शब्द झाले मोती.. - २
शब्द झाले मोती..१
मागील धाग्याबद्दल :
या धाग्याला पुन्हा २०१५ प्रमाणे पुन्हा सुरुवात करावी म्हणतोय.. भाग -१ मध्ये जरी धाग्याला मी सुरुवात केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी ..आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर अनेक जनांनी ही यात मजा आनली..आपण एकमेकांना ओळखत ही नव्हतो आणि काय सुंदर नाते विनले गेले.
नियम :
तेंव्हा सारखेच आता ही वाटते आहे.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले.. जसेच्या तसे ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने..
मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा
नोटः कृपया, +१, भारी. छान असे रिप्लाय देवू नये.. ही एक डायरीच होते एकमेकांची, नंतर कधी ही वाचावी अशी , अश्या रिप्लाय ने मध्ये निट वाचता येत नाही.
उलट तुम्ही ही काहीही लिहा .. जे वाट्टेल ते.. वरच्या रिप्लाय ला अनुसरुन किंवा आपल्या मनातले बेधडक..
फुले वेचूनि परड्या भरल्या नाजूक तिच्या बोटांनी अगणित ती सुवासिक स्मरणे भरू कुठल्या कुप्यांनी?वाह --------- मला लहान पणा पासून पांढरी, पांढरट रंग असणारी फुले खूप आवडतात.. माहीत नाही का पण आवडतात.. उरुळी ला माझ्या घराच्या अंगणात जाई चा वेल होता.. काळ्या चिमणीने त्यात घरटे पण केले होते.. जुई बाजूला छोट्याश्या बागेत होती.. अंघोळी चे पाणी जायचे तिथे मोगरा उभा असायचा.. एक पाकळीचा मोगरा.. दोन पाकळीचा मोगरा.. किती आठवणी.. मोगरा तेंव्हाचे माझे आवडते फुल.. तायडी गजरा करायची या फुलांचा.. या पांढऱ्या फुलांच्या आवडी पायी, दूर दातार बंगल्यामध्ये उगाच आलेलं धोतऱ्याचे फुल पण मला आवडलं होतं. मी मोठा होत गेलो तसं मला बकुळी आणि पारिजातका च्या फुलांनी मोहिनी घातली.. त्या फुलांत मला माझ्या आत दडलेल्या प्रेमाच्या अनामिक हुरहुरी ची आठवण येते.. तिच्या आठवणींची हलकीशी बरसात होते... सुगंधाचच लेणंच ते.. माझ्या रहाटनीतल्या घराचे नाव 'पारिजात'.. पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलुट करायची ती सुगंधाचीच हे मोहत्सव मधलं माझं आवडतं वाक्य.. आता हळू हळू या प्रेमात रातराणी ने प्रवेश केलाय.. रातराणी म्हणजे आकाशातल्या चांदण्याच जणू. .. निरपेक्ष भावनेचे अलवार प्रेम म्हणजे रातराणी....तेव्हाची भिजलेली आठवण, आहे अजून ओली जरासे परतून, देऊन जा ऊब तुझ्या सोबतीची___^___ धन्यवाद.. ओळी एकदम खऱ्या.. माझ्या मनातले भाव.. काल माझे सारे वाचून अश्विनी चा फोन आला.. तिने आपण पुन्हा पुस्तकांच्या दुकानात.जावू.. हॉटेल्स ला जावू.. मी काढील वेळ.. मी नेहमी प्रमाणे : तू काय ते लवकर ठरव.. आपण भेटू.. पण तू आणखिन काही वर्ष लावले तर मी तुझ्या सारख्या म्हाताऱ्या मुलीला घेऊन मुळीच फिरणार नाही.. ती :-)) :-)):-)) अवांतर - आज 10 वाजल्यापासून नविन प्रोजेक्ट वर काम सुरु... आता इकडे येणे कमी.. प्रयत्न करेल.. त्यामुळे लास्ट ला झोपताना 'बकुळी' हा प्रतिसाद दिला .. झोप आला तरी दिला.. कारण आज पासून अवघड होईल आता इकडे येणे.. आता शनिवार - रविवार जिंदाबाद ! पण आज पासून मिपा कमी होणार हे नक्की.. तुम्ही लिहित रहा.. मी वाचेल नंतर