"अशा का वागतात काही मुली?"
आत्ताच एका 'फक्त प्रौढांसाठी' असणार्या WhatsApp ग्रुपवर(आता कुठला ग्रुप ते इथं नका विचारु!)एका वेगळ्या विषयावर चर्चा झाली.यात काही मिपाकरही होते.
तर चर्चेचा विषय असा होता की 'तशा प्रकारच्या व्हिडिओजपैकी,काही व्हिडिओज हे मुलींना फसवून त्यांच्याच मित्राकडून नंतर डिलीट करण्याच्या वायद्याने काढले जातात.अर्थातच असं काही होत नाही.मैत्रिणीच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन हे व्हिडिओज संकेतस्थळांवर लिक केले जातात.
यात एका सदस्यांनी असा मुद्दा मांडला की "या मुलींना कळत कसं नाही? बॉयफ्रेंडच्या नको त्या मागण्यांना या मुली बळी कशा पडतात? यामुळे आपलं आयुष्य पणाला लागू शकतं हे या मुलींना का कळत नसावं?
या फसवणूकीला जशा मुली जबाबदार आहेत तशीच त्यांना फसवणारे त्यांचे बॉयफ्रेंडही तेवढेच जबाबदार आहेत.पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत यातून सर्वात जास्त त्रास हा मुलींनाच होतो.भोगावं त्यांना लागतं.घरातल्यांची नाचक्की होते ती वेगळीच!
अशा प्रकारचे व्हिडिओज चोरुनही काढले जातात.पण हा प्रकार घडतो केव्हा? जेव्हा ती मुलगी अशा प्रकारे मित्राच्या खुशीसाठी संमती देते तेव्हा! मग प्रश्न असा येतो की या मुली का तयार होतात अशा प्रकारांना? का ठामपणे नकार देऊ शकत नाहीत?बरं हा प्रकार अल्पशिक्षित मुलींबरोबर,खेड्यातच घडतो असं नाही अगदी शिकलेल्या शहरी मुलीही याला बळी पडतात.
बरं हे असे लबाड लांडगेच या मुलींना आवडतात.त्यांचं स्टायलिश वागणं,कपडे,गाडी हेही जोडीला असतं.
पण एखाद्या साध्या सरळ मुलानं यांना प्रपोज केलं की, "मी तुला किती चांगला समजत होते.तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती!" असं उत्तर मिळतं.
मुली किती लेवलपर्यंत जाऊन माती खाऊ शकतात याचं एक उदाहरण पाहण्यात आहे.
ही मुलगी BE Electronics चांगल्या मार्कांनी पासआऊट होती.एके ठिकाणचा कामाचा चांगला अनुभव होता.त्यानंतर आमच्या कंपनीत आली.इथे आधीपासूनच एक मुलगा टेस्टींगसाठी होता.याचं त्याच्या कॉलेजमधल्या दुसर्या एका मुलीबरोबर अफेअर होतं.तिच्याचबरोबर लग्नही ठरलं होतं.भावी बायकोबरोबर सगळे उद्योग करुन झाले होते.
ही कंपनीत आलेली मुलगी त्याने पाहिली.हीला मी पटवणारंच असं म्हणून प्रयत्न सुरु केले.तिचा पाठलाग करणे वगैरे प्रकार सुरु झाले.ती आणि तिची मैत्रीण दोघी एकत्रच घरी जायच्या अॅक्टीवावरुन.सुरुवातीला ही मुलगी आपण भलं आपलं काम भलं अशी होती.
हीच्या जोडीदार मैत्रिणीचे विचार म्हणजे प्रेमात पडायचं,नवर्याचा स्वभाव आधीपासून माहित असलेला चांगला अशा टाईपचे.तिच्या संगतीने हीचेही तसेच विचार.(अर्थात असे विचार काही गैर नाहीत)
पण तसा कोणी हीच्या जिवनात नव्हता.मग ह्या ठोंब्याचे प्रयत्न सुरु होतेच.आणि वाढले.तिच्या शिव्या खाऊन,अपमान होऊनही पिच्छा सोडत नव्हता.ती बोलली नाही की हा डबा खायचा नाही.
आता हीची ही जोडीदारीण हे सर्व प्रकार पाहत होती.तिने सुचवलं अगं एवढा मागं लागलाय तर नाही का म्हणतेस? प्रेमविवाह करायचा असं ठरलंय ना आपलं? दे त्याला रिस्पॉन्स!
डिपार्टमेंटमधल्या काही लोकांनी त्या मुलाबद्दल सांगितलं तरीही ती बदलली नाही.
स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची मुळातच अक्कल नसल्याने तिने या मुलाला होकार दिला.तिला याचं लग्न ठरलंय हेही माहित होतं.तरीही मी निर्णय बदलायला लावीन असा विश्वास.दोघंही वाहवत गेले.सगळे "उद्योग" करुन झाले.यानं त्याचे फोटोही काढून ठेवले.
या मुलीच्या घरी ती या नालायकाबरोबर बोलत असताना बापानं पकडलं.झोडपून काढलं पण लग्न करीन तर याच्याबरोबरचं म्हटल्यावर बापानं मुंबईचं एक स्थळ काढलं.तो मुलगा स्वभावानं कसा आहे वगैरे न पाहता जबरदस्तीनं लग्न लावून दिलं.
या ठोंब्याच्या होणार्या बायकोलाही आपला होणारा नवरा इतका नालायक आहे हे माहित होतं तरीही गावभर फिरल्याने सगळीकडे प्रसिध्दी झाली होती.मग तिच्याबरोबर याचं लग्नही झालं.
या एका प्रसंगात एक नव्हे तर चक्क तीन पूर्ण बिंडोक मुली पाहिल्या.त्या पण शिकलेल्या,इंजिनियर मुली.
अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात.
"आमच्या मित्राला ३ बहीणी आहेत... त्यातली ही दुसरी!
दिसायला फार सुंदर. तीचं आणि एका मुलाचं प्रेम साधारण ८वी ते ९ वीच्या दरम्यान जुळलं.. ती त्याच्यापेक्षा ६ महिन्याने मोठी... १२ वी नंतर त्या दोघांमध्ये खूप जवळीक झाली... ती मुलगी, तिची लहान बहीण आणि आजी गावी तर बाकी मुंबईला होते.. तो मुलगा दररोज त्या मुलीच्या रात्री १२ च्या नंतर घरी यायचा... तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... त्यामुळे संशय ही कोण घेत नसे... एखादा सापडला.. गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल... पण परत ६ महिन्यांनी ह्यांचे प्रकरण चालू... अाख्या गावभर झालं.. तरी ती मुलगी बेफिकर... शेवटी घरच्यांना समजलं... एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं.. पण ती एवढी बेफिकीर की करीन तर हाच.. दोघानी ही २१ पार केल होतं.. तिला फार समजावलं पण ऐकेनाच... पळून जाऊ नये म्हणून मग लग्न लावायचा विचार केला... आम्ही सांगून टाकलं लग्नानंतर परत तोंड नाही दाखवायचं ती उलट बोलली तुमच्या सारख्या सैतानांकडे मला यायचं ही नाही.
त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अगोदरच बहिणीकडे शिकायला... राहतं दोन खणांचं कौलारू घर.. १० ते १२ गुंठे जमीन, अर्धवट शिक्षण म्हणून नोकरी नाही,आईवडील गावात एकाकडे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात कोणाकडेतरी रोजंदारीवर जायचे.
आणि मुलीचे वडील मातब्बर, भाऊ सॉफ्टवेअर मध्ये, मोठी बहीण पण जॉबला... परिस्थिती ने तर जहागिरदार.. देखणेपणावरती तर त्या मुलीला कुणीही पसंत केलं असतं.
तिला इतके बोलूनही ती ऐकेना... समजावणार्यांनाच शिव्या द्यायची!.. शेवटी भातुकलीच्या खेळासारखं त्या बाहुला बाहुलीच लग्न(सगळ्यांच्या तोंडात हेच) मंदिरात लावून दिलं.
आता वर्ष झालं असेल मुलगा कुठंतरी दुकानात जॉब करतो... परिस्थिती बिकट म्हणून तीही आता सासू बरोबर मजुरी करते.... कुठं ते राजकुमारीच जगणं आणि कुठं आता काबाडकष्ट!
एकदा तिच्या नवऱ्या बरोबर नाश्ता करताना हॉटेल मध्ये भेटली... अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती... विचारलं तिलाच शिव्या देताना थोडा का विचार केला नाहीस..??? तो पोरगा काहीच बोलला नाही.. बडवलेला म्हणून!
(सैराटचीच कथा फुलवल्यासारखी वाटेल पण हे खरं आहे.)
म्हणजे वास्तव समोर आलं की मग विचार करतात... पण त्याअगोदर केला असता तर ही वेळ अाली नसती.
कुठे चुकतं या मुलींचं? विश्वास ठेवण्यायोग्य माणूस त्यांना अोळखता येत नाही की प्रेमात पडल्यावर मेंदूत काही रासायनिक बदल होतात? की कशाची भितीच वाटत नाही यांना?
अशा का वागतात काही मुली?
💬 प्रतिसाद
(278)
A
arunjoshi123
Wed, 08/02/2017 - 11:11
नवीन
प्रश्न इन्व्हॅलिड आहे.
व्हॅलिड असल्यास उत्तर नाही असे आहे.
=========================================
मूळात मूलीचं "वास्तविक भलं" आणि "तिच्या कुटुंबियांची तिच्या भल्याची कल्पना"या संकल्पना परस्परविरोधी आहेत हि धारणा मिथक आहे. (एखाद्या क्रिमिनल कुटुंबात सोडून.).
सबब असा अधिकार अनावश्यक आहे.
शिवाय लग्नानंतरचे जीवन कसे असते याचा अनुभव पालकांस असतो, पाल्यास नाही. म्हणून भलं काय ते त्यांना ठरवू द्यावं. त्यांना व्हेटो असू दिलेला बरा.
- Log in or register to post comments
झ
झिंगाट
Wed, 08/02/2017 - 06:56
नवीन
हा धाग्याचा पहिला भाग कोणीच का वाचत नाहीये???
बॉयफ्रेंडच्या अवाजवी मागण्यांना पूर्ण करणे पण शहाणपणाचे आहे असे प्रतिसादकर्त्यांना वाटते का???
धाग्यातील दुसरा किस्सा घेऊन त्यातील मारहाणीचा विरोध करण्यापेक्षा पहिल्या भागावर बाकीच्यांची मते वाचायला आवडतील....
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 08/02/2017 - 07:35
नवीन
लेखाच्या पहिल्या भागाबाबत बोलायचं तर माझं तर स्पष्ट मत आहे, आताच्या ह्या व्हर्चुवल जगात सख्या (?) नवरा-बायकांनी सुद्धा अति रोमँटिक फोटो किंवा व्हिडिओस काढण्याची हौस करू नये. घरात लहान मुले मोबाईल हाताळत असतात, दुर्दैवाने कोणाला व्हॉट'सअप msg करतील सांगू शकत नाही. किंवा सिस्टिम हॅक सुद्धा होऊ शकते.
आताच्या नवंतरुण प्रेमी युगलांना असे फोटो किंवा व्हिडिओस का काढावेसे वाटतात हे समजून घेण्यासाठी या पिढी मध्ये थोडे मिसळावे लागेल.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 08/02/2017 - 10:09
नवीन
हा काय प्रश्न झाला? सेक्यूरिटी हा अस्पेक्टच नाही असं समजा एक क्षण, नव्या पिढिनं काय करू नये याचं मार्गदर्शक तत्त्व काय?
=================================================================
जुनी पिढी का नाही म्हणे काढत (त्यांना अजून पुरेसा रोमँटिकपणा आहे मानू.)? हे तर न मिसळता कळेल. प्रॉब्लेम काय? फक्त सेफ नाही म्हणून तर तरुणांची रिस्क घ्यायची कपॅसिटि जास्त असते. पण मुळात "प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे झक मारू देत" हेच तत्त्व असेल तर असा संकुचित विचार आपल्या मनात कसा आला हा विस्मय झाला आहे.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Wed, 08/02/2017 - 12:38
नवीन
"प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे झक मारू देत" हेच तत्त्व असेल तर असा संकुचित विचार आपल्या मनात कसा आला हा विस्मय झाला आहे.
हेच म्हणतो
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 08/02/2017 - 14:42
नवीन
असे तत्व माझ्या कुठल्या प्रतिसादात तुम्हाला दिसले ते सांगा.
(तुमचा वरचा प्रतिसाद माझ्या वाचनातून सुटला होता)
जोशी बुवा मी माझ्या कोणत्याच प्रतिसादात कधीही अश्लाघ्य भाषेचा वापर शक्यतो करत नाही. तुम्हाला निर्वाणीचा इशारा, पुन्हा असले शब्द माझ्या लेखणीत वदवून घेण्याचा प्रयत्न केला तर जाहीर अपमानित करण्यात तमा बाळगणार नाही.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 08/03/2017 - 08:08
नवीन
क्षमस्व.
माझ्या कोणत्याही लिहिण्याचा उद्देश कोणाला दुखावणे हा नाही. एखादा शब्दप्रयोग वापरू नये असा संकेत असेल तर मला पाळायला आवडेल.
==========
आपली इच्छा नसताना आपल्याकडून काही अपवचन लिहून घ्यावं अशा दुष्ट विचारांचा मनुष्य मी नाही, उद्देशाबदला शंका घेऊ नये ही विनंती.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Wed, 08/02/2017 - 07:46
नवीन
धन्यवाद झिंगाटजी,
आपल्या सोयीचा,धागाकर्त्याला झोडपायला बरा पडेल असाच भाग निवडून त्यावरच बर्याच जणांची चर्चा चालू आहे.कारण पहिल्या भागातून खरमरीत,धागाकर्त्याला रानटी,असंस्कृत म्हणावं असं काहीच हाती लागत नाहीये.
या लोकांचा उद्देश धाग्याच्या विषयाशी संबंधित अशी चर्चा करणं हा नाहीच मुळात!
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Wed, 08/02/2017 - 07:56
नवीन
टीकेचा त्रास होत असेल तर असे लिखाण टाकू नये.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Wed, 08/02/2017 - 08:14
नवीन
त्रास टीकेचा नाही,धाग्याचं अर्धवट वाचन करुन उतावळेपणानं दिलेल्या प्रतिसादांचा होतो.
- Log in or register to post comments
अ
अकिलिज
Wed, 08/02/2017 - 09:52
नवीन
त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अगोदरच बहिणीकडे शिकायला... राहतं दोन खणांचं कौलारू घर.. १० ते १२ गुंठे जमीन, अर्धवट शिक्षण म्हणून नोकरी नाही,आईवडील गावात एकाकडे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात कोणाकडेतरी रोजंदारीवर जायचे.
आता सांगा कि तो कामधंदा न करणारा, भंपक, रिकामटेकडा कसाकाय. इथे तुम्ही सविस्तर सांगतही नाहीये. कदाचित तो हुशार पण परिस्थितीने गरीब कॅटॅगिरीतला असू शकेल. आणि तसं असल्याशिवाय तो जहागिरदारच्या पोरीला पटवूच शकत नाही.
आता यात अर्धवट वाचन, उतावळेपणानं दिलेला प्रतिसाद वगैरे कसा येतो ते सांगा.
दोन ओळीत मुलाची माहीती, त्या वरून तो भंपक आणि प्रतिसादकर्ते उतावळे आणि त्यांच वाचन अर्धवट. नमस्कार.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Wed, 08/02/2017 - 12:53
नवीन
तो मुलगा दररोज त्या मुलीकडून रात्री १२ च्या नंतर घरी परत यायचा... तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... त्यामुळे संशय ही कोण घेत नसे...
आता वर्ष झालं असेल मुलगा कुठंतरी दुकानात जॉब करतो... परिस्थिती बिकट म्हणून तीही आता सासू बरोबर मजुरी करते....
यावरुन नाही दिसत का? मुलगा किती गुणवान असावा ते?
म्हणून म्हटलं अर्धवट वाचन आणि उतावळे प्रतिसाद!
- Log in or register to post comments
अ
अकिलिज
Wed, 08/02/2017 - 13:42
नवीन
तो मुलगा दररोज त्या मुलीकडून रात्री १२ च्या नंतर घरी परत यायचा... म्हणजे रात्री १२च्या नंतर मुलींच्या कडून घरी येणारे भंपक असतात.
तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून.... गावात बहिणीकडे रहाणारे भंपक असतात.
कि गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... रात्री कट्ट्यावर येणारे भंपक असतात.
आता वर्ष झालं असेल मुलगा कुठंतरी दुकानात जॉब करतो.. कुठंतरी दुकानात जॉब करणारे भंपक असतात.
यातलं कुठलं एकतरी लॉजिक बरोबर आहे कां हे सांगा. नाहीतर फक्त तुम्ही म्हणताय म्हणून मुलाला भंपक समजूयात.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 08/02/2017 - 10:02
नवीन
केसची माहीती तुमच्यापेक्षा प्रतिसादकांनाच जास्त असणार!!!
================================================
कारण त्या उदारमतवादी वर्तनाचे, मतांचे नियम ठरलेले आहेत. ती मुलं आता उदारमतवाद्यांचे कन्हैया कुमार झालेली आहेत आणि त्यांवर टीका असंभव आहे.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Wed, 08/02/2017 - 10:08
नवीन
आता तुम्ही काहीतरी प्रतिसाद दिलाय त्याच अनुषंगाने मुलींना "राखी सावंत" म्हणावे का?
का फक्त मुलांना दोषी करार देण्यात आलेला आहे? जी "भोळ्या भाबड्या" मुलींना फसवतात?
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 08/02/2017 - 08:20
नवीन
हे पहा कोणी आमंत्रण पाठवलं नव्हतं तुम्हाला. या आणि धागा काढा म्हणून!! आता धागा काढला आहे तर लोक त्यांच्या मनातले विचार मांडणारच. त्या मुलीने तुमच्या मनासारख्या मुलाशी लग्न करायला हवं होतं आता मिपाकरांनी पण तुमच्या मनासारखी मतं मांडावी म्हणता का?
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Wed, 08/02/2017 - 12:56
नवीन
माझ्या मनासारखी मते नकाच मांडू. फक्त धाग्याच्या विषयाला धरुन मते मांडलीत तरी पुरे!
- Log in or register to post comments
व
वीणा३
Wed, 08/02/2017 - 08:48
नवीन
कारण पहिल्या भागात चर्चा करण्यासारखं खरंच काही नाहीये. बरेचदा प्रेमात पडलेली मुलं मुली हे फोटो - व्हिडीओ प्रकार करत असले तरी त्यात कोणालाही फसवण्यापेक्षा नवीन टेकनॉलॉजी वापरणं, मित्र -मैत्रिणीवर इंप्रेशन मारणं हा उद्देश असतो. पूर्णपणे फसवायच्या दृष्टीने मुलाने सगळ्या गोष्टी केल्या असतील तर चर्चा करण्यापेक्षा पोलिसांची मदत घेतलेली बरी.
किती उदाहरणं आहेत, जिथे अगदी दाखवून बघून लग्न झालाय आणि मुलीचे हाल झालेत, सासरी त्रास झालाय, प्रसंगी जीव जायची, वेड लागायची पाळी अली त्या मुलीवर? नवऱ्या मुलाकडचे लोक एकावर एक मागणी करत सुटलेत, सरळ दिसतंय कि हे थांबणार नाहीये, अशा वेळी किती लोक पुढे जातात लग्न थांबवायला? मुलीची सिलेक्टिव्ह काळजी फक्त जेव्हा ती स्वतःचा निर्णय स्वतः घेते.
तुमच्या त्या पहिल्या उदाहरणातील मुलगी बी इ आहे, स्वतःची नोकरी करतीये, सज्ञान आहे, आणि स्वतःला हवं तसं वागत्ये. आता त्यात चूक असेलही पण किती लोकांचं मॉरल पोलिसिंग करत बसणार तुम्ही, तुमच्याच ऑफिस मध्ये ४ लोक ड्रग घेणारे असतील, अलकोहोलिक असतील, सिगारेट फुकून शरीराचे हाल करून घेत असतील, लोन वर लोन घेऊन स्वतःला अडकवून घेत असतील, आणि अशा लोकांबद्दल तुम्हाला आणि आसपास च्या बऱ्याच लोकांना वाईट पण वाटत असेल. त्याच्या अख्या कुटुंबाला पण त्रास होत असेल. पण ते त्यांच्या आयुष्यात चुकीचे निर्णय घेतायत म्हणून कोणीही जाऊन त्यांना मारणं कितपत बरोबर? खरं तर या उदाहरणात जर आसपासच्या लोकांनी "उसे उसके हाल पे छोड दो " आणि फक्त कामापुरते संबंध ठेवलेत ना तर ती मुलगी पटकन सावरेल. पण एवढ्या लोकांना कोण समजावणार बदलायला. त्या मुलीला नाव ठेवणं सोपं जास्त.
सज्ञान, कमावत्या व्यक्तीला "समजवायचा प्रयत्न करणे / जमेल ती लागेल ती मदत करणे " या पलीकडे उपाय नाही हा बऱ्याच मारामारी विरोधी लोकांचा दृष्टिकोन असतो. आणि निर्णय चुकतात, दुनियेतल्या सगळ्या लोकांचे चुकतात, अनेक लोक फसवतात. अगदी टाटा अंबानी सारख्याना फसवल्याची सुद्धा उदाहरण असतील. अडनिड्या वयातली मुलं (खासकरून मुलगी) फसली तर त्यांना परत आयुष्य नव्याने सुरु करता येईल असा आपला समाज नाही हे आपलं दुर्दैव. किमान शहरामध्ये बऱ्याच घरामध्ये "समाज काय म्हणेल" म्हणून आयुष्य जगणं कमी झालाय, आणि असंच व्हावं हीच इच्छा.
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Wed, 08/02/2017 - 15:16
नवीन
तुम्ही धाग्याचा उद्देश नीट समजावूनच घेतला नाही.
बरेचदा प्रेमात पडलेली मुलं मुली हे फोटो - व्हिडीओ प्रकार करत असले तरी त्यात कोणालाही फसवण्यापेक्षा नवीन टेकनॉलॉजी वापरणं, मित्र -मैत्रिणीवर इंप्रेशन मारणं हा उद्देश असतो. पूर्णपणे फसवायच्या दृष्टीने मुलाने सगळ्या गोष्टी केल्या असतील तर चर्चा करण्यापेक्षा पोलिसांची मदत घेतलेली बरी.
मुध्दा हा आहे की मुले मुलींना असे न्युड व्हिडीओ काढायला सांगतात आणि नंतर व्हायरल करतात. पुढे दोघांचे फिस्कटले तर केवळ असल्या व्हिडीओमुळे लग्न होत नाही अशी उदाहरणे आहेत. तेव्हा आज आपला केवळ बॉयफ्रेंड सांगतो आहे म्हणून असे व्हिडीओ काढू नका हाच घाग्याचा उद्देश आहे. एकदा व्हिडीओ सगळीकडे पसरल्यानंतर पोलिसांची मदत घेउन काय फायदा?
तुमच्या त्या पहिल्या उदाहरणातील मुलगी बी इ आहे, स्वतःची नोकरी करतीये, सज्ञान आहे, आणि स्वतःला हवं तसं वागत्ये. आता त्यात चूक असेलही पण किती लोकांचं मॉरल पोलिसिंग करत बसणार तुम्ही, तुमच्याच ऑफिस मध्ये ४ लोक ड्रग घेणारे असतील, अलकोहोलिक असतील, सिगारेट फुकून शरीराचे हाल करून घेत असतील, लोन वर लोन घेऊन स्वतःला अडकवून घेत असतील, आणि अशा लोकांबद्दल तुम्हाला आणि आसपास च्या बऱ्याच लोकांना वाईट पण वाटत असेल. त्याच्या अख्या कुटुंबाला पण त्रास होत असेल. पण ते त्यांच्या आयुष्यात चुकीचे निर्णय घेतायत म्हणून कोणीही जाऊन त्यांना मारणं कितपत बरोबर? खरं तर या उदाहरणात जर आसपासच्या लोकांनी "उसे उसके हाल पे छोड दो " आणि फक्त कामापुरते संबंध ठेवलेत ना तर ती मुलगी पटकन सावरेल. पण एवढ्या लोकांना कोण समजावणार बदलायला. त्या मुलीला नाव ठेवणं सोपं जास्त.
हे मुळ घाग्यातील वाक्य
स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची मुळातच अक्कल नसल्याने तिने या मुलाला होकार दिला.तिला याचं लग्न ठरलंय हेही माहित होतं.तरीही मी निर्णय बदलायला लावीन असा विश्वास.दोघंही वाहवत गेले.सगळे "उद्योग" करुन झाले.यानं त्याचे फोटोही काढून ठेवले.
या मुलीच्या घरी ती या नालायकाबरोबर बोलत असताना बापानं पकडलं.झोडपून काढलं पण लग्न करीन तर याच्याबरोबरचं म्हटल्यावर बापानं मुंबईचं एक स्थळ काढलं.तो मुलगा स्वभावानं कसा आहे वगैरे न पाहता जबरदस्तीनं लग्न लावून दिलं.
या ठोंब्याच्या होणार्या बायकोलाही आपला होणारा नवरा इतका नालायक आहे हे माहित होतं तरीही गावभर फिरल्याने सगळीकडे प्रसिध्दी झाली होती.मग तिच्याबरोबर याचं लग्नही झालं.
या एका प्रसंगात एक नव्हे तर चक्क तीन पूर्ण बिंडोक मुली पाहिल्या.त्या पण शिकलेल्या,इंजिनियर मुली.
ह्यात कंपनीतील लोकांनी मारहाण केल्याचा उल्लेख कुठे आहे? किमान समोरची व्यक्ती चुकीच्या मार्गाने चालली आहे तर थांबवण्याचा प्रयत्न करणे गुन्हा आहे का?
- Log in or register to post comments
M
mayu4u
Wed, 08/02/2017 - 07:52
नवीन
सर्वप्रथम डिस्क्लेमर: मी जन्मापासून मुबंईत राहिलोय, आणि ग्रामीण भागातील सामाजिक परिस्थितीचा मला अजिबात अंदाज नाही.
लहानपणापासून मी एका बऱ्यापैकी लिबरल कुटुंबात वाढलो. आई-बाबांनी त्यांची मतं माझ्यासमोर मंडळी असली तरी लादली नाहीत कधीच. बऱ्याच बाबतीत मला निर्णय आणि आचार स्वातंत्र्य होतं. वयात येताना मुलींबद्दलचंआकर्षण, चोरी-छुपे रिलेशनशिप्स इ सुद्धा होतंच. मात्र एखाद्या मुलीचा, तिच्या माझ्यावरच्या विश्वासाचा गैरफायदा घ्यावा असं कधी मनात आलं नाही.
आता जाणवतंय, कि याचं मुख्य कारण आई-बाबांनी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून केलेली माझी जडण-घडण. संस्कार वगैरे मोठे शब्द वापरणार नाही मी, मात्र आई-बाबांचा माझ्याशी असलेला संवाद, माझी मतं मोकळेपणे मांडण्याचं दिलेलं स्वातंत्र्य, नि:संकोचपणे मतभेद व्यक्त करण्याची लावलेली सवय या साऱ्यांचा सकारात्मक परिणाम झालेला जाणवतोय.
वर म्हटल्याप्रमाणे आई-वडिलांनी जाणीवपूर्वक आपल्या मुलांवर आणि मुलींवर संस्कार करणं हेच महत्वाचं आहे.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 08/02/2017 - 11:15
नवीन
पर्फेक्ट. सज्ञान झाल्यावर भारतीय राज्यघटनेला मधे आणून अधिकार वैगेरे भाषा करण्यापेक्षा चांगले संस्कार कधीही श्रेयस्कर.
- Log in or register to post comments
च
चिनार
Wed, 08/02/2017 - 09:01
नवीन
मुली अश्या प्रकारे क्लिप्स कश्या काय करू देतात हा प्रश्न मलाही पडतो. अशी मागणी करणारी मुलं नालायक असतात. नंतर मित्रांना दाखवून स्वतःचा पुरुषार्थ दाखवतात. मुलींनी या प्रकाराला बळी पडू नये.
ह्या क्लिप्स नेटवर/कायप्पावर चवीने पहिल्या जातात. अर्थात ते पाहणाऱ्यांमध्ये मी सुद्धा आहे. त्यांना दाखवायला लाज नाही तर आम्ही का बाळगावी असं आमचं लॉजिक आहे.
पण स्वतः असं कुठल्या मुलीबरोबर करण्याचा विचारही मनात येत नाही.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 08/02/2017 - 09:56
नवीन
उदारमतवादी इथे देखिल तुम्हाला मोराल पोलिसिंगच्या कटघर्याता खडे करतील का? पडू द्या ना बळी, तुम्ही कोण जाणिव देणारे? १८ वर्षे झाली तर आपले व्हिडिओ बनवणारे त्यातल्या रिस्क्सची जाणकारी ठेऊन असतीलच, इ इ. बळी पडणे हे बळी पडणे असं तुम्ही पाहता, त्यांना कदाचित आवडत असू शकेल, इ इ पुढे. किंवा देहात वा शॄंगारात वा प्रणयात न दाखवावं असं मुळात काही नसतंच. विकसित देशांत दाखवतातच, इ इ इ इ.
- Log in or register to post comments
च
चिनार
Wed, 08/02/2017 - 13:46
नवीन
मंग पडू द्या ना बाप्पा त्याईले बळी..आम्ही आहोच ना पाहायला डोळे फाडू फाडू...
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 08/02/2017 - 09:27
नवीन
(गंभीर किंवा विनोदी अंगाने उत्तरे दिलेली चालतील)
१. बदडणे हा गुन्हा (भारतीय कायद्याने) आहे का? त्याला काय सजा आहे?
२. सरकारी सजांमधे बदडून काढणे नावाची कोणती सजा नाही. मग बदडणे हा प्रकार लोकांनी (गुन्हा आहे म्हणून) त्यागला आणि सरकारने (शिक्षा नाही म्हणून) त्यागला तर हा प्रकार पृथ्वीतलावरून नष्टच होऊन जाईल. न बडवणारे जग तुम्हाला आवडेल का?
३. लहान मुलांना चापट मारणे हा गुन्हा आहे का?
४. कोणाला पाठीत गुद्दा घालणे हा गुन्हा आहे का?
५. कायमची शारिरिक जखम होणार नाही अशी काळजी घेऊन प्रेमपूर्वक बदडता येते का?
६. काउंसेलिंगने बदडण्यापेक्षा उत्तम परिणाम होतो हे कसे सिद्ध कराल? काउंसेलिंगवर असा कोणता मंत्र शिंपडलेला असतो कि ती इतकी परिणामकारक असते?
७. महान अशा पाश्चात्य संस्कृतीतून बडवण्याच्या रानटी प्रथेचे उच्चाटन कधी झाले? मंजे आपण (अॅज यूज्वल) किती वर्षे मागे आहोत?
८. बडवण्याच्या इतका विरोध असणारांस आपल्या आईने, बापाने, आज्जीने, आजोबांनी एखादी थुतरीत दिलेली आठवते काय? त्याविरोधात ते कधी कोर्टात गेले? निकाल काय आला?
९. प्रत्येकच शिक्षा केवळ सरकारनेच द्यावी असे असते काय? म्हणजे आमच्या ईशानने गृहपाठ केला नाही तर मी कोणत्या कोर्टात जाऊन त्याला "आदेश" आणून द्यावा?
१०. नात्यानात्यांमधे आज्ञा देण्याचा अधिकार (पोरी, असं करू नको गं इ इ टाईपचा) देखिल केवळ शासनाकडे उरला आहे का? सज्ञान झालेल्या सर्व मूर्खांस अक्कल आलेली आहे असे गृहित धरून समीकरणे सोडवायची काय?
११. इतरांच्यात पडणे हा देखिल घटनात्मक अधिकार केवळ शासनाकडे उरला आहे का? केवळ माझ्या पेशींतील एका रेणूमुळे हा माणूस (उदा. माझा बाप) त्याचा माझा काही संबंध नसताना (सरकारचे दोन भिन्न, स्वतंत्र नागरीक या अर्थाने) माझ्या आयुष्यात उगाच लूडबूड करत असतो अशी फिर्याद मला करता येईल काय? बाप किंवा बॉस किंवा आई यांची लूडबूड कायद्याने थांबवता कशी येईल?
================================
धाग्यावर जी उदारमतवादी मते व्यक्त झाली आहे ती थोडी अपुरी वाटली म्हणून प्रश्न विचारले आहेत.
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Wed, 08/02/2017 - 09:34
नवीन
प्रश्न आवडले!
१. बदडणे हा गुन्हा (भारतीय कायद्याने) आहे का? त्याला काय सजा आहे?
UNDER Indian Penal Code
Section 319 - Hurt.- Whoever causes bodily pain, disease or infirmity to any person is said to cause hurt.
Section 323 -Punishment for Hurt- Whoever, except in the case provided for by section 334, voluntarily causes hurt, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to one year, or with fine which may extend to one thousand rupees, or with both.
Section 334 - Whoever voluntarily causes hurt on grave and sudden provocation, if the neither intends nor knows himself to be likely to cause hurt to any person other than the person who gave the provocation, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to one month, or with fine which may extend to five hundred rupees, or with both.
Section 350 - Criminal force.-Whoever intentionally uses force to any person, without that person’s consent, in order to the committing of any offence, or intending by the use of such force to cause, or knowing it to be likely that by the use of such force he will cause injury, fear or annoyance to the person to whom the force is used, is said to use criminal force to that other.
“Injury”.—The word “injury” denotes any harm whatever illegally caused to any person, in body, mind, reputation or property.
Section 351. Assault - Whoever makes any gesture, or any preparation intending or knowing it to be likely that such gesture or preparation will cause any person present to apprehend that he who makes that gesture or preparation is about to use criminal force to that person, is said to commit an assault. Explanation.—Mere words do not amount to an assault. But the words which a person uses may give to his gestures or preparation such a meaning as may make those gestures or preparations amount to an assault.
Source : https://www.quora.com/Is-slapping-a-person-an-assault-and-is-it-punishable-by-law-in-India
शिक्षक सुद्धा मुलांना बडवू शकत नाहीत. तुमच्या माहितीत असे कोणी शिक्षक असल्यास पोलिसात तक्रार करू शकता.
- Log in or register to post comments
ह
हेमंत८२
Wed, 08/02/2017 - 12:23
नवीन
१. बदडणे हा गुन्हा (भारतीय कायद्याने) आहे का? त्याला काय सजा आहे?:::::----कोर्ट ऊठेपासून जन्मेठेपे पर्यंत सर्व शिक्षा यात सामाविस्ट होऊ शकतात.. फक्त कसे बदडले याला महत्व आहे.
२. सरकारी सजांमधे बदडून काढणे नावाची कोणती सजा नाही. मग बदडणे हा प्रकार लोकांनी (गुन्हा आहे म्हणून) त्यागला आणि सरकारने (शिक्षा नाही म्हणून) त्यागला तर हा प्रकार पृथ्वीतलावरून नष्टच होऊन जाईल. न बडवणारे जग तुम्हाला आवडेल का?::::--- नाही मुळीच नाही. त्याची तर गरज आहे आणि माझ्यासारखा असे मुळमुळीत जगू शकत नाही..
३. लहान मुलांना चापट मारणे हा गुन्हा आहे का?:::--- पहिल्यांदा मारत असत तर नक्कीच. पण जर सवय असेल तर नाही आणि स्वतःच्या....... दुसऱ्याच्या नाही..
४. कोणाला पाठीत गुद्दा घालणे हा गुन्हा आहे का?:::--- कोणाला गुद्दा मारत आहे याच्यावर अवलंबून आहे..
५. कायमची शारिरिक जखम होणार नाही अशी काळजी घेऊन प्रेमपूर्वक बदडता येते का? ::::--- हो हा प्रयोग मी बाrच्यादा केला आहे अनुभव हवा असेल तर प्रत्यक्षात भेटावे..
६. काउंसेलिंगने बदडण्यापेक्षा उत्तम परिणाम होतो हे कसे सिद्ध कराल? काउंसेलिंगवर असा कोणता मंत्र शिंपडलेला असतो कि ती इतकी परिणामकारक असते?::::--- यासाठी आपण मुन्ना भाई mbbs हा चित्रपट आणि गांधीजी यांचे चरित्र वाचावे...( हलके घ्या)
८. बडवण्याच्या इतका विरोध असणारांस आपल्या आईने, बापाने, आज्जीने, आजोबांनी एखादी थुतरीत दिलेली आठवते काय? त्याविरोधात ते कधी कोर्टात गेले? निकाल काय आला?:::--या सर्वठिकाणी तो माझ्यातरी विरोधात गेला होता.
९. प्रत्येकच शिक्षा केवळ सरकारनेच द्यावी असे असते काय? म्हणजे आमच्या ईशानने गृहपाठ केला नाही तर मी कोणत्या कोर्टात जाऊन त्याला "आदेश" आणून द्यावा?::::--- त्याला होम मिनिस्टर कोर्टमध्ये उभे करावे. अपोआपच तुम्हाला न्याय मिळेल..
११. इतरांच्यात पडणे हा देखिल घटनात्मक अधिकार केवळ शासनाकडे उरला आहे का? केवळ माझ्या पेशींतील एका रेणूमुळे हा माणूस (उदा. माझा बाप) त्याचा माझा काही संबंध नसताना (सरकारचे दोन भिन्न, स्वतंत्र नागरीक या अर्थाने) माझ्या आयुष्यात उगाच लूडबूड करत असतो अशी फिर्याद मला करता येईल काय? बाप किंवा बॉस किंवा आई यांची लूडबूड कायद्याने थांबवता कशी येईल?:::--आजकाल कोणी पण जनहित याचिका दाखल करतात...
जमेल त्या प्रयत्नाने उत्तर देण्याचं प्रयत्न केला आहे ((( हलके घ्या )))
- Log in or register to post comments
उ
उपेक्षित
Wed, 08/02/2017 - 09:45
नवीन
साधारण १ वर्ष झाले असतील या घटनेला...
माझ्या मित्राचा एक मुस्लीम मित्र आहे त्याने त्याचा laptop वर त्याचे आणि त्याचा मैत्रिणीचे काही फोटो आणि विडीओ (एकांतातील) साठवून ठेवले होते. एक दिवशी त्याचा दुकानात काम करणारा एक उत्तरभारतीय कामगाराने बराच ऐवज, पैसे या बरोबर तो laptop सुद्धा लंपास केला आता या महाभागाची तंतरली, एक नशीब कि laptop ला password होता सेटिंग लावून आणि 25 हजाराच्या laptop साठी साधारण ५ लाख खर्च करून या हिरोने आणि त्याचा मित्रांनी गोरखपूरवरून एका दुकानदाराकडून तो laptop एकदाचा मिळवला.
हे असे मूर्ख असतात एक एक ...
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 08/02/2017 - 09:46
नवीन
पण गरीबी आहे इतकंच.. मुलगा वाईट आहे असं कुठे (तुम्ही जितकं लिहिलं त्यावरुन तरी) दिसत नाही. दुकानात जॉब करतो म्हणजे रिकामटेकडा पण म्हणता येणार नाही.
बाकी मुलगी रडली ते गरीबीमुळे , माहेरच्यांची आठवण आल्यामुळे असेल कदाचित पण म्हणजे तिला पश्चाताप होतो आहे किंवा ती दु:खात आहे असं म्हणता येत नाही.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 08/02/2017 - 09:50
नवीन
समजा म्हणता येत नाही. पण तिला जसा "कष्टांत पण आनंदात" जगायचा अधिकार आहे तसा लेखकमहाशयांना "तिच्याबद्दल दु:खात नि स्वतः श्रीमंतीत" जगायचा तितकाच समान आणि आदरणिय अधिकार आहेच कि!!!
- Log in or register to post comments
प
परिंदा
Wed, 08/02/2017 - 11:28
नवीन
मुलगी का रडली त्याचे कारण धागाकर्त्याने दिलेले आहेच.
माहेरच्यांनी संबंध तोडले म्हणून ती रडली, मी गरीब आहे, मला (पैश्याची) मदत करा म्हणून नाही!
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Fri, 08/04/2017 - 18:23
नवीन
@ परिंदा - नाव बदला . तुमच्या बिनडोक विचार सरणीला हे नाव शोभत नाही.
- Log in or register to post comments
प
परिंदा
Wed, 08/02/2017 - 12:56
नवीन
मुलगी का रडली त्याचे कारण धागाकर्त्याने दिलेले आहेच.
माहेरच्यांनी संबंध तोडले म्हणून ती रडली, मी गरीब आहे, मला (पैश्याची) मदत करा म्हणून नाही!
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 08/02/2017 - 13:08
नवीन
१. धागालेखक इथेच आहे, त्याला सांगू द्या. त्यांनी का रडली ते नीट लिहिलं नाही.
२. आणि त्याही पेक्षा निर्णयाबद्दल पश्चात्ताप आहे का हे महत्त्वाचं...
३. आणि समजा नाही तरिही "का वागतात" हा लेखकाचा विचार त्याच्या बाजूने योग्य असू शकतो. एखाद्या सुविद्य, सुशिक्षित, सुंदर, सुधन तरुणीस मजुरिण बनण्यात आनंद का येत आहे असा तो प्रश्न आहे. तिची आत्मसुखाची भावना चूक आहे म्हणून लेखक दु:ख व्यक्त करूच शकतो. श्रीगुरुजिंच्या उदाहरणातील केसही अशिच आहे. मुलीला पाकिस्तानात जाऊन छळ करून घेत विधवा म्हणून सासूची सेवा करणे ही भावना आनंददायक वाटत असेल, पण श्रीगुरुजींना नाही.
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 08/02/2017 - 10:55
नवीन
धाग्यावर अजो आले. आता धाग्याचे किमान तीनशे तरी कुठे नाही गेले. चला, पॉपकॉर्न घेऊन बसतो.
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 08/02/2017 - 10:57
नवीन
होय =))
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 08/02/2017 - 11:13
नवीन
रॉयल्टी देत नाय राव तुमी. कमई पन व्हायला पायजे का नाई?
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 08/02/2017 - 13:00
नवीन
...पार्वती, आधी रिसर्च पेपर लाव.
- कॅप्टन रिसर्चगाडे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 08/02/2017 - 12:09
नवीन
धाग्यात दोन वेगळे प्रश्न आहेत. दोन्हींए वेगवेगळे उत्तर देतो.
१) काही प्रत्यक्ष घडलेले प्रसंग सांगतो.
बेळगावमधील आशा पाटील नावाची मुलगी आंतरजालावरील ओळखीवरून एका पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडली. कालांतराने त्यांनी लग्न करायचे ठरविले. दोघांनीही एकमेकांना प्रत्यक्ष पाहिलेले नव्हते. तरीसुद्धा तिने धर्म बदलला व मुस्लीम झाल्यानंतर एका मौलवीच्या सहाय्याने आंतरजालावरून पाकिस्तानी मुलाशी लग्न केले. लग्नानंतर बराच प्रयत्न केल्यानंतर तिला व्हिसा मिळाला व ती पाकिस्तानमध्ये नवर्याकडे गेली. गेल्यानंतर वर्षाभरातच तिला मूल झाले. पहिल्या मुलानंतर ती लगेचच दुसर्यांदा गर्भवती असताना अचानक तिचा नवरा वारला. नवरा वारल्यानंतर तिच्या सासूसासर्यांनी तिचा छळ सुरू केला व घराबाहेर पडण्याची मनाई केली. नवर्याच्या मृत्युनंतर तिने आपल्या दिराशी लग्न करावे यासाठी ते दडपण आणू लागले. शेवटी भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्यानंतर व दीर आणि सासू-सासर्याविरूद्ध पोलिस तक्रार केल्यानंतर तिला भारतात परत येता आले. भारतात परत आल्यानंतर काही काळाने तिने परत पाकिस्तानात परत जायची तयारी सुरू केली कारण तिला म्हणे नवर्याच्या पश्चात सासूसासर्यांची सेवा करायची होती. आपल्याला सासूसासरे त्रास देणार आहेत हे माहीत असूनसुद्धा पाकिस्तान नावाच्या नरकात परत जायचा विचार करणार्या या मुलीला मूर्ख म्हणावे का भोळीभाबडी?
२) कलकत्त्यातील सुस्मिता मुखर्जी (नावाविषयी खात्री नाही) नावाची एक सुशिक्षित तरूणी मित्राशी ब्रेकअप झाल्यामुळे दु:खी अवस्थेत असताना तिला एक अफगाणी मुस्लिम भेटला व ती त्याच्या प्रेमात पडली. ती स्वतः सुशिक्षित होतीच व तिचे आईवडीलही सुशिक्षित व चांगल्या परिस्थितीतील होते. या मुलीने अफगाणीशी लग्न करून ती त्याच्या बरोबर काबूलला रहायला गेली. तिथे रहायला गेल्यानंतर तिला दिसले की त्याचे घर अत्यंत छोटे असून (म्हणजे मातीच्या १-२ खोल्या) त्यात ८-१० जण रहात आहेत. रोजचे खाणे म्हणजे नान चहात बुडवून खाणे. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे तिच्या नवर्याचे आधीच एक लग्न झाले होते व त्याची पहिली बायको व त्यांची मुले तिथेच रहात होती. आपले लग्न झाल्याचे त्याने तिच्यापासून लपवून ठेवले होते. ही मुलगी मूर्खासारखी तिथेच ७-८ वर्षे राहून घरकाम करीत बसली कारण तिथे गेल्यानंतर काही दिवसांनी तिला तिथेच सोडून तिचा नवरा कलकत्त्यात परतला. तो काळ तालिबानचा असल्याने अफगाणिस्तानमध्ये स्त्रियांना एकट्याला कोठेही जायची परवानगी नव्हती. त्यामुळे या मुलीला काबूलमधून भारतात परत येता आले नाही. या सुशिक्षित तरूणीने ७-८ वर्षे त्या मातीच्या घरात सासू, सासरे, दीर, सवत व सवतीची मुले यांची सेवा करण्यात घालविली. नोकरी करणे, काही उद्योगव्यवसाय करणे शक्यच नव्हते कारण त्या प्रकाराला बंदी होती. शेवटी ७-८ वर्षानंतर धाडस दाखवून ती पाकिस्तानमार्गे कलकत्त्यात परतली. नवर्याने एवढी घोर फसवणूक करून आयुष्याची वाट लावली तरीसुद्धा तिला त्याच्याबद्दल राग नव्हता. कलकत्त्यात परत आल्यानंतर तो तिला परत भेटला व परत त्यांचे मनोमीलन झाले काही वर्षानंतर तालिबानी गेल्यानंतर ते दोघे काबूलला परत जाऊन त्यांनी पुन्हा एकदा संसार सुरू केला. आपल्या अनुभवांवर तिने एक पुस्तक लिहिले असून त्याचा मराठी अनुवाद 'काबुलीवाल्याची बंगाली बायको' या नावाने प्रसिद्ध आहे. या पुस्तकातून तिने तालिबानची बदनामी केली असा तालिबान्यांची समजूत झाल्यामुळे ३-४ वर्षांपूर्वी काही अज्ञात तालिबान्यांनी तिला काबूलमध्ये वयाच्या ५० व्या वर्षी गोळ्या घालून मारून टाकले. ज्याने आपली घोर फसवणूक करून आपल्या संपूर्ण आयुष्याची वाट लावली त्याच्याचबरोबर परत काबूलमध्ये जाऊन आत्मघात करून घेणार्या या मुलीला मूर्ख म्हणावे का भोळीभाबडी?
माझ्या परिचयात प्रेमप्रकरणात पडून आयुष्याची वाट लागलेल्या २-३ मुलींची उदाहरणे आहेत. "काही मुली अशा का वागतात?" हे या मुलींच्या बाबतीत एक गूढच आहे.
आता दुसरा मुद्दा.
वरील लेखात एका प्रेमात पडलेल्या मुलीचा व त्यातून मुलाला व मुलीला मारहाण झाल्याचा संदर्भ आहे. त्यावर बरीच धुमश्चक्री सुरू आहे. मी अशा प्रसंगात नक्की कसा वागेन हे सांगता येणे अवघड आहे. मुलीला समजावून सांगण्याचा नक्कीच भरपूर प्रयत्न करीन. परंतु सांगूनही मुलगी ऐकत नसेल आणि मुलगी ज्या मुलाच्या प्रेमात पडली आहे त्याच्याशी तिचे लग्न झाले तर तिच्या आयुष्याची वाट लागेल असे स्पष्ट दिसत असेल तर मुलीला त्यापासून परावृत्त करण्यासाठी पुढची कृती काय असेल हे आतातरी सांगता येणे खूप कठीण आहे. काठावर उभे राहून सूचना देणे खूप सोपे असते. मुलगा-मुलगी सद्यान आहेत, त्यांचे निर्णय त्यांना घेऊ देत, कायदा हातात घेऊ नका, बळजबरी करू नका, त्यांचं आयुष्य त्यांना ठरवू देत असे सल्ले सहज देता येतात. कोणतेही आईवडील कधीही आपल्या मुलांचं अहित करीत नाहीत. जर एखादे पालक आपल्या मुलीच्या लग्नाच्या निर्णयाला कसून विरोध करीत असतील तर त्यामागे निश्चितच काहीतरी सबळ कारणे असणार. जर एखाद्या विशिष्ट मुलाशी लग्न झाले तर आपल्या मुलीचे नक्कीच अहित होईल असे त्यांना वाटले व त्यातून त्यांनी अशा लग्नाला कसून विरोध केला तर ते नक्कीच समजण्यासारखे आहे. अर्थात मारहाण करणे, धमक्या देणे असे प्रत्येकजण करीलच असे नाही. किंबहुना सुशिक्षित समाज या मार्गांचा अवलंब करण्याची शक्यता कमी असते. वर दिलेल्या २ प्रसंगावरून असे दिसते की या मुलींच्या घरच्यांनी त्यांच्या निर्णयाला कसून विरोध करायला हवा होता व कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलीला ते लग्न करण्यापासून परावृत्त करायला हवे होते. तसे झाले असते तर आज स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना मुलीची वाईट अवस्था बघावी लागली नसती.
माझ्या परिचयात प्रेमप्रकरणात पडून आयुष्याची वाट लागलेल्या २-३ मुलींची उदाहरणे आहेत. त्यांच्या आईवडीलांनी मुलीला लग्नापासून परावृत्त करण्याचा फारसा प्रयत्न केला नव्हता त्याचा त्यांना आता नक्कीच पश्चाताप होत असणार.
असो.
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Wed, 08/02/2017 - 15:50
नवीन
खर्या अर्थाने संतुलीत आणि घाग्याचा विषय समजावून घेउन दिलेला प्रतिसाद.
मागे एक तासगावच्या मुलीने फे,बु. वरुन पाकिस्तानातील एका मुलाशी मैत्री केली होती. सर्वांनी समजावून सुध्दा तीने पाकिस्तानात जावून त्या मुलाशी लग्न केले. पुढे तीचा छ्ळ झाला म्हणून ती परत आली. आयुष्याचे धिंडवडे काढणार्या या घटना. या वेळीच थांबवायला नकोत ( अर्थात मारहाण न करताच) का पाडगावकरी कविता म्हणाव्यात अशी ईथल्या तथाकथीत उदारमतवाद्यांची अपेक्षा आहे ? एखादी व्यक्ती चुकत असेल तर तीला थांबवणे हा सुध्दा गुन्हा आहे हे इथे कळले.
दुसरा मुध्दा त्या मारहाण झालेल्या प्रसंगाचा. अशीच घट्ना एखाद्या मोठ्या शहरात झालेली असेल तर कदाचित आई-बापाचा दॄष्टिकोण "तीच्या नशिबात आहे ते होईल" असे म्हणून कदाचित गप्प बसण्याचा असेल. मुख्य म्हणजे शहरात असल्या चर्चेसाठी कोणाला वेळ नसल्याने एखाद्या दिवशी चर्चा होउन दुसर्या दिवशी नित्य व्यवहार सुरु होतील. कदाचित तो मुलगा चांगला निघाला तर सुखांत शेवट हि होइल.
पण गाव पातळीवर अशीच विचारपुर्वक प्रतिक्रिया उमटेल हे सांगणे कठीण आहे. एकतर छोटा आकार आणि बहुतेक सगळे एकमेकाना ओळखतात. अश्या परिस्थितीत एखाद्या घरतल्या मुलीने असे केले की तीच्या भावंडाची व भावकीतील लग्ने होणे कठीण होते. वरच्या उदाहरणात समजावून सांगितले असणारच. उगाच कोणी मारामारीवर येत नाही. निदान महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर कायद्याची भीती सर्वांनाच आहे. पोटच्या पोरीचे नुकसान होताना कोणत्या आई-वडीलांना आनंद वाटेल? आणि कल्पना करा कि एकाच गावात तो मुलगा आणि मुलगी रोजच सामोरे येणार. त्याची चर्चाही रोजच होत राहणार. असे एखादे प्रकरण म्हणजे गावातल्या रिकामटेकड्या मंडळींसाठी ज्वलंत विषय. त्या कुटुंबाची रोजची होणारी मानसिक कुंचबणा यातूनच हे असले टोकाचे पाउल उचलले जाते. एकतर कायद्याने तो मुलगा व मुलगी दोघेही स न म्हणजे पोलिस व कायद्याची मदत हि दारेही बंद. या कोंडलेपणातूनच मारहाणीचा प्रकार झाला असावा ( जो निषेधार्ह आहे) असा माझा तर्क. त्यामुळे केवळ शहरी चष्मा लावून किमान या घटेने कडे न पहाता, मुलींना वेळीच सावरायला हवे यासाठीच ह्या धाग्याचा मुळ उद्देश.
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Wed, 08/02/2017 - 15:55
नवीन
बाकी ठीक आहे पण गावकरी-गावकरी म्हणून त्यांनी किती दिवस मागासलेले राहायचे. त्यांनी पण आता दृष्टिकोन बदलायला हरकत नाही.
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Wed, 08/02/2017 - 16:08
नवीन
तिथेही बदल होत आहेत. पण गावपातळीवर होणार्या बदलांचा वेग हा नेहमी मंद असतो.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 08/02/2017 - 18:09
नवीन
श्रीगुरुजी, उत्तम प्रतिसाद!
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 08/03/2017 - 07:03
नवीन
गुरुजी,
हा धागा आणि विषय इतका फालतू आणि वैयक्तिक आहे की तुम्ही असल्या लांबलचक प्रतिक्रिया इथे देऊ नयेत.
नाही होते काय की आमच्यासारखे लोक त्या ताज्या घडामोडी वाल्या धाग्यावर तुमच्या आणि ट्रुमन साहेबांच्या प्रतिसादांची वाट पाहत बसतात.
आणि तुम्ही इथे कसले टंकन करताय.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 08/03/2017 - 07:51
नवीन
जर असेंच असेंल तर तुम्हीं इथेच वाचन कसलें करतांय?
(अप्पा हे कर्नाटकच्या सीमेवरच्या लोकांचं पेटंट तुम्ही मोडताय म्हणून इतके अनुस्वार ओतलेत.)
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 08/03/2017 - 11:18
नवीन
तिथले सगळे वाचून संपले होते. म्हणून लिहिले.
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Fri, 08/04/2017 - 18:29
नवीन
खूप मेहनती दिसतोय हा पठाण. यांच्यात काहीच वाईट्ट नाहीए. - मिसळपाव वरील कनहैया लोकांचे मत असेल बहुतेक असेच ..
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Wed, 08/02/2017 - 12:49
नवीन
१. डॉ. आंबेडकरांनी "घटना" लिहीली असती,
२. म. गांधींनी अहिंसा पालन करा असे सांगितले असते,
३. लो. टिळकांनी असहकार करा हा नारा,
४. लाल बहादुर शास्त्रींनी " जय जवान जय किसान" म्हटले असते
तर कितपत यशस्वी झाले असते याबद्द्ल मला शंका आहे.
अनुभवी, मध्यम-अनुभवी, किंचीत-अनुभवी, ताजी-अनुभवी आणी अन-अनुभवी पिढी लैच प्रश्न विचारते (चुक की बरोबर की पांचट की फालतु हे अलहिदा)
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 08/02/2017 - 12:53
नवीन
म्हणे लिडर बना, सक्षम व्हा.
फॉलोअर्स नसतील काय क्षाक्ष्क्षं लिडर बनणार?
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Wed, 08/02/2017 - 15:53
नवीन
शंभर टक्के सत्य!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »