Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग २०

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/25/2018 - 18:08
🗣 217 प्रतिसाद
आजतक व एबीपी न्यूज या दोन वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या नवीन मतदार सर्वेक्षणाचे अंदाज आज जाहीर केले. १) आजतक - कार्वी सर्वेक्षण हे सर्वेक्षण ३० डिसेंबर २०१७ ते १० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ४०% मतांसहीत एकूण ३०९ जागा मिळतील तर संपुआला २७% मतांसहीत एकूण १०२ जागा मिळतील. या सर्वेक्षणात शिवसेना रालोआत आहे असे गृहित धरलेले आहे व संजदचा देखील रालोआत समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे. जर संपुआत तॄणमूल काँग्रेस, सप व बसप सामील झाले तर संपुआच्या मतांची टक्केवारी ३८% पर्यंत जाऊन एकूण जागा २०२ मिळू शकतील, तर या परिस्थितीत रालोआला २५८ जागा मिळू शकतील. म्हणजे रालोआ वजा शिवसेना आणि संपुआ अधिक तृणमूल अधिक सप अधिक बसप अशी निवडणुक झाली तर संपुआ रालोआपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल. https://www.indiatoday.in/india/story/india-today-mood-of-the-nation-poll-is-narendra-modi-still-india-s-first-choice-as-pm-1154288-2018-01-25 २) एबीपी न्यूज - सीएसडीएस सर्वेक्षण हे सर्वेक्षण ७ जानेवारी २०१८ ते २० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ३४% मतांसहीत एकूण ३०१ जागा मिळतील तर संपुआला २५% मतांसहीत एकूण १२७ जागा मिळतील. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे. http://www.abplive.in/india-news/nda-to-win-293-309-seats-if-general-elections-were-held-today-abp-news-csds-survey-639813-639813?rs_type=internal&rs_origin=section&rs_medium=article&rs_index=4

प्रतिक्रिया द्या
43001 वाचन

💬 प्रतिसाद (217)
क
कपिलमुनी गुरुवार, 01/25/2018 - 19:46 नवीन
म्हैसूर येथे पाठविण्यात येणारे जैन कंपनीच्या ३९ ठिबक नळ्यांच्या बंडलपैकी ७० हजार ९७७ रुपये किंमतीचे १५ ठिबक बंडल अज्ञात चोरट्यांनी सुरत रेल्वे लाईनवरील धक्क्यावरून चोरून नेले आहे. ही घटना २२ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी बुधवारी (दि. २४) कंपनीचे सिक्युरिटी सुपरवायझर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 01/25/2018 - 19:48 नवीन
पौड जवळ रावडे गावाच्या हद्दीतील डोंगरामध्ये सुमारे 20 ते 25 मोर, लांडोर आणि काही रानकोंबड्यांचा मृत्युमुखी झालेल्या अवस्थेत आढळल्या. या घटनेमुळे परिसरातील डोंगरभागात मोठी दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान तीन ते चार दिवसापूर्वी विषबाधेमुळे या पक्षांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज गावातील नागरिकांनी व्यक्त केला आहे
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 01/25/2018 - 19:49 नवीन
हळदीकुंकू समारंभ व पालक सभा म. न.पा शाळा क्र ५३ मुलांची मुंढवा या शाळेतील इ २ री च्या वर्गात हळदीकुंकू समारंभाच्या निमिताने माता पालक सभा घेतली गेली या सभेत पालकांनी वर्गातील मुलांचे वाचन घेतले यामुळे पालकांना आपल्या मुलांची प्रगती प्रत्यक्ष पाहता आली
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 01/25/2018 - 19:55 नवीन
पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. हे 21 वे पुष्प प्रदर्शन असून ते 25 ते 28 जानेवारी या कालावधी नागरिकांना पाहण्यासाठी खुले आहे. अशी माहिती एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनचे मानद सचिव सुरेश पिंगळे यांनी दिली. या पुष्प प्रदर्शनात केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या, कुंड्यांची आकर्षक मांडणी. मनमोहक फुलांची मांडणी, पाने, फुले वापरून तयार केलेल्या विविध पुष्परचना आणि विविद प्रकारचे प्रदर्षणीय स्टॉलचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे. याप्रदर्शनाला पुष्पप्रेमींनी हजेरी लावत पहिल्याच दिवशी भरपूर प्रतिसाद दिला. यावेळी एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनचे मानद सचिव सुरेश पिंगळे, संस्थेच्या समन्वयक अनुपमा बर्वे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 01/26/2018 - 03:43 नवीन
आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दहा आसियान देशांमधील प्रत्येकी एकाला पद्मश्री देण्यात आली आहे.क्रिकेट खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि बिलिअर्ड खेळाडू पंकज अडवाणी यांना पद्मभूषण देण्यात आले आहे. पद्मश्री विजेत्यांमध्ये डॉ. अभय आणि राणी बंग तसेच गंगाधर पानतावणे यांचा समावेश आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 01/26/2018 - 03:58 नवीन
राजस्थानातील पोटनिवडणुकांमध्ये करणी सेना आणि इतर राजपूत संघटना काँग्रेसला समर्थन देणार. पद्मावत चित्रपटप्रकरणी राज्य सरकारच्या 'दुर्लक्षामुळे' हा निर्णय घेतला गेला असे खाली दिलेल्या बातमीत म्हटले आहे . आणि राजपूत समाजाला आरक्षणाची मागणी आहेच. म्हणजे हा सगळा प्रकार कोणी स्पॉन्सर केला होता हे वेगळे सांगायला पाहिजे का? काँग्रेस, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट, सगळे पुरोगामी विचारवंत ही देशाला लागलेली मोठी किड आहे. http://www.financialexpress.com/india-news/padmavati-fallout-karani-sena-other-rajput-groups-support-congress-to-avenge-humiliation-by-bjp-in-rajasthan-bypolls/1016304/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/26/2018 - 06:30 नवीन
>>> काँग्रेस, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट, सगळे पुरोगामी विचारवंत ही देशाला लागलेली मोठी किड आहे. + २० लाख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
विशुमित Sat, 01/27/2018 - 07:09 नवीन
मग भाजप शासित काही राज्य सरकारांनी देखील या चित्रपटावर बंदी का घातली असावी? मतलब सब मिले हुए है. काँग्रेस, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट, सगळे पुरोगामी विचारवंत ही देशाला लागलेली मोठी किड आहे.'' हि जरा अतिशयोक्ती वाटते. फक्त भाजप म्हणजे देश नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 01/26/2018 - 04:39 नवीन
आज मुंबईत संविधान बचाओ रॅली आहे म्हणे. त्यात सामील होणार्‍यांच्या यादीत एक नाव आहे सीताराम येचुरी. म्हणजे यांच्या पक्षाचे सरकार केरळमध्ये ध्वजवंदनाला बंदी घालणार आणि हे इकडे मुंबईत संविधान बचाओ रॅलीमध्ये सामील होणार. काय मंडळी आहे की नाही पुरोगामी सेक्युलर लॉजिक? २०१९ च्या निवडणुका जवळ आल्याचे जाणवतेय की नाही?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 01/26/2018 - 14:03 नवीन
शाळेत झेंडावंदन शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती किंवा तिथले लोकप्रतिनिधीनी करावे, असा संकेत ( की नियम ) आहे.. श्री भागवत यापैकी नेमके कोण आहेत ? त्यांच्या स्वतःच्या शाखा देशभर असताना तिथे न करता हे नेहमी दुसरीकडे जाऊन धवजवंदन का करतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ड
डँबिस००७ Sat, 01/27/2018 - 06:25 नवीन
काँग्रेस, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट, सगळे पुरोगामी विचारवंत ही देशाला लागलेली मोठी किड आहे. प्रचंड सहमत !!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/27/2018 - 10:58 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/aap-potrait-tipu-sultan-in-delhi-assembly-bjp-called-its-controversial-1622540/ दिल्ली विधानसभेत ७० स्वातंत्र्यसैनिकांची चित्रे लावण्यात येत आहेत. त्यात टिपू सुलतानच्या चित्राचाही समावेश आहे. टिपू कधीपासून स्वातंत्र्यसैनिक झाला? टिपूची प्रतिमा अत्यंत क्रूर व धर्माध मुस्लिम अशी असून त्याने हजारो हिंदूची कत्तल करून अनेकांचे जबरदस्तीने धर्मांतर केले होते. असा नराधम, केजरीवालसारख्या नालायकांना वंदनीय असावा, यात नवल नाही. कर्नाटकमध्येदेखील टिपूचे उदात्तीकरण सुरू आहे. तिथे टिपू जयंती वगैरे साजरी केली जाते. एकंदरीत टिपू हा निधर्मांधांचा नवीन पोस्टर बॉय आहे. आगामी काळात अफझल गुरू, याकूब मेमन, कसाब इ. अतिरेकी देखील यांना वंदनीय होतील व त्यांचे पुतळे उभारून त्यांची जयंती साजरी केली जाईल यात तिळमात्र शंका नाही.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 01/27/2018 - 13:13 नवीन
१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वातंत्र्य सैनिकांचे नाव सांगा, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान दिले अशा संघाच्या नेत्यांची नावे सांगा असे आम्ही भाजपला म्हटले होते. मात्र भाजपने यावर काहीही उत्तर दिले नाही. २. संविधानाच्या १४४ व्या पानावरही टिपू सुलतानचे चित्र आहे. मग दिल्ली विधानसभेत टिपू सुलतानचे चित्र लावण्यात आले तर त्यात गैर काय? हे प्रतिसादमधून का टाळले? बाकी संविधानाच्या १४४ व्या पानावरही टिपू सुलतानचे चित्र कोणी टाकले आहे, कोणाला काही माहिती आहे का? (मी १४४ पण पाहून खात्री केलेली नाही हे नमूद करू इच्छितो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 01/27/2018 - 15:08 नवीन
>>> १. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वातंत्र्य सैनिकांचे नाव सांगा, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान दिले अशा संघाच्या नेत्यांची नावे सांगा असे आम्ही भाजपला म्हटले होते. मात्र भाजपने यावर काहीही उत्तर दिले नाही. अत्यंत हास्यास्पद बचाव आहे. या दोन गोष्टींचा संबंधच नाही. तसेच टिप्याचा दिल्लीशी कणभरही संबंध नाही. दिल्लीबाहेरील कोणी हवा होता तर या नरराक्शसापेक्शा इंग्रजांविरूद्ध लढलेला दुसरा बाजीराव होताच की. देशात असंख्य स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. ते सोडून यांना नेमका हा नराधमच कसा सापडला? ट्रुमनने बरोबर लिहिलं आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट, सगळे पुरोगामी विचारवंत ही देशाला लागलेली मोठी कीड आहे. >>> २. संविधानाच्या १४४ व्या पानावरही टिपू सुलतानचे चित्र आहे. मग दिल्ली विधानसभेत टिपू सुलतानचे चित्र लावण्यात आले तर त्यात गैर काय? या बद्दल माहिती नाही. नेहरूंची मुस्लिम चाटुगिरी माहिती असल्याने तसे असल्यास आश्चर्य वाटणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
M
manguu@mail.com Sun, 01/28/2018 - 04:59 नवीन
इंग्रजांविरुद्ध दुसरा बाजीराव लढला ? काय विनोद करताय गुरुजी ! लढले तर मग पेशवे इंग्रजांकडून पेन्शन का घेत होते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 01/28/2018 - 08:27 नवीन
कोरेगाव-भीमा येथील लढाई माहिती आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sun, 01/28/2018 - 08:30 नवीन
त्याला पेशवा हजर होता का ? की इतराना लढायला सांगून , मीही येतो असे म्हणून , तो तिथे आलाच नव्हता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
M
manguu@mail.com Sun, 01/28/2018 - 08:31 नवीन
आणि ती नंतर पेन्शन घेतली ती का? न लढण्यासाठी का ? किती होती ? सात की आठ लाख ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
L
lakhu risbud Mon, 01/29/2018 - 14:26 नवीन
तुम्ही आता "लोचट" असा आयडी घ्या, म्हणजे तुमची तळमळ संपादक मंडळाला कळेल.नंतर कदाचित आयडी उडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
श
श्रीगुरुजी Sun, 01/28/2018 - 08:37 नवीन
वाचन वाढवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
अ
अर्धवटराव Sun, 01/28/2018 - 01:18 नवीन
जातीय समीकरणांनी गुजरातमधे भाजपला घाम फोडला. देशभर शेतकर्‍यांमधे असंतोष घुमसतोय. रोजगार निर्मीती वगैरे क्षेत्रात काहि ठाशीव काम झाल्याचं दिसत नाहि. करणी सेनेसारखे नवे उपद्रव हे गपगुमान सहन करताहेत. शिवसेना सारखे सहकारी साथ सोडुन जायला लागले आहेत. तरिही यांचे डोळे उघडायला तयार नाहि. एकदाचं मोदि कार्ड एक्स्पायर झालं कि परत विरोधीपक्ष पदाची खुर्ची उबवणे यापलिकडे काहि कार्यक्रम नाहि कि काय यांचा. अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Sun, 01/28/2018 - 08:40 नवीन
शिवसेना सोडून जातेय म्हणजे सुंठीवाचून खोकला जातोय. इतर मुद्द्यात दम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Sun, 01/28/2018 - 16:30 नवीन
योग्य ठिकाणी मुद्द्यांची दखल घेतली जावी अशी इच्छा, आशा आणि अपेक्षा आहे. बाकि राम जाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 01/28/2018 - 17:05 नवीन
मुळात शिवसेना सोडून गेलेली नाही आणि जाणारही नाही कारण (१) 'सामना'तून कितीही म्याव म्याव केली तरी सेनेला आपली खरी ताकद किती अल्प आहे याची कल्पना आहे आणि (२) सेना सत्तेसाठी अत्यंत कासावीस व लाचार आहे व स्वबळावर आपण सत्तेच्या जवळपास सुद्धा जाऊ शकत नाही हे सेनेला नेमके माहिती आहे. तरीसुद्धा सेनेने बाहेर पडण्याचा आततायीपणा केला, तर काळजी घेण्यास शहा व मोदी समर्थ आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Tue, 01/30/2018 - 14:05 नवीन
आणि शहाजींचं सामर्थ्य गुजरातमधे बघितलच आहे. कर्नाटकमधे सुद्धा राम वि. अल्ला वगैरे फालतुगिरी सुरु झाली आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 01/30/2018 - 18:33 नवीन
टिप्या जयंती, कर्नाटकचा वेगळा ध्वज, लिंगायतांना वेगळा धर्म, लंकेशच्या खुनासाठी संघावर आरोप, हिंदूंचे खून वगैरे फालतूगिरी सुरू झाल्यानंतर त्यावर उत्तर येणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ग
गॅरी ट्रुमन Tue, 01/30/2018 - 18:57 नवीन
कर्नाटकमधे सुद्धा राम वि. अल्ला वगैरे फालतुगिरी सुरु झाली आहे.
अर्धवटराव, तुम्हाला जे.एन.यु मध्ये भारताचे तुकडेतुकडे व्हावेत वगैरे प्रकार झाले होते ती फालतूगिरी वाटत असावी अशी अपेक्षा आहे. कारण गेल्या महिन्या-दीडमहिन्यात प्रधानसेवकांनी लाज आणली वगैरे तुम्ही म्हटले आहेत ते आठवले पण अशा तुकडेतुकडे गँगला राहुल, केजरीवाल, डावे इत्यादी सगळ्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता त्यामुळे लाज आणली अशा प्रकारे तुम्ही कधी म्हटल्याचे आठवत नाही. सुशिक्षित लोकांचा हाच अ‍ॅटिट्यूड अगदी प्रचंड डोक्याला शॉट लावतो. मोदींनी सगळे प्रश्न सोडवायला हवेत नाहीतर ते प्रश्न मुळात निर्माण केले त्यांनाच आम्ही मत देऊ!! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
श
श्रीगुरुजी Wed, 01/31/2018 - 08:14 नवीन
आणि शहाजींचं सामर्थ्य गुजरातमधे बघितलच आहे. गुजरातमध्ये मार्च १९९५ पासून (१९९७-९८ मधील १ वर्षांच्या वाघेलाच्या कारकीर्दीचा अपवाद वगळता) डिसेंबर २०१७ पर्यंत तब्बल २२ वर्षे भाजप सत्तेत होता. भाजपने सलग ५ विधानसभा व ५ लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळविले होते. एखादा पक्ष सलग इतका मोठा काळ एखाद्या प्रदेशात सत्तेवर असेल तर अँटीइंक्युंबन्सी मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन जनता बदल करण्यास उत्सुक असते. तशीच अँटीइंक्युंबन्सी यावेळी होती. त्याचबरोबर पटेलांना राखीव जागा प्रकरणावरून भडकावण्यात आले होते. पटेल, इतर मागासवर्गीय, दलित आणि खांग्रेस यांची अभद्र जातीय युती झाली होती. मतदानाच्या आदल्या दिवशी रातोरात २०१५ मध्ये पोलिस गोळीबारात मारल्या गेलेल्या दंगलखोर पटेलांचे चित्र छापलेली व शहीदांचे स्मरण ठेवा असे लिहिलेली लाखो पोस्टर्स राज्यात सर्वत्र लावण्यात येऊन जातीय भावना पेटविण्याचा जोरदार प्रयत्न केला गेला. त्यात भरीला निश्चलीकरण व वसेक सारखे कठोर आर्थिक निर्णय होतेच. माध्यमे भाजपविरूद्ध रोज आग ओकत होती. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा बहुमत मिळविणे हे काही लाडू खायचं काम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
श
श्रीगुरुजी Mon, 01/29/2018 - 18:14 नवीन
शिवसेना सारखे सहकारी साथ सोडुन जायला लागले आहेत. तरिही यांचे डोळे उघडायला तयार नाहि https://m.maharashtratimes.com/india-news/shivsena-took-part-in-nda-meeting-resolution-passed-in-praise-of-pm-modi/articleshow/62698835.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Tue, 01/30/2018 - 14:06 नवीन
बरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 01/31/2018 - 08:16 नवीन
वेगळे लढणार असल्या कितीही फुशारक्या सेनेने मारल्या तरी सत्ता सोडण्याची हिंमत सेनेच्या पार्श्वभागात नाही हे लक्षात आले असेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
सुबोध खरे Sun, 01/28/2018 - 18:24 नवीन
RSS didn't participate in the freedom movement even though its founder K. B. Hedgewar participated in the freedom movements. He wanted to have personal involvement in the struggle, but not bring his organization into it. That was pragmatic. Other than INC, none of the major political groups in India actually participated in the freedom movement. Jinnah's Muslim League didn't; Ambedkar's ILP didn't; Savarkar's Hindu Mahasabha didn't; EV Ramaswamy's Justice party didn't. Even the Communists didn't for the most part. All these groups were quite nascent and their founders didn't want to get on the bad side of the British, thereby losing their movement and momentum. RSS was formed due to the Malabar riots of 1921 - that killed a large number of Hindus in the present state of Kerala. Congress didn't voice much against that event as part of the riots were targeted at the British rule too. For Hedgewar, this was a realization that he needed a group that will fight for the Hindu interests even if sometimes aligned with the British. In the initial decades, the movement was quite small, competing with both Congress and Mahasabha for the Hindu votes and Hedgewar was very careful to avoid politics. Only many decades later came the Jan Sangh/BJP - the political wing. Since they avoided politics, they didn't participate in the freedom movement. When Hedgewar died in 1940, the movement was left with Golwalkar who was more reclusive and had little desire for a paramilitary style organization. This pushed RSS even further away from politics. This is when Godse and others moved out of RSS to form Hindu Rashtra Dal as he & others thought RSS was too removed from reality. In hindsight this action of Golwalkar [keeping a big distance from politics] saved it from the destruction faced by other Hindutva groups post Mahatma's assassination. Golwalkar headed RSS for a long time [33 years] and it is only after his death that RSS became actively involved in politics under the next leader, Deoras. Without Deoras there would have been no BJP. Coming back to the question, you could have asked what was the contribution of individual temples, mosques, churches, social organizations to the freedom movement and in each case it amounts pretty close to ZERO. Like today, politics was a sensitive subject that many of these organizations tried to avoid.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सुबोध खरे Sun, 01/28/2018 - 18:25 नवीन
जालावरून साभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गामा पैलवान Sun, 01/28/2018 - 19:43 नवीन
च्यायला, काँग्रेसचं तरी काय योगदान आहे स्वातंत्र्यचळवळीत? इंग्रजांनंतर काँग्रेसी सत्तेवर आले याचा अर्थ काँग्रेसने इंग्रजांना घालवण्याची चळवळ चालवली असा होत नाही. काँग्रेसमुळे इंग्रज गेले असाही त्याचा अर्थ नाही. इंग्रज गेले ते आझाद हिंद सेनेच्या बंडाळीमुळे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आनंदयात्री Tue, 01/30/2018 - 19:57 नवीन
>>इंग्रज गेले ते आझाद हिंद सेनेच्या बंडाळीमुळे. आणि अटलांटिक सनदेमुळे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अनुप ढेरे Wed, 01/31/2018 - 09:42 नवीन
आझाद हिंद सेनेचं माहिती नाही पण नेव्हीचं बंड याला कारणीभूत होतं असं वाचलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 01/31/2018 - 13:11 नवीन
अगदी बरोबर. आझाद हिंद सेनेवरून प्रेरणा घेऊन नौदलाने केलेलं बंड होतं ते. इंग्रज सरकारतर्फे लढणाऱ्या भारतीय सैनिकांना जपानने युद्धकैदी बनवलं. अशांपासून आझाद हिंद सेना निर्माण करण्यात आली. त्यामुळे तिच्यात सामील झालेल्या भारतीय सैनिकांना बंडखोर समजलं गेलं. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
M
manguu@mail.com Sun, 01/28/2018 - 13:21 नवीन
https://www.ndtv.com/delhi-news/after-karnataka-row-over-tipu-sultan-now-lands-in-delhi-1805157 Referring to the BJP, Mr Goel said "I want to tell them that the Constitution of India also carries a picture of Tipu Sultan on page 144. So, either the people who fought the British to free the country and wrote this Constitution were 'gaddaar' (traitors) or they (BJP) are the ones".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन Sat, 01/27/2018 - 11:25 नवीन
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकार लोकशाही पध्दतीने कारभार करत आहे का असा प्रश्न उभा केला आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/raghuram-rajan-opens-up-on-whats-working-and-whats-not-working-for-india/articleshow/62671062.cms चला मंडळी, पुरोगामी बुबुडाविपुमाधविंनो करा रघुराम राजन यांच्या नावाचा जयघोष सुरू. राजन काय म्हणालेत ते बघू: १. 'नोकरशाहीला बाजूला सारून एक छोटासा कंपू सरकारचे सर्व महत्त्वाचे निर्णय घेत आहे. नोकरशाहीमध्ये एक प्रकारची भीती आहे': म्हणजे नोकरशाहीने महत्वाचे निर्णय घेणे ही लोकशाहीची व्याख्या आहे का राजन यांच्या मते? मजाच म्हणायची. २. मोदी सरकारचा कारभार खरोखरच लोकशाहीला अनुरूप आहे का? : हे होते रिझर्व्ह बँक गव्हर्नर. म्हणजे कितीही महत्वाचे पद असले तरी अर्थकारणाशी संबंधित एक गोष्ट ते बघत होते. त्यावरून पूर्ण मोदी सरकारचा कारभार कसा आहे आणि तो लोकशाहीला अनुरूप आहे का याविषयी टिप्पणी करण्याइतकी माहिती कशी मिळाली कोणास ठाऊक. राजनना टिका करायचा अधिकार आहे. पण त्यांचे शिक्षण, त्यांनी क्षेत्राला दिलेले योगदान आणि त्यांनी भूषविलेले पद लक्षात घेता त्यांनी केलेल्या टिकेला काहीतरी आधार असायला हवा आणि तो त्यांनी स्पष्ट करायला हवा. नाहीतर टारासारखे लोक गुडघ्यातली टिका करतात त्यात आणि राजननी केलेली टिका यात फरक काय राहिला? ३. देशात पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रकल्प रखडले आहेत. सरकारनं त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं: याविषयी दुमत नसावे. पण राजननी काही आकडेवारी प्रसिध्द केली आहे का की पूर्वी अडकलेले प्रकल्प किती, आता अडकलेले प्रकल्प किती वगैरे? आसामात सिल्चरची रेल्वेलाईन, दिल्ली-मेरठ रस्त्याचे सहापदरीकरण वगैरे प्रकल्प वेगाने पूर्ण केले त्याविषयी काय? दुसरे म्हणजे राजननीच गव्हर्नर असताना बँकांना एन.पी.ए चे खरे आकडे जाहिर करायला भाग पाडले हे त्यांनी चांगलेच केले. पण त्यानंतर बँका प्रकल्पांसाठी पैसे कर्जाऊ द्यायला हात आखडता घ्यायला लागल्या. त्या हल्लीच त्यात पुढाकार घ्यायला लागल्या आहेत अशा बातम्या आहेत. या प्रक्रीयेला नक्की किती वेळ लागतो? आता वेळ लागला आहे/लागत आहे तो अवाजवी जास्त आहे का अशा प्रकारचे भाष्य करायला नको का त्यांच्यासारख्या शिकल्यासवरलेल्या माणसाने? ४. अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांना किंमत दिली जात नाही. एकीकडे म्हणायचे सरकार लोकशाही पध्दतीने काम करत नाही आणि दुसरीकडे म्हणायचे अधिकार्‍यांनी घेतलेल्या निर्णयांना किंमत नाही. अधिकार्‍यांनी काहीही निर्णय घेतला तरी लोकशाही पध्दतीत त्यावर फायनल से सरकारचाच असतो याविषयी त्यांचे काय म्हणणे आहे? ५. आपल्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवले जाईल की काय, अशी भीती त्यांच्यात (अधिकार्‍यांमध्ये) आहे याला चोराच्या मनात चांदणे असे का म्हणू नये? ६. आपण एका छोट्या कंपूच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा गाडा हाकत आहोत का? 2.5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था चालवण्याची क्षमता आपल्यात आहे का,' याचाही विचार व्हायला हवा,' असं राजन म्हणाले. त्याच धर्तीवर चिदंबरमपुत्राच्या सिंगापूरमधील संशयास्पद बँक व्यवहारांची माहिती द्यायला यांनी कित्येक महिने का लावले याचाही विचार व्हायला हवा.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Sat, 01/27/2018 - 12:52 नवीन
http://www.livemint.com/Industry/fNaC0lupSZi9oJe4jDPlOM/Davos-2018-Chanda-Kochhar-says-India-seeing-huge-inflows-in.html
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 01/27/2018 - 19:49 नवीन
विशुमित, २. संविधानाच्या १४४ व्या पानावरही टिपू सुलतानचे चित्र आहे. माझ्या माहितीनुसार संविधानात कुणाचेही चित्रं नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sun, 01/28/2018 - 06:56 नवीन
संविधानाची मूळ प्रत चित्रांनी भरलेली आहे. अनेक चित्र आहेत. टिपू आहे का नाही हे नाही महिती पण कृष्ण, अर्जुन, राम वगैरे आहेत.कृष्ण-अर्जुन डायरेक्टिव प्रिंसिपल्सच्या पानावर आहेत बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गवि Sun, 01/28/2018 - 07:20 नवीन
इथे पूर्ण मूळ हस्तलिखित घटना पेज बाय पेज वाचता / पाहता येईल. नेमक्या चित्रांचीही खात्री करुन घेता येईल. Scanned कॉपीही हवी असल्यास डाऊनलोड करता येईल. https://www.wdl.org/en/item/2672/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ग
गामा पैलवान Sun, 01/28/2018 - 15:52 नवीन
गवि, दुव्याबद्दल धन्यवाद. मला त्यात एकही चित्रं सापडलं नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Sun, 01/28/2018 - 16:38 नवीन
आहेत की.. उदा. काही:- Image removed. Image removed. Image removed. बरीच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 01/28/2018 - 19:59 नवीन
गवि, माझी दृष्टी तितकीशी तीक्ष्ण नाही. त्यामुळे चित्रं दिसली नाहीत. त्याबद्दल क्षमस्व. आता यातनं टिपू सुलतान शोधावा लागेल. शिवाय तो टिपूच आहे असं स्पष्टपणे प्रतीत व्हायला हवं. तसं जरी स्पष्ट झालं तरी टिपूचा संविधानाशी नक्की सबंध काय यावर देखील प्रकाश पडायला हवा. माझ्या मते असा काही अधिकृत संबंध नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Mon, 01/29/2018 - 02:25 नवीन
तसं जरी स्पष्ट झालं तरी टिपूचा संविधानाशी नक्की सबंध काय यावर देखील प्रकाश पडायला हवा. माझ्या मते असा काही अधिकृत संबंध नाही.
+१ सहमत. वर उल्लेख आलेल्या १४४ क्र. पानावर तरी टिपू अथवा कोणतेच चित्र दिसत नाहीये. शिवाय कोणत्याही चित्राचा एकूण घटनेशी / किंवा त्या त्या पृष्ठावरच्या मजकुराशी थेट संबंध आहे किंवा कसे हेही माहीत नाही. कदाचित ही चित्रं अशीच सुशोभीकरण म्हणून वापरलेली असू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सुबोध खरे Mon, 01/29/2018 - 05:42 नवीन
१४४ व्य पानावर टिपू सुलतानाचे चित्र नाहीच. आआप वाले इतके निखालस खोटे बोलू शकतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
क
कपिलमुनी Wed, 01/31/2018 - 17:45 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 01/31/2018 - 19:36 नवीन
ओके. Scan करणाऱ्या टीमने / व्यक्तीने पाठपोठ पाने इन्क्लुडिंग कोरी मागची साइडही scan केलेली दिसते. त्यामुळे पेज नंबर त्या रीडरनुसार न पाहता थेट पानाच्या फूटरमधे पहायला हवेत असं दिसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा