Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग ३०

श
श्रीगुरुजी
Wed, 04/25/2018 - 11:14
🗣 281 प्रतिसाद
स्वयंघोषित भोंदू गुरू आसारामबापूवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आसारामबापू ऑगस्ट २०१३ पासून तुरूंगात आहे. सध्या तो ७८ वर्षांचा आहे. या शिक्षेमुळे तुरूंगातच त्याची अखेर होणार हे नक्की. भारतात असे अनेक भोंदूबाबा आहेत. यांच्यामुळे हिंदू धर्माची बदनामी होत आहे. या सर्वांना पकडून अशीच शिक्षा मिळणे आवश्यक आहे. काही काळापूर्वी राम रहीम सिंग या भोंदूबाबाला सुद्धा शिक्षा झाली होती. परंतु अनेकजण अजून मोकळेच आहेत. http://indianexpress.com/article/india/asaram-bapu-rape-case-verdict-live-updates-jodhpur-judgment-court-order-5150695/

प्रतिक्रिया द्या
61097 वाचन

💬 प्रतिसाद (281)
A
arunjoshi123 Wed, 04/25/2018 - 14:23 नवीन
भावनिक दृष्ट्या खोटा दिलासा
अपघात, मृत्यू, रोग, इ इ झालेले असताना भावनिक दृष्ट्या खोटा दिलासा खूपदा दिला जातो. यांच्यावरही ४२० लावणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
भ
भंकस बाबा गुरुवार, 04/26/2018 - 05:25 नवीन
हलालाबद्दल आपले व मंगूचे मत जानून घ्यायला आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
अ
अभ्या.. Wed, 04/25/2018 - 12:58 नवीन
न्यायलयाचे, तपास अधिकार्‍यांचे, फिर्यादीची केस लढवणार्‍याचे आणि फिर्यादीचे खरोखर अभिनंदन
भारतात असे अनेक भोंदूबाबा आहेत. यांच्यामुळे हिंदू धर्माची बदनामी होत आहे. या सर्वांना पकडून अशीच शिक्षा मिळणे आवश्यक आहे.
सौ टकेकी बात. भक्त किती आहेत आणि किती कट्टर आहेत त्याचा विचार न करता खटाखट केस घातल्या पैजेत, पटापट निर्णय लागले पैजेत, झटाझट जन्मठेपा नैतर फाश्या झाल्या पैजेत. जयतु ओरिजिनल हिंदुत्व जयतु हिंदुमहिमा, बदनामी करणारे मुर्दाबाद
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/25/2018 - 19:31 नवीन
India shows jobs growth as 3.11 mn join PF in 6 months
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 04/25/2018 - 20:47 नवीन
हे हिमनगाचे टोक आहे, हयात पकोडे वाले पकडले तर ६०० कोटीचा आकडा सहज पार होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 04/25/2018 - 20:52 नवीन
धन्य आहे _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
M
manguu@mail.com Wed, 04/25/2018 - 21:13 नवीन
पकोडेवाले २-२ शिफ्टही करतात .. म्हणजे १००० कोटीही होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/26/2018 - 03:16 नवीन
मोदींविरूद्ध बोलण्याचा अजून एक मुद्दा निष्प्रभ ठरला. त्यामुळे पप्पूछाप आचरट बोलणे क्रमप्राप्त आहे. चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 04/26/2018 - 05:01 नवीन
आचरट गुरुजींचे फोटोशॉप फोटो कोणत्या कॅटोगरीत येतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
M
manguu@mail.com गुरुवार, 04/26/2018 - 05:24 नवीन
लाचरट ( लाचार + आचरट )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
M
mayu4u गुरुवार, 04/26/2018 - 06:56 नवीन
मस्त शब्द आहे. तुमच्या मिपा वरच्या कारनाम्यांना अगदी चपखल बसतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/26/2018 - 08:35 नवीन
थोडी सुधारणार. त्याच्यासाठी लोचरट (लोचट + आचरट) हे विशेषण योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/26/2018 - 08:33 नवीन
हल्लाबोल क्याटागरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 04/26/2018 - 09:09 नवीन
बरं झालं त्यानिमित्ताने तुम्ही तुमचा खोटारडेपणा कबूल केला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/26/2018 - 09:20 नवीन
म्हणजे तुमच्या साहेबांचे हल्लाबोल का डल्लामार म्हणून काहीतरी होतं ते खोटं होतं तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 04/26/2018 - 09:23 नवीन
आमचे कोणी साहेब नाहीत, स्वतःच साहेब आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गामा पैलवान Wed, 04/25/2018 - 22:23 नवीन
जेम्स वांड,
अर्थात जोधपूर कोर्टानेच गड्याला इतके ढिले केले आहे की हायकोर्टात काही चमत्कार होईल असे वाटत नाही,
आसाराम बापूंच्या कर्मचाऱ्यांवरील जुनी केस उच्च न्यायालयात टिकली नाही. ही देखील टिकेलसं वाटंत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 04/26/2018 - 07:03 नवीन
टिकली तर सुदैव, नाही टिकली तर दुर्दैव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ह
हणमंतअण्णा शंक… गुरुवार, 04/26/2018 - 08:50 नवीन
बहुतेक प्रमुख साक्षीदारांना गोळ्या घालून मारले गेले आहे, एकाला भोसकलं आहे. हे जर हायकोर्ट नजरेआड करत असेल तर हाय खावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 04/25/2018 - 22:39 नवीन
कुत्र्याला कंटाळून इम्रानखानाची तिसरी बायको घराबाहेर पडली आहे. बातमी : https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/imran-khans-third-wife-leaves-his-home-after-quarrels-over-dogs/articleshow/63912456.cms बायकोसोबत करावयची कृत्ये इम्रानने कुत्र्यासोबत केली की काय? म्हंजे मला म्हणायचं होतं की आंजारणे, गोंजारणे, जेवतांना आपल्या थाळीतून घास भरवणे, इत्यादि. -गा.पै.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 04/26/2018 - 04:25 नवीन
या केसला अनेक पैलू आहेत... ... ज्या अभागी बालिकेवर या आसारामाने स्वतस लादले ती या आश्रमात शिक्षणासाठी राहत होती. २०१३ सालच्या १५ ऑगस्टच्या रात्री तिला या आसारामाने आपल्या कक्षात बोलावून लैंगिक अत्याचार केले. तिला बाधा झाली आहे आणि बापूंच्या ‘खास प्रसादा’ने ती दूर होईल असे सांगत आसारामच्या महिला सहकाऱ्याने या मुलीस बाबाकडे जाण्यास भरीस पाडले. हे घृणास्पद कृत्य येथेच संपत नाही. त्यानंतर या मुलीने तक्रार दाखल करू नये म्हणून त्याने जंगजंग पछाडले. अनेकांना धमकावले, तिच्या कुटुंबीयांना दरडावले, इतकेच नव्हे तर या प्रकरणातील काही साक्षीदारांना यमसदनास पाठवले गेले. परंतु तरीही हे कुटुंब दबले नाही. ही मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेच्या मुख्याध्यापकास धमकावण्यापर्यंत आसाराम आणि त्याच्या भक्तगणांची मजल गेली. या मुख्याध्यापकावर दबाव कसला? तर सदर मुलीची जन्मतारीख अशी बदलायची की ती सज्ञान ठरू शकेल. आणि तशी ती सज्ञान ठरवली गेली की अल्पवयीनांवरील अत्याचार या आरोपाचे रूपांतर दोन सज्ञानींत परस्परांच्या संमतीने झालेला व्यवहार असे करता येईल. परंतु या शाळेच्या मुख्याध्यापकांनीदेखील कच खाल्ली नाही. अशा तऱ्हेने सर्व संबंधितांच्या निर्धाराने हे प्रकरण धसास लागले आणि आसारामवरील आरोप सिद्ध झाले. या खेरीज आणखीही दोन महिलांनी आसारामवर बलात्काराचा आरोप केलेला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रिपाद पणशिकर गुरुवार, 04/26/2018 - 01:20 नवीन
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर गुरुवार, 04/26/2018 - 01:20 नवीन
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर गुरुवार, 04/26/2018 - 01:22 नवीन
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर गुरुवार, 04/26/2018 - 01:23 नवीन
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर गुरुवार, 04/26/2018 - 01:23 नवीन
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 04/26/2018 - 07:24 नवीन
 मुझफ्फरनगरमध्ये दंगलीपूर्वी आयोजित महापंचायतीत साध्वी प्राची, भाजपाचे खासदार कुँवर भारतेंद्र सिंह आणि संजीव बालयन तसेच आमदार उमेश मलिक, संगीत सोम आणि सुरेश राणा यांनी द्वेष पसरवणारी जहाल भाषणे केली होती. खून, जातीय हिंसाचार यासारखे तब्बल १३१ खटले मागे घेतल्यानंतर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने आता साध्वी प्राची आणि भाजपाच्या दोन नेत्यांवरील प्रक्षोभष भाषण केल्याप्रकरणी दाखल असलेले खटले मागे घेण्याची तयारी सुरु केली आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर आणि श्यामली जिल्ह्यातील जातीय हिंसाचारप्रकरणी खुनाच्या १३ प्रकरणांसह तब्बल १३१ खटले मागे घेण्याची प्रक्रिया योगी सरकारने सुरु केली आहे. यापाठोपाठ आता मुझफ्फरनगरमध्ये दंगलीपूर्वी आयोजित महापंचायतीत साध्वी प्राची, भाजपाचे खासदार कुँवर भारतेंद्र सिंह आणि संजीव बालयन तसेच आमदार उमेश मलिक, संगीत सोम आणि सुरेश राणा यांनी द्वेष पसरवणारी जहाल भाषणे केली होती. बालयन हे २०१७ पर्यंत केंद्रात तर राणा हे उत्तर प्रदेशमध्ये मंत्री होते. कावल गावात शाहनवाझ याच्या हत्येनंतर सचिन आणि गौरव यांची बेदम मारहाणीत हत्या झाली होती. त्या मुद्द्यावरुन ही महापंचायत आयोजित करण्यात आली होती. या तीन हत्यानंतर ७ सप्टेंबर २०१७ रोजी जिल्ह्यात हिंसाचाराचा उद्रेक झाला होता.  या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. https://www.loksatta.com/desh-videsh-news/muzaffarnagar-violence-yogi-government-to-withdraw-hate-speech-cases-against-sadhvi-prachi-1669547/
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 04/26/2018 - 07:40 नवीन
एखादा माणूस किंवा संत हिंदू आहे म्हणून त्याचा गुन्हा किंवा तो मुसलमान आहे म्हणून त्याचा गुन्हा जास्त होत नाही. दुर्दैवाने डावे आणि काँग्रेस यांनी मुसलमान (किंवा अल्पसंख्याक) यांच्या मतपेटीसाठी त्यांच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करण्याची आणि हिंदू गुन्हेगारांचे गुन्हे बटबटीत पणे पुढे आणण्याची वृत्ती बाळगली. उदा याकूब मेमन किंवा अफझल गुरु चे समर्थन आणि अस्तित्वात नसलेला हिंदू दहशतवाद आता कडवे हिंदुत्ववादी तीच उलट तर्हेने वापरताना दिसतात. गुन्हेगार हा गुन्हगारच आहे मग तो कोणत्याही जातीधर्माच्या असो. त्याचे समर्थन करणे हि चूकच ठरेल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/26/2018 - 08:07 नवीन
+१०० गुन्हेगार मग तो कोणत्याही धर्म, पंथ, जात इत्यादीचा असला तरी त्याला एकाच तराजूत मोजले गेले पाहिजे. पूर्णविराम. याबाबतीत, भारतिय पुरोगामी व माध्यमे फार तोकडी... किंबहुना सक्रियपणे एकांगी (partial) आहेत यात अजिबात वाद नाही. गेल्या सहा महिन्यांत अनेक दुदैवी घटना घडलेल्या असताना राजकिय सोईच्या केवळ निवडक दोन घटना घेऊन त्यांच्यावरून भारतात व परदेशात (केवळ पंतप्रधानांचा दौरा चालू असलेल्या काळात व दौरा असलेल्या दोनच देशांत) आकांडतांडव केले गेले आणि दौरा संपताच एकाएकी सामसून झाली, हे का केले गेले ते कळायला फार मोठी बुद्धी लागणार नाही ! :( अश्या राजकारणाने प्रेरित कृतीमुळे, बलात्कारासारख्या निर्घृण गुन्ह्यांच्या खरेपणा/महत्वाबद्दल सर्वसाधारण जनमानसात संशय/उदासिनता निर्माण होते. त्याचबरोबर, त्याच काळात घडलेल्या इतर अनेक व विशेषतः खालील दोन घटना केवळ राजकियदृष्ट्या सोईच्या नसल्याने, त्यांची मुख्य माध्यमांत फारशी दखलही घेतली गेली नाही, इतका एकांगीपणा तथाकथित पुरोगामी लोकांच्या नैतिक दिवाळखोरीचे लक्षण तर आहेच, पण, ते ज्या लोकशाहीच्या नावाने गळे काढतात त्याच लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे आहे. Lured to Ghaziabad, survivor says she was raped by juvenile and maulvi Catholic priest in Kerala arrested for raping minor girl
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मराठी_माणूस गुरुवार, 04/26/2018 - 07:52 नवीन
ह्या खटल्यात ती मुलगी, तीचे कुटूंबीय, वकील, मुख्याध्यापक हे खंबीर राहीले त्या मुळेच शिक्षा होउ शकली.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 04/26/2018 - 08:41 नवीन
वरील साध्याशा पोष्टमध्ये दोन गोष्टी समजल्या नाहीत. १. >>स्वयंघोषित भोंदू गुरू आसारामबापूवर… त्यांच्या अनुयायांनी, भक्तांनी त्यांना गुरू केले अाहे. मोठमोठे लोक, अाजी माजी प्रधानमंत्र्यांबरोबर त्यांची छायाचित्रे जालावर दिसत अाहेत. त्यामुळे ’स्वयंघोषित’ म्हणजे काय? २. तुंम्हाला ‘स्वयंघोषित’ नसलेला व भोंदू नसलेला कोणी बाबा, महाराज माहिती अाहे का? प्रश्न गंभीरपणे विचारलेले अाहेत. तुमच्या उत्तराची अपेक्षा अाहे.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 04/26/2018 - 13:03 नवीन
ते ट्रोलिंगवरून भांडणाचं सोडा. अामच्या सिन्सिअर प्रश्नांना पण उत्तरे द्या की जरा. का फक्त भाजपा, मोदी हे शब्द असले तरच उत्तरे देता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/26/2018 - 13:37 नवीन
सध्याच्या काळात असे निस्वार्थी, स्वयंघोषित नसलेले कोणी आहेत का याची कल्पना नाही. पूर्वी असे अनेकजण होऊन गेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 13:33 नवीन
१. वैयक्तिकरित्या ते स्वयंघोषित वगैरे बकवास वाटते. एक दिवस अचानक उठून एखाद्या बाबाने उठून मी देव/देवाचा माणूस आहे म्हणून घोषणा केली आणि भक्त मागे लागले असे प्रतीत होते. २. तस्मात, सयंघोषीत तर माहित नाही पण भोंदू बरेच जण वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
M
manguu@mail.com गुरुवार, 04/26/2018 - 08:43 नवीन
आसारामच्या प्रॉपर्टीचे काय होणार ?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 04/26/2018 - 08:47 नवीन
ओरिजनल हिंदू धर्माकडे जाणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com गुरुवार, 04/26/2018 - 08:49 नवीन
म्हणजे शून्यातून शून्याकडे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सुबोध खरे गुरुवार, 04/26/2018 - 12:03 नवीन
तुम्हाला "शून्य" कळलं आहे का? कोठेही हिंदु धर्म शब्द आला कि पिचकारी मारायची हि वाईट खोड सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 12:07 नवीन
अतिशय निषेधार्ह्य वक्तव्य आहे. निषेध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 04/26/2018 - 08:52 नवीन
भारतीय मिडीयात जो पर्यंत बाबा, गुरु, स्वामी व इतर बाबा लोक एकाद्या गुन्हेगारी प्रकरणात अडकत नाहीत तो पर्यंत ते स्वंयभू असतात, मात्र असे लोक जेंव्हा गुन्हेगारी प्रकरणात अडकतात त्यावेळी ते स्वयंघोषित भोंदू वगैरे होतात. आता याच भारतीय मिडीयाने ह्या आसारामच्या सत्संग वगैरेचे जाहिराती करुन काय कमी पैसा मिळवलाय. -- आता नरेंद्र मोदी ज्यावेळी या आसारामला भेटले व त्याची स्तुथी केली, त्यावेळी त्याच्यावर सध्या असलेल्या आरोपांपैकी एकही आरोप नव्हता. मात्र आता त्याच व्हिडीओ क्ल्पिप व्हायरल करुन नरेंद्र मोदींनी बलात्कारी बाबा आसारामाची कशी स्तुथी केली होती, हे मिडीयात दाखवत नरेंद्र मोदीं बलात्कार्‍यांचे समर्थक आहेत असे चित्र आज काही मिडीया चॅनेल व काही वर्तमानपत्र पसरवत आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 10:36 नवीन
आसारामांनी गुन्हा केला, त्यांना शिक्षा मिळाली, आनंद आहे. असे अजून अनेक बाबा बुवा कसले कसले गुन्हे करत असतील, सगळ्यांना आत घातला पाहिजे. ---------------------------------------------- त्यांनी हा गुन्हा केला त्यानंतर त्यांना फॉलो करणे, त्यांचे समर्थन करणे वगैरे आक्षेपार्ह्य असू शकते पण हा गुन्हा घडायच्या आधी कोणी त्यांना मानत असेल तर आज तुम्हाला लाज वाटते का तुम्ही अशा माणसाला फॉलो करता वगैरे विचाराने अत्यंत बालिशपणाचे आहे असे मला वाटते. सोशल मीडियावर वर फिरत असलेली ती मोदींची चित्रफीत, गांधींचे फोटो वगैरे सगळं थिल्लरपणा वाटतो. असल्या बाबतीत कसलाही विचार नसणारे लोक इतर लोकांच्या विचारांची दिशा ठरवणार? --------------------------------------------- एका बाजूला न्यायव्यवस्था मोदींच्या इशाऱ्यावर चालते म्हणायचं, दुसऱ्या बाजूला मोदींनी आसारामांची स्तुती केली आहे आणि ते त्यांचे गुरु आहेत म्हणायचं आणि मग मोदींनी स्वतःच्या गुरुलापण वाचवले नाही म्हटले कि गुन्हा २०१३ ला दाखल झाला, ते मुख्याध्यापक, कुटुंबीय स्ट्रॉंग होते म्हणून मोदींना पॉसिबल झाला नाही म्हणायचं. कशाचा कशाला मेळ नाही. -------------------------------------------- सुप्रीम कोर्टात हे महाशय सुटले तर त्यांना निर्दोष मानायचं कि नाही? म्हणजे जसजसं वरच्या कोर्टात जाल तसतसं जेष्ठ न्यायमूर्ती असतात आणि म्हणून योग्य न्याय मिळू शकतो अशी माझी धारणा होती. ती चुकीची आहे काय?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 04/26/2018 - 10:45 नवीन
त्यांनी हा गुन्हा केला त्यानंतर त्यांना फॉलो करणे, त्यांचे समर्थन करणे वगैरे आक्षेपार्ह्य असू शकते पण हा गुन्हा घडायच्या आधी कोणी त्यांना मानत असेल तर आज तुम्हाला लाज वाटते का तुम्ही अशा माणसाला फॉलो करता वगैरे विचाराने अत्यंत बालिशपणाचे आहे असे मला वाटते. सोशल मीडियावर वर फिरत असलेली ती मोदींची चित्रफीत, गांधींचे फोटो वगैरे सगळं थिल्लरपणा वाटतो. असल्या बाबतीत कसलाही विचार नसणारे लोक इतर लोकांच्या विचारांची दिशा ठरवणार?
हा ना, फोटो वगैरे थिल्लरपणा सोडा, ते जुने असले तरी असली तरी आहेत, काहीजण तर चक्क असल्या थिल्लर गोष्टींसाठी फोटोशॉप वापरुन सोशल मिडीयावर वापरतात हो असले खोटे पुरावे म्हणून. काय बोलायचे सांगा त्यांना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
क
कपिलमुनी गुरुवार, 04/26/2018 - 10:49 नवीन
लै रक्त आटवू नकोस ! शांतीला धर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ज
जेम्स वांड गुरुवार, 04/26/2018 - 11:14 नवीन
लेका धंदेवाला आहेस, शब्दाला वजन असते शूट मध्ये धंदा करणाऱ्याच्या, उगाच ते खर्च करून अडग्यांची मार्केट व्हॅल्यु कश्याला वाढीवतोस मर्दा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अभ्या.. गुरुवार, 04/26/2018 - 11:17 नवीन
ओके सांगलीकर, ओके सातारकर (का वाईकर?) ;) आपका हुक्म सर आंखोपर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
क
कपिलमुनी गुरुवार, 04/26/2018 - 10:48 नवीन
जेव्हा आसाराम वर कोणतेही गुन्हे दाखल नव्हते त्या काळातले एकत्र असण्याचे व्हिडीओ पब्लिश करणे चुकीचे आहे. आसारामचे किंवा राम रहीम चे लाखो फॉलोअर होते , त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणे किंवा त्याला बोलवणे ही नॉर्मल गोष्ट आहे . त्यावरून दंगा करायची गरज नाही. सध्या त्यांनी आसारामचे समर्थन केलेले नाही ही चांगली गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 04/26/2018 - 12:09 नवीन
असेच म्हणतो फॉलोअर असायची गरज नाही. एकदा कधीतरी आस्था चॅनेल लागला होता आणि रिमोट सापडत नव्हता तेंव्हा आसाराम बापूंचे कीर्तन लागले होते . कुतूहल म्हणून मी ते पाहिले. ते बोलतात अतिशय चांगले हि वस्तुस्थिती. बाकी अध्यात्म हे मला कळत नाही किंवा त्यात रस हि नाही. पण केवळ उत्तम वक्ता आहे म्हणून एखादा त्यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाला गेला आणि त्यांच्या पाया पडला तर तो त्यांचा भक्त झाला असे सिद्ध करण्याची लोकांना एवढी खाज का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 12:18 नवीन
पण मी काय म्हणतो, भक्त असला तरी काय प्रॉब्लेम आहे? तो त्यांच्या प्रवचनाचा किंवा अध्यात्मिक गोष्टींचा भक्त असू शकेल ना? पण भक्त आहे म्हणून तो लगेच त्यांच्या बलात्काराच्या कृतीला समर्थन देईल काय? मग ते सिद्ध करण्याची एवढी उर्मी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अभ्या.. गुरुवार, 04/26/2018 - 12:23 नवीन
पण केवळ उत्तम वक्ता आहे म्हणून एखादा त्यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाला गेला आणि त्यांच्या पाया पडला तर तो त्यांचा भक्त झाला असे सिद्ध करण्याची लोकांना एवढी खाज का?
हा ना, आणि चक्क तेही फोटोशॉप केलेले फोटो टाकून सिध्द करतात हो, काय म्हनायचे आता सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कपिलमुनी गुरुवार, 04/26/2018 - 10:55 नवीन
सर्व धर्मातले सध्याचे बाबा , संत ,मुल्ला लोकांना चुत्या बनवत असतात .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा