे कोड कौतुक करण्याला न चुकलेले ट्विटर किंग ची काही प्रतिक्रिया नाही आली अजून वर्णिका बद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
श
श्रीगुरुजी Tue, 08/08/2017 - 07:23 नवीन
पोलिसांनी जर सौम्य कलमे लावली, तर न्यायालयात आव्हान दिल्यास न्यायालय कडक कलमे लावण्याचा आदेश देऊ शकते का? हे प्रकरण दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न दिसतो. अर्थात माध्यमातून बरेच स्पेक्युलेशन सुरू आहे. अजून सविस्तर माहिती बाहेर आलेली नाही. हे प्रकरण, मेहता प्रकरण भाजपला जड जाणार आहे. भाजपने आरोपींना वाचविण्याचा अजिबात प्रयत्न करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 08/08/2017 - 07:41 नवीन
मेहता राष्ट्रीय अध्यक्ष्यांचे नातेवाईक आहेत. कारवाई होण्याची शक्यता कमी वाटते. बघू पार्टी विद डिफरेन्स वाले काय करतात ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन Mon, 08/07/2017 - 17:34 नवीन
फक्त शिवसेनेच्या कुणी असे काही केले असते तर शिवसेना समर्थक किती आय.डी नी त्याचा निषेध केला असता? जर रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडिया कर्मचाऱ्याला थोबडावले होते तेव्हा कोणीही शिवसेना समर्थक जे काही झाले ते चुकीचे होते हे म्हणायलाच मुळी तयार नव्हता. तो अनुभव लक्षात घेता त्या मुलीचीच कशी चूक आहे यावर सगळे शिवसेना समर्थक काथ्या कुटत राहिले असते हीच शक्यता सर्वात जास्त. तसले तारे कुणा नेत्याने तोडले आहेत. पण असले काही शिवसेनेच्या माणसाने केले असते तर मिपावरही असेच काही वाचायला मिळाले असते हीच शक्यता जास्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
व
विशुमित Mon, 08/07/2017 - 17:48 नवीन
<<<<फक्त शिवसेनेच्या कुणी असे काही केले असते तर शिवसेना समर्थक किती आय.डी नी त्याचा निषेध केला असता?>>> ==> मी शिवसेना समर्थक नाही पण राष्ट्रवादीच्या कोण्या नेत्याच्या पोराने असले केले असते तर नक्कीच मी निषेद केला असता. <<< तसले तारे कुणा नेत्याने तोडले आहेत.>>> ==>>रामवीर भट्टी http://www.loksatta.com/desh-videsh-news/woman-shouldnt-have-gone-out-so-late-in-the-night-says-haryana-bjp-vice-president-ramveer-bhatti-on-chandigarh-stalking-case-1525940/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 08/07/2017 - 18:29 नवीन
जर रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडिया कर्मचाऱ्याला थोबडावले होते तेव्हा कोणीही शिवसेना समर्थक जे काही झाले ते चुकीचे होते हे म्हणायलाच मुळी तयार नव्हता.
हे आपले वक्तव्य चुकीचे आहे, आपण धागा काढून परत वाचण्यास हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
वरुण मोहिते Tue, 08/08/2017 - 08:00 नवीन
विरोध एअर इंडिया च्या सर्व्हिस ला होता . आणि कारण न वाचता तोंडसुख घेणाऱ्या लोकांना . दुसरे पक्ष ह्याविषयी काही चर्चा असली कि भाजप समर्थकांचा तोल जातो हे वेळोवेळी दिसले आहे . भाजप च्या चुका असल्या कि सौम्य शब्द बाकी काय असेल तर १० प्रतिसाद झोडपायला इतरांना .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Tue, 08/08/2017 - 08:21 नवीन
विरोध एअर इंडिया च्या सर्व्हिस ला होता .
आणि अगदी तसाच विरोध रमेश किणी प्रकरणात रमेश किणींनाही होता. श्री.रा.रा. राज ठाकरेंना ती जागा खाली करून हवी होती आणि तरीही रमेश किणी ते सोडायला तयार झाले नाहीत. काय हा मराठी बाण्याचा मराठी माणसानेच केलेला उपमर्द. तरीही किती शिवसेना समर्थकांनी निदान राज ठाकरेंना निदान प्रश्न तरी विचारले होते? त्यावेळी मिपा नव्हते. पण असते तर रविंद्र गायकवाड प्रकरणी झाले त्याच्या हजार पटींनी मोठे रण शिवसेना समर्थकांनी मांडले असते हे नक्कीच. तेव्हा शिवसेना समर्थकांचा विरोध नक्की कशाला होता आणि समर्थन कशाला आहे याच्या कहाण्या ऐकवूच नका. तो इतिहास बराच जुना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 08/08/2017 - 14:31 नवीन
ह्या दोन प्रकरणांचा काडीमात्र संबंध नसताना आपल्या सरसकट विधानाच्या समर्थनार्थ हे उदाहरण देणे पटले नाही. परत एकदा आधीचा धागा वाचून आपली मते बनवा असे सुचवतो. सरसकट शिवसेना समर्थक, भाजप समर्थक वगैरे विधाने पटत नाहीत असे नमूद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Tue, 08/08/2017 - 14:44 नवीन
ह्या दोन प्रकरणांचा काडीमात्र संबंध नसताना आपल्या सरसकट विधानाच्या समर्थनार्थ हे उदाहरण देणे पटले नाही.
दोन प्रकरणांचा काडीमात्र संबंध नाही हे खरे असले तर मग हरियाणातील त्या दिवट्याचे कृत्य हलकटपणाचे आहे आणि खट्टर सरकारचे पोलिस याप्रकरणी त्याला वाचवायचा प्रयत्न करत आहेत हे लिहिल्यावर प्रतिसादात शिवसेना आणायची काहीच गरज नव्हती. त्या हरियाणातील भाजप प्रदेशाध्यक्षाच्या दिवट्याचा आणि शिवसेनेचा काय संबंध? काहीच नाही. तरीही शिवसेना प्रतिसादात आणायची ती आणलीच. मग इतरांनी त्यावर भाष्य केलेच पाहिजे ही अपेक्षा करणे जसे अयोग्य आहे त्याचप्रमाणे इतरांनी त्यावर भाष्य करूच नये ही अपेक्षा करणेही. संदर्भासाठी हा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 08/08/2017 - 17:42 नवीन
अच्छा म्हणजे त्यांनी चुकीच्या पद्धतीने मांडले म्हणून तुम्हीपण "जशास तसे(?)" उत्तर दिले असे आहे ते! मला तुमच्या लेखनाबद्दल आणि मतांबद्दल आदर आहे म्हणून आपलं सांगायचं प्रयत्न केला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अत्रे Tue, 08/08/2017 - 08:19 नवीन
अवांतर: गायकवाडच्या मागे दिल्ली पोलीस का लागले नाहीत अजून? fir होऊन बरेच दिवस झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Tue, 08/08/2017 - 09:31 नवीन
गायकवाडने माफी मागितल्याने प्रकरण संपविले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 08/08/2017 - 14:28 नवीन
आपणही आधीचा धागा काढून वाचण्यास हरकत नसावी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 08/08/2017 - 15:00 नवीन
आपणही आधीचा धागा काढून वाचण्यास हरकत नसावी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
व
विशुमित Mon, 08/07/2017 - 18:05 नवीन
<<<< हे बरोबर आहे पण कायद्याने तशी घटना घडली असे सिद्ध झाले तर.>>> ==>> सिद्ध बिद्ध काही होणार नाही. रस्त्या वरील सगळे सी सी टीव्ही बंद होते(?) <<<सिद्ध झाले आरोप तर या प्रदेशाध्यक्ष महोदयांनी जाहीर वक्त्यव्य करावे>>> ==>> २०-२५ वर्षांनी ? <<<जी काय शिक्षा कोर्ट देईल ती भोगू द्यावी.>>> ==>> पेरोल वर १० वेळा घरी आंतील त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 08/07/2017 - 18:27 नवीन
हो आपले बरोबर आहे, cctv बंद होणे, पॅरोलवर दहा वेळा सोडणे हे सगळे गेल्या तीन वर्षात घडायला सुरुवात झाली! तो फक्त शिवसेनेचा किंवा भाजपचा नेता किंवा नेत्याचा नातेवाईक होता एवढेच काही लोकांसाठी त्या घटनेची तीव्रता वाढवून तथाकथित निषेध वगैरे नोंदवायला पुरेसे ठरते यातच सगळे आले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मराठी_माणूस Mon, 08/07/2017 - 08:49 नवीन
http://www.loksatta.com/mumbai-news/man-reaches-mother-flat-on-return-from-us-finds-her-skeleton-1525717/ http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/us-techie-comes-home-finds-moms-skeleton/articleshow/59947157.cms
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 08/08/2017 - 08:47 नवीन
हरयाणा प्रकरणावर मत न देता , गायकवाड प्रकरण , सेना इत्यादी संबंध नसता उकरुन काढुन , मनातील भडास काढण्याचा थयथयाट मनोरंजक आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 08/08/2017 - 08:57 नवीन
हरयाणा प्रकरणावर मत न देता
वाचत जा हो जरा. सुरवातीलाच त्या प्रकरणाविषयी लिहिले आहे.
गायकवाड प्रकरण , सेना इत्यादी संबंध नसता उकरुन काढुन
बरोबर आहे इथे शिवसेनेचे नाव यायचा काहीच संबंध नव्हता. पण कसे आहे की (माझ्या आकलनाप्रमाणे) शिवसेना समर्थक असलेल्या एका मिपाकराने हा प्रतिसाद देऊन काही कारण नसताना शिवसेनेचे नाव आणले. तेव्हा उकरून कोणी काय काढले आहे हे तुम्हाला दिसत नसले किंवा त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असाल तर त्याला मी तरी काहीही करू शकत नाही आणि करणारही नाही.
मनातील भडास काढण्याचा थयथयाट मनोरंजक आहे.
भडास हा मराठी शब्द आहे का? असो. एकूणच नक्की काय लिहिले आहे ते न वाचताच उगीच काहीतरी प्रतिसाद देऊन आपलेच हसे करून घ्यायचा प्रयत्नही मनोरंजक वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
अ
अभिदेश Tue, 08/08/2017 - 16:21 नवीन
गॅरी , FYI... मी कोणत्याही पक्षाचा समर्थक वा भक्त नाही आपल्यासारखा . मी विरोधाभास दाखवतोय. जेव्हा भाजप सोडून दुसर्या पक्षाचा मुद्दा असतो तेव्हा काही मिपाकर ज्या पद्धतीने प्रतिसाद देतात , जी भाषा वापरतात आणि भाजपच्या बाबतीत मात्र गुळमुळीत भाषा वापरतात . हे म्हणजे आपला तो बाब्या हा प्रकार आहे. दुसरे माझे प्रतिसाद जे तुम्ही म्हणताय की शिवसेनेच्या समर्थनार्थ होते , ते तुम्ही नीट वाचलेत तर शिवसेनेला युतीचे कोणतेही श्रेय न देण्याच्या बाबतीत होते. हा कृतघ्नपणा झाला. युतीचा दोघांनाही फाययदा झाला होता , हे मान्य ना करण्याला होता. मुळात वर उल्लेखलेला प्रतिसाद हा तुम्हाला उद्देशून नसताना , स्वतःवर तुम्ही ओढून घेतलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
विशुमित Tue, 08/08/2017 - 16:41 नवीन
<<<मुळात वर उल्लेखलेला प्रतिसाद हा तुम्हाला उद्देशून नसताना , स्वतःवर तुम्ही ओढून घेतलाय.>>> -===>> मिपावर फक्त गिनेचुणेच भाजप समर्थक उरल्यामुळे असेल कदाचित. जेवढे उरलेले आहेत त्यातले पण काही निःपक्षतेकडे झुकलेले आणि फक्त मोदी समर्थक दिसतायेत. बाकी इतर पक्षाचे समर्थक तर त्यांच्या पक्षाप्रमाणे अगोदरच बदनाम आहेतच. ते काय आपले विचार बदलतील असे वाटत नाहीत. असो..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
म
मोदक Tue, 08/08/2017 - 17:12 नवीन
वरती कमीतकमी वीस वर्षे हा दावा कशावरून केलात हे कळाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 08/08/2017 - 18:01 नवीन
मोदी सारखा ब्रँड बनायला आणि एक हाती सत्ता आणायला ७० वर्ष लागली भाजपला. मोदींच्या कर्तृत्वामुळे (?) मी फक्त २० वर्षच गृहीत धरली नवीन ब्रँड साठी. मोदी जो पर्यंत आहेत तो पर्यंत कोणी ब्रँड बनण्याची शक्यता धूसर आहे. २०१९-२०२४ ची टर्म गृहीत धरली तर आणखी ७ वर्ष. त्या नंतर जनता पुढील ३ टर्म भाजपला एकहाती सत्ता देईल असे वाटत नाही. तो पर्यंत २०-२२ वर्ष जाणारच आहे. फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल शंका आहे. कारण त्यांच्या कडे नेतृत्व करण्यासाठीचा शरद पवार, मोदीजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या सारखा स्वतंत्र बाणा नाही आहे. कठपुतळी वाटते. (कृपया ब्राह्मण आहे म्हणून व्हिक्टीम कार्ड खेळू नका. वीट आलाय त्याचा. ) योगीचे नाव घेऊन तुम्ही अमंगळ करमणूक केलीत. असो- दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 08/08/2017 - 18:16 नवीन
ओके फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल शंका आहे. कारण त्यांच्या कडे नेतृत्व करण्यासाठीचा शरद पवार, मोदीजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या सारखा स्वतंत्र बाणा नाही आहे. कठपुतळी वाटते. (कृपया ब्राह्मण आहे म्हणून व्हिक्टीम कार्ड खेळू नका. वीट आलाय त्याचा. ) व्हिक्टीम कार्ड काय.. अटलजी पण ब्राह्मण होते. कसे आहे, महाराष्ट्रातले सरंजामवादी विचार सगळीकडेच लागू पडत नाहीत. कळेल हळूहळू. योगीचे नाव घेऊन तुम्ही अमंगळ करमणूक केलीत. मुख्यमंत्री होतील असे वाटले नव्हते. पंप्र होणार नाही असेही वाटून घेऊ शकता. समजा पुढे कधीतरी पंतप्रधानपदाचा उमेदवार न सांगता भाजपा एकहाती निवडून आली आणि केले योगीला पंतप्रधान.. मग काय करणार..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 08/08/2017 - 18:30 नवीन
काहींच्या काही प्रतिसाद..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 08/08/2017 - 19:51 नवीन
समजा पुढे कधीतरी पंतप्रधानपदाचा उमेदवार न सांगता भाजपा एकहाती निवडून आली आणि केले योगीला पंतप्रधान.. मग काय करणार..? ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 08/09/2017 - 17:38 नवीन
काय करणार ?? भोगणार दुसऱ्यांच्या कर्माची फळे..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
विशुमित Tue, 08/08/2017 - 19:35 नवीन
तो गुजरातच्या बेंचमार्क चा प्रश्न अनुत्तरित राहिला. (माझा नाही म्हणा तो प्रश्न )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
श
श्रीगुरुजी Tue, 08/08/2017 - 19:16 नवीन
फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल शंका आहे. कारण त्यांच्या कडे नेतृत्व करण्यासाठीचा शरद पवार, मोदीजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या सारखा स्वतंत्र बाणा नाही आहे. कठपुतळी वाटते. वरील यादीत नितीशकुमार आणि विशेषत: पवारांचे नाव पाहून खूप हसलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 08/08/2017 - 19:37 नवीन
बैसाखीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 08/08/2017 - 19:46 नवीन
धन्यवाद! बैसाखीला अजून ८-९ महिने आहेत. मराठा मोर्चाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 08/08/2017 - 19:51 नवीन
तुम्हाला पण मराठा मोर्चाच्या हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्र बाहेर आहे सध्या. पण पाठिंबा आहेच इथून. लोक पाकिस्तानातून पण पाठिंबा देत आहेत. असो..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Tue, 08/08/2017 - 19:57 नवीन
बघताय काय मग... व्हा मणिशंकर अय्यर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Tue, 08/08/2017 - 20:05 नवीन
मला नको. मुंबईकरांना शुभेच्छा द्या. महागड्या गाड्यातून येऊन राखीव जागा मागणाऱ्या धनदांडग्यांमुळे उद्या त्यांची वाट लागणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 08/10/2017 - 17:07 नवीन
कोणाची वाट लागणार? मुंबईकरांची? कसे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/10/2017 - 17:36 नवीन
एखाद्या शहरात एके दिवशी बाहेरून लाखो माणसे, लाखो वाहने रस्त्यावर आली तर तिथे काय होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 08/10/2017 - 17:48 नवीन
कुंभ मेळा ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अप्पा जोगळेकर Wed, 08/09/2017 - 08:21 नवीन
फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल शंका आहे. कारण त्यांच्या कडे नेतृत्व करण्यासाठीचा शरद पवार, मोदीजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या सारखा स्वतंत्र बाणा नाही आहे. कठपुतळी वाटते. पवार साहेब, नितीश कुमार आणि बॅनर्जी अजून राजकारणात अपरिपक्व आहेत. इतकी वर्षे राजकारणात राहून आणि कोलांट्या उड्या मारुन सुद्धा पवार साहेब फक्त मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री यापलीकडे जाऊ शकले नाहीत. आता नाईलाजाने मराठा मोर्चा कार्ड खेळावे लागत आहे. नितीश कुमार आणि बॅनर्जी यांच्याबद्दल फार काही बोलण्यासारखे सुद्धा नाही. त्यामुळे फडणवीस यांची तुलना वरील व्यक्तींशी होऊ शकत नाही. फडणवीस यांची स्पर्धा मोदी, यशवंतराव चव्हाण किंवा अब्राहम लिंकन यांच्याशी होऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अत्रे Wed, 08/09/2017 - 08:29 नवीन
फडणवीस यांची स्पर्धा मोदी, यशवंतराव चव्हाण किंवा अब्राहम लिंकन यांच्याशी होऊ शकते.
खोखो हसत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
व
विशुमित Wed, 08/09/2017 - 17:20 नवीन
अप्पा.. काही वयक्तिक कारणांमुळे आज खूप अपसेट होतो. तुमच्या प्रतिसादाने इतका हसलो की सगळं टेन्शन विरघळून गेले. आजच्या मोर्च्यात पाणी वगैरे वाटप केले की नाही आमच्या (तुमचे पण आहेत बरका) बंधू लोकांना??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
च
चिर्कुट Wed, 08/09/2017 - 07:11 नवीन
>> मोदींनी गुजरात मॉडेल यशस्वी केले आणि तो बेंचमार्क तयार झाला आहे हा दावा कशावरुन केला हे कळाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 08/09/2017 - 10:18 नवीन
कशावरून म्हणजे..? २०१४ चा निवडणुक प्रचार ज्या बेसवर झाला किंवा २००२ ते २०१४ पर्यंत जे गुजरातमध्ये जी वेगवेगळी विकासकामे झाली ते काय होते तुमच्यामते..? २१ अपेक्षित प्रश्नसंचाप्रमाणे प्रश्नोत्तरे हवी असतील तर इतके बेसीक समजावून सांगायला माझ्याकडे वेळ नाही असे समजा. किंवा गुजरात मॉडेल फेल गेले असे समजा - काय फरक पडतो..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
च
चिर्कुट Wed, 08/09/2017 - 11:38 नवीन
मुळात 'गुजरात मॉडेल' असं काही अस्तित्चात नव्हतं. ती फक्त प्रचारासाठी तयार केलेली एक टर्म होती, असं माझं मत आहे. काही बेसिक प्रश्न - १. फक्त गुजरातमध्ये झालेली (इतर कोणत्याही राज्यांत न झालेली) कोणती विकासकामे या मॉडेल अंतर्गत झाली आहेत? १. जर इतकंच यशस्वी आहे ते मॉडेल, तर त्याच्याबद्दल काही डॉक्युमेंटेशन आहे का? त्याचा कुणी अभ्यास केला आहे का? २. तुम्ही म्हणता की हे मॉडेल बेंचमार्क आहे. त्याचे काय क्रायटेरिया आहेत? कोणी ठरवलेले? ३. भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत (उदा. महाराष्ट्र, केरळ, इ.) नक्की कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये गुजरात पुढे आहे? असेल तर या मॉडेलच्या नेमक्या कोणत्या पॉलिसीमुळे ते शक्य झालं? ४. इतर भाजपशासित राज्यांमध्ये ते का लागू नाही झालं इतकी वर्षे? अजूनही काही प्रश्न आहेत, पण सध्या इतके पुरे. ता. क. - जर योग्य उत्तरे मिळाली, तर माझे मत जाहीरपणे बदलायला मी तयार आहे. मात्र आजपर्यंत गुजरात मॉडेलबद्दल विचारलेल्या प्रश्नाची टू द पॉईंट उत्तरे मिळत नाहीत असा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा