Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग २५

ग
गामा पैलवान
Sat, 03/10/2018 - 19:31
🗣 265 प्रतिसाद
लोकहो, अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274 याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले? याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/ मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं. एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन. जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही. आ.न., -गा.पै.
वर्गीकरण
ताज्या घडामोडी

प्रतिक्रिया द्या
51087 वाचन

💬 प्रतिसाद (265)
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/12/2018 - 18:46 नवीन
मुख्य म्हणजे... लेखनावरून तुम्ही विचारी दिसता. कम्युनिस्ट राजवटीत सर्वात प्रथम, विचारी माणसांची रवानगी शेतावर किंवा गुलागमध्ये किंवा रशियामध्ये सायबेरियात केली जाते. तेव्हा, असा काही विचार करताना सांभाळून असा ! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
माहितगार Tue, 03/13/2018 - 16:28 नवीन
मुख्य म्हणजे... लेखनावरून तुम्ही विचारी दिसता. कम्युनिस्ट राजवटीत सर्वात प्रथम, विचारी माणसांची रवानगी शेतावर किंवा गुलागमध्ये किंवा रशियामध्ये सायबेरियात केली जाते. तेव्हा, असा काही विचार करताना सांभाळून असा ! ;) =))
असे काही झाले आप, अशा काही निमीत्ताने तरी आपल्या दोघांच्या भेटीचा योग येईल. मेहनतीने तब्येत बरी रहाते असे तुम्ही डॉक्टर लोकच सांगताना :) पण ज्या कम्यूनीस्ट मिपाकरांना जरा बदल म्हणून त्यांच्या बाजूने प्रतिसाद लिहिला तर त्यांच्या पैकी शेती च्या राष्ट्रीयीकरणाच्या प्रस्तावाच्या समर्थनार्थ कुणीच कसे पुढे आलेले नाही . तोट्यातील शेती सरकारला देऊन सरकारकडे नौकरी करण्यासारखी खरेतर ला जवाब कम्यूनीस्ट आयडीया दुसरी कोणती नाही . प्रतिसादापुरते कम्युनीस्ट होऊन पाहीले तरी कुणी कम्युनीस्ट समर्थनार्थ अद्याप पुढे कसा आला नाही बरे ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 03/13/2018 - 16:50 नवीन
कम्युनिस्ट राजवटीतील उद्योग आणि शेतीच्या राष्ट्रियिकरणाचे परिणाम संक्षिप्त स्वरुपात इथे पाहता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
व
विशुमित Mon, 03/12/2018 - 15:38 नवीन
<<स्मिता पटवर्धनांच्या लेखाचा प्रतिवाद करता येइल , पण त्या इथे नाहीत त्यामुळे त्यांच्या पर्यंत पोचणार नाही.>>> ==>> स्मिता पटवर्धन व्यक्ती नाही वृत्ती आहे, इथून आरामशीर पोहचेल त्यांच्या पर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
A
arunjoshi123 Tue, 03/13/2018 - 13:12 नवीन
१०० % भांडवल शाही आणि १०० % कम्युनिझम दोन्हि प्रॅक्टिकल नाहि.
मग काय, आपला शिक्का - पंजावर पक्का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
A
arunjoshi123 Tue, 03/13/2018 - 13:16 नवीन
बाकी कम्युनिस्ट लोकांना शिव्या देण्याची किंवा प्रवाहा बाहेर ठेवणार्यांचि गंमत वाटते .
सहमत आहे. प्रत्येक विचारधारेचा आदर झाला पाहिजे. शेवटी विचारधारा इ सर्व बकवास असतं, माणसं कशी आहेत हे महत्त्वाचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 03/12/2018 - 16:55 नवीन
ट्रोल धाड --भाजपाच्या सायबर सैनिकांचं अमित शाहनी घेतलं बौद्धिक
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Tue, 03/13/2018 - 13:23 नवीन
तुमच्यासारख्या लोकांमुळं भाजपचा सायबर सैनिक बनायला अनेकांना प्रेरणा मिळते. ============== आणि हो, अगदी खरंच, निरव मोदीच्या मॅटरमधे पडती बाजू घ्यायचं कारण नाही. संपूर्ण केसमधे मोदी पळाला हेच्च नि एवढ्ढंच पाहणारे गाढव असतील तर त्यांचं निर्गाढवीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ग
गामा पैलवान Mon, 03/12/2018 - 17:42 नवीन
माईसाहेब,
अगदी बरोबर. हे समजणे पूनम महाजनच्या आवाक्याबाहेरचे आहे. म्हणून मोर्च्यामागे नक्षल्वाद्यांचा हात असे तर्कट मांडून ती मोकळी झाली.
त्याचं काय आहे की ग्रामीण व मागास भागांतून नक्षलवाद्यांची पीछेहाट चालू आहे. म्हणून त्यांनी शहरांवर लक्ष केंद्रित केलंय. कोरेगाव भीमा निमित्ताने झालेली सणसवाडी इथली दंगल हे या नव्या व्यूहरचनेचंच अपत्य आहे. मुंबईत साधारणत: मोर्चाचा मुख्य घोळका निघून गेल्यावर शांतता असते. यंदा मात्र एकापाठोपाठ एक असे घोळके हिंडत होते. हे कशाचं लक्षण आहे ते आम्हांस चांगलं समजतं. तेंव्हा जरा वस्तुस्थितीवर भाष्य केलंत तर बरं पडेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 03/12/2018 - 17:54 नवीन
राणीच्या गावात राहून कोरेगाव भीमा बद्दल तुमच्याकडे असणारी माहिती वाखाणण्याजोगी आहे. (हा. घ्या )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 03/12/2018 - 19:16 नवीन
विशुमित, अहो जग जवळ आलंय : https://www.bbc.com/marathi/42541030 मुंबईत ९० बशी आणि राज्यभरात १६७ फोडण्याची प्रकाश आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाची ताकद वा नियोजन आहे का? साधा प्रश्न आहे. याउलट नक्षलवादी पद्धतशीरपणे हिंसाचार करतात. प्रकाश आंबेडकरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणतरी चाप ओढतोय ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 03/12/2018 - 19:26 नवीन
बातमीनुसार भिडे आणि एकबोटेंवरच निशाणा साधला तर चाप ओढणाऱ्यांनी?? बरोबर ना ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
M
manguu@mail.com Mon, 03/12/2018 - 20:09 नवीन
इंजिनवाल्यानीही मुंबईत बशी फोडल्या होत्या की . त्याना शिकवायला नक्षली आले होते का ? किंबहुना , बहुजनांची आधी कुरापत काढून नंतर त्यांच्या reaction चा गवगवा करून त्याना नक्षली ठरवण्याचा प्लॅन तर नसेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 03/12/2018 - 22:08 नवीन
अहो मंगू, इंजिनवाल्यांची ताकद किती? प्रकाश आंबेडकरांची ताकद किती? जरा तुलना करून पाहता का! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
क
कपिलमुनी Mon, 03/12/2018 - 17:55 नवीन
नवपरिणीत भाजपा नेत्याची खास लिंक तुमच्यासाठी नरेश अगरवाल ! काही मतासाठी भाजपने नुकतेच पावन केलेत. सर्व हिंदू लोकांनी ऐकावी .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/12/2018 - 18:41 नवीन
नरेश आगरवालला प्रवेश देणे हा चुकीचा निर्णय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बिटाकाका Mon, 03/12/2018 - 18:48 नवीन
नुसताच चुकीचा निर्णय नाही तर बाद कॅटेगरीतील निर्णय! भाजप जर कधी रसातळाला गेलंच तर ते असल्या बाद निर्णयांमुळेच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/12/2018 - 18:50 नवीन
+१,००,००० भाजपा इतकी अगतिक का झाली आहे हे अनाकलनिय आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Mon, 03/12/2018 - 18:50 नवीन
LLRC
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गामा पैलवान Mon, 03/12/2018 - 22:12 नवीन
कपिलमुनी, दुव्याबद्दल धन्यवाद! जेटलींनी चांगलाच समाचार घेतलाय. असेच छानछान चलचित्रं पाठवीत चला. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ज
जेम्स वांड Tue, 03/13/2018 - 03:46 नवीन
