राजकारण
ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग २)
Primary tabs
आधीच्या भागात दोनशेहून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे (वाट पाहून) हा भाग काढत आहे.
नवीन प्रतिसाद ह्या भागात द्यावेत, जुन्या प्रतिसादांना प्रति-प्रतिसाद द्यायचे असतील तर पहिल्या धाग्यावर द्यावेत.
---
आधी मद्य विक्रीत, मग बससेवेत आणि आता शौचालय बांधकामात घोटाळा!
- केजरीवाल सरकारवर काँग्रेसचा आरोप
एका वृत्तवाहिनीचे संबंधित ट्विट:
दिल्ली कांग्रेस ने मनीष सिसोदिया पर लगाया टॉयलेट घोटाले का आरोप◆ कांग्रेस नेताओं ने LG वी के सक्सेना को सौंपा ज्ञापन ◆ पब्लिक टॉयलेट में कांट्रैक्ट की जांच की मांग की pic.twitter.com/srb1VPnKSP— News24 (@news24tvchannel) September 21, 2022
पटले. फडणवीस हा व्यक्ति भाजपचे प्रचंड नूकसान करत आहे. खरं तर भाजप शिवसेना युती फिसकटली ती फक्त ह्या व्यक्तीच्या ईगोमूळे. अनेक भाजपचे मतदार नाराज आहे फडणवीसवर. एकतर शिवसेनेसोबत यपती करायला नको होती, केलीच तर बंडखोर ऊभे करायला नको होते, सेनेला एक वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं असतं तरी सेना तयार झाली असती. पण पाच वर्षांच्या हट्टापायी स्वतः चे अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपदही घालवून घातले. १०५ घरी बसवले म्हणून संजय राऊतांच्या नावाने गळे काढनारे फडणवीस ह्या व्यक्तिस मात्र दोष देत नाहीत. खडसे बावनकूळे, तालडे, मूंडे ह्यांना थोडा स्पेस दिला असता तर ह्या लोकानी स्वतः सोबत आणखी १५ आमदार तरी जिंकवले असते. १०५ अधीक १५ १२० आमदार झाले असते भाजपचे. पण विनाशकाले विपरीत बूध्दे…..
पण विनाशकाले विपरीत बूध्दे…..
पण भाजपाचा असा विनाश झाला तर मनातून तुम्हाला आनंदच होत असेल ना ?
भाजपला महाराष्ट्रात किमान पुढील २ विधानसभा निवडणुकीत अजिबात संधी नाही. स्वबळावर १२२ जागा जिंकणाऱ्या भाजपला आता १ आमदार असलेल्याचे अनाहूत सल्ले ऐकावे लागत आहेत यापेक्षा दुर्दैव ते काय. अनेक नेत्यांनी अनेक वर्षे परीश्रम करून स्वबळावर बहुमताच्या जवळ आणलेला पक्ष फक्त एका व्यक्तीच्या सत्तेच्या वखवखीमुळे घसरणीला लागला आहे आणि अत्यंत भ्रष्ट, जातीयवादी, गुन्हेगार असलेल्यांना जवळ करून डोक्यावर घेत आहे, हे माझ्यासाठी अतिशय दु:खदायक आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेऊन स्वत:ची छी थू करून घेऊन नाक कापून घेतले, ते सहज टाळता येण्यासारखे होते. एकतर निवडणुकीत उमेदवार द्यायलाच नको होता. दिला तर शेवटपर्यंत लढायचे होते. पण उमेदवार दिला, पक्षकार्यालय उघडले, जोरदार प्रचार सुरू केला, अर्ज भरताना दणक्यात मोठी मिरवणूक काढली आणि कोणीतरी पत्र लिहिले म्हणून अचानक माघार घेऊन पळ काढला. त्या उमेदवाराला, कार्यकर्त्यांना, समर्थकांना तोंडावर आपटवून संस्कृती वगैरे गप्पा ठोकायला हे मोकळे आणि हा जोरदार मास्टर स्ट्रोक म्हणून माघारीचे समर्थन करायला फडणवीस भक्त व समर्थक पत्रकारही मोकळे.
आणि कोणीतरी पत्र लिहिले म्हणून अचानक माघार घेऊन पळ काढला.राज ठाकरेंची मुंबई पालिका निवडणूकीत मेहेरबानी व्हावी म्हणून भाजपने त्यांच्या पत्रानंतर लगेच ऊमेदवार मागे घेतला असावा का? “ठाकरे” ब्रॅंड किती गरजेचाय भाजपला?
जोपर्यंत फडणवीस सारखे नेते राज्यात आहेत तोपर्यंत भाजपचा विनाशच व्हावा असेच वाटते. कोरोना काळात केलेले गलिच्छ राजकारण, सुशांतसींग प्रकरणात मुंबई पोलिसांची केलेली बदनामी, साधू हत्याकांडावरून घातलेला तमाशा, वेंदाता प्रकल्प गुजरातला हलवणे हे पाहीलं की भाजपचा कट्टर समर्थक असनारे आमच्यासारखे लोक भाजपचा सत्यानाश व्हावा ह्या मतापर्यंत आलोय.
"किती पाऊस पडला पाहिजे हे ठरविणे हे महापालिकेच्या हातात नाही" हे विधान आणि "धरणात पाणी नाही तर मग आम्ही मु**चे का?" ही दोन्ही विधाने एकसारख्या पध्दतीने असंस्कृत आणि बेमुर्वतखोर पणा दाखवणारी आहेत.