Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"अशा का वागतात काही मुली?"

उ
उपयोजक
Mon, 07/31/2017 - 12:36
🗣 278 प्रतिसाद
आत्ताच एका 'फक्त प्रौढांसाठी' असणार्‍या WhatsApp ग्रुपवर(आता कुठला ग्रुप ते इथं नका विचारु!)एका वेगळ्या विषयावर चर्चा झाली.यात काही मिपाकरही होते. तर चर्चेचा विषय असा होता की 'तशा प्रकारच्या व्हिडिओजपैकी,काही व्हिडिओज हे मुलींना फसवून त्यांच्याच मित्राकडून नंतर डिलीट करण्याच्या वायद्याने काढले जातात.अर्थातच असं काही होत नाही.मैत्रिणीच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन हे व्हिडिओज संकेतस्थळांवर लिक केले जातात. यात एका सदस्यांनी असा मुद्दा मांडला की "या मुलींना कळत कसं नाही? बॉयफ्रेंडच्या नको त्या मागण्यांना या मुली बळी कशा पडतात? यामुळे आपलं आयुष्य पणाला लागू शकतं हे या मुलींना का कळत नसावं? या फसवणूकीला जशा मुली जबाबदार आहेत तशीच त्यांना फसवणारे त्यांचे बॉयफ्रेंडही तेवढेच जबाबदार आहेत.पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत यातून सर्वात जास्त त्रास हा मुलींनाच होतो.भोगावं त्यांना लागतं.घरातल्यांची नाचक्की होते ती वेगळीच! अशा प्रकारचे व्हिडिओज चोरुनही काढले जातात.पण हा प्रकार घडतो केव्हा? जेव्हा ती मुलगी अशा प्रकारे मित्राच्या खुशीसाठी संमती देते तेव्हा! मग प्रश्न असा येतो की या मुली का तयार होतात अशा प्रकारांना? का ठामपणे नकार देऊ शकत नाहीत?बरं हा प्रकार अल्पशिक्षित मुलींबरोबर,खेड्यातच घडतो असं नाही अगदी शिकलेल्या शहरी मुलीही याला बळी पडतात. बरं हे असे लबाड लांडगेच या मुलींना आवडतात.त्यांचं स्टायलिश वागणं,कपडे,गाडी हेही जोडीला असतं. पण एखाद्या साध्या सरळ मुलानं यांना प्रपोज केलं की, "मी तुला किती चांगला समजत होते.तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती!" असं उत्तर मिळतं. मुली किती लेवलपर्यंत जाऊन माती खाऊ शकतात याचं एक उदाहरण पाहण्यात आहे. ही मुलगी BE Electronics चांगल्या मार्कांनी पासआऊट होती.एके ठिकाणचा कामाचा चांगला अनुभव होता.त्यानंतर आमच्या कंपनीत आली.इथे आधीपासूनच एक मुलगा टेस्टींगसाठी होता.याचं त्याच्या कॉलेजमधल्या दुसर्‍या एका मुलीबरोबर अफेअर होतं.तिच्याचबरोबर लग्नही ठरलं होतं.भावी बायकोबरोबर सगळे उद्योग करुन झाले होते. ही कंपनीत आलेली मुलगी त्याने पाहिली.हीला मी पटवणारंच असं म्हणून प्रयत्न सुरु केले.तिचा पाठलाग करणे वगैरे प्रकार सुरु झाले.ती आणि तिची मैत्रीण दोघी एकत्रच घरी जायच्या अॅक्टीवावरुन.सुरुवातीला ही मुलगी आपण भलं आपलं काम भलं अशी होती. हीच्या जोडीदार मैत्रिणीचे विचार म्हणजे प्रेमात पडायचं,नवर्‍याचा स्वभाव आधीपासून माहित असलेला चांगला अशा टाईपचे.तिच्या संगतीने हीचेही तसेच विचार.(अर्थात असे विचार काही गैर नाहीत) पण तसा कोणी हीच्या जिवनात नव्हता.मग ह्या ठोंब्याचे प्रयत्न सुरु होतेच.आणि वाढले.तिच्या शिव्या खाऊन,अपमान होऊनही पिच्छा सोडत नव्हता.ती बोलली नाही की हा डबा खायचा नाही. आता हीची ही जोडीदारीण हे सर्व प्रकार पाहत होती.तिने सुचवलं अगं एवढा मागं लागलाय तर नाही का म्हणतेस? प्रेमविवाह करायचा असं ठरलंय ना आपलं? दे त्याला रिस्पॉन्स! डिपार्टमेंटमधल्या काही लोकांनी त्या मुलाबद्दल सांगितलं तरीही ती बदलली नाही. स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची मुळातच अक्कल नसल्याने तिने या मुलाला होकार दिला.तिला याचं लग्न ठरलंय हेही माहित होतं.तरीही मी निर्णय बदलायला लावीन असा विश्वास.दोघंही वाहवत गेले.सगळे "उद्योग" करुन झाले.यानं त्याचे फोटोही काढून ठेवले. या मुलीच्या घरी ती या नालायकाबरोबर बोलत असताना बापानं पकडलं.झोडपून काढलं पण लग्न करीन तर याच्याबरोबरचं म्हटल्यावर बापानं मुंबईचं एक स्थळ काढलं.तो मुलगा स्वभावानं कसा आहे वगैरे न पाहता जबरदस्तीनं लग्न लावून दिलं. या ठोंब्याच्या होणार्‍या बायकोलाही आपला होणारा नवरा इतका नालायक आहे हे माहित होतं तरीही गावभर फिरल्याने सगळीकडे प्रसिध्दी झाली होती.मग तिच्याबरोबर याचं लग्नही झालं. या एका प्रसंगात एक नव्हे तर चक्क तीन पूर्ण बिंडोक मुली पाहिल्या.त्या पण शिकलेल्या,इंजिनियर मुली. अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात. "आमच्या मित्राला ३ बहीणी आहेत... त्यातली ही दुसरी! दिसायला फार सुंदर. तीचं आणि एका मुलाचं प्रेम साधारण ८वी ते ९ वीच्या दरम्यान जुळलं.. ती त्याच्यापेक्षा ६ महिन्याने मोठी... १२ वी नंतर त्या दोघांमध्ये खूप जवळीक झाली... ती मुलगी, तिची लहान बहीण आणि आजी गावी तर बाकी मुंबईला होते.. तो मुलगा दररोज त्या मुलीच्या रात्री १२ च्या नंतर घरी यायचा... तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... त्यामुळे संशय ही कोण घेत नसे... एखादा सापडला.. गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल... पण परत ६ महिन्यांनी ह्यांचे प्रकरण चालू... अाख्या गावभर झालं.. तरी ती मुलगी बेफिकर... शेवटी घरच्यांना समजलं... एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं.. पण ती एवढी बेफिकीर की करीन तर हाच.. दोघानी ही २१ पार केल होतं.. तिला फार समजावलं पण ऐकेनाच... पळून जाऊ नये म्हणून मग लग्न लावायचा विचार केला... आम्ही सांगून टाकलं लग्नानंतर परत तोंड नाही दाखवायचं ती उलट बोलली तुमच्या सारख्या सैतानांकडे मला यायचं ही नाही. त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अगोदरच बहिणीकडे शिकायला... राहतं दोन खणांचं कौलारू घर.. १० ते १२ गुंठे जमीन, अर्धवट शिक्षण म्हणून नोकरी नाही,आईवडील गावात एकाकडे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात कोणाकडेतरी रोजंदारीवर जायचे. आणि मुलीचे वडील मातब्बर, भाऊ सॉफ्टवेअर मध्ये, मोठी बहीण पण जॉबला... परिस्थिती ने तर जहागिरदार.. देखणेपणावरती तर त्या मुलीला कुणीही पसंत केलं असतं. तिला इतके बोलूनही ती ऐकेना... समजावणार्‍यांनाच शिव्या द्यायची!.. शेवटी भातुकलीच्या खेळासारखं त्या बाहुला बाहुलीच लग्न(सगळ्यांच्या तोंडात हेच) मंदिरात लावून दिलं. आता वर्ष झालं असेल मुलगा कुठंतरी दुकानात जॉब करतो... परिस्थिती बिकट म्हणून तीही आता सासू बरोबर मजुरी करते.... कुठं ते राजकुमारीच जगणं आणि कुठं आता काबाडकष्ट! एकदा तिच्या नवऱ्या बरोबर नाश्ता करताना हॉटेल मध्ये भेटली... अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती... विचारलं तिलाच शिव्या देताना थोडा का विचार केला नाहीस..??? तो पोरगा काहीच बोलला नाही.. बडवलेला म्हणून! (सैराटचीच कथा फुलवल्यासारखी वाटेल पण हे खरं आहे.) म्हणजे वास्तव समोर आलं की मग विचार करतात... पण त्याअगोदर केला असता तर ही वेळ अाली नसती. कुठे चुकतं या मुलींचं? विश्वास ठेवण्यायोग्य माणूस त्यांना अोळखता येत नाही की प्रेमात पडल्यावर मेंदूत काही रासायनिक बदल होतात? की कशाची भितीच वाटत नाही यांना? अशा का वागतात काही मुली?
वर्गीकरण
आपले मत

प्रतिक्रिया द्या
97506 वाचन

💬 प्रतिसाद (278)
स
सूड Tue, 08/01/2017 - 20:46 नवीन
तुमच्या आवडीच्या मुलाशी तिने संसार थाटायला हवा होता कां?
बिंगो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अकिलिज
य
योगेश लक्ष्मण बोरोले Tue, 08/01/2017 - 16:31 नवीन
परींदाभाउ, अहो सैराट हा व्यवसायीक चित्रपट आहे व त्याचि मुख्य उद्देश पैसा कमावणे हाच होता. पैसा कमावण्यासाठी धक्कादायक, अतिरंजित कथानक व चित्रण लागतेच. याचा अर्थ महाराष्ट्रात उठता-बसता अशा गोष्टि घडतात असे नाही. त्यामुळे सैराट न केल्याबद्दल केअशु व त्यांच्या मित्रांना धन्यवाद देण्याची गरज नाही कारण ती आपल्या बहुतांषांची स्वाभाविक प्रवृत्ति नाही. अगदी उत्तरेतदेखील आता अशा घटना अपवादात्मक घडतात व काही झाले की च्यानलवाले त्याविषयी बातम्यांचा अनेक दिवस रतीब घालतात. आता, अशी एकही घटना घडु नये खरे तर. पण मग ती आदर्श व्यवस्था होईल व ते फक्त स्वप्नातच शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा
द
दुर्गविहारी Tue, 08/01/2017 - 19:22 नवीन
वर बर्याच जणानी मोराल पोलिंसिंगसाठी गळे काढलेत, त्यांच्यासाठि दोन उदाहरणे देतो १) आमच्याच अपार्टमेंट्मधे दुसर्‍या विंगमधे माझाच शाळामित्र रहातो. त्याची मुलगी आता आठवीत आहे. एका दुपारी घरात कोणी नसताना तीने तीच्या मित्राला घरी बोलावले. ती ,तीचा मित्र व शेजारीच रहाणारी तीची मैत्रीण असे तीघे गच्चीवर गेले. ते एका शेजारच्या फ्लॅट्मधे रहाणार्‍या व्यक्तीने बघीतले. काही शंका येउन ते मागोमाग गेले, तेव्हा ती व तीचा मित्र किसींग करीत होता व दुसरी मैत्रीण त्याचे व्हिडीओ शुटींग करीत होती, हा प्रकार पाहून त्या व्य्क्तीने तीच्या आई वडीलांना फोन केला ,नंतर सगळ्यांनी त्या मुलाला बदड्ले व त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले. आज वरच्या प्रतिक्रीया वाचून मला कळले कि त्यांनी कित्ती घोर पाप केले. वास्तविक त्या व्य्क्तीने त्यांच्या मागोमाग जायलाच नको होते, गेल्यास तो जे प्रकार करीत होते त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे होते. शिवाय तीच्या वडीलांनी मारहाण करण्याएवजी त्या मुलाचे आभारच मानायला हवे होते, कारण परदेशात हे चालते ना! शिवाय सगळ्यांनी मिळून पाडगावकरांच्या कवितेचे सामुहिक वाचन करायला पाहिजे होते. आहाहा काय दृष्य असेल ना ते. पुढच्या वेळी असा काही प्रकार दिसला ना कि मी तरी मि.पा,च्या या घाग्याची प्रिंटाऔअट्च त्या मुलीच्या घरच्यांना देईन, म्हण्जे मुले काहिही करायला मोकळी. आता कोणी मुलगा कुठल्या मुलीची छेड काढली ना तर मी तरी अडवायला जाणार नाही, कारण," त्याने तीची छेड काढली, तुमचे काय गेल?" हा प्रश्न आहेच. २) एका मुसलमान मुलाने माझ्या एका माहितीतील मुलीला ठरवून नादी लावले, ज्या दिवशी तीचा अठरावा वाढदिवस होता त्याच दिवशी पळून जाउन लग्न केल. आजही ती मुलगी दर्ग्या मोहल्लात कोंबड्यांची घाण काढताना दिसते. आज मि.पा.वरच्या प्रतिक्रिया वाचून कळले कि हे चालू द्यावे , नसते मोराल पोलिसिंग करू नये.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 08/01/2017 - 20:52 नवीन
ते एका शेजारच्या फ्लॅट्मधे रहाणार्‍या व्यक्तीने बघीतले. काही शंका येउन ते मागोमाग गेले,
ठीकाय, आपण असं म्हणू की ह्या मागोमाग गेलेल्या व्यक्तीचा मुलगाच त्यात असता तर ह्या मागोमाग गेलेल्या व्यक्तीने काय केलं असतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
उ
उपयोजक Wed, 08/02/2017 - 03:30 नवीन
माफ करा पण वरच्या मारहाणीच्या प्रसंगात इथल्याच कोणचीतरी बहिण,नातेवाइक असते तर काय झालं असतं? विचार करा. आम्ही मारहाण न करता मुलीला समजावलं असतं वगैरे धाग्यावर लिहायला फार सोपं आहे त्यामुळे धाग्यावर समजुतदार,विवेकाने विचार करणारा अशी प्रतिमा होतही असेल पण प्रत्यक्षात मात्र असं काही घडलं तर झोडपणे,किंवा स्थानिक नगरसेवकाची मदत घेऊन त्या मुलाला बदडून काढण्याचा मार्गही अवलंबला जाईल एवढं नक्की! बाकी चालू द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
पिलीयन रायडर Wed, 08/02/2017 - 03:51 नवीन
कोण तुम्ही? नाही सांगाच की तुम्ही कोण??? उद्या समजा त्या मुलीचं रीतसर लग्न झालंही आणि त्यात तिला काही त्रास झाला तर घेणार का बहिणीची जबाबदारी? सांभाळणार का तिला? दुसर्‍याला बदडुन काढायला काडीचीही अक्कल लागत नाही. म्हणुन ते करायला मजा वाटतेय. फक्त तुमच्या लेखी चूक असलं की बास. पण लागुन कोण गेले तुम्ही? कायद्याने तुम्हाला तुरुंगात का टाकु नये? मी असते ना त्या मुलीच्या जागी, तर एकेकाला मुस्काडात दिली असती आधी. आणा कोण नगरसेवक आणताय तो. हिम्मत कशी होते?? केस करायला हवी होती त्या मुलीने. हात तुटेस्तोवर मारता आणि वर तोंड करुन समर्थन करता? आज लोकांना मारझोड होतेय.. उद्या जीव जाईल. (जो जातोच अनेक ठिकाणी..) तेव्हा काय करणार? घेणार का त्या मुलाची जागा? तिथे नाही सामाजिक कळवळा येत? समजा कुणी चुकीचं वागत असेल तर आपण एखाद्याला समाजावुन सांगु शकतो. मारहाण नाही करु शकत. उगाच वाट्टेल त्या गोष्टीचे समर्थन करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 08/02/2017 - 09:19 नवीन
त्या मुलीने का केस केली नसेल? एक उगी आपला अंदाज?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
M
mayu4u गुरुवार, 08/03/2017 - 09:26 नवीन
...मिपा वर पीर ताईंचा प्रतिसाद वाचला नसेल! ["जिभेचे हाड मोडले असेल!" या पु ल यांच्या "म्हैस " मधल्या वाक्याच्या चालीवर वाचावे ;)]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
र
रामपुरी गुरुवार, 08/03/2017 - 15:27 नवीन
"दुसर्‍याला बदडुन काढायला काडीचीही अक्कल लागत नाही" छान छान.. दुसर्‍यांची अक्कल काढणारा एक आयडी गेला तरी त्याचा वारसा चालवणारे अजून आहेत हे पाहून परमसंतोष जाहला. चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अत्रे Wed, 08/02/2017 - 04:38 नवीन
अच्छा, म्हणजे अशा वेळी उपयोगी पडतील म्हणूनच गुंड नगरसेवकांना निवडून आणतात वाटतं लोक! तरीच म्हटलं चांगली माणसं का निवडून येत नाहीत सहसा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
प
प्रसाद_१९८२ Wed, 08/02/2017 - 07:21 नवीन
१) आमच्याच अपार्टमेंट्मधे दुसर्‍या विंगमधे माझाच शाळामित्र रहातो. त्याची मुलगी आता आठवीत आहे. एका दुपारी घरात कोणी नसताना तीने तीच्या मित्राला घरी बोलावले. == आता त्या मुलीनेच त्या मुलाला किसींग करायला स्वत:, घरी कोणीही नसताना बोलावले, तर त्यात मुलाचा दोष काय? आणि त्या मुलाबरोबरच, चूक मुलीची सुद्धा असताना फक्त त्या मुलालाच का बरे बदडले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
द
दुर्गविहारी Wed, 08/02/2017 - 08:56 नवीन
सविस्तर मी लिहीत बसलो नाही. पण त्या मुलीलाही बदडले तिच्या घरच्यानी आणि आता बरीच सरळ वागती आहे. बाकी मुलाचा काय दोष असे आपण म्हणता? आधी बाहेर कुठेतरी किंवा शाळेत यांचे प्रकरण चालू झाले असले पाहिजे नाहीतर ती मुलगी उगाच कोणालाही बोलावून घेणार आहे का? आणि ईतके आंमत्रण आहे ह्या त्या मुलाला न कळण्याईतका तो भोळा होता असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
स
सूड Wed, 08/02/2017 - 09:06 नवीन
आणि ईतके आंमत्रण आहे ह्या त्या मुलाला न कळण्याईतका तो भोळा होता असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
तुम्हाला त्या वयात आमंत्रण मिळालं असतं तर तुम्ही काय केलं असतं याचा शांतपणे विचार करुन बघा एकदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
द
दुर्गविहारी Wed, 08/02/2017 - 15:01 नवीन
वैयक्तिक हल्ले सुरु झालेत त्यामुळे मी थांबतो. मुद्दे नसल्यामुळेच हा प्रतिसाद आलाय असे गृहित धरतो. घडलेली घटना मी सांगितली उगाच त्या व्यक्तीचा मुलगा असेल तर, मुलगी असेल तर, भाचा असेल तर अशी कितीही लांबड लावता येईल. आपण खुशाल कल्पनाचित्र रंगवत बसावे. माझ्या मते त्या मुलाचा आणि मुलीचा दोघांचाही या प्रकरणात सारखाच दोष आहे. दोघेही अजुन आठवीत, म्हणजे शाळेत शिकत आहेत. शिक्षण हा मुळ उद्देश बाजुला ठेवून हे धंदे करायची गरज नाही. बाकि आपल्याकडून हि अपेक्षा नव्हती. काही विचारपुर्वक प्रतिसाद आला तर उत्तर देवू आणि फाट्यावर मारण्याचा पर्याय आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 08/02/2017 - 15:34 नवीन
बाकि आपल्याकडून हि अपेक्षा नव्हती
आमचीदेखील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
प
प्रसाद_१९८२ Wed, 08/02/2017 - 09:29 नवीन
आणि ईतके आंमत्रण आहे ह्या त्या मुलाला न कळण्याईतका तो भोळा होता असे तुम्हाला म्हणायचे आहे का? << अहो अश्या वयात सर्वसाधरण मुले, अश्या प्रकारच्या आमंत्रणाची वाट देखिल पाहत नाहीत. तुमच्या कहाणीत तर त्या मुलींनी समोरुन आमंत्रण दिलेय, आता त्या मुलाच्या वयात असे आमंत्रण न स्विकाराणा मुलगा अगदीच बावळट म्हणावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 12:42 नवीन
शिवाय तीच्या वडीलांनी मारहाण करण्याएवजी त्या मुलाचे आभारच मानायला हवे होते, कारण परदेशात हे चालते ना!
ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने परदेशी संस्कृती हीच देशाची प्रिस्क्राइब्ड संस्कृती म्हणून केव्हाची नोटिफाय केली आहे. असता कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
व
वीणा३ Tue, 08/01/2017 - 23:46 नवीन
वरच्या बहुतेक सगळ्या उदाहरणात मुलीची पण तेवढीच चूक (चूक म्हणा, किंवा इच्छा म्हणा, सहभाग म्हणा), दिसतोय. असं असताना फक्त त्या मुलाला भंपक इ इ विशेषण आणि ती मात्र चांगल्या घरची मुलगी असं विभाजन जरा मजेशीर वाटतंय. बऱ्याच उदाहरणात फक्त शारीरिक आकर्षण असतं, आणि पालकांच्या विरोधामुळे, आणि अडनिड्या वयात ते साहसी इ वाटत असल्यामुळे मुलं हट्ट सोडत नाहीत. मारून तर परिस्थिती अजूनच बिघडण्याची शक्यता असते. माझी एक काकू म्हणायची, तुम्ही तरुण मुलं आमच्यावर चिडलेली असता, का स्वतःवर चिडलेली असता का दुनियेवर तेच कळत नाही. अडनिड्या वयातले शारीरिक बदल कोणालाही (मुलगा / मुलगी) विचित्र वागायला लावू शकतात. १-२ उपाय सुचवते. मारामारी अजिबातच करू नका, घराबाहेर कुठलीही गोष्ट जाण्या आधी हे करून बघा जमलं तर. "आमच्या मित्राला ३ बहीणी आहेत... त्यातली ही दुसरी! " या उदाहरणात, मी तर म्हणते त्या मुलीला घेऊन , त्या मुलाच्या घरी (मोठा भाऊ, बहीण इ च्या सोबतीने), त्या मुलाच्या घरी चक्कर मारायला लावावी, आणि तिथे जे-जे काही आपल्या घरापेक्षा वेगळं दिसतं, ते ते आपल्या घरी करायला लावावं. उदा, त्या मुलाच्या घरी त्याची आई-बहीण भांडी घासत असेल आणि मुलीच्या घरी या सगळ्याला बाई असेल, तर मुलीला सांगावं, "बघ बाई, तुला ह्याच मुलाशी लग्न करायचं आहे तर या सगळ्याची सवय घे", तिने काही नवीन मागितलं तर "आत्ता आम्ही देऊ शकू, पण लग्न झाल्यावर तुला बहुतेक काटकसरीची सवय करावी लागेल असं दिसतंय, तर तू आत्तापासूनच सवय केलेली बरी, ही ४ कामं कर (सरळ घरातली धुणी-भांडी, केर-फारशी करायला लावावी), तुला आपल्या कामवाल्या बाईंना देतात तेवढे पैसे देते, त्यात काय जमेल ते - हवं ते विकत घे, आणि तसं जगायची आत्तापासून सवय लावून घे, कारण तू आमच्या मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे आम्ही तुला आर्थिक मदत नक्कीच करणार नाही, आणि हा मुलगा चांगला असेलही पण फार काही पैसे कमावेल असं वाटत नाही". मुलगी खरंच प्रेमात असेल तर ती यातून पण नक्की मार्ग काढेल, नसेल तर काय तो निर्णय घेईल. आणि शांतपणे तू आमचं ऐकलं नाहीस तर, आमची जवाबदारी नाही हे सतत सांगत राहावं. आणि मुलगा किंवा मुलगी कोणीही खूपच काही चूक करतायत तर नीट आणि अधून -मधून बोलून दाखवत राहावं. आणि मुख्य म्हणजे आपल्या पैशावर ऐश करू देऊ नये, घरात जे काय होईल ते जेवायला मिळेल आणि सगळ्या गरजा (ऐश नाही) भागवल्या जातील, बाकी आपलं आपलं बघा म्हणून सांगावं. १८ च्या पुढील असेल तर सरळ बाहेर पार्ट-टाइम नोकरी करायला लावावी. पैसा हा माणसाला भरकटवू शकतो तसंच जमिनीवर पण ठेवू शकतो. टिनेज मध्ये प्रेम करण एकदम सोपं असतं, भरपूर वेळ आणि हॉर्मोन्स + आई वडिलांचा पैसा + प्रेम निभावण्यासाठी काय करायला लागत याचा पत्ता नाही असं डेडली समीकरण असतं. त्यातलं पैसा काढून घेणं / मिळवायला प्रवृत्त करणं, आणि प्रेम निभवायला काय करायला लागतं ते सांगत राहणं एवढंच पालक म्हणून आपण करू शकतो. पैशाचं महत्व कळल्यावर, ते मिळवण्यासाठी लागणारे कष्ट कळल्यावर एकूण निर्णयप्रक्रियाच बदलून जाते, आणि ती आयुष्यात खूप फायदेशीर ठरू शकते.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 08/02/2017 - 03:56 नवीन
अगदी अगदी... साधारण एकाच वयाची मुलं आहेत ही. चूक दोघांचीही आहे. मुळात केवळ प्रेम असणं चुक नाही. आर्वजनिक ठिकाणी सभ्यपणे वागत नसतील तर तसं समजावुन सांगता येतं. प्रसंगी दरडावुन सांगताही येतं. पण मारामारीची गरज नाही. बाकी तुमच्या व्याखेत बसत नाही म्हणुन एखाद्याचं प्रेम चुकीचं नसतं. अनेकदा समज कमी असते. त्यासाठी काऊन्सिलिंग सारखे माणसातले पर्याय आहेत जगात शिल्लक अजुन. ह्यांनी मरुस्तोवर मारलं तरी काय करायचं ते केलंच ना त्या पोरांनी? काय फायदा झाला? नीट बोलले असते त्या दोघांशी तर कदाचित ऐकलंही असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
अ
अत्रे Wed, 08/02/2017 - 04:40 नवीन
+१०० सुंदर प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 12:49 नवीन
वरच्या बहुतेक सगळ्या उदाहरणात मुलीची पण तेवढीच चूक (चूक म्हणा, किंवा इच्छा म्हणा, सहभाग म्हणा), दिसतोय. असं असताना फक्त त्या मुलाला भंपक इ इ विशेषण आणि ती मात्र चांगल्या घरची मुलगी असं विभाजन जरा मजेशीर वाटतंय.
भंपकपणा हे एक स्वतंत्र्य आहे आणि धागालेखकाने ते थेट वापरले आहे. गरिब तो भंपक असले काही लॉजिक मांडलेले नाही. म्हणून जे वास्तव लेखकाला माहित आहे त्यास प्रश्न का करावा?
पैसा हा माणसाला भरकटवू शकतो तसंच जमिनीवर पण ठेवू शकतो. टिनेज मध्ये प्रेम करण एकदम सोपं असतं, भरपूर वेळ आणि हॉर्मोन्स + आई वडिलांचा पैसा + प्रेम निभावण्यासाठी काय करायला लागत याचा पत्ता नाही असं डेडली समीकरण असतं. त्यातलं पैसा काढून घेणं / मिळवायला प्रवृत्त करणं, आणि प्रेम निभवायला काय करायला लागतं ते सांगत राहणं एवढंच पालक म्हणून आपण करू शकतो. पैशाचं महत्व कळल्यावर, ते मिळवण्यासाठी लागणारे कष्ट कळल्यावर एकूण निर्णयप्रक्रियाच बदलून जाते, आणि ती आयुष्यात खूप फायदेशीर ठरू शकते.
पैसे आणि प्रेम यांचा काय संबंध? प्रेम निभवायला पैसा किंवा त्याचा त्याग करायची शक्ती लागते हे कुठून आलं? प्रेम आणि पैसा दोन वेगळ्या अक्षांवर प्लॉट करता येतील. उगाच ज्याचं प्रेम आहे त्याला पैशाचं महत्त्व सांगून प्रेमातनं परावृत्त का करावं? शिकेल पाण्यात पडल्यावर पोहायला! संबंधच काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
स
सौन्दर्य Wed, 08/02/2017 - 22:06 नवीन
तुमचा प्रतिसाद पटला आणि म्हणून आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
अ
अत्रे Wed, 08/02/2017 - 04:34 नवीन
अच्छा, म्हणजे अशा वेळी उपयोगी पडतील म्हणूनच गुंड नगरसेवकांना निवडून आणतात वाटतं लोक!
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 08/02/2017 - 04:48 नवीन
असे प्रश्न हे भारतातील एकत्र कुटुंबपद्धतीमधील परस्परावलंबित्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अभावामुळे घडतात. समाजाने आता जास्त मोकळे व्हायला हवे. मुलामुलींना पंधरा-सोळा वयापासूनच स्वतंत्र राहायची आणि स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घ्यायची सवय लावावी. आपण नंतर त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये आणि त्यांच्यावर आपल्या म्हातारपणी अवलंबूनही राहू नये. मुलाबाळांच्या शिक्षणा-लग्नासाठी पै-पै जमवत बसण्यापेक्षा आधी आपल्या म्हातारपणाची आणि आजारपणाची तरतूद करण्यास प्राधान्य द्यावे. ग्रेट फ्रीडम कम्स वुइथ ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी हे त्यांच्या मनावर लहानपणापासून बिंबवावे. हे सगळं वाचायला जरा जड जाईल काहींना. पण समाजाची वाटचाल आता याच दिशेने होत आहे. आपण आपलं बघावं. लग्नेसुद्धा जास्त टिकणार नाहीत. एकेकाची एकापेक्षा जास्त लागणेही होतील. तेव्हा लग्नातून मिळणारे स्थैर्य हा प्रकारही संपेल. त्यामुळे प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुषाला स्वतःच्या आर्थिक स्वावलंबित्वाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच घ्यावी लागणार आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Wed, 08/02/2017 - 06:32 नवीन
सहमत आहे. आपण कुणासाठी जगतो मुलांसाठीच ना, मुले म्हणजे म्हातारपणाची काठी वगैरे विचार फार जुने झाले आहेत असे वाटते. निदान मी तरी केवळ मुलांसाठी जगत नाही. आपले आयुष्य आपल्याला हवे तसे (फक्त दुसऱ्याला त्रास न देता) जगा. स्वत:च्या छंदांना वेळा द्या, आवडीनिवडी जोपासा. उगाच सगळ्या सोई मुलांना आयत्या मिळाव्यात म्हणून आपले आयुष्य कुढत जगायची किंवा तडजोडी करत जगायची काही गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 10:34 नवीन
भारतातील एकत्र कुटुंबपद्धतीमधील परस्परावलंबित्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अभावामुळे घडतात.
जरा कार्यकारणभाव कळेल काय? म्हणजे आजकाल "भारतातील एकत्र कुटुंबपद्धती" हा शब्दप्रयोग वापरताना काही कार्यकारणभाव द्यावाच लागत नाही असा लोकांचा समज झालेला दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ असे प्रसंग भारतीय संसदीय लोकशाही वा भारतीय मुक्त अर्थव्यवस्था यांच्यामुळे का होत नाहियेत आणि भारतातील एकत्र कुटुंबपद्धतीमुळे का होत आहेत हे कळेल काय? कि भारतातील एकत्र कुटुंबपद्धती म्हटलं तर कोणतंही खापर बिनदिक्कत फोडता येतं असं काही आहे का? ==================================== भारतातील एकत्र कुटुंबपद्धतीमधे असं कोणतं वैयक्तिक स्वातंत्र्य नसतं जे नाभिकीय कुटुंबात असतं? ज्यामुळे असे प्रसंग होतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 11:42 नवीन
मुलामुलींना पंधरा-सोळा वयापासूनच स्वतंत्र राहायची आणि स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घ्यायची सवय लावावी.
हो ना, भारतात गावागावात मॅक्डॉनाल्ड आणि डॉमिनॉज आहेतच फडकं मारायला घराबाहेर पडल्यापडल्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 11:44 नवीन
आपण नंतर त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये आणि त्यांच्यावर आपल्या म्हातारपणी अवलंबूनही राहू नये. मुलाबाळांच्या शिक्षणा-लग्नासाठी पै-पै जमवत बसण्यापेक्षा आधी आपल्या म्हातारपणाची आणि आजारपणाची तरतूद करण्यास प्राधान्य द्यावे.
दूध तुटल्यानंतर किती दिवसांनी हा प्रकार चालू करावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Wed, 08/02/2017 - 15:02 नवीन
बास? इतकेच प्रश्न? धिस इज नॉट फेअर अजो. तीनशे करायचेयत ना? अजून विचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 08/03/2017 - 08:01 नवीन
बाकी तुमच्या दृष्टिकोनाचं कौतुक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अत्रे Wed, 08/02/2017 - 04:52 नवीन
कोणी "शाळा" चित्रपट पाहिलाय का? त्यात पण असा (प्रपोझ केले म्हणून) मारहाणीचा प्रसंग आहे. त्यातल्या हिरो मुलाच्या बाबांची भूमिका बरोबर वाटते. बाय द वे, हेच धागलेखक दुसऱ्या लेखात काही मुलांचे लग्न जमत नाही (http://www.misalpav.com/node/40388) म्हणून चिंता करत आहेत आणि इकडे मात्र मुलींना सम्मतीने लग्न करण्याला विरोध करत आहेत. यातला विरोधाभास छान आहे :) मला वाटत यांना प्रॉब्लेम हा आहे की "अशा मुली" त्यांना आवडणाऱ्या मुलांशी लग्न करतात आणि ज्या मुलांची लग्ने जमणे सध्या कठीण झाले आहे, अशा मुलांशी लग्न करत नाहीत :)
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 08/02/2017 - 08:07 नवीन
मला वाटत यांना प्रॉब्लेम हा आहे की "अशा मुली" त्यांना आवडणाऱ्या मुलांशी लग्न करतात आणि ज्या मुलांची लग्ने जमणे सध्या कठीण झाले आहे, अशा मुलांशी लग्न करत नाहीत त्यांना आवडणार्‍या मग कामधंदा न करणार्‍या,भंपक,रिकामटेकडा असला तरी चालेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Wed, 08/02/2017 - 08:16 नवीन
काका, मुळात आपल्याला काय चालेल हा प्रश्न कुठून उत्पन्न होतो? कोणावरही मालकी हक्क का गाजवावा? एका लिमिटनंतर आपण कोणाही समजावून सांगितल्याशिवाय काहीही करू शकत नाही. वरचा वीणा यांचा प्रतिसाद वाचनीय आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 11:25 नवीन
कोणावरही मालकी हक्क का गाजवावा?
इथे केवळ तुम्हाला हक्क म्हणायचं असावं. मुनुष्यांवरील मालकी हक्क हा कंसेप्ट काही नसतो. ========================= पण कोणावरही हक्क का गाजवावा मंजे काय? का गाजवू नये? फक्त करारावर हस्ताक्षरे झाली तर त्यातील जी बंधने आहेत तितकेच हक्क असे आहे की काय? हक्क कसे आजवावेत आणि नाही याचं एक व्यवस्थित फ्रेमवर्क आहे ना? मग असा प्रश्न पडूच कसा शकतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
स
सूड Wed, 08/02/2017 - 08:24 नवीन
त्यांना आवडणार्‍या मग कामधंदा न करणार्‍या,भंपक,रिकामटेकडा असला तरी चालेल?
तो तिचा प्रश्न आहे ना, त्यात बरं ती तुमची बहीण नाही. नाहीतर जीवच घेतला असतात. सांगायचं बाई गं आवडतोय तर ठीक आहे, पण नोकरीधंदा नसेल तर तुझं तुला बघावं लागणार आहे. त्यादृष्टीने तुझ्या मनाची तयारी करुन घे. सासरी गेलीस की तुझा संसार तुला सांभाळायचा आहे, आम्ही नसणार आहोत तिथे. निर्णय ती घेत्ये तर त्याच्या बर्‍या वाईट परिणामांचा विचार करायला तरी लावा. बळंच मारहाण काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 10:17 नवीन
नाहीतर जीवच घेतला असतात.
हे कशावरून? हे विधान थोडं बोल्ड नाही का? अन्य लोकांच्या लफडे / प्रकरणे / प्रेम इ इ करणार्‍या बहीनींच्या बदडण्याचे समर्थन करणारे (पण प्रत्यक्ष स्वतः न बदडणारे) लोक तिच केस स्वतःच्या बहीणीची निघाली तर प्राण घेतात यावर काही रिसर्च पेपर आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 08/02/2017 - 10:48 नवीन
घेत नाहीत असं सांगणारा रीसर्च पेपर आणा आधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 10:56 नवीन
याच अंगानं थोडं पुढे जात हे बदडणारे लोक पृथ्वीवरील संपूर्ण जीवसॄष्टी (किंवा असलेच तर अन्य ग्रहांवरील जीवन देखिल) नष्ट करतात असं देखिल म्हणायला वाव आहे म्हणायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 08/02/2017 - 10:59 नवीन
म्हणा की, आणि तुम्हाला हवा असतो म्हणून डेटा पण तयार ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 10:27 नवीन
निर्णय ती घेत्ये तर त्याच्या बर्‍या वाईट परिणामांचा विचार करायला तरी लावा.
परिणाम सांगण्याइतका अनुभव आणि संभाषण कौशल्य प्रत्येकात नसतं. असे तोंडी सांगीतलेले विचार कोणाला पटत नाहीत. ==================================================================== माझ्या १० वर्षाच्या मुलाला "मोबाईल खेळू नको" हे अनंत लोकशाहीय पद्धतींनी सांगून पाहिलं. अजून तरी त्यावर काहीच परिणाम झालेला नाही. आणि माझ्यामते त्याच्या मित्रांमधे त्यातल्या त्यात तो वडिलांचं ऐकण्यात खूप चांगला आहे (अगदी या मोबाईल बाबतीत.), बाकीची पोरं पाहिली तर ती थेट अ‍ॅडिक्टच आहेत. बापाला अजिबात जुमानत नाहीत. आता मोबाईलचे हार्मोन्स स्रवत आहेत, तरुणपणी तेव्हाचे स्रवतील. सांगीतल्यानं लोकांना (म्हणजे आपल्या माणसांना) कळतं? ते एकतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अत्रे Wed, 08/02/2017 - 10:33 नवीन
माझ्या १० वर्षाच्या मुलाला "मोबाईल खेळू नको" हे अनंत लोकशाहीय पद्धतींनी सांगून पाहिलं. अजून तरी त्यावर काहीच परिणाम झालेला नाही
दुसऱ्या एखाद्या जास्त इंटरेस्टिंग गोष्टीकडे/ प्रोजेक्ट्मध्ये त्याचे लक्ष वळवायचा प्रयत्न करा, मोबाईलला विसरून जाईल कदाचित. अमुक अमुक करू नको चा उपयोग सहसा होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 10:37 नवीन
पहा संभाषण नावाच्यागोष्टितल्या त्रुटी. =================== अनंत लोकशाही पद्धती मधे अनंत गोष्टी आल्या. याही आल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Wed, 08/02/2017 - 10:42 नवीन
मग मोबाईल लपवा आणि स्वत: मोबाईल वापरू नका + त्याच्यासोबत दुसरा छंद/खेळ खेळा. हे पण ट्राय केलं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
सूड Wed, 08/02/2017 - 10:54 नवीन
छे असं कसं आपल्याकडे फक्त हे करु नको ते करु नको सांगायची पद्धत असते. काय कर सांगायचं नाही. आताचं उदाहरण आहे, शाम्पूची अ‍ॅड चालू होती. ती मुलगी आईला काहीतरी विचारते. शेजारी बसलेले काका लगेच, "ऑ? आईला उलट उत्तर करते?" असं का म्हणून विचारायचं नाही, आंधळेपणाने करत राहायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 11:06 नवीन
लपवणं आणि न वापरणं शक्य नाही आणि योग्य नाही. ================ दुसरे खेळ खेळले तरी त्याचा आंतरिक ओढा काउंसेलिंगने जात नाही असा स्वानुभव आहे. ================================ विषय असा आहे कि मनुष्य हा सारासार चांगला विचार करतो नि सद्वर्तन हि धारणा मिथ्या आहे. मी सिगरेट पितो. तो वाईट असल्याची खूप जाणिव मला आहे. माझ्या अनेक हितैषींनी मला रेग्यूलर ती सोड म्हणून खूप मनवलं आहे. पण आधिकारिक वाणीनं बोलणारा माझ्या आयुष्यात कोणीच नाही. उद्या आई किंवा बॉसने कानफटात ठेवायचा प्रघात असता तर मी सिगारेट फार तर फार चोरून ओढली असती आणि ते आत्तच्या परिस्थितीपेक्षा चांगलं असलं असतं. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Wed, 08/02/2017 - 11:20 नवीन
लपवणं आणि न वापरणं शक्य नाही आणि योग्य नाही.
हम्म, तेवढं शक्य झालं असत तर बरं झालं असतं. बघा एखाद्या दिवशी ट्राय करून :) आमच्या लहानपणी मोबाईल नव्हते हे भाग्यच म्हणायचे. आमच्या लहानपणी आई खूप वेळ पुस्तके वाचून दाखवायची तेव्हापासून पुस्तकांची आवड आहे. मोबाइलपेक्षा गोष्टींच्या पुस्तकांचे व्यसन कधीही चांगले. मला सुद्धा हे सगळीकडे मोबाईलवर बसणारी लहान मुले बघून प्रश्न पडतो, यांचे मन दुसऱ्या कशात का रमत नाही? तुम्ही जरूर ट्राय करा जेवढे जमेल तेवढे.
आधिकारिक वाणीनं बोलणारा
मी समजू शकतो. जसे की Phd करताना विशिष्ट प्रकारचे गाईडच जास्त काम करवून घेऊ शकतात तसा काहीसा प्रकार आहे. "स्वत:च स्वत:ला ऑर्डर कशी द्यायची" या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर किती बरे होईल! मग कोणी "वरच्या" लेव्हल वरची धक्का-स्टार्ट मारायला व्यक्ती लागणारच नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 11:37 नवीन
आम्ही रोज गोष्टी वाचतो, फिरायला जातो, खेळतो. ते कसं करवून घ्यायचं ते मला माहित आहे. पण ते फॅड कसं उतरावायचं हा प्रश्न अनुत्तरित आहे. ================== सध्याच्या प्रयोगांतर्गत मी इंसेटिव स्किम वापरतो - पाढे वाचले तर अर्धा तास, इ इ . पण आपण होऊन खेळू नये इतकं प्रबोधन असंभव दिसतंय. आमच्या पूज्यनीय पिताश्रींनी हा प्रश्न त्यांच्या काळात असता तर ४-५ दिवसांत सोडवला असता. ===================== गधी पे दिल आये तो परी क्या चिज है ही म्हण उगाच नाही. तारुण्यातल्या भावना, इच्छा नियंत्रित करणं असंभव आहे. तर जी काही छुटपुट वारदातें होणार ती होणारच. मात्र त्याला ओपन सपोर्ट नको. थोडंसं भय हवं. १४ ला तारुण्याचे कोंब फुटून ३४ ला लग्न करणारी ही पहिली पिढी आहे. म्हणून लेनियंसि इज जस्टिफाईड. पण "समजवणूक" ही एकमेव सजा आहे हे पाल्याला कळले तर मज्जा आहे त्याची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
श
शब्दबम्बाळ Wed, 08/02/2017 - 10:44 नवीन
गम्मत आहे नई, भारतात १८वर्षांची "पोर" देशाचा पंतप्रधान निवडू शकतात पण स्वतःचा जोडीदार शोधायला मात्र "शहाणी" नसतात! त्यांनी लग्नाचं उदाहरण दिल होत या अर्थी मुलगी सज्ञान आहे हे गृहीत धरलं असावं अशी अपेक्षा आहे! १० वर्षाचं उदाहरण कुठून काढलेत काय माहित! उद्या, माझ्या 1 वर्षाच्या मुलाला चड्डीत शी/शु करू नकोस हे अनंत लोकशाही पद्धतीने समजावून सांगितलं तरी कळत नाही असे म्हणेल कोणीतरी!! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 10:52 नवीन
माझ्या 1 वर्षाच्या मुलाला चड्डीत शी/शु करू नकोस हे अनंत लोकशाही पद्धतीने समजावून सांगितलं तरी कळत नाही असे म्हणेल कोणीतरी!!
१० वर्षाच्या माझ्या मुलाला मोबाईल जास्त खेळू नये याची पूर्णतः जाणिव आहे असे बोलून माझे दोन शब्द संपवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ Wed, 08/02/2017 - 11:05 नवीन
अरे वा! तुमच्या १० वर्षाच्या मुलाची जाणीव आपणास "पूर्णतः" आहे हे ऐकून छान वाटले! याला काही आधार वगैरे लागतच नसेल त्यामुळे अधिक विचारात नाही. बर, आता तो तुम्हाला म्हणाला कि मला मी काय करतोय याची पूर्णतः याची जाणीव आहे आणि मला तरीही हेच करायचं आहे. तुम्ही काही सांगू नका! तर तुम्ही काय करणार? आणि आता मूळ मुद्द्यावर येत "सज्ञान" मुलीने तिचा जोडीदार ठरवला तर तिला तसे करण्याचा अधिकार तुमच्या लेखी आहे कि नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा