Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग ३१

श
श्रीगुरुजी
Sat, 04/28/2018 - 05:03
🗣 266 प्रतिसाद
http://indianexpress.com/article/opinion/columns/robust-job-growth-not-fake-news-narendra-modi-economy-demonetisation-gst-inflation-5154381/ देशाच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण वरील लेखात आहे.

प्रतिक्रिया द्या
57748 वाचन

💬 प्रतिसाद (266)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 04/30/2018 - 15:36 नवीन
ह्या सगळ्याचा कायद्याशी संबंध होता की नव्हता? कोल्हापुरी चपला मृत गाई/म्हशीच्या चामड्यापासून बनवतात की बनवत नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
श
श्रीगुरुजी Mon, 04/30/2018 - 15:37 नवीन
असला तर जास्त वाईट का नसला तर जास्त वाईट? असला किंवा नसला तरी वाईटच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ड
डँबिस००७ Mon, 04/30/2018 - 12:41 नवीन
ह्या मंगुला फक्त हिंदु धर्मा बद्दल तिरस्कार आहे ! त्यामुळे बाकीचे धर्म त्यांना जवळचे आहे. त्यातल्या त्यात मंगुला ईस्लाम खुपच जवळचा आहे. हिंदु धर्माचा व हिंदु लोकांचा तिरस्कार करण्याचा एकही मौका सोडत नाहीतो. मिसळपाव वर मंगुच्या गरळ / प्रतीक्रियेवर वातावरण गढुळ झाल की त्याला आनंदाच्या ऊकळ्या फुटत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मार्मिक गोडसे Mon, 04/30/2018 - 07:14 नवीन
https://www.google.co.in/amp/s/m.timesofindia.com/india/pm-narendra-modi-summons-tripura-cm-biplab-deb-over-controversial-statements/amp_articleshow/63964364.cms २ मे ला CM चे कान होणार लांब
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 04/30/2018 - 07:37 नवीन
त्रिपुरातील नागरिकांना पुरे पुरे झाले असणार. 'महाभारताच्या काळात इंटरनेट होते'..असे बिप्लब महाशय म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
M
manguu@mail.com Mon, 04/30/2018 - 07:38 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/piyush-goyal-troll-on-twitter-1671262/ देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी टि्वटरवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोवरुन रविवारी युझर्सनी पियूष गोयल यांना मोठया प्रमाणात ट्रोल केले. गोयल यांनी रात्रीच्यावेळी उपग्रहाच्या माध्यमातून घेण्यात आलेले भारताचे दोन फोटो टि्वटरवर पोस्ट केले होते. सर्व भागात वीज पोहोचल्यानंतर भारत आता कसा दिसतो व आधी कसा दिसायचा हे सांगणारे ते दोन फोटो होते. या फोटोंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ठरवलेल्या मुदतीआधीच भारताने सर्व गावांचे विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य गाठले. भारतीयांच्या जीवनातून अंधकार दूर करुन नवीन, शक्तिशाली भारत घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा संदेश त्यांनी फोटोखाली लिहीला होता. पियूष गोयल यांच्या टि्वटनंतर काहीवेळातच टि्वटर युझर्सनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. कारण गोयल यांनी जे फोटो टि्वट केले होते ते दोन वर्ष जुने फोटो होते. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून रात्रीच्यावेळी भारत कसा दिसतो त्याचे फोटो काढले होते. पहिला फोटो २०१२ सालचा होता. दुसरा फोटो नासाने मागच्यावर्षी प्रसिद्ध केला पण तो २०१६ सालचा होता.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 04/30/2018 - 08:51 नवीन
भाजप वाले असे बिघडल्यासारखे का करायला लागलेत? खोटे / ढापलेले फोटो टाकायची भारी हाऊस सगळ्यांना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 04/30/2018 - 08:58 नवीन
योग्य बोललास रे विशुमिता. खरे तर गेल्या सरकारपेक्षा ह्यांचे मंत्री काम करताना दिसत आहेत. मात्र दुसर्या फळीतील नेत्यांचा वाचाळपणा सांभाळताना मोदी/शहा व ईतर मोठ्या नेत्यांना नाकीनऊ येत असावेत असे ह्यांचे मत. फोटोबाबतेही तेच.. पियुष ह्यांना ते फोटो टाकयची काही गरज नव्हती.. बहुतेक शाबासकी घेण्याच्या प्रयत्नात ते जास्तच पुढे गेले व फसले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 04/30/2018 - 09:12 नवीन
यांच्या ओहर अॅक्टींगला लोक वैतागले आहेत. काम राई एवढं दिखावा पर्वताएवढा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
M
manguu@mail.com Mon, 04/30/2018 - 09:24 नवीन
माई फोटो खोटा तर माहितीबद्दलही साश्ंकता निर्माण होणार ना ? नेहरुंचे सौ. माउंटबॅटनचे फोटो दाखवून हेच लोक नेहरुंच्या कामावर प्रश्नचिन्ह लावत होते. आता ह्यांचे फोटो खोटे तर तेच प्रश्नचिन्ह ह्याना साभार परत होईल ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
A
arunjoshi123 Mon, 04/30/2018 - 14:10 नवीन
नेहरुंच्या कामावर
उदाहरणार्थ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ग
गामा पैलवान Mon, 04/30/2018 - 14:37 नवीन
फक्त फोटोच तर उचललेत. पैसे ढापलेत का? शिवाय दावा पूर्णपणे खराच आहे. २०१२ साली मोदी सत्तेत नव्हते तर २०१६ साली होते. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
क
कपिलमुनी Mon, 04/30/2018 - 14:46 नवीन
फोटो खोटे मग जर दावा खरा होता तर फोटो पण खरेच टाकायचे ना ! की नुसताच कागदी दावा आहे ? बाकी फोटो ढापले आहेत ते तुम्ही मोठे पणाने मान्य करता बॉ ! गुर्जी त्यावरून पण पाल्हाळ लावतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 04/30/2018 - 16:01 नवीन
जागे व्हा! -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अभ्या.. Mon, 04/30/2018 - 16:32 नवीन
अल्फा, बिटा झाले, गामा आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ब
बिटाकाका Mon, 04/30/2018 - 17:46 नवीन
हाहाहा!! पातळी खाली नेणे चालू ठेवा, शुभेच्छा!!! आधीच म्हणालो, मुद्दे नसले की वैयक्तिक होण्याशिवाय पर्यायच राहत नाही!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
थ
थॉर माणूस Mon, 04/30/2018 - 20:31 नवीन
कोलॅटरल डॅमेज... एका आयडीने पातळी सोडलेली चालली की दुसरे त्याही पुढे जाता येते का ते पहाणार, त्यात सुक्याबरोबर ओलेसुद्धा जळण्याची शक्यता असतेच. लोकांना वेळीच न थांबवण्याचे परीणाम दुसरे काय. काही महिन्यांपूर्वी याचबद्दल समजावत होतो काही धाग्यांवर. लोकांनी पातळी हळूहळू खाली न्यायला सुरूवात केलीच होती. त्याचीच परीणीती चिखलफेकीत होत्येय आता. एखादी गोष्ट केलेली चालतेय असे दिसले की कधी ना कधी बाकीचे लोक पण हा ट्रेंड पकडणारच की हो, आता शुभेच्छा देऊन काय उपयोग? अजूनही जे चालू आहे त्याने थोड्या काळाने काही धाग्यांचे गटार झाले तरी आश्चर्य वाटायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Tue, 05/01/2018 - 07:40 नवीन
मी माझ्या प्रतिसादांची काळजी आणि जबाबदारी घेऊ शकतो, इतरांच्या नाही. मी वैयक्तिक किंवा पातळी सोडून बोललो असें तर दाखवून द्यावे, वावगे असेल/नसेल तरी दिलगिरी व्यक्त करायला आपल्याला कमीपणा वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
उ
उपेक्षित Tue, 05/01/2018 - 13:14 नवीन
१ लंबर अभय भाऊ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
माहितगार Mon, 04/30/2018 - 14:44 नवीन
मी मूळ बातमी फालो केलेली नाही पण, सर्वसाधारणपणे नासाची छायाचित्रे कॉपीराईट च्या वांद्या शिवाय वापरण्यास मुक्त असतात कॉपीराईट फ्री छायाचित्रांना वापरण्यात वावगे काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Mon, 04/30/2018 - 07:45 नवीन
भोपाळ: पाच साधूंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात विविध आखाड्यातील नागा साधूंनी जोरदार निदर्शने करत सरकारचा निषेध नोंदविला आहे. यादगार-ए-शहाजहाँनी पार्कमध्ये या साधुंनी जोरदार निदर्शने केली. नर्मदा सेवा यात्रेतील भ्रष्टाराचार चव्हाट्यावर आणू नये म्हणूनच शिवराज सिंह चौहान यांनी या पाच साधूंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिल्याचा आरोप नागा साधूंनी केला आहे. स्वामी वैराग्यानंद गिरी यांनी या साधूंच्या या मोर्चाचं नेतृत्व केलं. या साधूंना मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत मोर्चा न्यायचा होता. पण त्यांना पोलिसांनी मध्येच अडविले. घोटाळ्याविरोधातील आवाज दाबण्यासाठीच साधुंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन गप्प बसविले असल्याचा आरोपही या साधुंनी केला. चौहान गेली १२ वर्ष मुख्यमंत्रीपदावर आहेत. या काळात त्यांना साधूंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देता आला नाही, मग आताच साधूंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा का दिला?, असा सवाल करतानाच ६ कोटी वृक्षांचं रोपण करण्यात आल्याच्या सरकारच्या दाव्यावरही नागा साधूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. https://m.maharashtratimes.com/india-news/naga-sadhus-protest-against-mos-status-given-to-five-sadhus-in-mp/articleshow/63968429.cms
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 04/30/2018 - 07:55 नवीन
करदात्यांना गप्प करणे कठीण नाही, परंतू ह्या फुकट्यांना सांभाळणे किती अवघड आहे हे आता ह्यांना समजेल.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 04/30/2018 - 12:37 नवीन
नेत्यापासून ते चाट्यापर्यंत सर्वांना खोटे फोटो टाकायची सवय लागली आहे. जसे की Image removed.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 05/01/2018 - 15:04 नवीन
असा खरा आरसा दाखवला की ट्रोल गायब होतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बिटाकाका Tue, 05/01/2018 - 16:02 नवीन
खरंतर तुमच्या वरील ट्रोलसदृश प्रतिसादाला उत्तर देण्यात फार हशील नाही असे मला वैयक्तिकरित्या वाटते, पण तुम्ही चुकीची माहिती सांगून नेमके काय सिद्ध करायचा प्रयत्न करत आहात ते कळले नाही म्हणून प्रतिसाद द्यावासा वाटला. तुम्हाला नेमके कुणाला ट्रोल करायचे आहे? म्हणजे तुम्ही म्हणता तसं मोदींना फेकू सिद्ध करायचं आहे तर त्यांना टार्गेट ठेवून त्यांनी केलेले ट्विट, दावे वगैरे वापरा. भाजपला ट्रोल करायचे असेल तर त्यांनी अधिकृतरित्या केलेली ट्विट्स टाका. कोणीतरी ऐर्या गैरयाने भाजपच्या समर्थनार्थ काही टाकले असेल तर त्याला कोण उत्तर देईल? ======================== तुम्ही वर टाकलेले चित्र हा भाजप किंवा मोदींचा गोंधळ नसून पीआयबीचा गोंधळ आहे. त्यांनी त्यासाठी माफीही मागितली आहे शिवाय संबंधित मंत्रालयाने त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागितले होते. अर्थात तुम्हाला हे माहिती नसेल असे नाही किंवा माहिती करून देण्यात रस नसेल. ======================== खाली विकिलिक्स बद्दल जे टाकले तेही असेच. भक्त काय करत आहेत त्याला सरकारने किंवा मोदींनी कशाला कंट्रोल करत बसावे, भक्तांनी/अंधभक्तांनी/द्वेष्ट्यांनी काय ट्रोल ट्रोल खेळायचे ते खेळावे. फारफार तर असले ट्विट्स जर भाजपचा कोणी अधिकृत नेता वापरत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी एवढीच अपेक्षा आपण करू शकतो. अर्थात अशी कारवाई कधी होत नसते जशी अलका लांबाच्या फेक सर्वे ट्विटवर झाली नव्हती. ====================== तुम्ही टाकताय तसले ट्विट्स सगळ्या पक्षांचे इथे या धाग्यावर सगळे टाकत बसले तर चर्चेच्या ऐवजी धुळवड होईल. अशी धुळवड खेळण्याचीच इच्छा असेलच तर वेगळा धागा कडेने इष्ट असे मलातरी वाचते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Tue, 05/01/2018 - 19:52 नवीन
बिटाकाका , हे फोटो भाजप च्या गुरुजी सदृश प्रचारकांनी केलेले फेकू कामा बद्दल आहे. इथे गुरुजी तेच करत आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
शब्दबम्बाळ Wed, 05/02/2018 - 06:15 नवीन
ताज्या घडामोडी हा कायम धुळवडीचा धागाच होतो... त्याशिवाय तुम्ही इतकं लिहिलं आहेच तर, PIB हि सरकारी संस्था आहे आणि सध्या जे सरकार आहे ते त्यासाठी उत्तरदायी आहे. PIB अधिकृत सरकारी बातम्या इतर मीडियालादेखील पुरवते. त्यामुळे आता जे काही घडलं ते त्यांचं ते बघून घेतील तिथे सरकारचा/मोदींचा संबंध नाही हि टेप कृपया वाजवू नका. काही चांगलं झालं कि लगेच मोदींच व्हिजन, प्रामाणिकपणा इत्यादी सुरु होत आणि काही चुकलं कि मग त्या खात्याचे अधिकारी, लोकांचा बेजबाबदारपणा, नाहीतर मग गेल्या ६० वर्षातील सरकार हेच मुद्दे असतात! कधीतरी जबाबदारी घ्यावी माणसाने! जबाबदारी वरून आठवलं इथे फेक फोटो टाकणाऱ्या अंधासमर्थकाने निदान ते टाकल्याची जबाबदारी तरी घेतली आहे का? का आपल्या सरकारच्या धोरणानुसार ढकलाढकली सुरु आहे?? "२०लाख" वेळा लोकांनी सांगून झालं असेल! :P बाकी http://www.pib.nic.in हि PIB ची वेबसाईट आहे. फ्रंट पेजवर स्लाईडसमध्ये मोदीसोडून देशातला एक तरी फोटो दिसतोय का सांगा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Wed, 05/02/2018 - 07:03 नवीन
परत एकदा नीट वाचा प्रतिसाद. पीआयबी कि अजून कुठली संस्था सरकारी असल्याचा किंवा नसल्याचा काय संबंध इथे? कि मी तसा दावा केला आहे? ते चित्र जणू काही मोदींनी किंवा भाजपने टाकले आहे याच्या थाटात ट्रोलिंग साठी वापरले जातेय. त्यावर मी फक्त इतकेच सांगितले कि ती चूक पीआयबी ची आहे आणि त्यांनी माफी मागून ते चित्र मागे घेतले आहे. सरकारने हि यावर त्या संस्थेकडून स्पष्टीकरण मागितले आहे. आता कुणीतरी ट्रोल करत आहे म्हणून म्हणून सरकारने यापेक्षा जास्त काय करणे अपेक्षित आहे तुम्हाला? --------------------------------- बरं त्याउपर जाऊन सिद्ध काय करायचेय तेही कळेना? कि असे एरियल इन्स्पेक्शन झाले नाही? कि मोदींना आवडेल तो व्हुव त्यांनी टाकायला लावला? त्यांना हवाई पाहणीत काय दिसले याचे ओरिजिनल फोटोही टाकले पीआयबी ने, ते पाहून घ्यावेत हवे तर. --------------------------------- फोटो एडिट करून टाकणे आणि चांगल्या गोष्टींचे व्हिजन याची तुलना करताय तुम्ही? शुभेच्छाच देऊ शकतो फक्त! -------------------------------- कोण कसली जबाबदारी घेत नाही, ढकलाढकली करतंय त्याची टेप माझ्या प्रतिसादाला उत्तर म्हणून का वाजवताय? थेट त्यांच्या कानात जाऊन वाजवाकी! उगाच सरसकटीकरण कशाला? मुद्द्यावर बोललं तर चर्चा होते, नाहीतर धुळवडीला हातभारच लागतो. -------------------------------- कावीळ झाली कि जग पिवळं दिसतं म्हणतात. पीआयबीच्या वेबसाईटवर पाहिलं मोठं बॅनर खेळाडूंच्या कौतुकसोहळ्याचं दिसत आहे. तसेही, पीआयबी च्या वेबसाईटवर २०१४ पर्यंत त्यावेळच्या पंतप्रधानच फोटो लागायचा आता आताच्या लागतोय. ------------------------------- असो....फेसबुकवरचे, भक्त/अंधभक्त/द्वेष्टे/अन्धद्वेष्टे/नास्तिक यांच्यासारखे फोटोज शोधणे/बनवणे, त्याला ट्रोलिंगसाठी वापरणे वगैरे फार अवघड नसावे. कोणाला मिपावर पण तसेच वावरायचे असेल तर त्याला कोण अडवणार. मुद्दे मांडणे अवघड काम असावे बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
श्रीगुरुजी Tue, 05/01/2018 - 16:19 नवीन
असा खरा आरसा दाखवला की ट्रोल गायब होतात . ट्रोल गायब झालेले नाहीत. इथे तुम्ही ट्रोलचा रतीब टाकताय की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ड
डँबिस००७ Mon, 04/30/2018 - 13:00 नवीन
In a noteworthy development, all of India’s 597,464 inhabited villages have now joined the country’s mainline electricity supply network. It will be recalled that Prime Minister Narendra Modi had announced on August 15, 2015 that all unelectrified villages would get power over the next 1,000 days. ह्या कामाला पुर्वीच्या सरकारांना ६० वर्ष पुरी पडली नाहीत ती ह्या सरकारने १००० दिवसात पुर्ण केलेय !!
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 04/30/2018 - 13:17 नवीन
सरकारचे अभिनंदन..
How does India define electrification? The government considers a village to be electrified if the number of households electrified is at least 10% and electricity is provided to public buildings including schools, health centres, dispensaries, community centres and village councils.
हे ही लक्षात ठेवलेले बरे असे ह्यांचे मत. http://www.bbc.com/news/world-asia-india-43946049
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
क
कपिलमुनी Mon, 04/30/2018 - 13:29 नवीन
वीज तयार होणारे प्रकल्प सुद्धा आता 4 वर्षात बांधून तयार झाले का ? सरकारला क्रेडिट नक्की द्या पण 60 वर्षात काही झाले नाही म्हणून गळा काढू नका. 60 वर्षात आपण अण्वस्त्रसज्ज देखील झालो हे विसरू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
A
arunjoshi123 Mon, 04/30/2018 - 14:13 नवीन
60 वर्षात आपण अण्वस्त्रसज्ज देखील झालो हे विसरू नका
चीनची कृपा. नाहीतरी नेहरूंच्या काळात आपण उत्तमपैकी टॉफीसज्ज होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
M
manguu@mail.com Mon, 04/30/2018 - 14:53 नवीन
*"97% villages electrified before PM Modi came to power": Twitterati ridicule PM on his 100% electrification claim* Prime Minister Narendra Modi on Sunday said that the mammoth task of electrifying every village in India has been accomplished. But many social media users weren’t as thrilled with his tweet and felt that it was a little misleading as it didn't divulge all the details. *"There was already 94% electrification of villages when Modi came to power. UPA took village electrification from 79% in 2004 to 94% in 2014.* NDA2 finished last 6% at the same rate as the UPA, approx 1.5% per year," economist Rupa Subramanya stated in a tweet. "So Modi government gets credit for closing the last 4% not 6%. Basically most villages in the country were already on the grid by the time Modi came to power but headlines and BJP friendly journos make it appear that most villages were not electrified before 2014," she added. http://www.timesnownews.com/amp/mirror-now/in-focus/article/97-villages-electrified-before-pm-modi-came-to-power-twitterati-respond-on-100-electrification-claim/222699?__twitter_impression=true
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ड
डँबिस००७ Mon, 04/30/2018 - 13:01 नवीन
ईथे लोक मॉर्फ फोटोच्या जवाबदारी बद्द्ल बोलत आहेत. जनतेच्या कल्याणाच ईथे कोणाला पडलेलच नाही. !!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 04/30/2018 - 13:46 नवीन
Image removed. ट्विट चा दुवा सरकारने कोर्टात कबूल केले आहे की सुप्रीम कोर्टाने असे कोणतेही आदेश दिले नव्हते . सरकार कडून लोकाना मिसलीड करण्यात आले आहे. दुवा
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 05/01/2018 - 11:37 नवीन
इथे सरकार तोंडघशी पडलाय मग गप्प बसले आहेत. सरकार सुद्धा चुकल्याचे कबूल करते , पण मिपावर चहा पेक्ष्या किटली गरम आणि फेकू पेक्षा भक्त गरम झालेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Mon, 04/30/2018 - 13:49 नवीन
http://www.thehindu.com/news/national/6-year-old-rape-victim-dies-after-8-day-struggle-in-odisha/article23725572.ece?homepage=true असिफासाठी मेणबत्ती मोर्चा काढणारे, निदर्शने करणारे, मोदींच्या परदेश दौ-यात निदर्शने करणारे, ट्विट करणारा पप्पू आणि अनेक सिनेकलाकार आता कोठे जाऊन लपले? अरे हो, विसरलोच. या प्रकरणातील बलात्कारी खुनी हा पुरोगाम्यांच्या लाडक्या शांतीधर्माचा आहे ना. मग तोंडाला चिकटपट्टी, कानात बोळे व डोळ्यांवर पट्टी येणारच, कारण हा पुरोगामी व निधर्मी गुन्हा आहे.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 04/30/2018 - 14:42 नवीन
तुम्ही काढा मोर्चा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Mon, 04/30/2018 - 14:18 नवीन
बलात्कारी आणि पीडितेचा धर्म बघायची सवय भाजपयाना आहे. दिल्ली मधल्या रेपमध्ये मुस्लिम मुलगा होता तेव्हा सगळयांनी निदर्शने करून संताप व्यक्त केला होता , तेव्हा काँग्रेस, भाजप , हिंदू, मुस्लिम असा विचार केला नव्हता. यात सुद्धा धर्म घुसडायला भाजप्यानी सुरुवात केली आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Mon, 04/30/2018 - 17:55 नवीन
हाहाहा!! बलात्कारासारख्या क्रूर घटनेवरसुद्धा सिलेक्टिव्ह प्रोटेस्ट (की नौटंकी?) करून आता तोंडावर पडून झालेय. मग अंधभक्तना आता आठवले की यात धर्म वगैरे असतो. हा प्रश्न भाजपला नाही, ज्यांनी "आय ऍम हिंदुस्तान" असे जाणिपूर्वक वापरायला सुरुवात केली त्यांना जाऊन विचारायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 04/30/2018 - 14:41 नवीन
सध्या b com , b a च्या परीक्षा संपल्या त्यावरून आठवले , इराणी बाईने तेव्हा डिग्री जॉईन केली असती आणि पास झाली असती तर आता खरी डिग्री असते तिच्याकडे ! बादवे खोटा फोटोशॉप करून डिग्री मिळत नाही , नाहीतर ते पण सर्टिफिकेट लावले असते. मा. पंप्रची डिग्री किंवा निकाल दाखवायला विद्यापीठ नाही म्हणताय असा वाचण्यात आले आहे . ख खो मोती जाणे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 04/30/2018 - 15:30 नवीन
https://www.firstpost.com/india/delhi-court-dismisses-fake-degree-case-against-smriti-irani-says-it-was-filed-to-needlessly-harass-her-3059110.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 04/30/2018 - 15:57 नवीन
https://www.firstpost.com/india/delhi-court-dismisses-fake-degree-case-against-smriti-irani-says-it-was-filed-to-needlessly-harass-her-3059110.html/amp दुवा In pursuance to the court's earlier direction, Delhi University had also submitted that the documents pertaining to Irani's BA course in 1996, as purportedly mentioned by her in an affidavit filed during 2004 Lok Sabha elections, were yet to be found. The court had on 20 November last year allowed the complainant's plea seeking direction to the officials of EC and DU to bring the records of Irani's qualifications after he said he was unable to place them before the court. PIL फेटाळली म्हणून डिग्री सापडली नाहीये. दुव्यात स्पष्ट लिहिला आहे की या बाईची डिग्री सापडत नाही. एक अर्ज केला की सगळा चार वर्षाचा transcript मिळते. बाकी केजरीवाल ने माफी मागितली ज्या दिवशी स्वतःच्या चुकीबद्दल माफी मागायचे धाडस सगळ्या नेत्याकडे येईल तो सुदिन ! बादवे तुम्ही तर खोटी चित्रे टाकूनही माफी मागत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 04/30/2018 - 16:24 नवीन
New Delhi: In a relief to Smriti Irani, a Delhi court on Tuesday dismissed a complaint against her for allegedly giving false information on her educational qualification to the Election Commission, saying it was filed to "needlessly harass" her as she was a union minister. "The said delay could not be condoned as the complainant is not an aggrieved person, the complaint does not appear to have been filed for the vindication of the majesty of justice and maintenance of law and order, the complaint appears to have been filed to needlessly harass the proposed accused," the magistrate said. बाकी केजरीवाल ने माफी मागितली ज्या दिवशी स्वतःच्या चुकीबद्दल माफी मागायचे धाडस सगळ्या नेत्याकडे येईल तो सुदिन ! एकदा नव्हे तर तब्बल ३३ वेळा आचरटपणा करून अत्यंत खालच्या पातळीवरील भाषा वापरून बेफाम व निराधार आरोप करायचे, प्राण गेला तरी माफी मागणार नाही अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना करून महागडे वकील हायर करून न्यायालयात खेटे घालायचे, न्यायालयात समोरच्यावर अर्वाच्य आरोप करायचे, स्वतःच्या व्यक्तिगत खटल्याची कोट्यावधी रूपयांची फी सरकारी खजिन्यातून द्यायची आणि आता प्रकरण अंगाशी येऊन शिक्षा होणार हे स्पष्ट दिसायला लागताच माफी मागून मोकळे व्हायचे . . . हे धाडस नसून अत्यंत निर्ढावल्याचे व डांबरटपणाचे लक्षण आहे. बादवे तुम्ही तर खोटी चित्रे टाकूनही माफी मागत नाही खोटी आहेत हे ठरविले कोणी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 04/30/2018 - 16:29 नवीन
तुमच्या आख्या प्रतिसादात डिग्री कुठे दिसेना ! PIL डिसमिस केलि पण डिग्री नाही दाखवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 04/30/2018 - 16:33 नवीन
मोठ्या पदावरील व्यक्तील त्रास देऊन ब्लॅकमेल व बदनाम करण्यासाठी मुद्दाम फाईल केलेल्या खोडसाळ पीआयएल कचर्‍यातच टाकायच्या असतात. न्यायालयाने योग्य तोच निर्णय घेतला. नुकतीच लोयांच्या मृत्युनंतर ३ वर्षानंतर जागे होऊन भाजपला त्रास देण्यासाठी मुद्दाम फाईल केलेली खोडसाळ पीआयएल न्यायालयाने अशीच कचर्‍याच्या डब्यात फेकून दिली हे वाचले असेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
M
manguu@mail.com Mon, 04/30/2018 - 16:43 नवीन
दोन्ही केसेस्मध्ये त्यानी स्वताच वेगवेगळ्या वेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ताळमेळ नव्हते, म्हणूनच जनहितासाठी सत्य बाहेर येण्यासाठी पी आय एल टाकली. बदनामी हेतु होता तर अटक का नाही केली तक्रारकर्त्याला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 04/30/2018 - 18:10 नवीन
जनहित? LLRC . . . ते जनहित वगैरे नसून harassment आहे असा न्यायालयानेच निर्णय दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
क
कपिलमुनी Mon, 04/30/2018 - 16:58 नवीन
इथे प्रत्येकाने खोटे म्हणाले आहे. आणि अभ्या सारखा अनुभवी माणसाने सांगितले आहे. खरे आहे असे कोणि म्हणाले असल्यास दाखवा . इथल्या इथे मतदान घेऊन टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा