राजकारण

ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग २)

Primary tabs

आधीच्या भागात दोनशेहून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे (वाट पाहून) हा भाग काढत आहे.

नवीन प्रतिसाद ह्या भागात द्यावेत, जुन्या प्रतिसादांना प्रति-प्रतिसाद द्यायचे असतील तर पहिल्या धाग्यावर द्यावेत.

---

आधी मद्य विक्रीत, मग बससेवेत आणि आता शौचालय बांधकामात घोटाळा!

- केजरीवाल सरकारवर काँग्रेसचा आरोप

ऑपइंडियाची बातमी

एका वृत्तवाहिनीचे संबंधित ट्विट:

दिल्ली कांग्रेस ने मनीष सिसोदिया पर लगाया टॉयलेट घोटाले का आरोप◆ कांग्रेस नेताओं ने LG वी के सक्सेना को सौंपा ज्ञापन ◆ पब्लिक टॉयलेट में कांट्रैक्ट की जांच की मांग की pic.twitter.com/srb1VPnKSP— News24 (@news24tvchannel) September 21, 2022

“नायजेरियातून मोदींनी आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला”; नाना पटोलेंचा अजब दावा

https://www.loksatta.com/maharashtra/lampi-virus-spread-after-modi-gove…

------

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहे. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले,” असे नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

शाम भागवत

गुरूजींच्या मताला पॉलपॉट यांचा दुजोरा!!!
जबरदस्त ध्रुविकरण!!!
;)

श्रीगुरुजी

हा सदस्य कोण हे तात्काळ समजल्याने कोणताही प्रतिसाद वाचला नाही आणि वाचणारही नाही.

श्रीगुरुजी

शिवाजी पार्क मैदान प्रकरणापाठोपाठ ऋतुजा लटके प्रकरणातही शिंफ सरकार तोंडावर आपटले. यातून
ऋतुजा लटकेंनाच सहानुभूती मिळाली आहे. नशीबाने पावणेतीन वर्षांनंतर सत्ता मिळाल्यावर काही भरीव काम करण्याऐवजी फालतू गोष्टींवरच भर दिला की असंच वारंवार आपटावं लागणार. आपल्या पहिल्या ५ वर्षात बहुतेक वेळ कारस्थाने करून पक्षांतर्गत विरोधक संपवून सत्ता घालविल्यानंतर आतासुद्धा काम न करता अत्यंत फालतू गोष्टींवरून कारस्थाने सुरू आहेत. ठाकरे सरकार पावणेतीन वर्षे फक्त विरोधकांना व टीकाकारांंच्ये मागे लागले होते व वारंवार
न्यायालयाकडून थपडा खात होते. शिंफ सरकार फक्त सेनेच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यात धन्यता मानत आहे व त्यामुळे न्यायालयाकडून थपडा खात आहे. हे सरकार खड्ड्यात जाण्याच्या दृष्टीने वेगात मार्गक्रमणा करीत आहे.

mayu4u

कुठे आहे?

mayu4u

कुठे आहे?

पॉल पॉट

आज वाचलेला एक कायप्पा फोरवर्ड
"एका विधवेवर चालून आलात? पराजित झालात तर अब्रु जाईल", अहिल्यादेवी होळकर..
...मग राघू पेशवे माघारी फिरले.:)

सुबोध खरे

एका विधवेच्या विरोधात जाऊन अख्खा पक्ष कुणी काढला याचा फॉरवर्ड पण आला नाही वाटतं?

लटके वहिनी जर शिंदे गटात असत्या आणि निवडणूक लढवत असत्या तर गद्दार महाराष्ट्रद्रोही अशी शेलकी विशेषणे लावून म वि आ चा उमेदवार उभा केला असता आणि प्रचाराचा शिमगा केला असता.

कमाईग अशाच कोणत्यातरी निवडणुकीत एका विधवेच्या विरुद्ध आपला उमेदवार उभा करून श्री शरद पवार यांनी जंग जंग पछाडून त्यांना पराभूत केले होते. नाव आठवले कि सांगतो

तेंव्हा इतिहासातील दाखले सोडून द्या

पॉल पॉट

आधी झालेल्या तीन पोटनिवडणूकांत ऊमेदवार ऊभा केला भाजपने तेव्हा संस्कृती नाही आठवली. आता शिवसेनेची ताकद पाहून मैदानातून पळ काढला. सोयीने हिंदूत्व आठवतं भाजपेयींना तसं सोयीने संस्कृती आठवली. बाकी त्या बाईच्या ऊमेदवारीत काड्या करन्यात आल्या. राजिनामा स्विकारला गेला नाही तेव्हा मात्र संस्कृती कुठे माती खायली गेली होती??
राज ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन पळ काढला. अनेक प्रलोभने देऊनही श्रीमती लटके भाजप किंवा शिंदे गटात गेल्या नाहीत न्हणून पळ काढावा लागला भाजपला.

सुबोध खरे

एका विधवेच्या विरोधात जाऊन अख्खा पक्ष कुणी काढला याचा फॉरवर्ड पण आला नाही वाटतं?

लटके वहिनी जर शिंदे गटात असत्या आणि निवडणूक लढवत असत्या तर गद्दार महाराष्ट्रद्रोही अशी शेलकी विशेषणे लावून म वि आ चा उमेदवार उभा केला असता आणि प्रचाराचा शिमगा केला असता.

कमाईग अशाच कोणत्यातरी निवडणुकीत एका विधवेच्या विरुद्ध आपला उमेदवार उभा करून श्री शरद पवार यांनी जंग जंग पछाडून त्यांना पराभूत केले होते. नाव आठवले कि सांगतो

तेंव्हा इतिहासातील दाखले सोडून द्या

कधी कधी, माघार घेण्यात शहाणपणा असतो आणि हा शहाणपणा माननीय शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी देखील दाखवला आहेच की ...

अंधेरी निवडणूक ही एक लिटमस टेस्ट म्हणून कॉंग्रेसला द्यायला नको होती आणि तेच भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाने केले.

भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाने, मुंबई महानगर पालिका, हेच सध्या पुरते ध्येय ठेवले आहे.

मुरजी पटेल यांच्या निष्ठेची लिटमस टेस्ट करून झाली, ही एक बाजू आणि निवडणूकीत कुठल्या वाॅर्डातून किती मते लटके ताईंना मिळतात? ही दुसरी बाजू झाली.

तिसरी महत्वाची बाजू म्हणजे, भाजपचे निर्णय, केंद्रीय पातळीवर घेतले जातात, हे परत एकदा योग्य त्या व्यक्तींपाशी पोहचवले गेले, मग त्या व्यक्ती अंतर्गत असोत किंवा बाहेरील.

चौथी महत्वाची बाजू म्हणजे, शिंदे गटाला, तयारी साठी पुरेसा वेळ आणि मतदारांच्या कलाचा अंदाज यायला हवा...

वजीराला वाचवायला प्यादीच बळी जातात.तसेच, एका जागेने भाजपचे आणि त्यांच्या मित्र पक्षाचे, काहीच नुकसान झाले नाही.

अर्थात, काहीही झाले तरी, माननीय उद्धव ठाकरे गटाला आता कॉंग्रेसचेच बोट पकडून चालणे भाग पडणार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मजा बघत बसणार...

बाय द वे, एक सुंदर सिनेमा आठवला

The man from Nowhere.

जरूर बघा ....

पॉल पॉट

कधी कधी, माघार घेण्यात शहाणपणा असतो माघार घेणे नी पळपूटेपणा करणे ह्यात फरक असतो. माघार निवडणूक जाहीर झाल्याबरोबर घेता येते. आन वेळी केला जातो तो पळपुटेपणा.

अर्थात, काहीही झाले तरी, माननीय उद्धव ठाकरे गटाला आता कॉंग्रेसचेच बोट पकडून चालणे भाग पडणार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मजा बघत बसणार... सेना आणी शिंदे गटात फरक आहे.

कपिलमुनी

अशीही लाल ! तशीही लाल ..
जिंकलो तरी लाल ... हरलो तरी लाल..

पुढून लाल , मागून लाल ..

लाल लाल लाले लाल !

परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष यांची अशीच परिस्थिति आहे...

कपिलमुनी

अशीही लाल ! तशीही लाल ..
जिंकलो तरी लाल ... हरलो तरी लाल..

पुढून लाल , मागून लाल ..

लाल लाल लाले लाल !

गांधी कॉंग्रेस, पवार कॉंग्रेस, ममता कॉंग्रेस इत्यादी एका माणसाच्या हातातील पक्ष, लगेच निर्णय घेऊ शकतात.

पण, समितीला निर्णय घ्यायला वेळ लागतो ....

हा मुलभूत फरकच, काही लोकांना पटत नाही....

एखाद दोन माणसांच्या हाती पक्ष गेला की काय होते? हे बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या निर्मितीने दाखवले आहेच की, आणि गेला बाजार काश्मीरचा प्रश्र्न युनोत नेऊन, हे सिद्ध पण केले आहेच....

वरील चर्चा ही , सुबोध खरे यांच्या बरोबर करत आहे. नसता चोंबडेपणा करायला येऊ नये ....

सुबोध खरे

गांधी नेहरू आडनाव सोडले तर काँग्रेस, ममता शिवाय तृणमूल, ठाकरे आडनावाशिवाय शिवसेना किंवा पवार कुलोत्पन्न सोडून राष्ट्रवादी पक्ष

हा त्या त्या त्या पक्षाच्या कार्यकारिणीला मान्य होतोय का?

१९९८ पासून श्रीमती सोनिया गांधीच काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत मधली २ वर्षे (२०१७-१९) राहुल गांधींचा "प्रयोग" सोडला तर.

अटल बिहारी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण जे पी नड्डा, वेंकय्या नायडू, राजनाथ सिंह, अमित शाह या पैकी एकाचे ही दुसर्याशी जवळचे किंवा लांबचे नाते नव्हते/ नाही. आणि यापैकी एकाचेही सुपुत्र किंवा सुकन्या नजीकच्या भविष्यकाळात पक्षाचे नेतृत्व करण्याची शक्यता नाही.

बाकी गुलामी ची वृत्ती रक्तातच मुरली असली कि गुलामीचे फायदे आणि स्वातंत्र्याचे तोटेच जास्त दिसत राहतात आणि त्याला साधा उपाय नाही

पॉल पॉट

संघात हा अशीच परिस्थीती आहे. ब्राम्हण जातीशिवाय इतर जातीचा सरसंघचालक केला जात नाही. बाकी शिवसेना राष्ट्रवादी हे पक्ष अनूक्रमे बाळासाहेब नी पवारांनी राबून वाढवलेत ते इतर कोणाला का द्यावेत?? भाजप हा खिचडी नेत्यांची पक्ष आहे. एकमेकांचे काटे काढत लोक वर जातात भाजपात. मोदी विरूध्द संजय जोशी, मोदी विरूध्द अडवाणी, फडणवीस विरूध्द मूंडे, तावडे, पंकजाताई, बावनकूळे. अमीत शहा विरूध्द फडणवीस असं पक्षांतर्गत खूनशी राजकारण भाजपातच पहायला मिळते.

सुबोध खरे

भुजबळ नव्या अवतारात आलेले दिसत आहेत.

तोच द्वेष

तोच भंपक युक्तिवाद

तोच मुद्दा भरकटवणे

राजकीय पक्षाच्या अध्यक्षांबद्दल चर्चा असताना नको तरी नाक खुपसणे

पॉल पॉट

कोण भूजबळ? काय भंपक युक्तिवाद? काय मूद्दा भरकटवला? बहुतेक संघाचे सर्व अध्यक्ष ब्राम्हण का? ह्या कळीच्या प्रश्नावरून काढता पाय घ्यायचा हा फोल प्रयत्न असावा का?

सुबोध खरे

वरील चर्चा ही , सुबोध खरे यांच्या बरोबर करत आहे. नसता चोंबडेपणा करायला येऊ नये ....

कपिलमुनी

खासगी चर्चा करायची असेल तर व्यनी खेळावे..

सार्वजनिक पटलावर आला की चर्चा ही सार्वजनिक होणारच...

परा च्या भाषेत खिडकीत बसलात की लोक शुक शुक् करणारच

सुबोध खरे

खिडकीत बसलात की लोक शुक शुक् करणारच

तुम्ही कशाला खिडकीत तोंड घालताय?

कपिलमुनी

लोक खालून शिट्टी मारणार, बोलणार , त्याला खिडकीत बसणारे काही करू शकत नाहीत!

सुबोध खरे

ब्राम्हण जातीशिवाय इतर जातीचा सरसंघचालक केला जात नाही

केवळ जातीवर आधारित असा द्वेषमूलक प्रश्न होता म्हणून मी पास दिला होता

असो

प्रा. राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैय्या हे १९९४ ते २०० पर्यंत सरसंघचालक होते ते जनेयुधारी ब्राम्हण होते काय हो?

नाही म्हणजे

आजकाल पारशी/ मुसलमान आजोबांची नातवंडे स्वतः;ला जनेयुधारी ब्राम्हण म्हणवून घेताना दिसतात म्हणून विचारले

कॉमी

पारशी/मुसलमान आजोबा ?

शहाणी सुरती माणसे सुद्धा व्हाट्स ऍप युनिव्हर्सिटी स्नातक असतात असे दिसते.

कॉमी

पारशी/मुसलमान आजोबा ?

शहाणी सुरती माणसे सुद्धा व्हाट्स ऍप युनिव्हर्सिटी स्नातक असतात असे दिसते.

कॉमी

पारशी होते हे जगजाहीर आहे. /मुसलमान हे टिपिकल व्हाट्सअप मेंदूचे लक्षण आहे.

mayu4u

आणि तरीही तुम्ही त्याचा उल्लेख केलात, हे कस्ले लक्षण असावे बरे?

श्रीगुरुजी

पारशी/मुसलमान असंच डॉ. खरेंनी लिहिलंय जे बरोबर आहे.

कॉमी

बुद्धी बंद केली, डोळे बंद केले की सगळे कसे छानच आहे असे दिसते किंवा तसे नाटक करता येते, स्त्री/पुरुष श्रीगुरुजी.

(अपमानित होण्याची गरज नसावी, होय ना ?)

आग्या१९९०

फिरोझ गांधीच्या अस्थी पारसी दफनभूमीत का पुरल्या?

श्रीगुरुजी

बुद्धी बंद केली, डोळे बंद केले की सगळे कसे छानच आहे असे दिसते किंवा तसे नाटक करता येते, स्त्री/पुरुष श्रीगुरुजी. (अपमानित होण्याची गरज नसावी, होय ना ?)

बुद्धी बंद केली, डोळे बंद केले की कटू वाटणाऱ्या सत्य गोष्टींना नाकारावं लागतं ना, स्त्री/पुरुष/अजून काही तरी कॉमी.

(शरम वाटण्याची गरज नसावी, होय ना ?)

कॉमी

एकूण क्ष/य असे लिहिण्यात खोडसाळपणा असतो हे तुम्ही मान्य केलेले दिसतेय. :)

कॉमी

ख्या ख्या ख्या.
गांधी परिवाराबद्दल ते मुसलमान असण्याची ढुसकी व्हाट्सअप वर फिरत असते हे माहीत असून खरेंनी पारशी/मुसलमान असे लिहिले आहे. आता तुम्हाला डोळे झाकायचे असले तर घ्या झाकून.

श्रीगुरुजी

दुसरी शक्यता सुद्धा पूर्णपणे मान्य/अमान्य करता येईलच असे नाही. याविषयी मी लिहीन कधीतरी.

सुबोध खरे

@कॉमी

प्रा. राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैय्या हे १९९४ ते २०० पर्यंत सरसंघचालक होते ते जनेयुधारी ब्राम्हण होते काय हो?

हा मूळ द्वेषमूलक प्रश्न होता.

त्यातून पारशी लोकांत गांधी हे आडनाव नसतं. ते घांडी असतं.

धड एक आडनाव नाही.

मतांसाठी जनेयुधारी ब्राम्हण म्हणवून घ्यायचं

स्वतः XX खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं

सुबोध खरे

@कॉमी

प्रा. राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैय्या हे १९९४ ते २०० पर्यंत सरसंघचालक होते ते जनेयुधारी ब्राम्हण होते काय हो?

हा मूळ द्वेषमूलक प्रश्न होता.

त्यातून पारशी लोकांत गांधी हे आडनाव नसतं. ते घांडी असतं.

धड एक आडनाव नाही.

मतांसाठी जनेयुधारी ब्राम्हण म्हणवून घ्यायचं

स्वतः XX खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं

सुबोध खरे

हे द्वेषमूलक प्रश्नाचे उत्तर होते. त्यावर तुम्ही उगाच इमले रचले.

सुबोध खरे

१९७० मध्ये कॉम्रेड कृष्णा देसाई कम्युनिस्ट पक्षाच्या आमदाराचा खून झाला . या खुनाचे आरोपी शिवसेनेचे सदस्य होते आणि या खुनात श्री बाळ ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप केला होता.

या नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत परळ मतदार संघात कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजिनी देसाई या उभ्या राहिल्या असताना त्यांच्या विरुद्ध झंझावाती प्रचार करत श्री बाळ ठाकरे यांनी १५ सभा घेतल्या आणि आपल्या उमेदवार श्री वामनराव महाडिक यांनी विजयी केले होते.

तेंव्हा बिचारी विधवा सारखे कोणी अरण्यरुदन केल्याचे आठवत नाही.

https://www.loksatta.com/mumbai/know-all-about-history-of-shivsena-firs…

https://en.wikipedia.org/wiki/Krishna_Desai

पॉल पॉट

शिवसेनेने ऊमेदवार देऊ नका असं कधीही सांगीतलं नाही. पराभव दिसू लागल्याने भाजपने पळ काढलाय मैदानातून.
स्वयंसेवकांनो, आजचा धडा काय?? पराभवापेक्षा पळ बरा.

श्रीगुरुजी

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत फडणवीस व रामदास कदम यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. आम्ही वाघाच्या तोंडात हात घालून वाघाचे दात मोजतो असे फडणवीस बोलल्यानंतर रामदास कदमांनी काहीतरी झोंबणारे उत्तर दिले होते. यावर तुमचा पगार किती ... बोलता किती असे फडणवीस बोलले होते. त्यावर उत्तर देताना कदम म्हटले होते की मी विरोधी पक्षनेता असताना तुम्ही माझ्या हाताखाली काम करायचा. पण कल्याण-डोंबिवली महापालिका निकालानंतर सेनेला पाठिंबा देऊन शेपूट घालून फडणवीसांनी समर्थकांना व मतदारांना तोंडावर पाडलं.

संभाजीनगर महापालिका निवडणूक निकालानंतर याचीच पुनरावृत्ती झाली.

नंतर मुंबई महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा एकदा सेनेला पाठिंबा देऊन शेपूट घालून समर्थकांना व मतदारांना तोंडावर पाडलं.

आता अंधेरी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा तेच.

फडणवीसचे कट्टर समर्थक आता तोंड फुटून घ्यायला सरावले असतील. हा मास्टर स्ट्रोक आहे असे पडेल चेहऱ्याने सांगत राहतील. भविष्यात अजून अनेकदा तोंडावर आपटायची तयारी ठेवा.

कार्यकर्त्यांना उचकवायचं, राणा भीमदेवी थाटात घोषणा करायच्या, कार्यकर्त्यांना लढायची पूर्ण तयारी करायला सांगायचं, मोठमोठ्या मिरवणुका काढायच्या आणि कार्यकर्ते चिलखत, ढाल, तलवार घेऊन रणांगणात उतरले की सपशेल माघार घेऊन त्यांना तोंडघशी पाडायचं हे यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

पण आता यामुळे भाजपमध्ये फडणवीस विरोधात उघड उघड आवाज उमटू लागतील. हा माणूस अजिबात भरवसा ठेवण्याच्या लायकीचा नाही व हा आपल्याला कधीही तोंडघशी पाडू शकतो हे आता भाजपेयींना समजायला प्रारंभ होईल.

भाजपने स्वत:चं नाक कापून घेतलंय. १५-२० हजाराच्या मिरवणुकीने अर्ज भरायला गेले, ऋतुजा लटकेंना अर्ज भरता येऊ नये यासाठी लांड्यालबाड्या केल्या, राजीनामा लटकवत ठेवला, आदल्या दिवशी तक्रार दाखल केली आणि अर्ज मागे घेण्यास जेमतेम २ तास शिल्लक असताना माघार घेतली. त्यासाठी संस्कृती वगैरे जो तात्विक मुलामा चढवलाय त्यावर तान्हे मूल सुद्धा विश्वास ठेवणार नाही. काहीतरी सौदेबाजी नक्कीच झाली आहे. मुरजी पटेलला बिचाऱ्याला मिरवणुकीचा खर्च सोसावा लागला. फडणवीस सहकाऱ्यांना असेच तोंडघशी पाडणार.

आता राज ठाकरेच भाजपचे निर्णय घेणार, पराभवाच्या भीतिने भाजप पळाला असे टोमणे सुरू झालेत. मुळात राज या नगण्य माणसाच्या पत्राची दखल घ्यायचं कारणंच काय होतं?

याची अजून एक बाजू म्हणजे मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक अविरोध पार पडावी यासाठी शेलार व पवारांनी संगनमत करून अंधेरीतून भाजपने अर्ज मागे घेतला म्हणे. पण पवार व शेलार यांच्या साटेलोट्यात सेनेला फायदा कशाला द्यायचा?

यामागे अजून एक तिसरी थिअरी आहे.

ही पोटनिवडणूक भाजपने जिंकली असती तर आशिष शेलारांचं महत्त्व वाढेल व त्यातून आपल्याला अजून एक प्रतिस्पर्धी निर्माण होईल असे फडणवीसांना वाटले. शेलार मुख्यमंत्री होत असतील तर आम्ही पाठिंबा देऊ असे पवारांनी मोदी-शहांना सांगितल्याची बातमी काही काळापूर्वी आली होती. त्यामुळेच फडणवीसांनी या जागेवरून मुरजी पटेलांना माघार घ्यायला लावली जेणेकरून शेलारांचं महत्त्व वाढू नये.

२०१७ मध्ये आशिष शेलारांनी मुंबई महापालिकेत ८२ नगरसेवक निवडून आणले. तेव्हा राष्ट्रवादी, मनसे असे पक्ष फोडून मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आणणे सहज शक्य होते. पण त्यामुळे आशिष शेलारांचं महत्त्व वाढून आपल्याला एक प्रतिस्पर्धी निर्माण होईल, या समजूतीतून फडणवीसांनी तेव्हाही मुंबई महापालिका सेनेला देऊन टाकली.

एकनाथ शिंदेंबरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर आशिष शेलारांना मंत्रीमंडळात घेतलेले नाही.

आपल्या पहिल्या ५ वर्षात खडसे, पंकजा मुंडे, तावडे व बावनकुळे या आपल्या तथाकथित प्रतिस्पर्ध्यांना संपविल्यानंतर आता फडणवीस आपले उर्वरीत प्रतिस्पर्धी चंद्रकांत पाटील व शेलारांना संपविण्याच्या प्रयत्नात आहेत. पाटलांचे राज्याध्यक्ष पद काढून घेऊन व अत्यंत दुय्यम खाते देऊन लांबवर फेकले आहे. आता शेलारांना वर येऊ न देण्याचा प्रयत्न आहे.

अर्थात डोळ्यांवर झापड बांधलेल्या फडणवीसांच्या अंधभक्तांना ही माघार हा सुद्धा एक दणदणीत मास्टर स्ट्रोक वाटला असणार. प्रत्येक वेळी तोंडावर आपटून तोंड काळे झाले तरी तो मास्टर स्ट्रोकच असतो.