राजकारण

ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग २)

Primary tabs

आधीच्या भागात दोनशेहून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे (वाट पाहून) हा भाग काढत आहे.

नवीन प्रतिसाद ह्या भागात द्यावेत, जुन्या प्रतिसादांना प्रति-प्रतिसाद द्यायचे असतील तर पहिल्या धाग्यावर द्यावेत.

---

आधी मद्य विक्रीत, मग बससेवेत आणि आता शौचालय बांधकामात घोटाळा!

- केजरीवाल सरकारवर काँग्रेसचा आरोप

ऑपइंडियाची बातमी

एका वृत्तवाहिनीचे संबंधित ट्विट:

दिल्ली कांग्रेस ने मनीष सिसोदिया पर लगाया टॉयलेट घोटाले का आरोप◆ कांग्रेस नेताओं ने LG वी के सक्सेना को सौंपा ज्ञापन ◆ पब्लिक टॉयलेट में कांट्रैक्ट की जांच की मांग की pic.twitter.com/srb1VPnKSP— News24 (@news24tvchannel) September 21, 2022

वामन देशमुख

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी, रशियाचे रक्षण करण्यासाठी आण्विक शस्त्रे वापरण्यास आम्ही तयार आहोत असा पाश्चात्य देशांना इशारा दिला.

रॉइटर्स् ची बातमी -

https://www.reuters.com/world/europe/putin-signs-decree-mobilisation-sa…

कंजूस

मोठाच धडाका करायचा ठरले असेल तर . . .
बाकी अमेरिकाही बोलू शकणार नाही. त्यांनीही हे केलंय. चीनचीही संमती असावी.

माघार घायला लागली म्हणूण आण्विक शस्त्रे वापरायची कल्पना असेल गरज नसेल तर रशिया कशाला वापरेल? आण्विक शस्त्रे वापरली तर भारताला सुद्धा रशिया बरोबरचा व्यापार बंद करावा लागेल.

कंजूस

आण्विक शस्त्रे वापरली तर भारताला सुद्धा रशिया बरोबरचा व्यापार बंद करावा लागेल.

होय.

तर्कवादी

हा मुर्खपणा कुणी करेल असे वाटत नाही.. अणूयुद्ध एकदा सुरु झाले की निम्मेअधिक जग सहज बेचिराख करुनच थांबेल कदाचित

सुबोध खरे

आपण जर पुतीन यांचे भाषण नीट वाचले तर काही गोष्टी लक्षात येतील.

एक म्हणजे रशियाने आपले राखीव सैन्य उतरवण्याचा निर्णय का घेतला?

पाश्चात्य देशांनी युक्रेनला न भूतो न भविष्यति अशी आधुनिक शस्त्रास्त्रे देऊन हे युद्ध धुमसत राहील हि सोय करून ठेवली आहे.

युक्रेन हा नाटो चा भाग नाही आणि पूर्वीच्या सोव्हिएत युनियनचे भाग असलेल्या देशांना नाटोत सामील करून रशिया ला चारी बाजूनी वेढून त्यांच्या वर दबाव आणण्याचा प्रयत्न अमेरिका गेली ३० वर्षे करत आलेला आहे.

कारण रशियाला खिळखिळे करून तेथे असलेली अमाप खनिजसंपत्ती, तेल, नैसर्गिक वायू स्वस्तात पदरात पडून घेणे हा हेतू आहे.

रशियाविरुद्ध युक्रेन या युद्धात जर रशियाच्या अस्तित्वाचा प्रश्न आला तर रशिया अण्वस्त्रे वापरण्यास मागे पुढे पाहणार नाही असे पुतीन यांनी म्हटले आहे. यात काही नवीन नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान किंवा सरसेनानी असे कायमच बोलत आलेले आहेत.

अण्वस्त्र निर्मिती चा मूळ हेतूच तो आहे कि सर्वनाशाचये वेळेस शत्रूवर इतका मोठा आघात करायचा कि तो आपल्यावर हल्ला करण्यापूर्वी चार वेळेस विचार करेल.

अमेरिकेने आता पर्यंत इराक इराण लिबिया सारख्या अनेक देशांवर कारण नसताना हल्ला केला पण उत्तर कोरिया वर हल्ला करण्याची अमेरिकेची हिंमत झालेली नाही. कारण त्यांच्या कडे असलेली अण्वस्त्रे.

आंतरराष्ट्रीय राजकारणात दंडेलशाही करणारा पुतीन हा काही एकमेव नेता नाही. अमेरिका गेली ८० वर्षे हेच करत आली आहे. असा एकही खंड नाही जेथील राजकारणात अमेरिकेने ढवळा ढवळ केलेली नाही.
पुतीन करत आहेत ते समर्थनीय आहे का हा मुद्दा बाजूला ठेवला तर पाश्चात्य राष्ट्रे करत आहेत ते संपूर्णपणे चूक आहे हे स्पष्ट आहे.

रशिया यावर आर्थिक निर्बंध टाकले तर युरोपचे प्राण कंठाशी आलेले आहेत. त्यामुळे काहीतरी दुसरे करण्यासाठी त्यांनी पुतीन यांच्यावर दबाव आणण्यासाठी धमक्या द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे पुतीन यांनी धमकीला दिलेले प्रत्युत्तर आहे.

वामन देशमुख

विश्लेषण : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर का कारवाई?
https://www.loksatta.com/explained/what-is-popular-front-of-india-nia-r…

सदर वृत्तानुसार मागच्या आठ-दहा वर्षांमध्ये ही संघटना अधिकच फोफावलेली दिसते आहे.

---

अवांतर: मागच्या आठ-नऊ वर्षांमध्ये, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद सारख्या संघटना मात्र हळूहळू नामशेष होत चालल्या आहेत का?

क्लिंटन

काल पी.एफ.आय वर छापे घालण्यात आले आणि शंभरेक लोकांना पकडण्यात आले आहे.

आपले माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी त्याच पी.एफ.आय च्या कार्यक्रमाला हजर होते. त्यांच्या घरावर छापा घालून त्यांना कधी तुरूंगात पाठविणार? तसेच केरळमध्ये पी.एफ.आय वरील छाप्यांच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला आहे आणि अपेक्षेप्रमाणे त्या बंदला हिंसक वळण लागले आहे.

आता यातील संगती बघितली तर खरोखरच धक्कादायक गोष्टी दिसतील. २००७ मध्ये हामिद अन्सारी पहिल्यांदा उपराष्ट्रपती झाले ते त्यावेळी मनमोहन सरकारला पाठिंबा देत असलेल्या कम्युनिस्ट पक्षांच्या आग्रहामुळे. ते पी.एफ.आयच्या कार्यक्रमाला जातात. कालपरवा एन.आय.ए ने म्हटले आहे की पी.एफ.आयला तालिबान स्टाईल इस्लामी राज्य भारतात आणायचे आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/nia-pfi-aims-to-enforce-talib… याच पी.एफ.आय ने मागच्या वर्षी तालिबानचे उघड समर्थनही केले होते. आणि केरळमधील राजकारण बघितले तर राज्यातील हिंदू मतदार हे कम्युनिस्ट पक्षांचे पारंपारीक समर्थक आहेत.

आता याची संगती कशी लावायची? केरळमधील हिंदू आपल्याच सर्वनाशासाठी मत देत आहेत? असल्या लोकांना कोण जागे करणार आणि कसे?

पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये, अल्पसंख्यांकांचे काय होत आहे?

ह्याचे उदाहरण समोर आहेच की ....

आग्या१९९०

केरळमधील CPI २००६ पासून राजकीय हत्यांना PFI ला जबाबदार धरत आहे आणि ती एक धार्मिक संघटना असल्याचे मानते.

मदनबाण

काल पी.एफ.आय वर छापे घालण्यात आले आणि शंभरेक लोकांना पकडण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे एक जुने ट्विट पाहण्यात आले होते, ते इथे देऊन ठेवतो.

Shocked to know that @mybmc giving legitimacy to organisation like Popular Front of India (PFI), allegedly known for anti-national & anti-social activities.Hon CM @OfficeofUT ji do you agree to this?If not, will you take strong action?Sharing few links, See what is PFI? pic.twitter.com/KLcZoupBPh— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 2, 2020

आपले माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी त्याच पी.एफ.आय च्या कार्यक्रमाला हजर होते. त्यांच्या घरावर छापा घालून त्यांना कधी तुरूंगात पाठविणार?
हिंदुंना वाटते की मायावी राक्षस केवळ पुराणातच होते, पण त्यांना डोळ्या समोर असलेल्या राक्षसांना ओळखायला देखील बराच वेळ लागतो असे दिसते ! १०००० नीच मेल्यावर हा हामिद नावाचा महानीच पैदा झाला असावा ! या निच्चडची एक मुलाखत काही काळापूर्वी पाहिली होती, स्वतः जिहादी नीच मानसिकतेचा असणारा हा रोखठोक प्रश्न विचारणार्‍या पत्रकाराच्या मानसिकतेवर प्रश्न करताना दिसला.

जाता जाता :-
थापाड्याच्या खोट्या हिंदुत्वाच्या थापांना कंटाळुन थापा भाजपा मध्ये गेला म्हणे ! :)))
संदर्भ :- बाळासाहेबांचे विश्वासू चम्पासिंग थापा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः । महामोहा च भवती महादेवी महासुरी ॥६॥

राघव

भारी. विडोबद्दल धन्यवाद!

विवेकपटाईत

टीआरपी घोटाळ्याची रिपोर्ट आली -इति अर्णब गोस्वामी
परमवीर सिंहचे काय होणार ?

विवेकपटाईत

टीआरपी घोटाळ्याची रिपोर्ट आली -इति अर्णब गोस्वामी
परमवीर सिंहचे काय होणार ?

पुराने थैमान घातलेला असताना भारताकडून मदत नाही, पाकिस्तान म्हणतो “ते आता बदललेत, हिंदूंचं वर्चस्व…”

https://www.loksatta.com/desh-videsh/pakistan-foreign-minister-bulawal-…

पाकिस्तान मधल्या अल्पसंख्यांकांचे काय झाले?

-------

आतंकवादी हल्ले करणार्या पाकिस्तानला , भारताने काहीही मदत करू नये, हे माझे वैयक्तिक मत आहे ....

'मुस्लिम राष्ट्रा'चे लक्ष्य! PFIचे 'व्हिजन २०४७' उघड; एनआयएच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/documents-show-pfi…

वेगवेगळ्या माध्यमातून इस्लाम धर्माचा प्रचार करून भारतीय स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवात म्हणजे २०४७मध्ये संपूर्ण देश मुस्लिम राष्ट्र करण्याचे लक्ष्य ठेवण्याचा संदेश या पुस्तकातून देण्यात आला आहे. त्यानुसारच उच्चशिक्षित आरोपी हे शिबिरे, कार्यक्रमातून प्रशिक्षण देत होते.

कपिलमुनी

ताजे ताजे मनोबल वाढलेल्या पोलिसांनी किती जणांना अटक करून देशद्रोह वगैरे कलमे लावली ??

श्रीगुरुजी

जोपर्यंत फडणवीस हा निष्क्रीय माणूस गृहमंत्री आहे, तोपर्यंत यांच्याविरूद्ध काहीही भरीव कारवाई होणार नाही. आम्ही यांव करू, आम्ही त्यांव करू एवढीच प्रतिक्रिया मराठी व पाठोपाठ हिंदीत दिली जाईल. अर्थात मविआ सरकार टिकले असते तरीही काहीही झाले नसते. मागील सरकार आणि हे सरकार यात काहीही अंतर नाही.

रोहिंग्यांमुळे बांगलादेशची सुरक्षा, अर्थव्यवस्थेवर परिणाम, पंतप्रधान शेख हसिना यांचे प्रतिपादन, भारताचेही घेतले नाव

https://www.loksatta.com/desh-videsh/rohingyas-cause-serious-effect-on-…

रोहिंग्यांचा प्रश्न आमच्यासाठी मोठे आव्हान आणि ओझे आहे. भारत देश मोठा आहे. भारतामध्ये रोहिंग्यांना सामावून घेतले जाऊ शकते. मात्र तेथे रोहिंग्यांची संख्या कमी आहे.

--------

रोहिंग्यांचे ओझे, भारत सरकारने अजिबात घेऊ नये... हे माझे वैयक्तिक मत आहे ...

श्रीगुरुजी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला मोठा दिलासा दिला असून, ठाकरेंना धक्का दिला आहे. आज दिवसभर पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला. यामुळे पक्षचिन्हासंबंधी खरी शिवसेना कोणाची हे निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आत्तापर्यंत ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई निवडणूक आयोगासमोर पोहोचली आहे.

शिंदे गटाकडे बहुसंख्य आमदार व खासदार असल्याने शिंदे गटालाच शिवसेना हे पक्षनाम व धनुष्यबाण हे चिन्ह मिळण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटाला पक्षासाठी नवीन चिन्ह व शिवसेना (बाळासाहेब गट) असे काहीतरी नवीन नाव घ्यावे लागण्याची बरीच शक्यता आहे.

डँबिस००७

चिन प्रेमियर शी जिन पिंग गेले १० दिवसांपासुन बेपत्ता आहेत. त्यांच्या बद्दल चिन सरकार तसेच चिन मधली मिडीया चकार शब्द काढायला तयार नाही,
अश्या परीस्थितीत अफवांचे पेव फुटलेले आहे.
१.चिन प्रेमियर शी जिन पिंग ची हत्या झालेली असुन चिन मध्ये सत्ता पालट झालेला आहे
२. शी जिन पिंग यांचे अपहरण झालेले आहे
अश्या वेगवेगळ्या अफवा बाजारात पसरलेल्या आहेत. त्याच्यावर कोणतेही स्पष्टीकररण न आल्याने वा दस्तुरखूद्द शी जिन पिंग मिडीया समोर न आल्यामूळे अफवांना अंत उरलेला नाही.
या पूर्वीच चिन सरकारच्या प्रवक्त्याने चिन प्रेमियर शी जिन पिंग यांना मेंदुतील रक्त वाहीन्या बारीक होण्याची व्याधी जडलेली आहे असे जाहीर केलेले आहे.
बेपत्ता होऊन १० दिवस उलटलेले आहेत म्हणजे कॉरेंटाईन चा काळही संपलेला आहे, अजुनही
आता लोकांचे डोळे 1October वर लागलेले आहेत कारण त्या दिवशी
चिन नॅशनल डे साजरा केला जातो. त्या दिवशी चिन प्रेमियर शी जिन पिंग यांना जनते समोर यावेच लागणार आहे, कारण नॅशनल डे चे कार्यक्रम चिन प्रेमियर शी जिन पिंग शिवाय साजरे होउच शकत नाहीत.
https://youtu.be/hWecXPrCfkY
https://youtu.be/bUy7hUeRA7M
https://youtu.be/SCwc7Pgi0uI

डँबिस००७

चिन प्रेमियर शी जिन पिंग गेले १० दिवसांपासुन बेपत्ता आहेत. त्यांच्या बद्दल चिन सरकार तसेच चिन मधली मिडीया चकार शब्द काढायला तयार नाही,
अश्या परीस्थितीत अफवांचे पेव फुटलेले आहे.
१.चिन प्रेमियर शी जिन पिंग ची हत्या झालेली असुन चिन मध्ये सत्ता पालट झालेला आहे
२. शी जिन पिंग यांचे अपहरण झालेले आहे
अश्या वेगवेगळ्या अफवा बाजारात पसरलेल्या आहेत. त्याच्यावर कोणतेही स्पष्टीकररण न आल्याने वा दस्तुरखूद्द शी जिन पिंग मिडीया समोर न आल्यामूळे अफवांना अंत उरलेला नाही.
या पूर्वीच चिन सरकारच्या प्रवक्त्याने चिन प्रेमियर शी जिन पिंग यांना मेंदुतील रक्त वाहीन्या बारीक होण्याची व्याधी जडलेली आहे असे जाहीर केलेले आहे.
बेपत्ता होऊन १० दिवस उलटलेले आहेत म्हणजे कॉरेंटाईन चा काळही संपलेला आहे, अजुनही
आता लोकांचे डोळे 1October वर लागलेले आहेत कारण त्या दिवशी
चिन नॅशनल डे साजरा केला जातो. त्या दिवशी चिन प्रेमियर शी जिन पिंग यांना जनते समोर यावेच लागणार आहे, कारण नॅशनल डे चे कार्यक्रम चिन प्रेमियर शी जिन पिंग शिवाय साजरे होउच शकत नाहीत.
https://youtu.be/hWecXPrCfkY
https://youtu.be/bUy7hUeRA7M
https://youtu.be/SCwc7Pgi0uI

कंजूस

चीनबद्दल काहीच सांगत नाहीत.

महत्त्वाची बातमी! ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’विरोधात केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय; पुढील पाच वर्षांसाठी…

https://www.loksatta.com/desh-videsh/central-government-declares-pfi-as…

रिहॅब इंडिया फाऊंडेशन, कॅम्पस फ्रण्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स काऊन्सिल, नॅशनल कॉनफ्रडेशन ऑफ ह्युमन राइट ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन्स फ्रण्ट, ज्युनियर फ्रण्ट, एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन अॅण्ड रिहॅब फाऊंडेशन केरळ या संस्थांवरही पीएफआयबरोबर बेकायदेशीर संस्था म्हणून बंदी घालण्यात आली आहे.

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, नवरात्रीत शेवटचे तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत गरब्याला परवानगी

https://www.loksatta.com/maharashtra/navratri-2022-maharashtra-governme…

अतिशय चुकीचा निर्णय.... ध्वनी प्रदूषण थांबायलाच हवे....

श्रीगुरुजी

गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र . . . अत्यंत कार्यक्षम व कट्टर हिंदुत्ववादी सरकार आहे हे. आता दसरा, कोजागरी, दिवाळी, संकष्टी चतुर्थी, दत्तजयंती, संक्रांत, शिमगा असे बरेच सण शिल्लक आहेत.

मदनबाण

शशिकांत ओक यांच्या ताजमहाल, लालकिल्ला यासंदर्भातील मुगल शैलीच्या पेंटिंगवर भाष्य या धाग्यात मी खालील प्रतिसाद दिला होता :-
जाता जाता :- ध्रुव राठी चा व्हिडियो मी आधीच पाहिला होता, तो एक प्रसिद्ध व्ह्लॉगर / युट्युबर आहे. परंतु माझा व्यक्तिगत मता नुसार त्याला कोणाचे तरी मजबुत फंडिंग असुन माहिती देताना उत्तम दिशाभूल करणे हे त्याचे विशेष कौशल्य आहे. त्याच्या अनेक व्हिडियोज मधले प्रतिसादांचे निरिक्षण केल्यास साधारण एकाच आशयाचे / प्रकारचे प्रतिसाद त्याला दिले जातात हे उघड होते.

माचो ध्रुव राठी :-

अधिकचे संदर्भ :-
दो कौड़ी का NRI यूट्यूबर ध्रुव राठी अब सरकार की रडार पर आ गया है
Exclusive: YouTube ‘insider’ helping Dhruv Rathi? Govt officials left puzzled as Rathi’s video not blocked by YouTube

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः । महामोहा च भवती महादेवी महासुरी ॥६॥

क्लिंटन

इटलीमध्ये Girorgia Melani या नव्या पंतप्रधान सत्तारूढ झाल्या आहेत. त्या टोकाच्या उजव्या समजल्या जातात. त्यांनी सत्तेत आल्यावर नव्या मशिदी बांधायला नियंत्रणे आणायची घोषणा केली आहे. स्विडनमध्येही अलीकडे झालेल्या निवडणुकीत सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाच्या मॅग्डालेना अ‍ॅन्डरसन यांनी बहुमत गमावले आहे.

इटलीच्या नव्या पंतप्रधानांच्या घोषणेविषयीचा व्हिडिओ देत आहे-

युरोपमध्ये अलीकडच्या काळात उदारमतवाद- पोलिटिकली करेक्ट भूमिकेचा अतिरेक झाला होता. फ्रान्स, बेल्जिअम वगैरे देशांमध्ये दहशतवादी हल्ले झाले तरीही युरोपातील देश आपण कसे मानवतावादी हे दाखवून द्यायला सिरीयातील युध्दामुळे त्या भागातील शरणार्थींना आपल्या देशात आश्रय देत आहेत. असे म्हणतात की काम करायला स्वस्तातले मजूर मिळावेत म्हणून युरोपातील देशांनी या शरणार्थींना घरी घेतले. खखोदेजा पण त्यातून त्या देशांची शांतता बिघडली. स्वीडनसारख्या देशात त्यातून दंगली झाल्या. असा उदारमतवादाचा अतिरेक झाला की मग त्याविरोधात प्रतिक्रिया म्हणून टोकाचे उजवे नेते सत्तेत येत आहेत असे दिसते.

इटलीमध्ये तर अशा पोलिटिकली करेक्ट आणि उदारमतवादी धोरणाने अगदी हास्यास्पद पातळी गाठली होती . जानेवारी २०२० मध्ये करोना पसरायला लागल्यावर तो विषाणू चीनमधून आला असल्यामुळे त्या देशांमध्ये चीनी लोकांविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या. तो विषाणू पसरविण्यात काहीही हात नसलेल्या इटलीत राहत असलेल्या चिनी लोकांविरोधात अशा प्रतिक्रिया उमटणे अयोग्य होते हे वेगळे सांगायला नको. पण ती गोष्ट अयोग्य म्हणून त्याच्या उलट्या टोकाची प्रतिक्रिया आली आणि ती मिलानोच्या महापौरांकडून. शहरातील रस्त्यावरील चीनी लोकांना मिठ्या मारा अशी आवाहनवजा विनंती त्यांनी केली. https://news.cgtn.com/news/2020-02-05/People-in-Italy-encourage-China-i… करोना पसरल्यानंतर सुरवातीच्या काळात इटलीमधून भयानक बातम्या येत होत्या. चीनी लोकांना मिठ्या मारणे ही ती परिस्थिती येण्यास कारण ठरली का याविषयी दोन्ही बाजूंचे उलटसुलट दावे आले आहेत. नक्की सांगता येणार नाही पण चिनी लोकांना मिठ्या मारून करोनाविरोधात कसे यश मिळणार होते?

अशाप्रकारच्या वागण्याचा अतिरेक झाला की मग त्याला प्रत्युत्तर म्हणून टोकाचे उजवे सत्तेत आले तर मग आश्चर्य वाटू नये.

कॉमी

चिनी लोकांना मिठी मारा-
चेन ऑफ इव्हेन्ट अशी आहे-

१. चिनी लोकांवर ("चिनी" दिसणाऱ्या म्हणायला हवे) उगाच कोव्हिडचा राग काढणे.
२. मग त्यावर प्रतिक्रिया म्हणून चिनी लोकांना मिठी मारा असे सांगितले गेले. आता हे मिठी मारणे अति आहे हे मान्य आहे, कहस्क्रुन साथीचा रोग असताना.

पण तुम्ही दोन्ही टोकाच्या प्रतिक्रियांना एका तागडीत तोलता हे मला अत्यंत अतार्किक वाटते. एक प्रतिक्रिया वंशद्वेषीक व लोकांना खूप त्रास देऊ शकणारी आहे. दुसरी घटना, हि पहिल्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून प्रेमाचा संदेश देत आहे. त्या प्रतिक्रियेतल्या भावना सुरेख आहेत आणि कबूल व्हाव्यात अश्याच आहेत. एक बाजू वंशद्वेष रुजवणारी आहे आणि दुसरी बाजू वंशद्वेष होऊ नये म्हणून किंचित 'ओव्हर' जाणारी आहे. दोन्ही बाजू वेगवेगळ्या पातळींवर (cringe/annoying ते अत्यंत चूक व समाजास घातक) वाईट आहेत.

बाकी, इटलीत कोव्हिड खूप पसरला ह्यात मिठ्या मारण्याने काही हजारभर लोक आजारी पडले इथपर्यंत समजता येते. खुद्द बोल्सनारो कोव्हिडला गंभीर आजार समजत नव्हते, कोव्हिडला हल्ल्यात घेणारी वक्तव्ये सातत्याने करत होते, आणि माझ्या माहितीप्रमाणे ते लसींच्या विरोधात आहेत आणि त्यांनी लस घेतली नव्हती.

पोलिटीकली करेक्ट वागणे, हे अवकाशातून येत नाही, तर द्वेषपूर्ण वागण्याचे प्रत्युत्तर म्हणून येते, हे तुमच्या उदाहरणातून दिसले. एक टोकाची बाजू द्वेषपूर्ण आहे, आणि दुसरी "टोकाची बाजू" इतर प्रकारच्या लोकांच्या स्वीकृतीसाठी काही वेळेस अतिरेकी वाटतील असे प्रयत्न करते. ह्या दोन्ही बाजू एकसारख्या वाईट आजिबात नाहीत असे मला वाटते.

सुबोध खरे

एक बाजू वंशद्वेष रुजवणारी आहे आणि दुसरी बाजू वंशद्वेष होऊ नये म्हणून किंचित 'ओव्हर' जाणारी आहे.

हा आपला प्रतिसाद एकीकडे झुकणारा (biased) आहे हे स्पष्ट होते आहे.

कॉमी

चायनीज लोकांना मिठ्या मारा हे किंचितच ओव्हर जाणारे आहे. चायनीज लोकांना त्रास देणे हे कितीतरी जास्त वाईट आहे.

सुबोध खरे

क्लिंटन यांनी

इटलीमध्ये तर अशा पोलिटिकली करेक्ट आणि उदारमतवादी धोरणाने अगदी हास्यास्पद पातळी गाठली होती हे लिहिलेलें आहे त्याचे एक उदाहरण म्हणून "चिनी लोकाना मिठ्या मारा" हे दिला होतं.

तेवढं एकच कारण नाही.

मुस्लिम शरणार्थी लोकांना थारा देणं, बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह (BRI) मध्ये सहभागी होऊन चीनशी जवळीक साधणे हे युरोपीय संघराज्यात किंवा अमेरिकेत कुणालाच न आवडणारी गोष्ट इटलीतील वाममार्गी लोकांच्या सरकारने केलं होतं

आपण सोयीस्कर रित्या त्यातील फक्त "चिनी लोकाना मिठ्या मारा" हे घेऊन त्याला प्रतिसाद दिला आहे म्हणून आपला प्रतिसाद एकांगी आणि पूर्वग्रह दूषित आहे हे स्पष्ट आहे.

कॉमी

जे उदाहरण दिले त्यावरच टिप्पणी करणार कि मी..
बाकी, मुस्लिम शरणार्थी लोकांना मदत देणे सुद्धा कौतुकास्पद आणि चांगलेच आहे.
चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये सहभागी होण्याची आणि उदारमतवादाचा संबंध कसा जरा स्पष्ट कराल काय ? मला खरेच ह्याबद्दल फारशी माहिती नसल्याने मी बोलणे इष्ट नाही.

PFI चे पाकिस्तान कनेक्शन उघड; महाराष्ट्रातून समोर आली धक्कादायक अपडेट

https://www.tv9marathi.com/crime/pakistan-connection-of-pfi-exposed-big…

पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरातून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

तालिबान्यांनी तुरुंगात डांबून कापले केस, शीख तरुणाने मांडली व्यथा, पाहा PHOTOS

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट अस्तित्वात आल्यापासून देशातील अल्पसंख्यांकाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

कपिलमुनी

इतक्या दूर दूर लक्ष देत आहात तर अंकिता भंडारी ह्या हिंदू तरुणीचा खून प्रकरण पन वाचून घ्या ..

कि भाजप मधले आरोपी असतील तर काय लिहावे ते सुचत नाही ?