Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी- भाग ३३

ख
खेडूत
Tue, 05/15/2018 - 06:46
🗣 279 प्रतिसाद
रामराम! आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे! आजची एक बातमी: मुलाला मोठा इंजिनिअर करण्याचं स्वप्न बाळगून पालकांनी आपल्या पाल्यांना इंजिनिअरिंगमध्ये 'टाकायला' सुरुवात केली. मधल्या काळात या विद्यार्थ्यांचा आकडा बराच वाढला होता. पालकवर्गाच्या वाढत्या उत्साहामुळे महाविद्यालयंही पत्त्यांसारखी उभी राहिली. मात्र आता हा उत्साह ओसरलेला दिसत असल्याने इंजिनिअरिंगच्या जागाही रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयांची चांगलीच अडचण झाली आहे. 2016 - इंजिनियरिंगच्या 43 टक्के जागा रिक्त 2017- इंजिनियरिंगच्या 44 टक्के जागा रिक्त 2018- इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त ही घसरगुंडी महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंग महाविद्यालयांची आहे. गेल्या चार ते पाच वर्षात राज्यात कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी कॉलेजेस उगवली. विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची स्वप्नं दाखवली गेली. पण इंजिनियरिंगकडे वाढलेला ओढा आता आटला आणि अनेक महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली. महाराष्ट्रात सध्या 360 इंजिनियरिंग कॉलेज आहेत, तर 447 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. 2017 साली एक लाख 44 हजार जागांपैकी 64 हजार 625 जागा रिक्त राहिल्या, तर 2018 साली एक लाख 38 हजार जागांपैकी 56 हजार जागा रिक्त राहिल्या. दरम्यान, फार्मसी म्हणजेच औषधनिर्माणशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसत आहे. इंजिनियरिंगमधील घसरणीचं मूळ हे कॉलेजच्या बाहेर आहे, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मिळणाऱ्या अपुऱ्या संधींमध्ये आहे. पण या स्थितीवर सरकारने तूर्तास काही उपाययोजना आखलेल्या आहेत नव्याने सुरु होणाऱ्या इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना स्थगिती देण्याची विनंती एआयसीटीईला करण्यात आली आहे. ज्या खाजगी संस्थांनी इंजिनियरिंग कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी अभ्यासक्रमात बदल करुन प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यवसायाभिमुख शिक्षणाला भर दिला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या
108438 वाचन

💬 प्रतिसाद (279)
स
सर टोबी Sun, 05/20/2018 - 19:03 नवीन
तुमच्या निःस्पृहतेच आहे आणि त्यात तुम्ही अपयशी ठरला आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sun, 05/20/2018 - 19:26 नवीन
मी निस्पृह आहे असा कधी दावा केलेला नाही आणि तसे मला कुणी म्हणो की नाही मला पाच पैशाचा फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
M
manguu@mail.com Mon, 05/21/2018 - 01:28 नवीन
महागाई निर्देशांक हा शेकडो विविध गोष्टींच्या किमतीवरून ठरवतात, तुम्ही एक वडापाव हे स्वतः:च्य सोयीसाठी वापरून काहीतरी हास्यस्पद लिहीत आहात असेच करायचे तर सबप्राईम , रियाल इस्टेटची मंदी या काळात घराच्य किमती ढासळतात, मग हे उदाहरण घेऊन वा वा स्वस्ताई आली म्हणून नाचायचे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
M
manguu@mail.com Mon, 05/21/2018 - 01:32 नवीन
आणि तुलना करताना क्रूड ऑईलच्य किमती हेही विचारात घ्या, पण , क्रूड किमतीतील फरकामुळे मोदीजिना भारताचे रिजर्व वाढवण्याची संधी मिळाली , लोकाना फायदा देऊन त्यांना राजकीय आत्महत्या करायची नव्हती इ इ त्यावरचे युक्तिवाद पुन्हा लिहायची गरज नाही ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 05/21/2018 - 06:37 नवीन
ब्वॉर्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Mon, 05/21/2018 - 06:40 नवीन
मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले तरी, उपमुख्यंमत्रीपद आणि २० मंत्रीपदांची मागणी करून काँग्रेसने थोडी तरी इज्जत राखली आहे. असा फॉर्मुला शेवटास गेला तर काँग्रेसचे अभिनंदन! --------------------------------- परमेश्वरा बहुतेक उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 05/21/2018 - 07:22 नवीन
क्रुडचे भाव उतरत्या पातळीवर गेले ४ वर्षांपासून सतत राहीले आहेत. त्याचा मोदींशी संबंध नाही. उतरत्या दरांचा संबंध अमेरिकेतील शेल क्रांती, इराणवरील निर्बंध उठणे, ओपेकला दर दिवशीचे उत्पादन कमी करण्यासंबंधी एकमत निर्माण करण्यात सुरुवातीला आलेले अपयश, एकूणच जागतीक अर्थव्यवस्थीत आलेली मंदी, रशीयन ऑइल रिफायनरीजचे वाढलेले उत्पादन, युरोपातील अनेक देशांत क्लिन एनर्जीसंबंधी होत असलेली प्रगती अश्या अनेक जागतीक घटनांशी होता. तेलाचे भाव घसरते असल्याने त्याचा फायदा लोकांपर्यम्त पेट्रोल- डिझेलचे भाव कमी करून पोचवला असता तर ते योग्य ठरले असते असे म्हणण्यात अर्थ नाही कारण पेट्रोल, डिझेलचे दर आवाक्यातच राहिले होते, ते आणखी कमी होऊ दिल्याने लॉजिस्टिक्स कॉस्ट्स जरी कमी झाल्या असत्या तरी तो फायदा ग्राहकापर्यंत पोचलाच असता असे नाही शिवाय महागाई दर या सबंध काळात कमीच होता(CPI India 2017-4.00 %, CPI India 2016-2.23 %, CPI India 2015- 6.32 %, CPI India 2014-5.86 % ). उलट कमी दराचा फाय्दा घेऊन सबसिडीज नष्ट करून वाचलेल्या पैश्यातून देशाची राजकोशीय परिस्थिती(विशेषतः राजकोशीय तूट) सुधारणे योग्य होते. तो तसा अलोकप्रिय निर्णय घेऊन मोठीच रिस्क सरकारने घेतली, माझ्या मते तो योग्य निर्णय होता. तसेच घसरत्या दरांचा फायदा घेऊन तीन स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह्स निर्माण केले गेले, जो भविष्यवेधी उत्तम निर्णय होता, सरकारमध्ये असेच रिझर्व्हस आणखीही निर्माण करण्याचे घाटत आहे. त्यामुळे आतापर्यंत आपली ऑईल पॉलिसी योग्यच राहिली आहे असे दिसते. आता, पुन्हा क्रुड ८०-९० च्या पातळीवर काही काळ तरी स्थिर राहील असे दिसते. त्याचाही मोदींशी संबंध नाही. मध्यपुर्वेतील अशांतता, व्हेनेझुएलातील अस्थिरता, रशीया व ओपेकचा तेल उत्पादन कमी करण्याचा दृढनिश्चय, शेल कंपन्यांचा कमी दरात तेल पुरवण्यातला कमी झालेला उत्साह, जागतीक अर्थव्यवस्थेत आलेली धुगधुगी अशी अनेक कारणे त्यासाठी आहेत. आपल्याला आता आपली पॉलिसी या बदलत्या परिस्थितीप्रमाणे रिअलाइन करावी लागेल. माझ्या मते सरकार जास्त आडमुठी भुमिका न घेता पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासाठी मार्केटमध्ये हस्तक्षेप करेल आणि ते योग्य असेल. पेट्रोलच्या वाढत्या दराचा बाऊ करण्याची गरज नाही हा युक्तिवाद चुकीचा आहे, सरकारमधील लोकही असा विचार करणार नाहीत असा विश्वास वाटतो.
https://economictimes.indiatimes.com/industry/energy/oil-gas/rising-oil-prices-one-of-the-biggest-risks-to-indian-economy/articleshow/62695842.cms
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 05/21/2018 - 07:46 नवीन
संतुलीत प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ब
बिटाकाका Mon, 05/21/2018 - 09:25 नवीन
निवडणुकांच्या तोंडावरही पेट्रोल दराच्या लोकप्रिय निर्णयापासून दूर राहून सरकारने धाडस दाखवले आहे खरे पण लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसमोर असेच करता येईल कि नाही माहित नाही. कदाचित त्यावेळी सरकारच्या फायद्याच्या गोष्टी बाजूला ठेवून हस्तक्षेप करून किमती खाली आणल्या जातील. डिसेंबर पर्यंत तरी किमती कमी होतील असे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
M
manguu@mail.com Mon, 05/21/2018 - 10:31 नवीन
पेट्रोलच्या वाढत्या दराचा बाऊ करण्याची गरज नाही हा युक्तिवाद चुकीचा आहे, हे पटले, पण डॉ. खरेंचे म्हणणेही खरे आहे, असे वाटत आहे. पेट्रोल डिझेलचे दर जरी कमी केले तरी वाहतूकदार त्यांचे दर कमी करणार नाहीत, ते कमी झाले नाहीत तर कोणत्याच वस्तूंचे दर कमी होणार नाहीत. सेवा पुरवणारेदेखील दर कमी करणार नाहीत या सगळ्याला accountibility असणार नाही तुला नाही अन मला नाही , घाल कुत्र्याला , असे होईल, त्यापेकशा सरकारच्या तिजोरीत गेले तर देशाच्या कामी येईल, असे त्यांचे मत असणार , असे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
म
मार्मिक गोडसे Mon, 05/21/2018 - 18:57 नवीन
असेही इंधनावरील करांमुळे सरकारी तिजोरीत भर पडतच असते, इंधनावरील एक्साइज ड्युटी कमी केल्यावर जरी वाहतूकदारांनी त्यांचे दर कमी केले नाही तरी त्यांचा नफा वाढल्याने सरकारच्या तिजोरीत प्राप्तिकराच्या रूपाने भर पडणार आहे. सरकार फिस्कल डेफीसीट कमी करण्यासाठी फक्त एकाच कमोडिटीवर इतका भर देते हे चुकीचे वाटते. CAD कमी करणे हे प्रमुख उद्दिष्ट असायला हवे. कच्च्या तेलाच्या आयाती नंतर सोन्याच्या आयातीवर देशाचे परकीय चलन खर्च होते, त्यामुळे रुपयाची किंमत कमी होते व आयात महाग होते. त्याकरता सोने आयात धोरणा बाबत कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
प
पुंबा Mon, 05/21/2018 - 07:25 नवीन
मराठी टेलिव्हिजन सृष्टीत सध्या चर्चेचा विषय असलेला 'मराठी बिग बॉस' हा रिअॅलिटी शो हळूहळू आणखी रंगतदार होऊ लागला आहे. बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक वादग्रस्त सदस्यांपैकी एक असलेल्या राजेश शृगांरपुरे याला घराबाहेर जावं लागलं आहे. राजेश बाहेर गेल्यामुळं आता पुढच्या आठवड्याची सगळी समीकरणं बदलली आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जातो. या आठवड्यात त्यासाठी पुष्कर, रेशम टिपणीस, जुई गडकरी आणि राजेश शृगांरपुरे नॉमिनेट झाले होते. त्यातही जुई गडकरी, राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस हे डेंजर झोनमध्ये होते. या तिघांपैकी रेशम आणि जुई सेफ झाल्या. मात्र, राजेशला घराबाहेर जावं लागलं. राजेश घराबाहेर पडल्याने सगळेच दु:खी झाले. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडताना महेश मांजरेकरांनी त्याला घरातील सदस्यांबरोबर बोलण्याची संधी दिली. तेव्हा त्यानं आपल्या भावना काही सदस्यांकडं व्यक्तही केल्या. रेशम टिपणीस हिच्यासोबतच्या जवळीकीमुळं राजेश हा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र, त्याच्यामुळं बिग बॉसची चर्चाही बरीच झाली. आता तो बाहेर पडल्यानं पुढं काय होणार, याबद्दल उत्सुकता आहे.
https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/marathi-bigg-boss/rajesh-shrungarpure-out-of-big-boss/articleshow/64252116.cms
बाकी, विकेंडचा वारमध्ये आमची लाडकी सई टवका दिसत होती..
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 05/21/2018 - 08:10 नवीन
बीग-बॉसनेच शेवटी आता 'शृंगार पुरे' असे राजेशास म्हंटले असावे. रंगीबेरंगी थत्ते पण बाहेर पडले ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
क
कंजूस Mon, 05/21/2018 - 07:40 नवीन
बिगबॅासचे समिक्षण थत्तेंनी केलेय. --------- भावाकडे वळून - पुर्वी टिव्हि फ्रिज लोनवर कुणी घेत असत व्याज देऊन. आता झिरो पर सेंट लोन पसरून त्यांचे भाव क्याश पेमेंटवाल्यांनाही उगाच द्यावे लागतात. वाण्याकडून उधार घेतात म्हणून ते भावच जास्तीचे लावतात. डी मार्टवाले मोठे भाव लिहून तुमच्यासाठी फक्त एवढेच परंतू तेही जास्तीच आहेत. बाहेर काही दुकानात बय्राच स्वस्तात वस्तू मिळतात. लोकांना समज करून दिलाय स्वस्त म्हणून.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 05/21/2018 - 10:07 नवीन
थत्ते म्हणाले की मी सेलिब्रेटी आहे , मोठा माणूस आहे..म्हणून मग माझ्याशी भांडण करण्यात लोकांना इंटरेस्ट आहे. मी गेलो तर उषा नाडकर्णी ला कोणी विचारणार नाही... इथे मी युट्युब बंद केलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
M
manguu@mail.com Mon, 05/21/2018 - 10:24 नवीन
सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बी.एस.येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीच्या काहीवेळ आधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र त्याआधीच कर्नाटकच्या राजकारणात बऱ्याच नाटयमय घडामोडी घडल्या. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव करणाऱ्या भाजपाला कोंडीत पकडण्याची रणनिती काँग्रेसने आखली होती. भाजपाकडून आपल्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होतोय हे दाखवण्यासाठी काँग्रेसने सहा ऑडियो क्लिप जारी केल्या. या ऑडियो क्लिप जारी करणे त्याच रणनितीचा एक भाग होता असा दावा काँग्रेसने केला आहे. भाजपा मध्यस्थाच्यावतीने काँग्रेसला आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न करत असल्याचे समजले होते. त्यामुळे तीन दिवस आधीच ऑडियो क्लिप रेकॉर्डिंगचा प्लान बनवला होता असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाने मध्यस्थावर आमदार शोधण्याची जबाबदारी सोपवली होती. जे आमदार निष्ठाबदलाला तयार होणार त्यांच्याशी स्वत: भाजपाचे वरिष्ठ नेते चर्चा करणार असल्याचे आम्हाला मध्यस्थाकडून समजले होते. आम्ही आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी याबद्दल चर्चा केली आणि भाजपाला जाळयात अडकवायचा प्लान आखला असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. सत्तेसाठी भाजपा कुठल्या थराला जाऊ शकते तो भाजपाचा खरा चेहरा जगासमोर आणायचा होता त्यासाठी काँग्रेसने हे सर्व केले. भाजपा नेत्यांशी चर्चा करुन त्यांना जाळयात अडकवू शकतील अशा आमदारांची आम्ही निवड केली असे या नेत्याने सांगितले. काँग्रेसने या सौदेबाजीसाठी आमदार बी.सी. पाटील यांची निवड केली. माजी पोलीस निरीक्षक राहिलेल्या पाटील यांनी अनेक कन्नड चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्याकडे असलेल्या अभिनय कौशल्यामुळे काँग्रेसने त्यांची निवड केली. बी.सी.पाटील निष्ठा बदलून भाजपाला साथ देऊ शकतात हे मध्यस्थामार्फत भाजपा नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. ते आपल्यासोबत काही आमदारही आणू शकतात हे संदेश भाजपा नेतृत्वापर्यंत पोहोचवण्यात आले. त्यानुसार हे ऑपरेशन आखून अंमलबजावणी करण्यात आली. १७ मे रोजी काँग्रेस आमदारांना बसने बंगळुरुबाहेर नेण्यात येत होते. त्यावेळी पाटील यांच्या मोबाइलवर भाजपा नेत्यांचे फोन आले. त्याचवेळी कॉल रेकॉर्ड करण्यात आले. एकदा येडियुरप्पा आणि त्यानंतर श्रीरामलु राव यांच्याबरोबर बोलणे झाल्याचा त्यांचा दावा आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/bjp-trap-in-congress-plan-1683601/
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 05/21/2018 - 10:42 नवीन
एका चोराने दुसर्या चोराला पकडले म्हणायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Mon, 05/21/2018 - 15:29 नवीन
इतर वेळेला भाजप ऑडिओ व्हिडीओ द्यायचे - भारतविरोधी घोषणा दिल्या म्हणून, यावेळी त्यांचीच ऑडिओ क्यासेट आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ब
बिटाकाका Mon, 05/21/2018 - 16:46 नवीन
खोटी ऑडिओ कॅसेट बरं का!! आमदाराने स्वतःच सांगितलं यांचं पितळ उघडं पाडलं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 05/21/2018 - 16:50 नवीन
भाजपावाले जाळ्यात अडकले. ह्यापुढे घोडेबाजार करताना प्रत्येक राजकीय पक्ष दहावेळा विचार करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Mon, 05/21/2018 - 18:17 नवीन
ते कसं काय बरं माईसाहेब??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
M
manguu@mail.com Mon, 05/21/2018 - 18:03 नवीन
भाजपयांच्याही सगळ्या व्हिडीओ क्लिप्स खोट्याच निघाल्यात. एकालाही शिक्षा झाली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Mon, 05/21/2018 - 18:19 नवीन
चला लिस्ट करा बरं कोणकोणते विडिओ मग! मग ठरवू खरे कोणते होते आणि खोटे कोणते. उगा हवेत गोळीबार कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Mon, 05/21/2018 - 11:11 नवीन
काँग्रेसचे हबिणंदन! सिआयडीच्या एपिसोडपेक्षा भारी वाटले!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Mon, 05/21/2018 - 11:30 नवीन
हळूहळू सगळे समोर येईलच, एक टेप खोटी असल्याचं तरी मान्य झालंय. http://www.republicworld.com/r-bharat/r-bharat/kagarasa-mla-na-kiya-odiyo-tapa-mamala-ma-khalasa-bjp-ki-tarapha-sa-mari-patani-ko-nahi-aya-koi-phona-pharaji-ha-tapa
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
क
कपिलमुनी Mon, 05/21/2018 - 11:25 नवीन
कडू साखरेचे विश्लेषण
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Mon, 05/21/2018 - 14:40 नवीन
१०५- १०६ च्या आसपास राहण्याची शक्यता दिसत आहे. अशा परिस्थितीत भाजपकडे काय पर्याय राहतात? मलातरी वैयक्तिकरित्या कुमारस्वामींना लॉटरी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. अभिनन्दन..तुमच अन्दाज खरा ठरला..
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Mon, 05/21/2018 - 16:51 नवीन
हाहाहा! धन्यवाद, पुढच्या वेळी जावं म्हणतोय कुठंतरी एनडिटीव्हीला वगैरे..;);)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९
ट
ट्रेड मार्क Mon, 05/21/2018 - 19:20 नवीन
काँग्रेसने सुप्रीम कोर्टाला पहाटे कामाला लावलं तेव्हा कारण होतं राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं. सुप्रीम कोर्टाने त्यात हस्तक्षेप करण्याचं नाकारल्यावर राहुल गांधीनी कोर्टाची किंवा संपूर्ण भारताचीच पाकिस्तान बरोबर तुलना केली. तेव्हा कुठल्या पुरोगामी विचारवंताने त्याचा विरोध केला? सगळी शक्ती फक्त भाजप कसा चुकीचा आहे हे दाखवण्यातच लागली होती. अगदी लोकशाही बरबाद झाली म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. नंतर त्याच कोर्टाने आणि त्यातूनही ज्या चीफ जस्टीस विरुद्ध इतके महिने कारस्थानं चालली होती, त्यांनीच दिलेल्या बेंचने जेव्हा फक्त बहुमत सिद्ध करण्याची मुदत कमी केली तेव्हा मात्र लगेच सुप्रीम कोर्ट चांगलं झालं? म्हणजेच काय आम्हाला पाहिजे तसा निकाल नाही लागला तर आम्ही सुप्रीम कोर्टाला देखील चुकीचं ठरवणार, शिव्या घालणार. बहुमताला फक्त ८ आमदार कमी असताना सरकार स्थापनेसाठी दावा करणं म्हणजे लोकशाहीचा खून ठरतो. पण ७४ आणि ३५ सीट्स कमी असलेल्या पक्षांना संधी दिली की मात्र सगळं आलबेल असतं? त्यातही सगळ्यात कमी सीट्स मिळालेल्या पक्षाचा नेता, म्हणजेच ज्याला जनतेने नाकारलं आहे, असा नेता मुख्यमंत्री होतो तेव्हा मात्र कोणत्या पुरोगाम्याला जनतेचा कौल आठवत नाही? उपलब्ध पर्यायांपैकी सगळ्यात स्थिर सरकार कोण देऊ शकतो हा विचारच नाही, फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं हाच एक अजेंडा आहे का? आतापर्यंतचा इतिहास आहे की काँग्रेसने असा पाठिंबा दिलेली सरकारं फार काळ टिकली नाहीत. म्हणजे समजा आत्ता जदसे आणि काँग्रेसचं कोण कुठलं मंत्रिपद घेणार यावरून फाटलं किंवा ६-८ महिन्यांनी दोघांचं पटलं नाही तर काय करणार? काँग्रेस आणि जदसेला सरकार स्थापण्यासाठी बोलावलं नाही तर आम्ही उपोषणाला बसू हे म्हणणं कोणाला ब्लॅकमेल वाटत नाही. एवढंच काय भाजप सत्तेवर आलं तर दंगे देशभरात होतील असे सुद्धा काँग्रेस नेते याआधी सुद्धा म्हणाले आहेत. तेव्हा ते या पुरोगाम्यांना किंवा फक्त भाजपचा विरोध करणाऱ्या कोणालाच चुकीचं वाटत नाही? गम्मत आहे!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा