Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग ३०

श
श्रीगुरुजी
Wed, 04/25/2018 - 11:14
🗣 281 प्रतिसाद
स्वयंघोषित भोंदू गुरू आसारामबापूवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आसारामबापू ऑगस्ट २०१३ पासून तुरूंगात आहे. सध्या तो ७८ वर्षांचा आहे. या शिक्षेमुळे तुरूंगातच त्याची अखेर होणार हे नक्की. भारतात असे अनेक भोंदूबाबा आहेत. यांच्यामुळे हिंदू धर्माची बदनामी होत आहे. या सर्वांना पकडून अशीच शिक्षा मिळणे आवश्यक आहे. काही काळापूर्वी राम रहीम सिंग या भोंदूबाबाला सुद्धा शिक्षा झाली होती. परंतु अनेकजण अजून मोकळेच आहेत. http://indianexpress.com/article/india/asaram-bapu-rape-case-verdict-live-updates-jodhpur-judgment-court-order-5150695/

प्रतिक्रिया द्या
61097 वाचन

💬 प्रतिसाद (281)
श
श्रीगुरुजी Fri, 04/27/2018 - 14:01 नवीन
मुद्दे आटोपले कि डू आयडी, समर्थन वगैरे फालतू मुद्दे बाहेर यायला लागतात हे एक निरीक्षण आहे + २० लाख याबरोबरीने त्रागा, आदळआपट, आकांडतांडव, "मी" "मी" ची जपमाळ इ. फालतू मुद्दे सुद्धा पुढे येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/26/2018 - 16:47 नवीन
मी बिटाकाका नाही. इथे उत्तर दिले आहे. बहुतेक वाचनात आले नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 04/26/2018 - 17:07 नवीन
दक्षिणेत एक सदगुरू(जग्गी वासुदेव) क्रिया योग, ईनर इंजिनियरिंग वगैरे वर क्लासेस घेत असतात. जगातल्या जवळपास कोणत्याही विषयावर ते अधिकारवाणीने बोलतात. कुणा मिपाकरास अनुभव आहे का ?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 04/26/2018 - 17:39 नवीन
भारताचे पहिले पंतप्रधान , मॉर्फ नाही https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/magazines/panache/when-google-search-was-confused-about-indias-first-pm/amp_articleshow/63925555.cms
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 18:31 नवीन
कुठलेही अर्धवट ज्ञान वाईटच. इंडिया फर्स्ट पीएम सर्च केल्यावर गूगल त्यांच्या अल्गोरिथम नुसार विकिपीडियाच्या "लिस्ट ऑफ इंडियन पीएम्स" या पेजवर असलेला फर्स्ट पीएमशी निगडित नेहरूंचा उतारा हायलाईट मध्ये दाखवत आहे. या पेजवर एकच फोटो आहे "भारताचे सध्याचे पंतप्रधान मोदी" असा. आता यात गुगल आणि विकिपीडिया दोन्ही साईट्स आपापल्या जागी बरोबर असून हा कसलाही एरर नाही. पण भक्तांना नाचायला लागतेच काय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
सुखीमाणूस गुरुवार, 04/26/2018 - 18:46 नवीन
विरोधकांची रुदाली व्हायला पण तेच कारण पुरते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 19:17 नवीन
मला विरोधी पक्षातले भक्तच नाचत आहेतअसे अभिप्रेत होते :):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
थ
थॉर माणूस गुरुवार, 04/26/2018 - 19:47 नवीन
>>>आता यात गुगल आणि विकिपीडिया दोन्ही साईट्स आपापल्या जागी बरोबर असून हा कसलाही एरर नाही. एका अर्थाने हा ग्लिच आहे, कारण सर्च जर पहिल्या पंतप्रधान (किंवा कोणताही मंत्री) यासाठीचा असेल तर फोटोसुद्धा त्याप्रमाणे फेच व्हायला हवा होता, पण तो मात्र सध्याच्या पदावरील व्यक्तीचा होतोय. कारण गुगल या क्वेरीसाठी विकीपिडीयावरून "List of Prime Ministers of India" फेच करत होते आणि सर्वात पहीला फोटो दाखवत होते जो सध्याच्या पंतप्रधानांचा (किंवा ज्या पदाची यादी आहे त्यातील सध्याच्या व्यक्तीचा) असतो. इथे गुगलने त्याच पेजवरील खालच्या यादीतून फोटो उचलायला हवा होता. ग्लिच नसता तर गुगलने फिक्स केला नसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 20:33 नवीन
असेलही, ग्लिच होता आणि तो गुगल ने फिक्स केला की विकी पेज अपडेट झाले कळले नाही. ****************** पण तरीही यात अगदी गुगलला "यु आर सो फुल ऑफ जंक" म्हणण्यासारखे काय कळले नाही. मोदी दिसले की जल्ला ऍसिडीटीच होते काही लोकांना. मंग गुगल पण मोदीला सामील...लै मज्जा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
थ
थॉर माणूस Fri, 04/27/2018 - 02:18 नवीन
गुगलने फिक्स केला तो, आता ते फोटोसाठी वेगळी युआरएल वापरतायत (अमेरीकन प्रेसिंडेंटसाठी असलेल्या स्टेप्ससारखी). विकीपेज पाहीले की कळते ना लगेच, पेज तसेच आहे अजून म्हणजे विकीपेजचा काहीच संबंध नाही, सोपं आहे फार पडताळणे. त्यामुळे कसलाही एरर नाही वगैरेला काहीही अर्थ नाहीये, जिथून कुठून माहिती मिळाली आहे त्याकडे कृपया दुर्लक्ष करा. >>>पण तरीही यात अगदी गुगलला "यु आर सो फुल ऑफ जंक" म्हणण्यासारखे काय कळले नाही. असते हो एकेकाची सवय, धड काय झालंय हे कळलेलं नसताना अर्धवट ज्ञानावर काहीही दावे करतात लोक. काय माहिती गुगलला योग्य आणि अचूक माहितीचा एकमेव स्त्रोत समजणारे बरेच लोक असतील ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील कदाचित. आपण उगाच अर्थ काढायचे नाहीत त्यातून. जमेल तशी योग्य माहिती पुरवायची आणि शांतपणे बाजूला बसायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 04/27/2018 - 03:52 नवीन
मेक्स सेन्स!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
ब
बिटाकाका Fri, 04/27/2018 - 06:18 नवीन
बादवे, आता परत चेक केलं तर तो ग्लिच फिक्स झालेला दिसत नाही. अजूनही सर्च तोच फोटो दाखवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 04/26/2018 - 19:47 नवीन
अमेरिकेचे पहिले अध्यक्ष किंवा इंग्लंडचे पहिले पंतप्रधान गुगलून बघा. तिकडे अगदी शिस्तीत दाखवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 20:39 नवीन
बरं मग??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 04/26/2018 - 19:53 नवीन
कुठलेही अर्धवट ज्ञान वाईटच. ज्ञान काढायची गरज नाही. भारी पडेल तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 20:39 नवीन
तुम्ही भक्त आहात का? मंग बळजबरी स्वतःवर का ओढून घ्यालाव? आन वरून धमकी पण... ------------------------ मी सर्वज्ञानी आहे असा माझा अजिबात दावा नाही. भारी पडलं तरी माझं अर्ध ज्ञान पूर्ण करायला आवडतं आपल्याला. त्यामुळे निवांत रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
M
mayu4u Fri, 04/27/2018 - 07:50 नवीन
आता बिटाकाकांना पोकळ बांबूचे फटके मिळणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
M
manguu@mail.com गुरुवार, 04/26/2018 - 20:02 नवीन
मी पंतप्रधानांची यादी पहायला ते पेज पाहिले होते. त्यात विद्यमान म्हणून मोदीजींची माहिती सर्वात वर आहे. बाकी यादी खाली आहे. असो. वाचणारा नुसता फोटो पहायला ते पेज तसेही बघणार नसतो. बाकी माहिती बरोबर आहे. शिवाय , विकि अपडेट हे जनता करत असते. कुणीतरी अतीप्रेमाने केले असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 04/26/2018 - 20:17 नवीन
आपल्याच साईटवर इंधनाचे दर कोण लपवतय?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 04/27/2018 - 06:31 नवीन
https://www.mypetrolprice.com/3/0/Mumbai-Petrol-Price-Chart हे घ्या गेल्या १७ वर्षाच्या किमती पेट्रोल डिझेल सी एन जी आणि ऑटो एल पी जी च्या सर्व देशातील सर्व शहरातील किमती. एकदाचा आत्मा थंड होउ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
प
प्रसाद_१९८२ Fri, 04/27/2018 - 06:54 नवीन
एकदाचा आत्मा थंड होउ दे.
--- Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Fri, 04/27/2018 - 07:27 नवीन
मोदी पंतप्रधान असेपर्यंत त्यांचा आत्मा थंड होईल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मार्मिक गोडसे Fri, 04/27/2018 - 08:03 नवीन
चार पाच दिवसांपूर्वी ह्या साईटवर ही माहिती नव्हती, लोकांनी आवाज उठवला आता एक एक साईट लपवलेले दर दाखवू लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
A
arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 08:14 नवीन
???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
प
प्रसाद_१९८२ Fri, 04/27/2018 - 08:15 नवीन
लोकांनी आवाज उठवला आता एक एक साईट लपवलेले दर दाखवू लागले.
-- इतर लोकांचे जाऊद्या, मिसळपाव साईटवर, गतकाळच्या पेट्रोल-डीजेलच्या दराबाबत तुम्हीच इतका जोरात आवाज उठवलात की, सरकारला घाबरुन मागचे सर्व दर प्रत्येक साईटवर जाहिर करावे लागले. :)) --- तुमचे, अभिनंदन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
A
arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 08:16 नवीन
तुमचं शिक्षण किती झालंय विचारायची सोय नाही कारण सामाजिक संकेत म्हणतो कि तो वैयक्तिक हल्ला ठरेल. पण तोच सर्वात उचित प्रश्न आहे. विचारावा कि विचारू नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
सुबोध खरे Fri, 04/27/2018 - 08:18 नवीन
गोडसे बुवा कशाला थापा मारताय? मी अगोदरही पाहिले होते. म्हणूनच तुम्हाला लिहिलं होतं कि चमच्याने भरवायची अपेक्षा कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Fri, 04/27/2018 - 11:24 नवीन
तुम्हीही तेव्हा काही दुवे दिले होते इकडे टिचकी मार तिकडे टिचकी मार ,मग मिळेल मागील ४ वर्षाचे इंधन दर. जेव्हा तेथे उपलब्ध नाही असं सांगितले तेव्हा तुम्ही गप्प बसलात. आज त्या साईटने खुले केले तेव्हा आले उड्या मारत मला दाखवायला. एकदा चमच्याने भरावयाचे नाही हे ठरवलं तर ठाम राहायचं होतं ना. तुमचा खोटेपणा उघडकीस आला. सरकार खोटे आणि त्याचे समर्थकही खोटे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 04/27/2018 - 16:32 नवीन
हायला झक मारली आणि तुम्हाला दुवे शोधून दिले असे वाटायला लागले आहे. वर तुम्ही म्हणताय माझा खोटेपणा उघडकीस आला? काय खोटेपणा केला आणि कुठे सरकारचे समर्थन केले आहे ते एकदा कळेल का? बाकी माझ्याबद्दल "अशी टिप्पणी' केल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
अ
अर्धवटराव Fri, 04/27/2018 - 05:30 नवीन
धाग्याचं नाव काय, तर ताज्या घडामोडी. इथे चाललेला राडा ताजा नाहि, घडामोडीचं तर बोलायलाच नको. व्युत्पन्न मिपा, जागा हो !!
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 07:25 नवीन
१९३० ते १९५० चा मिडीया आजच्यासारखा सनसनीप्रिय राहिला असता तर महात्मा गांधी सुद्धा आसारामासारखेच कुख्यात म्हणून प्रसिद्धी पावले असते.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 04/27/2018 - 07:34 नवीन
असहमत! निषेधार्ह्य वक्तव्य, निषेध! ---------------------------- आपल्याला असे का वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 08:17 नवीन
गांधीजी आपल्या मायनर नातींसोबत नागडे झोपायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ज
जेम्स वांड Fri, 04/27/2018 - 08:46 नवीन
हे आजच्या कायद्यानुसार बलात्कारात मोडेल का? कसे ? का? जर मोडणार नसेल तर आसाराम अन मोहनदास करमचंद गांधी ह्यांच्यात साम्य कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 09:07 नवीन
मी बलात्कार हा शब्द वापरला नाही. कुख्यात केले असते असे म्हणालो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
प
प्रसाद_१९८२ Fri, 04/27/2018 - 08:50 नवीन
तो एक 'प्रयोगा'चा भाग होता. त्याला बलात्काराशी जोडणे कितपत योग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 09:21 नवीन
https://www.indiatoday.in/magazine/cover-story/story/20130617-mahatma-gandhi-experiment-sexuality-manuben-discovered-diaries-763997-1999-11-30 कदाचित त्यापेक्षा वाईट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 04/27/2018 - 09:56 नवीन
गांधीजी आपल्या मायनर नातींसोबत नागडे झोपायचे.
तो एक प्रयोगाचा भाग होता व ती बाब गांधीनी कधीही लपवून ठेवली नाही. कविता करणारे माजी पंतप्रधान ,परराष्ट्र मंत्री असताना फक्त बाई,बाटलीत मग्न असायचे असे सुब्रमण्यम स्वामीनी म्हंटले होते. भाजपाचे 'मोबाईल' नेते म्हणून प्रसिद्ध असणारे एक नेते पत्नीस सोडून एका महिला पत्रकारासमवेत जगाच्या सफरीवर गेले होते. दुसर्या एकाचे तमाशा नर्तकीबरोबर संबंध होते. हे तिघेही संघाच्या खास 'राष्ट्रवादाच्या' मुशीत वगैरे तयार झालेले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
M
manguu@mail.com Fri, 04/27/2018 - 10:35 नवीन
एका माजी कविताकाराच्या घरी कुणी राजकन्या रहायची म्हणे. आणि हेच भाजपे काँग्रेसवाल्यांच्या घराचे कौल काढून आत बघतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 04/27/2018 - 11:02 नवीन
हा हा हा. खरे आहे रे ते मंगू. http://www.rediff.com/news/report/mrs-kaul-here-you-dont-know-who-i-am/20140505.htm असो. हा 'ताज्या घडामोडींचा' धागा आहे. शिळ्या घडामोडी येथे नकोत असे ह्यांचे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 11:48 नवीन
लोकांची "प्रकरणे" असू नयेत हा अजबच मूर्खपणा ऐकत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष सामूहिक बलात्कार करतात ते चूक आहे. प्रकरण असण्यात काही चूक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 04/27/2018 - 12:10 नवीन
मग राहूल गांधींना अटक का करत नाहीत राजनाथांचे पोलिस?सी,बी.आय? की ते राहूलला घाबरतात? अफवा पसरवायच्या, विकृत आनंद मिळवायचा व प्रकरण अंगाशी आले की धूम ठोकायची... नेहरूंनी सुभाषचंद्र बोसांना मारले.. काँग्रेस सरकार गुप्त कागदपत्रे जाहीर करीत नाही.. आता चार वर्षे सत्तेवर आहेत.. काय झाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 12:13 नवीन
नेहरूंनी सुभाषचंद्र बोसांना मारले.. काँग्रेस सरकार गुप्त कागदपत्रे जाहीर करीत नाही.. आता चार वर्षे सत्तेवर आहेत.. काय झाले?
१. बोस कोण्या विमान अपघातात मेलेले नाहीत २. नेहरू त्यांच्यावर पाळत ठेवत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
A
arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 12:29 नवीन
मग राहूल गांधींना अटक का करत नाहीत राजनाथांचे पोलिस?सी,बी.आय? की ते राहूलला घाबरतात? अफवा पसरवायच्या, विकृत आनंद मिळवायचा व प्रकरण अंगाशी आले की धूम ठोकायची...
राहुलच्या केसमधे काँग्रेसने पेरलेल्या जजांनी केसदेखील अ‍ॅडमिट करून घेतली नाही. (ह्या जजांनी आजही न्यायव्यवस्थेची सगळी आब्रू विकून काँग्रेसची सेवा चालू ठेवली आहे.). न्यायव्यवस्था काँग्रेसच्या काळात इतकी दुबळी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 04/27/2018 - 14:08 नवीन
खोट्या चकमक प्रकरणात अमित शहांना दिलासा देणारे न्यायाधीश पी. सदाशिवम केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले जातात हा योगायोग ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 14:24 नवीन
म्हणजे राहुल गांधी बलात्कारी आहे हे तुम्हाला मान्य आहे!!! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
A
arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 11:44 नवीन
ती बाब गांधीनी कधीही लपवून ठेवली नाही.
म्हणून ती योग्य ठरत नाही.
असे सुब्रमण्यम स्वामीनी म्हंटले होते.
ह्यांनी म्हटलेले सगळे खरे मानता का?
भाजपाचे 'मोबाईल' नेते म्हणून प्रसिद्ध असणारे एक नेते पत्नीस सोडून एका महिला पत्रकारासमवेत जगाच्या सफरीवर गेले होते. दुसर्या एकाचे तमाशा नर्तकीबरोबर संबंध होते. हे तिघेही संघाच्या खास 'राष्ट्रवादाच्या' मुशीत वगैरे तयार झालेले..
ह्या बायका १८+ असतील तर हे सगळं आधुनिक आधुनिक नव्हे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 04/27/2018 - 11:54 नवीन
प्रश्न आधुनिकतेचा नाही रे अरूण. नैतिकतेचा टेंभा मिरवत 'गिरी तो भी टांग उपर' करणार्या लोकांचा आहे. सुब्रमण्यम स्वामीच नव्हे तर अनेकांनी ह्याविषयी लिहिले आहे. भाजपाच्या आतील गोटातल्या लोकांना(आता बरेचसे मार्गदर्शी मंडळात असतील!) ह्यापेक्षा अधिक माहिती असेल ह्यात शंका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 12:11 नवीन
माईसाहेब, तुमच्याकडे ४० वर्षापासून एक नोकर आहे. पत्रकार निकमाने लावलेला फोन नेहमी तोच उचलतो याचा अर्थ तुमचे नि नोकराचे अनैतिक संबंध आहेत असं होतं का? लोकांना काय काहीही म्हणतात. इंदिरा गांधी एका माणसाकडून एकांतात योग शिकायच्या. धिरेंंद्र ब्रह्मचारी म्हणून लिहिलं तर चिकार कहाण्या मिळतात. मग? =================== गांधीजींची केस एक लोकवंदता नाही. ती एक सत्य कथा आहे म्हणून तिच्यावर बोलताना मध्येच दुसरा विषय आणू नये. नग्न स्त्रीच्या शेजारी नग्न झोपून ब्रह्मचर्याची परीक्षा घेता येत असेल तर अजून एक पायरी पुढे जाऊन पुढे बरे काही काही करून देखील त्यापुढची ब्रह्मचर्याची परीक्षा घेता येईलच की. पहिली पास पुढची परीक्षा घ्यायचे का गांधीजी? आणि एकदा पास झालं कि झालं कि मोप. वारंवार भिन्न भिन्न स्त्रीयांशी, भिन्न भिन्न जागी तीच तीच परीक्षा कशाला घेत होते ते? स्त्री काय पुरुषाच्या परीक्षेचे साधन आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 04/27/2018 - 13:27 नवीन
वाजपेयी विवाहित दांपत्याबरोबर एकत्र का राहत होते? संघाची शिकवण आहे का ती? एक पत्नी असताना तमाशा नर्तकीबरोबर संबंध ठेवणे.. हे संघाने शिकवले का भाजपाच्या दिवंगत नेत्याला ? ह्या प्रकरणांची चर्चा समाज्माध्यमांवर काँग्रेस्वाल्यांनी केली तर चालेल का? गांधी द्वेष एका मर्यादेपर्यंत समजू शकते पण बौद्धिके घेणार्या ह्या मंडळींची चारित्र्ये बरबटलेलीच आहेत हे विसरू नकोस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा