Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी- भाग ३३

ख
खेडूत
Tue, 05/15/2018 - 06:46
🗣 279 प्रतिसाद
रामराम! आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे! आजची एक बातमी: मुलाला मोठा इंजिनिअर करण्याचं स्वप्न बाळगून पालकांनी आपल्या पाल्यांना इंजिनिअरिंगमध्ये 'टाकायला' सुरुवात केली. मधल्या काळात या विद्यार्थ्यांचा आकडा बराच वाढला होता. पालकवर्गाच्या वाढत्या उत्साहामुळे महाविद्यालयंही पत्त्यांसारखी उभी राहिली. मात्र आता हा उत्साह ओसरलेला दिसत असल्याने इंजिनिअरिंगच्या जागाही रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयांची चांगलीच अडचण झाली आहे. 2016 - इंजिनियरिंगच्या 43 टक्के जागा रिक्त 2017- इंजिनियरिंगच्या 44 टक्के जागा रिक्त 2018- इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त ही घसरगुंडी महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंग महाविद्यालयांची आहे. गेल्या चार ते पाच वर्षात राज्यात कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी कॉलेजेस उगवली. विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची स्वप्नं दाखवली गेली. पण इंजिनियरिंगकडे वाढलेला ओढा आता आटला आणि अनेक महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली. महाराष्ट्रात सध्या 360 इंजिनियरिंग कॉलेज आहेत, तर 447 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. 2017 साली एक लाख 44 हजार जागांपैकी 64 हजार 625 जागा रिक्त राहिल्या, तर 2018 साली एक लाख 38 हजार जागांपैकी 56 हजार जागा रिक्त राहिल्या. दरम्यान, फार्मसी म्हणजेच औषधनिर्माणशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसत आहे. इंजिनियरिंगमधील घसरणीचं मूळ हे कॉलेजच्या बाहेर आहे, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मिळणाऱ्या अपुऱ्या संधींमध्ये आहे. पण या स्थितीवर सरकारने तूर्तास काही उपाययोजना आखलेल्या आहेत नव्याने सुरु होणाऱ्या इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना स्थगिती देण्याची विनंती एआयसीटीईला करण्यात आली आहे. ज्या खाजगी संस्थांनी इंजिनियरिंग कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी अभ्यासक्रमात बदल करुन प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यवसायाभिमुख शिक्षणाला भर दिला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या
108438 वाचन

💬 प्रतिसाद (279)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 05/15/2018 - 12:21 नवीन
गोव्यातून धडा घेऊन काँग्रेसने जनता दलाला ऑफर दिली आहे अशी बातमी आहे. जेडी(एस)आमदाराचा भाव प्रत्येकी ४० कोटी असल्याचे बोलले जाते. आता अपक्ष/जेडी(एस्)चे आमदार कुठल्या रिसॉर्टवर जातात ते बघुया.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 05/15/2018 - 12:27 नवीन
तर परत पैसे कशाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
M
manguu@mail.com Tue, 05/15/2018 - 12:31 नवीन
*ब्रेकिंग न्युज* *कॉंग्रेस - जेडीएस देणार भाजपच्या हातावर तुरी* *कौल कर्नाटकचा* ▪ *सर्वाधिक जागा जिंकूनही भाजप राहणार सत्तेपासून दुर* ▪ *५ वाजता राज्यपालाना भेटुन जेडीएस करणार सत्तास्थापनेचा दावा* ▪ *जनता दलाचे कुमारस्वामी मुख्यमंत्री होण्याची शक्यता* पक्षीय बलाबल *भाजप = १०४* *कॉंग्रेस =७७* *जनतादल(s)= ३९* *इतर = ०२*
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 05/15/2018 - 12:42 नवीन
मंगू, अरे पण सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाला आधी आमंत्रित केले जाते असे काहीतरी आहे ना? त्यांनी 'नाही' म्हंटले तर मग दुसरे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Tue, 05/15/2018 - 13:19 नवीन
जो आधी जातो, त्याला पहिला चान्स गोव्यात दुसर्या नंबरवर असूनही भाजपवाले आधी गेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
श
शब्दबम्बाळ Tue, 05/15/2018 - 12:54 नवीन
ऑफिस मध्ये सगळे जण बीजेपीला शिव्या घालत आहेत! त्यातल्या बऱ्याच लोकांना खरतर बीजेपी यावे असे वाटत होते पण सकाळपासून बीजेपीवाल्यांच्या ज्या हालचाली सुरु होत्या त्या बघून यांचं पण डोकं फिरलं... इतका ओव्हर कॉन्फिडन्स का करायचा? तो 'येडी'(सगळे असेच हाक मारतात, बऱ्याच लोकांना त्याचा राग आहे खरतर, जरी मोदींना समर्थन देत असले तरी) शपथ घ्यायलाच बसला होता, आम्हाला कोणाचं समर्थन लागणार नाही आणि घेणारही नाही असली वक्तव्य आधीच करून बसलेत! आता काही जणांना असेही वाटतंय की बर झालं! सिध्धु बाहेर जाणार, येडी ला पण चान्स नाही मिळायचा आणि कुमारस्वामी सीएम बनू शकतो. एका अर्थाने मोठया पक्षांना धडा मिळाला आणि तिसराच पुढे आला... बघूया काय होतंय, चांगलेच ट्विस्ट आलेत! अवांतर: या निमित्ताने प्रसारमाध्यमांची घिसाडघाई पुन्हा दिसून आलीच!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 05/15/2018 - 13:02 नवीन
आजघडीला मतदान, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर होत असून सुद्धा संपूर्ण निकाल लागायला संध्याकाळचे पाच का वाजावे लागतात हेच कळत नाही.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 05/15/2018 - 13:22 नवीन
मतदान मशीनवर असले तरी फायनल प्रिंट पेपरवर होऊन ती स्वाक्षरी झाली की प्रोसेस कायदेशीर होते, निकाल आधीच लागला तरी डिग्रीचे सर्टिफिकेट उशीराच भेटते ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
अ
अभ्या.. Tue, 05/15/2018 - 13:26 नवीन
आगामी २०१९ चा रिझल्ट डोक्यात ठेवून बीजेपी क्लेम करायला जाणार का? म्हनजे ते कैतरी समीकरण वगैरे आहे ना? आम्हाला मोदीकाका पायजेत बाबा २०१९ ला पण. कारण म्हणजे कर्नाटकात असले काही तरंगते राजकारण झाले की सोलापूराचा बाजार वधारतो.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 05/15/2018 - 13:54 नवीन
नवी दिल्ली: मणिपूर आणि गोव्यात आघाडी करून सत्ता स्थापनेची खेळी करणाऱ्या भाजपवर त्यांचचं तंत्र उलटलं आहे. काँग्रेसने भाजपच्या याच तंत्राचा वापर करत कर्नाटकात जेडीएससोबत आघाडी केली असून आजच हे दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा करणार आहेत. त्यामुळे कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं असून भाजपला हा मोठा हादरा असल्याचं मानलं जात आहे. मणिपूर आणि गोव्याच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असतानाही भाजपनं प्रादेशिक पक्षांना आपल्या बाजूला वळवून दोन्ही राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्याचंच उट्टं आता काँग्रेसने काढलं आहे. कर्नाटकमध्ये बहुमतासाठी ११३ जागा हव्या आहेत. मात्र कोणत्याही पक्षाला हा आकडा गाठता आलेला नाही. कर्नाटकमध्ये भाजप १०६ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ७३ आणि जेडीएस ४१ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे. जेडीएस नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याबाबत सोनिया गांधी आणि आझाद यांच्यात चर्चा झाली असून सोनिया यांनी त्याला हिरवा कंदिल दाखवला होता. त्यानंतर आझाद यांनी देवगौडा यांच्याशी चर्चा करून जेडीेएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. जेडीेएसनेही ही ऑफर स्वीकारली असून काँग्रेसबरोबर आघाडी केल्याचं जाहीर केलं आहे. आज सायंकाळी काँग्रेस आणि जेडीेेएसचे नेते राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. तर येत्या १८ मे रोजी जेडीएस नेते कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं जेडीएसने स्पष्ट केलं आहे. गोव्याच्या धर्तीवरच राज्यपालांनी आम्हालाही सरकार स्थापनेसाठी पाचारण करावं, अशी मागणीही जेडीएसने केली आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 05/15/2018 - 14:07 नवीन
तुम्ही एक विसरताय, गोवा व मणिपूर ह्या दोन्ही राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री आहे. कॉंग्रेससारखी जागा जास्त असूनही मुख्यमंत्री पद, एका कमी जागा असलेल्या पक्षाकडे द्यायची नामुष्की भाजपावर ओढवली नव्हती. -- या घटनेने एक सिद्ध झाले की कॉंग्रेस सत्ता हव्यासी होतीच पण आता लाचार देखील झालेय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Tue, 05/15/2018 - 14:23 नवीन
लहान भावाला सत्ता देण्यात किती आनंद असतो हे आता सेक्युलर लोकांनी रामभक्तांना शिकवायचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
प
प्रसाद_१९८२ Tue, 05/15/2018 - 14:28 नवीन
निवडणुक प्रचारात ह्याच(जेडी-एस) लहान भावाला कॉंग्रेसने कश्या प्रकारच्या शिव्या घातल्या होत्या, हे सर्व जनतेने पाहीले आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Tue, 05/15/2018 - 14:31 नवीन
दुसऱ्याला सत्तेचा आनंद देता देता आपल्याला वनवासात पाठवण्यात आले आहे याची जाणीव झाली हेही नसे थोडके. -------------------------- बाकी सेक्युलर लोकं रामभक्त नसतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Tue, 05/15/2018 - 14:27 नवीन
घाई होतेय हो मंगूसाहेब! उतावळ्या मेडियासारखं लगेच निष्कर्षाला कशाला पोहोचायचं? गोवा आणि मणिपूर मध्ये काँगेसने आपला प्रस्ताव पाठवायच्या आधी भाजपने प्रस्ताव पाठवला होता. ढिलाई काँगेसची होती, त्याचं समर्थन भाजपची खेळी, तंत्रने नाही होऊ शकत. कुठलाही चाणाक्ष, जुना/मुरलेला पक्ष करू शकला असता ते काँग्रेसला करता आलं नाही हि वस्तुस्थिती आहे. ------------------------------------- इथे भाजपनेही तितक्याच तत्परतेने सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला आहे आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे आताच काहीही निष्कर्ष काढणे अवघड आहे. राज्यपाल कुणाला आमंत्रण देतात यावर सगळं आहे. ------------------------------------ भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावून बहुमत सिद्ध करायला वेळ दिला गेला तर मात्र कर्नाटकात पुढचे पंधरा दिवस राजकारण उतू जाणार आहे एवढे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Tue, 05/15/2018 - 14:29 नवीन
१८ तारखेला शपथ घेणार होते म्हणे. मग सात दिवस कशाला हवे आहेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Tue, 05/15/2018 - 14:35 नवीन
ती तर सिद्धरामैय्यापण घेणार होते, त्याचे काय झाले ते नाही विचारले? भाजपला जनतेने नाकारल्यामुळे वगैरे जड वाक्य फार जुनी नाहीत मंगूसाहेब! ------------------------------- बाकी वरील वाक्य बघून, जेडीएस चे सरकार आले कि तो तो काँग्रेसचा नैतिक विजय ठरणार आहे यात काही शंका उरलेली नाही :):).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
भ
भंकस बाबा Tue, 05/15/2018 - 14:57 नवीन
निवडून आलेल्या उमेदवारानी कुमारस्वामीच्या नावाला आक्षेप घेतला आहे , आता जर कोंग्रेसचा बार फुसका ठरला तर वदनि कवल घेता म्हणून झाल्यावर ताटावरुन उठवल्यासारखे होईल , ते राहुलबाबा कुठे दिसले नाही? बघा आमच्यात परिवर्तन झाले , पप्पू नाही म्हटले , आता खरोखरच दया येते बिच्यार्याची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ग
गामा पैलवान Tue, 05/15/2018 - 15:39 नवीन
मंगूश्रीपंत, उत्तम विवेचन आहे. (बघा, माझ्या सहवासाने तुमच्या प्रतिभेस कसे धुमारे फुटू लागलेत ते) माझ्या मते येदियुरप्पांचा पत्ता कट करायला भाजप सरकार बनवत नाहीये. हिमाचलात धूमलांचा वापर करून भाजपने निवडणूक जिंकली, पण स्वत: धूमल हरले (संदर्भ व अधिक माहिती : http://jagatapahara.blogspot.co.uk/2018/05/blog-post_5.html ). याचा अर्थ असा की भ्रष्ट चेहऱ्याचा वापर करून निवडणूक खुशाल जिंकायची, पण त्यात असा काही मोडता घालायचा की भ्रष्ट व्यक्तीस विजयाची फळं चाखता येऊ नयेत. असाच काहीसा प्रकार कर्नाटकात घडलेला दिसतो. मात्र येदि सावध असल्याने पराभूत झाले नाहीत. अशा वेळेस सरकार न स्थापायचा डावपेच भाजप श्रेष्ठींनी खेळला असावा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Tue, 05/15/2018 - 15:44 नवीन
इतका अफाट खर्च करायचा आणि सत्त सोडायची ते कुणाला तरी धडा द्यावा म्हणुन ! भाजपावाले सत्ता स्थापायला जात नाहीत कारण त्यांच्याकडे सध्या तितके मनुष्यबळ नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
व
विशुमित Tue, 05/15/2018 - 15:47 नवीन
ये बात कूच हजम नही हुआ..! === <<<(बघा, माझ्या सहवासाने तुमच्या प्रतिभेस कसे धुमारे फुटू लागलेत ते)>> ==>> म्हणून तर मी तुमचा फॅन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
क
कंजूस Tue, 05/15/2018 - 15:16 नवीन
थोडक्यात बंगळुरु दूर.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 05/15/2018 - 15:47 नवीन
अशा परिस्थितीत काय करायचे याबद्दल आपल्या घटनेमध्ये याबद्दल स्पष्टता नाही. मोठ्या पक्षाला बोलवायचे की आघाडीला बोलवायचे ? पूर्वी वाजपेयीना सर्वात मोठा पक्ष असून बहुमत नव्हते तरीही सरकार स्थापनेला बोलावले होते . सध्या गोवा , मणिपूर मध्ये आघाडीला बोलावले होते. आणि त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. सध्या दोन्ही पक्षाना भेटायला आहे . दोघांनी पत्रे दिली आहेत. मग मणिपूर गोव्यानुसार आता आघाडीला संधी हवी. त्यांचा मुख्यमंत्री कोण हे ते अंतर्गत प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 05/15/2018 - 16:18 नवीन
दोन्ही बाजू आहेत. भाजपाला सरकार स्थापन करायचे तर काही आमदार फोडावेच लाग्तील. मग अशावेळी घोडेबाजाराला उत्तेजन द्यायचे की जे स्थिर सरकार देऊ शकतात(किंवा तसा दावा करतात) अशांना आमंत्रण द्यायचे? ह्या दोन्ही पक्षांची युती निवडणूकीनंतर झाली आहे तेव्हा ह्यांचे सरकारही स्थीर शासन देइल ह्याची हमी नाही. वेळ आली की थातूर-मातूर कारण देऊन पाठिंबा काढून घ्यायचा हे धोरण इंदिरा गांधींच्या काळापासून चालत आले आहे. देवेगौडा ह्यांना त्याचा अनुभव आहेच.
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Tue, 05/15/2018 - 16:51 नवीन
गॅरी दादा कुठे गायबलेत देव जाणे. चक्क निवडणूक चाललीये आणि त्यांचा धागा नाही असा कसं काय :(
  • Log in or register to post comments
ए
एमी Tue, 05/15/2018 - 18:05 नवीन
त्यांच्या गुजरात निवडणूक धाग्यावर 'सन्माननीय' सदस्यांनी काय दिवे लावले होते ते पाहिलं असेल तर असे प्रश्न पडणार नाहीत. 'आवरा यांना' म्हणून ३-४ दा संपादकांना हाळी दिलेली. 'ट्रोल अलर्ट' देणारं वॉचडॉग तेव्हा हड्डी चघळत बसलं होतं बहुतेक....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
व
वीणा३ Tue, 05/15/2018 - 19:27 नवीन
पण गॅरी ट्रुमन ना आधी पण अशा लोकांकडे संपुर्ण दुर्लक्ष करताना बघितलंय. त्या धाग्या वरच्या गोंधळामुळे ते लिहीत नसतील तर खरंच वाईट आहे मिपासाठी :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
M
mayu4u Wed, 05/16/2018 - 06:45 नवीन
संपादकांशी ओळख वगैरे काहीतरी बिनबुडाचं तुम्ही लिहिलेलं, तोच धागा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
व
वीणा३ Wed, 05/16/2018 - 19:31 नवीन
संपादकांशी ओळख - नाय हो मी जेमतेम येते कशीबशी मिपा वर आवड म्हणून , कुठली कुणाची ओळख नाहीये माझी :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
अ
अर्धवटराव Tue, 05/15/2018 - 17:37 नवीन
लोकसभेचे निकाल भाजपच्या बाजुने लागल्यास काँग्रेसचा कर्नाटकात पत्ता कट करण्याचा प्रयत्न केला जाईल.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 05/15/2018 - 17:58 नवीन
वाराणसीत पूल पडला, नेहरूंच्या नावाने अजून कुणी कसे विव्हळले नाही ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 05/15/2018 - 22:30 नवीन
नेहरूंच्या नावे पप्पू विव्हळतोय म्हणून. -गा.पै. अवांतर : यालाच अच्छे दिन म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ड
डँबिस००७ Tue, 05/15/2018 - 22:23 नवीन
वाराणसी मध्ये निर्माणाधीन पुलाचा बीम कोसळुन मोठा अपघात झालेला आहे. बरीच वहाने ह्या बीम खाली सापडल्याने मोठी जिवीत हानी झालेली आहे ! मृृृतात्मानां श्रद्धांजली !! मा. संपादक मंडळ , mangoo ह्या सदस्याला वाराणसीत झालेल्या अपघाताबद्दल असंवेदनशील टिप्पणी केल्याबद्दल सक्त ताकीद देण्यात यावी!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 05/15/2018 - 22:24 नवीन
वाराणसी मध्ये निर्माणाधीन पुलाचा बीम कोसळुन मोठा अपघात झालेला आहे. बरीच वहाने ह्या बीम खाली सापडल्याने मोठी जिवीत हानी झालेली आहे ! मृृृतात्मानां श्रद्धांजली !! मा. संपादक मंडळ , manguu ह्या सदस्याला वाराणसीत झालेल्या अपघाताबद्दल असंवेदनशील टिप्पणी केल्याबद्दल सक्त ताकीद देण्यात यावी!
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 05/16/2018 - 06:06 नवीन
देवाने मुद्दाम पूल मोडून तुम्हाला संदेश दिला आहे कि सत्ताधारी पक्षापासून तुम्ही बंगालला वाचवावे - मोदीजी जेंव्हा कोलकाता मधील पूल पडला तेंव्हा. वाराणसीत पूल पडून लोक मेले ह्याच दुःख आहे. - आपल्या मतदारसंघात पूल पडला तेंव्हा मोदीजी. https://www.independent.co.uk/news/world/asia/kolkata-flyover-collapse-was-gods-message-says-indian-prime-minister-a6974026.html
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 05/16/2018 - 06:26 नवीन
निवडणूक प्रचारात बऱ्याच वेळेस काहीही बरळतात मोदी, भाषणे ऐकावी पण वाटत नाहीत. ------------------------------------ तरीही तुमची वरची तुलना पटली नाही. ज्या दिवशी कोलकत्यात अपघात झाला त्या दिवशी ते अमेरिकेत होते. तिथून त्यांनी काल जसा शोक व्यक्त केला आणि जे मत व्यक्त केले तेच मत व्यक्त केले होते. अपघाताच्या दिवशीची बातमी - https://www.ndtv.com/kolkata-news/pm-modi-expresses-shock-and-sadness-over-kolkata-flyover-collapse-1292596 नंतर पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात त्या पुलाचं बांधकाम करणाऱ्या कंपनीने पूल कोसळणे हे देवाचे काम (पक्षी-ऍक्ट ऑफ गॉड) आहे असे म्हटले होते. त्याला उद्देशून हे ऍक्ट ऑफ गॉड नसून ऍक्ट ऑफ फ्रॉड आहे आणि असलाच काही मेसेज देवाचा तर तो असा कारभार करणाऱ्या सरकारला हटवण्याचा आहे असे मोदी म्हणाले. ----------------------------------- अर्थात हि फक्त पार्शवभूमी, याने मोदींच्या त्या वाक्यातला फोलपणा कमी होत नाही. फक्त त्या पुलाच्या वेळी प्रतिक्रिया वेगळी, आता वेगळी असं चित्र निर्माण करणे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
प
प्रसाद_१९८२ Wed, 05/16/2018 - 06:33 नवीन
निवडणूक प्रचारात बऱ्याच वेळेस काहीही बरळतात मोदी, भाषणे ऐकावी पण वाटत नाहीत.
-- अगदी सहमत ! मागे ABP MAZA च्या चर्चेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, "निवडणुक प्रचारा दरम्यान जो माणूस मोदींची भाषणे लिहितो त्याला 'पोकळ बांबू' ने फटकावले पाहिजे", इतकी त्यांची भाषणे निराधार असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
M
manguu@mail.com Wed, 05/16/2018 - 09:45 नवीन
हिणकस बोलून सारवासारव करण्यात काही लोक पटाईत असतात दाभोलकरांच्या मृत्यूबाबतही त्यांना कर्माचे फळ मिळाले अशी वाक्ये लिहिली होती , नंतर सारवासारव केली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
M
manguu@mail.com Wed, 05/16/2018 - 06:28 नवीन
खूप वाईट शब्द वापरले आहेत मोडीजीनी. लोकांच्या मृत्यूचे राजकारण करणे , हे खूपच वाईट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
क
कपिलमुनी Wed, 05/16/2018 - 09:35 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल गुरुवार, 05/17/2018 - 07:21 नवीन
आसे म्हायतीविनाचे आकडे कश्ये शेंडी लावाय्ला वापर्तात ह्ये इतरांनी त्येंच्या परतिसादात लिवले हायेच. आनि आसं क्येला तर बाकी लोकं कपाटातली जुनी हाडे धडधडा बाहेर पाडतात आनि लईच पंचाईत व्हते रं बाबा ! जवापत्तूर कायदा वापरून काम व्हतंय तवापत्तूर कोनीबी फकस्तं 'आप्लं नुस्कान व्हतंय रे बाबा' म्हनून गळा काड्ला की लोकान्ला लै मज्जा येतीया रं बाबा ! हमाममे सबच नंगे है रं बाबा... when-vajubhai-vala-watched-deve-gowda-dismiss-bjp-government-in-gujarat-1234669-2018-05-16">When Vajubhai Vala watched Deve Gowda dismiss BJP government in Gujarat ह्ये काय लईच कानुनी व्हतं का ? इंदिराबाईंन्नी बिगरकाँग्रेसची लै सरकारं राष्ट्रपती व राज्यपालांना हाताशी पकडून घडधडा पाल्डी व्हती त्ये आटवतं का ?! त्ये तर जंक्शन गैरकानुनी व्हते रं बाबा !? =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
S
sagarpdy गुरुवार, 05/17/2018 - 08:20 नवीन
निष्कर्ष : पक्षाध्यक्ष डोकं वापरणारा असला कि बरं पडत (कायद्याच्या चाकोरीत राहून सत्ताकारण करायला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
M
manguu@mail.com Wed, 05/16/2018 - 09:58 नवीन
कर्नाटकमध्ये भाजपाकडून जनता दल सेक्यूलरच्या आमदारांना १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कुमारस्वामी केला आहे. भाजपाकडे हा काळा पैसा येतो कुठून, असा सवालही त्यांनी विचारला आहे. बुधवारी कुमारस्वामी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर गंभीर आरोप केले. आमच्या आमदारांना १०० कोटी रुपये आणि मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्यांची ऑफर दिली जात आहे, असे कुमारस्वामींनी सांगितले. ते गरीबांचे सेवक असल्याचे सांगितले जाते. मग त्यांच्याकडे काळा पैसा कुठून येतो आणि आयकर विभागाचे अधिकारी काय करत आहेत, असा सवाल त्यांनी विचारला. ‘मी निकालावर समाधानी नाही. कर्नाटकात मोदी लाट नसून भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही. देशातील अन्य राज्यांमध्ये भाजपाने जे केले त्यानुसार कर्नाटकमध्ये त्यांना सत्तास्थापनेचा अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले. गोवा, मणिपूरमधील भाजपाच्या सत्तास्थापनेसंदर्भात ते बोलत होते. मी मुख्यमंत्रीपदाच्या मागे धावत नाही. पण आम्ही कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा ओलांडला आहे, असा दावा त्यांनी केला. मला दोन्ही पक्षांनी ऑफर दिली होती. पण २००४ आणि २००५ मध्ये मी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने माझ्या वडिलांच्या राजकीय कारकिर्दीवर एक कलंक लागला. हा कलंक पुसण्यासाठीच मी काँग्रेससोबत जात आहे, असे कुमारस्वामी यांनी नमूद केले.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 05/16/2018 - 10:11 नवीन
हे नीट समजून घे की, हे वरून कीर्तन आतून तमाशा आहे हे न कळायला तू काय दुधखुळा नाहीस भावा. तुझं कौतुक केलं का तू काँग्रेसभक्ती करायला लागतो व्हय रं! तर, १०० कोटी/आमदार दर कमी वाटल्यामुळे उघड मीडियात असली नैतिक बोंब उठवणाऱ्या कुमारस्वामींवर जनतेने कितपत विश्वास ठेवायचा हे जनतेला नीट कळते म्हणून तर त्यो तिसरा मोठा पक्ष झालाय. शेवटी काय कुमारस्वामी जास्तीत जास्त बोली लावणार माणसाकडे जाणार, असे नाहीतर तसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 05/16/2018 - 11:13 नवीन
एडीयुरप्पा उद्या शपथ घेणार
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 05/16/2018 - 12:34 नवीन
घेऊ द्या हो, कुठे बहुमत आहे त्यांच्याकडे? उद्या घेतील आणि परवा राजीनामा देतील. काँगेस आणि जेडीएसला घाबरायचं काहीच कारण नाहीये हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 05/16/2018 - 11:36 नवीन
EVM problem मूळे हुबळीचा निकाल रद्द मशीनाच्य क्षमतेपेक्षा 200 मते जास्त नोंदल्याचे आढळले
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 05/16/2018 - 12:32 नवीन
लै घाई? https://www.aninews.in/news/national/general-news/ec-clears-hubli-dharwad-poll-result-in-karnataka201805160211400001/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ड
डँबिस००७ Wed, 05/16/2018 - 12:33 नवीन
काँग्रेसचे अध:पत्तन !! 'कर्नाटकच्या राज्यपालांनी काँग्रेस-जेडीएस आघाडीला सत्ता स्थापन्यासाठी आमंत्रण नाही दिलं तर कर्नाटकात रक्तपात होईल,' असा इशारा काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे कर्नाटमध्ये राज्यपाल कुणाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलावतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी हा इशारा दिला आहे. 'राज्यपाल संविधानिक मूल्यांचं पालन करत नसतील आणि आम्हाला सरकार स्थापन्यासाठी आमंत्रित करणार नसतील तर कर्नाटकात रक्तपात होईल,' असा इशारा आझाद यांनी दिला. काँग्रेसचे आमदार नाराज असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. असं काहीच नाही. उलट भाजपचेच आमदार असंतुष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. 'भाजपकडे बहुमताचा आकडा नाही. भाजपकडे केवळ १०४ आमदार आहेत. तर काँग्रेस-जेडीएसकडे ११७ आमदार आहेत. त्यामुळे राज्यपाल पक्षपाती होणार नाहीत, अशी आशा आहे,' असंही ते म्हणाले. आणी हे म्हणतात काँग्रेस पक्ष म. गांधीजींच्या तत्वावर चालतात !! देशात पुर्वी झालेल्या व होणार्या दंग्याच मुळे ईथेच आहे हे कळायला वेळ लागणार नाही !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 05/16/2018 - 12:35 नवीन
karnataka: काँग्रेसचे १२ आमदार बैठकीला गैरहजर र्नाटकात कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यानं सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजपनं हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसने आज बोलावलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीला १२ आमदार गैरहजर राहिल्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. त्याशिवाय चार आमदार गायब झाल्यानं या आमदारांना आणण्यासाठी काँग्रेसने हेलिकॉप्टर पाठविल्याचं सूत्रांनी सांगितलं. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्याच संपर्कात आमदार असल्याचा दावा केल्याने या पक्षांनी आपआपल्या आमदारांवर वॉच ठेवला आहे. आज सकाळी काँग्रेसने नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती. यावेळी ७८ पैकी केवळ ६६ आमदाराच उपस्थित होते. काँग्रेसने आज बोलावलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीला १२ आमदार गैरहजर राहिल्यानं काँग्रेस हादरलेली आहे !! आपल्या लोकांबद्दलच शंका आणी हे म्हणे राज्य चालवणार !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा