Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग ३०

श
श्रीगुरुजी
Wed, 04/25/2018 - 11:14
🗣 281 प्रतिसाद
स्वयंघोषित भोंदू गुरू आसारामबापूवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आसारामबापू ऑगस्ट २०१३ पासून तुरूंगात आहे. सध्या तो ७८ वर्षांचा आहे. या शिक्षेमुळे तुरूंगातच त्याची अखेर होणार हे नक्की. भारतात असे अनेक भोंदूबाबा आहेत. यांच्यामुळे हिंदू धर्माची बदनामी होत आहे. या सर्वांना पकडून अशीच शिक्षा मिळणे आवश्यक आहे. काही काळापूर्वी राम रहीम सिंग या भोंदूबाबाला सुद्धा शिक्षा झाली होती. परंतु अनेकजण अजून मोकळेच आहेत. http://indianexpress.com/article/india/asaram-bapu-rape-case-verdict-live-updates-jodhpur-judgment-court-order-5150695/

प्रतिक्रिया द्या
61097 वाचन

💬 प्रतिसाद (281)
ब
बिटाकाका Fri, 04/27/2018 - 19:52 नवीन
एक प्रतिसाद सोडून वर जोशींनी एक्सप्लेन केलं आहे. ----------------------- सरकारने डेफिसीट कमी करण्यासाठी आणि योजनांना मनी पंप करण्यासाठी ह्या सबसिडी प्रकाराला फाटा द्यावा. शेवटी सरकारला कुठून तरी पैसा आणावाच लागतो आणि सध्या तरी मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Fri, 04/27/2018 - 20:11 नवीन
सरकारने डेफिसीट कमी करण्यासाठी आणि योजनांना मनी पंप करण्यासाठी ह्या सबसिडी प्रकाराला फाटा द्यावा. शेवटी सरकारला कुठून तरी पैसा आणावाच लागतो इंधनाचे दर दुप्पट केल्यास डेफिसिट कितीने कमी होईल? किंवा इंधनाचे दर निम्म्याने कमी केल्यास डेफिसिट कीतीने वाढेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ग
गामा पैलवान Fri, 04/27/2018 - 23:08 नवीन
मा.गो., तुमच्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. पण सवलत न देता तूट कमी करायची असेल तर भ्रष्टाचार थांबला पाहिजे. मोदी नेमका भ्रष्टाचारच काबूत आणताहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ब
बिटाकाका Fri, 04/27/2018 - 14:44 नवीन
आणि आता ते नुसते तेवढ्यावर थांबत नसून दोन लोकांचे मत सारखे (आणि विशेषकरून भाजप-मोदी समर्थनार्थ) असतील तर तर त्यांना एकमेकांचे डुप्लिकेट आयडीज ठरवून मोकळे होतात. लै मंजी लैच मज्जा हाय. ------------------------------------------- जस्ट एक कल्पना म्हणून हे असले लॉजिक लावून मिपाकडे पाहिले आणि क्षणात डुप्लिकेट आयड्यांचा एक घोळका नजरेसमोरून पुढे सरकला :):).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 04/27/2018 - 15:51 नवीन
हे नवीन नाही. लै जुने आहे. पण आता निव्वळ एका विषयावर निखळ चर्चा होऊ शकत नाही च्च. "आमचा एक वाईटपणा दाखवता, तर तुमचे दोन दाखवतो." असली हिरहिरी सगळीकडे. काय करता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ज
जेम्स वांड Fri, 04/27/2018 - 17:07 नवीन
पाहून आनंद जाहला! काड्या टाकून आग पेटवून मजा पाहणाऱ्यात नसणाऱ्या मिपाकरांत तुमचा नंबर आम्ही खूप वरती ठेवला होता, मूर्तीभंजनाबद्दल आभारी कोटी कोटी आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 04/27/2018 - 17:25 नवीन
मी कधी म्हटलं मी काड्या सारतं नाही? मिपावर एवढी वर्षे उगीच काढली का? =)) आपल्याला मूर्ती बिर्ती नको बुवा. फुकटचा मोठेपणा! डू आयडी असल्याचे आरोप करणे ही अगदी बारकुली गोष्ट आहे. कोणी म्हटले तर काय अंगाला भोके पडतात का? बरे इथे कोण आधार कार्ड मागतोय? काढेनात का दोन काय दहा आयडी? पासवर्ड अन् ईमेल सांभाळायचे झंझट त्यांनाच. लोकांनी एकाने आयडी काढून दुसऱ्याला वापरायला देणे, बऱ्याच जणांनी मिळून एक आयडी वापरणे तऱ्हा तऱ्हा केल्यात. फिरभी हम चूप थे, चूप है, चूप रहेंगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ब
बिटाकाका Fri, 04/27/2018 - 19:58 नवीन
असे हजार जण डुप्लिकेट आयडी म्हणून नाचले असते तरी मला शष्प फरक पडला नसता पण पद्धत तर बघा. उघड पाने मान्य पण करायचं नाहीये की हो आरोप आहे. वरून माझी भूमिका हे माझं सोंग आहे वगैरे...म्हणून शेवटी स्पष्ट विचारलं! ––––-––––––––– आता तुमीच पंच हाव, तुमीच न्याव मिळवून द्यावा ही नम्र विनंती!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
A
arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 14:49 नवीन
प्रयोग अयशस्वी झाला असता तर काय? हे डोक्यात आल्याशिवाय राहत नाही.
प्रयोग यशस्वी झाला आहे की अयशस्वी अशी कोणतीही शहनिशा झालेली नाही. त्यामुळं हे विधान व्हॅलिड नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 04/28/2018 - 10:45 नवीन
मी इथून पळून गेले आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ड
डँबिस००७ Fri, 04/27/2018 - 19:40 नवीन
कर्नाटकात भाजपच विजयी होणार आहे !! जनतेची २०१९ ची पुर्व तयारी चालु आहे ! जनता २०१९ ला मोदीजींनाच निर्विवाद निवडणुका जिंकुन देणार आहे. मोदींवर देशातील १००% जनतेचा विश्वास आहे. ह्या विश्वासाला सार्थ ठरवत मोदीजी देशाला पुढे नेण्याच काम सुरुच ठेवणार !!
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 04/28/2018 - 03:55 नवीन
उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील मदरशात एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी पोलिसांनी मौलवीला अटक केली आहे. पॉस्को कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मुख्य अल्पवयीन आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.... लोकसत्तातील पूर्ण बातमीचा दुवा: https://www.loksatta.com/desh-videsh-news/maulvi-of-madrasa-arrested-under-pocso-act-ghazipur-minor-rape-case-1670394/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 04/28/2018 - 06:24 नवीन
चित्रगुप्त काका, मी आधीच लिहिल्याप्रमाणे हा 'निधर्मी व पुरोगामी' प्रकारचा बलात्कार असल्याने मेणबत्ती मोर्चा, निषेध, आंदोलने, परदेशात पंतप्रधानांच्यविरूद्ध निदर्शने करणारे निधर्मी व पुरोगामी विचारवंत या बलात्काराविरूद्ध एक चकार शब्द काढणार नाहीत. अगदीच आरडाओरडा झाला तर 'गुन्हेगारांचा धर्म पाहू नका' असा पुरोगामी सल्ला देतील. काहीजण तर या मुलीनेच मुल्लाला फसविले किंवा कथुआ प्रकरणावरून लक्श वळविण्यासाठी हा बनाव रचण्यात आला आहे हे सुद्धा ठासून सांगतील.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 04/28/2018 - 07:17 नवीन
हा ना, आता मुल्लाचा आणि राहुलच्या भेटीचा फोटोशॉप केलेला पुरावा पण येईल ट्रोलिंग साठी. कॉलिंग श्रीगुरुजी फॉर फेक फोटो पुरावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
माहितगार Sat, 04/28/2018 - 08:04 नवीन
अभ्याराव ते गुरुजींचे सोडून द्या , ते त्यांच्या वैचारीक विरोधकांना हव्या त्या मैदानात खेळवून दमवतात . पण ह्या गूगल इमेजेस घ्या . आता तुम्ही नाव काढले म्हणून -राहुलरावाम्च्या गूगल छायाचित्र यादी दिली त्यातील प्फेक नसलेल्या जेनुआईन छायाचित्रारील काही लोक रोज काही ना काही वेगळे अनुचित उपद्व्याप करत असतील . प्रत्येकाच्या मागे गुप्तहेर आणि इनकम छायाचित्र विभाग लावला तर दोनचार तरी नको असलेली उदाहरणे गावतील जी राहुलजींच्या आज या राजकारण्याच्या उद्या त्या राजकरण्याच्या छायाचित्रात दिसतात . केवळ छायाचित्र कुणासोबत आहे या वरुन काही ठरत नसावे . लागेबांधे सिद्ध होण्यासाठी अधिक संदर्भ आणि पुराव्यांची गरज भासत असावी की नाही. समजा या किंवा अशा केस मधल्या मौलवीने राहुलजी सोबत केव्हातरी खरा फोटो काढून घेतला असला तर तेवढ्याने लगेच राहुलजी वाईट ठरतात का ? तसे नक्कीच नसावे - ( बाकी मी घराणेशाही प्रेमी नसल्याने त्यांची अजून किती बाजू घ्यावी ते समजत नाही ) राहुलरावांचे आसारामासोबत फोटो नसतीलही पण इतर काँग्रेस नेत्यांच्या आसारामासोबत असलेल्या उठबशी बाबत पुरेसे लिहून आलेले आहे , त्याचे दुसर्‍या धागावर व्यवस्थीत संदर्भही दिले आहेत हवेतर इकडेही देता येतील. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
माहितगार Sat, 04/28/2018 - 08:05 नवीन
पण ह्या गूगल इमेजेस घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
अभ्या.. Sat, 04/28/2018 - 09:23 नवीन
माहितगार तुम्हारा गल्ली चुक्याच. http://www.misalpav.com/comment/993611#comment-993611 उधर जानेका बाबा. तुम्हारेवाले उधर है. या आपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 04/28/2018 - 09:37 नवीन
अभ्याराव वैरारीक दृष्ट्या व्यक्त होण्यासाठी कंपू आणि कळपांचे अडसर आपण शोधत नाही. आमची बॅटींग बर्‍यापैकी चौफेरच असते . मी नेमक्या कोणत्या चेंडूवर आनि केव्हा कॅच घेतो ते इतरत्र लिहिले आहे ते नंतर केव्हा तरी सांगेन सध्या तिकडच्य गल्लीतला एक प्रतिसाद इकडे रेकॉर्डसाठी नोंदवतो त्या बापूंनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिलेली लेखी प्रशस्तीपत्रे न्यायालयास सादर केली असावित (चुभूदेघे) ; तरीही एकतर्फी काय संबंध जोडताय ?
२६ एप्रिल म्हणजे कालचे एन डि टि व्ही वृत्त आहे Edited by Deepshikha Ghosh | Updated: April 26, 2018 07:56 IST Behind Asaram's Multi-Crore Empire, A Roster Of Political "Friends" Asaram owes much of his early growth to successive Gujarat governments -- both Congress and the BJP. Since the days of former Prime Minister Indira Gandhi, high profile politicians have been close to self-styled godmen to woo voters. The gurus, in return, often gained considerable clout and have used it often to brazenly break the law. Asaram owes much of his early growth to successive Gujarat governments -- both Congress and the BJP. It was in the Congress regime in 1981 and 1992 that he was allotted 14,515 square metres of land. In 1997 and 1999, when the BJP was in power, he was allocated around 25,000 square metres of land to expand his ashrams in Gujarat. In Madhya Pradesh, the Congress government of Digvijaya Singh gifted Asaram prime land in 1998. The Congress veteran is seen bowing to Asaram in photos. Nearly 15 years later, in 2013, Digvijaya Singh publicly expressed regret about the land allotment, calling it a "mistake". Known to his followers as "Bapuji", Asaram counted among his admirers former union minister Uma Bharti, Chhattisgarh Chief Minister Raman Singh and Rajasthan Chief Minister Vasundhara Raje of the BJP and ex-ministers Kapil Sibal, Kamal Nath and Ashok Gehlot of the Congress. But Asaram and PM Modi are reportedly far from close; in 2012, without naming PM Modi, who was then the Chief Minister of Gujarat, Asaram had made some remarks that were seen as a threat to throw him out of power. In 2009, allegations emerged of Asaram occupying land illegally in Gujarat. Over 67,000 square metres of land was reportedly taken back by the government.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
माहितगार Sat, 04/28/2018 - 09:39 नवीन
*वैचारीक दृष्ट्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
श्रीगुरुजी Sat, 04/28/2018 - 10:42 नवीन
खांग्रेसी नेत्यांचे आणि गुन्हेगार मुस्लिमांचे साटेलोटे दाखविण्यासाठी फोटोची गरज नाही. ते उघड गुपित आहे. उदाहरणार्थ गांधीजी आणि 'भाई' रशीद. आणि समजा राहुल आणि या मुल्लाचा खरा फोटो टाकला तरी तुम्ही धावत येऊन फोटो खोटा आहे असा दावा कराल. कशावरून खोटा असे विचारले तर "कारण मी म्हणतो म्हणून" हे सबळ कारण देऊन "मी"पुराण सुरू होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 04/28/2018 - 11:01 नवीन
ते खऱ्या फोटोला खरेच म्हणायची नियत अजून शाबूत आहे माझी. निदान दुसऱ्या कुणासाठी तरी खोटे फोटो टाकून ट्रोलिंग करण्यापेक्षा स्वतः: बद्दल खरे बोललेले बरे ना. आणि मा. संपादक मंडळाला मी विनंती करतो की स्कोअर सेटलींग आणि त्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या ह्या आयडीवर त्वरित कार्यवाही व्हावी. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 04/28/2018 - 11:16 नवीन
इथे मी काही स्कोअर सेटलिंग वगैरे करीत नाहीय्ये. मला त्याची गरजच वाटत नाही. माझ्यावर आरोप करायला सुरूवात आपणच केली आहे याचा विसर पडलेला दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 04/28/2018 - 16:43 नवीन
आरोप आणि खोटा आरोप ह्यात फरक असतो श्रीगुर्जी. सुरुवात आपण फेक फोटो टाकून केलेली आहे. एकतर खोटेपणा करायचा तो करायचा, उघडे पडले तर त्याला फाटे फोडत दुसर्‍याकडे बोटे दाखवत बसायचे. खोटे उघड करणार्यालाच खोटे ठरवत बसायचे, नुसते तितकेच करुन गप्प बसण्याएवजी जिथे तिथे त्याचाच उल्लेख करत उकसावायचे ह्याला स्कोरसेटलिंग म्हणतात. करायचे ठरवले तर हे आम्हाला चांगले करता येते. फक्त ते करायची नियत नाहीये. (हे एकदाच सांगितलेल्या "मी" पुराणात अ‍ॅड केले तरी चालेल) तुमच्याशी आणि तुमच्या पक्षविचारांशी वैयक्तिक वैर नाहीये, इव्हन ते कधी दाखवलेले ही नाहीये पण ह्याच पध्दतीने तुमची वागणूक चालू राहिली आणि तुम्ही वैयक्तिक हल्ले करत राहिलात तर संपादक मंडळाकडे तक्रार केलेलीच आहे. त्यांच्याकडून काही कार्यवाही न झाल्यास मी आपणास माझ्या पध्दतीने उत्तर देत राहीन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 04/28/2018 - 18:01 नवीन
एकतर्फी आणि पक्शपाती आरोप झाले व त्याच्या आडून स्कोअर सेटलिंग सुरू झाले की योग्य ते उत्तर द्यावे लागते. एनी वे, जे सांगायचं ते सांगून झाले आहे. माझ्याकडे अजून नवीन सांगण्यासारखे काही नाही व अधिक काही लिहिण्यात स्वारस्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ग
गामा पैलवान Sat, 04/28/2018 - 22:07 नवीन
श्रीगुरुजी, बनावट चित्रं टाकण्यात तुमची शाळकरी गफलत ( = स्कूलबॉय एरर) झालीये. चूक झाली म्हणून सरळ पडदा टाकून द्या ना. हा.का.ना.का. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चित्रगुप्त Sat, 04/28/2018 - 23:42 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चित्रगुप्त Sat, 04/28/2018 - 23:49 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चित्रगुप्त Sat, 04/28/2018 - 23:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
श
श्रीगुरुजी Sat, 04/28/2018 - 12:14 नवीन
बादवे, खरं स्कोअर सेटलिंग म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्यावर आरोप केलेल्या पहिल्या प्रतिसादानंतर ठराविक ३-४ आयडींचे माझ्याबद्दल दिलेले प्रतिसाद वाचा. स्कोअर सेटलिंग लगेच समजून येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
A
arunjoshi123 Sat, 04/28/2018 - 07:36 नवीन
अगदी आपल्या मिपावरच्या पुरोगाम्यांच्या आत्मधर्मवैफल्यवाफा निवाल्या आहे. ================= तसं त्यांचंही बरोबरच आहे म्हणा, ते पडले सगळे पुरोगामी ब्राह्मण, तेव्हा मौलवीने त्यांच्या धर्माच्या मुलीवर बलात्कार केला तर त्यांना न्यूनगंड कसा येईल? न्यूनगंड येऊ शकणे हे पुरोगामीत्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तसा पुरोगाम्यांचा धर्म नसतो, पण तरीही आपल्या धर्माच्या मुलीवर बलात्कार होणे ही दु:खाची गोष्ट आहे, संतप्त व्हायची नाही हे ही त्यांना कळते. सबब सध्याला आत्मग्लानीक्रोधजन्याक्रोशज्वलित मेणबत्त्या फडताळातच असू द्यायच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पैसा Sat, 04/28/2018 - 10:43 नवीन
साक्षात सरस्वतीचे पद लालित्य बघून नत मस्तक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा