Skip to main content

शृँगार ९

लेखक अनाहूत यांनी बुधवार, 13/04/2016 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाला बस लागते , कुणाला गाडी लागते पण कोकणात कुणाला बोट लागत असेल अस वाटल नव्हत . असो असेल कोणीतरी माझ्यासारखा बाहेरचा . बाकी कोकणातून परतताना या अथांग सागरातून प्रवास करण्याची कवी कल्पना दूर होऊन मला वास्तवात आणण्याच काम केल होत त्या बोट लागलेल्याने . बाकी पुर्वी लोक घोड्यावरून प्रवास करायचे त्यांच काय ? त्यांनाही .... असो. इतर वेळी आयुष्यात फार काही होत नाही , होत नाही म्हणता म्हणता किती काही घडलय गेल्या काही दिवसांमधे . अथांग समुद्र दूरपर्यंत पाहील तिथपर्यंत अगदी क्षितीजापर्यंत . काय आहे क्षितीज ? फक्त एक आभास.... कधी आकाश आणि समुद्र किंवा आकाश आणि जमीन भेटतात का ?

माझी ज्यूरी ड्यूटी ५

लेखक शेंडेनक्षत्र यांनी बुधवार, 13/04/2016 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ४ अमेरिकेतील कोर्टातील एक विचित्र जुनाट पद्धत म्हणजे जे काही कामकाज होते आहे ते एक लेखनिक अर्थात स्टेनोग्राफर लिहून घेत असतो. त्याला कोर्ट रिपोर्टर म्हणतात. अगदी शॉर्टहॅंड वापरले तरी तासनतास असे लिहिणे दमवणारे असणर. त्यामुळे कोर्टाचे कामकाज एक दीड तासापेक्षा जास्त सलग चालत नसे. जज छोटी का होईना पण सुट्टी देत असे. त्यामुळे ज्युरीचे काम फार दमवत नसे. अशी जुनी पद्धत आज अमेरिकेत का आहे हे एक न उलगडलेले कोडे आहे. सगळ्या कामाचे ध्वनी वा चित्रमुद्रण करणे व ते संग्रह करणे हे सहज शक्य आहे. पण तसे केले जात नाही.

लघुकथा - इच्छापूर्ती

लेखक उल्का यांनी बुधवार, 13/04/2016 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
(कथा लिहायचा पहिलाच प्रयत्न आहे. कुठेतरी वास्तवाशी मिळताजुळता प्रसंग. सहअनुभूतीतून सुचलेली काल्पनिक कथा आणि काल्पनिक पात्रे.) भर दुपारी रस्त्याच्या कडेकडेने इकडे तिकडे बघत, वाटेत येणाऱ्या छोट्या छोट्या दगडांबरोबर फुटबॉल खेळत, हातातल्या काठीने चालता चालता मातीवर रेघोट्या ओढत चालणारा सुम्या (सुमीत) अचानक थबकला. त्याच्यापुढे काही अंतरावर चालणाऱ्या काकांच्या खिशातून रुमाल काढताना पाकीट पडलेले त्याने पाहिले. धावत जाऊन त्याने ते उचलले आणि काकांना हाक मारली. "ओ काका, पाकीट पडलं बघा." काकांच्या डोक्यात कामाची घाई होती. त्यामुळे असेल कदाचित त्यांच्या कानातून मेंदूत हे वाक्य झिरपले नसावे.

(भूक भागत नाही)

लेखक रातराणी यांनी बुधवार, 13/04/2016 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा डोनल्ड आणि मिकीवरून, हटत नाही नजर गूफीच्या गोंधळाचे तर, हासू येते भरपूर मधेच लाईट जाता, येतो अश्रूंचा पुर आजीला देउन हुल , बाळ पळते दूर पण दार असते बंद, बाहेर जाता येत नाही नेमके अशाच वेळी, बाबा घास भरवू पाही ओठांचा होतो चंबू, त्याला उघडावे कसे त्रेधा उडवून सर्वांची, बाळ खुदूखुदु हसे हताश होऊन सारे बसता, आई येते धावून पप्पाकडून घेऊन ताट, बसते माझे खेळ काढून डोनल्ड मिकी गूफी, मला कुणीच लागत नाही टीवी झाला बंद तरी, त्यांची आठवण येत नाही देते हातामध्ये घास, काउचिउला देण्यासाठी मलाही भरवते त्यांच्यासंगे, सांगत परीच्या गोष्टी

पाणी-प (गद्यविडंबन)

लेखक सुधीरन यांनी बुधवार, 13/04/2016 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
(काही दिवसांपूर्वी मी सुभाष अवचटांचं "खिडकी" या नावाचं पुस्तक वाचलं. त्यातिल काही कथा मला आवडल्या.

शब्दांच्या, रानातल्या गप्पा!

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 13/04/2016 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
"दादा, तुमची ही कविता जरा समजून सांगाल का. म्हणजे, हे निसर्गचित्रण आहे का यात काही रूपकात्मक शृंगार दडला आहे जो मला नेमका दिसत नाहीये." आणि मग त्यांनी पुढे जे काही त्या कवितेतल्या चित्रणाबद्दल सांगीतले ते ऐकून/समजून माझ्या लक्षात आले की, आपण अजून कविता बुद्रूकलाही जाऊन पोचलो नाहिये, कविता खुर्द हे गाव तर लांबच! कविता होती, "जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ...." आणि कवि अर्थातच, महाराष्ट्राचे 'शेतकवी', कवि ना. धो. महानोर! रविवार दि. १०/४/२०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अजिंठ्याच्या जवळ पळसखेड्याला त्यांना भेटायचा सुवर्णयोग आला होता. भेटतील का नाही? भेटतील तर कुठे? कसे?

शब्द प्रेम!

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 13/04/2016 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
लेखकाच्या जीवनातले शब्दांचे महत्त्व: शब्द हेच शस्त्र, शब्द हेच अमूचे अस्त्र शब्द हेच युद्ध, शब्द हीच शांती शब्द हीच नीती, शब्द हीच अमुची मिती शब्द हेच कर्म, शब्द हेच फळ शब्द हेच दैवत, शब्द हेच अमुचे वैभव शब्द हीच दृष्टी, शब्द हीच सृष्टी शब्द हेच जग अमुचे, शब्द हेच जीवन अमुचे शब्द हेच अमुचे प्रेम - पहिले आणि शेवटचे!

-स

लेखक सुधीरन यांनी बुधवार, 13/04/2016 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या ओल्या केसांचा गंध करीत नाही मला धुंद- शॅम्पू का बरे लावतेस? तुझे डोळे तसे अगदी गहिरे वगैरे आहेत- लेन्सेस का वापरतेस? तुझ्या ओठांची लाली थोडी कडू बघ लागते- लिपस्टिक कसलं लावतेस? तुझ्या गोब-या गालांना कुस्करणं मला आवडतं- त्यांना क्रीम का फासतेस? कितीदा तुला सांगितले नटू नकोस उगाचच तू- अशीच मला आवडतेस!
काव्यरस

बळी

लेखक विजय पुरोहित यांनी बुधवार, 13/04/2016 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
(अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील अगदी ग्रामीण भाग. एक छोटंसं शहर. सन 2016. गावापासून थोडंसं लांबच असलेलं एक उदासवाणं, काळोखं दिसणारं जुनाट पद्धतीचं घर.) दारावरची बेल वाजते. श्री. स्टीफन्सन जाऊन दार उघडतात. समोर एक हसतमुख, उमद्या व्यक्तिमत्वाचा डिलीव्हरी बॉय उभा आहे. तो त्यांच्या हातात तत्परतेने एक पार्सल देतो. श्री. स्टीफन्सन यांना अपेक्षित वस्तु पोहोचलेली आहे. त्याला पाहून ते मंदस्मित करतात. डिलीव्हरी बॉय पावतीवर त्यांची स्वाक्षरी घेतो आणि लगेच माघारी वळतो. लगोलग श्री. स्टीफन्सन घरात येतात आणि त्या वस्तूला लावलेली वेष्टणे अधीरपणे फाडून टाकतात.