Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"अशा का वागतात काही मुली?"

उ
उपयोजक
Mon, 07/31/2017 - 12:36
🗣 278 प्रतिसाद
आत्ताच एका 'फक्त प्रौढांसाठी' असणार्‍या WhatsApp ग्रुपवर(आता कुठला ग्रुप ते इथं नका विचारु!)एका वेगळ्या विषयावर चर्चा झाली.यात काही मिपाकरही होते. तर चर्चेचा विषय असा होता की 'तशा प्रकारच्या व्हिडिओजपैकी,काही व्हिडिओज हे मुलींना फसवून त्यांच्याच मित्राकडून नंतर डिलीट करण्याच्या वायद्याने काढले जातात.अर्थातच असं काही होत नाही.मैत्रिणीच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन हे व्हिडिओज संकेतस्थळांवर लिक केले जातात. यात एका सदस्यांनी असा मुद्दा मांडला की "या मुलींना कळत कसं नाही? बॉयफ्रेंडच्या नको त्या मागण्यांना या मुली बळी कशा पडतात? यामुळे आपलं आयुष्य पणाला लागू शकतं हे या मुलींना का कळत नसावं? या फसवणूकीला जशा मुली जबाबदार आहेत तशीच त्यांना फसवणारे त्यांचे बॉयफ्रेंडही तेवढेच जबाबदार आहेत.पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत यातून सर्वात जास्त त्रास हा मुलींनाच होतो.भोगावं त्यांना लागतं.घरातल्यांची नाचक्की होते ती वेगळीच! अशा प्रकारचे व्हिडिओज चोरुनही काढले जातात.पण हा प्रकार घडतो केव्हा? जेव्हा ती मुलगी अशा प्रकारे मित्राच्या खुशीसाठी संमती देते तेव्हा! मग प्रश्न असा येतो की या मुली का तयार होतात अशा प्रकारांना? का ठामपणे नकार देऊ शकत नाहीत?बरं हा प्रकार अल्पशिक्षित मुलींबरोबर,खेड्यातच घडतो असं नाही अगदी शिकलेल्या शहरी मुलीही याला बळी पडतात. बरं हे असे लबाड लांडगेच या मुलींना आवडतात.त्यांचं स्टायलिश वागणं,कपडे,गाडी हेही जोडीला असतं. पण एखाद्या साध्या सरळ मुलानं यांना प्रपोज केलं की, "मी तुला किती चांगला समजत होते.तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती!" असं उत्तर मिळतं. मुली किती लेवलपर्यंत जाऊन माती खाऊ शकतात याचं एक उदाहरण पाहण्यात आहे. ही मुलगी BE Electronics चांगल्या मार्कांनी पासआऊट होती.एके ठिकाणचा कामाचा चांगला अनुभव होता.त्यानंतर आमच्या कंपनीत आली.इथे आधीपासूनच एक मुलगा टेस्टींगसाठी होता.याचं त्याच्या कॉलेजमधल्या दुसर्‍या एका मुलीबरोबर अफेअर होतं.तिच्याचबरोबर लग्नही ठरलं होतं.भावी बायकोबरोबर सगळे उद्योग करुन झाले होते. ही कंपनीत आलेली मुलगी त्याने पाहिली.हीला मी पटवणारंच असं म्हणून प्रयत्न सुरु केले.तिचा पाठलाग करणे वगैरे प्रकार सुरु झाले.ती आणि तिची मैत्रीण दोघी एकत्रच घरी जायच्या अॅक्टीवावरुन.सुरुवातीला ही मुलगी आपण भलं आपलं काम भलं अशी होती. हीच्या जोडीदार मैत्रिणीचे विचार म्हणजे प्रेमात पडायचं,नवर्‍याचा स्वभाव आधीपासून माहित असलेला चांगला अशा टाईपचे.तिच्या संगतीने हीचेही तसेच विचार.(अर्थात असे विचार काही गैर नाहीत) पण तसा कोणी हीच्या जिवनात नव्हता.मग ह्या ठोंब्याचे प्रयत्न सुरु होतेच.आणि वाढले.तिच्या शिव्या खाऊन,अपमान होऊनही पिच्छा सोडत नव्हता.ती बोलली नाही की हा डबा खायचा नाही. आता हीची ही जोडीदारीण हे सर्व प्रकार पाहत होती.तिने सुचवलं अगं एवढा मागं लागलाय तर नाही का म्हणतेस? प्रेमविवाह करायचा असं ठरलंय ना आपलं? दे त्याला रिस्पॉन्स! डिपार्टमेंटमधल्या काही लोकांनी त्या मुलाबद्दल सांगितलं तरीही ती बदलली नाही. स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची मुळातच अक्कल नसल्याने तिने या मुलाला होकार दिला.तिला याचं लग्न ठरलंय हेही माहित होतं.तरीही मी निर्णय बदलायला लावीन असा विश्वास.दोघंही वाहवत गेले.सगळे "उद्योग" करुन झाले.यानं त्याचे फोटोही काढून ठेवले. या मुलीच्या घरी ती या नालायकाबरोबर बोलत असताना बापानं पकडलं.झोडपून काढलं पण लग्न करीन तर याच्याबरोबरचं म्हटल्यावर बापानं मुंबईचं एक स्थळ काढलं.तो मुलगा स्वभावानं कसा आहे वगैरे न पाहता जबरदस्तीनं लग्न लावून दिलं. या ठोंब्याच्या होणार्‍या बायकोलाही आपला होणारा नवरा इतका नालायक आहे हे माहित होतं तरीही गावभर फिरल्याने सगळीकडे प्रसिध्दी झाली होती.मग तिच्याबरोबर याचं लग्नही झालं. या एका प्रसंगात एक नव्हे तर चक्क तीन पूर्ण बिंडोक मुली पाहिल्या.त्या पण शिकलेल्या,इंजिनियर मुली. अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात. "आमच्या मित्राला ३ बहीणी आहेत... त्यातली ही दुसरी! दिसायला फार सुंदर. तीचं आणि एका मुलाचं प्रेम साधारण ८वी ते ९ वीच्या दरम्यान जुळलं.. ती त्याच्यापेक्षा ६ महिन्याने मोठी... १२ वी नंतर त्या दोघांमध्ये खूप जवळीक झाली... ती मुलगी, तिची लहान बहीण आणि आजी गावी तर बाकी मुंबईला होते.. तो मुलगा दररोज त्या मुलीच्या रात्री १२ च्या नंतर घरी यायचा... तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... त्यामुळे संशय ही कोण घेत नसे... एखादा सापडला.. गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल... पण परत ६ महिन्यांनी ह्यांचे प्रकरण चालू... अाख्या गावभर झालं.. तरी ती मुलगी बेफिकर... शेवटी घरच्यांना समजलं... एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं.. पण ती एवढी बेफिकीर की करीन तर हाच.. दोघानी ही २१ पार केल होतं.. तिला फार समजावलं पण ऐकेनाच... पळून जाऊ नये म्हणून मग लग्न लावायचा विचार केला... आम्ही सांगून टाकलं लग्नानंतर परत तोंड नाही दाखवायचं ती उलट बोलली तुमच्या सारख्या सैतानांकडे मला यायचं ही नाही. त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अगोदरच बहिणीकडे शिकायला... राहतं दोन खणांचं कौलारू घर.. १० ते १२ गुंठे जमीन, अर्धवट शिक्षण म्हणून नोकरी नाही,आईवडील गावात एकाकडे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात कोणाकडेतरी रोजंदारीवर जायचे. आणि मुलीचे वडील मातब्बर, भाऊ सॉफ्टवेअर मध्ये, मोठी बहीण पण जॉबला... परिस्थिती ने तर जहागिरदार.. देखणेपणावरती तर त्या मुलीला कुणीही पसंत केलं असतं. तिला इतके बोलूनही ती ऐकेना... समजावणार्‍यांनाच शिव्या द्यायची!.. शेवटी भातुकलीच्या खेळासारखं त्या बाहुला बाहुलीच लग्न(सगळ्यांच्या तोंडात हेच) मंदिरात लावून दिलं. आता वर्ष झालं असेल मुलगा कुठंतरी दुकानात जॉब करतो... परिस्थिती बिकट म्हणून तीही आता सासू बरोबर मजुरी करते.... कुठं ते राजकुमारीच जगणं आणि कुठं आता काबाडकष्ट! एकदा तिच्या नवऱ्या बरोबर नाश्ता करताना हॉटेल मध्ये भेटली... अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती... विचारलं तिलाच शिव्या देताना थोडा का विचार केला नाहीस..??? तो पोरगा काहीच बोलला नाही.. बडवलेला म्हणून! (सैराटचीच कथा फुलवल्यासारखी वाटेल पण हे खरं आहे.) म्हणजे वास्तव समोर आलं की मग विचार करतात... पण त्याअगोदर केला असता तर ही वेळ अाली नसती. कुठे चुकतं या मुलींचं? विश्वास ठेवण्यायोग्य माणूस त्यांना अोळखता येत नाही की प्रेमात पडल्यावर मेंदूत काही रासायनिक बदल होतात? की कशाची भितीच वाटत नाही यांना? अशा का वागतात काही मुली?
वर्गीकरण
आपले मत

प्रतिक्रिया द्या
97506 वाचन

💬 प्रतिसाद (278)
अ
अत्रन्गि पाउस Mon, 07/31/2017 - 12:52 नवीन
अशा का वागतात काही मुली !
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 07/31/2017 - 12:54 नवीन
... एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल! "अशा का वागतात काही मुली?" - अक्कल नसल्याने!
  • Log in or register to post comments
श
श्री Mon, 12/24/2018 - 14:08 नवीन
बरं आता दिड वर्षात काही फरक पड्ला का मुलींमध्ये ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
स
सौन्दर्य Mon, 07/31/2017 - 17:13 नवीन
साधारणपणे एकाच वयाच्या मुला-मुलीत, मुली जास्त mature असतात असं एकूण निरीक्षण आहे. मुली भावनेच्या भरात वहावत जात नाहीत, त्यांचे पाय नेहेमीच जमिनीवर असतात. शारीरिक संबंधात पुढील नको असलेले परिणाम मुलींनाच भोगावे लागतात ह्याची त्यांना जाणीव असते. तरी देखील त्या अश्या का वागतात ह्याचे एक कारण म्हणजे 'तारुण्य सुलभ भावना' हे असू शकते. दुसरे कारण म्हणजे आवडलेला मुलगा, मग तो कोणीही व कोणत्याही परिस्थितीतला असो, हातातून निसटून जाऊ नये म्हणून केलेली किंवा करावी लागणारी एक तडजोड, असू शकते.
  • Log in or register to post comments
अ
अतरंगी Mon, 07/31/2017 - 17:19 नवीन
त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अगोदरच बहिणीकडे शिकायला... राहतं दोन खणांचं कौलारू घर.. १० ते १२ गुंठे जमीन, अर्धवट शिक्षण म्हणून नोकरी नाही,आईवडील गावात एकाकडे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात कोणाकडेतरी रोजंदारीवर जायचे. आणि मुलीचे वडील मातब्बर, भाऊ सॉफ्टवेअर मध्ये, मोठी बहीण पण जॉबला... परिस्थिती ने तर जहागिरदार.. देखणेपणावरती तर त्या मुलीला कुणीही पसंत केलं असतं.>>>>> निव्वळ महान विचार आहेत.....दंडवत घ्यावा.
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 07/31/2017 - 17:24 नवीन
सहमत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अतरंगी
उ
उपयोजक Mon, 07/31/2017 - 17:37 नवीन
कोणाचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अतरंगी
द
दशानन Mon, 07/31/2017 - 17:39 नवीन
ज्यांना उपप्रतिसाद दिला आहे त्यांच्याशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
उ
उपयोजक Mon, 07/31/2017 - 19:29 नवीन
लव जिहादमधे अशाच उथळ विचारांच्या हिंदु मुली फसत असाव्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
य
योगेश लक्ष्मण बोरोले Mon, 07/31/2017 - 17:38 नवीन
आपल्याकडे बहुसंख्य घरांमध्ये मुलींसाठी लग्न व संसार हेच मुख्य ध्येय म्हणुन मुलींवर ठासवले जाते. त्याचबरोबर २४ तास दुरचित्रवाणी, सिनेमे ईं. वरुन ईश्क, प्यार चा अविरत मारा चालु असतोच. मग थोडे वयात आल्याबरोबर काही लांडगे फायदा उठवतात व विचारांची काहीच खोली नसल्याने मुली फसतात .
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Mon, 07/31/2017 - 18:16 नवीन
सारासार विचारशक्ती गहाण पडल्याने असे किस्से घडतात. या बरोबरच मुलांकडे पालकांचे पुरेसे आणि सजग लक्ष नसल्याने असे प्रकार घडतात. माझा मुलगा साधारण सातवी आठवीत असताना त्याच्याच वर्गातल्या एका मुलीचे आई वडील जे आमचे स्नेही आहेत, गप्पा मारायला आले असता त्या बी (मुलीची आई) म्हणाली, 'तुमचं बरं आहे हो, तुम्हाला मुलगा आहे काळजी करावी लागत नाही. मुलीची किती काळजी घ्यावी लागते....' त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो, "मुलींइतकीच मुलाची काळजी घ्यावी लागते, मुलांकडेही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. आपल्या मुलाने कुणाही मुलीचा गैरफायदा घेऊ नये असे संस्कार जाणीवपूर्वक करावे लागतात".
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 07/31/2017 - 19:31 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
न
नीलमोहर Mon, 07/31/2017 - 19:08 नवीन
अशा का वागतात काही मुली? का वागतात काही मुली अशा? वागतात का काही मुली अशा? काही मुली अशा वागतात का? मुली अशा काही वागतात का? अशा मुली काही का वागतात? का अशा काही वागतात मुली? वागतात का मुली अशा काही? काही मुली अशा का वागतात? मुली अशा काही का वागतात?
  • Log in or register to post comments
व
विखि Mon, 07/31/2017 - 19:29 नवीन
जब तक इस देस मे सनीमा है तब तक लोक ........ बनते रहन्गे !
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर Tue, 08/01/2017 - 08:22 नवीन
खरय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विखि
अ
अत्रे Tue, 08/01/2017 - 02:33 नवीन
गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल.
एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं
कोण आहेत हे तुमचे मित्र? अटक व्हायला पाहिजे अशा लोकांना.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 08/01/2017 - 09:34 नवीन
अश्या रानटी प्रवृत्तीच्या लोकांमुळेच, गुन्हेगारी बळावते. त्यांना काय करायचे आहे ते करु द्या की, तुम्ही कशाला मोरल पोलिसिंग करता. मला वाटते ज्यांच्याकडे मुली ढुंकुनही बघत नाहीत अशीच लोक दुसर्‍याच्या फाटक्यात पाय घालत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
उ
उपयोजक Tue, 08/01/2017 - 13:17 नवीन
त्या रिकामटेकड्या मुलाला मारलं याचा राग येतो पण त्या मुलीची वाट लागली याचं वाईट नाही का वाटत? आणखी एखादीची वाट लागू नये म्हणून सावध राहणं चूक आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ज
जेम्स वांड Tue, 08/01/2017 - 15:52 नवीन
सावध राहणे म्हणजे बडवणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 11:57 नवीन
आपल्या देशात अहिंसा सर्वतोपरी आहे, म्हणून अगदी देशाची जरी वाट लागली तरी चालेल पण ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
म
मराठी कथालेखक Wed, 08/02/2017 - 09:24 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 11:54 नवीन
रितसर तक्रार करून १५ वर्षे केस चालवणे हेच श्रेयस्कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
स
सूड Tue, 08/01/2017 - 08:47 नवीन
कशाला मॉरल पोलिसिंग करत बसायचं? आपल्याला दुसरे काही उद्योग नाहीयेत का? ती मुलगी, तिचा नवरा, आणि त्यांचं नशीब, बघून घेतील!! आपल्याकडच्या लोकांना लष्करच्या भाकर्‍या भाजण्याची हौस फार. असं काही ऐकलं की घरचं कार्य असल्यासारखे जातात. मी तर माझ्या मित्रांना पण एकदा सांगून बघतो. तेही मित्र आहेत म्हणून, नाही ऐकलं तर मनात "झक मार" म्हणतो आणि सोडून देतो.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 08/01/2017 - 13:09 नवीन
हो खरंय आपण आपलं पाककृती,कलादालन,भटकंती,रांगोळी,ज्वेलरी डिझायनिंग असे धागे काढलेले बरे नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Tue, 08/01/2017 - 15:14 नवीन
हो खरंय आपण आपलं पाककृती,कलादालन,भटकंती,रांगोळी,ज्वेलरी डिझायनिंग असे धागे काढलेले बरे नाही का?
प्रतिसाद समजला नाही, जरा विस्तृतपणे सांगता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
न
नगरीनिरंजन गुरुवार, 08/03/2017 - 10:36 नवीन
इथे तर स्वतःच्या निर्णयस्वातंत्र्यासाठी काबाडकष्ट करणे, गरिबीतून स्वप्रयत्नाने वर येणे ह्यालाच वाईट म्हटलंय. काबाडकष्ट केले म्हणजे आयुष्य बरबाद झाले असं समजणारे बहुदा रिकामटेकडे व परोपजीवी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ए
एमी Sun, 08/06/2017 - 03:17 नवीन
+१. काबाडकष्ट केले म्हणजे आयुष्य बरबाद झाले असं समजणारे बहुदा रिकामटेकडे व परोपजीवी असतात. >> त्यांचा तर उदोउदो चाललेला असतो की इथे सतत...भाकर्या बडवण्याची किंमत वगैरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
व
विशुमित Tue, 08/01/2017 - 10:45 नवीन
तुम्ही आधी टुक्कार पोरांची सांगत सोडा. असल्या उचापती मध्ये पडू नका. तुमचे लग्न झाले नसेल तर ते होण्यात पण अडथळे येतील. आपले शिक्षण नोकरी धंद्यात लक्ष घाला. इतरांच्या पोरींची जास्त काळजी करू नका. त्यांची काळजी करायला आपले प्रशासन खंबीर आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 08/01/2017 - 13:11 नवीन
खरंच का काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 08/01/2017 - 13:20 नवीन
मग तलवारी घेऊन रिकामटेकडी पोरं कापत सुटणार की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
उ
उपयोजक Tue, 08/01/2017 - 14:00 नवीन
बरं मग त्या रिकामटेकड्या मुलाला हातही न लावता किंवा त्याला एक पैसाही न देता त्या चांगल्या मुलीचं भवितव्य कसं वाचवायचं याचा सुयोग्य मार्ग सुचवा बघू!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 08/01/2017 - 14:11 नवीन
चांगल्या मुलीचं भवितव्य कसं वाचवायचं याचा सुयोग्य मार्ग सुचवा बघू!
तिचं भवितव्य कशात चांगल वाईट आहे ते तिला ठरवू दे की. तुम्ही फार फार तर समजावून सांगा. मुलाला गुरासारखे मारणे, हात मोडेपर्यंत मारणे असले प्रकार करायचा हक्क तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना कुणी दिला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
उ
उपयोजक Tue, 08/01/2017 - 14:22 नवीन
मी मारहाण केलेली नाही किंवा त्याचं समर्थनही केलेलं नाही.हा मित्राच्या गावी घडलेला प्रसंग आहे. त्या मुलाला आधी समजावलंच नसेल डायरेक्ट मारलंच असेल कशावरुन? समजावूनही बधला नसेल तर काय करावं? न कळत्या वयातलं कोणी भावनेत वाहून चुकीचा निर्णय घेत असेल तर माझा काय संबंध? माझ्या घरापर्यंत नाही ना आलं म्हणून तो घेऊ द्यावा का?इतकी डोळेझाक करावी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अभिजीत अवलिया Tue, 08/01/2017 - 14:43 नवीन
<एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं../blockquote> ह्याचा अर्थ तुम्ही पण मारहाण केलीत असा होतो. अवांतर — ही मोरल पोलिसिंगची हौस बर्याच लोकांना असते. विशेष करुन रस्त्यावर फुटकळ अपघात जरी झाला तरी हे लोक न्यायदान करायला हजर. गेल्या गुरवारी डांगे चौकात एका डाॅक्टरला गाडी चालवताना ब्रेन स्ट्रोक आला. त्यामुळे त्यांची गाडी दुसर्या कारला धडकली. मोरल पोलिस आले आणि डाॅक्टर दारु पिलेत असे अनुमान काढून त्यांना बेदम मारले. नंतर ते डाॅक्टर आहेत हे समजल्यावर पळून गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
अ
अभिजीत अवलिया Tue, 08/01/2017 - 14:48 नवीन
प्रतिसाद अर्धवट आला. एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं.. — ह्याचा अर्थ तुम्ही पण मारहाण करणार्या ग्रुप मध्ये होता असा होतो माझ्या मते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
उ
उदय Tue, 08/01/2017 - 16:41 नवीन
अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात. "आमच्या मित्राला ३ बहीणी आहेत... त्यातली ही दुसरी! दिसायला फार सुंदर. तीचं आणि एका मुलाचं प्रेम साधारण ८वी ते ९ वीच्या दरम्यान जुळलं.. ती त्याच्यापेक्षा ६ महिन्याने मोठी... १२ वी नंतर त्या दोघांमध्ये खूप जवळीक झाली... ती मुलगी, तिची लहान बहीण आणि आजी गावी तर बाकी मुंबईला होते.. तो मुलगा दररोज त्या मुलीच्या रात्री १२ च्या नंतर घरी यायचा... तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... त्यामुळे संशय ही कोण घेत नसे... एखादा सापडला.. गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल... पण परत ६ महिन्यांनी ह्यांचे प्रकरण चालू... अाख्या गावभर झालं.. तरी ती मुलगी बेफिकर... शेवटी घरच्यांना समजलं... एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं.. पण ती एवढी बेफिकीर की करीन तर हाच.. दोघानी ही २१ पार केल होतं.. तिला फार समजावलं पण ऐकेनाच... पळून जाऊ नये म्हणून मग लग्न लावायचा विचार केला... आम्ही सांगून टाकलं लग्नानंतर परत तोंड नाही दाखवायचं ती उलट बोलली तुमच्या सारख्या सैतानांकडे मला यायचं ही नाही. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
म
मोदक Tue, 08/01/2017 - 17:02 नवीन
किंवा हा व्हिडीओ बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय
ख
खेडूत Wed, 08/02/2017 - 07:46 नवीन
वरील प्रतिसादाच्या आधी एक वाक्य आहे: 'अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात' त्यामुळे सदर लेखक मारहाणीत सामील असल्याचे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय
प
प्रसाद_१९८२ Tue, 08/01/2017 - 14:20 नवीन
बरं मग त्या रिकामटेकड्या मुलाला हातही न लावता किंवा त्याला एक पैसाही न देता त्या चांगल्या मुलीचं भवितव्य कसं वाचवायचं याचा सुयोग्य मार्ग सुचवा बघू! === मुलीचे भवितव्य वाचवायला, एकाद्याला गुरासारखे मारणे, त्याचे हातपाय तोडणे हा "सुयोग्य" मार्ग आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
उ
उपयोजक Tue, 08/01/2017 - 14:25 नवीन
बरं मारहाण करणं चुकीचं असं समजू! मग योग्य मार्ग तुम्ही सुचवा! पण हमखास लागू पडला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
प
पिलीयन रायडर Tue, 08/01/2017 - 14:34 नवीन
मारहाणीचा मार्ग पडला का हमखास लागु?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
अ
अत्रे Tue, 08/01/2017 - 14:50 नवीन
पण हमखास लागू पडला पाहिजे.
मारहाणीचा मार्ग उपयोगी पडला नाही हे तुम्ही दिलेल्या उदाहरणावरूनच दिसून येते. उलट मारहाण केल्यामुळे त्यांचा लग्न करण्याचा निर्धार वाढला नसेल कशावरून (रिवर्स सायकॉलॉजि)? मुलगी सज्ञान असेल तर तुम्ही तिला समजावून सांगितल्याशिवाय काहीही करू शकत नाही. तिला कोणी नुकसान पोहोचवत असेल तर पोलीसांत तक्रार करू शकता. बाकी प्रत्येक जण आपलं भाग्य स्वतः ठरवतो, ते त्याचे त्याला/तिला ठरवू द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
उ
उदय Tue, 08/01/2017 - 16:52 नवीन
मारहाण करणं चुकीचं असं समजू! कुठल्याही परिस्थितीत मारहाण करणे हे चुकीचेच आहे आणि तुम्ही त्याचे समर्थन करताय, हे काही बरोबर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
आ
आदूबाळ Tue, 08/01/2017 - 14:19 नवीन
मॉरल पोलिसींग की लत बहुत भयानक होती हय. त्यामुळे वर कितीकांनी सांगितलं तरी धागालेखकाला ते 'सत्कार्यात आलेले काटे' वाटतील. आणि महाराष्ट्रात तशीही मॉरल पोलिसींगची जुनी परंपरा आहे. (उदा० पंचहौद मिशन प्रकरण) काही नाही हो सकेशु, तुम्ही काही ऐकू नका या वैट्ट लोकांचं.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 08/01/2017 - 17:00 नवीन
काय होते पंचहौद मिशन प्रकरण..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Tue, 08/01/2017 - 17:54 नवीन
पंचहौद मिशन नावाची (मिशनरी) शाळा होती (अजूनही आहे सुभाषनगरजवळ). त्यांनी १८९२मध्ये काही समारंभाप्रीत्यर्थ लोकमान्य टिळकांना आणि न्या० रानड्यांना शाळेत बोलावलं. समारंभ संपल्यावर चहा दिला. त्यांनीही तो प्यायला. हे सगळं पेपरात छापून आल्यावर गदारोळ उठला. सनातनी लोकांच्या मते ख्रिस्ती लोकांच्या हातचा चहा पिणं हे पातक होतं. चुकीचं, अनैतिक होतं. त्याबद्दल या दोघांवर ग्रामण्य** बजावण्यात यावं अशी त्यांची मागणी होती. यात कोणीतरी शंकराचार्यांना आर्बिट्रेटर नेमलं. त्यांनी प्रायश्चित्त## घेण्याची शिक्षा फर्मावली. टिळकांनी घेतलं. रानड्यांनी काय केलं ते आठवत नाही. **हे ग्रामण्य म्हणजे एक नंबर प्रकार असायचा. बेसिकली वाळीत टाकणे, पण त्यात इतरही काही विनोद होते. प्रबोधनकार ठाकर्‍यांनी या ग्रामण्य प्रकरणावर बरंच विस्तृत लिहिलं आहे. ##हाही एक नंबर प्रकार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
स्रुजा Wed, 08/02/2017 - 14:49 नवीन
पंचहौद फारच भारी प्रकरण झालं होतं. टिळकांनी देखील सहजा सहजी प्रायश्चित्त घेतलं नाही. आधी तर त्यांच्या वकीली डोक्याने "बटाटा पण आपला नाही, साबुदाणा पण नाही पण तो तर तुम्ही उपासाला पण खाता, शिवाय चहा चिनी मातीच्या भांड्यातुन दिला होता - तो निर्लेप च होता. फार काय, करणारे आचारी ब्राह्मण च होते" पर्यंत युक्तिवाद केले. ते नेहमीसारखेच प्रभावी देखील होते. शिवाय ग्रामण्याला भीक घालायची नाही हे त्यांनी ठरवलंच होतंं, वार्‍याशी सुद्धा भांडतील अशी आधीच ख्याती असलेल्या टिळकांना आणि त्यांच्या अ‍ॅटिट्युड ला या वाळीत टाकण्याचा असा कितीसा फरक पडणार आहे याची मुळात परंपरावाद्यांना देखील खात्री नव्हती. त्यांच्या मुलाची मुंज देखील त्याच काळातली . स्वतः पौरोहित्य करेन नाही तर काशीच्या ब्राह्मणांना बोलावेन वगैरे त्यांनी ठरवलं होतं (हा संदर्भ नीट आठवत नाहीये, खात्री करुन घ्यायला हवी) . कुटुंबाची मात्र त्यांच्या अवस्थ थोडी नाजुक झाली होती, मुलींबरोबर खेळायला कुणी मिळेना- घरी मदतीला आजुबाजुच्या बायका येईनात- पण जसा काळ पुढे जायला लागला तसा तो विरोध ही मवाळ व्हायला लागला कारण शेवटी वैयक्तिक हितसंबंध महत्वाचे असतातच - समाजाची भीती एका ठराविक मर्यादेपर्यंतच काम करते. होय नाही करता करता आणि " आम्ही म्हणलं नव्हतं टिळक छुपे सुधारक च आहेत" हे फार पुढे यायला लागल्यावर, त्यातल्या त्यात शंकराचार्यांची मध्यस्थी दोन्ही पार्टींना पटली आणि ते प्रकरण एकदाचं मिटलं. सुधारकांनी नेहमीसारखं सगळंच थेट शिंगावर घेतल्याने त्यांना शंकराचार्यांची ही पळवाट उरली नाही आणि वाळीत टाकलेल्या लोकांच्या सुधारणेसाठी ते नेहमीसारखे एकटेच झगडत राहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Wed, 08/02/2017 - 15:05 नवीन
...आणि या प्रकरणानंतर उण्यापुर्‍या वीस वर्षांत पुण्यात चहाची हॉटेलं जागोजाग झाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
म
मोदक Wed, 08/02/2017 - 15:17 नवीन
छ्या.. असे लिहायचे नै कै.. ..आणि या प्रकरणानंतर उण्यापुर्‍या वीस वर्षांत पुण्यात चहावाल्यांना अच्छे दिन आले. असे कैतरी लिहा. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
स्रुजा Wed, 08/02/2017 - 20:53 नवीन
हाहाहा भारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा