Skip to main content

ऑटो रायटिंग पशुपतीनाथ मंदिरात

लेखक योगविवेक यांनी गुरुवार, 30/04/2015 23:54 या दिवशी प्रकाशित केले.

ऑटो रायटिंग पशुपतीनाथ मंदिरात

कथन – विवेक चौधरी, जळगाव. (नेपाळ यात्रेतील ओकसरांचे सहकारी)

23-26 मार्च 2015 मधे भृगुसंहितेच्या शोधात ओक सरांचे व माझे गमन झाले. त्याचा संक्षिप्त अहवाल आपल्याला अन्यत्र वाचायला मिळेल. त्या प्रवासात ज्या अदभूत घटना घडल्या त्यातील एक होती ती पशुपतीनाथाच्या मंदिरपरिसरात अचानक उद्भवलेले ऑटोरायटिंग...! टीप - आमच्या यात्रेनंतर 25 एप्रिल 2015ला नेपाळमधे धरणीकंप झाला होता.

सत्यकथा .. अध्याय १ आणि २

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 30/04/2015 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
..................................................अध्याय पहिला...................................................................... नैमिष नावाचं एक अरण्य होतं. इथे शौनक आणि इतर अनेक ऋषी महर्षी जगत्कारण आणि जगत कल्याणाविषयी चिंतन, अभ्यास, साधना करत असत. एक दिवस त्यांच्यात वाद घडला. आणि सत्य या गोष्टीबद्दल बरीच मतमतांरे झाली. शेवटी खरा निर्णय करण्यासाठी ते सर्व सूत महर्षींकडे गेले. तेंव्हा त्यांच्यात व सूतात झालेला संवाद म्हणजेच हि सत्याची- सत्य कथा होय. ती आपणा सर्वांनी आता ऐकूया.

जय मनु बाबा .....

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 30/04/2015 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
अंदाजे अठराएक वर्षांपूर्वी आतल्या खोलीतून बायकांमधे 'बाय अडली कि काय ओ' अशी दबक्या आवाजातील काळजीयुक्त गलका उमटला, दाराच्या आडोश्याला उभ्या असलेल्या, मनुने हे ऐकले मात्र, त्याची नजर समोरच्या गाभार्यावर खिळून राहिली, तिकडे पाहून नमस्कार केला, मनात 'माझ्या बहिणीला व तिच्या बाळाला, माझ्या भाच्याला जीवनदान दे देवा, याच भाच्याच्या हाताने दरवर्षीच्या यळ्ळूर गडाच्या जत्रेत, बिशीबेळेहुळी अन्न शिरापुरी अस ११ लोकांना जेवू घालीन' असा नवस घातला.…. थोड्यावेळाने गावातल्या एका वयोवृद्ध सुईनीकडूनच बाळंतपणं सुखरूप झाल्याचं कळल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला.

खाऊगल्ली भाग २

लेखक रेवती यांनी गुरुवार, 30/04/2015 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== खाऊगल्ली : भाग १ ================================================================== बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा. तर चला एकमेका सहाय्य करू------- वरील मजकूर त्रिवेणीच्या पहिल्या धाग्यातून ढापला आहे याची नोंद घ्यावी.

...देव आहे अंतरी

लेखक अजय जोशी यांनी गुरुवार, 30/04/2015 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
गझल... तू मला टाळून कळले, लपविले जे अंतरी.. आणखी आणू नको तू आव कुठले अंतरी..! दूर तू असतेस आता, काळजी कुठली नसे... भेट की भेटू नको विश्वास आहे अंतरी..! मन तुझे कळले मला शब्दांविना स्पर्शातुनी.. फारही सांगू नको तू ठेव थोडे अंतरी..! मी तुला भेटायला इतके मुखवटे चढविले.. आणि ओळखलेस तेंव्हा भाव फुलले अंतरी..! ती गुलाबाची कळी पाहून मी स्मरले तुला.. फुलत गेले आठवांचे रोम हर्षे अंतरी..! आज तू पुसलेस अश्रू, पायही दमले तुझे.. केवढे छळलेस पूर्वी, काय पिकते अंतरी..? घोषणा केलीस तू भेटायचे आहे पुन्हा.. पण मिठीच्या आत कळले फोलपण जे अंतरी..! या मनाच्या वावराला दु:ख जळण्याचे नसे.. पण कुणी समजून घ्या ह
काव्यरस

हडळीचा आशिक

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 30/04/2015 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
हडळीचा आशिक जपानमध्ये हितोशी नावाचा एक माणूस रहायचा. तो एका पाषाणरह्रद्यी बाईच्या प्रेमात पडला. तिला राजी करायला त्याने भलते कष्ट उपसले. ती म्हणजे त्याला सर्वस्व वाटायची. तिच्या वाचून त्याला स्वतःचे आयुष्य फोलफोल वाटायचे. शेवटी एकदाची ती बया त्याच्यावर प्रसन्न झाली. त्याच्याशी लग्न करायला तयार झाली. पण हाय! नेमक्या त्याच दिवशी, आपण एका असाध्य रोगाने ग्रस्त आहोत, आपण काही फार दिवस जगणार नाही, हे तिच्या लक्षात आले. तरी आपला हिरो तिच्याशी लग्न करतो. तिचे शेवटचे दिवस सुखात जावेत म्हणून आटापिटा करतो. पण, मृत्यू शय्येवर असताना मात्र हि बया त्याला म्हणते, “ मला एक वचन द्या.

माहिती हवी: चौसोपी वाडा व इतर मराठी वास्तु प्रकार

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 30/04/2015 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
चौसोपी वाड्यांबद्दल कुणी काही लेख, पुस्तके लिहिली आहेत का? जालावर कुठे फोटो मिळतील का? जालावर काही मिळालेत पण अर्धवट आहेत. पुर्ण कल्पना येत नाही. जिथे भेट देऊन अभ्यास करता येईल असे काही जुने चौसोपी वाडे सुस्थितीत व वापरात असलेले कुठे आहेत याची काही माहिती असल्यास जरूर सांगा. त्यांचे आर्कीटेक्चर, उपयोगिता, वैशिष्ट्ये, बांधकाम साहित्य, बांधकामावर असणारा पर्यावरणाचा प्रभाव यावर माहिती संकलित करायची आहे. त्याचे एक चांगले, जास्तीत जास्त बारकावे असलेले मॉडेल बनवायचे आहे. काही मराठी संकल्पनांवर जालावर निश्चित माहिती उपलब्ध होत नाही.

BSNL लॅंडलाइन व ब्रॉडब्रॅंड कनेक्शन घ्यावे का?

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 30/04/2015 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे गाव कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात असून BSNL शिवाय कोणतीही इंटरनेट सर्विस उपलब्ध नाही . मोबाईलसाठी 2G वोडाफोन GPRS वरुन नेट वापरतो . परंतु तिचा स्पीड 30-50 केबीपीएस पेक्षा जास्त नसतो. BSNL चे ५०० केबीपीएस ब्रॉडब्रॅंड ५५०/- रूपयामध्ये अमर्यादित प्लान आहे. पण इथे १०० केबीपीएस तरी मिळेल अशी आशा आहे. त्यातच आता बीएसएनएल ने रात्री ९.०० ते सकाळी ७.०० वाजे पर्यन्त माहाराष्ट्र व मुंबई साठी अमर्यादित फ्री कॉलिंग ची सुविधा दिल्याने बीएसएनएल कनेक्शन घ्यावे असे वाटत आहे . आपला काय अनुभव आहे ? BSNL लॅंडलाइन व ब्रॉडब्रॅंड कनेक्शन घ्यावे का?

आयुर्वेद

लेखक मयुर आपटे यांनी गुरुवार, 30/04/2015 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
!! श्री गणेशाय नमः !! मित्रहो उशिरा फायदे मिळतात म्हणून जास्त लोक आयुर्वेदिक उपचारानकडे वळत नाहीत !! काही दुखले, खुपले त्वरित आराम हवा म्हणून आपण अलिओप्याथी चे उपचार घेतो, काही महिन्यान पूर्वी माझेही विचार असेच होते शिवाय उपचार स्वस्तात व्हायचे.... आयुर्वेदिक म्हणजे उपचार थोडे खर्चिक असे मनात ठसले होते !! पण, माझा मुलगा ह्याला बड चेरी नामक आजार आहे, अन अलिओप्याथी मध्ये कुठलाही औषधीय उपचार नाही, सर्व उपचार आहेत ते शस्त्रक्रियेचे आहेत....