http://indianexpress.com/article/opinion/columns/robust-job-growth-not-fake-news-narendra-modi-economy-demonetisation-gst-inflation-5154381/
देशाच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण वरील लेखात आहे.
दोन दिवसांच्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी चीनमध्ये गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ चीनच्या वादकांनी चक्क हिंदी गाणे वाजवून त्यांचे स्वागत केले. ‘तू तू है वही दिल ने जिसे अपना कहा’, हे गाणं वादकांनी वाजवलं आणि मोदींनीही वादकांसाठी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनमध्ये आहेत. डोकलाम संघर्षांनंतर भारत आणि चीन यांच्यातील विकोपाला गेलेले संबंध सुधारण्याचा दृढनिर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अनौपचारिक शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी व्यक्त केला होता. विचार, सुसंवाद, सहकार, स्वप्नपूर्ती आणि बांधिलकी अशा नव्या पंचसूत्रीचा नारा मोदी यांनी या बैठकीत दिला.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांनी झील इस्ट लेकच्या किनारी मॉर्निंग वॉक केला. यानंतर दोघांनीही नौकाविहार करत मैत्रीचा संदेशही दिला. नौकाविहार केल्यानंतर मोदी आणि जिनपिंग एकत्र भोजन करतील. वुहानमध्ये मोदींच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात चीनच्या वादकांनी बॉलिवूडमधील ‘तू तू है वही दिल ने जिसे अपना कहा’ हे गाणं सादर केले. मोदींसाठी हा एक सुखद धक्काच होता. मोदींनीही टाळ्या वाजवून त्या वादकांना दाद दिली.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/watch-video-modi-in-china-pm-narendra-modi-xi-jinping-enjoy-bollywood-song-tu-tu-hai-wahi-dil-ne-jise-apna-kaha-1670619/
चीनचे चाणक्य वाद्यांवर नाही हितसंबंधांवर भरवसा ठेवतात असे ऐकुन आहे. बाकी आंतरराष्ट्रीय राजकरणात स्थानिक राजकारणा प्रमाणे रुसव्या फुगव्यांचे प्रदर्शन कमी आणि आपसी संबंधांच्या झांकी व्यवस्थीत रंगवल्या जातात पण इथले रुसवे फुगव्यांचे गुंते अधिक जटील असतात आणि पडद्या समोर पेक्षा मागे बरेच काही होत असते आणि ते वेगळे असते.
भारत व चीन दरम्यान आता होणार्या घडामोडी मागे भारताच्या प्रगल्भ नेते श्री मोदीजींचा पक्का निर्धार दिसत आहे.
एका बाजुला अमेरीका व चीन दुसर्या बाजुला अमेरीका व रशीया अशी रस्सी-खेच चालु असताना ह्या सर्वात भारताच्या आशेवर पाणी फिरण्याची पुर्ण लक्षण दिसत आहेत.
नविन अमेरिकन कायद्या प्रमाणे रशीया कडुन काहीही ( युद्ध सामुग्री) खरेदी केली तर अमेरिकेच्या एंबार्गोला सामोर जाव लागेल, ह्या काय दा येत्या काही महीन्यात लागु होईल. ह्या पार्श्व भुमीवर भारत रशीया कडुन एस ४०० मिसाईल डिफेंस सिस्टीम विकत घेण्याच्या प्रक्रीयेच्या शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे.
जर भारताने ही प्रणाली रशीया कडुन विकत घेतली तर भारतावर अमेरीकेचा एंबार्गो होणे अटळ आहे. ह्या विषयी जॉन मॅटीस ह्यांनी
अमेरीकेला सल्ला दिलेला आहे की भारताला वाळीत टाकणे अमेरीकेला महाग पडेल त्या पेक्षा भारताला ह्या कायद्याच्या बाहेर ठेवाव.
अमेरीका चीनच्या मुसक्या बांधत असताना, भारताने चीन बरोबर राजकीय खेळी केलेली आहे. डोकलाम नंतर चीन ने युद्धा पेक्षा मा घार घेणे पसंद केले ह्याचा अर्थ चीनला ही युद्द नकोय . पण भारताने डोकलाम च्या वेळेला ठाम ऊ भ राहून आपली भुमिका स्पष्ट केलेली आहे. आता चीनला जाऊन मोदीजींनी भारत शांतता प्रिय आहे हे सुद्धा दाखवुन देत आहे.
ह्या चीन भेटी दरम्यान मोदीजीच्या स्वागतासाठी परंपरेला फाटा देत चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जीन पिंग स्वतः आलेले होते .
आताच झालेल्या कॉमनवेल्थ सम्मीट मध्ये सुद्धा मोदीजींना सोडुन उरलेल्या ५२ देशाच्या राष्ट्राध्यक्षांना येण्याजाण्यासाठी बसची सोय केलेली होती. पण मोदीजींना मात्र लिमोझीन कार दिलेली होती. ह्या दरम्यान ईंग्लंडची राणी फक्त मोदीजींनाच भेटीसाठी वेळ देते.
या वरून जागतीय राजकारणात मोदीजींच्या प्रभावाची कल्पना येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात डोकलाम आणि चीन- पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरसंदर्भात थेट चर्चा झालेली नाही. मोदी आणि क्षी जिनपिंग यांनी या दोन वादग्रस्त मुद्द्यांवर थेट चर्चा करणे टाळले. पण सीमेवरील तणाव कमी करणे आणि दोन्ही देशांमधील व्यापार वाढवण्याबाबत दोन्ही नेत्यांचे एकमत झाले आहे.
वैधानिक इशारा : ही बातमी आहे. माझे मत नाही. (संपादित)
काँग्रेसच्या काळात विरोधकांकडून अशा चर्चाना पोकळ चर्चा , शेपूटघालू चर्चा , हुतात्म्यांचा अपमान इ इ संबोधले गेले असते.
पण आता अशा चर्चाना प्रगल्भ चर्चा , व्यापारात बरकत , शांती प्रयत्न इ इ लागतील.
असो . नेहरुना विरोध करता करता अखेर त्याच पंचशील मार्गावर पाऊल ठेवल्याबद्दल नेहरु व मोदीजींचे अभिनंदन.
https://hi.m.wikipedia.org/wiki/पंचशील
Five principles , पंचशील कुणाची का निर्मिती असेना , आज मोदीजीना तेच हवे आहे.
https://www.huffingtonpost.in/2017/09/05/was-jawaharlal-nehru-the-architect-of-panchsheel-the-fascinating-story-behind-the-1954-treaty_a_23197081/
नेहरुना विरोध करता करता अखेर त्याच पंचशील मार्गावर पाऊल ठेवल्याबद्दल नेहरु व मोदीजींचे अभिनंदन.
LLRC
मोदीद्वेषाने मेंदूचा पूर्ण ताबा घेतल्याने नेहरूंच्या काळातील पंचशील आणि मोदींनी सांगितलेली नवीन पाच सूत्रे यातला फरक समजेनासा झालेला दिसतो.
नेहरूंच्या काळातील पंचशील - Mutual respect for each other's territorial integrity and sovereignty, Mutual non-aggression, Mutual non-interference, Equality and mutual benefit, Peaceful co-existence
मोदींनी पुढे आणलेली पाच नवीन सूत्रे - विचार, सुसंवाद, सहकार, स्वप्नपूर्ती आणि बांधिलकी
मोदीनी नवीन सूत्रे आणली ?
Mutual respect for each other's territorial integrity and sovereignty,
Mutual non-aggression,
Mutual non-interference,
Equality and mutual benefit,
Peaceful co-existence
ही जुनी सूत्रे मोदीना नको आहेत का ?
चीनचे दाखवायचे व खायचे दात वेगळे असतात. शी जिनपिंग हा अत्यंत धूर्त व डांबरट माणूस आहे. अचानक मोदींच्या स्वागताला पायघड्या घालण्यामागे खरा कुटील उद्देश काय आहे ते आगामी काळात समजेलच.
Modi-Xi's informal summit ends: 5 key takeawaysReducing border tensionsIn light of the tense face off between Indian and Chinese troops at Doklam last year, Modi and Xi underlined the importance of "maintaining peace and tranquility in the border region". To this effect, they have issued strategic guidance to their respective militaries to strengthen communication in order to build trust and mutual understanding. The two sides will also work together in implementing confidence building measures.
Need for greater cooperation
As the West, led by the US, becomes increasingly inward-looking, emerging superpowers India and China must step up and assume a more significant role in the world order. As such, stable and balanced relations between the two neighbours is vital and recognising this, Modi and Xi decided to strengthen the Closer Development Partnership in a mutually beneficial and sustainable manner. This will be conducive for the development and prosperity of the people as well as the region.
More dialogue to pre-empt conflict
It is in the long term interests of India and China to create a broad platform of dialogue and discussion through which contentious matters can be addressed and resolved before they escalate. The two leaders agreed that both sides have the maturity and wisdom to handle differences through peaceful discussion.
Both China and India said they seek a fair settlement to their border disputes, and to this end, the Special Representatives appointed by the two nations will play a key role.
Balancing skewed trade
The two leaders agreed to push forward bilateral trade and investment in a balanced and sustainable manner by taking advantage of complementarities between their two economies.
They reiterated the importance of building an open and pluralist global economic order in which all countries can freely participate to pursue their development, while also contributing to the elimination of poverty and inequality in all regions of the world.
Informal summit a success, more on the cards
The two leaders highly assessed the opportunity for direct, free and candid exchange of views offered by the Informal Summit and agreed on the utility of holding more such dialogues in the future. The "forward-looking dialogue" was a unique opportunity for direct and candid exchange of views between the two premiers and helped them forge a common understanding. Both agreed that meetings on the lines of the Wuhan summit will determine the future direction of India-China relations. Before leaving, PM Modi reciprocated by inviting Xi to India for a similar informal summit next year.
स्त्रोतः
https://timesofindia.indiatimes.com/india/modi-xis-informal-summit-ends-5-key-takeaways/articleshow/63950531.cms
सगळ गुडी गुडी रिपोर्टींग चालू आहे तेव्हा त्यात मीठाचा खडा टाकण्याचे टाळत होतो. वरकरणी हे किमान होत असतेच , दोन अणवस्त्रधारी शेजार्यांना त्या शिवाय पर्याय नाही. बेसिक रिलेशन्स नीट झाल्या शिवाय डिफेन्स इक्विपमेंट आणि हाय लेव्हल टेक्नॉलॉजीत दोन्ही रास्।ट्रे एकमेकांना मदत करणार नाहीत. चीनला भारत वस्तु उत्पादन आणि मिनरल आणि एनर्जी रिसोर्स अॅक्विझीशन मध्ये फारशी काँपीटीशन देत नाही, भारताचे लूक इस्ट एशिआ आणि आमेरीकेसोबत फार तापदायक ठरु नये एवढेच बघायचे आहे. म्हणजे भारत भारताचे उत्पातमुल्य वापरणार नाही एवढे त्यांना पुरेसे आहे . - इस्ट एशिआत फक्त व्हिएतनाम भारताच्या मदतीने छुटपूट आवाहन देऊ शकतो बाकीचे देश रशियाआणि चीन पैकी एक निवडायची वेळआली की चीन निवडतात . जपान अणवस्त्रासहीत सामरीक गुंतवणूक करत नाही तो पर्यंत त्या दिशेचे व्यावहारीक टेंशन चीनला काहीच नाही. आमेरीके सोबत ततवसंबंध सुधारत असले तरी आमेरीकी अध्यक्ष आणि आमेरीकी संसद याम्ची उ भारता सोबतची उंटाची चाल पूर्णत्वाने थांबण्यारशिया शक्यता नाही हि भारत आमेसंबंदकी मैत्रिला आमरीकी मर्यादा आहे. ब्रिटीश लोकांना भारतीय मनोभूमिका समज्ते तेवढी आमेरीकना समजत नाही. भारत इराण आणि रशिया सोबतचे संबंध बिघडवून घेऊ शकत नाही हे आमेरीकी संसद त्यांचे कायदे बनवताना समजून घेत नाही. भरतीय आयटीचे इनकम संपले तर भारताचे आमेरीके विषयीचे मुख्य आर्थिक आकर्षणच लयास जाते.
भारतासाठी मात्र बर्याच गोष्टी महत्वाच्या आहेत , १) न्युक्लीअर सप्लायर ग्रूपची चीन ने वाट अद्याप रोखून ठेवली आहे ती चीन नेमकी केव्हा मोकळी करणार २) दहशतवादी प्रकरणात आणि इतर बर्याच गोष्टीत चीन पाकीस्तानला पाठीशी घालतो त्यात काही बदल होणार आहे का ?
३) मालदिव्ज स्रीलंका बांग्लादेश आणि नेपाळ मधील भारत विरोधी दृष्टीकोणास हवा देणे चीन सोडणर का ? ४) भारतीय कंपन्यात इनव्हेस्ट मेंट ला स्थानिकांना चीन पूर्ण मोकळीक देणार का ? ५ ) सीमा प्रश्नावर महत्वपूर्ण तडजोड चीन करणार का ? ६) सुरक्षा परिषदेत भारताला कायम सीट मिळण्यासाठी चीन भारताचे समर्थन करणार का ?
तर एकुण देखावा नको उपरोक्त गोष्टीत जमिनीवर काय प्रगती होते ते महत्वाचे
माहितगार,
तुम्ही उपस्थीत केले ल्या सर्व प्रश्नाच मुळ भारत चीन संबंधाच्या मुळाशी आहे. चीन ह्या देशाने आपली प्रगती गेल्या काही दशकात केलेली आहे. त्यासाठी त्यांचा ब्लुप्रींट तेंव्हाही तयार होता आताही त्यापुढचा ब्लुप्रिंट तयार आहे.
प्रॉब्लेम हा आ हे की ४ वर्षांपुर्वी चीन विरुद्ध भारत ब्र ही काढत नव्हता आता डोकलामच्या पार्श्व भुमीवर भारताच्या सरकारचे धोरण , मानसिकता पुढे आलेली आहे.
आंतरराष्ट्रिय संबंधात कोणताही देश दुसर्या देशाबद्दल सहानुभुतीपर चांगले निर्णय घेईल, चांगले संबंध ठेवील अशी अपेक्षा करता येत नाही. चीन सुद्धा ह्याला अपवाद ठरु नये. चीन कडुन कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करणे चुक आहे. चीन त्याला सोईचेच निर्णय घेणार , येणारा काळ त्याला उत्तर देईल,
१) न्युक्लीअर सप्लायर ग्रूपची चीन ने वाट अद्याप रोखून ठेवली आहे ती चीन नेमकी केव्हा मोकळी करणार :
चीन केंव्हाही भारताला पुढे जाऊ देणार नाही. न्युक्लिअर सप्लायर ग्रृप मध्ये नसल्याने भारताचे मोठे नुकसान होणार आहे पण त्या वर भारताला तोडगा काढता येउ शकेल जसे की वीजेची निर्मितीची पर्यायी साधनांचा वापर पण भारताला विषेश सवलती देणार्या अमेरीकेला ह्याचा फटका बसणार आहे. अमेरीकेला भारताला उच्च दर्जाची न्युक्लीअर टेक्नॉलॉजी विकता येणार नाही. कारण भारताच्या दृष्टीने न्युक्लीअर सप्लायर ग्रूपचा सभासद नसल्यास ह्या उच्च दर्जाची न्युक्लीअर टेक्नॉलॉजीचा काहीही उपयोग होणार नाही.
तेंव्हा अमेरीकेने, फ्रांसने व ईतर राष्ट्रांनी चीन वर दबाव आणला तरच न्युक्लीअर सप्लायर ग्रूप मध्ये भारताची वर्णी लागेल.
२) दहशतवादी प्रकरणात आणि इतर बर्याच गोष्टीत चीन पाकीस्तानला पाठीशी घालतो त्यात काही बदल होणार आहे का ?
चीन पाकिस्तानला पाठीशी घालतोय कारण पाकिस्तानची चीनला गरज आहे. चीन पाकिस्तान मधुन पश्चिमी समुद्राच्या रस्त्याचा पर्याय शोधत आहे. चायना पाकिस्तान ईकॉनॉमी कॉरीडोर ह्या प्रकल्पा द्वारे ते साध्य झालेले आहे. ह्या प्रकल्पाला भारताचा प्रखर विरोध आहे. कारण हा प्रकल्प भारताच्या गिलगीट बाल्टीस्तानातुन तसेच पाक व्याप्त काश्मिरातुन जातो. पाकिस्तान सरकारने ह्या प्रकल्पाला परवानगी दिलेली आहे. ५२ बीलीयन डॉ ईतकी गुंतवणुक असलेला हा महा प्रकल्प पाकिस्तानच्या मदती शिवाय पुर्ण हो ऊ शकणार नाही. त्यामुळे चीन वेळोवेळी पाकिस्तानला चुचकारण्यासाठी भारता विरोधी ( पाकिस्तान धार्जीणे ) निर्णय घेतो. हल्लीच्या बातम्या नुसार ह्या प्रकल्पाचे काही महत्वाचे भाग चीनने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
३) मालदिव्ज स्रीलंका बांग्लादेश आणि नेपाळ मधील भारत विरोधी दृष्टीकोणास हवा देणे चीन सोडणर का ? चीनने ह्या देशात स्ट्राटेजीन निवेश / पैसे गुंतवणुक केलेली आहे . ही गुंतवणुक चीनच्या जागतीक स्तरावरच्या प्रभावासाठी उपयुक्त आहे. त्या मुळे चीन ह्या देशातील भारताच्या प्रभावाला न्युट्रल करण्याचा प्रयन्त करणारच. त्या देशाच्या जनतेच्या / सरकारच्या प्रखर विरोधा शिवाय चीनला त्या देशातुन हाकुल लावणे शक्य नाही. समजा चीन तिथुन निघुन गेला म्हणजे भारताला मोकळीक मिळेलच अस होत नाही.
चीन हा प्रयत्न गेले दशक चालु होता तेंव्हा चे सरकार झोपलेले होते.
४) भारतीय कंपन्यात इनव्हेस्ट मेंटला स्थानिकांना चीन पूर्ण मोकळीक देणार का ? कोणताच देश परकीय कंपन्यांना गुंतवणुकीत स्थानीक नागरिकांना मोकळीक देत नसतो. चीन ह्याला अपवाद असणार नाही.
५ ) सीमा प्रश्नावर महत्वपूर्ण तडजोड चीन करणार का ? भारत चीन सीमा प्रश्न काही शतके जुने आहेत. त्यावर तोडगा हा सरकार तयार असतील तरच निघेल अन्यथा फक्त टाईंम पास चालु असेल.
६) सुरक्षा परिषदेत भारताला कायम सीट मिळण्यासाठी चीन भारताचे समर्थन करणार का ? भारताला कायम सीट मिळावी म्हणुन
चीनने का म्हणुन समर्थन करायला पाहीजे ? चीन कडे व्हेटो आहे त्यामुळे चीनच्या समर्थनाशिवाय भारताला सीट मिळणे अशक्य आहे.
पण सीट मिळण्यासाठी चीन सरकारचे मिं धे होण्याचेही काहीही कारण नाही. सुरक्षा परिषदेत भारताला सीट न मिळाल्यामुळे आता पर्यंत काही बिघडले नाही , त्यामुळे यापुढे सीट न मिळाल्यास आकाश कोसळणार अशी अपेक्षा करण्यात काही हशील नाही.
चीनला सुरक्षा परिषदेत सीट मिळण्यापुर्वी १९५६ - ५७ साली अमेरीकेने भारताला सीट मिळावी म्हणुन प्रयत्न केलेला होता. पण तत्कालीन पंतप्रधानानीं भारताला ह्या सीट मध्ये काहीही स्वारस्य नसल्याचे सांगीतले होते म्हणुन त्या काळी सुरक्षा परीषदेत फक्त
चीनची वर्णी लागली. त्या चुकीची फळे आज आपण भोगतोय !!
चीनचा आंतरराष्ट्रीय प्रभाव व त्याचे राजकारण ह्यावर नंतर कधी तरी !!
PM Modi, Xi Jinping agree to undertake joint economic project in AfghanistanHIGHLIGHTS
The understanding was reached between the two leaders during the two-day informal summit which concluded today.
This will be a first such project in the war-torn country where China while trying to expand its influence has tacitly backed Pakistan
.....undertake joint economic project in Afghanistan ..... हे फार आश्चर्यजनक आहे.
अफगाणिस्तानात चीनच्या सहयोगाने भारताने काम करणे म्हणजे चीनच्या OBOR /'ओबोर प्रकल्पाला (आजवर न दिलेला) पाठींबा देणे. अफगाणिस्तान-इराणमध्ये भारताने आजवर केलेल्या प्रचंड गुंतवणुकीचे फायदे ड्रॅगनला उपलब्ध करून देणे. पाकव्याप्त काश्मीर भागातून ओबोर मार्ग राबवला जाणार आहे हे जगजाहीर आहे. आजवर ओबोरला भारताच्या तीव्र विरोधाचे हे एक ठळक कारण आहे /होते.
याउप्पर अफगाणिस्तानात सहयोग करायचाच झाल्यास परतफेड म्हणा किंवा उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणा - नेपाळ, श्रीलंका आणि मालदीव मध्ये परस्पर सहयोगाने काम करण्याचे प्रतिदान भारताने मिळवले पाहिजे होते, तसे घडलेले दिसत नाही.
बाकी अंदर की बात बडे लोग जाने.
अनिंद्य
अफगाणिस्तान-इराणमध्ये भारताने आजवर केलेल्या प्रचंड गुंतवणुकीचे फायदे !!
भारताने अफगाणिस्तान-इराणमध्ये केलेली गुंतवणुक प्रचंड वैगेरे नाही. चीनच्या गुंतवणु कीच्या पुढे तर काहीच नाही !! एका आफ्रिकेतल्या कित्येक देशात चीनने मुलभुत सोयी निर्माण केलेल्या आहेत . पण ही गुंतवणुक एका प्लॅनचा भाग आहे. त्यात भावना
वैगेरेला स्थान नाही.
बर्याचदा भारताने आता पर्यंत केलेल्या गुंतवणुका ह्या मानव जिवनमुल्याच्या आधारावर वैगेरे असतात. ह्या गुंतवणुकी मागे ईकॉनॉमिकल अँगल असतो का ? बहुद्दा नसतोच,
उदा,
भारत हिरव्या वेलचीच्या उत्पादनामध्ये जगात अव्वल स्थानी होता. जगभरातुन भारताच्या वेलचीला मागणी होती. आज भारताचे स्थान हे ग्वाटेमाला नावाच्या फारश्या माहीत नसलेल्या देशाने घेतलेले आहे. ही वेलची भारताच्या वेलची पेक्षा दिसायला हिरवीकंच आकर्षक, सुंदर व वासाला सुद्धा वरचढ . ग्वाटेमाला ह्या देशाला वेलची उत्पादनाबद्दल माहीतीच नव्हती. बाय लॅटरल रिलेशनच्या खाली भारताने
ग्वाटेमाला देशाला वेलची उत्पादनाबद्दल शिकवल आणी स्वतःची बाजार पेठ घालवुन बसला !!
कित्येक कोटीची ही निर्यातीची बाजारपेठ स्वतः घालवुन बसणारा भारत हा एकमेव देश असेल !!
पण हे करणार्या लोकांना ना त्याची खंत ना सोयर सुतक !!
गॅस एकस्प्लोरेशन मध्ये ईराण ने भारताची मदत मागीतली होती. क्रूड ऑईल उत्पादनात जगातल्या पुढारलेल्या देशात सामिल असलेल्या ईराणला गॅस एकस्प्लोरेशनमध्ये काहीही गती नव्हती तसेच ईराणला एंबार्गो मुळे ईतर देश मदत करायला पुढे येत नव्हते.
हा गॅस शोध मोहीम पुर्ण झाल्यावर ईराणला रशीयाची आठवण झाली. रशीयाच्या सर्वात मोठ्या कंपनी गॅझप्रॉमला ईराणने ह्या गॅसच्या प्रोसेस बद्दल भागीदार बनवल. ईराणच्या गॅसच्या भिस्तीवर भारतात नविन उद्द्योग निर्माण करण्याच्या स्वप्नांना खीळ बसली. आता ईराण भारताच्या सरकारी अधिकार्यांकडे बोलायला ही तयार नाही !
@ डँबिस००७,
चीनशी तुलना करायची तर भारताची गुंतवणूक 'किडुक-मिडूक' सदरात मोडेल ह्याबद्दल सहमत. पण भारतासारख्या साधनसंपन्न (!) देशाच्या धनाला 'अपॉर्च्युनिटी कॉस्ट' असते असे मला वाटते. भारताच्या इराण-अफगाण गुतंवणुकीमागे ईकॉनॉमिकल अँगल नव्हता-नाही असे म्हणवत नाही.
ओबोरला आधी विरोध आणि आता सुप्त/परोक्ष पाठिंबा आश्चर्यजनक आहे नक्की. कदाचित चीनच्या तोंडदेखल्या मैत्रीला उत्तर म्हणून गुडी-गुडी आश्वासनही असू शकेल, तसेही ही भेट 'अनौपचारिक'च होती. म्हणून म्हणालो, अंदर की बात बडे लोग जाने. :-)
अनिंद्य
ते स्वतःच स्वतः ला तुर्क म्हणवत होते. इथले लोक तसे म्हणत नव्हते.
बाकी भारतीयांचा पासपोर्टचा काय आधार कार्डही होते तेंव्हा.
तुम्हाला हवं तर मी गांधीजींचे आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स दाखवतो.
‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ५ पोलिसांवर शुक्रवारी रात्री निलंबनाची कारवाई करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.
https://www.loksatta.com/maharashtra-news/satara-5-police-suspended-for-alleged-negligence-in-sambhaji-bhide-security-1670613/
स्वत:च्या धष्टपुष्ट धारकर्यांच्या टीमकडून हे संरक्षण घेऊ शकत नाहीत का ?
------------------------------
दोनचार रुपये पगार वाढला की सरकार आवाहन करते ... गॅस सबसिडी सोडा.
तसे उच्च उत्पन्नी लोक , स्टार , राजकीय लोक , धार्मिक लोक ह्यानाही आवाहन करावे की तुम्ही सरकारी खर्चातून संरक्षण घेऊ नका.
स्वावलंबनाची शिकवण ही फक्त मिडल क्लासच्या गॅसबाबतीतच का ?
की सगळी नीतीमत्ता फक्त मिडलक्लास साठीच ?
मोगा खान
मूळ संभाजी भिडे यांनी सुरक्षा रक्षक मागितले आहेत का?
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये म्हणून सरकारने त्यांना सुरक्षा पुरवली आहे.
आणि ज्यांना कामावर ठेवले आहेत त्यांनी हलगर्जी पण केला तर त्यात संभाजी भिडे यांचा संबंध काय?
तसे उच्च उत्पन्नी लोक , स्टार , राजकीय लोक , धार्मिक लोक ह्यानाही आवाहन करावे की तुम्ही सरकारी खर्चातून संरक्षण घेऊ नका.
कुणाकुणाला सरकारी खर्चाने संरक्षण दिले आहे?
पहिल्यांदा त्या प्रियांका गांधी आणि वडाराचे संरक्षण काढून घ्यायचे बोला मग इतरांचे
बाकी अंबानी स्वतःच्या संरक्षणाचे पैसे वट्ट मोजून देतात हेही तुम्हाला ठाऊक नसेलच.
http://www.business-standard.com/article/companies/mukesh-ambani-s-24x7-z-security-cover-to-cost-him-rs-15-lakh-a-month-113042200692_1.html
कुठेही काहीही गरळ ओकायची सवय सोडून द्या.
दुवा उघडून पाहण्याचेही कष्ट घेतले नाही का?
का समजून घ्यायचंच नाहीये?
फक्त राजकारणी आणि लागेबांधे असलेले लोक फुकट संरक्षण घेतात बाकी लोकांना पैसे भरावे लागतात.
दोनचार रुपये पगार वाढला की सरकार आवाहन करते ... गॅस सबसिडी सोडा.
तसे उच्च उत्पन्नी लोक , स्टार , राजकीय लोक , धार्मिक लोक ह्यानाही आवाहन करावे की तुम्ही सरकारी खर्चातून संरक्षण घेऊ नका.
मंगू भाऊ एक विनंती करतो तुला बघ पटत आहे का ते ( मला मोदी चे कवतिक न्हाई आन त्या राहुल बाबा चे सोयर बी नाही हे आधीच सांगून ठेवतो)
जिथे तिथे गरळ ओकणे गरजेचे आहे का ? चांगल्या चाललेल्या चर्चेत मिठाचा खडा टाकणे गरजेचे आहे का ?
शहाणे असाल तर कृपया स्वतः चे हासे करून नका घेऊ.
साला आपले क्लिंटन भाऊंच्या अभ्यासू आणि निष्पक्ष चर्चा कुठ आन (संपादित) चिखलफेक कुठ, आता अक्षरशः वीट आलाय याचा.
साला आपले क्लिंटन भाऊंच्या अभ्यासू आणि निष्पक्ष चर्चा कुठ आन या मंगू/गोडसे/ गुरुजी / जोशी / बीटाकाका यांची चिखलफेक कुठ, आता अक्षरशः वीट आलाय याचा.
---
तुम्हाला अश्या चर्चांचा आता अक्षरशः वीट आलाय तर अश्या चर्चा न वाचणे हा पर्याय आहे की तुमच्याकडे. :)
कि 'या व ह्या चर्चा वाचा' असे जबरदस्तीने कोणी ओढूण आणून, तुम्हाला ह्या वीट आणणार्या चर्चा वाचायला लावतो ?
अशा चिखलफेकीत न उतरण्याचा किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे.
<<
सध्या भारतात ज्याप्रमाणे असहिष्णूता वाढलेय, धर्मनिरपेक्षता खतरे मै है, भाजपा सरकारने अल्पसंख्यासाठी Concentration camp उघडलेत वगैरे म्हणण्याची फॅशन आलेय, तशीच फॅशन आजकाल मिपावर राजकिय चर्चांच्या धांग्यावर 'वीट' आलाय वगैरे म्हणण्याची आली आहे.
उपेक्षित भौ , तुमचा आयडी येऊन दीड वर्ष झाले आहे. क्लिंटन ह्यांच्या चर्चा त्यापूर्वी होत होत्या ना ? गेले वर्षभरात त्यांचे काही लिखाण झाले आहे का? मला आठवत नाही म्हणून विचारले.
तुम्हाला मागेच फाट्यावर मारायचं ठरवलं होतं, पण आता तुम्ही नाव घेऊन गरळ ओकत आहात म्हणून, एकतर चिखलफेक दाखवून द्या नाहीतर तुमचं शहणजोग वक्तव्य मागे घ्या.
***************
संपादक मंडळी, कृपया असल्या नाव घेऊन आयडींच्या बदनामी करणाऱ्या आयडींवर आपले मत व्यक्त करा. हा प्रकार जाणीवपूर्वक केला जातोय असे म्हटले तर वावगे ठरेल काय? नाहीतर अशी कारवाई नियमात नाही असे सांगा, म्हणजे असल्या आयडींच्या आनंदापायी, आम्ही वाचनमात्र होतो. कुठल्याही मुद्द्यावर कधीही मत न मांडता, विनाकारण केली जाणारी ही खरी चिखलफेक थांबायलाच हवी.
अरे देवा १ दिवस मिपा उघडले नाही तर आमच्या वक्तव्याचा पार राडा करून सोडला राव या अंध भक्तांनी आन अंध द्वेष्ट्यांनी ;)
चला त्यानिमित्ताने का होईना भक्त आणि भक्त द्वेष्टे एकत्र आले हे हि नसे थोडके :)
गुजरातमधील उना येथील दलित समुदायाच्या काही कुटुंबांनी आज हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हिंदू धर्मात आम्हाला आदर मिळाला नाही, तसेच हिंदूंनी आम्हाला आपलेही मानले नाही, याच कारणांमुळे आम्ही बौद्ध धम्मात गेल्याचे धर्मांतरानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना या नवदीक्षितांनी सांगितले.
आजच्या धर्मांतर सोहळ्यासाठी उना येथे मोठ्या संख्येने दलित कुटुंबे एकत्र जमली होती. या कुटुंबांनी विधिपूर्वक बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. धर्मांतरानंतर बोलताना दिक्षितांपैकी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'आम्हाला हिंदूच मानले जात नव्हते, मंदिरांमध्ये प्रवेश नव्हता. याच कारणामुळे आम्ही हिंदू धर्म सोडून बौद्ध झाल्याचे अनेकांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी उना येथे गोरक्षकांनी दलितांना मारहाण केली होती. या घटनेतील पीडितांनीही हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला होता. उनामधील घटनेमुळे आजही दलितांच्या मनात मोठा राग आहे.
जुलै २०१६ मध्ये वशराम, रमेश, अशोक आणि बेचर या दलित तरुणांना गोरक्षकांनी अमानुषपणे मारहाण केली होती. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर गुजरातमध्ये व्यापक दलित आंदोलनही सुरू झाले होते.
हिंदू गोऱ़़क्षाकानी अमानुष मारहाण केली म्हणून त्यांनी हिंदू धर्म सोडायचा निर्णय घेतला. आता १८व्या शतकात न जाता,टिपूवर चर्चा न करता ही घटना दुर्दैवी आहे व हे असे पुन्हा होणार नाही ह्याची हमी गुजराती सत्ताधार्यांनी दिली तर भाजपाच्याच फायद्याचे ठरेल.
माईसाहेब
टिपूचा आणि गुजरातचा काय संबंध हो?
या "स्वघोषित गोरक्षकांना" लगाम घालणे तसेही आवश्यक आहेच.
एकंदर २० लोकांना त्याबद्दल अटक झालेली आहेच. त्यांना न्याय दिला जाईल हि काळजी घेणे आवश्यक आहे.
पण या दोन गोष्टींचा बादरायण संबंध तरी आपल्याला जोडता येतोय का?
"प्रायव्हेट आणि कॉन्फिडेन्शियल" असेल तर त्यासाठी इतर मार्ग मिसळपाव वर उपलब्ध आहेत की हो खरे. धाग्यावर "प्रायव्हेट आणि कॉन्फिडेन्शियल" गोष्टी आणल्या तर चालणार आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
नेहरुना विरोध करता करता अखेर त्याच पंचशील मार्गावर पाऊल ठेवल्याबद्दल नेहरु व मोदीजींचे अभिनंदन.LLRC मोदीद्वेषाने मेंदूचा पूर्ण ताबा घेतल्याने नेहरूंच्या काळातील पंचशील आणि मोदींनी सांगितलेली नवीन पाच सूत्रे यातला फरक समजेनासा झालेला दिसतो. नेहरूंच्या काळातील पंचशील - Mutual respect for each other's territorial integrity and sovereignty, Mutual non-aggression, Mutual non-interference, Equality and mutual benefit, Peaceful co-existence मोदींनी पुढे आणलेली पाच नवीन सूत्रे - विचार, सुसंवाद, सहकार, स्वप्नपूर्ती आणि बांधिलकी