पालक पुऱ्या
सध्या शाळा -कॉलेजला सुट्ट्या लागल्या आहेत. रोज रोज मुलांचा एकच प्रश्न -- आई आज काय बनवणार्.
चला म्हटलं आज पालक पुऱ्या बनवूयात.
आधी पालक पाने एक मिनीट पाण्यात उकळून घेतली.त्याची पेस्ट बनवली. लसूण जिरे ओवा मिक्सर मधून बारीक करून घेतले. थोडी कणिक व थोडेसेच बेसन पीठ,हिंग,हळद,लाल तिखट,चवीनुसार मीठ व चिमुटभर साखर,एक चमचा तेल घातले त्यात पालक पेस्ट घालून पीठ घट्ट मळून घेतले.लगेचच पुऱ्या लाटून तळल्या.व गरम गरम सर्व्ह केल्या.
मिसळपाव