ताज्या घडामोडी- भाग ३३
रामराम!
आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे!
आजची एक बातमी:
मुलाला मोठा इंजिनिअर करण्याचं स्वप्न बाळगून पालकांनी आपल्या पाल्यांना इंजिनिअरिंगमध्ये 'टाकायला' सुरुवात केली. मधल्या काळात या विद्यार्थ्यांचा आकडा बराच वाढला होता. पालकवर्गाच्या वाढत्या उत्साहामुळे महाविद्यालयंही पत्त्यांसारखी उभी राहिली. मात्र आता हा उत्साह ओसरलेला दिसत असल्याने इंजिनिअरिंगच्या जागाही रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयांची चांगलीच अडचण झाली आहे.
2016 - इंजिनियरिंगच्या 43 टक्के जागा रिक्त
2017- इंजिनियरिंगच्या 44 टक्के जागा रिक्त
2018- इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त
ही घसरगुंडी महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंग महाविद्यालयांची आहे. गेल्या चार ते पाच वर्षात राज्यात कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी कॉलेजेस उगवली. विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची स्वप्नं दाखवली गेली. पण इंजिनियरिंगकडे वाढलेला ओढा आता आटला आणि अनेक महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली.
महाराष्ट्रात सध्या 360 इंजिनियरिंग कॉलेज आहेत, तर 447 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. 2017 साली एक लाख 44 हजार जागांपैकी 64 हजार 625 जागा रिक्त राहिल्या, तर 2018 साली एक लाख 38 हजार जागांपैकी 56 हजार जागा रिक्त राहिल्या. दरम्यान, फार्मसी म्हणजेच औषधनिर्माणशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसत आहे.
इंजिनियरिंगमधील घसरणीचं मूळ हे कॉलेजच्या बाहेर आहे, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मिळणाऱ्या अपुऱ्या संधींमध्ये आहे. पण या स्थितीवर सरकारने तूर्तास काही उपाययोजना आखलेल्या आहेत
नव्याने सुरु होणाऱ्या इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना स्थगिती देण्याची विनंती एआयसीटीईला करण्यात आली आहे. ज्या खाजगी संस्थांनी इंजिनियरिंग कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी अभ्यासक्रमात बदल करुन प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यवसायाभिमुख शिक्षणाला भर दिला जाणार आहे.
💬 प्रतिसाद
(279)
क
कपिलमुनी
Fri, 05/18/2018 - 12:29
नवीन
भाजपचे आमदार के. जी. बोपय्या यांची कर्नाटक विधानसभेच्या हंगामी सभापतीपदी निवड !
आता हे अध्यक्ष फ्लोअर टेस्ट मध्ये भाग घेउ शकतात का ?
मतदान कसे घ्यायचे आवाजी कि गुप्त या बद्दल कायदा काय सांगतो ?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Fri, 05/18/2018 - 12:40
नवीन
गुप्त मतदानाची विनंती कोर्टाने फेटाळली आहे त्यामुळे मतदान गुप्त नसणार आहे हे नक्की. बहुतेक आवाजी होईल.
-------------------------------------
जर दोन्ही बाजूनी समान मते पडली तर अध्यक्ष आपले मत नोंदवू शकतात.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 05/18/2018 - 13:32
नवीन
सदरच्या राजकीय स्थितीवरून सरकारने घटने मध्ये दुरुस्ती करावी आणि नियम तयार केले पाहिजेत .
किंन्वा न्यायालयाने यावर मार्गदर्शक तत्वे सांगितली पाहिजे . जेणेकर्रोन भविष्यात हा प्रोब्क्लेम येणार नाही
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 05/18/2018 - 13:38
नवीन
संपूर्णपणे सहमत
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 05/18/2018 - 14:10
नवीन
सुप्रिम कोर्टाने अगदी स्वच्छ्पणे सांगितले आहे. क्रिस्टल क्लीयर का काय म्हणतात तसे.
Para 4.11.04 of Sarkaria Commission Report specifically deals with the situation where no single party obtains absolute majority and provides the order of preference the Governor should follow in selecting a Chief Minister. The order of preference suggested is:
– An alliance of parties that was formed prior to the Elections.
– The largest single party staking a claim to form the Government with the support of others, including “independents”.
– A post-electoral coalition of parties, with all the partners in the coalition joining the Government.
– A post-electoral alliance of parties, with some of the parties in the alliance forming a Government and the remaining parties, including “independents” supporting the Government from outside.
https://thewire.in/politics/karnataka-assembly-vajubhai-vala-india-governors
वजूभाई वाला ह्यांनी तिसरा पर्याय म्हणून जेडीएस्/काँग्रेसला बोलवायला हवे होते.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 05/18/2018 - 15:17
नवीन
सध्याच्या कर्नाटक केस मध्ये माझ्या माहिती प्रमाणे काँग्रेसचा पाठिंबा बाहेरून आहे. तेव्हा क्रमांक तीन ऐवजी चार चा संकेत लागू व्हावयास नको का ?
सध्या येडियुरप्पांनी क्लेम क्रमांक दोन खाली केला आहे , किमान राज्यपालांना त्यांचे पत्र तसे आहे कि इतरांचे पाठबळ मिळवीन . आता इथे बघितले तर आता जी कर्नाटक केस झाली त्याचा वस्तूत: सरकारिया कमिशनने विचार केलेला दिसत नाही . ज्यात गणिती कारणांनी क्रमांक चारचा पर्याय सबळ होतो .
एखाद्या निष्पक्ष राज्यपालाने येडियुराप्पाना इतर आमदारांची पाठिंब्याची पत्रे सादर करण्यास सांगितले असते . पण समजा तिसरा आणि चौथा पर्याय दृष्टीपथात नाही त्या केसमध्ये राज्यपालांनी काय करायचे ? पुन्हा क्रमांक २ ला हातात इतरांची पत्रे असोत वा नसोत संधी देऊन पाहणे आले .
पण मुद्दा एवढ्यावरही संपत नाही पाठिंब्या च्या पत्रांचे हि राजकारण होते त्यातही आमदार दारा दोन मिनिटास बाजू बदलून यालाही पात्र दिले आणि त्यालाही पात्र दिले असे खेळ करू शकतात त्याचा हिशेब राज्यपालांनी कसा ठेवायचा ? त्या साठी फ़्लोअर टेस्ट हा एकमेव पारदर्शक उपाय आहे आणि सुप्रीम कोर्टाचा मुख्यभर फ्लॉअर टेस्ट वर दिसतो .
आपण संदर्भात दिलेल्या वृत्त प्रमाणे राज्यपालांनी सहसा सरकारिया कमिशनच्या मार्गदर्शक क्रमा प्रमाणे निर्णय घेणे प्रिफरेबल असे म्हटले तरी पुढे असे निर्णय सब्जेक्टिव्ह असतील असेच म्हटले आहे . म्हणजे अगदीच नियमावर बोट ठेऊन नव्हे व्यक्तिगत तारतम्याचा राज्यपालांनी वापर करणे अभिप्रेत आहे . कारण शेवटी जनतेस स्थिर सरकार प्राप्त व्हावे यासाठी राज्यपालांनी त्यांचे कौशल्य वापरणे अभिप्रेत असावे .
आता राज्यपालांनी वापरावयाचे कौशल्य राजकीय व्यक्तींसोबत वापरावयाचे आहे . आणि असे कौशल्य राजकीय कौशल्य असते ते सहसा अननुभवी अराजकीय व्यक्तीस अवगत असेल असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरते म्हणून , सरकारिया कमिशनची राज्यपाल पदावर अराजकीय पार्श्वभूमीची व्यक्ती असावी हि अपेक्षा तेवढी रास्त ठरत नाही . खरी गरज राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नायायाधीषांना इतर पदे घेणे जसे अवघड जाते तसे राज्यपाल पद स्वीकारणाऱयांना उपराष्ट्रपायी आणि राष्ट्रपती पाडा शिवाय इतर मार्ग बंद करावेत किंवा विधानसभा आणि लोकसभेवर किमान दहा वर्षे अपात्र ठरवावे असे काहीतरी करावयास हवे .
- Log in or register to post comments
र
रविकिरण फडके
Fri, 05/18/2018 - 14:47
नवीन
आपला कायदा असा आहे की शपथविधी झाल्यानंतरच आमदार इ.साठी anti-defection चे कलम लागू होते. परंतु, ज्या क्षणी उमेदवार निवडून आल्याचे अधिकृतपणे जाहीर होते त्याच क्षणी जर हे कलम लागू झाले तर हे सगळे आमदार पळवापळवीचे, शंभर कोटींचे, कोर्टबाजीचे, आरोप प्रत्यारोपांचे, (घोडेबाजार), इ. प्रकार बंद होणार नाहीत काय?
की, हे असे सर्व करायला वाव मिळावा म्हणूनच सर्वसंमतीने सोयीस्करपणे कायदा असा केला आहे?
की, मी म्हणतो तसा कायदा केला तर काही वेगळ्या, अधिक मोठ्या अडचणी येतील? जाणकार मंडळींनी ह्यावर प्रकाश टाकावा.
धन्यवाद.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 05/18/2018 - 16:14
नवीन
जर आमदार शपथ घेत नसतील तर ते मतदानास पात्र नसतात .
मतदानास पात्र असतील तर व्हीप मानावाच लागेल
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 05/18/2018 - 16:16
नवीन
असे कसे होईल ?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 05/18/2018 - 16:56
नवीन
हे माहीत नव्हते . याचा स्रोत संदर्भ संदर्भासाठी मिळू शकल्यास अभ्यासण्यास आवडेल .
आपण म्हणता तसा बदल केला तरी अंशतः: फरक पडेल पण घोडेबाजार संसदीय पद्धतीत पूर्णपणे कधीच बंद होणार नाही. सत्तेचे गणित त्रिशंकू झाले तर प्रोपोर्शनेट रिप्रेझेंटेशन ने सत्ता स्थिर करता येते का पाहिले पाहिजे आणि किंवा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदाची अशा केसेस मध्ये सरळ पुर्ननिवडणूक घेण्याचाही विचार करण्यास हरकत नसावी
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 05/18/2018 - 19:10
नवीन
सर्वच वेळी proportionate participate झाले पाहिजे
सत्ताधार्यानी अजेंडे रेटायचे आणि विरोधकांनी विरोध करायचा, सरकार बदलले तर तोंडे बदलतात, काम तेच राहाते
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 05/18/2018 - 20:58
नवीन
बॉबी डार्लिंगने नवरा आपल्याला मारहाण करतो आणि अनैसर्गिक सेक्स करतो असा आरोप केला. ज्यानंतर बॉबी डार्लिंगचा नवरा रमणीक शर्माला अटक करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी रमणीक शर्माला अटक करण्यात आल्याचे बॉबी डार्लिंगने सांगितले. बिग बॉस या कार्यक्रमामुळे प्रकाश झोतात आलेली बॉबी डार्लिंग आता या कारणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. सप्टेंबर २०१७ मध्येच तिने नवऱ्याविरोधात मारहाणीची तक्रार केली होती. बॉबी डार्लिंगने फेब्रुवारी २०१६ मध्ये भोपाळच्या रमणीक शर्मासोबत लग्न केले. स्पॉटबॉय इ ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
सप्टेंबर २०१७ मध्ये केलेल्या तक्रारीत रमणीक दारु पिऊन मला मारहाण करतो, माझे दुसऱ्या पुरुषासोबत अफेअर असल्याचे खोटे आरोप करतो असे म्हटले होते. त्याने माझी प्रॉपर्टी बळकावली त्याला माझ्या मुंबईतल्या घरावरही हक्क हवा होता असाही आरोप बॉबी डार्लिंगने केला. या सगळ्या आरोपांनंतर बॉबी डार्लिंगने नवऱ्यावर हुंडा मागितल्याचाही आरोप केला आहे. एवढेच नाही तर रमणीक, त्याची आई आणि भाऊ या तिघांविरोधात बॉबीने तक्रार दाखल केली आहे.
---------
हा पुरुषाचा बाई झाली . आता ह्याला हिंदू विवाह कायद्यातले पोटगी , कौटुंबिक अत्याचार 398 की काय ते हे सगळे फायदे स्त्रीप्रमाणे मिळणार का ?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 05/18/2018 - 21:52
नवीन
ज्या विवाह कायद्यानुसार विवाह झाला असेल त्यानुसार कारवाई होणार
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sat, 05/19/2018 - 06:51
नवीन
राज्यपालांना congress ने लिस्ट दिली नाही म्हणे
जर congress ची लिस्ट द्यावी लागते , तर bjp ची लिस्ट कुठे आहे ? त्यांनी दिली का 113 ची लिस्ट ?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 05/19/2018 - 07:24
नवीन
राज्यपालांना congress ने लिस्ट दिली नाही म्हणे
त्यांना "रागा" कडून आदेश आला नसेल.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sat, 05/19/2018 - 07:43
नवीन
भाजपयाना आदेश आला नाही का ?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sat, 05/19/2018 - 07:39
नवीन
कोण म्हणालं असं? संदर्भ देता का?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sat, 05/19/2018 - 07:45
नवीन
बहुमत होणार का आज? स्वतःच्याच जाळ्यात काँग्रेस अडकतंय का? हंगामी अध्यक्षांवर आक्षेप घेतला आहे तर त्यांना नोटीस बजावावी लागेल. आणि नोटीस बजावली तर सुनावणी पूर्ण होईपर्यंत बहुमत घेता येणार नाही असं कोर्टाचं म्हणणं पडलं आहे.
--------------
हे लिहिता लिहिता हंगामी अध्यक्षांवर आम्ही काहीही करू शकत नाही असा निकाल कोर्टाने दिला आहे असे बातम्यात आहे. बहुमताचा मार्ग क्लिअर!
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Sat, 05/19/2018 - 12:42
नवीन
चला, शेवटी येडाअण्णांने राजीनामा दिलाच.
विधानसभेत बहुमत सिद्ध करु म्हणून बढाया मारणारे, भाजपा नेते आता चांगलेच तोंडावर आपटले आहेत.
--
कॉंग्रेसचे अभिनंदन !
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Sat, 05/19/2018 - 12:46
नवीन
हे म्हणजे 'नायक' मधल्या अनिल कपूर सारखच झालं म्हणायचं ...
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sat, 05/19/2018 - 12:46
नवीन
रमजानची टिपू सुल्तानला भेट.
काँग्र्सचे व जेडी चे अभिनंदन .
कुत्र्याकडून देशभक्ती शिका, असे म्हणणार्या मोदीना आणि चार तुकडे टाकून कुत्र्यासारखे आमदार बोलवु , असे बोलणार्या शहाना काँग्रेस , जेडीच्या पक्षप्रेमी लोकांकडून सणसणीत चपराक.
अभिनंदन
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sat, 05/19/2018 - 12:47
नवीन
शेवटी भाजपचा बालीश खेळ त्यांच्या अंगाशी आला आहे, येडीयुरप्पांनी बहुमताआधी राजीनामा दिला आहे.
------------------------
आज ज्या परिस्थतीत भाजप आहे तिथे काँग्रेस-जेडीएसला आणता आलं असतं, स्वतःला राठी महारथी म्हणवणारे शेवयी उघडे पडले. नैतिक वरची लेव्हल घेण्याऐवजी सरकार स्थापन करण्याचा खटाटोप हे भाजपला अजून बराच पल्ला गाठायचा आहे याची जाणीव करून देईल एवढीच आशा करतो.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sat, 05/19/2018 - 14:03
नवीन
आज कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाआधीच भाजप नेते येडियुरप्पांनी राजीनामा दिला. पण त्यानंतर राष्ट्रगीत सुरू असतानाच येडियुरप्पा, भाजपचे आमदार आणि कर्नाटक विधानसभेच्या सभापतींनी विधानसभेतून निघून जाऊन राष्ट्रगीताचा अवमान केला. यामुळे सगळीकडून भाजपवर टीका होते आहे.
कर्नाटकामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला पण त्याला बहुमत मिळालं नाही. तरीही भाजपने राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. पण सुप्रीम कोर्टाने येडियुरप्पांना शनिवारी दुपारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सगळे आमदार कर्नाटक विधानसभेत जमले. यावेळी आमदारांच्या शपथविधीनंतर येडियुरप्पांनी भाषण केले. हे भाषण झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरू झाले. पण राष्ट्रगीताच्यावेळी स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीताला मान न देता येडियुरप्पांनी भाजप आमदारांसह सभात्याग केला.
त्यांच्या या कृतीवर राहुल गांधींनी सडकून टीका केली. भाजप आणि संघ भारतातली संस्थाचं महत्त्व संपवू पाहत आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्याविरूद्ध लढत आहोत असं त्यांनी सांगितलं
- Log in or register to post comments
व
विशुमित
Sat, 05/19/2018 - 15:12
नवीन
भाजपे ना! त्यांना काही देणं घेणं नाही आहे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताबद्दल.
पण सत्ता मिळण्यासाठी त्याबद्दल नाटकी प्रेम दाखवाय पुढे.
त्या थेटर मधे राष्ट्रगीताला उभे नाही राहिले म्हणून देशाचा किती प्राईम टाईम घालवला याची गणतीच नाही.
- Log in or register to post comments
र
रामदास२९
Mon, 05/21/2018 - 14:55
नवीन
एक गोष्ट तुम्ही पहिली का.. यात भाजपा च्या लोकान्ची चुक नाही..
भाषण सम्प्ल्यावर येड्डी निघाले, अशोक गेहेलोत, गुआ ना भेटले आणि बाहेर पडले ..
स्वतः सिध्दरामय्यान्ना देखील केव्हा राष्ट्रगीत सुरु झाल कळाला नाही..त्याना दुसर्या कोणीतरी उठवला.. ही चूक (बोपय्या) यान्ची आहे, त्यान्नी येड्डीन्चा भाषण सम्पल्या सम्प्ल्या वन्दे मातरम अस जाहीर करायला हव होता.. म्हणजे सगळ्याना कळाल असता ..
राहता रहिला राहूल गान्धीन्चा विषय .. त्यान्ना कळाल ही नाही कि राष्ट्रगीत केव्हा सुरु झाला आणि वर त्यान्नी ते लवकर आटपायला सान्गितल..
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 05/19/2018 - 14:15
नवीन
भाजपास काँग्रेसी डिप्लोमसीचे स्किल आत्मसात करणे अजून बरेच बाकी आहे हे कर्नाटक घटनेवरुन दिसून आले. बहुमत नसताना सत्तेवर क्लेम करण्या पेक्षा त्यांना सत्तेवर येऊ दिले असते तर त्यांचे आमदार मोकळेच फिरले असते आणि काँटॅक्ट सोपा झाला असता. काँग्रेसने पत्रकार परिषदेतून जेडिएसला बाहेरुन पाठींबा दिला की दुसर्या पत्रकार परिषदेतून भाजपाने कोणी १५ जण जेडिएस मधून बाहेर पडा आणि तुमचेच मंत्रिमंडळ बनवा , आम्ही बाहेरुन पाठींबा देण्यास तयार आहोत असे जाहीरपणे सांगितले असते तर सगळे बुचकळ्यात पडले असते . आणि भाजपाच्या जागी काँग्रेस असती तर काँग्रेस ने तसे केले सुद्धा असते . शिकतील अनुभवातून एक एक करुन .
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 05/19/2018 - 14:25
नवीन
कदाचित जेडिएसला विनाशर्त पाठींब्याची खेळीकरुन काँग्रेसच्या पाठींब्याचे महत्व कमी करता येऊ शकले असते .
- Log in or register to post comments
ग
गणेश.१०
Sat, 05/19/2018 - 14:38
नवीन
थोड्या अंशी सहमत पण आपण म्हणता त्या परिस्थितीत भाजप हालचाल करणार हे न समजण्याइतकी ७० वर्षांची काँग्रेस दूधखुळी नाही.
अजूनही काँग्रेस आणि जेडीएस चे आमदार हॉटेल मध्ये बांधून ठेवले आहेत म्हणे :-)
केवळ ७ जागांसाठी भाजपने जेडीएस गटाला बाहेरून पाठिंबा दिला असता तर पुढील निवडणुकीत जनतेने त्यांचा पाठिंबा नक्कीच काढून घेतला असता.
येडियुरप्पांनी पुढील विधानसभेत १५० जागा आणि लोकसभेत सर्वांच्या सर्व २८ जागा मिळवण्याची प्रतिज्ञा करून उरली सुरली लाज राखली हे बरं केलं.
- Log in or register to post comments
ग
गणेश.१०
Sat, 05/19/2018 - 14:24
नवीन
भाजपाचं उद्दिष्ट येनकेनप्रकारे सत्ता होतं हे उघड आहे.
येडियुराप्पाना तर शेवटपर्यंत घोड-चमत्काराची आशा होती.
राजीनामा नाटय हे अति उशीरा सुचलेलं शहाणपण.
side effect असा झाला की काँग्रेसला गुडघ्यावर यावं लागलं.
जेडीएसने मात्र वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.
भविष्यात जेडीएसला स्वतःला मजबूत करण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल.
आणि काँग्रेसला पश्चाताप.
भाजपाला देशात आणि इतर राज्यात सत्ता असल्यामुळे खूप मोठा फटका बसण्याची शक्यता कमी.
हाता-तोंडाशी आलेला घास मात्र हिरावला गेल्याची रुखरुख भाजप राज्य नेतृत्वाला राहील.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 05/19/2018 - 14:35
नवीन
खरे तर भाजपाने क्लेम केला नसता तर अधिक बरे झाले असते असे वाटते. आताही काँग्रेस्/जेडीएस जास्त काळ एकत्र राहण्याची शक्यता कमीच आहे.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Sat, 05/19/2018 - 15:03
नवीन
कर्नाटक विधानसभा निवडणुकीने शाळेमध्ये ऑप्शनला टाकलेल्या राज्यशास्त्र विषयामधील बारकावे समजण्यास खूप मदत झाली.
सर्वांचे हार्दिक आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा...!!
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sat, 05/19/2018 - 15:04
नवीन
आता काँग्रेस + जद , सप + बसप , राजद + काँग्रेस , काँग्रेस + राष्ट्रवादी अशा अनेक आघाड्याची शक्यता वाढल्या आहेत
- Log in or register to post comments
ए
एमी
Sat, 05/19/2018 - 18:04
नवीन
भाजप, मोदी नको असलेल्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्यावर गेल्या वर्षीपासूनच काम चालू करायला हवं होत.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 05/19/2018 - 15:22
नवीन
ईतके दिवस एक्मेकांना खाउ की गिळू करणारे भाजपा-काँग्रेसवाले विधानभवनाबाहेर एकमेकांशी दिलखुलास गप्पा मारताना दिसले तेव्हा ह्यांनाही बरे वाटले. हे आम्हाला धमकावता आहेत, ते आम्हाला १०० कोटीची ऑफर देत आहेत.. हे मजेसाठीच होते हे सिद्ध झाले.

- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Sat, 05/19/2018 - 17:16
नवीन
भाजपाला एक चांगला धडा मिळाला. आता याच प्रमाणे काँग्रेस ने गोवा, मेघालय आणि मणिपूर मध्ये पण सत्ता काबीज करावी.
नंतर २०१९ मध्ये सुद्धा एकदाची काँग्रेसला सत्ता मिळाली की संपूर्ण देशात कसं सगळं आलबेल होईल.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sat, 05/19/2018 - 17:23
नवीन
काँग्रेसने फार्स न करता हिंमत असेल तर गोवा, मणिपूर मध्ये आणि तेजस्वीने बिहारमध्ये अविश्वास प्रस्ताव आणावा. आम्हाला बोलवा म्हणून स्वतःचे हसे करून घेऊ नये.
-----------------
बाकी या कर्नाटक प्रकरणात कोर्टाने कुठेही राज्यपालांनी काही चुकीचे केले असे म्हटले नाहीये, आणि बोलावलेल्या पक्षाचा बहुमत नापास होण्याची ही काही पहिली वेळ नाही. त्यामुळे भाजपचा पराभव हा स्वतःचा विजय मानून हा बोगस विजय साजरा करणाऱ्यांचं कौतुक!
-----------------
कर्नाटकमध्ये किती दिवस स्थिर सरकार असेल हे बघणे औत्सुक्याचे आहे.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sat, 05/19/2018 - 17:17
नवीन
स्वतंत्रपणे लोकांना सामोरे गेल्यानंतर, २२२ लढवून ७८ जिंकणाऱ्या, मुख्यमंत्र्यांसह १७ मंत्री हरलेल्या काँग्रेसला आणि निकालानंतर ५ दिवस गायब असलेल्या अधक्ष्यांना पराभवाचा हिशेब देण्याऐवजी परत बिनबुडाचे आरोप करण्याची संधी भाजपच्या कर्नाटकातील अपरिपकव राजकारणाने मिळाली आहे. उघड उघड जनतेने लाथाडल्यानंतरही उजळ माथ्याने विजयी अविर्भावात बोलणाऱ्या अध्यक्षांबद्दल काय बोलावे. भविष्यकाळ उज्वल आहे.
----------------------
मिळालेला विजय नैतिक पराभवात रूपांतरित करणाऱ्या शहांना याचा जाब विचारून जबाबदारी घ्यायला लावण्याची वेळ आली आहे हे भाजपने जाणले तर बरे होईल. शहांना जेवढा स्वतःवर विश्वास आहे तेवढे ते चाणाक्ष राजकारणी नाहीत आणि त्यांना अतिआत्मविश्वास नडतो हे अनेकदा सिद्ध झाले आहे. तेव्हा भाजप आतातरी हे गंभीरपणे घेईल का?
----------------------
काँग्रेस जेडीएस ला बहुमत आवाजी मतदानाने सिद्ध न करता चॅनेलच्या कॅमेरांच्या गराड्यात विभागणी पद्धतीने करायला सांगण्यात येईल का?
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Sat, 05/19/2018 - 17:55
नवीन
खरंच भाजप ने इतका बावळटपणा करायची गरज नव्हती. करू द्यायचं सरकार स्थापन आणि बघायची मजा. मला नाही वाटत कुमारस्वामी टिकतील. अर्थात गेल्या चार दिवसात मी जे नागरिकशास्त्र ह्या धाग्यातून शिकलेय, त्यातून आलेलं हे अभ्यासपूर्ण मत!
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 05/19/2018 - 18:39
नवीन
पिराताई,
तुमच्याशी जवळजवळ सहमत. जवळजवळ अशासाठी की भाजपचा डाव थोडा वेगळा आहे. आम्ही जनतेच्या सेवेसाठी सत्तेवर दावा सांगितला म्हणून गळा काढायला येदि मोकळे. आता सत्ता राबवायची जबाबदारी जदसे व पप्पूपक्षाची आहे. सत्ता स्थापणं सोपं असलं तरी चालवणं अवघड आहे. हे येदिंना देखील माहित आहे. योग्य वेळेस जदचे आमदार फोडून मध्यावधी निवडणुका घेतल्या जातील. ही 'योग्य वेळ' २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची असेल हे वेगळे सांगणे नलगे. मोदी, शहा व येदी पक्के लबाड आहेत.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sat, 05/19/2018 - 18:46
नवीन
की ते कर्नाटकचे नंदनवन करणार होते
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 05/20/2018 - 07:19
नवीन
येडियुरप्पा बोलले की ते कर्नाटकचे नंदनवन करणार होते. भाजपे आले असते तर ते मूर्खांचे नंदनवन झाले असते.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 05/20/2018 - 09:59
नवीन
पंतमंगूश्री,
मग आता पप्पूला शहाण्यांचं नंदनवन बनवायची संधी आहे. बघूया काय करतो ते!
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Sat, 05/19/2018 - 20:44
नवीन
ही 'योग्य वेळ' २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची असेल हे वेगळे सांगणे नलगे.
तोपर्यंत पेट्रोल डिझेलच्या दरांनी १०० री पार केलेली असेल. इंधनावरील एक्साइज ड्युटी कमी करण्याची नामुष्कीची वेळ येईल तेव्हा ह्यांच्यावर.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 05/20/2018 - 18:35
नवीन
लोक पेट्रोलच्या किमतीचा एवढा ठणाणा का करतात हे समजत नाही.
सध्या मोदी विरोध बाजूला ठेवूया.
2013 साली भाव 65 रुपये लिटर होता आणि वडा पाव 5 रुपये
महागाई च्या दराने वडापाव 12 ते 15 झाला आहे म्हणजे 250 ते 300 टक्के भाववाढ
आणि पेट्रोल 85 होईल हे गृहीत धरले तर 30% भाववाढ 5 वर्षात आहे.
हा दर इतर महागाईपेक्षा नक्कीच कमी आहे.
वाहतुकदारांनी डिझेलचे भाव कमी झाल्यावर आपले दर कधीच कमी केलेले नाहीत. तेंव्हा त्यांच्या रडारडी कडे लक्ष देण्यात अर्थ नाही. त्यांना पायाभूत सुविधा चांगल्या करून घ्याव्यात आणि भाव वाढवावेत. उगाच जाळून प्रदूषण करणाऱ्या लोकांची पत्रास बाळगायचे कारण नाही
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Sun, 05/20/2018 - 20:29
नवीन
लोक पेट्रोलच्या किमतीचा एवढा ठणाणा का करतात हे समजत नाही.
कोण ठणाणा करतय?
भविष्यात विद्यमान सरकार इंधन दराविषयी काय भूमिका घेईल ह्याचा अंदाज वर्तविला आहे.
सध्या मोदी विरोध बाजूला ठेवूया.
2013 साली भाव 65 रुपये लिटर होता आणि वडा पाव 5 रुपये
कशासाठी हे लंगडे समर्थन करत आहात?काहीही तुलना करून स्वतःचे हसू करून घेत आहात.
२०१३ साली कच्च्या तेलाचे रुपयात प्रती बॅरल काय दर होता आणि आज काय दर आहे ह्याची तुलना करा, मगच बोला.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 05/21/2018 - 06:38
नवीन
ब्वॉर्र
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 05/20/2018 - 18:36
नवीन
लोक पेट्रोलच्या किमतीचा एवढा ठणाणा का करतात हे समजत नाही.
सध्या मोदी विरोध बाजूला ठेवूया.
2013 साली भाव 65 रुपये लिटर होता आणि वडा पाव 5 रुपये
महागाई च्या दराने वडापाव 12 ते 15 झाला आहे म्हणजे 250 ते 300 टक्के भाववाढ
आणि पेट्रोल 85 होईल हे गृहीत धरले तर 30% भाववाढ 5 वर्षात आहे.
हा दर इतर महागाईपेक्षा नक्कीच कमी आहे.
वाहतुकदारांनी डिझेलचे भाव कमी झाल्यावर आपले दर कधीच कमी केलेले नाहीत. तेंव्हा त्यांच्या रडारडी कडे लक्ष देण्यात अर्थ नाही. त्यांना पायाभूत सुविधा चांगल्या करून घ्याव्यात आणि भाव वाढवावेत. उगाच जाळून प्रदूषण करणाऱ्या लोकांची पत्रास बाळगायचे कारण नाही
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 05/20/2018 - 18:50
नवीन
हे लॉजिक तर त्यापूर्वीही तितकेच खरे असणार ना ? की अचानक 2014 नंतर वडापावची महागाई पेट्रोलच्य महागाईच्य तुलनेत अचानक वाढली ?
मग 2014 पूवी तेल दरवाढ झाल्यावर भाजपे आंदोलनाला रस्त्यावर का नाचायचे ?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 05/20/2018 - 18:56
नवीन
मोगा खान
तुम्हाला साधी तुलना पण कळेनाशी झाली आहे. 2005 साली वडापाव 3 रुपये होता तेंव्हा पेट्रोल किती होते तेही पाहून घ्या.
मोदी द्वेष बाजूला ठेवा असे मी वर लिहिलेच आहे. पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवताच येत नाही इतकी तुमची विचारसरणी गढूळ झाली आहे का?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 05/20/2018 - 18:57
नवीन
मोगा खान
तुम्हाला साधी तुलना पण कळेनाशी झाली आहे. 2005 साली वडापाव 3 रुपये होता तेंव्हा पेट्रोल किती होते तेही पाहून घ्या.
मोदी द्वेष बाजूला ठेवा असे मी वर लिहिलेच आहे. पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवताच येत नाही इतकी तुमची विचारसरणी गढूळ झाली आहे का?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »