शृँगार १०
माणसाच्या मनाचही अस असत ना कधी कोणता विचार येईल आणि काय मानसिक स्थिती होईल सांगता येत नाही . तसच झाल होत आता . साधी दाढी करायची त्यातही दोन तीनदा कापून घेतल होत आता अशा परिस्थितीत मी न डगमगता मिशांकडे मोर्चा वळवला .
फारच वाढल्या आहेत म्हणून त्यांना थोड बारीक करण्याचा आणि आकार देण्याचा प्रयत्न होता पण हे साध कामही किचकट झाल होत . कधी इकडची मिशी बारीक कधी तिकडची . इकडं एक आकार तिकड भलताच फार प्रयत्न करूनही काही जमेना तेव्हा तीन पर्याय राहिले होते आहे तसच राहू देण व हस करून घेण . इतके दिवस अस्ताव्यस्त दाढी मिशा घेऊन फिरत होतो पण आता तो उपाय अशक्य होता .
मिसळपाव