Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग २५

ग
गामा पैलवान
Sat, 03/10/2018 - 19:31
🗣 265 प्रतिसाद
लोकहो, अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274 याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले? याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/ मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं. एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन. जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही. आ.न., -गा.पै.
वर्गीकरण
ताज्या घडामोडी

प्रतिक्रिया द्या
51087 वाचन

💬 प्रतिसाद (265)
श
श्रीगुरुजी Tue, 03/13/2018 - 13:28 नवीन
भांडारकर हल्ल्याची जाहीर कबुली देऊन सत्कार करून घेणारे जसे निर्दोष सुटले तसेच हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 03:48 नवीन
तडिपार...??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 08:19 नवीन
हार्पिक पटेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
च
चिर्कुट Wed, 03/14/2018 - 09:22 नवीन
येदीयुराप्पा??? नरेंद्र मोदी??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 09:29 नवीन
प्रज्ञा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 10:14 नवीन
पप्पू? सोनिया? पवार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
A
arunjoshi123 Wed, 03/14/2018 - 11:27 नवीन
बाय द वे, तडिपार करायचा निर्णय राजकिय होता का न्यायिक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
M
manguu@mail.com Tue, 03/13/2018 - 15:13 नवीन
पुणे: माहिती आणि तंत्रज्ञाचे हब बनत चाललेल्या पुण्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सच्या उपस्थितीतच एका आजारी महिलेवर जादूटोणा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. संध्या गणेश सोनवणे या २४ वर्षीय महिलेची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना डॉ. सतीश चव्हाण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात करण्यात आले होते. परंतु तिथेही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे या महिलेच्या कुटुंबीयांनी एका मांत्रिकाला थेट रुग्णालयात बोलावून जादूटोणा केला. या मांत्रिकाने डॉक्टर आणि नर्सच्या समोरच मंत्र पुटपुटत महिलेच्या अंगावरून उतारा काढला. दरम्यान, आजार अधिकच बळावल्याने या महिलेचं निधन झालं आहे. जादूटोण्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 03/13/2018 - 16:23 नवीन
मांत्रिकाकडून उपचार करून घेणे आणि एखाद्या धनगराकडून उपचार करून घेणे यात फरक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ड
डँबिस००७ Tue, 03/13/2018 - 17:37 नवीन
सही आहे गुरुजी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
M
manguu@mail.com Tue, 03/13/2018 - 18:54 नवीन
देशी पारंपारिक उपचारांबद्दल इतका नकारात्मक विचार ! बायदिवे , रामदेवबाबा डॉक्टर आहेत की फार्मासिस्ट ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 05:46 नवीन
धनगर उपचारावरुन धनगर आरक्षण आठवले. तुमचे लाडके आपल्या सुपीक डोक्यातून आरक्षण लगेच देण्याची हमी दिली होती. अभ्यास झाला का? की ह्या टर्मला गॅप घेणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 06:05 नवीन
आरक्षण, अनुदान, कर्जमाफी, वीजबिलमाफी, सवलती, मोफत गोष्टी, नुकसानभरपाई इ. च्या पलिकडे कधी तरी जायचा प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 06:15 नवीन
आठवण करून दिली. स्मृतीभ्रंश झाला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 07:46 नवीन
https://youtu.be/2PaAsueSv4c
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 08:22 नवीन
आरक्षण, आंदोलन, अनुदान, कर्जमाफी, वीजबिलमाफी, सवलती, मोफत गोष्टी, नुकसानभरपाई . . . फक्त याच गोष्टी कशा आठवतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 06:46 नवीन
मी तर बाबा या सगळ्यांच्या पलिकडे गेलो आहे. आता फक्त मोक्षच बाकी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 08:24 नवीन
पण तुमचे साहेब अजूनही सत्तेच्या आशेवर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 09:31 नवीन
त्यात गैर काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 10:16 नवीन
आशेवर असणे गैर नसून त्यासाठी पेटवापेटवी करणे गैर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सालदार Wed, 03/14/2018 - 07:28 नवीन
मांत्रिक कुटूंबियांनी नाही आणला. डॉ. चव्हाण यांनी आणला: http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-deenanath-mangeshkar-hospital-102728
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
स
सालदार Wed, 03/14/2018 - 07:29 नवीन
चव्हाण मुहूर्तावर करायचे शस्त्रक्रिया मृत संध्या सोनवणे यांच्यावर छातीतील गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी रात्री आठची वेळ दिली होती; परंतु सध्या ग्रह चांगले नसून "यमाची घंटा' असल्याचे सांगत नऊ किंवा दहा वाजण्याचा मुहूर्त चांगला असल्याचे सांगितले व रुग्णाला त्रास होत असतानादेखील त्यांनी उशिराने शस्त्रक्रिया केली. त्यानंतर अतिरक्तस्राव झाल्यानंतर तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये हलविण्यास सांगितले. त्यानंतर डॉ. सतीश चव्हाण यांनी सोनवणे कुटुंबीय व जगताप कुटुंबीयांना "देवावर विश्‍वास ठेवा सर्व काही ठीक होईल' असे सांगत दीनानाथ रुग्णालयात मांत्रिकाद्वारे मंत्रोच्चार केले. डॉ. चव्हाण पंचांग पाहून मुहूर्तावर सर्व शस्त्रक्रिया करीत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणानंतर मंगळवारी स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम दिवसभर बंद ठेवण्यात आले होते. रुग्णालयाच्या मुख्य दरवाजावर कोहळा, घोड्याचा नाल आणि देवतांच्या तसबिरी असल्याचे निदर्शनास आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सालदार
श
श्रीगुरुजी Tue, 03/13/2018 - 16:33 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/rbi-directed-to-stop-using-lou-for-imports-from-immediate-effect-1644820/ पीएनबीला 13 हजार कोटींचा चुना लावणाऱ्या LoU च्या वापरावर आरबीआयची बंदी
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 03/13/2018 - 17:36 नवीन
मांत्रिकाकडून उपचार करून घेणे आणि एखाद्या धनगराकडून उपचार करून घेणे यात फरक नाही. हा हा हा , एका डॉ ने धनगराच्या औषधाची सांगीतलेली गोष्ट आठवली !!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/14/2018 - 05:25 नवीन
सामान्य माणसाने धनगराकडून उपचार घेणे आणि एका आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पदवीधराने (स्वतःच्या शास्त्रात ठोस आणि पुराव्याने सिद्ध झालेले उपचार उपलब्ध असताना) धनगराकडून स्वतःला चुना लावून घेणे यात काय फरक आहे तो लोकांनीं स्वतः जाणून घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 05:27 नवीन
आधुनिक वैद्यकशास्त्राचा पदवीधर??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 03:43 नवीन
शेतकरी अंदोलन झाले आता नवीन विषय... https://googleweblight.com/i?u=https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-narendra-modi-is-global-leader-in-fake-twitter-followers-say-reports-1645024/&hl=en-IN&tg=169&tk=5713964171029647719
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 05:29 नवीन
नवीन विषयांचा उपयोग नाही. शेतकरी आंदोलने सतत सुरू असतात. https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/the-farmers-will-go-on-strike-again-sukanu-committee-alerts/articleshow/63289755.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 05:50 नवीन
ही चालतच राहणार. कोणत्या ही सत्ताधारीला आता सुट्टी नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 06:02 नवीन
कोणाच्या तरी राजकीय फायद्यासाठी कितीही आंदोलने करा. आंदोलन पेटविणा-यांना व करणा-यांना काहीही फायदा होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 06:58 नवीन
म्हणजे तुमच्या लाडक्या मा.मु. नी ह्या वेळेस पण वेळ मारून नेली असे म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे Wed, 03/14/2018 - 07:03 नवीन
आता काकासाहेब कोणती नवी खेळी करायची याचा विचार करत असतील. जितके बार काढत आहेत सगळेच फुसके निघाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 07:10 नवीन
म्हणजे शेतकर्यानी लाल झेंडे घेऊन मोर्चा काढला ते 'यांच्या' मुळे?? एक म्हण वापरली असती पण ह्या फोरमवर नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 03/14/2018 - 08:10 नवीन
नाही आमचे काकासाहेब मुख्यमंत्री असताना ५०,००० चा गोवारी आदिवासींचा मोर्चा नागपूरला (२३ नोव्हेंबर १९९४) आला होता तेंव्हा त्यांना भेटण्याची साधी तसदी सुद्धा (सौजन्य हा शब्द मोठा वाटतो) साहेबानी घेतली नव्हती त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ लोकांचा बळी गेला होता आणि ५०० जण जखमी झाले होते. पण साहेबाना प्रगतीची आणि कल्याणाची जास्त काळजी होती. याची आठवण झाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 08:33 नवीन
तीच का काकांनी मागील वर्षा वापरलेली म्हण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 08:44 नवीन
सर्व विरोधकांचे सर्व बार फुसके निघत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 08:27 नवीन
वाटेल ते हट्ट करणा-या लहानांना मधाचे बोट चाटवून समजूत काढावीच लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 07:18 नवीन
मला तर शंका ( संशय ) आहे की ही अंदोलनं सरकार पुरस्कृत तर नाहीत ना. बंद दरवाज्यातून लगेच तोडगा निघतो आहे आणि प्रश्न सोडवले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली जाते सरकार ने मोर्चा सुरू झाला तेव्हा पासूनच रुग्णवाहिका आणि ईतर सोयी पुरविल्या होत्या. दाल मे जरूर कुछ काला है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 08:32 नवीन
फडणविसांच्या चातुर्याला लाल सलाम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सुबोध खरे Wed, 03/14/2018 - 08:48 नवीन
काकासाहेब मुख्यमंत्री असतात गोवारी आदिवासींचा ५०,००० चा मोर्चा नागपूरला गेला होता (२३ नोव्हेंबर १९९४). काकासाहेबांनी त्यांना भेटण्याची तसदी सुद्धा घ्यावीशी वाटली नव्हती.ते तातडीने मुंबईला परतले होते. तेथे झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ जणांचा बळी गेला आणि ५०० च्या वर जखमी झाले होते. पण "कल्याण आणि प्रगती" जास्त महत्त्वाची होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 09:20 नवीन
गोवारी अंदोलनातील चेंगराचेंगरी एक दुर्दैवी घटना होती यात माझ्या मनात काही दुमत नाही. गोवारी अंदोलनातील चेंगराचेंगरी मध्ये दाणी आयोगाने तात्कालिन सरकारला क्लीनचीट दिली होती ती सुद्धा युती सरकारच्या काळात. बाकी या संदर्भातील सगळे धागेदोरे माझ्या पेक्षा तुमच्या पिढीला जास्त माहिती आहे. तरी देखील आजोबांना विचारून आणखी मुद्दे मांडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 03/14/2018 - 13:46 नवीन
गोवारी आदिवासींचा ५०,००० चा मोर्चा नागपूरला गेला होता (२३ नोव्हेंबर १९९४). काकासाहेबांनी त्यांना भेटण्याची तसदी सुद्धा घ्यावीशी वाटली नव्हती साहेबाना क्लीन चिट मिळेल यात कोणता मोठा मुद्दा आहे. त्यांनी काही आदिवासींचे हत्याकांड केले असे कुणाचेही म्हणणे नाही. एवढे सगळे आदिवासी तेथे येऊन त्यांना साधे भेटण्याचे किंवा मागण्या ऐकून घेण्याचे "सौजन्य" साहेबाना नव्हते एवढेच मला म्हणायचे आहे. पुढे काय काय झाले हे सर्वाना माहित आहेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 09:01 नवीन
माझा संशय / अंदाज बरोबर आहे असेच म्हणावे लागेल मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
वीणा३ Wed, 03/14/2018 - 05:45 नवीन
हा धागा (ताज्या घडामोडी वाले जवळपास सगळेच ) = ९०% अक्षरशः सरकारी नळ आहे + १० % ताज्या बातम्या ;) lol
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 03/14/2018 - 08:11 नवीन
पण पाणि बहुतेक सगळे लालसर आहे ;) (ह. घ्या. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
म
माहितगार Wed, 03/14/2018 - 08:24 नवीन
प्रतिसाद हि चर्चा मुख्यत्वे कम्यूनिस्ट मोर्चाविषयी झाली तेवढ्याच अर्थाने घेण्यात यावा हे. वे.सांनल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गणामास्तर Wed, 03/14/2018 - 05:59 नवीन
https://www.loksatta.com/manoranjan-news/anushka-sharma-and-virat-kohli-wore-same-tshirt-to-the-airport-1644804/
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Wed, 03/14/2018 - 09:06 नवीन
सुरु करायची वेळ आली आहे, या धाग्यावर २०० + प्रतिसाद झालेत.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/14/2018 - 09:16 नवीन
गोरखपूर आणि फुलपुर मध्ये झटका बसण्याची दाट शक्यता दिसतेय! ========================== स्वतःला राष्ट्रीय राजकारणात (खासकरून पंतप्रधानपदाच्या दावेदारीत) प्रस्थापित करण्याची घाई तोंडावर पडण्यास (पडल्यास) कारणीभूत असेल काय? ========================== जातीय गणिते घालून भाजपला रोखले जाऊ शकते हे परत एकदा सिद्ध होण्याच्या मार्गावर, माझे वैयक्तिक मत!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 10:03 नवीन
3 साठी- काही महिन्यांमधेच विकासाला मतदान करणारा मतदार (राजा) अचानक जातीपातीचा विचार कसा काय करायला लागला? मला तर बाबा EVM चा प्रताप वाटतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा