Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग २५

ग
गामा पैलवान
Sat, 03/10/2018 - 19:31
🗣 265 प्रतिसाद
लोकहो, अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274 याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले? याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/ मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं. एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन. जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही. आ.न., -गा.पै.
वर्गीकरण
ताज्या घडामोडी

प्रतिक्रिया द्या
51087 वाचन

💬 प्रतिसाद (265)
ज
जेम्स वांड Tue, 03/13/2018 - 03:48 नवीन
किती इंची स्क्रीन असलेला मोबाईल गरिबी रेषेच्या वरती/खाली असणे/नसणे डिफाईन करत असावा असे आपल्याला वाटते श्रीगुरुजी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/13/2018 - 04:16 नवीन
विचार करा. उत्तर मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
श
श्रीगुरुजी Mon, 03/12/2018 - 18:28 नवीन
कंठलंगोट परीधान केलेला एक शेतकरी सुद्धा दिसतोय.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 03/12/2018 - 18:58 नवीन
कंठलंगोट घालणारे सेल्समेन पोरे कटाकटी ५-६ हजार महिना कमावतात हे पाहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/13/2018 - 02:23 नवीन
पण ते प्रत्येक गोष्ट फुकट मागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ज
जेम्स वांड Tue, 03/13/2018 - 03:50 नवीन
सगळ्या गोष्टी फुकट मागतात असे आपले मत आहे का श्रीगुरुजी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 04:55 नवीन
जेमतेम ५-६ हजार मिळविणारे कंठपट्टीवाले कर्जमाफी, फुकट वीज, नुकसान भरपाई इ. ची सातत्गणीयाने केल्याचे ऐकिवात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 04:56 नवीन
सातत्याने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 03:52 नवीन
LLRC
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रिपाद पणशिकर Tue, 03/13/2018 - 10:56 नवीन
कंठलंगोट ?????? हे काय आहे कोणि जरा सांगाल का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
M
manguu@mail.com Tue, 03/13/2018 - 11:03 नवीन
टायसाठी मराठी शब्द - कंठलंगोट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिपाद पणशिकर
आ
आनन्दा Tue, 03/13/2018 - 03:32 नवीन
अहो त्या राहुलच्या आयटीआयची काय भानगड आहे?
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Tue, 03/13/2018 - 09:29 नवीन
कोणती भानगड?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
श्रिपाद पणशिकर Tue, 03/13/2018 - 11:01 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
श्रिपाद पणशिकर Tue, 03/13/2018 - 11:02 नवीन
तो आयटिआय चा कोर्स करतोय. मशिन तयार करणार आहे. ईकडुन बटाटा टाकायचा तिकडुन सोने बाहेर. पुण्यनगरीमध्ये सोनारांनि बटाटाच्या गोदामे भरुन घ्यायला सुरुवात केलिय. २०१९ नंतर बटाट्याचे सोने होणार।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
श्रीगुरुजी Tue, 03/13/2018 - 09:36 नवीन
एकीकडे स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी करतात तर दुसरीकडे सातत्याने कर्जमाफी मागतात. परंतु कर्जमाफी हा उपाय नाही असे स्वामीनाथन् म्हणतात.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 05:38 नवीन
स्वामीनाथन कर्जमाफीला विरोध नाही असेही म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्वेता व्यास Tue, 03/13/2018 - 10:17 नवीन
मोर्चासाठी लाखोंचे फंडींग करणाऱ्यांना काही अनवाणी लोकांना साध्या चपला नाही पुरवता आल्या? की हा मोर्चा पायी असणार आहे हे त्यांना माहितीच नव्हतं? पण लाल टोप्या पुरवण्याऐवजी चपला पुरवल्या असत्या तर असे फोटो दाखवून त्याचं राजकीय भांडवल कसं करता आलं असतं ना.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 03/13/2018 - 10:42 नवीन
चपलांऐवजी लाल टोप्या आणि लाल झेंडे पुरवून स्वपक्शाची जाहिरात करणे जास्त सोपे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता व्यास
श
श्वेता व्यास Tue, 03/13/2018 - 10:51 नवीन
सहमत. चपला पुरवल्या असत्या तर त्यात काही राजकीय लाभ नाही ना. मग ज्यांचा इतका कळवळा आला आहे त्यांचे हाल होईनात का .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
M
manguu@mail.com Tue, 03/13/2018 - 11:23 नवीन
रथयात्रेत सामील झालेल्याना झेंडेच पुरवले होते ना ? की खडावा अन वल्कले पुरवली होती ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता व्यास
श
श्वेता व्यास Tue, 03/13/2018 - 12:16 नवीन
त्याचा इथे काय संबंध? आपण शेतकऱ्यांविषयी आणि त्यांच्याबद्दल असलेल्या कळवळ्याविषयी बोलत आहोत ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Tue, 03/13/2018 - 12:39 नवीन
बाजीरावाची शेंडी अहमदशहा अब्दालीला नाही लावली तर मजा कशी येणार? हवेत गोळ्या मारायच्या आणि विचारले कि उत्तर नाही द्यायचे हा मोडस ऑपरेंडी दिसतोय. -------------------------------------------- बाकी एवढा नकारात्मक प्रचार करून, मोर्चे वगैरे काढून हाताशी काही लागत नाही म्हटल्यावर काय चडफडाट होत असेल नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता व्यास
A
arunjoshi123 Wed, 03/14/2018 - 11:02 नवीन
रथयात्रेतले लोक मुलायम सिंगाला नैवेद्याचे पैशे मागायला गेले होते हे नविनच ऐकलं. =============== मंजे त्यांना पैसे पुरवलेच असणार हे तुमचं म्हणनं मान्य केलं तरी ते "मागायला" गेले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
क
कपिलमुनी Tue, 03/13/2018 - 11:33 नवीन
चप्पल घालून पायाला फोड येत नाहीत का ? मोर्चासाठी लाखोंचे फंडींग करणाऱ्यांना ?? याबद्द्लचे पुरावे द्या . उचलला हात , काढला आयडी आणि लागले पो टाकयला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता व्यास
श
श्वेता व्यास Tue, 03/13/2018 - 12:18 नवीन
इतकं कळतं तर पायाला फोड येईस्तोवर चालू नये, तेही स्वत:चं नुकसान करून दुसऱ्याच्या राजकीय फायद्यासाठी. आयडी काढण्यापूर्वी किंवा पो टाकण्यापूर्वी तुमची परवानगी घ्यावी लागते का? स्वारी मला माहिती नव्हतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Tue, 03/13/2018 - 12:27 नवीन
सातत्याने पो टाकणे हा फक्त त्यांचाच जन्मसिद्ध हक्क आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता व्यास
क
कपिलमुनी Tue, 03/13/2018 - 14:10 नवीन
हे कोणी ठरवले ? बाकी लाखोचा खर्च होता त्यचे पुरावे द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता व्यास
श
श्वेता व्यास Wed, 03/14/2018 - 08:30 नवीन
कॉमन सेन्सला पुराव्याची गरज नसावी. फंडिंग नसते तर टोप्या चालताना आकाशातून डोक्यावर येऊन पडल्या आणि झेंडे जमिनीतून उगवून हातात आले का? तेवढा कॉमन सेन्स नसेल तर मी तुम्हास पुरावे देण्यास बांधील नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
A
arunjoshi123 Wed, 03/14/2018 - 11:09 नवीन
फोडांचं काय घेऊन बसलात. अगदी ऐश करत प्रचंड सुखाचं जीवन जगताना देखील नको नको तिथे फोड येतच असतात. ================ प्रश्न असा आहे कि शक्य तितके शारीरिक त्रास कमी करायचा तर बरं असतं. दूरून चालत येणंच मोप आहे, वर मुद्दाम बिनाचपलेचं येणं वा ती मिळत असताना न घेणं, वा तोच मुद्दा बनवायचा म्हणून त्रास करून घेणं एका माईल्ड आत्महत्येसारखं आहे. =================== खर्च झालाय हे तर खरं आहे. तुम्ही देव मानत नाही तेव्हा ईश्वरानं तर फंडिंग केलेलं नसणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
च
चिर्कुट Wed, 03/14/2018 - 09:18 नवीन
मुंबईत आलेल्या फाटक्या माणसांच्या मोर्चाला झेंडे, टोप्या ,जेवण खाण ह्यासाठी “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ अस म्हणून बरेच काळजीवाहू लोक काळजीने डोक खाजवून त्यांचे प्रश्न सगळ्या रंध्रातून बदबदा वाहू राहिलेत. तर “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ ह्या लाखमोलाच्या सवालासाठी आणि शेतकरी मोर्चाच्या खर्चाच पोस्टमार्टेम करणाऱ्या ह्या काळजीवाहू लोकांच्या मेंदूला अजून खाद्य पुरवायला कोरी करकरीत प्रश्नमंजुषा. पोस्टमार्टेम क्रमांक एक दिल्लीत भाजपने नुकतच नव ऑफिस बांधल. भाजपने हे ऑफिस १७०००० वर्गफूट जमिनीवर बांधलेलं आहे.तिथल्या सुविधा आणि बांधकामाचा दर्जा ह्यावरून सहजच किंमत काढता येईल. भाजपला २०१६-१७ मध्ये कॉर्पोरेट देणग्या २९० कोटीच्या मिळाल्यात.सत्तेवर नसतानाही एवढ्याच देणग्या मिळत असतील अस गृहीत धरल आणि देशभरात होणाऱ्या पक्षीय निवडणुकाचा खर्च ह्याच निधीतून भागवला जात असेल अस गृहीत धरल तर दरवर्षी उरणारी श्रीशिल्लक नेमकी किती आणि ह्या नव्या ऑफिसच्या बांधकामाला खर्च किती आला ह्याच गणित मांडल तर “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ हा प्रश्न तिकडेही विचारायला पाहिजे. पोस्टमार्टेम क्रमांक दोन भाजपची मातृपितृ का काय म्हणतात अशी संघटना म्हणजे संघ. संघाची नोंदणी भारतातल्या कुठल्या कायद्याने झालेली आहे.१५ ऑगस्ट १९४७ पूर्वी काहीही असल तर त्यानंतर देशातल्या सगळ्या स्वयंसेवी संस्थांनी नव्या भारतीय कायद्यांनी आपापली नोंदणी केलेली असावी तशी संघाची नोंदणी कुठल्या कायद्याने झालेली आहे ? संघाला मिळणाऱ्या देणग्या नेमक्या कुठल्या कायद्याने स्विकारल्या जातात ? आता विचारा , “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ पोस्टमार्टेम क्रमांक तीन विवेकानंद फौंडेशन नावाची अजित डोभाल ( तेच ते गावठी जेम्स बॉंड ) ह्यांची संस्था अण्णांच्या आंदोलनात सक्रीय होती,तेच आंदोलन ज्यामुळे कॉंग्रेसला वेगवेगळे आरोप करून, लोकपालाचा बागुलबुवा उभारून सत्तेवरून खाली खेचल त्या आंदोलनात लोकांनी किती आणि कसा खर्च केला ? विवेकानंद फौंडेशन ला देणग्या कुठून मिळाल्यात ? आता विचारा , “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ पोस्टमार्टेम क्रमांक चार मार्च महिन्यात फक्त दहा दिवस ठराविक बँकामधून इलेक्ट्रोरल बॉंड ची विक्री सरकार करणार होत ज्याद्वारे राजकीय पक्षांना देणग्या मिळणार होत्या. शौचालय बांधण्यापासून मर्तिकाच्या सामानापर्यंत आणि जन्मापासून माणूस सरणावर चढवेपर्यंत सगळ्या ठिकाणी आधारकार्डाची सक्ती करणार सरकार ह्या बॉंडच्या खरेदीला आधार कार्ड सक्तीच नाही म्हणतय ते का बुवा ? आता विचारा , “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ आता “ हे त्यांना का विचारत नाही “ छाप प्रश्न घेऊन येणाऱ्या लोकांसाठी. शेतकरी मोर्चाला पैसे कुठून आलेत ह्याची चिरफाड करणारी लोक सरकार समर्थक असण आणि विशिष्ट राजकीय पक्ष-विचारसरणी ह्यांच्याशी संबंधित असण हा योगायोग आहे अस आम्ही समजतोय. म्हणूनच वरच सगळ पोस्टमार्टेम करायला घेतलेले पेशंट एकाच विचारसरणीशी संबंधित आहेत हाही योगायोग समजावा. आता विचारा, “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता व्यास
M
manguu@mail.com Wed, 03/14/2018 - 09:29 नवीन
हे व्हाट्सपवर फॉरवर्ड करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 10:38 नवीन
खालचे स्पष्टीकरणही व्हाट्सपवर फॉरवर्ड करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 10:37 नवीन
>>> श्रीशिल्लक नेमकी किती आणि ह्या नव्या ऑफिसच्या बांधकामाला खर्च किती आला ह्याच गणित मांडल तर “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ हा प्रश्न तिकडेही विचारायला पाहिजे. गरज नाही. ते बांधकामाचा खर्च सरकारने द्यावा अशी मागणी करून आंदोलने करीत नाहीत. >>> संघाची नोंदणी भारतातल्या कुठल्या कायद्याने झालेली आहे.१५ ऑगस्ट १९४७ पूर्वी काहीही असल तर त्यानंतर देशातल्या सगळ्या स्वयंसेवी संस्थांनी नव्या भारतीय कायद्यांनी आपापली नोंदणी केलेली असावी तशी संघाची नोंदणी कुठल्या कायद्याने झालेली आहे ? RSS is already a registered organisation with registration number 08-D 0018394. The digit code of registration is 94910. The registration has been issued under section 1860 of Indian Government and Society Registration Law 1950. https://www.google.co.in/amp/s/www.nagpurtoday.in/revealed-rss-is-already-registered-organisation-in-chandrapur/09061719/amp >>> विवेकानंद फौंडेशन ला देणग्या कुठून मिळाल्यात ? विवेकानंद फौंडेशनला देणग्या मिळाल्यात हे कोठून समजले? >>> मार्च महिन्यात फक्त दहा दिवस ठराविक बँकामधून इलेक्ट्रोरल बॉंड ची विक्री सरकार करणार होत ज्याद्वारे राजकीय पक्षांना देणग्या मिळणार होत्या. झाली का विक्री सुरू? >>> आता विचारा, “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ तेच परत विचारतो. चपलांना पैसे नाहीत, कर्ज परतफेडीला पैसे नाहीत, वापरलेल्या स्वस्त विजेचे बिल भरायला पैसे नाहीत . . . पण मग ३०-४० हजार टोप्या, ३०-४० हजार झेंडे, मोठ्या पडद्याचा चतुर भ्रमणध्वनी, कंठपट्टी इ. साठी "यवडे पैशे कुठून आले ब्वा"?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
M
manguu@mail.com Wed, 03/14/2018 - 10:48 नवीन
https://www.nagpurtoday.in/revealed-rss-is-already-registered-organisation-in-chandrapur/09061719 हो का ? संघाच्या देणगी पावतीवर नंबर असतो का ? आयुक्ताकडून ऑडिट होते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 10:53 नवीन
>>> संघाच्या देणगी पावतीवर नंबर असतो का ? नसतो का? >>> आयुक्ताकडून ऑडिट होते का ? नाही होत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/15/2018 - 12:27 नवीन
पोस्टमार्टेमवाले डॉक्टर कोठे गेले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 Wed, 03/14/2018 - 11:12 नवीन
कंचा कंपांउंडर पोस्ट मार्टम करतो ब्वा तुमच्याकडं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
क
कपिलमुनी Tue, 03/13/2018 - 11:31 नवीन
>>छत्तीसगड: नक्षलवाद्यांचा हल्ला; ९ जवान शहीद दहशतवाद्या विरोधात राबवतात तशी मोहिम नक्षलवाद्यांचा विरोधात राबवायला हवी.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 03/14/2018 - 11:22 नवीन
अहो, किती सोहराबुद्दीन टाईपच्या केसेस अमित शहा नि मोदी एका आयुष्यात झेलू शकतात? कुणाला काही हात लावला तर बोंबलायला इतके डावे आहेत कि कुणाला हात न लावणंच योग्य होईल. ========================= काल एका काँग्रेसच्या उमेदावारानं ३.३० वाजता दिल्लित मिळालेलं प्रमाणपत्र निर्वाचन आयोगाला गुजरातेत त्याच दिवशी ३.०० वाजता दिलं!!!!! हे टाईम ट्रॅव्हल कसं काय शक्य आहे म्हणून चर्चा चालू होती. काँग्रेसच्या प्रतिनिधिला खोटारडेपणा केल्याचा काही गम नव्हता. आमची चोरी तुम्ही पकडू शकला नाहीत (प्रमाणपत्र दिलंच कसं आणि घेतलंच कसं) हाच तुमचा खोटारडेपणा असं काहीतरी तो बरळत होता. ================= काश्मिरमधल्या हत्यांपेक्षा नक्षलवाद्यांनी केलेल्या हत्या कितीतरी पट आहेत इतकी मूलभूत माहीत भारतातल्या लोकांना नाही. डाव्यांच्या प्राणप्रिय अशा नक्षल्यांना कोणीही हात लावू आणि स्वतःवर खटले दाखल करून घेऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Tue, 03/13/2018 - 11:52 नवीन
फडणविसांनी पुन्हा एकदा अत्यंत प्रगल्भतेने शेतकरी मोर्चा शांतपणे हाताळून बंडोबांचा थंडोबा केला व फडणवीस सरकार घालविण्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या व फक्त आपणच शेतकर्‍यांचे कैवारी आहोत असे दाखवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार्‍या सर्व पक्षांच्या हातात वाटाण्याच्या अक्षता दिल्या. मागील ३-४ वर्षात फडणविसांना अडचणीत आणण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील निर्भया प्रकरणाचे निमित्त करून मराठ्यांना राखीव जागांसाठी सर्व जिल्ह्यातून मोर्चे काढण्यात येऊन फडणविसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले. परंतु फडणविसांनी सर्व मागण्यांना पाठिंबा देऊन मोर्चेकर्‍यांचे छुपे हेतू हाणून पाडले. शिवसेनेने पाठिंबा काढून घ्यावा म्हणून सातत्याने शिवसेनेला डिवचले जात आहे. परंतु पाठिंबा काढण्याची सेनेच्या पार्श्वभागात हिंमत नाही हे फडणवीस चांगलेच ओळखून आहेत व त्यामुळे ते सेनेच्या दबावाला अजिबात भीक घालत नाहीत. २०१५ मध्ये अवर्षणाचे व डाळींच्या भावाचे निमित्त करून फडणविसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. तोही फोल ठरला. मागील वर्षी कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांच्या संपाचे निमित्त करून जनतेला वेठीस धरून नासधूस करण्यात आली. ते आंदोलन सुद्धा फडणविसांनी शांतपणे हाताळले. कर्जमाफीची योजना जाहीर करून त्यातून धनदांडग्यांना व लबाड कर्जदारांना बाजूला ठेवल्यामुळे आंदोलनाचे निमित्त करून कर्ज बुडविणार्‍यांना चाप लागला. नंतर भीमा-कोरेगावचे निमित्त करून महाराष्ट्रात जातीय तणाव पेटविण्याचे जोरदार प्रयत्न झाले. ते प्रयत्न सुद्धा फोल ठरले. काही महिन्यांपूर्वी अडगळीत पडलेल्या यशवंत सिन्हांनी महाराष्ट्रात येऊन शेतकर्‍यांना पेटविण्याचा प्रयत्न केला. फडणविसांनी प्रगल्भतेने त्यांचाही थंडोबा केला. आता या शेतकरी मोर्चाच्या निमित्ताने भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी मोर्चाला पाठिंबा देऊन आपली राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न केला. फडणविसांनी तो प्रयत्नसुद्धा फोल ठरविला. जर या प्रकरणाचे श्रेय कोणाला मिळणार असेल तर ते मोर्चा आयोजित करणार्‍या उजव्या कम्युनिस्ट पक्षाला व भाजपलाच जाईल. आशाळभूतपणे वाट पहात असलेल्या इतर सर्व पक्षांना याचे कणभरही श्रेय मिळणार नाही. उजवा कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या मृतवत असल्याने त्यांना याचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे अंतिमतः भाजपच लाभार्थी ठरेल. ठाकरे बंधू, , पवार (थोरली व दोन्ही धाकटी पाती), अशोक चव्हाण, विखे पाटील अशा अनेकांचे मनसुबे फडणविसांनी मागील ३-४ वर्षात आपल्या प्रगल्भतेने उधळून लावलेले आहेत व त्यांना हात चोळत बसावे लागले आहे. आपली राजकीय कारकीर्द फडणविसांच्या वयापेक्षाही मोठी असून आपल्याला अशी प्रगल्भता का दाखविता येत नाही याची खंत विशेषतः पवारांना नक्की वाटत असेल. चरफडत बसलेले विरोधी पक्ष पुढील एकदीड वर्षात महाराष्ट्रात जातीय दंगली भडकावण्याचे व पुन्हा एकदा शेतकर्‍यांना पेटविण्याचे जोरदार प्रयत्न करणार हे नक्की. परंतु त्यातून फडणवीस नक्की मार्ग काढतील याची खातरी आहे.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 03/13/2018 - 14:25 नवीन
तसेही आता आश्वासन देवून त्याची पूर्तता करायला पुढची निवडणूक येईलच. गाजर दाखवायला जातय काय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
M
manguu@mail.com Tue, 03/13/2018 - 15:14 नवीन
आपले सरकार - गाजर दमदार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 03:47 नवीन
संपूर्ण प्रतिसाद LLRC
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 05:02 नवीन
तुमच्या साहेबांप्रमाणेच तुम्हीसुद्धा खजील होऊन ओशाळवाणे हसण्यापलिकडे दुसरे काहीही करू शकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 05:39 नवीन
LLRC
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 05:57 नवीन
http://www.misalpav.com/comment/986718#comment-986718
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
च
चिर्कुट Wed, 03/14/2018 - 06:24 नवीन
अहो असे हसू नका ओ आमच्या प्रगल्भ मुमंना... त्यांनी नदीच्या गाण्यात किती प्रगल्भ अभिनय केलाय पाहिलं नाही का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 03/14/2018 - 06:53 नवीन
पपेट शो.. फ्रॅकली सांगतो मला फक्त मा. मंगुटीवारांचाच अभिनय आवडला. मा.मु. ना नाही जमले. अभिनय येत नसल्याने त्या विडियोसाठी काम नव्हते करायला पाहिजे होते असे माझे वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
ब
बिटाकाका Tue, 03/13/2018 - 12:58 नवीन
त्या पब मारामारी प्रकरणातून ते श्रीराम सेनावाले सुटले म्हणे. ज्याचे विडिओ फुटेज आहेत अशा प्रकारांत असे होत असेल तर अजून काय बोलायचे? कसा व्हायचा न्याय? https://www.ndtv.com/india-news/mangalore-pub-attackers-let-off-despite-assault-video-10-points-1823220?pfrom=home-topscroll
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा