नास्तिक चळवळ : काळाची गरज ?
राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात.
मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात.
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )
धर्माच्या अतिरेकी बाजारावर नास्तिकतेचा तो़डगा, या अर्थाने नास्तिकता ही काळाची गरज आहेच.अजिबात गरज नाही. धर्माचा बाजार, धर्मात घुसडलेल्या वाईट गोष्टींचे उच्चाटन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी नास्तिकतेची अजिबात गरज नाही.धर्म ही अफूची गोळी आहे म्हणजे धर्म हे पेनकिलर आहेत.नास्तिकता ही तर हेरॉईनपेक्षाही जास्त अंमली आहे आणि ती पेनगिव्हर आहे.मग मुख्य आवश्यकता आहे ती त्यांचं धर्मावरचं मानसिक अवलंबित्व कमी करण्याची. त्यासाठी मानसोपचार हा एक घटक आहे, त्यावर ते बोलले.बापरे, म्हणजे राजीव सानेंच्या मते भाविक हे मनोरूग्ण आहेत तर. नास्तिकवाद्यांचा हाच उर्मटपणा डोक्यात जातो. मानसोपचारांची खरी गरज नास्तिकवाद्यांनाच आहे.इथे कितीही राळ उडवली गेली तरी संयमाने आणि जिद्दीने ते आपले विचार मांडत राहतात.हिट अॅण्ड रन असे अनेकांचे यशस्वी धोरण असते.खरंतर नास्तिक हे एकांडे शिलेदार असतात. ते बरेचदा ज्या सडेतोडपणे विचार मांडतात त्यामुळे ते उद्धट वाटतात.नास्तिक त्यांच्या सडेतोडपणामुळे उद्धट वाटत नसून त्यांच्या अहं ब्रह्मास्मि दंभामुळे व आस्तिकांना मूर्ख व तुच्छ लेखण्याच्या दर्पामुळे उद्धट वाटतात. खरं तर ते नुसते उद्धट वाटत नसून ते उद्धट आहेतच. नास्तिकांनी लिहिलेले कोणतेही लेख वाचा. बहुसंख्य लेखात आस्तिकांचा अंधश्रद्ध, मूर्ख, मेंदूला गंज चढलेले अशा शब्दात उपहास केलेला असतो. असा उपहास करणारे आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातील ९९.९९% प्रसंगात अंधश्रद्ध असतात व त्याची त्यांना जराही खंत वाटत नाही.धार्मिक जसे कंठशोष करून, कर्णे लावून आपापल्या दैवतांचे गुण ऐकायची, किंवा प्रार्थनेला चलण्याची (अजान) सक्ती करतात त्याप्रमाणे इथले कोणीही नास्तिकता लोकांच्या गळी उतरवण्यासाठी आसुसलेले नव्हते.कमाल आहे. साधं मिपाचं उदाहरण घेतलं तर आस्तिकता/नास्तिकता या विषयावर किती आस्तिकांनी व किती नास्तिकांनी लेख पाडलेत याचा जरा शोध घ्या. नास्तिकतावादी सातत्याने लेख पाडत असतात. गणेश विसर्जनाच्या दिवशी अंनिसचे फलक लावून नदीकाठावर गर्दी करणारे आस्तिक असतात का? जसे आस्तिक कर्णे वगैरे लावतात तसेच नास्तिकही वेगळ्या पद्धतीने आपले विचार इतरांच्या गळी उतरविण्यासाठी आसुसलेले असतात.अतिभाविकता तुमच्या अडचणी गालिच्याखाली सारत उत्तमतेचा आभास निर्माण करते, या गोष्टीला बहुसंख्य नास्तिकांचा विरोध असतो. भावनेवर आधारीत राजकारण करणारे, किंवा धार्मिकतेच्या बाजाराचा फायदा घेणारे यांचा भर धार्मिकता ही अतिभाविकतेकडे घेऊन जाण्यावर असतो.तुमच्या सर्व अडचणींसाठी आस्तिकताच कारणीभूत आहे व त्यावर नास्तिकता हाच एकमेव उपाय आहे असा आभास अतिनास्तिकता निर्माण करते.नास्तिकता ही कोणत्याच धर्माच्या विरोधात नाही.LLRCखरं तर नास्तिकांतले अर्धेजण तरी आपापल्या धर्माच्या अवडंबराला, (कोणताही) धर्म रस्त्यावर आणल्याने होत असलेल्या सक्तीच्या गैरसोईला कंटाळलेले असतात. तेव्हा ह्या गोष्टी कमी झाल्या तर नास्तिक आपले नास्तैक्य आपल्या मनात बाळगतील.रस्त्यावर धर्म आणण्यावर बंदी आणण्यासाठी धर्मावरच बंदी आणणे म्हणजे डोक्यात उवा झाल्यावर मुंडके उडविण्यासारखे आहे.कारण मुळातच जगा आणि जगू द्या हे त्यांचं तत्व असतं.तसं असेल तर तुम्ही तुमची नास्तिकता पाळा आणि आस्तिकांना त्यांची आस्तिकता पाळू दे. सातत्याने लेख पाडून नास्तिकतेचा प्रचार आणि आस्तिकतेवर आघात कशासाठी?म्हणून नास्तिकांवर झोड उठवण्यापेक्षा आस्तिकांनी आपापल्या धर्मातील अवडंबरं, धार्मिक विधी (किमान त्यात सहभागी नसणार्यांना तरी) कमीत कमी त्रास देणारे कसे होतील याकडे लक्ष देऊन त्याबाबतीत प्रबोधन केलं आणि आपल्या हळव्या भावनांची आपणच वास्तववादी चिकित्सा केली तर अश्या मेळाव्यांची गरज उरणार नाही.आस्तिकांवर झोड उठविण्याऐवजी नास्तिकांनी स्वयंचिकित्सा करून आपला अहंभाव, दांभिकता व वैचारिक ढोंग बंद केले तर नास्तिकांना उत्तर देण्याची आस्तिकांना गरजच पडणार नाही.हे उच्चाटन कसे करणार? बघा आमच्याकडे लग्न झाल्यावर सोळाव्याची पूजा झाल्यानंतर जागरण गोंधळ करावे लगते. काहींचे गॉड असते काहींचे तिखट. आता आमचे कुटुंब जवळपास माळकरी पण आमच्या परंपपरेनुसार जागरण तिखट लागते. मानतेनुसार गॉड केले तर कुलदेवतेला रुजू होत नाही. गुरुजींनी (काका) सांगितले की काही नाही कणकेचा बोकड मंत्रउपचार करून बळी दिला तर चालू शकतो. पण देव आहे (सगुण-निर्गुण म्हणा) या संकल्पनेमुळे मन (आणि सगे सोयरे) मानायला तयार नसते ना. अशा वेळेस काय करावे?कोणत्या तरी पिढीतून कोणी तरी सुरूवात करावी लागते. त्याशिवाय उच्चाटन होऊ शकणार नाही.भाविक मनोरुग्ण नसले तरी नास्तिकांपेक्षा पोससेसिव्ह असतात. तुम्ही माझ्या मते शहरात राहता म्हणून सहसा कोणी आस्तिक दुसर्यांना उपदेश करायला जात नाही पण गावाकडे माळकरी झालेले बिगरमाळकरीला इतके उपदेश देत असतात की तो पकुण जातो. माळकरी लोकांना विशेष सन्मान/आदर/विश्वास असतो, भले ते अस्सल जीवनात कसे ही वागोत.कोणी कीर्तनकार जेव्हा बिगर माळकरी सगळे बावळट अशी अवहेलना करतो तेव्हा ते सुद्धा खूप डोक्यात जातात. बाकी सासू सुनेच्या कथा एकदमच मणघडत आणि सुरस असतात. आता यात कीर्तनकारांचा दोष असे जरी म्हंटले तरी वरून खाली त्यांच्या पर्यंत तेच झिरपले असते. लोक कीर्तनकारांना धर्माचे एक पाईक आणि प्रचारक म्हणून विश्वास ठेवत असतात. इतर बाबा बुवा आचार्य, काका गुरुजी हे देखील कमी अधिक प्रमाणात हेच सांगत असतात. याला कंट्रोल कोण करणार?गावाकडे तसेही दुसर्यांच्या वैयक्तिक जीवनात लक्ष घालणारे बरेच जण आढळतात. शहरात याचे प्रमाण कमी आहे. शहरात बर्याच ठिकाणी शेजारी काय करतात यात फारसे कोणी लक्ष घालत नाही. गावाकडे मात्र चौकशा खूप असतात. या मानसिकतेतूनच माळकर्यांचे उपदेश होत असावेत.माझ्या पाहण्यात ही सर्व लक्षणे आस्तिक लोकांत जास्त प्रमाणात आढळतात.माझ्या पाहण्यात अशी उदाहरणे नाहीत. नास्तिकांनाच आपल्या नास्तिकतेचा उदोउदो करायचा असतो. त्यामुळेच नास्तिकता परीषद, पुरस्कार, नास्तिकतेवर परीसंवाद, माध्यमातून लेख पाडणे असले प्रकार मोठ्या प्रमाणात दिसतात. अगदी मिपाचंच उदाहरण घेतलं तर इथे नास्तिकतेचा उदोउदो करणारे, श्रद्धावानांवर कोरडे ओढणारे किती लेख आहेत आणि आस्तिकता, आध्यात्मिकता इ. चा उदोउदो करणारे किती लेख आहेत याचे प्रमाण पाहिले तर याचे प्रत्यंतर येईल.माझ्या मते "तुमच्या सर्व अडचणींसाठी नास्तिकताच कारणीभूत आहे व त्यावर आस्तिकता हाच एकमेव उपाय आहे असा आभास अतिआसस्तिकता निर्माण करते. घरात, देवळात, समाज्यात, प्रवचन कीर्तनात हेच ऐकायला मिळते आहे.सर्व अडचणींसाठी नास्तिकताच कारणीभूत आहे व आस्तिकता हाच सर्व अडचणींवर उपाय आहे असे सांगणारे चुकीचे सांगत आहेत.मला वाटते सामन्याला परवडेल असे जिथे खरे अध्यात्म शिकवले जाईल असे अभ्यास वर्ग असले पाहिजेत मग. तुमच्या माहितीत असेल तर कृपया सुचवा. घरदार सोडायला लावू नका फक्त.असे वर्ग कोठे चालतात याची मला कल्पना नाही.अस्तिकतेचा प्रचार करण्यासाठी गावोगावी सप्ताहाचे अवडंबर माजले आहे. सनातन, हरे कृष्णा वाले लोक वेगवेगळ्या यात्रा जत्रेत त्यांचे पोस्टर/पुस्तक घेऊन उभे असतात. दत्त स्थान असणारे पौर्णिमेला वाऱ्या घालायला फरक पडतोय असा प्रचार करत असतात. नास्तिकते वाले आताशी कुठे शहरातील कुठल्या कोपऱ्यात वर्षातून एखाद दुसरा संमेलन करताना आढळतात. त्यात त्यांना पुरस्कार वगैरे देण्यासाठी तुम्हा आम्हा आस्तिक लोकांच्या मतानुसार योग्य पैलवान सुद्धा मिळत नाही. मला वाटते आस्तिक लोकांकडे वैचारिक quality आणि quantity असताना घाबरायचे काही कारण नसावे.सप्ताह, उत्सव, काकडआरती, वारी इ. गोष्टी अनेक शतकांपासून सुरू आहेत. सनातन, हरे कृष्णावाले इ. तिथे जमलेल्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी येतात. ज्याप्रमाणे जत्रेच्या ठिकाणी अनेक तात्पुरती दुकाने लागतात, तसेच हे सुद्धा तिथे आपली पुस्तके वगैरे खपविण्यासाठी येतात.vice versa पण हवे होते. असो...निश्चितच