शब्द झाले मोती.. - २
शब्द झाले मोती..१
मागील धाग्याबद्दल :
या धाग्याला पुन्हा २०१५ प्रमाणे पुन्हा सुरुवात करावी म्हणतोय.. भाग -१ मध्ये जरी धाग्याला मी सुरुवात केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी ..आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर अनेक जनांनी ही यात मजा आनली..आपण एकमेकांना ओळखत ही नव्हतो आणि काय सुंदर नाते विनले गेले.
नियम :
तेंव्हा सारखेच आता ही वाटते आहे.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले.. जसेच्या तसे ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने..
मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा
नोटः कृपया, +१, भारी. छान असे रिप्लाय देवू नये.. ही एक डायरीच होते एकमेकांची, नंतर कधी ही वाचावी अशी , अश्या रिप्लाय ने मध्ये निट वाचता येत नाही.
उलट तुम्ही ही काहीही लिहा .. जे वाट्टेल ते.. वरच्या रिप्लाय ला अनुसरुन किंवा आपल्या मनातले बेधडक..
पांढर्या शुभ्र कागदावरती.. माझे शब्द फक्त तुझ्या साठी.. या शब्दांचेच मग होईल गाणे.. तुझे माझे ..आपलेच... मग कागदाचेच त्या होईल एक विमान.. उडणारे.. मुक्त..स्वछंद...भिरभिरत्या वार्यावरती, शब्द माझे उडतील सैरावैरा.. स्पंदने ही माझी घेतील सूर मग, तुझ्या घुंगुर - पैंजणांचे त्या सूरांबरोबर तु गाशील का मग माझे शब्द .. माझे गाणे.. जे असेल फक्त, तुझे माझे.. आपलेच..तेंव्हा आभाळभरुन सुद्धा उरेल का गं मागे, माझ्या आठवणींचे हे जग.. पावसाच्या पाण्यात दिसेल का गं मग, माझ्या अस्तित्वाचे ढग..----------- गणेशाजेंव्हा प्रश्नच प्रश्नांची उत्तरे असतात तेंव्हा भावनांना काहीच अर्थ उरत नाही.. तीच्या माझ्या आठवणींच्या बांधावर आता बाभळी शिवाय काहीच येत नाही.. - शब्दमेघसरीला मेघ कधीच सापडत नाही नजरकैद त्याची मात्र कधीच सुटत नाही.. बांधावरच्या बाभळीला ही मग बहर येतो.. आठवणींना मात्र तिच्या गावचा पत्ताच नसतो.. -- शब्दमेघ (एक विनंती.. रिप्लाय देताना छान.. सुदंर अशी एकोळी रिप्लाय नका देऊ.. त्याने लिंक तुटते.. उलट असेच रिप्लाय मस्त वाटतात.. आणि रिप्लाय ला रिप्लाय लिहिताना खुप छोटे छोटे आकार होतात रिप्लाय चे.. म्हणुन सरळ main प्रतिसाद मध्ये असा रिप्लाय द्या सर्वात शेवटी.. जसा हा रिप्लाय दिलाय तसा मध्ये दुसरा रिप्लाय आल्याने मागचे थोडे प्रतिसाद येथेच डकवलेत )