Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी- भाग ३३

ख
खेडूत
Tue, 05/15/2018 - 06:46
🗣 279 प्रतिसाद
रामराम! आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे! आजची एक बातमी: मुलाला मोठा इंजिनिअर करण्याचं स्वप्न बाळगून पालकांनी आपल्या पाल्यांना इंजिनिअरिंगमध्ये 'टाकायला' सुरुवात केली. मधल्या काळात या विद्यार्थ्यांचा आकडा बराच वाढला होता. पालकवर्गाच्या वाढत्या उत्साहामुळे महाविद्यालयंही पत्त्यांसारखी उभी राहिली. मात्र आता हा उत्साह ओसरलेला दिसत असल्याने इंजिनिअरिंगच्या जागाही रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयांची चांगलीच अडचण झाली आहे. 2016 - इंजिनियरिंगच्या 43 टक्के जागा रिक्त 2017- इंजिनियरिंगच्या 44 टक्के जागा रिक्त 2018- इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त ही घसरगुंडी महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंग महाविद्यालयांची आहे. गेल्या चार ते पाच वर्षात राज्यात कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी कॉलेजेस उगवली. विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची स्वप्नं दाखवली गेली. पण इंजिनियरिंगकडे वाढलेला ओढा आता आटला आणि अनेक महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली. महाराष्ट्रात सध्या 360 इंजिनियरिंग कॉलेज आहेत, तर 447 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. 2017 साली एक लाख 44 हजार जागांपैकी 64 हजार 625 जागा रिक्त राहिल्या, तर 2018 साली एक लाख 38 हजार जागांपैकी 56 हजार जागा रिक्त राहिल्या. दरम्यान, फार्मसी म्हणजेच औषधनिर्माणशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसत आहे. इंजिनियरिंगमधील घसरणीचं मूळ हे कॉलेजच्या बाहेर आहे, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मिळणाऱ्या अपुऱ्या संधींमध्ये आहे. पण या स्थितीवर सरकारने तूर्तास काही उपाययोजना आखलेल्या आहेत नव्याने सुरु होणाऱ्या इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना स्थगिती देण्याची विनंती एआयसीटीईला करण्यात आली आहे. ज्या खाजगी संस्थांनी इंजिनियरिंग कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी अभ्यासक्रमात बदल करुन प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यवसायाभिमुख शिक्षणाला भर दिला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या
108438 वाचन

💬 प्रतिसाद (279)
ग
गणेश.१० Wed, 05/16/2018 - 22:08 नवीन
लोकशाहीचा तमाशा: १) सगळ्यात कमी संख्याबळ असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री - JDS २) पुरेसे संख्याबळ नसताना सत्ता स्थापनेचा दावा - BJP ३) ज्या न्यायाधीशाविरुद्ध महाभियोग आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासमोरच न्यायाची याचिका - INC यापुढेही असा तमाशा प्रत्येक निवडणुकीनंतर होण्याची दाट शक्यता.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/17/2018 - 07:55 नवीन
हमारे बडे देशमे ऐसे छोटेबडे तमाशे होते रहते है...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेश.१०
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/17/2018 - 03:19 नवीन
नऊ वाजता शपथ्विधी होणार असे दिसते आहे. आता पुढच्या १५ दिवसात कॉण्ग्रेस्/जद(से)च्या किती आमदारांचे 'विचार परिवर्तन' होते ते बघुया.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 05/17/2018 - 04:18 नवीन
नाराज लिंगायत आमदार टार्गेट असतील बहुतेक! -------------------- पहाटे साडेचार वाजता कोर्टाने शपथविधी रोखण्यास स्पष्ट नकार दिला. भाजपला राज्यपालांना सादर केलेले पत्र सादर करण्याची नोटीस कोर्टाने दिली असून, कोर्टातील हाय-व्होल्टेज ड्रामा अजून संपलेला दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
स
साहना गुरुवार, 05/17/2018 - 10:19 नवीन
भाजप आणि काँग्रेस ह्या दोघांचा तत्वनिष्ठतेचा आव निव्वळ ढोंग आहे. कर्नाटकातून काँग्रेस ला पैसे मिळत होते आणि २०१९ च्या विलेक्शनसाठी पैसे जमा करण्यासाठी कर्नाटक काँग्रेस साठी फार महत्वाचे राज्य होते कारण इतर ठिकाणी काँग्रेस ची अंत्यक्रिया होऊन श्राद्ध सुद्धा घातले गेले आहे. कुठल्याही परिस्तितीत सत्ता हा मोदी-शाह मंडळींचा मोटो असून कर्नाटकात वाट्टेल त्या मार्गाने जम बसवण्याचा प्रयत्न ते करतील ह्यांत शंका नाही. काँग्रेसची तिरडी देशातून उठवी अशी माझी लहानपणा पासूनची इच्छा होती. ती सफल ठरतेय म्हणून आनंद वाटतो.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 05/17/2018 - 10:47 नवीन
कर्नाटकातून काँग्रेस ला पैसे मिळत होते आणि २०१९ च्या विलेक्शनसाठी पैसे जमा करण्यासाठी कर्नाटक काँग्रेस साठी फार महत्वाचे राज्य होते
हेच खरे आहे. आणि म्हणूनच ते आकाशपाताळ एक करतायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
M
manguu@mail.com गुरुवार, 05/17/2018 - 11:00 नवीन
1000 कोटीचे - त्याला पैसे कुठून आले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ग
गब्रिएल गुरुवार, 05/17/2018 - 16:43 नवीन
तुमच्यासार्क्यांनी दिल्याले आसनार ! तसंबी तुमी मोदी आनि बिजेपीला इक्त गरळ ओकत आस्ता, त्यानं मिपावर्ची बांधावर बस्लेली दोनचार मतं बिजेपीकडं ग्येली आसनारच. तुम्च्यासारक्यांचा बिजेपीला लई आधार हाय बगा ! आसंच काम चालू ठ्येवा बर्का =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 05/17/2018 - 11:45 नवीन
रायपूर: 'बहुमत नसताना कर्नाटकात भाजपनं सरकार स्थापन केलं असून ही संविधानाची हत्या आहे,' असं सांगतानाच एकीकडे खुनाचा आरोप असलेला व्यक्ती एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश काम करू शकत नाहीत. मीडिया सुद्धा भीतीपोटी काम करत नसून देशात सध्या पाकिस्तान सारखी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर केली. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/the-bjp-is-creating-an-atmosphere-of-fear-claims-congress-president-in-chhatisgarh/articleshow/64204131.cms -- इतक्या थपडा खाऊन ही हा माणुस सुधारायचे नाव घेत नाही.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/17/2018 - 13:09 नवीन
खरे आहे रे प्रसाद. पूर्वी काँग्रेस्वाल्यांमध्ये पराभव मान्य करायची सवय होती. अगदी १९८९ च्या लोकसभा निकालानंतर राजीव गांधी ह्यांनी "आमच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी लोकांना आम्ही नको आहोत' असे स्पष्ट म्हंटले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/17/2018 - 13:09 नवीन
खरे आहे रे प्रसाद. पूर्वी काँग्रेस्वाल्यांमध्ये पराभव मान्य करायची सवय होती. अगदी १९८९ च्या लोकसभा निकालानंतर राजीव गांधी ह्यांनी "आमच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी लोकांना आम्ही नको आहोत' असे स्पष्ट म्हंटले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ब
बिटाकाका गुरुवार, 05/17/2018 - 13:42 नवीन
तशी अपेक्षा आता कोणाकडूनच ठेवता येत नाही माई!! इज्जतीने वाटाघाटी करायच्या सोडून भाजपला सत्तेतुन बाहेर ठेवण्यासाठी सगळं गुंडाळून कशाला ठेवायला पाहिजे? यांच्याकडे यशस्वी नेते असते तर त्यांनी मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घ्यायला पाहिजे होतं. त्याऐवजी याना भाजपच्या नेत्यांच्या कामगिरीवर जास्त विश्वास असल्यासारखे जेडीएसला भाजप कडे जाऊ द्यायचे नाही आणि भाजपची सत्ता येऊ द्यायची नाही हे ध्येय ठेवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
M
manguu@mail.com गुरुवार, 05/17/2018 - 13:41 नवीन
महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांकडून जमिन अधिग्रहणाला विरोध होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत सापडला आहे. भारत आणि जापान यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आकाराला येत आहे. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्यातील शेतकरी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन द्यायला विरोध करत आहेत. काही शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात येणारे नुकसानभरपाईचे पॅकेज मान्य नाहीय तर काही शेतकऱ्यांचा जमीन द्यायलाच विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प अडचणीत सापडला आहे. आणखी विलंब लागला तर हा प्रकल्प ठरलेल्या मुदतीत २०२३ पर्यंत कार्यान्वित होऊ शकणार नाही असे जापान सरकारच्या अधिकाऱ्याने सांगितले. ते अहमदाबाद येथे पर्यटन महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होते. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प २०२३ च्या अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. आपल्या हातात फक्त पाच वर्षांचा वेळ आहे. जमीन अधिग्रहणाचा तिढा लवकरात लवकर सुटला पाहिजे. भारत आणि जापान दोन्ही देश ही हायस्पीड ट्रेन चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत असे नोडा यांनी सांगितले. नुकतीच ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात निदर्शने केली. प्रकल्पासाठी जिल्हा यंत्रणेने केलेल्या जमीन सर्वेक्षणावर नाराजी व्यक्त केली. अटकेची भिती दाखवून हे सर्वेक्षण करण्यात आले असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/17/2018 - 15:02 नवीन
चिनी मुस्लिमांची स्थिती चीनमध्ये वाईट आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/china-is-doing-brainwash-of-muslims-under-name-of-reeducation-camp-1681873/ “जे या नियमांचं पालन करत नव्हते किंवा करण्यास नकार देत असत, वाद घालत किंवा शिकवण्यासाठी उशिरा येत त्यांना तब्बल १२ तास हात पाय बांधून कोंडून ठेवलं जात असे”, असं समरकंद यांनी सांगितलं आहे. याव्यतिरिक्त नियमांचं पालन न करणाऱ्यांचं तोंड पाण्यात बुडवलं जात असे. मुस्लिमांना शिक्षा म्हणून डुकराचं मासं खाण्याची सक्ती केली जाते. तसंच धार्मिक दहशतवादाच्या आरोपाखाली दारुदेखील पाजली जाते' जग अजूनही ह्यावर आवाज उठवत नाही आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश गुरुवार, 05/17/2018 - 15:20 नवीन
आता मुंबईला आझाद मैदानामध्ये कधी करणारेत निदर्शन आणि त्या निमित्ताने झुंडशाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
क
कंजूस गुरुवार, 05/17/2018 - 17:47 नवीन
राहुलचे नेतृत्व पुन्हा उघडे पडले.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 05/17/2018 - 19:36 नवीन
असणाऱ्या अन उथळपणे एजंडे रेटणाऱ्या काही महान सभासदांस आता तरी 'राष्ट्रपती' 'राज्यपाल' वगैरे पदांची 'पदसिद्ध ताकद' लक्षात यावी ही ईश्वराच्या पायाशी आमची प्रार्थना. Image removed. (भारतीय राज्यघटनेतून साभार)
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 05/17/2018 - 22:44 नवीन
क्षणिक राजकीय विचार रेटायची उर्मी असणाऱ्या अन उथळपणे एजंडे रेटणाऱ्या काही महान सभासदांस आत्मपरीक्षण केलेलं दिसतंय! इथे अजूनही काही सभासद भाजप आणि मोदी द्वेषाचा अजेंडा समर्थपणे राबवत आहेत, त्यांच्या बाबत बोलताय का? बाकी जरा वाचता येईल असं नीट चित्र डकवलं असतं तर बरं झालं असतं, लिंक वगैरे दिली असती तर काय सोने पे सुहागा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Fri, 05/18/2018 - 04:55 नवीन
आत्मपरीक्षण? राष्ट्रपती, राज्यपाल वगैरे पदे विनकामाची आहेत असे तारे भूतकाळात कोणी तोडलेत ते शोधून बघा, अन जमले, इच्छा असली तर त्यांनाच आत्मपरीक्षण करायचा सल्ला द्या! (किंवा स्वतः तरी करा ही नम्र विनंती) बाकी, आम्ही नमूद केलेले महान सभासद तुम्ही नाही, स्वतःला इतकं महत्वाचं समजू नका (किंवा समजा, सानू की). माझ्या मोदीप्रेमाचं सर्टिफिकेट मला तरी कोणाकडून घ्यायची गरज नाही आणि ते कोणासमोर सिद्ध कारायचीही नाही. मोदी जितके संसदेला पवित्र मानतात तितकेच आम्हीही मानतो, मोदी जितके पॉलिटिकल करेक्ट असतात त्याचे आम्ही भयानक पंखे असतो, म्हणूनच अव्वल वेडगळपणा करत त्यांनाच कमीपणा आणणाऱ्या काही स्वतःला मोदी समर्थक म्हणवणाऱ्यांची कीव पण करावी वाटत नाही आजकाल. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ज
जेम्स वांड Fri, 05/18/2018 - 04:59 नवीन
मोदीद्वेष्टे/ मोदीसमर्थक दोघेही स्वतःचे माईंडसेट तयार करून बसलेले असतात, त्यामुळं आम्ही दगडांवर डोसकं आपटत नसतोय, आम्ही हार्ड फॅक्ट अन आकडे बोलतो, मग ते कधी कोणाला आवडतात अन कधी कोणाला गैरसोयीचे होतात, टू हिम हिज ओन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ब
बिटाकाका Fri, 05/18/2018 - 06:50 नवीन
(श्रीगुरुजींचा डुप्लिकेट आयडी असा शिक्का आहेच, मग त्यांच्याबाजूने मत मांडायला काय जातेय?) वांडसाहेब, ते राज्यपाल वगैरेबद्दल व्यक्त केलेले मत एकदमच टाकाऊ आहे असे मला वाटत नाही. त्या पदांमागचा मूळ विचार हा चांगलाच असेल, रादर आहे, पण सद्यपरिस्थितीत त्या पदाला आलेली पक्षीय झळाळी श्रीगुरुजींनी व्यक्त केले तसे मत व्यक्त करण्यास भाग पडते असे नाही का? आज भाजपला सरकारस्थापनेला बोलावले या उदाहरणावरून आपण जसं ते पद किती पॉवरफुल आहे असं म्हणून शकतो तसंच आज भाजपला बोलावल्यामुळे ते पद किती प्यादयासारखं काम करतं असं मतही अनेक लोकांचं झालं आहेच. ------------------------------------- कर्नाटकात काँग्रेसने बसवलेले राज्यपाल असते तर परिस्थिती वेगळी असती आणि इथंच या पदाच घोडा पाणी पितं! ------------------------------------ हे परत उकरून काढायचं नव्हतं पण - पटलं नाही म्हणून बोलून दाखवतोच. श्रीगुरुजींनी काही ठिकाणी विनाकारण आणि बिनबुडाचा किल्ला लढवायचा प्रयत्न केला असेल, पण मी त्यांचे जुने लिखाण आणि विचार बघितले तर मला ते व्यवस्थित आकडेवारीसकट मांडलेले दिसले. बिनआकड्याच्या दुसरीकडच्या बातम्या इथे छापणारे आयडी इथे आहेत, त्यांच्या तुलनेत श्रीगुरूजींचं विश्लेषण जास्त मुद्देसूद दिसलं. घाणेरड्या शब्दात तर अजून अनेक आयडीनी प्रतिसाद दिलेले आहेतच. अगदी मलातर कुत्र्याची उपमा देण्यात आली, पण ते असोच. ------------------------------------ त्या सूचनेनंतर अरुण जोशी आणि श्रीगुरुजी मिपावर दिसले नाहीत. आय होप कि ते सुट्टीवर गेले आहेत :(. खासकरून अरुण जोशी यांची मते मिस करणे फार बेक्कार बोचून जातेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
व
विशुमित Fri, 05/18/2018 - 12:34 नवीन
<<<श्रीगुरुजींनी काही ठिकाणी विनाकारण आणि बिनबुडाचा किल्ला लढवायचा प्रयत्न केला असेल>>> ==>> इथेच तर मिपाचे वातावरण गढूळ होयला सुरवात झाली होती. त्यामुळे सगळेच बेलगाम सुसाट उधळायला लागले होते. ते 'विशेष सूचने'ने आताशी कुठे कॉन्ट्रोल मध्ये आले आहेत. त्यामुळे आणखी उकरत बसण्यापेक्षा विधायक चर्चा कशी स्मूथली चालेल याकडे सगळ्यांनी लक्ष देऊ यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 05/18/2018 - 12:46 नवीन
अजिबात नाही. श्रीगुरुजींच्या मुद्दे लढवण्याचा आणि इतर सभासदांना कुत्र्याची उपमा देण्याचा काय संबंध? आणि कंट्रोल मध्ये आले तेव्हा म्हणता येईल जेव्हा या अशा भाषेबद्दल माफी मागतील. --------------------------------- चर्चा विधायक करण्यासाठी फक्त मुद्द्यांची गरज लागते, ते नसले कि बाकीचे फालतू उद्योग करावे लागतात. सूचनेचा उपयोग काही सदस्य इथे येत नाहीत म्हणून झाला असे म्हणता येत नाही, दुसऱ्या बाजूने एकांगी, संदर्भहीन आणि विशिष्ट पक्षाच्या बदनामीकरत टाकलेल्या बातम्या बिनदिक्कत चालूच आहेत. त्यामुळे, असोच. -------------------------------- वांड साहेबांनी वर उल्लेख केला म्हणून सांगावे वाटले, बाकी पुढे मत मांडण्यात हशील नाही. थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ज
जेम्स वांड Fri, 05/18/2018 - 05:06 नवीन
बाकी जरा वाचता येईल असं नीट चित्र डकवलं असतं तर बरं झालं असतं, लिंक वगैरे दिली असती तर काय सोने पे सुहागा!! खाली ठळक अन अधोरेखित केलेलं "भारतीय राज्यघटनेतून साभार" हे वाक्य पण वाचता आलं नाही का, की सोईस्कररित्या गाळलं आहे ते सांगाल जरा! संविधान /घटना/ कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया असं सर्च करा गुगल वर शंभर ठिकाणी डाउनलोड करायला उपलब्ध आहे. ह्यउप्पर चमच्याने भरवाच म्हणत असाल तर आपला पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Fri, 05/18/2018 - 17:31 नवीन
तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी कुठे स्वतःला महान आणि महत्वाचं म्हणतोय? मला तर वाटलं तुम्ही स्वतःबद्दल बोलताय. तुमचा प्रतिसाद एकदा त्रयस्थ नजरेतून वाचा. बरं दुसऱ्या ज्या सदस्यांना हे उद्देशून म्हणालाय असं वाटतंय त्यांनी तर एकही प्रतिसाद या धाग्यावर दिला नाहीये. आम्ही हार्ड फॅक्ट अन आकडे बोलतो असं म्हणताय, पण हे असणाऱ्या प्रतिसादांपेक्षा तुमचे मतप्रदर्शन असलेले प्रतिसाद जास्त दिसत आहेत. त्यातले काही तर फॅक्ट वर आधारित सुद्धा नाहीत. राज्यघटना डाउनलोड करता येते हे मला माहित आहे. पण जेव्हा आपण एखाद्या पानाचा अथवा परिच्छेदाचा फोटो देतो तेव्हा निदान पृष्ठ क्रमांक तरी द्यावा असा संकेत आहे. का राज्यघटना तुम्ही दिलेल्या फोटोएवढीच आहे? असो. आम्ही पामर तुमच्यापुढे काय बोलणार. असे प्रश्न विचारून तुम्हाला अडचणीत आणल्याद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
M
manguu@mail.com गुरुवार, 05/17/2018 - 22:23 नवीन
कर्नाटकात सत्ता स्थापनेचा चांगलाच पेच निर्माण झाला असून भाजपाकडून सत्तेसाठी घोडेबाजार होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आपल्या आमदारांनी पक्षातून बाहेर पडू नये यासाठी काँग्रेसने त्यांना इलिंग्टन रिसॉर्ट येथे पाठवले होते. मात्र, या रिसॉर्टबाहेरील पोलिस बंदोबस्त हटवताच भाजपाचे नेते तिथे पोहोचले आणि त्यांनी काँग्रेसच्या आमदारांना पैशांची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते रामलिंगा रेड्डी यांनी केला आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/bjp-leaders-come-to-the-resort-and-offer-money-to-congress-mlas-says-congress-leader-1682152/ ........ ह्या पैशावर GST किती टक्के असतो ?
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 05/18/2018 - 03:45 नवीन
ते पण विचारून घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
व
विशुमित Fri, 05/18/2018 - 07:05 नवीन
हाहाहा..!! बेक्कार हसलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/18/2018 - 07:09 नवीन
हायला ! खरंय की ! भाजपकडून पैसे मिळत असल्यास हे विचारणे भागच आहे !!! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/18/2018 - 07:02 नवीन
Fearing another Goa, Congress drafted SC plea for largest party to be invited first आणि आत्ता "सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करायला बोलवून राज्यपालांनी चूक केली आहे. लोकशाहीचा खून झाला आहे. वाचवा,वाचवा !" असे म्हणणारा निकडीचा खटला भर रात्री काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही आक्षेप न घेता अपवादात्मकरित्या खटला त्वरीत सुरू करून तो रात्रभर चालू ठेवला. हे कोणाच्या आज्ञेने झाले... तर ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांवर महाअभियोग चालविण्याचा (अयशस्वी) आटापिटा काँग्रेसने केला त्यांच्या !! आणि तरीही काही तास उलटून गेल्यावर काँग्रेसच्या महान अध्यक्षांनी भारताच्या न्यायव्यवस्थेची तुलना पाकिस्तानातिल व्यवस्थेबरोबर केली आहे !!! यालाच, "चिडका बिब्बा" किंवा/आणि "एका बोटावरची थुंकी दुसर्‍या बोटावर ओढणे" किंवा/आणि "लोकशाहीचा गैरफायदा घेणे" असे म्हटले तर त्यात चुकीचे ते काय ?! पूर्वी असे प्रकार दाबून टाकून जनतेच्या डोळ्याआड ठेवता येणे शक्य होत असे. सद्याच्या मोकळ्याढकळ्या माहितीयुगात ते शक्य नसल्याने काही लोकांची मोठी पंचाईत होत आहे. पण तरीही लाज-शरम कचर्‍याच्या डब्यात फेकून (आणि जनता मूर्ख आहे, तिला शब्दांचे खेळ करून उल्लू बनवता येते असा स्वतःचा ग्रह चालूच ठेवत) "मी नेहमीच्च खरा, तू नेहमीच्च खोटा" असे म्हणण्याचा सतत चाललेला आटापिटा कौतुकास्पद आहे ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 05/18/2018 - 07:07 नवीन
राजकारण आणि सत्ता काबीज करणे. बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/18/2018 - 07:26 नवीन
काल भाउ तोरसेकर टी.व्ही.वर राजकारणी व पक्ष म्हणजे 'हमाम मे सब नंगे' प्रकार आहे असे म्हणाले. खरेच आहे. कर्नाटकच्या मतदारांनी असे मतदान केले की राजकीय पक्ष पुरते नागडे झाले असे ह्यांचे मत. १) ना खाउंगा ना खाने दूंगा' बदलून "ना खाउंगा पर सरकार बनाने के लिये खिलाउंगा' असे करायला हवे. २) सेक्युलॅरिझम, नेहरूवादी विचार वगैरे ची महती सांगणारी काँग्रेस- १०० कोटींचा आकडा ऐकला व आमदारांना बसमध्ये कोंबून रिसॉर्टवर धाडले. भाजपावाले तेथेही पोहचले- आता बस हैद्राबादला चालली आहे असे वाचले. म्हणजे ह्यांचे आमदार पैसे दिसले की नेहरू,सेक्युलॅरिझम सगळे चुलीत घालतात. ३) जनता दल(सेक्युलर)-सत्तेशिवाय १०-११ वर्षे काढल्याने भूक लागली आहे.आता काँग्रेसबरोबर घरोबा केला तर मुख्यमण्त्रीपद मिळेल पण मे २०१९ मध्ये भाजपावाले पुन्हा सत्तेवर यायची शक्यता . मग तेव्हा भाजपावाले वचपा काढणार. ह्या संभ्रमात जेडीएस.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 05/18/2018 - 08:22 नवीन
माईसाहेब, उगाच संदर्भाविना छापलेल्या बातम्यांवरून भाजपवाले रिसॉर्टवर गेले होते वगैरे म्हणणे बोगस वाटते हो. त्या रिसॉर्टच्या बाहेर ढिगांनी चॅनेल वाले कॅमेरे लावून बसले आहेत. आतापर्यंत कोणी नाही तर एनडीटीव्ही किंवा एबीपीने फुटेज दाखवले असते कि हो. ------------------------------- ते कुमारस्वामी म्हणाले १०० कोटी म्हणून लगेच १०० कोटी खरेच ऑफर केले असं मत बनवायचं का आपण? अहो १३ आमदारांना १३०० कोटी देण्यापेक्षा आधीच प्रचारावर आणि मतदारांना वाटण्यात वापरले असते कोणत्याही पक्षाने. ------------------------------- मला वाटते जेव्हा राजकीय पक्ष जेव्हा असं फोडाफोडी करत असतील तेव्हा फार्फार तर निवडणूक खर्च देतो आणि कुठलंतरी महामंडळ, जुना आमदार असेल तर मंत्रिपद देतो वगैरे असले प्रस्ताव असतील. १०० कोटी हे प्युअर थोतांड असेल असं तुमच्या ह्यांनाही वाटेल, विचारून बघा एकदा. ------------------------------- ते कुमारस्वामी तर भाजपचे १० आमदार आमच्या संपर्कात आहेत असेही म्हणाले, किती कोटींसाठी काय माहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
व
विशुमित Fri, 05/18/2018 - 08:45 नवीन
१०० कोटी सारख्या शुल्लक रकमेसाठी कोणी सत्तेला लाथ मारणार नाही, हे मात्र नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
M
mayu4u Fri, 05/18/2018 - 09:03 नवीन
१. किती रकमेसाठी सत्तेला लाथ मारणार असं वाटतं? २. लाथ मारतील हे नक्की ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 05/18/2018 - 12:18 नवीन
१. पैशापेक्षा सत्तेचा कैफ काही और असतो. सत्तेत असल्यावर १०० कोटी वगैरे हे शुल्लक आकडे वाटतात. करिअर सेक्युरिटी वगैरे प्रकार पण असतात ना राजकारणात. २. ते उद्या कळेलच. मी तरी काही उतावळा नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
M
mayu4u Sat, 05/19/2018 - 07:31 नवीन
लाह्या घेऊन बसलोय! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/18/2018 - 09:09 नवीन
१९९६ साली वाजपेयी सरकारच्या वेळेसही असेच झाले होते. खासदाराची किंमत तेव्हा ७५ लाख होती चर्चा होती. मुंबईचे मोठे उद्योगपती दिल्लेत पोचले होते वाटाघाटी करायला पण प्रयत्न फसले... व वाजपेयींनी राजिनामा दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
क
कपिलमुनी Fri, 05/18/2018 - 09:03 नवीन
उद्या दुपारी चार वाजता मज्जा येणार ! विधानसभेचा अध्यक्ष कोण ? मतदान आवाजी होणार की गुप्त ? वगैरे वगैरे ! हाणामार्‍या तर होणारच . उद्या दुपारी मस्त चील्ड बियर आणि तंदूर घेउन तमाशा बघत बसायचा :)
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 05/18/2018 - 09:11 नवीन
मग उद्या लगेच विश्वासदर्शक ठराव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बिटाकाका Fri, 05/18/2018 - 09:25 नवीन
सुप्रीम कोर्टाचा तसा आदेश आहे. ----------------------------- आता हाच आदेश इथून पुढे संदर्भ म्हणून वापरण्यात येईल का? आता यापुढे कोणत्याही राज्यपालाने ३ दिवसांचा अवधी द्यावा का? राज्यपालांच्या पॉवरचं काय होणार असे अनेक प्रश्न पडत आहेत. कोणी तज्ञांनी माहिती पुरवली तर स्पष्ट होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
M
manguu@mail.com Fri, 05/18/2018 - 09:26 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/karnataka-cm-bs-yeddyurappa-confident-to-prove-majority-1682339/ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी कर्नाटक विधासभेत बहुमत सिद्ध करुन दाखवू असा दावा केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि, सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे त्याचे पालन केले जाईल. मुख्य सचिवांशी चर्चा करुन उद्याच विधानसभेचे सत्र बोलवू. उद्या आम्हाला सभागृहात बहुमत सिद्ध करुन दाखवण्याचा १०० टक्के विश्वास आहे असे येडियुरप्पा म्हणाले. Image removed.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 05/18/2018 - 09:44 नवीन
बहुमत कसे सिद्ध होते ? तोंडी का लेखी ? कट ऑफ 113 च का , की , उद्या २०० च लोक हजर असले तर 101 चा कट ऑफ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
अ
अभ्या.. Fri, 05/18/2018 - 10:16 नवीन
मंगाण्णा, येन माडतीनी हो? ते कुमारास्वामी, येडीआण्णापेक्षा तुमीच लै एक्सायटेड दिसायले की. ह्यांग आग्याव हो तम्मा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
श
शाम भागवत Fri, 05/18/2018 - 11:24 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
माहितगार Fri, 05/18/2018 - 10:49 नवीन
२०० च लोक हजर असले तर 101 चा कट ऑफ
बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
mayu4u Fri, 05/18/2018 - 10:34 नवीन
मंगू ने पोस्टवलेला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Fri, 05/18/2018 - 11:42 नवीन
कर्नाटक विधानसभेत उद्या शनिवारीच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने भाजपला आणखी एक झटका दिला आहे. अँग्लो इंडियन सदस्याची राज्यपालांनी केलेली नियुक्ती अवैध असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले असून शनिवारी त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेण्याआधीच राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटक विधानसभेत अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती केली होती. राज्यपालांच्या या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी जेडीएसने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. सिक्री यांच्याकडे ही याचिका सादर करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी झाली.  संविधानाच्या अनुच्छेद ३३३ अन्वये राज्यपालांना एका अँग्लो इंडियन सदस्यांची नियुक्त करण्याचा अधिकार आहे. परंतू मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच ही नियुक्ती करता येते आणि मुख्यमंत्र्यांनी अजून बहुमत सिद्ध केलेले नाही, असं या याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.  कर्नाटक विधानसभेत भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी ८ आमदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येक आमदार भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळेच अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती करण्याची खेळी भाजपने खेळली होती. मात्र त्याला जेडीएस आणि काँग्रेसने आक्षेप घेतल्यानं भाजपचा हा डाव उधळून लावला गेला आहे. 
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 05/18/2018 - 13:21 नवीन
अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती
या प्रकाराचे आता औचित्य शिल्लक नाही , यांना कायम स्वरुपी स्थगिती द्यावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
क
कपिलमुनी Fri, 05/18/2018 - 12:27 नवीन
उद्या विधानसभेचा अध्यक्ष कोण असणार आहे ? आवाजी मतदान असणार की गुप्त ? यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा