ताज्या घडामोडी - भाग २५
लोकहो,
अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274
याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले?
याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/
मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं.
एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन.
जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही.
आ.न.,
-गा.पै.
💬 प्रतिसाद
(265)
व
विशुमित
Wed, 03/14/2018 - 10:03
नवीन
3 साठी- काही महिन्यांमधेच विकासाला मतदान करणारा मतदार (राजा) अचानक जातीपातीचा विचार कसा काय करायला लागला?
मला तर बाबा EVM चा प्रताप वाटतोय.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Wed, 03/14/2018 - 11:20
नवीन
तीनदा लिहिले तरी मी लिहिलेल्या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळला नाही हेच लक्षात येते. विकासाला मतदान करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जातीला मतदान करणारे (सर्वच पक्षांचे) जास्त आहेत. यातील फुटून प्रत्येकाची वोट बँक बनलेले एकत्र आणले तर भाजपाची वोटबँक आणि विकासावर मतदान करण्यासाठी त्यांच्याकडे वळलेला मतदार यांना धोबीपछाड दिला जाऊ शकतो असा त्याचा अर्थ आहे.
==============================
अगदी विरोधी विचारधारा असणारे पक्ष (निदान) मोदीविरीधासाठी तरी एकत्र ये आहेत हेही नसे थोडके.
==============================
फडणवीस मध्ये म्हणाले होते कि विरोधी पक्ष पोटनिवडणुकांपुरतेच राहिले आहेत. संपूर्ण भारतातच पोटनिवडणूक लावता येते कि कसं ते बघायला पाहिजे :).
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 03/14/2018 - 20:45
नवीन
विकासाला मतदान करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जातीला मतदान करणारे (सर्वच पक्षांचे) जास्त आहेत.
तसे असते तर आधीच मतदान त्याप्रमाणे केले असते की.
कोल्ह्याला द्राक्षे आंबट , तसे भाजपे हरले की लोकाना विकास नको , जात हवी असते , असे बोलतात.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
गुरुवार, 03/15/2018 - 03:48
नवीन
मध्ये ते भाजप जिंकला की ख्रिश्चनांनी मते दिली वगैरे म्हणणारे कोण होते हो?
======================
पण मी काय म्हणतो, जर भाजपच्या विकासलाच लोकांना नाकारायचे आहे तर ते बुआ-बबूआ कशाला? लोकांनी तसंही हरवलंच असतं की!
======================
बादवे, ते भाजप एव्हीममध्ये घोळ घालून जिंकतंय वगैरे झालं का सेटल?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 03/14/2018 - 10:04
नवीन
3 साठी- काही महिन्यांमधेच विकासाला मतदान करणारा मतदार (राजा) अचानक जातीपातीचा विचार कसा काय करायला लागला?
मला तर बाबा EVM चा प्रताप वाटतोय.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 03/14/2018 - 10:35
नवीन
अशा झटक्यांची आता सवय व्हावी लागेल
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 03/14/2018 - 10:19
नवीन
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे केंब्रिजमध्ये निधन झाले. बातमी
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 03/14/2018 - 10:59
नवीन
राम मंदिर आंदोलनाशी निगडीत भाजपाचे पाच वेळचे खासदार विनय कटियार यांचे राज्यसभेचे तिकीट यंदा कापण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिरप्रश्नी आंदोलन जिवंत ठेवण्यात कटियार यांची महत्वाची भूमिका आहे. सन १९८४ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपा दोन लोकसभा मतदारसंघावरून १९८९ मध्ये ८५ जागांवर पोहोचवण्यामध्ये त्यांचेही मोलाचे योगदान आहे. पण यंदा उत्तर प्रदेशमधून रिकाम्या झालेल्या राज्यसभेच्या १० जागांसाठी भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही. कटियार यांच्यापेक्षा कनिष्ठ सहकाऱ्यांना यावेळी प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे कटियार समर्थकांमध्ये आता चर्चा रंगली आहे. राम मंदिर निर्मितीसाठी नरेंद्र मोदींवर दबाव आणणे आणि अडवाणी यांना पाठिंबा देण्याची किंमत कटियार यांना चुकवावी लागल्याचे त्यांचे निकटवर्तीय दबक्या आवाजात म्हणत आहेत.
ज्या आठ नेत्यांना भाजपा उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवत आहे, ते सर्व कटियार यांच्यापेक्षा कनिष्ठ आहेत. यामध्ये अरूण जेटली, विजयपालसिंह तोमर, सकलदीप राजभर, कांता कर्दम, अनिल जैन, जीव्हीएल नरसिम्हा राव, हरनाथसिंह यादव, अशोक वाजपेयी. जेटली आणि राव हे राष्ट्रीय स्तरावरील चर्चित नेते आहेत. तर अशोक वाजपेयी हे समाजवादी पक्ष सोडून भाजपात आले आहेत. उर्वरित पाच नेते हे उत्तर प्रदेशमध्येच जास्त परिचित नाहीत.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 03/14/2018 - 11:23
नवीन
या केसचे माहित नाही पण मोदी टप्प्या टप्प्याने कोणाच्या डोळ्यात येणार नाही असे बरेच लोक बदलत असावेत असा माझा व्यक्तिगत कयास आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 03/14/2018 - 11:17
नवीन
Liang Xiangyi या चिनी पत्रकार मुलीच्या डोळ्यातील हावभावांनी चिनी सेंसॉरशीपच्या ठिकर्या कशा उडवल्या याची बातमी चर्चेत आहे . मला युट्यूब एंबेड करता आली नाही कुणी केल्यास चालेल.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 03/14/2018 - 12:41
नवीन
. बारमध्ये लवकरच एमआरपीमध्ये दारु विकत घेणं शक्य होणार आहे. राज्य सरकार याबाबतचा परवाना देण्याच्या विचारात आहे.
राज्यातील बारना FL 2 परवाना जारी करण्याचा विचार फडणवीस सरकार करत आहे. महसूल वाढवण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलण्याची तयारी आहे. यामुळे उत्पादन शुल्कात दहा टक्के वाढ होण्याचा सरकारचा अंदाज आहे.
एफएल 2 परवाना मद्य विक्रीची परवानगी देतो, मात्र परिसरात मद्यपान करता येत नाही. सध्या बार आणि परमिट रुम्सना एफएल 3 परवाना दिला जातो. म्हणजेच फक्त अल्कोहोल सर्व्ह करण्याचं लायसन्स.
'आता मद्यप्रेमी बारमधून दारु एमआरपीमध्ये विकत घेऊ शकतात. त्यानंतर हवं त्या ठिकाणी मद्यपान करु शकतात.' असं महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.
वाईन शॉपमालकांना मात्र या निर्णयाची धास्ती वाटत आहे. आपल्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती वाईन शॉपधारकांनी व्यक्त केली आहे. वाईन शॉप संघटनांनी याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
चालू आर्थिक वर्षात राज्य सरकारने एक्साईज ड्युटीतून 15 हजार कोटी रुपये मिळवण्याचं लक्ष ठरवलं होतं. जानेवारी अखरेपर्यंत 23 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत.
'प्रस्ताव विचाराधीन असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. अवैध मद्यविक्री कमी करुन राज्य सरकारचं महसूल वाढवण्याचं उद्दिष्ट आहे' अशी माहिती उत्पादन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
सध्या बार दारुवर 5 टक्के व्हॅट आकारतात. एफएल 2 परवाना दिल्यावर व्हॅट नाहीसा होईल, असं बावनकुळे म्हणाले.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 03/14/2018 - 13:09
नवीन
समाजवादी पक्षाचे अभिनंदन. २०१९ मधे बसपाशी युती करावी आणि २०२२ पर्यंत निभावावी.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Wed, 03/14/2018 - 14:05
नवीन
फुलपूर व गोरखपूर मतदार संघात भाजपाचा ओव्हर कॉंन्फिडन्स त्यांना नडला. देशात आजपर्यंत झालेल्या सर्व पोटनिवडणुकात भाजपाचा सातत्याने पराभव होत आहे. २०१९च्या निवडणुकीत समजा एनडीएने निवडणुक जि़कलीच तरिही नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायची आशा आता अंधूक होत आहे. सातत्याने सर्वसामन्य व मध्यम वर्गातील जनतेच्या विरोधी घेतलेले निर्णय (मग ते कितीही लोकउपयोगी असले तरी) भाजपाला खूप महाग पडणार आहेत.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 03/14/2018 - 14:54
नवीन
कर चुकवू पाहणारा व्यापारी वर्ग,उच्च-मध्यमवर्ग मोदींवर नाराज आहे असे दिसते आहे. नोटाबंदींनंतर सोन्या-चांदीचे व्यापारी बरेच नाराज झाले होते असे वाचले होते. २०१९ मध्ये भाजपाला ह्या वर्गाचा मोठा फटका बसायची शक्यता वाटते. त्यात राम-मंदीर वगैरे मुद्दे भाजपावाल्यांनी ताणले तर बघायलाच नको.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Wed, 03/14/2018 - 16:53
नवीन
फुलपुरचे माहीत नाही पण गोरखपूर मध्ये योगी आदित्यनाथांनी दिलेले उमेदवार डावलून शहांनी स्वतःचा उमेदवार दिला होता. ही नाराजी भोवली असण्याची शक्यता आहे, अर्थात योगी यांना ही नाराजी हाताळता आली नसेल तर तोही त्यांचाच पराभव आहे म्हणा!!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6