Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"अशा का वागतात काही मुली?"

उ
उपयोजक
Mon, 07/31/2017 - 12:36
🗣 278 प्रतिसाद
आत्ताच एका 'फक्त प्रौढांसाठी' असणार्‍या WhatsApp ग्रुपवर(आता कुठला ग्रुप ते इथं नका विचारु!)एका वेगळ्या विषयावर चर्चा झाली.यात काही मिपाकरही होते. तर चर्चेचा विषय असा होता की 'तशा प्रकारच्या व्हिडिओजपैकी,काही व्हिडिओज हे मुलींना फसवून त्यांच्याच मित्राकडून नंतर डिलीट करण्याच्या वायद्याने काढले जातात.अर्थातच असं काही होत नाही.मैत्रिणीच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन हे व्हिडिओज संकेतस्थळांवर लिक केले जातात. यात एका सदस्यांनी असा मुद्दा मांडला की "या मुलींना कळत कसं नाही? बॉयफ्रेंडच्या नको त्या मागण्यांना या मुली बळी कशा पडतात? यामुळे आपलं आयुष्य पणाला लागू शकतं हे या मुलींना का कळत नसावं? या फसवणूकीला जशा मुली जबाबदार आहेत तशीच त्यांना फसवणारे त्यांचे बॉयफ्रेंडही तेवढेच जबाबदार आहेत.पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत यातून सर्वात जास्त त्रास हा मुलींनाच होतो.भोगावं त्यांना लागतं.घरातल्यांची नाचक्की होते ती वेगळीच! अशा प्रकारचे व्हिडिओज चोरुनही काढले जातात.पण हा प्रकार घडतो केव्हा? जेव्हा ती मुलगी अशा प्रकारे मित्राच्या खुशीसाठी संमती देते तेव्हा! मग प्रश्न असा येतो की या मुली का तयार होतात अशा प्रकारांना? का ठामपणे नकार देऊ शकत नाहीत?बरं हा प्रकार अल्पशिक्षित मुलींबरोबर,खेड्यातच घडतो असं नाही अगदी शिकलेल्या शहरी मुलीही याला बळी पडतात. बरं हे असे लबाड लांडगेच या मुलींना आवडतात.त्यांचं स्टायलिश वागणं,कपडे,गाडी हेही जोडीला असतं. पण एखाद्या साध्या सरळ मुलानं यांना प्रपोज केलं की, "मी तुला किती चांगला समजत होते.तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती!" असं उत्तर मिळतं. मुली किती लेवलपर्यंत जाऊन माती खाऊ शकतात याचं एक उदाहरण पाहण्यात आहे. ही मुलगी BE Electronics चांगल्या मार्कांनी पासआऊट होती.एके ठिकाणचा कामाचा चांगला अनुभव होता.त्यानंतर आमच्या कंपनीत आली.इथे आधीपासूनच एक मुलगा टेस्टींगसाठी होता.याचं त्याच्या कॉलेजमधल्या दुसर्‍या एका मुलीबरोबर अफेअर होतं.तिच्याचबरोबर लग्नही ठरलं होतं.भावी बायकोबरोबर सगळे उद्योग करुन झाले होते. ही कंपनीत आलेली मुलगी त्याने पाहिली.हीला मी पटवणारंच असं म्हणून प्रयत्न सुरु केले.तिचा पाठलाग करणे वगैरे प्रकार सुरु झाले.ती आणि तिची मैत्रीण दोघी एकत्रच घरी जायच्या अॅक्टीवावरुन.सुरुवातीला ही मुलगी आपण भलं आपलं काम भलं अशी होती. हीच्या जोडीदार मैत्रिणीचे विचार म्हणजे प्रेमात पडायचं,नवर्‍याचा स्वभाव आधीपासून माहित असलेला चांगला अशा टाईपचे.तिच्या संगतीने हीचेही तसेच विचार.(अर्थात असे विचार काही गैर नाहीत) पण तसा कोणी हीच्या जिवनात नव्हता.मग ह्या ठोंब्याचे प्रयत्न सुरु होतेच.आणि वाढले.तिच्या शिव्या खाऊन,अपमान होऊनही पिच्छा सोडत नव्हता.ती बोलली नाही की हा डबा खायचा नाही. आता हीची ही जोडीदारीण हे सर्व प्रकार पाहत होती.तिने सुचवलं अगं एवढा मागं लागलाय तर नाही का म्हणतेस? प्रेमविवाह करायचा असं ठरलंय ना आपलं? दे त्याला रिस्पॉन्स! डिपार्टमेंटमधल्या काही लोकांनी त्या मुलाबद्दल सांगितलं तरीही ती बदलली नाही. स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची मुळातच अक्कल नसल्याने तिने या मुलाला होकार दिला.तिला याचं लग्न ठरलंय हेही माहित होतं.तरीही मी निर्णय बदलायला लावीन असा विश्वास.दोघंही वाहवत गेले.सगळे "उद्योग" करुन झाले.यानं त्याचे फोटोही काढून ठेवले. या मुलीच्या घरी ती या नालायकाबरोबर बोलत असताना बापानं पकडलं.झोडपून काढलं पण लग्न करीन तर याच्याबरोबरचं म्हटल्यावर बापानं मुंबईचं एक स्थळ काढलं.तो मुलगा स्वभावानं कसा आहे वगैरे न पाहता जबरदस्तीनं लग्न लावून दिलं. या ठोंब्याच्या होणार्‍या बायकोलाही आपला होणारा नवरा इतका नालायक आहे हे माहित होतं तरीही गावभर फिरल्याने सगळीकडे प्रसिध्दी झाली होती.मग तिच्याबरोबर याचं लग्नही झालं. या एका प्रसंगात एक नव्हे तर चक्क तीन पूर्ण बिंडोक मुली पाहिल्या.त्या पण शिकलेल्या,इंजिनियर मुली. अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात. "आमच्या मित्राला ३ बहीणी आहेत... त्यातली ही दुसरी! दिसायला फार सुंदर. तीचं आणि एका मुलाचं प्रेम साधारण ८वी ते ९ वीच्या दरम्यान जुळलं.. ती त्याच्यापेक्षा ६ महिन्याने मोठी... १२ वी नंतर त्या दोघांमध्ये खूप जवळीक झाली... ती मुलगी, तिची लहान बहीण आणि आजी गावी तर बाकी मुंबईला होते.. तो मुलगा दररोज त्या मुलीच्या रात्री १२ च्या नंतर घरी यायचा... तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... त्यामुळे संशय ही कोण घेत नसे... एखादा सापडला.. गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल... पण परत ६ महिन्यांनी ह्यांचे प्रकरण चालू... अाख्या गावभर झालं.. तरी ती मुलगी बेफिकर... शेवटी घरच्यांना समजलं... एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं.. पण ती एवढी बेफिकीर की करीन तर हाच.. दोघानी ही २१ पार केल होतं.. तिला फार समजावलं पण ऐकेनाच... पळून जाऊ नये म्हणून मग लग्न लावायचा विचार केला... आम्ही सांगून टाकलं लग्नानंतर परत तोंड नाही दाखवायचं ती उलट बोलली तुमच्या सारख्या सैतानांकडे मला यायचं ही नाही. त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अगोदरच बहिणीकडे शिकायला... राहतं दोन खणांचं कौलारू घर.. १० ते १२ गुंठे जमीन, अर्धवट शिक्षण म्हणून नोकरी नाही,आईवडील गावात एकाकडे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात कोणाकडेतरी रोजंदारीवर जायचे. आणि मुलीचे वडील मातब्बर, भाऊ सॉफ्टवेअर मध्ये, मोठी बहीण पण जॉबला... परिस्थिती ने तर जहागिरदार.. देखणेपणावरती तर त्या मुलीला कुणीही पसंत केलं असतं. तिला इतके बोलूनही ती ऐकेना... समजावणार्‍यांनाच शिव्या द्यायची!.. शेवटी भातुकलीच्या खेळासारखं त्या बाहुला बाहुलीच लग्न(सगळ्यांच्या तोंडात हेच) मंदिरात लावून दिलं. आता वर्ष झालं असेल मुलगा कुठंतरी दुकानात जॉब करतो... परिस्थिती बिकट म्हणून तीही आता सासू बरोबर मजुरी करते.... कुठं ते राजकुमारीच जगणं आणि कुठं आता काबाडकष्ट! एकदा तिच्या नवऱ्या बरोबर नाश्ता करताना हॉटेल मध्ये भेटली... अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती... विचारलं तिलाच शिव्या देताना थोडा का विचार केला नाहीस..??? तो पोरगा काहीच बोलला नाही.. बडवलेला म्हणून! (सैराटचीच कथा फुलवल्यासारखी वाटेल पण हे खरं आहे.) म्हणजे वास्तव समोर आलं की मग विचार करतात... पण त्याअगोदर केला असता तर ही वेळ अाली नसती. कुठे चुकतं या मुलींचं? विश्वास ठेवण्यायोग्य माणूस त्यांना अोळखता येत नाही की प्रेमात पडल्यावर मेंदूत काही रासायनिक बदल होतात? की कशाची भितीच वाटत नाही यांना? अशा का वागतात काही मुली?
वर्गीकरण
आपले मत

प्रतिक्रिया द्या
97506 वाचन

💬 प्रतिसाद (278)
ह
हस्तर Mon, 06/15/2020 - 04:31 नवीन
माहित्ति बद्दल धन्य वाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
व
विशुमित Tue, 08/01/2017 - 14:25 नवीन
लग्न करते वेळी मुलगी २१ वर्षाची होती, म्हणजे सज्ञान होती. तुम्ही सर्वानी समजावून पण पाहिले. तिने ऐकलं नाही. आता घेतलेल्या निर्णयामुळे रडत आहे. रडू द्यात की. तुम्ही कशाला जास्त काळजी करता. याचा विपरीत परिणाम असा होईल की लोक तुम्हालाच म्हणतील हा "केअशु' का एवढा इंटरेस्ट घेतोय या मुलीबद्दल. दुसरे म्हणजे त्या पोराचा तुम्ही हात मोडला. त्याने जर हाफ मर्डर ची केस तुमच्यावर ठोकली असती तर मग काय केले असते? म्हणून म्हंटले टुक्कार पोरांच्या नादी लागून दुसऱ्याच्या बापासाठी आपली दाढी मिशा काढू नका. बाकी मर्जी तुमची. सुयोग्य मार्ग म्हणाल तर एक भाऊ (मित्राची बहीण ती आपली बहीण) या नात्याने त्या मुलीने घेतलेला निर्णय सार्थ ठरवा म्हणून तिच्या गरीब रिकामटेकड्या नवऱ्याला कसे कामधंद्याला लावून त्यांची आर्थिक/सामाजिक परिस्थिती सुधारेल यासाठी प्रयत्न करा. हाणामारीच्या भानगडीत पडाल तर बाराच्या भावात जाल.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 08/01/2017 - 14:35 नवीन
धाग्यावर बर्‍याच जणांचा प्रतिसाद हा मारहाण करु नका.लागते वाट मुलीची लागू द्या.तुम्हाला काय करायचंय? असा दिसतो आहे.पण धाग्याच्या नावाशी संबंधित प्रतिसाद येत नाहीयेत. मारहाणीवरच सगळ्यांचा फोकस आहे. धागा मुली अशा का वागतात यामागची सामाजिक किंवा मानसिक कारणे शोधली जावीत त्याचा उहापोह व्हावा यासाठी आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 08/01/2017 - 14:43 नवीन
मुली अशा का वागतात हे जाणून तुम्ही काय करणार आहात ते आधी सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
व
विशुमित Tue, 08/01/2017 - 14:49 नवीन
वरती नितीन पालकरांनी सुयोग्य शब्दात दिलेले उत्तर पुरेशे ठरावे असे वाटते. बाकी त्या नागराजांनी सैराट काढून चूकच केली म्हणायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
न
नगरीनिरंजन गुरुवार, 08/03/2017 - 10:43 नवीन
प्रत्येकाला पैसा आणि त्यासाठी कोणाहीबरोबर राहणे पसंत असेल असे नाही. प्रत्येकाला आपले आयुष्य हवे तसे जगायचा अधिकार आहे. म्हणून मुली अशा वागतात आणि त्यांना तसे वागू द्यावे. गोडबोल्या पोरांच्या नादी लागून दु:ख मिळाले तर मिळू द्यावे. तो त्यांचा जीवनानुभव आहे. उगीच दुसर्‍याला जपण्याच्या व बोन्साय करण्याच्या भानगडीत पडू नये असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
अ
अकिलिज Tue, 08/01/2017 - 14:37 नवीन
इमॅजीन करा. तुम्ही मला कट्ट्यावर भेटला.... माझे मित्र आणि काही जणांनी तुम्हाला बेदम मारलं... हात मोडेपर्यंत मारलं.. तरीपण तुम्ही बेफिकीर... धागे काढीन तर असेच.... कसं वाटतंय. तुम्ही काय करावं आणि काय करू नये हे कुणी दुसर्‍यानी ठरवावं.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 08/01/2017 - 14:53 नवीन
उदाहरण तरी व्यवस्थित द्या. मी जर काहीच केलं नसेन तरीही तुम्ही मला का माराल? इथे काही तरी घडलं मग मारहाण झाली ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अकिलिज
अ
अकिलिज Tue, 08/01/2017 - 15:00 नवीन
त्यांनी प्रकरण केलं. तुम्हाला आवडलं नाही (पक्शीः तुम्हाला असं काही प्रकरण करायाचा चान्स गावला नाही) तुम्ही असा उदात्त धागा काढला. आम्हाला आवडला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
व
वरुण मोहिते Tue, 08/01/2017 - 14:40 नवीन
असाही एक धागा काढा . मी मोलाचे प्रतिसाद देईन . मी स्वतःच वाया गेलोय त्यामुळे . त्यात मारहाणी ची प्रवृत्ती असणारी ,मुलींना फसवणारी ,अश्या अनेक गोष्टी ऍड करता येतील . मुले अशी का वागतात असा धागा काढू काय म्हणता ?
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 08/01/2017 - 14:55 नवीन
नक्की काढा.पण सोबत याआधीचे राहिलेले धागेही काढा.किती दिवस वाट पहायला लावणार आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
स
सस्नेह Tue, 08/01/2017 - 14:48 नवीन
मंगेश पाडगावकर यांची सुंदर कविता तुमचं काय गेलं ? याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करु दे की ! मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ? तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला, लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे की ! तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं ? त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करु दे की ! मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ? एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली, घरात तेव्हां कोणीच नव्हतं म्हणून त्याचं फ़ावलं तिला जवळ घेऊन त्याने चक्क दार लावलं, लावलं तर लावू दे की फावलं तर फावू दे की तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं ? त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करु दे की ! मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ? घरात जागा नसते हल्ली त्यांच चालणारच टॅक्सीत प्रकरण, ते थोडेच बसणार आहेत घोकत पाणिनीचं व्याकरण, गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच ! कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच घेतले तर घेऊ दे की व्हायचे ते होऊ दे की तुमच्या घरचं बोचकं त्याने थोडंच उचलून नेलं ? त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करु दे की ! मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 08/01/2017 - 14:51 नवीन
अर्रर्रर्रआ कहर च ..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/06/2017 - 13:25 नवीन
:) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
द
दुर्गविहारी Tue, 08/01/2017 - 14:50 नवीन
वर बर्‍याच प्रतिक्रिया वाचल्या. अनुभव विश्व मर्यादित असले कि अशा प्रतिक्रिया येणार हे अपेक्षित होते. बर्‍याच जणाना त्या मुलाला मारल हे खटकलय, पण लक्षात घ्या हि शेवटची पायरी आहे. आपणही आपल्या घरी लहान मुलाना प्रथम रागावतो आणि अगदिच निरुपाय झाला कि मारतो( असे मारावे कि नाही हा वेगळ्या धाग्याचा विषय) हिच गोष्ट त्या गावी झाली असणार हे लक्षात घेतले गेले नाही. मोठी शहरे सोडली तर लहान गावी अश्या गोष्टीचा बोभाटा पटकन होतो. घरात असे एखादे उदाहरण घडले तर त्या घरातील बाकीच्या मुलांच्या लग्नात तर अडचणी येतातच पण, भावकीत हि लग्न होताना अवघड होते. असे होउ नये ह्यासाठी त्या मुली व मुलाचे सुरवातीला काउन्सलींग केले गेले, तरी ही एकत नाही म्हणल्यावर नाईलाजानेच मारहाण झाली.यात घागाकर्त्याने एक मुध्दा लिहीला नाही आहे, त्या मुलीला जेव्हा सुरवातीला समजाउन सांगितले गेले कि तुझ्या आणि तुझ्या मुलाचा परिस्थिती असलेला फरक आणि लग्नानंतर तुझ्या जीवनशैलीत होणारा वाईट बदल ( जो तीला नंतर समजलाच) तेव्हा तीने, "माझे लग्न याच मुलाशी लावून दिले नाहीतर मी आत्महत्या करेन व चिठ्ठीत तुम्हा सगळ्यांची नावे लिहून ठेवेन". कायद्याची हि अक्कल त्या मुलीला आहे पण आपले भविष्यात नुकसान नको म्हणून आपल्याच भावकीतील लोकांना धमकी द्यावी अशी वाटते यात काही चुकीचे नाही? एका मुलीपायी होणारे सगळ्यांचे नुकसान या सर्व नातेवाईकांनी केवळ वर हि मंडळी म्हणत आहेत तसे केवळ "मोरल पोलिसिंग" नको यासाठी गप्प बसावे ? आणि असे काही त्यानी केले तर त्यांना एका फटक्यात टुकार, रानटी प्रवृत्ती ठरविणारे आहेतच . हाच दॄष्टिकोण ठेवून जायचे ठरवले तर जरा कुठे निसर्गरम्य स्थळी , एखाद्या एतिहासिक ठिकाणी जरा एकांत दिसला कि चाळे करणारी मंडळी दिसतात, अगदी नवीन लग्न झालेल्या लोकांचे हेच प्रकार पहायला मिळतात. एक तर सर्वसामान्य लोक जरा बदल म्हणून बाहेर पडलेले असतात, तिथे जावे तर आपल्याच लहान मुलांसमोर हे असले प्रकार बघून निमूटपणे परत यावे लागते. यातून कधी कधी गावकर्‍यांचा किंवा स्थानिकांचा संमय सुटून मारहाण झालेली वाचायला मिळते. मोराल पोलिसींगचे डोस पाजण्यापेक्षा हे प्रकार का खपवून घ्यायचे ? याचे आधी उत्तर द्या. या प्रेमी जीवांनी किंवा लग्न झालेल्या जोडप्या किमान आपला उपद्रव ईतरांना होणार नाही याची जाणीव ठेवायला नको? अन्यथा काही बागेमध्ये व मंदिरामध्ये "इथे अश्लिल चाळे केले तर बांबुचे फटके मिळतील " असा बोर्ड लावायची वेळ का यावी? माझा स्वताचा अनुभव देतो. एकदा पावसाळा संपता संपता रायगडला मी व माझा भाउ असे दोघेच गेलो होतो, मधला दिवस असल्याने गडावर फार गर्दी नव्हती. एक चार जणांचा ग्रुप होता. दोन मुले व दोन मुली. त्यात एक नवीन लग्न झालेले जोडपे होते. ठिकठीकाणी एकमेकाच्या गळ्यात हात घालून फोटो काढणे चालू होते. सुरवातीला मी दुर्लक्ष केले. मात्र जगदीश्वर परिसरातही हेच चाळे सुरु झाले. मंदिर परिसरात आपण आहोत याची साधी जाणीव त्याना नव्ह्ती. हेच चाळे करायचे होते तर महाबळेश्वर , माथेरान आहेच. ईथे मी आक्षेप घेतला. मग मात्र गड बघायला(?) आलेले हे तथाकथित पर्यटक मागे वळून न बघता परतीच्या वाटेला लागले. इथे मला कोणी कशाला हे मोराल पोलिसिंग किंवा दरडावल्याबध्दल पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे असे म्ह्णले तरी चालेल, पण काही श्रध्दा असलेल्या ठिकाणी असे चाळे करणे योग्य वाटत नाहीत. तुमच्या चार भिंतीत तुम्ही काहीहि करा. मला काय त्याचे हि समाजातील वाढणारी प्रवॄत्ती अनेक अनिष्ट गोष्टीना प्रोत्साहन देते आहे. थेट धाग्याशी संबधीत नाही पण रहावत नाही म्हणून उदाहरण देतो, परवा पिंपरीमधे झालेल्या तरूणाच्या अपघाताचा प्रकार किंवा आटपाडी-मुंबई बसला झालेला दहिवडीजवळ अपघात, दोन्ही ठिकाणी मदत राहिली बाजुला मोबाईल मधून फोटो काढून शेअर करण्याची घाई बघायला मिळते. बाकी धाग्याचा विषय नीट समजावून घेउन प्रतिक्रीया दिल्या जाव्यात असे वाटते.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 08/01/2017 - 15:02 नवीन
कोणालातरी माझा मुद्दा समजला हे वाचून बरे वाटले. काही मुद्दे लिहायचे राहीले असतील तर त्याबद्दल खरंच क्षमस्व! काही जणांना हा धागा एकांगी वाटला असेल पण तुमच्या विस्तृत प्रतिसादामुळे दुसरीही बाजू लक्षात येईल मिपा सदस्यांच्या असे वाटते. मनापासून आभार!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
उ
उदय Tue, 08/01/2017 - 17:40 नवीन
आपण पण लक्षात घ्यायला हवे की ते तरुण/तरुणी पण सर्वसामान्य असतात आणि जरा बदल म्हणून बाहेर पडलेले असतात. नवीन लग्न झालेले जोडपे होते, त्यांना पण प्रायव्हसी हवी असते जी कदाचित घरी मिळत नाही. (भारतातली प्रायव्हसी हा एक स्वतंत्र धाग्याचा विषय आहे, म्हणून जास्त चर्चा करत नाही.) मुळात चाळे करणार म्हणजे काय करणार? गळ्यात गळे घालून फिरतील, एकमेकांशी सलगीने चिकटून बसतील, किसिंग करतील अजून काय? भारताबाहेर आलात तर हे सगळे सर्रास दिसते आणि कुणाला (लहान मुलांना पण) त्याचे कौतुक नाही. भारतात पण घरात टीव्हीवर लहान मुले हे सगळे बघतातच. त्याच्यासाठी इतके मोरल पोलिसिंग, पोलिसांच्या ताब्यात द्यायची भिती किंवा थेट मारहाण कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
द
दुर्गविहारी Tue, 08/01/2017 - 19:03 नवीन
आपले उदारमतवादी विचार समजले. ह्या तरुण, तरूणीना बाहेर पडून फिरायला कोणीही अडवत नाही किंवा नुकतेच लग्न झाल्यामुळे असणारे एकमेवांविश्यी नैसर्गिक आकर्षण समजू शकतो. पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही गोष्टींची काळजी घेण गरजेच आहे. काही शिस्त सांभाळणे आवश्यक आहे. आपल्या चाळ्याचा ईतराना त्रास होउ न देण तर आपण करू शकतो ना? मंदिराजवळ असताना आपला प्रेमाचा उमाळा आवरता येईल ना? बाकी बंद खोलीत तुम्ही काय करताय ह्यावर कोणी आक्षेप घेत नाहिये. भारताबाहेर काहिहि चालत असले तरी आपण ह्या गोष्टी करताना भारतात आहोत याचे भान ठेवायलाच हवे. हे प्रकार करताना कित्येकदा एकांतात या जोडप्याना गाठून गुंडानी लुटण्याची किंवा भावना चाळवल्या जाउन मुलीवर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या आहेत. आपण या गोष्टीना निमंत्रण देणार आहोत्?त्याना या आधी चांगल्या भाषेत समजावले होते. आणि मिठ्या मारुन फिरायला महाबळेश्वर, माथेरान आहेतच. अखिल महाराष्ट्राला वंदनीय रायगडावर हे करायची गरज नव्हती. बाकी सार्वजनिक जागी किसिंग, प्रेसिंग हे चाळे कायद्याने गुन्हा आहेत हे माहिती असेल अशी अपेक्षा करतो. पोलिसाची अश्या ठिकाणी चक्कर झाली हे प्रकार बंद होताना दिसतात, म्हणजे आपण काही चुकीचे करतोय हे यांना समजतय. भारतात मुलाबरोबर हे चाळे असलेले कार्यक्रम बघितली जातात हा निष्कर्ष कश्याच्या आधारावर काढला? आणि मुलांसमवेत असताना ईतर कुटूंबानी हे निमुटपणे चालवून घ्यावे अशी अपेक्षा तुम्हाला गैर वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय
उ
उदय Tue, 08/01/2017 - 23:14 नवीन
बाकी सार्वजनिक जागी किसिंग, प्रेसिंग हे चाळे कायद्याने गुन्हा आहेत हे माहिती असेल अशी अपेक्षा करतो. >>> हे मला माहीत न्हवते. प्रश्न उदारमतवादी विचारांचा नाही, संकुचित मनोवृत्तीचा आहे. मिठ्या मारणे तर दूरची गोष्ट, भारतात तर नवरा-बायको हातात हात घालून गेले तरी संस्कृतीरक्षकांना चालत नाही. कित्येकदा एकांतात या जोडप्याना गाठून गुंडानी लुटण्याची किंवा भावना चाळवल्या जाउन मुलीवर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या आहेत. >> या अशा घटना भारतातच नाही तर भारताबाहेरपण होतात. सुनसान जागी कुणीही लुटला जाऊ शकतो, बलात्कार किंवा विनयभंग होऊ शकतो. तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? मिठ्या मारुन फिरायला महाबळेश्वर, माथेरान आहेतच. अखिल महाराष्ट्राला वंदनीय रायगडावर हे करायची गरज नव्हती. >>> गडांवर जाऊन दारूपार्ट्या करणे, तिथे जाऊन आरडा-ओरडा करणे, घाण करणे या गोष्टी करताना भान ठेवले जाते का? भारतात मुलाबरोबर हे चाळे असलेले कार्यक्रम बघितली जातात हा निष्कर्ष कश्याच्या आधारावर काढला? >>> टीव्हीवर काय प्रोग्राम दाखवतात ते मी स्वतः पाहिले आहे. शिवाय भारतात पॅरेंटल कंट्रोल्स ("V-Chip") किंवा प्रोग्राम रेटिंग प्रकार माझ्या माहितीत तरी नाहीत किंवा वापरले जात नाहीत. अन्यथा "मुन्नी बदनाम हुई" आणि "चोली के पिछे क्या है" सारखी गाणी प्राइम टाइममध्ये सर्रास दाखवली गेली नसती. का ही गाणी "चाळे" या सदरात बसत नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
द
दुर्गविहारी Wed, 08/02/2017 - 09:16 नवीन
भारतात तर नवरा-बायको हातात हात घालून गेले तरी संस्कृतीरक्षकांना चालत नाही.>> माझे मत फक्त माझ्या अनुभवापुरते सांगितले आहे. सार्वजनिक जागी वावरताना किमान ईतरांनी आक्षेप घ्यावे असे वागु नये हे सांगावे लागते हे खरेच दुर्दैवी आहे. बर मग्न झालंय म्हणजे आयुष्यभर तुम्ही एकमेकांसोबत असणारच आहात ना? हे असले चाळे करणारे बघून मुंबईला नॅशनल पार्कमधे बर्‍याच बलात्काराच्या घटना झाल्या होत्या. त्याचा संदर्भ होता. घटना जुन्या आहेत त्याची लिंक मला सापडली नाही. गडावर चालणार्‍या प्रत्येक आक्षेपार्ह गोष्टींचा मी कडाडून विरोध करतो. या धाग्याशी काही संबध नव्हता म्हणून त्याचा उल्लेख केला नाही ईतकेच. तुमच्या घरात असणार्‍या टि.व्ही. वर काहीही दाखविले जात असेल पण कोणते चॅनेल बघायचे यावर तुमचे नियंत्रण नाही? चॅनेल ब्कॉक करू शकतोच ना? आणि टि.व्ही. वर काहिही दाखविले जाते म्हणून प्रत्यक्षात या घटना मुलांसमोर धरबंद न ठेवता व्हाव्यात असे तुमचे म्हणने आहे काय? बाकी धाग्याचा मुळ उद्देश, स्वताचे न्युड व्हिडीओ केवळ आपला मित्र सांगतोय म्हणून शेअर केल्याने होणार्‍या नुकसानाला त्या मुलीलाच तोंड द्यावे लागते हा असून केवळ एकच वाक्य उचलून त्यावर गदारोळ घालणारे सदस्य बघून कीव आली. मि.पा.वर हा धागा टाकायचा धागाकर्याचा उद्देश केवळ या माध्यमातून या अश्या मुलींपर्यंत हा संदेश पोहचला तर किमान आयुष्यात पुढे होणारे नुकसान टळेल ईतकाच आहे. त्याबध्दल काही चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय
अ
अत्रे Wed, 08/02/2017 - 09:24 नवीन
@दुर्गविहारी गडावर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी नवरा बायकोने - किंवा प्रेमी युगुलाने, हातात हात धरून चाललेले पाहिल्यास तुम्ही विरोध करता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
द
दुर्गविहारी Wed, 08/02/2017 - 14:19 नवीन
एक चार जणांचा ग्रुप होता. दोन मुले व दोन मुली. त्यात एक नवीन लग्न झालेले जोडपे होते. ठिकठीकाणी एकमेकाच्या गळ्यात हात घालून फोटो काढणे चालू होते. सुरवातीला मी दुर्लक्ष केले. मात्र जगदीश्वर परिसरातही हेच चाळे सुरु झाले. मंदिर परिसरात आपण आहोत याची साधी जाणीव त्याना नव्ह्ती. हेच चाळे करायचे होते तर महाबळेश्वर , माथेरान आहेच. ईथे मी आक्षेप घेतला. मग मात्र गड बघायला(?) आलेले हे तथाकथित पर्यटक मागे वळून न बघता परतीच्या वाटेला लागले. जमल्यास सविस्तर वाचायची सवय लावून घ्या. तरिही आपल्या सोयीसाठी माझी प्रतिसाद पुन्हा इथे चिकटवलाय. आपल्याला यात कुठे वाचायला मिळाले कि निव्वळ विवाहीत जोडप्यानी हातात हात घेतला याला मी आक्षेप घेतला. मी सुध्दा सुरवातीला दुर्लक्ष केल परंतु मंदिर परिसराला आणखी काही महत्व आहे, पावित्र्य आहे. तिथेही तुम्ही वागण्यावर नियंत्रण आणत नाही म्हणल्यानंतर सुचना देणे भाग पडले. बरे मी काही गड बघु नका किंवा परत जा असेही सांगितले नव्हते. बर याबध्द्ल ना त्याना खंत ना खेद. ईतके झाल्यानंतर एखाद्याने शांतपणे उरलेली ठिकाणे पाहून परतीची वाट पकडली असती, हे टोळके निर्लज्जासारखे हसत तिथून गेले. यांना टाईमपास करायचा होता. यासाठीच मी लिहीले आहे कि यांनी महाबळेश्वर किंवा माथेरान अश्या ठिकाणी अशी वर्तणूक केली असती तर मला आक्षेप घेण्याचे काहीच कारण नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Wed, 08/02/2017 - 14:50 नवीन
आपल्याला यात कुठे वाचायला मिळाले कि निव्वळ विवाहीत जोडप्यानी हातात हात घेतला याला मी आक्षेप घेतला
मी असे म्हटलेच नाही की तुम्ही हात धरण्याला आक्षेप घेतला! मी फक्त विचारले , विरोध करता का म्हणून (कारण तुम्ही त्या कोटेशन ला वरती उत्तर दिले त्यातून मला कळले नव्हते). इन जनरल प्रश्न होता, त्या विशिष्ट घटनेबद्दल नव्हता. गैरसमज झाला असल्यास क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
श
शब्दबम्बाळ Wed, 08/02/2017 - 09:54 नवीन
आपल्या गडांविषयीच्या भावनांचा आदर आहे पण एक सांगा... इतिहासात कधीच कोणी गडावर स्त्रीचा हात धरला नसेल? इतिहासात कधीच कोणी गडावर एकमेकांना मिठी मारली नसेल? पावित्र्य पावित्र्य जे सांगितलं जाते ते नक्की काय आहे? आणि कोण ठरवत हे पवित्र ते अपवित्र वगैरे? एखाद्या लहान मुलाला कडेवर घेऊन प्रेमाने त्याचे चुंबन घेणारी आई अपवित्र कृत्य करत आहे म्हणाल का? मग एखाद्या युगुलाने प्रेमभावनेने हे कृत्य केले तर ते अपवित्र कसे होते? याला काही विशेष नियम आहेत का? भारतात लोकांना कुठल्याही बागेत अशी कृत्य केलेली चालत नाहीत, गडावर चालत नाहीत, घराबाहेर चालत नाहीत, हॉटेलच्या बंद खोलीत केली तरी पोलीस धाडी टाकून काहीही करू शकतात!(मुंबई मध्येच झालेलं हे!) मग भारतात अशी कुठली जागा राहते हो वयात येणाऱ्या तारुण्यसुलभ भावना असलेल्या मुलांना व्यक्त व्हायला?? का त्यांनी व्यक्त व्हायचाच नाही कारण "आम्हाला" ते अपवित्र वाटते किंवा आक्षेप घेण्यासारखे वाटते?! कधीपासून असे वाटू लागले भारतात? काही इतिहास वगैरे आहे का याला? उद्या एखाद्या गटाला मुलाने मुलीशी बोलणे देखील आक्षेपार्ह वाटू लागले कि "फटके" द्यायचे का असे करणार्यांना? आणि मी म्हणेन कि मग असे आक्षेप असणार्यांनीच पुढाकार घेऊन अशी उद्याने बनवावीत जेथे फक्त तरुण जाऊ शकतील मग! म्हणजे त्यांना बाकी कुठे जायला लागायचे नाही! आणि एक चहावाला जर भारताचा पंतप्रधान होऊ शकतो तर आज "लायकी" नसणारा मुलगा/मुलगी उद्या काहीतरी करून दाखवणारच नाही असे का वाटावे? त्यांना उभे राहण्यास पाठबळ द्यावे उलट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
द
दुर्गविहारी Wed, 08/02/2017 - 14:51 नवीन
तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे. तुमच्याच कुठल्या वाक्याचा संदर्भ कशालाच लागत नाही. इतिहासात कधीच कोणी गडावर एकमेकांना मिठी मारली नसेल? पावित्र्य पावित्र्य जे सांगितलं जाते ते नक्की काय आहे? आणि कोण ठरवत हे पवित्र ते अपवित्र वगैरे? एखाद्या लहान मुलाला कडेवर घेऊन प्रेमाने त्याचे चुंबन घेणारी आई अपवित्र कृत्य करत आहे म्हणाल का? मग एखाद्या युगुलाने प्रेमभावनेने हे कृत्य केले तर ते अपवित्र कसे होते? याला काही विशेष नियम आहेत का? ईतिहासाचे उदाहरण घ्यायचे असेल तर बाजीराव मस्तानीचे आहेच. पण त्यांनी कुठल्या गड किल्ल्यावर मिठ्या मारुन बसल्याचा अस्सल पुरावा आपल्यापाशी आहे का? उलट पुणे-सासवड रस्त्यावर दिवे घाटाजवळ बाजीरावने मस्तानीसाठी "मस्तानी तलावाची" उभारणी केली, तिथे ते निसर्गाचा आनंद लुटत. बाकी पावित्र्य , आईच्या कडेवरचे मुल असल्या कश्याचा कश्याशी संबध नसणार्‍या गोष्टींच्या व्याख्या आपणच करा आणि मग मला सांगा. भारतात लोकांना कुठल्याही बागेत अशी कृत्य केलेली चालत नाहीत, गडावर चालत नाहीत, घराबाहेर चालत नाहीत, हॉटेलच्या बंद खोलीत केली तरी पोलीस धाडी टाकून काहीही करू शकतात!(मुंबई मध्येच झालेलं हे!) मग भारतात अशी कुठली जागा राहते हो वयात येणाऱ्या तारुण्यसुलभ भावना असलेल्या मुलांना व्यक्त व्हायला?? का त्यांनी व्यक्त व्हायचाच नाही कारण "आम्हाला" ते अपवित्र वाटते किंवा आक्षेप घेण्यासारखे वाटते?! कधीपासून असे वाटू लागले भारतात? काही इतिहास वगैरे आहे का याला? केवळ शांतपणे गप्पा मारणार्‍या युगुलाला त्रास दिल्य्याची घटना तुम्ही सांगु शकाल? उगाच जाहीरपणे चुंबाचुंबी सुरु केली कि आक्षेप येणारच. गडावर काय किंवा बागेत काय किंवा ईतरत्र काय, भारतात निदान मोकळेपणावर बोलण्याला काही बंधन नाही. तुम्ही ईतरांना आक्षेपार्ह वाटेल असे वर्तन केले तर ते पाँईट आउट केले जाणार. बंद खोलीत धाडी पड्ल्या म्हणताय, असे त्या बंद खोलीत काय घडतय जे कायद्याच्या रक्षकांना आक्षेपार्ह वाटतय? नक्कीच काहीतरी चुकीचे होत असणार म्हणूनच धाडी पडणार ना. तुम्हाला घर असताना लॉजमधे काय करताय? बरे हे लॉजही ठराविकच असतात. तिथे तुम्ही काय करताय हा प्रश्न पोलिसानी विचारू नये काय? उद्या एखाद्या गटाला मुलाने मुलीशी बोलणे देखील आक्षेपार्ह वाटू लागले कि "फटके" द्यायचे का असे करणार्यांना? हा दिव्य शोध आपणच लावलाय, मी नाही. आजअखेर तीनशे ट्रेक केले असतील आणि बर्‍याच ट्रेकमधे मुली सोबत होत्या. उलट त्याना गडावर काही त्रास होउ नये याचीच आम्ही काळजी घेतली आणि हो त्यात काही प्रेम असलेल्या जोड्याही होत्या.पण पुर्ण ट्रेकमधे कोणी मिठ्या मारून फोटो काढलेत किंवा ईतर काही चाळे केलेत असे कधीही झाले नाही. आपण जातोय ती विरभुमी आहे आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हि भावना कायम मनात असायची. आणि मी म्हणेन कि मग असे आक्षेप असणार्यांनीच पुढाकार घेऊन अशी उद्याने बनवावीत जेथे फक्त तरुण जाऊ शकतील मग! म्हणजे त्यांना बाकी कुठे जायला लागायचे नाही! खुशाल बनवा. असल्या पीडा जिथे जातील तिथे बघायला लागणार नाही. काय तो कचरा एकाच जागी राहिल. आणि एक चहावाला जर भारताचा पंतप्रधान होऊ शकतो तर आज "लायकी" नसणारा मुलगा/मुलगी उद्या काहीतरी करून दाखवणारच नाही असे का वाटावे? त्यांना उभे राहण्यास पाठबळ द्यावे उलट! नक्कीच कतृत्ववान निघतील. पण त्यानी आपले कतृत्व आपल्या क्षेत्रात दाखवावे, जाहीर चाळे करण्यात नाही. बाकी यानंतरचे उप प्रतिसाद थोडे विचारपुर्वक लिहाल आशी आशा करतो, अन्यथा त्यांना फाट्यावर मारण्यत तेईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ Wed, 08/02/2017 - 17:21 नवीन
इतकं पण काही अवघड नव्हतं... आता तुम्ही हे किल्ल्यांचं/मंदिरांचं पावित्र्य म्हणता ते नेमके काय म्हणायचे? आता भारताच्या दक्षिणेकडे मंदिराच्या भिंतीवर कसल्या कसल्या मुर्त्या असतात. सगळे पाहतात ते... पण ते मंदिर पवित्र राहत का मग? हा देखील आपलाच इतिहास आहे ना? मग अचानक मिठी मारणे किंवा चुंबन घेणे या गोष्टी "आपत्तीजनक"/हिडीस वगैरे कधीपासून समजल्या जाऊ लागल्या याची काही माहिती आहे का आपल्याकडे? नाही म्हणजे अशा युगुलांना दम देणारे/मारहाण करणारे जणू आम्ही आमचा इतिहास वाचवतोय अशा थाटात असतात! नक्की कुठल्या कालखंडापासून कुठल्या कालखंडापर्यंतचा इतिहास हे देखील सांगावे मग... का केवळ "काही" लोकांना वाटत हे वाईट्ट आहे म्हणून ते "आपत्तीजनक" मानायचे सगळ्यांनीच? या गोष्टीला काहीच कारण/इतिहास नसेल तर मग काय खात्री कि उद्या या लोकांना मुलं-मुली एकत्र फिरण्यावर पण आक्षेप यायचा नाही? आणि ते उदाहरण म्हणाल तर, सार्वजनिक ठिकाणी आई तिच्या मुलाचा प्रेमाने पापा घेत असेल तरी पण संस्कृतीरक्षक जाऊन सांगतात का कि आम्हाला आक्षेप आहे या कृतीवर? नसतील तर असे का बरे? आक्षेप कृतीवर आहे ना? का फक्त मुलं-मुलींनी असे केले कि धरणी दुभंगते वगैरे...
पण पुर्ण ट्रेकमधे कोणी मिठ्या मारून फोटो काढलेत किंवा ईतर काही चाळे केलेत असे कधीही झाले नाही. आपण जातोय ती विरभुमी आहे
नाही म्हणजे मिठी मारण्यावर तुम्हाला काय आक्षेप आहे हे माझ्या आकलन क्षमतेच्या पलीकडे आहे!! गड-किल्ले वीरभूमी आहे ठीक पण तिथे लोक राहातच नव्हतेच का? स्त्री पुरुष एकत्र राहायचे नाहीतच का? कधी कुठले मुलं जन्माला आलेच नाही का? (हे बंद खोलीत झाले असेल असे म्हणालात तर तो मुद्दा खाली आहे) मग नक्की असे कोणते दिव्यत्व त्यांना आत्ता प्राप्त झालाय? का हे दिव्यत्व काही लोकांच्या विचारात आहे आणि आम्हाला किल्ल्यांकडे "अशाच" दृष्टीने बघायचंय म्हणून बाकीच्यांनी पण तसेच वागलं पाहिजे असे अलिखित नियम हवेत! कुठल्याही गोष्टीच अवडंबर वाईटच... मारली मिठी कोणीतरी समजा तर असा कोणता बुरुज कोसळणार आहे? वरच्या प्रतिसादात बंद खोलीत करा काय करायचंय असे म्हणणारे तुम्ही आता म्हणता घर सोडून बाहेर का जायचं असत?!
तुम्हाला घर असताना लॉजमधे काय करताय?
कहर आहे राव!! कोणी कुठं जायचं हे ते ज्यांना जायचंय ते ठरवतील! बाकीचे नाक खुपसणारे कोण? ते कायद्याचे रक्षक यांनी जे दिव्य काम केलं होत हॉटेलच्या बंद खोल्या उघडून युगुलांना सतावून त्यावर हाय कोर्टाने फटकारलंय बर का "त्या रक्षकांनाही" ILLEGAL, INTRUSIVE, UNCONSTITUTIONAL: HIGH COURT ON MADH MORAL POLICING वाचा ही बातमी, जो कायदा वापरून (Section 110 ) पोलिसांनी असली कारवाई केली होती तो वापरण्यावर बंदी आणली गेलीये! आणि समिती नेमण्यात आली होती पोलिसांवर कारवाई साठी... न्यायालयाने स्वतःहून युगुलांना फटके देणाऱ्यांना दिलेल्या फटाक्यांच्या दुप्पट फटके देण्याचा कायदा केला तर बाकीचे "रक्षक"पण शांत होतील. त्यामुळे "नक्कीच काहीतरी चुकीचे होत असणार म्हणूनच धाडी पडणार ना." या वाक्याला काहीही अर्थ नाही! ही एकंदरीत मानसिकता आहे, जी स्वतःच्या संकुचित विचारांमुळे इतरांना कसे वागायचे हे शिकवत असते! जी माहिती मी वाचली आहे त्यानुसार Section 294 जो आक्षेपार्ह कृतींसाठी आहे त्यात चुंबन अथवा मिठी यांचा स्पष्ट उल्लेख नाहीये पण संदिग्धतेमुळे तो कसाही वापरला जाऊ शकतो! भविष्यात त्यावर देखील कारवाई होईल अशी अपेक्षा आहे! तज्ज्ञांनी भर घालावी...
खुशाल बनवा. असल्या पीडा जिथे जातील तिथे बघायला लागणार नाही. काय तो कचरा एकाच जागी राहिल.
जास्त काही नाही यावर बोलायला पण घराबाहेर मिठी मारणारे अथवा चुंबन घेणारे "कचरा" असतात हि नवी माहिती मिळाली! पण मी म्हणतो अशा लोकांची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावायला मग "रक्षकांनीच" पुढाकार घ्यावा मग! कारण आपत्ती त्यांनाच आहे... बाकी पुढचा प्रतिसाद देण्याआधी विचार कराल अशी अपेक्षा आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
र
राही गुरुवार, 08/03/2017 - 12:18 नवीन
मलाही प्रत्येक ठिकाणी पावित्र्याचा जयघोष करणे फारसे पटत नाही. स्वच्छता राखा, शांतता राखा हे योग्यच आहे. पण गडावर अमुक खाऊ नका, तमुक खाऊ नका हे काय आहे? गडकिल्ले जेव्हा जितेजागते होते तेव्हा काय तिथे कोंबडे-बकरे कापले गेले नसतील? जिथे अजूनही वसती आहे तिथे काय होत असेल? तिथे काय मुले जन्माला आल्यामुळे पावित्र्यभंग होत असेल? आलिंगन, चुंबन, हातात हात घेणे या अगदी साध्या गोष्टी आहेत. त्यापुढच्या गोष्टी चारचौघात कोणी करीत नाही. केले तर ते निखालस अयोग्य आहे. पण ते सार्वजनिक सभ्यता राखली जावी म्हणून. पावित्र्यभंग होतो म्हणून नव्हे. काही शहरांमध्ये एखादे स्थान तीर्थ/क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असते. पण ते संपूर्ण शहरच 'पवित्र क्षेत्र' घोषित करून खाण्यापिण्याचे नियम जारी करण्याने काय साधते? उद्या अख्खे नाशिक शहर 'पवित्र क्षेत्र' बनले तर काय होईल? मुख्य प्रश्न स्वच्छता, शांतता आणि सुव्यवस्थेचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 08/03/2017 - 13:22 नवीन
मुळात हे पावित्र्य, गडावर मांसाहार करु नये वगैरे गोष्टी, आजकालच्या इंटरनेटछाप स्वंयघोषीत ट्रेकर्स(?) लोकांच्या डोक्यातली उपज आहे. बाकी जेंव्हा गड वापरात होते, शिवकाळातच नव्हे तर संस्थाने खालसा होईपर्यंत गडावर मांसाहार, मद्यपान वगैरे गोष्टी सर्रास होत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 08/04/2017 - 08:00 नवीन
काय आहे- तिथे राहून कर्तव्य बजावताना शिवकाळातील लोकांनी केलेल्या गोष्टी आणि चैन म्हणून गडावर जाऊन केलेल्या दारूपार्ट्या यातला फरक समजावून घेणे गरजेचे वाटत नाही का? शिवकाळातील लोकांनी केलेल्या पराक्रमाच्या खुणा म्हणून आपण गड-किल्यांकडे बघतो. पावित्र्य वगैरे सोडा, पण आदर तर असेलच ना? आपल्या घरातल्या मोठ्या लोकांबद्दल आदर असतो म्हणून आपण आपल्या घरात दारूपार्ट्या मांडून नाही बसत, मग जी आदराची स्थळे, ठिकाणे आहेत तिथे हाच न्याय का लावता येऊ नये? गडावरील त्याकाळातील लोक मलविसर्जन करीतच होते ना म्हणून आज गडावर हागणदारी करणे योग्य होईल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
प
प्रसाद_१९८२ Fri, 08/04/2017 - 09:16 नवीन
गडावरील त्याकाळातील लोक मलविसर्जन करीतच होते ना म्हणून आज गडावर हागणदारी करणे योग्य होईल काय? == खालील लेख बघा, मग कळेल सुट्ट्यांच्या दिवसात, हे तथाकथित ट्रेकर्स किल्ल्यांची काय अवस्था करतात ते. https://www.maayboli.com/node/39036
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
A
arunjoshi123 Fri, 08/04/2017 - 09:23 नवीन
हे वाईट आहे ना? तेच तर म्हणायचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 08/04/2017 - 12:20 नवीन
एक्झॅक्ट्ली! ट्रेकर वि. प्रेमी युगुल हा मुद्दाच नाहीये इथे! ट्रेकर आहेत म्हणून त्यांनी घाण करावी असा मुद्दाही दुर्गविहारींनी मांडलेला दिसत नाही. मुद्दा साधा आहे ज्यांना ह्या गोष्टींची जाणीव नाहीये त्यांना जाणीव करून द्यावीच लागते. प्रत्येक वेळेला ती फक्त हिंसेने किंवा फक्त अहिंसेनेच करता येईल असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
द
दुर्गविहारी Sat, 08/05/2017 - 17:14 नवीन
कृपया आपण मजकुर पुर्ण वाचायची सवय लावून घ्या म्हणजे अश्या असंबध्द प्रतिसाद येणार नाहीत. आणि जमल्यास थोडा आभ्यास वाढवा म्हणजे वर आपण जसे प्रतिसाद दिलेत तसे पुन्हा होणार नाहीत. आता तुम्ही ट्रेकर देखील घाण करतात ह्या अर्थाची लिंक दिलेली आहे. हि लिंक तुम्ही पुर्ण प्रतिसादासहीत वाचली तरी आहे का? हे पहिलेच वाक्य घ्या. " तिनेक दिवसांची जोडून सुट्टी आली की हौशा- नवशा- गवशा तथाकथित ट्रेकर्स लोकांची धिंगाणा घालायला काही हॉटट्ट" वर मी बोल्ड केलेल्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला असेल. तथाकथीत याचा अर्थ नीट माहिती आणि किमान शिस्त न पाळता आलेले ट्रेकर (याना ट्रेकर म्हणणेही अयोग्यच होईल). ह्या हौशी लोकांनी शिस्त पाळली नाही म्हणून हा धागा काढला आहे. एकदा सगळा धागा पुर्ण वाचा आणि मग अश्या लिंक द्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
उ
उपेक्षित Wed, 08/02/2017 - 17:26 नवीन
@ दुर्गविहारी .... वरती शब्दबंबाळ यांनी तुमच्या विषयी सुरवातीलाच आदर व्यक्त करून प्रतिसाद दिला होता मग उगाच त्यांना फाट्यावर मारण्यात येईल वगेरे म्हणून हिणवण्याचा उद्देश कळला नाही कुणाला. कसय तुमच्या कामाविषयी तुम्हाला असेल कौतुक आणि तुम्ही ३०० ट्रेक केले का ३००० केले याच्या शी इथल्या कुणाला काही घेणे देणे नाही पण किमान समोरचा तुमचा आदर करून प्रतिसाद देत असेल तर त्याचा आदर करा , ३०० ट्रेक करून महाराजांचा हा गुण घेता आला नसेल तर मग कठीण आहे. आपला (जश्यास तसे उत्तर देणारा) उपेक्षित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
उ
उपेक्षित Wed, 08/02/2017 - 17:19 नवीन
अतिशय समर्पक प्रतिसाद सायबाणु, पटले आपल्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
उ
उपेक्षित Wed, 08/02/2017 - 17:20 नवीन
शब्दबंबाळ यांना मागचा प्रतिसाद होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
उ
उपयोजक Wed, 08/02/2017 - 12:19 नवीन
केवळ एकच वाक्य उचलून त्यावर गदारोळ घालणारे सदस्य बघून कीव आली. मला तर सांगून सांगून कंटाळा आलाय. किव येण्यापुढचं काही असेल तर तेही आलंय!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 12:37 नवीन
अहो, गदारोळ नक्की कशाबद्दल चाललाय हे तुमचाच धागा असून तुम्हालाच माहित नाही. त्या कथेत अंततः त्या मुलीचं वाईट झालं आहे हा जो तुमचा प्रत्यक्ष अनुभव, माहिती इ इ आहे ती खरी नसून ती अत्यंत सुखात आहे आणि तुमचं तिच्या परिस्थितीबाबतचं अवलोकन चूक आहे असा प्रकार आहे. कळलं का? लोकांनी कितीतरी प्रतिसादांत लिहिलं आहे - "ती गरीब आहे, सुखात आहे, फक्त तिला घरच्यांची आठवण येत आहे, नवर्‍यासोबत सुखी आहे, (कदाचित) आईबापाला घातलेल्या शिव्यांचा पश्चात्त्ताप आहे." पण मुलगा मनातनं उतरला वा त्याच्यासोबत पळ्याल्याचा पश्चात्ताप इ इ आहे असं कुठं नाहीच. तसं उदारमतवादी लोकांना "त्या मारण्याचा" विसर पडला असता, पण जर तो मुलगा एक कुचकामी आणि पश्चात्ताप देणारा निर्णय असता तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
व
विशुमित Wed, 08/02/2017 - 13:08 नवीन
ज्या मुली सधन घरात जातात त्या सुखीच असतात हा निकर्ष कशावरून काढला आहे लेखक महाशयांनी? मुलीने घेतलेला निर्णय आततायीपणाचा का असेना पण तो सार्थ ठरवण्यासाठी तिने अपार आत्मविश्वास आपल्या नवऱ्यामध्ये निर्माण करायला पाहिजे. ते करायचं सोडून मारझोड करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कचाट्यात सापडण्याची आणि मुलीची आणखी बदनामी होण्याची जास्त शक्यता आहे. हे जे काही मी लिहीत आहे ते सुद्धा माझ्या प्रत्येक्ष अनुभवातून केलेली गोळाबेरीज आहे. (प्रत्येक्षात घेतलेला अनुभव नंतर शेर करतो) तुम्ही स्वतःच्या १० वर्षाच्या मुलांबाबत दिलेल्या उदाहरणात त्याने मोबाईल खेळणे नाही सोडले त्याला काय तुम्ही डांबून चाबकाचे फटके देणार का ? मुलांचा पालकांवर विश्वास हवा आणि पालकांचा सुद्धा मुलांवर आदरयुक्त दरारा हवा तर अशा गोष्टी ना आळा बसू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 13:18 नवीन
तुम्ही स्वतःच्या १० वर्षाच्या मुलांबाबत दिलेल्या उदाहरणात त्याने मोबाईल खेळणे नाही सोडले त्याला काय तुम्ही डांबून चाबकाचे फटके देणार का ?
अजिबात नाही. उदारमतवादी लोकांचा एक दरारा आहे आणि ते समोर नसले तरी पाहत आहेत या भितीपोटी मी हातही लावत नाही. (मराठी जालाचा सुपरिणाम!!) ==========================
मुलांचा पालकांवर विश्वास हवा आणि पालकांचा सुद्धा मुलांवर आदरयुक्त दरारा हवा तर अशा गोष्टी ना आळा बसू शकेल.
हवा मंजे काय? समजा ६०% केसेस मधे आहे? उरलेल्या ४०% काय बोंबलत बसायचं? "द ओन्ली सोल्यूशन ऑफ डीस्प्यूट रिझोल्यूशन इज अमिकेबल सेटलमेंट" हा काय सिद्धांत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
वरुण मोहिते Tue, 08/01/2017 - 15:03 नवीन
किल्ल्यांवरच्या भावनांना बाजूला काढून देत आहे लक्षात घ्या . ग्रामीण महाराष्ट्रात मुळात मुलींच्या भावनांना वाट मिळतच नाही . अगदी मुले पण घाबरतात फिरायला तर मुलींची काय कथा . हे वातावरण बदलून पहा पुढील १० वर्षात किती फरक पडेल . मैत्री ,प्रेम ह्या स्वाभाविक भावना आहेत. त्या दाबून ठेवल्याने अचानक अश्या गोष्टी घडतात . दुसरी गोष्ट कोणालाही अश्या वेळी बाजूला बसलेत काय करत असतील तरी जबरदस्ती खचितच नव्हती . अश्या वेळी मारहाण करून कोणाच्या मनावर काय परिणाम होतो ह्याचा विचार करावा . काही गोष्टी झाल्यात असतील ना मारहाणी च्या आधी हे आपले उत्तर सोयीस्कर आहे . तिसरी गोष्ट प्रत्येकवेळी माथेरान ,महाबळेश्वर ला जाण्याइतके पैसे सगळ्यांकडे असतील असं नाही . ह्याचा अर्थ काहीही करा बाहेर असे नाही पण मॉरल पोलिसिंग थांबवा . हिम्मत असेल तर पावसाळी ठिकाणी सार्वजनिक दारू पिणार्यांना धुमाकूळ घालणाऱ्या फाटकावून काढा . गुरासारखे मारा . पोलीस केस झाली तरी मी मदत कारेन नक्की .
  • Log in or register to post comments
उ
उदय Tue, 08/01/2017 - 17:10 नवीन
प्रेमभंग झाला म्हणून मुलीच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याचा प्रकार, हे एक टोक आणि तसेच मुलाला मारहाण करणे, हे दुसरे टोक. दोन्हीही बरोबर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
द
दुर्गविहारी Wed, 08/02/2017 - 09:29 नवीन
या घटने पुरते बोलायचे तर जसे रोपवे चे पैसे घालून आडवळणाच्या रायगडावर या जोडप्याना येणे जमते, तसे सर्व दर्जाच्या आणि प्रकरच्या सोयी सुविधा असलेल्या माथेरान, महाबळेश्व्र अश्या ठिकाणी जाणे जमणार नाही असे आपल्याला वाटते. पैशाच्या प्रश्न नक्कीच नसवा. आणि या घटनेत मी मारहाण करायचा प्रश्नच आला नाही, फक्त त्यांना समजेल अश्या भाषेत सांगितल्याबरोबर त्यांनी काढता पाय घेतला. मुळात काही पहावे असा त्यांचा उद्देश नव्ह्ताच, फक्त एकांताचा गैरकायदा घेण्याची वॄत्ती दिसली. बाकी यांच्या पेक्षा जास्त चीड दारू पिणार्‍या मंडळींची येती. हे एका दिवसात घाण करुन जातात आणि पुढच्या आठवड्या भराचे गड साफ करायचा कामाचा डोंगर निर्माण होतो. या लोकांची धुलाई बर्याचदा स्थानिक लोकांकडून झाल्याची उदाहरणे मी सांगु शकतो, पण परत धागा भरकटेल. आणि वातावरण बदलायचे म्हणजे काय करायचे?असाच या प्रेमी युगुलांचा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे नावे लिहून ठेवणे. समजावून सांगुनही आपलाच ठेका चालू ठेवला कि मग समजणार्‍या भाषेतच सांगावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
A
arunjoshi123 Wed, 08/02/2017 - 12:39 नवीन
ग्रामीण महाराष्ट्रात मुळात मुलींच्या भावनांना वाट मिळतच नाही .
म्हणजे नक्की काय काय होतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
श
शलभ Tue, 08/01/2017 - 15:19 नवीन
अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात.
मारहाणीचे अनुभव त्यांच्या एका ग्रुपमधील सदस्याचे आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 08/01/2017 - 15:26 नवीन
हम्म. साॅरी बर का केअशू साहेब. मी तुम्ही पण मारहाण करणार्या ग्रुप मधे होता असे समजल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
उ
उपयोजक Tue, 08/01/2017 - 16:13 नवीन
धन्स अवलिया साहेब.मी दोन प्रसंग दिलेत पण सगळ्यांची चर्चा फक्त दुसर्‍या प्रसंगावरच का? मारहाण करणं अयोग्य आहे.शिक्षा होऊ शकते हे माहित नसेलअसं वाटतंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
प
परिंदा Tue, 08/01/2017 - 15:52 नवीन
केअशु, तुम्हाला आणि तुमच्या मित्राला धन्यवाद.... त्या मुलीचा आणि तिच्या नवर्‍याचा "सैराट" न केल्याबद्दल!!
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 08/01/2017 - 16:23 नवीन
सैराटचं उदाहरण चुकलंय. परशासारखा गरीब पण गुणवान पोरगा असता तर चाललंही असतं.पण इथे मुलगा उनाड,भंपक आहे. हा फरक लक्षात घेतलात तर बरं होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा
अ
अकिलिज Tue, 08/01/2017 - 17:32 नवीन
त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अर्धवट शिक्षण. आणि मुलीचे वडील मातब्बर, भाऊ सॉफ्टवेअर मध्ये, मोठी बहीण पण जॉबला... परिस्थिती ने तर जहागिरदार.. आता तुमच्या मते मातब्बर, जहागिरदार म्हणजे मुलगीचा तुम्हाला पुळका आणि मुलगा उनाड, भंपक कसा काय ते सांगा. आणि एक लक्षात घ्या. तिचा निर्णय तिने घेतलाय. फळे चाखूदे. तिला आवडला. मग भले तो कसाही का असेना. तुमची नक्की ईच्छा काय आहे ? तुमच्या आवडीच्या मुलाशी तिने संसार थाटायला हवा होता कां?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा