Skip to main content

लहान मुलांचा मित्र "बबल्स" (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक मालविका यांनी सोमवार, 18/04/2016 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
Header लहान मुलांचा मित्र "बबल्स "(वय वर्षे २ते ५ ) माझा मुलगा दोन वर्षाचा झाला तेव्हा आमची भारत वारी झाली . माझ्या तिथल्या एका स्थानिक मैत्रिणीने तिच्याकडील २ पुस्तके मला दिली होती. त्याचे पूर्ण १२ भाग आहेत असे सांगितले होते. तिच्याकडे २ च होते. भारतात मिळतील असेही सांगितले. तेव्हा मी राहत असलेल्या देशात इंग्रजी पुस्तके तुलनेने खूप म्हणजे खूपच कमी मिळत. दुसऱ्याने वापरलेली पुढे पास होत असत.

वाचू आनंदे (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक मितान यांनी सोमवार, 18/04/2016 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
Header मित्रमंडळींच्या घोळक्यात एक दिवस असे लक्षात आले की खूप जण पुस्तकावर प्रेम करणारे आहेत. वाचतात. जमेल तशी पुस्तक खरेदी करतात. खूप जणांना स्वतःची पुस्तकं असावी असे वाटते. पण पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर एकदम खूप सारी पुस्तकं खरेदी करायला मध्यमवर्गीय खिसा नको म्हणायचा. वाचनाची ओढ तर स्वस्थ बसू देत नाही. घरात हवे ते पुस्तक हवे तेव्हा हाताशी असणे हे सूख पण वेगळेच !

पाडस (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 18/04/2016 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
Header पाडस- राम पटवर्धन यांनी मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांच्या द येर्लिंग चा केलेला हा नितांतसुंदर अनुवाद! अत्यंत समर्थ अनुवादांपैकी एक! आपल्याला आवडत्या पुस्तकातला आवडलेला परिच्छेद निवडायचा ठरवल्यावर नक्की कोणते वेचे घ्यायचे आणि किती घ्यायचे हे ठरवता येणं फार कठिण झालं.

ओऱ्हान पामूकचं इस्तंबूल (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक विशाखा पाटील यांनी सोमवार, 18/04/2016 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header एकेकाळी वैभव उपभोगलेल्या, पण आता केवळ त्याच्या खुणा मिरवणाऱ्या एखाद्या गावात जावं. संध्याकाळची कातर वेळ असावी. त्या वातावरणात आपलं मनही नकळत भूतकाळात शिरतं. काळ निसटून चालल्याची हुरहूर मनाला लागते. उदासवाणी छटा आसमंतापासून मनाच्या कोपऱ्याकोपऱ्यापर्यंत व्यापून राहते. मृत्यूचं वाटतं तसं ते भीतीदायक दु:ख नसतं, तर भावव्याकूळ होणं असतं. ती व्याकुळता जीवनाच्या क्षणभंगुरतेसाठी असते.

मुलाखत - श्री. विवेक मेहेत्रे (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक किलमाऊस्की यांनी सोमवार, 18/04/2016 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
Header नमस्कार मंडळी, पुस्तक दिन विशेष लेखमालिकेच्या निमित्ताने आपल्या भेटीला आलेले आहेत प्रसिद्ध हास्यचित्रकार 'श्री. विवेक मेहेत्रे'. व्यंगचित्रकार म्हणून आपण विवेक मेहेत्रे यांना ओळखातोच. अभियांत्रिकी शाखेतून उच्चशिक्षण घेतल्यावर श्री. विवेक मेहेत्रे यांनी लेखन, कविता, व्यंगचित्रे, एकपात्री प्रयोग, संपादक, प्रकाशक, व्याख्याता अशी अनेक क्षेत्रात यशस्वी वाटचाल केलेली आहे.

खुणावणारं खुलं वाचनालय (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक शिल्पा गडमडे यांनी सोमवार, 18/04/2016 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
Header काही दिवसांपूर्वी ऑनलाइन काहीतरी वाचत असताना मला अचानक ‘बालभारतीचे’ पुस्तक गवसले. ते पुस्तक चाळताना मन थेट जाऊन पोहचलं ते शाळेत. बालभारतीचे धडे वाचताना अनेक लेखकांची ओळख झाली, अधिकाधिक वाचायची गोडी निर्माण झाली. या आवडीतून माझी ओळख झाली लायब्ररी म्हणजेच वाचनालयाशी. कितीतरी विषयांवरची हजारो, लाखो पुस्तकं वाचनालयात आपली वाट बघत सज्ज असतात.

स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी

लेखक शरद यांनी सोमवार, 18/04/2016 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी भारतात स्त्रीयांवर अन्याय क्ररण्याची परंपरा अतिप्राचीन काळापासून आहे. सीता व द्रौपदी यांचे उदाहरण सर्वांना माहीत असते. पण त्या पूर्वीही पार वेदकाळातही हे चालूच होते. बृहदारण्यकातली गोष्ट घ्या. गार्गी ही विद्वान ब्रह्मचारिणी. ऋषीमंडळात चालणार्‍या वादविवादात हिरीरीने भाग घेणारी. पण बिचारीवर एकदा दुर्धर प्रसंग ओढवलाच. याज्ञवल्काबरोबरच्या एका चर्चेत ती प्रश्न विचारत होती व याज्ञवल्क उत्तरे देत होता. तीचा शेवटचा प्रश्न होता "ब्रह्म कशात सामावते ?’ शिघ्रकोपी याज्ञवल्काने तिला दरडावले "गार्गी, अतिप्रश्न विचारू नकोस.

मारीचझंपीचे (बंगाली) कम्युनीस्ट ( )मृग ( )

लेखक माहितगार यांनी सोमवार, 18/04/2016 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजाल न्याहाळताना कोणतीशी दडपशाहींची यादी नजरे समोर उगवली, सहसा दडपशाहीच्या कथांमध्ये केवळ पात्रे बदललेली मनुष्य सर्वत्र सारखा असतो असा विचार करत फारसे डिटेल्स न वाचता वेगाने पुढे गेलो पण एक वेगळच नाव दिसलं मारीचझंपी, स्थळनामांची गमंत असते काय असेल या स्थळनामा मागे या उत्सुकतेने डिटेल्स उघडले. मारीचझंपी हे एक बेट आहे, पश्चिम बंगालच्या सुंदरबनातील एक संरक्षीत वन्यक्षेत्र हे लक्षात आलं.

शृँगार १२

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 18/04/2016 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
" Hi friend how r u ? " - राधिका " I m fine n hows u ? " - मी " काय बोलू fine म्हणू की खर सांगू ? " - राधिका " खरच सांग . " - मी " काही प्रॉब्लेम असला की कुणापुढे बोलाव तेच समजत नाही . बाबा किती रागीट आहेत ते तुम्हाला माहीत आहेच . त्यामुळे त्यांच्यासमोर काही बोलायची हिंमत्तच होत नाही . आणि आई एकतर ignore करते नाहीतर भांडायला येऊ का तिथे अस बोलते , त्यामुळे तिला काही सांगण्यात अर्थ वाटत नाही . तुम्ही सांगत होता ते पटत आहे , काही bad girls पण असतात . आमच्या क्लासमधे पण एक ग्रूप आहे , ज्या सगळ्यांना टॉंन्ट मारतात , खूप वाईट कमेंट करतात .

िशख ध्रम की पंथ

लेखक sश्रिकान्त यांनी सोमवार, 18/04/2016 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
िशख ध्रम की पंथ? कारण िशख जरी गुरू ग्रंथसाहेब मानत आसले. तरी िहंदु देवतांची पुजा करतात . िमपाकर जरा या बदंदल कोणी प्रकाश टाकेल का?