"अशा का वागतात काही मुली?"
आत्ताच एका 'फक्त प्रौढांसाठी' असणार्या WhatsApp ग्रुपवर(आता कुठला ग्रुप ते इथं नका विचारु!)एका वेगळ्या विषयावर चर्चा झाली.यात काही मिपाकरही होते.
तर चर्चेचा विषय असा होता की 'तशा प्रकारच्या व्हिडिओजपैकी,काही व्हिडिओज हे मुलींना फसवून त्यांच्याच मित्राकडून नंतर डिलीट करण्याच्या वायद्याने काढले जातात.अर्थातच असं काही होत नाही.मैत्रिणीच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन हे व्हिडिओज संकेतस्थळांवर लिक केले जातात.
यात एका सदस्यांनी असा मुद्दा मांडला की "या मुलींना कळत कसं नाही? बॉयफ्रेंडच्या नको त्या मागण्यांना या मुली बळी कशा पडतात? यामुळे आपलं आयुष्य पणाला लागू शकतं हे या मुलींना का कळत नसावं?
या फसवणूकीला जशा मुली जबाबदार आहेत तशीच त्यांना फसवणारे त्यांचे बॉयफ्रेंडही तेवढेच जबाबदार आहेत.पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत यातून सर्वात जास्त त्रास हा मुलींनाच होतो.भोगावं त्यांना लागतं.घरातल्यांची नाचक्की होते ती वेगळीच!
अशा प्रकारचे व्हिडिओज चोरुनही काढले जातात.पण हा प्रकार घडतो केव्हा? जेव्हा ती मुलगी अशा प्रकारे मित्राच्या खुशीसाठी संमती देते तेव्हा! मग प्रश्न असा येतो की या मुली का तयार होतात अशा प्रकारांना? का ठामपणे नकार देऊ शकत नाहीत?बरं हा प्रकार अल्पशिक्षित मुलींबरोबर,खेड्यातच घडतो असं नाही अगदी शिकलेल्या शहरी मुलीही याला बळी पडतात.
बरं हे असे लबाड लांडगेच या मुलींना आवडतात.त्यांचं स्टायलिश वागणं,कपडे,गाडी हेही जोडीला असतं.
पण एखाद्या साध्या सरळ मुलानं यांना प्रपोज केलं की, "मी तुला किती चांगला समजत होते.तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती!" असं उत्तर मिळतं.
मुली किती लेवलपर्यंत जाऊन माती खाऊ शकतात याचं एक उदाहरण पाहण्यात आहे.
ही मुलगी BE Electronics चांगल्या मार्कांनी पासआऊट होती.एके ठिकाणचा कामाचा चांगला अनुभव होता.त्यानंतर आमच्या कंपनीत आली.इथे आधीपासूनच एक मुलगा टेस्टींगसाठी होता.याचं त्याच्या कॉलेजमधल्या दुसर्या एका मुलीबरोबर अफेअर होतं.तिच्याचबरोबर लग्नही ठरलं होतं.भावी बायकोबरोबर सगळे उद्योग करुन झाले होते.
ही कंपनीत आलेली मुलगी त्याने पाहिली.हीला मी पटवणारंच असं म्हणून प्रयत्न सुरु केले.तिचा पाठलाग करणे वगैरे प्रकार सुरु झाले.ती आणि तिची मैत्रीण दोघी एकत्रच घरी जायच्या अॅक्टीवावरुन.सुरुवातीला ही मुलगी आपण भलं आपलं काम भलं अशी होती.
हीच्या जोडीदार मैत्रिणीचे विचार म्हणजे प्रेमात पडायचं,नवर्याचा स्वभाव आधीपासून माहित असलेला चांगला अशा टाईपचे.तिच्या संगतीने हीचेही तसेच विचार.(अर्थात असे विचार काही गैर नाहीत)
पण तसा कोणी हीच्या जिवनात नव्हता.मग ह्या ठोंब्याचे प्रयत्न सुरु होतेच.आणि वाढले.तिच्या शिव्या खाऊन,अपमान होऊनही पिच्छा सोडत नव्हता.ती बोलली नाही की हा डबा खायचा नाही.
आता हीची ही जोडीदारीण हे सर्व प्रकार पाहत होती.तिने सुचवलं अगं एवढा मागं लागलाय तर नाही का म्हणतेस? प्रेमविवाह करायचा असं ठरलंय ना आपलं? दे त्याला रिस्पॉन्स!
डिपार्टमेंटमधल्या काही लोकांनी त्या मुलाबद्दल सांगितलं तरीही ती बदलली नाही.
स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची मुळातच अक्कल नसल्याने तिने या मुलाला होकार दिला.तिला याचं लग्न ठरलंय हेही माहित होतं.तरीही मी निर्णय बदलायला लावीन असा विश्वास.दोघंही वाहवत गेले.सगळे "उद्योग" करुन झाले.यानं त्याचे फोटोही काढून ठेवले.
या मुलीच्या घरी ती या नालायकाबरोबर बोलत असताना बापानं पकडलं.झोडपून काढलं पण लग्न करीन तर याच्याबरोबरचं म्हटल्यावर बापानं मुंबईचं एक स्थळ काढलं.तो मुलगा स्वभावानं कसा आहे वगैरे न पाहता जबरदस्तीनं लग्न लावून दिलं.
या ठोंब्याच्या होणार्या बायकोलाही आपला होणारा नवरा इतका नालायक आहे हे माहित होतं तरीही गावभर फिरल्याने सगळीकडे प्रसिध्दी झाली होती.मग तिच्याबरोबर याचं लग्नही झालं.
या एका प्रसंगात एक नव्हे तर चक्क तीन पूर्ण बिंडोक मुली पाहिल्या.त्या पण शिकलेल्या,इंजिनियर मुली.
अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात.
"आमच्या मित्राला ३ बहीणी आहेत... त्यातली ही दुसरी!
दिसायला फार सुंदर. तीचं आणि एका मुलाचं प्रेम साधारण ८वी ते ९ वीच्या दरम्यान जुळलं.. ती त्याच्यापेक्षा ६ महिन्याने मोठी... १२ वी नंतर त्या दोघांमध्ये खूप जवळीक झाली... ती मुलगी, तिची लहान बहीण आणि आजी गावी तर बाकी मुंबईला होते.. तो मुलगा दररोज त्या मुलीच्या रात्री १२ च्या नंतर घरी यायचा... तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... त्यामुळे संशय ही कोण घेत नसे... एखादा सापडला.. गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल... पण परत ६ महिन्यांनी ह्यांचे प्रकरण चालू... अाख्या गावभर झालं.. तरी ती मुलगी बेफिकर... शेवटी घरच्यांना समजलं... एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं.. पण ती एवढी बेफिकीर की करीन तर हाच.. दोघानी ही २१ पार केल होतं.. तिला फार समजावलं पण ऐकेनाच... पळून जाऊ नये म्हणून मग लग्न लावायचा विचार केला... आम्ही सांगून टाकलं लग्नानंतर परत तोंड नाही दाखवायचं ती उलट बोलली तुमच्या सारख्या सैतानांकडे मला यायचं ही नाही.
त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अगोदरच बहिणीकडे शिकायला... राहतं दोन खणांचं कौलारू घर.. १० ते १२ गुंठे जमीन, अर्धवट शिक्षण म्हणून नोकरी नाही,आईवडील गावात एकाकडे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात कोणाकडेतरी रोजंदारीवर जायचे.
आणि मुलीचे वडील मातब्बर, भाऊ सॉफ्टवेअर मध्ये, मोठी बहीण पण जॉबला... परिस्थिती ने तर जहागिरदार.. देखणेपणावरती तर त्या मुलीला कुणीही पसंत केलं असतं.
तिला इतके बोलूनही ती ऐकेना... समजावणार्यांनाच शिव्या द्यायची!.. शेवटी भातुकलीच्या खेळासारखं त्या बाहुला बाहुलीच लग्न(सगळ्यांच्या तोंडात हेच) मंदिरात लावून दिलं.
आता वर्ष झालं असेल मुलगा कुठंतरी दुकानात जॉब करतो... परिस्थिती बिकट म्हणून तीही आता सासू बरोबर मजुरी करते.... कुठं ते राजकुमारीच जगणं आणि कुठं आता काबाडकष्ट!
एकदा तिच्या नवऱ्या बरोबर नाश्ता करताना हॉटेल मध्ये भेटली... अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती... विचारलं तिलाच शिव्या देताना थोडा का विचार केला नाहीस..??? तो पोरगा काहीच बोलला नाही.. बडवलेला म्हणून!
(सैराटचीच कथा फुलवल्यासारखी वाटेल पण हे खरं आहे.)
म्हणजे वास्तव समोर आलं की मग विचार करतात... पण त्याअगोदर केला असता तर ही वेळ अाली नसती.
कुठे चुकतं या मुलींचं? विश्वास ठेवण्यायोग्य माणूस त्यांना अोळखता येत नाही की प्रेमात पडल्यावर मेंदूत काही रासायनिक बदल होतात? की कशाची भितीच वाटत नाही यांना?
अशा का वागतात काही मुली?
💬 प्रतिसाद
(278)
उ
उपयोजक
Fri, 08/04/2017 - 05:01
नवीन
स्पष्ट लिहिलं तरी सिध्द करुन द्यावं लागतंय.
त वरुन ताकभात काहीजणांना अोळखता येत नाही कि ते मुद्दाम करतात ते काही समजत नाही.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Fri, 08/04/2017 - 07:21
नवीन
विरोधासाठी विरोध होतो बऱ्याच वेळेस. क्ष=३ तर क्ष चा वर्ग ९ सिद्ध करा म्हणून सांगितलं कि आधी क्ष=३ कसे काय सिद्ध करा असे विचारण्याला काही अर्थ असतो का? क्ष चा वर्ग ९ आहे किंवा नाही यावर मते मांडावीत!
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Fri, 08/04/2017 - 07:24
नवीन
काय तरी अपेक्षांचा दर्जा राव!!!
अहो, "सज्ञान मुलीला समजावलंच कसं म्हणून एकेकाच्या मुस्काडीत ठेऊन दिली असती" अशी काहीतरी उच्च दर्जाची अपेक्षा करा ना.*
===============================
तारूण्यसुलभ शेण खाल्ल्यानंतर समाजाकडून रित मोडली म्हणून शारिरीक शिक्षा होणे हा गुन्हा असून मात्र असा गुन्हा करू इच्छिणारांस शारिरिक दंड करणे मात्र गुन्हा नाही इ इ तर्करत्नांचा आनंद घ्या.
- Log in or register to post comments
अ
अकिलिज
Fri, 08/04/2017 - 11:53
नवीन
धागाकर्ता म्हणतोय, एकदा तिच्या नवऱ्या बरोबर नाश्ता करताना हॉटेल मध्ये भेटली... अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती... विचारलं तिलाच शिव्या देताना थोडा का विचार केला नाहीस..??? तो पोरगा काहीच बोलला नाही.. बडवलेला म्हणून!
यात ती मुलाबद्दल काहीच तक्रार करताना दिसत नाहीये. आता धागाकर्त्याला आधीपासूनच मुलाची बाजू ठेचायचीय तर मुलगा टिनपाट आहे म्हणून जाहीर करणं आलंच.
खरेंच्या स्टोरीतही मुलीला मुलाबद्दल काही वावगं वाटत नाहीये. पालक लोकांनाच अपेक्षाभंग होण्याची काळजी लागलेली दिसतेय.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 08/04/2017 - 17:58
नवीन
पालक लोकांनाच अपेक्षाभंग होण्याची काळजी लागलेली दिसतेय.
उघड्या डोळ्याने प्राण जात नाही त्यामुळे काळीज तुटतं अशी बापाची अवस्था
मुलीचे दोन वेळेस पोट भरू शकेल एवढे तरी त्या मुलाने कमवावे हि अपेक्षा पण चूक आहे?
म्हणजे मुलाला शाळेत घातलं तर त्याने किमान पास व्हावे (९० टक्के नाही) इतकीही अपेक्षा पालकांची असू नये?
बढिया है!!!!!!!!!!!!!
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Fri, 08/04/2017 - 18:27
नवीन
स्वतः ची बहीण असल्या टिनपाट पोरा बरोबर फिरू लागली तरी हे लोक अशीच उच्च विचारसरणी बाळगतील का ? रिक्षा चालवत असला तरी काय झाले , मेहनती आहे. इ इ ..
मजुरी करत असला तरी काय झाले ? हुशार आहे तो .. इ इ ..
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Sat, 08/05/2017 - 16:46
नवीन
+१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००० टक्के सहमत.
उगाच आम्ही कसे विद्वान आणि वेगळ्या दृष्टीकोणातुन विचार करू शकतो हे दाखविण्याच्या प्रयत्नात काही अतिअशहाणे आय.डी. अश्या प्रतिक्रिया देताना दिसतात. याना आपल्या मुली किंवा बहीणी यांच्यावर हा प्रसंगा आल्यावर हेच विचार सुचतील का हा प्रश्न पडलाय.
शिवाय मोराल पोलिसिंगच्या नावाने गळे काढणार्या आय,डी. ना एकच विचारायचे आहे. उद्या दुबई किंवा ईतर अरेबियन देशातून चांगल्या पॅकेजच्या नोकरीची ऑफर आली तर केवळ तिथे मोराल पोलिसींग चालते म्हणून हे महाभाग नोकरी नाकारणार आहेत कि बॅगा भरायला पळणार आहेत?
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Mon, 08/07/2017 - 08:31
नवीन
बहीण फिरायला जाणे फार मोठि गोष्ट झाली. ती कचरा जमा करून जाणारी बाई असते तिला सोफ्यावर बसू दे आणि डायनिंग टेबलवर काही स्पून फोर्कने खाऊ दे म्हणावं. किंवा हापिसात सेक्यूरीटि गार्डला एक स्मित द्या आणि इतरांना जसे हाय मंता तसे त्यांना पण रोज हाय म्हणा, एवढं केलं तरी पावलो.
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Fri, 08/04/2017 - 07:17
नवीन
ईथे बरेच काउन्सलिंग एक्स्पर्ट आहेत डॉक. त्यांची अपाँईटमेंट घ्या आणि आणा त्यांच्याकडे. बघुया काय उजेड पाडतात. ;-)
नाहीच जमले तरी चिंता नाही, पाडगावकरांची कविता वडीलाना वाचायला देवु. त्यांची चुक त्याना लगेच कळेल.
ते ही सहन होत नसेल तर वडीलांना मुलीच्या मुलीच्या भानगडीत पडू नये म्हणून सांगा. त्यांना काय अधिकार मुलीने काय करायचे हे ठरवायचा. शिवाय मुलगा वाईटच हे ठरविणे एकांगी नाही का? कशावरून तो उद्या पंतप्रधान होणार नाही? मोदी चहावाले असताना झालेच ना?
शिवाय मुलीच्या आयुष्याचे नुकसान होत असेल तर होउ देत, तीला नवीन जिवनानुभव मिळतील. भले तीचे धिंडवडे निघु देत पण त्याला जिवनानुभव म्हणायचे बर का. न जाणो या अनुभवावरुन ती उद्या पुस्तक लिहील आणि त्याला बुकर पारितोषिक मिळेल.
आपण आशा करत रहायची.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Fri, 08/04/2017 - 07:32
नवीन
अरे व्वा, काय सुंदर समरी केली आहे उदारमतवादी विचारांची. तुम्हाला जबर्या कौशल्य आहे हो, (आम्ही दुर्बोध, रटाळ, कंटाळवाणे, इ इ होऊन जातो याच गोष्टी मांडताना.)
=========================
पण एक वाक्य राहिलं. "रामाच्या मंदिरात संडास का नाही करायची? राम त्याच्या काळात संडास करत नव्हता का? संडास करणं अपवित्र कसं? ती एक मूलभूत अंतःप्रेरित शारीरिक प्रक्रीया आहे. " हे मांडायचं विसरलात.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Fri, 08/04/2017 - 07:47
नवीन
संडास उघड्यावर करणे योग्य नाही म्हणून! आणि त्यामुळे आजार देखील पसरू शकतात!
रामाच्या मंदिराच्या जवळ देखील त्यासाठी शौचालय असत बर का!! कारण ती नैसर्गिक क्रिया आहे. भक्तांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जाते...
अहो गावांमध्ये कोणी आता उघडयावर देखील बसू नये म्हणून सरकार लोकशिक्षण करतंय! हागणदारीमुक्त गाव करायला... पण काही लोक असतातच तरीही आडमुठ... ते सगळीकडेच असतात म्हणा!
तिथे पण इथे पण!
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Fri, 08/04/2017 - 09:13
नवीन
दुर्गविहारिंनी असं उपरोधानं लिहायचं असं मला अभिप्रेत होतं. तुम्ही वास्तविकच लिहून टाकलंत. एकच पडतं म्हणा.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Fri, 08/04/2017 - 07:43
नवीन
जिथे तिथे पाडगावकर आणि इतरांना आणण्यापेक्षा वरती मी तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे देता का? फार अवघड वाटत असेल तर राहू द्यात, काही जबरदस्ती नाहीये... पण बघा शक्य झालं तर!
तुमचे गडावर वागण्यासाठीचे "२१ अपेक्षित" वगैरे काही असेल तर तेही तिथे प्रसिद्ध करू शकाल!
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Fri, 08/04/2017 - 10:30
नवीन
फालतु प्रतिसादाना मी फाट्यावर मारणार हे मी आधीच सांगितले आहे. तेव्हा जे मुध्दे मला पटत नाहीत त्यावर मुळ धाग्याचा विषय सोडून किती चर्चा करायची याला काही मर्यादा आहेत म्हणून थांबलोय. योग्य धाग्यात मी उत्तरे देईनच.
बाकी मी काहीही लिहीले तरी त्याला तुम्ही फाटे फोडणारच हे दिसतच आहे. पण चिंता नको, धागा तुम्ही काढा तिथे उत्तरे देतो.
यानंतर तुम्हाला हवे ते समजायला तुम्ही रिकामे आहात.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Fri, 08/04/2017 - 11:31
नवीन
बरोबर! तुमचा वरचा प्रतिसाद अगदी विषयाला धरून आणि अत्यंत माहितीपूर्ण आहे नाही का?! :)
बुकर पारितोषिक वगैरे! फालतू फाटे कोण फोडतोय ते तरी बघायचं होत ते लिहिताना!
असो मला पटत नाही ते फालतू/कचरा इतकाच तुमचा विचार दिसतोय... चालायचं...
"चर्चा" करायचीच असेल तर वेगळ्या धाग्याची काही गरज नाहीये, जर करायचाच असेल तर तुमच्या प्रतिसाद खाली जे लिहिलंय तिथे प्रतिवाद करा नाहीतर सोडून द्या! योग्य वेळ योग्य धागा वगैरे कशाला पाहिजे!
चालू दे तुमची "विषयाला धरून" चर्चा!
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Sat, 08/05/2017 - 16:35
नवीन
प्रतिसाद देण्यापुर्वी जरा विचार करीत जा. एकूणच या धाग्यावर मुदा काय आहे हे न समजुन घेताच प्रतिसाद द्यायची स्पर्धाच लागली आहे.
वरच्या प्रतिसादाबध्दल म्हणाल तर त्यासाठी धागा पुन्हा एकदा वाचुन पहा म्हणजे ज्या महाभागानी ज्या मुलीनी केवळ चुकीचे निर्णय घेतल्यामुळे वाइट जीवन जगावे लागते त्यांना "गोडबोल्या पोरांच्या नादी लागून दु:ख मिळाले तर मिळू द्यावे. तो त्यांचा जीवनानुभव आहे. " ह्या छापाच्या प्रतिक्रिया दिल्यात त्यांना मारलेला तो टोला आहे. इथे धाग्याचा मुळ विषय सोडून मी कशी काय प्रतिक्रीया दिली.
तुमचा दुसरा मुध्दा, गडाची पवित्रता वगैरे. मि.पा.वर जेव्हा आपण एका धाग्यावर प्रतिसाद देत असतो तेव्हा शक्यतो ते धाग्याशी संबधीत असावेत असा संकेत आहे. यामुळेच तुमच्या शंकाना उत्तरे देण्यासाठी दुसरा धागा काढा असे मी सांगतोय. यामुळे विषयाशी संबधी नसलेली चर्चा या धाग्यावर होणार नाही आणि गडकोटाच्या काढलेल्या धाग्यावर ईतर ईंटरेस्ट असलेले आय.डी. चर्चा करु शकतील ईतकाच माझा उद्देश आहे.
अंवातर चर्चा खुप झालेली आहे , त्यामुळे मी याप्रकारच्या प्रतिसादावर निदान या धाग्यावर तरी उपप्रतिसाद देणार नाही.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 08/04/2017 - 17:45
नवीन
मुलगा टिनपाट आहे हे मान्यच.. पण तरी मुलीला तोच मुलगा का आवडतो याचा एकदा विचार व्हायला हवा ? निदान कुतुहल म्हणून तरी...
शारिरिक आकर्षण म्हणाल तर तो जगातला सर्वात देखणा तरूण आहे असं तर नक्कीच नसेल ?
मग नेमकं काय ? काहीतरी कारण असेलच ना ? जर ते कारण शोधून त्यातला फोलपणा मुलीला दाखवता आला तर कदाचित प्रश्न सुटू शकेल...
- Log in or register to post comments
व
विटेकर
Fri, 08/04/2017 - 05:58
नवीन
याला फार मोठया प्रमाणात चित्रपट, नाट्य , दूरदर्शन जबाबदार आहे !
कलेच्या नावाखाली केवळ विकारांचे उदात्तीकरण केले जात आहे , लोक अभिरूचीहीन पण वासना चेतवणाऱ्या किळसवाण्या मनोरंजनाला चटावलेले आहेत.
पुढीची १००० वर्षे पुरी पडतील इतके चित्रपट निर्माण झालेत गेल्या १०० वर्षात ! आता तातडीने आणि चळवळ करून हा उद्योग बंद पडला पाहिजे , अतोनात नुकसान केले आहे या लोकांनी समाजाचे !
एका जर्मन कलीगबरोबर प्रवासात असताना तेलगु चित्रपट पाहण्याचा प्रसंग आला, तसा नाईलाज होता .. त्याची कॉमेंट फार बोलकी होती, तो म्हणाला, Suhas , this is not just vulgar but worst than porn ! आणि हा सिनेमा, मंडळी सहकुटुंब मिटक्या मारत पहात होती ! कसली डोंबळाची महान भारतीय संस्कृती सांगणार त्याला?
आणखी एक प्रसंग परवा हाफ़ीसात घडलेला! माझ्या नवऱ्याची बायको नावाची मराठी मालिका सध्या जोरात आहे ... त्या संदर्भातील चर्चा ! मुली पण या चर्चेत सामील !
एक लग्न झालेला तरुण म्हणाला ... "च्यायला त्या गुरुनाथ ची मजा आहे, शिकायला पाहिजे त्याच्याकडून , बायको आणि भानगड मस्त म्यानेज करतोय !'
सगळी मंडळी फिदीफिदी हसली, त्यात मुलीपण सामील !
त्या हरामखोर गुरुनाथला वास्तविक जोड्याने मारला पाहिजे ! घरात बायको असताना बाहेर शेण खातोय !
ही समाजाची मानसिकता असेल तर यातून सुदृढ सक्षम समाज कसा निर्माण होईल?
चित्रपट उद्योग बंद करता येत नसेल तर त्यांना CSR लागू करा. प्रत्येक बाजारू चित्रपटामागे एक संस्कारक्षम चित्रपट निर्माण करणे कायद्याने बंधनकारक करा.
विकार ग्रस्त ययाती कसा लयाला गेला ह ेपण दाखवा !
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Fri, 08/04/2017 - 07:21
नवीन
अस्म कसं ? अस कसं? ह्यातून त्याना जिवनानुभव मिळत नाही का? आणि सिरीयल आणि चित्रपट अनेकांना रोजगार देतात, त्यांचा पोटावर तुम्ही पाय आणताय? असहिष्णुपणा झाला हा. ;-)
ह. घ्या.
- Log in or register to post comments
र
रानरेडा
Mon, 08/07/2017 - 12:47
नवीन
जर्मनी त पॉर्न बनत नाही ??
बाप रे
https://en.wikipedia.org/wiki/Pornography_in_युरोप
- Log in or register to post comments
म
मोदक
Fri, 08/04/2017 - 11:05
नवीन
नवीन विषय घ्या आता चर्चेला..
- Log in or register to post comments
स
सत्या सुर्वे
Sat, 08/05/2017 - 01:16
नवीन
बेदम मारून का प्रश्न सुटणार होता ?
आधी बेदम मारले वगैरे तिथेच सगळे गणित वाया गेले. तरुण मुले ती, ती प्रेम नाही करणार तर आणखीन कुणी ?
उलट आई वडील आणि मुलांचे संबंध ठीक होते तर व्यवस्थित बोलून वगैरे मामला रफा दफा केला जाऊ शकता. मूर्ख आईवडील मुलीकडून साऱ्या चांगलंय मित्रांना राख्या बांधवून घेता आणि नंतर पोर गुंडा बरोबर पळून गेली म्हणून छाती बडवतात.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sat, 08/05/2017 - 02:34
नवीन
आजुबाजुच्या पाच {वाजतगाजत झालेल्या } गेल्या वर्षभरातील लग्न झालेल्या मुली घर सोडून परत माहेरी गेल्या आहेत. काहींची धुसफूस चालू आहे.
नवरा दारू पिऊन मारतो हे कारण कोणत्याही प्रकरणात नसून "हवी तशी मजा करायला {इथे} मिळत नाही" हे आहे. चार प्रेमविवाह आहेत.
थोडक्यात ज्यांचे संसार हसतखेळत चालू आहेत ती जोडपी नशिबवान आहेत.
गपचिप संसार कर हे अशा प्रकरणात सांगणारे आपण कोण?
लोकल ट्रेनच्या एका टोकाला मोटरमन आणि दुसय्रा टोकाला गार्ड असतो पण एकाला टोकाला मोटरमन अन दुसरीकडे मोटरवुमन आहेत!
- Log in or register to post comments
B
babubobade
Sun, 08/06/2017 - 11:19
नवीन
छान
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/06/2017 - 13:34
नवीन
सर्व प्रतिसाद वाचले आता शेवटी सारांश सांगून धाग्याला निरोप द्यावा असे वाटते.
बाकी, काही प्रतिसाद नेहमीप्रमाणेच भन्नाट होते. शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
व
विश्वजीत कदम
गुरुवार, 08/10/2017 - 12:37
नवीन
माझ्या ओळखीच्या ऑफीसमधील एक मुलगी त्र ३-४ जणाबरोब्र फिरुन आता एका ब्रोब्र प्रेमात आहे आणि हिच मुलगी ऑफीसमधील इत्र मुलीच्या चारित्र्याबद्द्ल वाईट बोलायची. ख्रत्र एकही मुलगी वाईट नव्हती हि आणि हिचि सख्खी मैत्रिण सोडुन.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 08/12/2017 - 09:01
नवीन
http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-newdelhi/cops-analysing-buxar-dms-two-page-suicide-note/article19477762.ece
काश अपर्णाताई की सलाह ये लोग लेते.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Mon, 06/15/2020 - 07:32
नवीन
बरोबर आहे, असल्या स्वभाववैशिष्ट्याला खरं म्हणजे आचरटपणाला काय म्हणणार ?
दुसर्या मुलीची कहाणी दु;खद आहे, मी देखिल असे युगुल क्लेशात जगताना पाहिले आहे !
लेख आवडला !
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6