Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग २५

ग
गामा पैलवान
Sat, 03/10/2018 - 19:31
🗣 265 प्रतिसाद
लोकहो, अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274 याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले? याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/ मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं. एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन. जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही. आ.न., -गा.पै.
वर्गीकरण
ताज्या घडामोडी

प्रतिक्रिया द्या
51087 वाचन

💬 प्रतिसाद (265)
श
श्रीगुरुजी Mon, 03/12/2018 - 10:28 नवीन
गडकरींनी तुमच्या साहेबांना हसतहसत अनेक उपरोधिक टोमणे मारले. तुमच्या साहेबांना कसनुसं हसण्यापलिकडे काहीही करता येत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 03/12/2018 - 15:30 नवीन
तुम्हाला संदर्भ पाहिजे होता तो मी दिला पुढचे उरकायला नव्हते सांगितले. त्यावर काही टिपणी असेल त्यावर चर्चा अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 03/12/2018 - 16:55 नवीन
तुम्हाला अर्थ समजलेला दिसत नाही. तो तुमच्या साहेबांना मारलेला टोमणा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
A
arunjoshi123 Tue, 03/13/2018 - 12:57 नवीन
या माणसाचा या क्षणापर्यंत आदर होता. हा तर पुरता नीच* आहे. =================== * या शब्दाचा एक गैरजातीभेदवादी अर्थ पण असतो. त्या अय्यरनं इतकं थोबाड वाकडं करत हा शब्द उच्चारला होता कि या शब्दाच्या घाणेरडेपणाला एक उच्च दर्जा प्राप्त झाला. अय्यरीय नीचतेशी इथे संबंध अपेक्षित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ज
जेम्स वांड Wed, 03/14/2018 - 03:04 नवीन
जोशी, तुम्ही इथे हे लिहिताना थोबाड (तुमचंच) वाकडं केलं का नाही हे आता आणि आम्हाला कसं हो कळणार? नाही म्हणजे अय्यरीय नीच जर बेंचमार्क पकडलं तर तुमचं थोबाड किती वाकडं झालं होतं (त्या विविक्षित क्षणी) हे पाहून On a scale on अय्यरीय नीच, तुमचं विधान किती टक्के जातीयवादी होतं अन किती टक्के जातिभेदोत्तर होतं हे कळायला बरं पडलं असतं, सेल्फी टाकायला हवी होती तुम्ही =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
N
Nitin Palkar Sun, 03/11/2018 - 18:01 नवीन
केवळ भाजप विरोध हा भाजपेतर सर्व पक्षियांचा एकमेव अजेंडा असल्याने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होई पर्यंत हे प्रकार अधिक जोर धरतील.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 03/12/2018 - 07:18 नवीन
सर्वपक्षीय विरोध असला तरी भाजप सगळ्या ठिकाणी निवडणूक जिंकत आहेत ना! हे कसे काय बुवा?? हे सर्व शेतकरी राजकीय हेतू ने आलेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
श
श्रीगुरुजी Mon, 03/12/2018 - 18:20 नवीन
शेतक-यांना हे नेते फसवित आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
S
sagarpdy Mon, 03/12/2018 - 06:07 नवीन
https://www.ndtv.com/india-news/narayan-rane-among-bjps-18-rajya-sabha-candidates-1822558 अच्छे दिन आले हो !
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 03/12/2018 - 13:17 नवीन
तुमच्या इथल्या कॉमेंटचा संदर्भ घेऊन विचारतोय, १. नारायण राणे ह्यांच्या भाजप प्रवेशानंतर आपण अजूनही आपल्या वरील कॉमेंट मधल्या विधानांशी सहमत आहात का? २. राणेंना आमदारकी होती, त्यांना मंत्रिपद मिळणे ह्याने ब्राह्मण समाज दुखावला असता अन त्यांना (ब्राह्मण समाजाला) भाजप अव्हेरू शकत नाही असे आपले म्हणणे होते, इथे तर थेट खासदारकी अन राज्यसभेचे वारे वाहतेय, म्हणजे मी म्हणलेलं ब्राह्मणांना भाजपची गरज आहे, भाजपला ब्राह्मणांची गरज नाही हे खरे मानावे का? की तुमच्यामते ब्राह्मणद्वेष्ट्या नारायण राणेंस पक्षात घ्यायचं अंतस्थ कारण काही व्यूहात्मक रचना असू शकेल ? ह्यावरचं तुमचं विश्लेषण वाचायला आवडेल. ३. ब्राह्मण समाज ही एकगठ्ठा मतपेढी नसल्यामुळे भाजपला त्यांच्यात रस नाही, शिवाय भाजपच्या नव्या ओबीसी/ वेगवेगळ्या जातीय केंद्रित राजकारणाला अनुसरून खेळ सुरू आहेत का? मुळात मला वाटतंय तसं हे राजकारण जातीय मतपेढीवर आधारित आहे का? उत्तर हो असले किंवा नसले तरी ह्यावर ब्राह्मण समाजाची प्रतिक्रिया काय असावी? पुढील व्यूहरचना (ब्राह्मण समाजाची) काय असावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
श
श्रीगुरुजी Mon, 03/12/2018 - 13:55 नवीन
>>> १. नारायण राणे ह्यांच्या भाजप प्रवेशानंतर आपण अजूनही आपल्या वरील कॉमेंट मधल्या विधानांशी सहमत आहात का? राणेला भाजपत घेतलेले नाही >>> की तुमच्यामते ब्राह्मणद्वेष्ट्या नारायण राणेंस पक्षात घ्यायचं अंतस्थ कारण काही व्यूहात्मक रचना असू शकेल ? ह्यावरचं तुमचं विश्लेषण वाचायला आवडेल. राणेला भाजपत घेतलेले नाही >>> पुढील व्यूहरचना (ब्राह्मण समाजाची) काय असावी? खांग्रेसी विचारांचे पक्श उघडउघड ब्राह्मणद्वेष्टे आहेत. त्यामुळे ब्राह्मणांनी सद्यपरिस्थितीत भाजपलाच पाठिंबा सुरू ठेवावा. भाजपला आंधळा पाठिंबा न देता मुद्द्यावर आधारीत व उमेदवारावर आधारीत पाठिंबा असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
क
कपिलमुनी Mon, 03/12/2018 - 14:10 नवीन
भाजपाने नारायण राणे यांना तिकिट देवून खासदार करणे तुम्हाला पटले का ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 03/12/2018 - 14:34 नवीन
नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ज
जेम्स वांड Mon, 03/12/2018 - 15:51 नवीन
नारायण राणे ह्यांना पक्षात घेतलेले नाही असे तुम्ही म्हणता आहात, पण राणेंना भाजपकडून राज्यसभेचे तिकीट मिळालेलं आवडलं नाही असेही म्हणताय, मला पडलेला प्रश्न असा की पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट मिळालेला माणूस पक्षाबाहेरचा असू शकतो? जर राणे पक्षाबाहेर आहेत अन पक्षाला त्यांची खास गरज नाहीये, उलट त्यांना तिकीट देऊन प्रामाणिक एकनिष्ठ मतदार असलेल्या ब्राह्मण समाजाचा रोषच पत्करायला लागणार आहे, तर भाजपने त्यांना तिकीट मुळातच का दिले असावे? दुसरे म्हणजे पक्षाचे राज्यसभेचे अधिकृत तिकीट मिळणे हे पक्ष प्रवेशाचे द्योतक मानता येईल का? नसल्यास का नाही? असल्यास राणे पक्षात आलेत हे मान्य करायला हरकत असल्यास ती कशावर आधारित हरकत असावी? (मुळात माझा तुमच्याइतका अभ्यास अन व्यासंग नाही, चार लोक जेव्हा मला विचारतील भाजपने असे का केले, तर त्याला द्यावयाचे उत्तर मला तुमच्या उत्तरातून मिळेल ही आशा मात्र पक्की आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 03/12/2018 - 17:02 नवीन
>>> पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट मिळालेला माणूस पक्षाबाहेरचा असू शकतो? राणे भाजपचा उमेदवार नसून भाजपच्या पाठिंब्यावर उभा आहे. >>> जर राणे पक्षाबाहेर आहेत अन पक्षाला त्यांची खास गरज नाहीये, उलट त्यांना तिकीट देऊन प्रामाणिक एकनिष्ठ मतदार असलेल्या ब्राह्मण समाजाचा रोषच पत्करायला लागणार आहे, तर भाजपने त्यांना तिकीट मुळातच का दिले असावे? कारण माहिती नाही. कदाचित कोकणात सेना, खांग्रेस व भ्रष्टव्याधीला अंगावर घेण्यासाठी राणेला वापरायचचे असावे. >>> दुसरे म्हणजे पक्षाचे राज्यसभेचे अधिकृत तिकीट मिळणे हे पक्ष प्रवेशाचे द्योतक मानता येईल का? नसल्यास का नाही? असल्यास राणे पक्षात आलेत हे मान्य करायला हरकत असल्यास ती कशावर आधारित हरकत असावी? राणे भाजपचा उमेदवार नाही. भाजपचा पाठिंबा असलेला उमेदवार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Mon, 03/12/2018 - 17:22 नवीन
कारण माहिती नाही. कदाचित कोकणात सेना, खांग्रेस व भ्रष्टव्याधीला अंगावर घेण्यासाठी राणेला वापरायचचे असावे. हे असंच असावं असे मनापासून वाटतंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
S
sagarpdy Tue, 03/13/2018 - 11:32 नवीन
आजारापेक्षा औषध वाईट अशी काहीशी म्हण आहे ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
व
विशुमित Mon, 03/12/2018 - 15:32 नवीन
यांना काय वाटते हे भाजप वाले हिंग लावून पण पुसत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
विशुमित Mon, 03/12/2018 - 15:27 नवीन
भाजपला आंधळा पाठिंबा न देता मुद्द्यावर आधारीत व उमेदवारावर आधारीत पाठिंबा असावा. LLRC
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Mon, 03/12/2018 - 15:33 नवीन
<<<खांग्रेसी विचारांचे पक्श उघडउघड ब्राह्मणद्वेष्टे आहेत>> ==>> म्हणजे भाजप शेठजी-भटजी समर्थक आहे तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 03/12/2018 - 18:13 नवीन
हेही समजलं नाही असं दिसतंय. भाजप ब्राह्मणद्वेष्टा नाही असा याचा अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
A
arunjoshi123 Tue, 03/13/2018 - 13:05 नवीन
शेठजी, भटजी भारताचे नागरिक नाहीत का रे बाबा? त्यांचं समर्थन केलेलं "देशद्रोह" कसा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
प्रचेतस Mon, 03/12/2018 - 07:31 नवीन
हा कालच्या वर्तमानपत्रात आलेला लेख. त्यांनी बोटचेपेपणा करुन काढून घेतला तरी इतर ठिकाणी मिळालाच.
  • Log in or register to post comments
ज
जानु Mon, 03/12/2018 - 07:38 नवीन
शेतकरी मोर्चातली बहुसंख्य जनता ही पेठ आणि सुरागण्यातील आदिवासी आहे. यांची सर्वात जुनी मागणी म्हणजे ज्या वन जमिनी कसतात त्या नावावर करून द्या. मुळात ही मागणी ६० च्या दशकापासून आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/12/2018 - 07:52 नवीन
मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा लग्नानंतर अद्याप त्यांच्या मुंबईतल्या नव्या घरात शिफ्ट झालेले नाहीत. सध्या त्यांनी भाड्याच्या घरातच संसार सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. विराटने वरळीतील एका इमारतीत ४० व्या मजल्यावर घर भाड्याने घेतले आहे. या घराचे महिन्याचे भाडे १५ लाख रुपये आहे. २०१६ मध्ये विराटने वरळीतील 'स्काय बंगलो' या प्रकल्पात ८ हजार रुपये चौरस फुटांचा फ्लॅट बुक केला होता. हा फ्लॅट अद्याप तयार होत आहे. याची किंमत ३४ कोटी रुपये आहे. या फ्लॅटचा ताबा विराट-अनुष्काला २०१९ पर्यंत मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी २४ महिन्यांसाठी भाडेतत्वावर घर घेतलं आहे. या फ्लॅटचं डिपॉझिट १.५ कोटी रुपये आहे. २,६७५ चौरस फुटांचं हे घर वरळीच्या अॅनी बेझंट रोडवरील 'लिजंड' इमारतीत ४० व्या मजल्यावर आहे. या फ्लॅटसाठी १ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आहे. विराट कोहलीने टि्वटरवर या फ्लॅटमधून बाहेर दिसणाऱ्या दृश्याचा फोटो पोस्ट केला आहे. त्याने म्हटलंय की 'जर तुमच्या घरातून असं सुंदर दृश्य दिसत असेल तर तुम्हाला आणखी काय हवं?' (सौजन्यः मटा)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/12/2018 - 07:53 नवीन
सुपरस्टार रजनीकांत यांचं इन्स्टाग्राम अकाऊंटही आता चालू झालंय. इन्स्टावर त्यांची एंट्री होताच तिथे त्यांच्या चाहत्यांची संख्या झटपट लाखोंच्या घरात पोहोचली. या थलैवानं त्याच्या चित्रपटामधला एक झकास फोटो त्यानं शेअर केला. अनेक चाहत्यांनी तो ठिकठिकाणी शेअर केला. आपल्या लाडक्या कलाकाराचा फोटो लाइक करत त्यांचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. Image removed. (सौजन्य : मटा)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/12/2018 - 07:55 नवीन
शिवणे (पुणे) : येथे औद्योगिक क्षेत्र परिसरात 11 हजार किलोवॅट क्षमतेची वीज वाहिनी (लाईटची तार) रस्त्यावर पडल्याने जाणाऱ्या वाहन चालकांना शॉक बसला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. शिवणे गावातील कालव्याच्या रस्त्याने खान वस्तीकडे रस्त्या जातो. त्या रस्त्याच्या वरून औद्योगिक क्षेत्र परिसराला 11 हजार किलोवॅट क्षमतेची वीज वाहिनी (लाईटची तार) जाते. आवाज होऊन ती वीज वाहिनी या रस्त्यावर अचानक खाली पडली. घटना सोमवारी सकाळी आठ वाजता घडली. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख सागर शिर्के दुचाकीवरून तेथून जात होते. तू व्हीलर थांबा पुढे जाऊ नका. असे काही लोक त्यांना ओरडत होते. ते थांबले त्यांनी पाहिले असता. वीज वाहिनी रस्त्यावर पडली होती. त्यावेळी टेम्पो व दुचाकी चालक तेथून जात होते. त्यांना शॉक लागल्याची माहिती यावेळी नागरिकांनी सांगितल्याचे शिर्के यांनी 'सकाळ' शी बोलताना ही माहिती दिली. (सौजन्यः सकाळ)
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 03/12/2018 - 07:59 नवीन
<<<शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत.>>> ==> अशा असंवेदनशील वाक्याला मिपावर कोणीच निषेद नोंदवला नाही, याचे सखेद दुःख वाटले. असो..
  • Log in or register to post comments
श
शलभ Mon, 03/12/2018 - 08:33 नवीन
सहमत आहे. अशा बोलण्यामुळे सरकारविरूद्धचा रोष वाढत जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ब
बिटाकाका Mon, 03/12/2018 - 09:02 नवीन
तो वाढावा अशीच तर अंध विरोधकांची इच्छा आहे, नाही का? मग उलट अशा वक्तव्याना समर्थन द्यायला नको का? =============================== हा राजकीय मोर्चा नाही म्हणणार्यांनी त्या सिपीआयच्या झेंड्याबद्दलही दोन शब्द व्यक्त करावेत. अशानेच सामान्य माणसांच्या शेतकऱ्यांच्या संवेदनांना छेद जात नाही का? सामान्य शेतकऱ्यांच्या मागे सामान्य माणूस नेहमी उभा राहतो असं इतिहास सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
श
श्रीगुरुजी Mon, 03/12/2018 - 09:03 नवीन
यात काय असंवेदनाशील आहे? ही वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 03/12/2018 - 15:36 नवीन
तुम्हाला माणसांपेक्षा बैलं प्रिय आहेत हे मागेच समजले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 03/12/2018 - 18:16 नवीन
माझ्या दृष्टीने सर्व सजीवांच्या जीवाला किंमत आहे. मुक्या जनावरांवर क्रूर अत्याचार करण्यास माझा विरोध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
आ
आनन्दा Tue, 03/13/2018 - 03:31 नवीन
माणसांच्या करामणुकीपेक्षा बैलांचा जीव मलादेखील नक्कीच प्रिय आहे. आय सेकंड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ज
जेम्स वांड Wed, 03/14/2018 - 03:07 नवीन
फक्त बैलांच्या *करमणुकीत* माणसांचेही जीव जायला नको म्हणून बैल *पाळीव* करण्याला उगाच अंधविरोध नसावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
मराठी_माणूस Mon, 03/12/2018 - 09:22 नवीन
सहमत. अतिशय खेदजनक. हे पण नेहमीचेच का ? https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/MumbaiMirror/ -------------------------------------- ह्याच चालीवर , "लोकल ची बेसुमार गर्दी, त्यातुन पडणारे लोक", "पावसाळ्यात रस्त्यावरचे खड्डे, तुंबणारे रस्ते" इत्यादी इत्यादी हे पण नेहमीचेच असेही म्हणता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सर टोबी Mon, 03/12/2018 - 17:16 नवीन
अनेक चांगले आय डी इथे धारातीर्थी पडलेत. तेंव्हा जमेल तेव्हडा विरोध करायचा बाकी सोडून द्यायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
A
arunjoshi123 Tue, 03/13/2018 - 13:10 नवीन
हो ना. वर १ लाख लाल टोप्या, १ एक लाख लाल झेंडे. ६ तारखेपासून ३ वेळेसचं जेवण. परतीचा प्रवास. कित्ती तो खर्च्च. आणि ७ दिवसाचं उत्पन्नाचं नुसकान! बिचारे गरीब शेतकरी इतका खर्च कसा उचलणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 02:56 नवीन
<<<शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत.>>> ==> अशा असंवेदनशील वाक्याला मिपावर कोणीच निषेद नोंदवला नाही, याचे सखेद दुःख वाटले. असो.. https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/the-farmers-will-go-on-strike-again-sukanu-committee-alerts/articleshow/63289755.cms आणखी एक आंदोलन! ___________________ किसान सभेच्या यशस्वी मोर्चानंतर आता राज्य शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. किसान सभेचा मोर्चा हा त्या पक्षाचा होता, त्या मोर्चाशी आमचा संबंध नाही. सभेचा मोर्चा यशस्वी झाला पण काही प्रश्नांची पूर्ण तड लागलेली नाही. त्यामुळे विविध प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आम्ही आंदोलनाची हाक दिली आहे, असा युक्तिवाद समितीने केला आहे. मंगळवारी यासदंर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीच्या नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार झाला. शेतकरी सभेच्या मोर्चाला तुम्ही पाठिंबा का नाही दिला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोन मोर्चे का काढता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या संघटनांमध्ये एकी नाही का, तुमच्यातच फूट पडली आहे का, अशी प्रश्नांची सरबत्ती झाली. त्यावर समितीने भूमिका मांडली. यावेळी रघुनाथदादा पाटील, सिद्धप्पा कलशेट्टी, सुशीला मोरोळे, किशोर ढमाले आदी उपस्थित होते. शेतकरी कामगार सभेचे अजित नवले मात्र अनुपस्थित होते. ___________________________________ हे शेतकरी नेते अत्यंत निर्लज्ज आहेत. अजित नवलेला महत्त्व मिळाल्याने या इतर नेत्यांना मिरची लागलेली दिसते. यांना शेतक-यांविषयी काहीही देणेघेणे नाही. स्वत:चे महत्त्व वाढविणे, जनतेला उपद्रव देणे एवढेच यांना जमते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 05:08 नवीन
फडणविसांसारखे संवेदनाशील व कार्यक्शम मुख्यमंत्री मिळण्याची शेतक-यांची पात्रताच नाही. त्यांना काहीही न देता पार्श्वभागावर लाथा घालणारी खांग्रेस/भ्रष्टव्याधीच हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 05:14 नवीन
LLRC
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 05:20 नवीन
तुमच्या साहेबांप्रमाणेच तुम्हीसुद्धा खजील होऊन ओशाळवाणे हसण्यापलिकडे दुसरे काहीही करू शकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 03/12/2018 - 09:34 नवीन
शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत. २०१९ साली २००४ ची पुनरावृत्ती होणार असे दिसू लागले आहे. त्यावेळी शायनिंग इंडिया चालू होते.नितिन गडकरींबद्दल काय बोलणार ?हसत हसत वेळ मारून नेणे म्हणजे चातुर्य असे त्यांचा समज.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 03/12/2018 - 10:10 नवीन
स्मिता पटवर्धनांच्या लेखाचा प्रतिवाद करता येइल , पण त्या इथे नाहीत त्यामुळे त्यांच्या पर्यंत पोचणार नाही. बाकी कम्युनिस्ट लोकांना शिव्या देण्याची किंवा प्रवाहा बाहेर ठेवणार्यांचि गंमत वाटते . नाहि रे वर्गातले लोक नेहमी कम्युनिझम कडे आकर्शित होतात , आणि आहे रे वाले भांडवल शाहि कडे ! १०० % भांडवल शाही आणि १०० % कम्युनिझम दोन्हि प्रॅक्टिकल नाहि.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/12/2018 - 10:23 नवीन
भांडवलशाहीने (सामान्य लोकांचही, सर्वांचं नव्हे) भलं झालेलं अनेक देश दाखवू शकतो, कम्युनिझमनं भलं झालेले कुठले देश आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 03/12/2018 - 12:35 नवीन
शेतकर्‍यांचे हक्क, कामगारांचे हक्क , सोयि , मेडिकल , पेन्शन , हक्काच्या रजा अशा अनेक गोष्टी या तून उदयास आल्या आहेत. मी १०० % कम्युनिझमचा समर्थक नाहि. पण भांडवल शाहि मध्ये आहे रे आणि नाहि रे यातील दरी वाढत जाते ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
A
arunjoshi123 Tue, 03/13/2018 - 13:14 नवीन
शेतकर्‍यांचे हक्क, कामगारांचे हक्क , सोयि , मेडिकल , पेन्शन , हक्काच्या रजा अशा अनेक गोष्टी या तून उदयास आल्या आहेत.
आणि अस्तालाही पावलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 03/12/2018 - 10:24 नवीन
अगदी बरोबर. हे समजणे पूनम महाजनच्या आवाक्याबाहेरचे आहे. म्हणून मोर्च्यामागे नक्षल्वाद्यांचा हात असे तर्कट मांडून ती मोकळी झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माहितगार Mon, 03/12/2018 - 11:17 नवीन
....बाकी कम्युनिस्ट लोकांना शिव्या देण्याची किंवा प्रवाहा बाहेर ठेवणार्यांचि गंमत वाटते
जी गोष्ट करून पाहिली नाही त्याचे आकर्षण वाटत असणेही शक्य आहे. कम्युनीझमचे नुसतेच समर्थन करण्यापेक्षा काही काळ कम्युनीझमचा अनुभव घेऊन पहाण्यास काय हरकत आहे आणि ते कम्युनीस्ट पक्षानेच केले पाहीजे असे नाही इतर पक्षांनी सुद्धा काही काळासाठी शेतीचे राष्ट्रीयीकरण करून पहाण्यास काय हरकत आहे. शेतकर्‍ञांच्या मुलांना त्यांच्याच शेतात नौकर्‍याही देता येतील . कर्ज काढण्याचे , पुन्हा माफ करण्यासाठी आंदोलनांचे आत्महत्या इत्यादींचे चक्रही रहाणार नाही. आत्महत्या टळल्याने आणि आंदोलने थांबल्याने उत्पादकताही वाढेल. *** मी नेता झालोतर शेतीचे राष्त्रीयीकरण कधीही करणार नाही, मला माझ्या हातचे आंदोलनाचे काम जाऊन शेतात कष्ट करणे जमणारे नाही ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/12/2018 - 18:42 नवीन
घराला आग लागली तर काय होईल याचा अंदाज येण्यासाठी स्वतःच्या घराला आग लावायची गरज नाही. इतरांच्या घराला लागलेल्या आगीने काय झाले हे अभ्यासले तर जास्त चांगले होईल :) उदा: कम्युनिझम प्रेरित "सुधारणांचा" चीन, रशियाचा, कंबोडिया, येमेन आणि अनेक आफ्रिकन देश यांच्यातील अनुभव कानठळ्या बसतील इतका बोलका आहे ! आज कम्युनिझमने शंभरी गाठूनही, सर्वसामान्य नागरिकाचे जिणे आनंदी तर सोडाच, पण कमीत कमी स्वतंत्र आणि सुसह्य झालेला एकही कम्युनिस्ट देश दाखवणे शक्य झालेले नाही. हे पुरेसे बोलके नाही का ? कम्युनिझमचे सगळे तथाकथित युटोपियन वायदे, केवळ भोळ्या पुस्तकी संकल्पना राहिल्या आहेत आणि प्रत्यक्षात गरीब-शेतकरी-कामकरी यांना खोटी प्रलोभने दाखवून, वर वर "पिपल्स हे, पिपल्स ते" असे फसवे पांघरूण घालून त्याखाली प्रत्यक्षात सरंजामी-लष्करी हुकुमशाह्या तयार केल्या गेल्या आहेत. आणि त्याला होणारा जरासाही विरोध हिंसेने/हत्येने नष्ट केला गेला आहे. हे दुर्दैवी आहे पण सत्य आहे ! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा