अॅलीना रोमरः मराठी विषयाची विद्यार्थिनी
नमस्ते,
माझे नाव अॅलीना रोमर आहे. मी नॉर्वेची नागरीक आहे. मी पुन्यात शिकते. मी पुने युनिवर्ससिटी मदे मराठी सब्जेक्टमदे बीए करते आहे. मला मराठी खुप खुप आवडते. मी रोज युनिवर्ससिटी मदे जाते. मला माझे कॉलेज खुप आवडते.
मी माझ्या घरमालकांकडे पेईंगगेस्ट आहे. मी कोथरूडला राहते. मी दररोज पायी चालत कॉलेजला जाते. चालत जातांना मला नागरीक दिसतात. दुकानदार दिसतात. रिक्षा दिसतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यामुळे मला दररोज नविन गोष्टी समजतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यावेळी मला भारतातले नागरीक दिसतात.
मिसळपाव