आपण ह्यावर श्रीगुरुजींचे विश्लेषण घेऊया, नारायण राणे भाजपात आला नाहीये तर भाजपने राणेंना फक्त पाठिंबा दिलाय हे त्यांनी मला कालच नीट समजवले आहे (अन मला ते पटलेले ही आहे) , फक्त पाठिंबा देणे म्हणजे पक्षात घेणे नसते (मग तो पाठिंबा राज्यसभेवर जायला असला तरीही) , आता काल त्यांनी इतकं उत्तम विश्लेषण दिल्यावर मला तरी अजून काही प्रश्न नाहीयेत, तुम्ही पण वाट पहा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
A
arunjoshi123 Tue, 03/13/2018 - 13:28 नवीन
सगळी घाण प्रमुख राष्ट्रिय राजकीय पक्षांत असायला हवी. हे लोक पक्षाच्या रोलवर नसताना समाजासाठी खूप जास्त खतरनाक असतात. ज्यांना जेल मधे टाकता येत नाही त्यांना राष्ट्रीय पक्षांत टाकावे. उदा. केजरीवाल काँग्रेसमधे असता तर खूप बरं राहिलं असतं. त्याचा सवता सुभा असल्यानं त्यानं केलेली घाण अतीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ज
जेम्स वांड Wed, 03/14/2018 - 03:16 नवीन
हे तुम्ही भाजप ,काँग्रेस इत्यादींच्या राष्ट्रीय कार्यकारणीना समजावून सांगा न प्लीज, म्हणजे त्यांनी उजळ माथ्याने राष्ट्रीय कारणांनी राष्ट्रहितासाठी आम्ही ही घाण पार्टीत घेत आहोत असे एकदाचे (काहींच्या मते कोडगेपणाने) सांगून टाकले की भेंडी डोक्याला शॉटच नाही लागणार मीडियाचा, आज काय दिवसभर नारायण राणे पहा, उद्या काय दिवसभर नरेश अग्रवाल पहा असले आयटमच नको तेज्यायला. इथे निवडणुकी डोळ्यासमोर ठेऊन घाण पवित्र करून घेतली जातेय तिला नैतिक अधिष्ठान पण मिळेल, मी तर म्हणतो गंगा स्वच्छ करण्यावर करोडो कश्याला खर्च करा! गंगा नदीच भाजप मध्ये घेऊन टाका! राणे अग्रवाल प्रमाणे ती पण 'साफ' होऊन जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 03/14/2018 - 05:39 नवीन
घाण पवित्र करून घेतली
हेच चूक आहे. घाण ९९% केसेसमधे पवित्र होत नाही. ती राष्ट्रीय पक्षात असलेले इष्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ब
बिटाकाका Wed, 03/14/2018 - 06:20 नवीन
नाही पण मी काय म्हणतो, हे पवित्र करणे, साफ करणे म्हणजे नेमके काय? म्हणजे भाजप मध्ये कोणी प्रवेश केला कि पवित्र करून घेतले वगैरे का म्हणतात? ============================== ते नवज्योतसिंग सिद्धू, नाना पटोले वगैरे पवित्र होतात कि घाण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड गुरुवार, 03/15/2018 - 04:13 नवीन
नवज्योतसिंह सिद्धू किंवा नाना पटोलेंपैकी कोणी प्रभू रामचंद्राबद्दल अक्षरशः हीन वक्तव्य केलंय काय? नरेश अग्रवालचा इतिहास तुम्हाला माहिती नाही का? प्रत्यक्ष सदनात तो काय बोललाय हे मी तरी एक धर्माभिमानी हिंदू म्हणून मी अवाक्षरही परत लिहू बोलू चर्चा करू इच्छित नाही, तुम्हांस गरज असल्यास तुम्ही ते शोधून पहा. तुम्हाला भाजप प्यारी असेल अन तिच्या उडत्या पडत्या बाजूनेही वाद घालायचाच असेल तर निरुपाय, पण मी तुम्हाला माझ्याप्रमाणेच धर्माभिमानी गृहस्थ मानत होतो. तुमच्यासाठी भाजप पहिला असेल माझ्यासाठी रामलल्ला आहे. इतकेच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/15/2018 - 04:57 नवीन
सहमत आहे. नरेश आगरवालला प्रवेश देणे ही चूक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ब
बिटाकाका गुरुवार, 03/15/2018 - 05:56 नवीन
वांड साहेब, गल्लत होतीय साहेब! माझा प्रश्न नरेश अग्रवालबद्दल नाही तर कोणीही भाजप मध्ये आलं (उदा. आख्खी पिंपरी चिंचवड वगैरे) कि तेच तुणतुणं वाजवलं जातं त्याबद्दल आहे. माझं नरेश अग्रवालला घेण्याबद्दलचं मत वरच मांडलं आहे, तुमच्या वाचनसोयीसाठी खाली लिंक देतो. http://www.misalpav.com/comment/986470#comment-986470 ========================= या स्पष्टीकरणासह परत तोच प्रश्न विचारतो - भाजपमध्ये घेऊन पवित्र करणे म्हणजे नेमके काय करणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड गुरुवार, 03/15/2018 - 06:19 नवीन
तर पवित्र करणे ह्यावर माझा टेक मांडतो, पटला तर बघा काही वेगळं वाटत असेल तर निःशंकपणे सांगा मी माझे विचार बदलून घेईन. पवित्र करून घेणे म्हणजे, समजा क्ष ह्या मतदारसंघात भाजपला जिंकायचा चान्स कमी आहे, पण तिथला विरोधीपक्ष सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्ट आहे, तिथे त्यांनी (विरोधकांनी) जिंकू शकणारा उमेदवार सोडून तिसऱ्याच उमेदवाराला तिकीट दिलंय तर अश्या उमेदवाराला भाजप मध्ये घेऊन , स्थानिक जुन्या कार्यकर्त्यांना डावलून, ह्या आयात उमेदवाराला तिकीट देणे. बऱ्याचवेळी हे उमेदवार भूतकाळात भाजपवर घणाघाती टीका करून चुकलेले असतात, किंवा त्यांच्या पूर्वपक्षात त्यांनी केलेल्या काही भ्रष्टाचार, अनैतिक वक्तव्यावर भाजपने ही (भूतकाळात) यथेच्छ टीका केलेली असते, पण ते सगळे विसरून फक्त ती सीट मिळवायला भाजपने त्या बाहेरच्या उमेदवाराला स्थानिक प्रामाणिक कार्यकर्ते डावलून फक्त जिंकायचे म्हणून तिकीट दिले की त्याला पवित्र करून घेणे म्हणले जात असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 03/15/2018 - 07:09 नवीन
हम्म ओके, मी या (टाईपच्या) पवित्र करण्याला मग राजकारण असेच म्हणेन. --------------------------------------- मला वाटतं हि भाजपला अनेक निवडणुका हरल्यानंतर आलेली उपरती असावी. सत्तेत येण्यासाठी नुसती नैतिकता ठेऊन चालत नाही. वाजपेयींच्या बाजूने सर्वसाधारण मत असताना (वाजपेयींच्या वेळी) देखील फक्त प्रत्येक दोलायमान मतदारसंघ टार्गेट एरिया ठरवून तिथे जिंकणारे उमेदवार दिल्याने काँग्रेस सत्तेत येऊ शकली असे मला वाटते. भाजपची आताची स्ट्रॅटेजीहि अशीच दिसतेय. -------------------------------------- पण तरीही स्थानिकांना, निष्ठवंतांना डावलून वगैरे मुद्दा मला पटत नाही. अशी टिका टाळायची असेल तर १००% निष्ठावंतांना तिकीट देणे हा एकच मार्ग उरतो. हि अशी निष्ठावंतांना डावलल्याची टिका करताना त्या डावलण्याचे प्रमाण काय हे पूर्णपणे विसरून हवेत गोळीबार केला जातो असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड गुरुवार, 03/15/2018 - 07:15 नवीन
इत्यादींवर मी ताज्या घडामोडी -२६ वर कॉमेंट केलीये काका, त्याची इथे द्विरुक्ती टाळतो, तिकडे ह्या उपरतीवर माझे विचार मी मांडले आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
च
चिर्कुट Wed, 03/14/2018 - 06:17 नवीन
निर्लज्ज पक्षाचं महानिर्लज्ज समर्थन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 03/14/2018 - 10:59 नवीन
भाजप निर्लज्ज असेल. पण मी केलेलं विधान फक्त भाजपसाठी नाही. =================== अ चे ८ मुले आहेत. त्यात एक गुंड आहे. तर तो देखील एकत्र कुटुंबात राहावा असं जनरल म्हटलंय. त्या कुटुंबाला इज्जत सांभाळायची असते नि गुंड मुलगा कुणाचं ना कुणाचं काही ना काही ऐकत असतो. तो शहरातल्या खोलीवर राहून सुसाट सुटल्यापेक्षा बरं. =================== बाकी सलज्ज पक्ष कोणते ते आम्हालाही सांगा. मतदानासाठी माहीती कामी येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
A
arunjoshi123 Tue, 03/13/2018 - 13:30 नवीन
नास्तिक बीजेपीत आल्यानं कपिलमुनींना थोडं बरं वाटायला हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Mon, 03/12/2018 - 18:26 नवीन
Image removed. मोर्चातील एक शेतकरी
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/12/2018 - 18:52 नवीन
कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या गरीब शेतक-याकडे बराच मोठा चतुर भ्रमणध्वनी संच दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Mon, 03/12/2018 - 19:01 नवीन
कोणाचा आहे ? कोणत्या कंपनीचा आहे ? कधी घेतला आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Mon, 03/12/2018 - 19:58 नवीन
बरं झाले म्हणायचं शेतकऱ्यांनी ४०-४० हजाराची बैलं आणली नाहीत मोर्च्याबरोबर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/13/2018 - 13:41 नवीन
म्हणजे बैलांनी गरीब बिच्चा-या शेतक-यांसाठी अपार यातना सहन करून खच्चीकरण करून घ्यायचे, नाकात वेसण घालून घेऊन भर उन्हात नांगर ओढायचा, प्रचंड ओझे लादलेली गाडी ओढायची, प्रचंड अत्याचार व छळ सहन करीत शर्यतीत तोंडाला फेस येईपर्यंत उरापाड धावून गरीब बिच्चा-या गांजलेल्या कर्जबाजारी शेतक-यांचे मनोरंजन करायचे, वय झाल्यावर खाटकाची सुरी मानेवर फिरवून घ्यायची आणि गरीब बिच्चा-या गांजलेल्या शेतक-यांच्या मोर्चातही तंगडतोड करायची. वा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 03:57 नवीन
तुम्हाला मुद्दा समजला नाही... प्रतिसादाची Sequence बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 04:00 नवीन
तुम्हाला मुद्दा समजला नाही... प्रतिसादाची Sequence बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
शलभ Tue, 03/13/2018 - 05:54 नवीन
जरा मोर्च्या बद्दल सगळ्या बातम्या बघितल्या तरी कळेल कि हे आलेले नक्कि कोण आहेत, बहुसंख्यांच्या मागण्या किती साध्या आहेत. उगाच फोटो मधे एखादा फोन दिसला, टाय दिसली तर बोंब मारायची. उन्हातानात चालणारे अनवाणी पाय नाही दिसले, त्या पायांना पडलेल्या भेगा नाही दिसल्या. तुमच्यासारख्या समर्थकांमुळे सरकार बदनाम होतंय, तुम्ही लोकांनी अशा बाबतीत आपली तोंडं बंद ठेवली तरी सरकारवर उपकार होतील. ---------------------------------- फडणवीस सरकारने परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी फक्त आयत्या मोर्च्यावर आपला फायदा उचलायला बघत होते, ते पण जेव्हा मोर्चा मुंबईत आला तेव्हा. त्याआधी झोपलेले. मोर्च्या, आंदोलनांचे प्रमाण ह्या सरकारच्या काळात वाढलंय, कारण हे सरकार काहीतरी करेल असं वाटतंय लोकांना. एकही आंदोलन असं दिसलं नाही के जे ह्या सरकारमुळे झालंय, आधीचे प्रश्नच सोडवताहेत फडणवीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बिटाकाका Tue, 03/13/2018 - 07:08 नवीन
मुळात हा मोर्चा त्याच मागच्यावेळी संप आंदोलन केलेल्या शेतकरयांचा त्याच मागण्यासाठी परत काढलेला मोर्चा आहे हे दाखविण्याची केविलवाणी धडपड चालली आहे. आणि त्यामुळेच कर्जमाफी फसवी होती वगैरे मुद्दे पुढे ढकलायचा प्रयत्न दिसतोय. -------------------------------------------- वर्तमानपत्रे वाचून मला जे समजले ते असे कि या मोर्च्यातील बहुतांशी शेतकरी हे आदिवासी शेतकरी आहेत आणि त्यांची मुख्य मागणी ते कसत असलेल्या वनजमिनी त्यांच्या नावावर कराव्यात अशी आहे. जे आदिवासी जमले ते या मुख्य मागणीसाठी असे मला वाटते. बाकी सिपीआयच्या झेंड्याखाली हा मोर्चा काढल्याने याला राजकीय रंग लागला नसता तरच नवल होते. हा राजकीय मोर्चा नाही म्हणणे अजिबात योग्य वाटत नाही. जर एक सामान्य निरपेक्ष शेतकरी मोर्चा रास्त मागण्यांसाठी काढायचा असेल तर त्यांनी राजकीय पक्षांपासून निराळे राहायलाच हवे (जसे मागच्या वेळी संपाच्या बहुतांश काळ झाले). ------------------------------------------- राज्यातील शेतकरी इतका हवालदिल झाला आहे का कि इथले शेतकरी माकप वगैरे लोकांचा आधार घेऊन मोर्चे काढतील आणि इथले मुख्य विरोधी पक्ष, शेतकऱ्यांचे कैवारी वगैरे मोर्चा मुंबईत आल्यावर त्यांच्या स्वागताला जाऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणण्यापुरतेच राहतील? यापुढची निवडणूक भाजप वि. माकप अशी समजावी का असा एक प्रश्न उगाच मनात डोकावून गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
M
manguu@mail.com Tue, 03/13/2018 - 08:18 नवीन
मशीद पाडणे , मंदिर बांधणे , कसायाला ठेचणे हे करायला राजकीय पक्ष पुढे सरसावले तर कौतुक होते. शेतकरी आण्दोलनाला कुणी भाकरी पुरवली तर लगेच चौकश्या सुरु - शेतकरी अन ह्या पक्षाचा काय संबंध ? ह्याना राजकीय फायदा हवा आहे का ? किती लोक अन किती भाकरी लागल्या ? किती खर्च आला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Tue, 03/13/2018 - 09:27 नवीन
वरील वक्तव्यांचे संदर्भ देणे, उगाच सवयीप्रमाणे हव्यात गोळ्या मारू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
मराठी_माणूस Tue, 03/13/2018 - 07:14 नवीन
सहमत. नेहमीचेच म्हणणार्‍यांनी हे ही फोटो पहावेत https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/1644054/kisan-long-march-expressive-photos-of-farmers-feet-become-an-eye-opener-for-many/5/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
श
श्रीगुरुजी Tue, 03/13/2018 - 07:44 नवीन
>>> बहुसंख्यांच्या मागण्या किती साध्या आहेत LLRC
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
M
manguu@mail.com Mon, 03/12/2018 - 19:00 नवीन
शेतकरी दरिद्री आहे , याचे क्रेडिट काँग्रेसला द्यायचे . तळागाळात मोबाइल व सौर पॅनेल पोचले याचे क्रेडिट मोदीना द्यायचे. भक्तलोकहो , बरोबर ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/13/2018 - 02:26 नवीन
मोठठा चतुर भ्रमणध्वनी वापरणारे दरिद्री असतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Tue, 03/13/2018 - 03:10 नवीन
आमच्या गरीब पेशंटची आम्ही NGO ना यादी देतो , त्याना मदत मिळावी म्हणून. .. ते home visit करतात आणि नंतर रिमार्क टाकतात .. घरात फ्रीज आहे , गरीब नाही. घरात टी व्ही आहे , गरीब नाही. घर ४०० फुटाचे आहे , गरीब नाही. लाइट बिल ८०० रु येते , गरीब नाही. दुधाचा चहा दिला , गरीब नाही . शेवटी ते कुणालाच मदत देत नाहीत. यादी तशीच. ( घरातल्या त्या वस्तू जेंव्हा कर्ता पुरुष धडधाकट होता , तेंव्हाच्या असतात , आता तो सिरियस आहे किंवा कैलासवासी झाला आहे , तर केवळ त्या वस्तूंच्या दर्शनाने family ची आर्थिक कंडिशन समजेल काय ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा