Skip to main content

आईशप्पथ.........!!!!

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 30/04/2015 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
अपरं नाक उडवून, गालाचा फुगा फुगवून वर फुकाचा राग धरून, जेव्हा तु माझ्यावर रुसुन बसतेस.. आईशप्पथ....माझा सगळा लोच्या करून टाकतेस.......... मला काही सुचत नाही, काय कराव उमगत नाही. वर भोकाड पसरून, माझ्यावर इमोशनल अत्याचार करतेस.. आईशप्पथ....माझा सगळा लोच्या करून टाकतेस.......... काही केल्या बोलत नाहीस, विनवण्या करुनही हसत नाहीस स्वतः अबोल राहुन, भांडयांची मात्र आदळाआपट करतेस..... आईशप्पथ....माझा सगळा लोच्या करून टाकतेस.......... "चालता हो!!!,मला तुझं थोबाडही बघायचे नाही" अशी माजोरडी धमकी मला माझ्याच तोंडावर देतेस..... आईशप्पथ....माझा सगळा लोच्या करून टाकतेस.......... नाही लावली कधी चार बोटं त

देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ?

लेखक ग्रेटगणेश यांनी गुरुवार, 30/04/2015 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ? (सदर लेख 'साप्ताहिक लोकप्रभा'त २७.१२.२०१४ रोजी प्रसिद्ध झालेला आहे.) आज आपल्या देशात शिक्षणाचं मध्यम कोणते असाव यावर चर्चा (आणि केवळ चर्चाच) सुरु आहे. महाराष्ट्रात नुकतेच श्री भालचंद्र नेमाडेंनी या चर्चेला तोंड फोडले. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञान भाषा असते. ती भाषा त्या मुलाला आईच्या पोटात असल्यापासून ऐकायला मिळालेली असते (उदा. अभिमन्यू). ज्ञानभाषा ही फक्त आणि फक्त मातृभाषाच होऊ शकते.

छायाचित्रकला स्पर्धा क्र. ९: मतदान

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 30/04/2015 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. हा धागा मतदानासाठी. तुमची मते ४ मेपर्यंत इथे नोंदवा. एखादा फोटो नजरचुकीने राहिला असेल तर जरूर कळवा.

प्रबळगड रात्रपदभ्रमण .. एक जंगली अनुभव :-)

लेखक योगेश आलेकरी यांनी बुधवार, 29/04/2015 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
मुरंजन उर्फ प्रबळगड NIGHT TREKK प्रबळगडावर मागच्याच आठवड्यात एक छोटासा ट्रेक झाला होता, फक्त एक जवळचा साधा ट्रेक म्हणून याकडे पाहत होतो पण गडावर गेल्यावर लक्षात आले कि हा गड तसा खूप जुना आणि अभ्यास करण्यासारखा अहे. याच्या माथ्यावर असणारे घनदाट जंगल हे आणखी एक उत्सुकतेचा विषय.

इंदूर - भाग ३ - सराफा

लेखक मोदक यांनी बुधवार, 29/04/2015 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
इंदूर - भाग १ - पूर्वतयारी आणि पुणे ते शिर्डी इंदूर - भाग २ - रावेरखेडी >>>"भिया फ्रेश हो जाओ, अभी सराफा निकलना है!" भुषणचा भाऊ चेतन टिपीकल इंदोरी भाषेत वदला.... या पूर्वी एकदा कोणतीही माहिती नसताना आपल्या यकुने दिलेल्या सूचनांनुसार सराफा भेट झाली होती. त्यावेळी सराफा भन्नाट आवडला होता. त्यामुळे दिवसभराचा प्रवासाचा शीण विसरून सराफ्याला जाण्यास सज्ज झालो. भुषणच्या घरच्यांसोबत थोड्या गप्पा मारून आम्ही सराफ्याकडे कूच केले.

सावधान! मगरमच्छी अश्रू

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 29/04/2015 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
सावधान मत्स्य पुत्रानों आयुष्यभर मासे मारणारा बगळा आता मगरीचे रूप घेऊन अश्रू ढाळण्यासाठी येत आहे, त्याला अचानक मत्स्य पुत्रांचा पुळका कसा आला, काही एक कळत नाही. आयुष्यभर बगळ्याने मासे सारे फस्त केले . घेऊनी वेश मगराचा. ढाळतो अश्रू आता. एका महानगरात एका मत्स्य पुत्राचा असाच जीव गेला: भुलूनी मगर अश्रुना जीव गेला मत्स्याचा. अर्पिली गांधी "चित्रफुले" ढाळूनी अश्रू मगरीने. सावधान! मत्स्य पुत्रानों घेउनी वेश साधूचा रावण हरतो सीतेला. जाणीव ठेवा इतिहासाची भुलू नका मगर अश्रुना.
काव्यरस

शब्द्नाद - पगार, वेतन, Salay..या शब्दांची जन्मकथा..

लेखक ग्रेटगणेश यांनी बुधवार, 29/04/2015 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
पगार, वेतन, Salay.. सर्वांच्या जिव्हाळ्याचा शब्द. अगदी ठार अडाण्यालाही या शब्दाचा अर्थ पटकन समजतो. महिन्याचे १ ते १० असे दहा दिवस पगाराचे असतात.

हं ! ते तुला कधी जमणारच नाही

लेखक गणेशा यांनी बुधवार, 29/04/2015 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: कविता आजकाल सुचत नसली तरी परम मित्र वल्ली यामुळे काही तरी लिहिले आहे.. नविन काव्य असे होत नसते म्हणुन काल आवडलेल्या कवितेला (धानजीरावांच्या) कवितेतुन उत्तर देत आहे मुळ कविता : तू ये... अरे द्यायचेच असेल तर दे आभाळालाही कवेत घेवु पाहणारे ते हात हं ! ते तुला कधी जमणारच नाही तोडलेल्या पाशावरती, कशास कुंपण अन भिंती शब्दांच्याच वादळांची कसली आहे कोणास भिती अरे गायचेच असेल तर गा ते स्वर बंदिशी मिलनाचे... हं ! ते तुला कधी जमणारच नाही हळव्या कोपर्‍याचे ..
काव्यरस

जय गांधी बाबा

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 29/04/2015 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
तर नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता ऑफिस गाठण्यासाठी प्रचंड गडबडीत तयारी चालू होती. एक तर थंडीच्या दिवसात आरामात जाड ब्ल्यांकेट पांघरून मस्त झोपायचं असतं, आणि आम्ही ७ च्या ऑफिससाठी धडपडत असतो. कसं बसं ६:५५ ला सगळं आवरून निघणार तेवढ्यात बॉस चा मेसेज आला. "Lets take a day off today.. it seems we have a national holiday and a dry day too... so don't go off to find a bar now... have fun". "आयचा घो... आज कसली सुट्टी आता? किती मुश्किलीनं काल ल्याब सेट करत आणली होती. आता मधेच सुट्टी कसली? आणि सुट्टी तर सुट्टी हे काल नाही का सांगता येत? च्यामैला रविवारी सुट्टी नाही देत कधी.

रात्रप्रवासी

लेखक Vimodak यांनी बुधवार, 29/04/2015 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
तारे वेचू तूझियासाठी, म्हणून निघालो रात्रप्रवासि... सूर्याला माघारी ठेवून, मंद वाहत्या चंद्रपाशी... गळ टाकुनी, अगाध-आकाशी, याचक बनूनी, अनंत-अधाशि... तुटले तारे वेचत फिरलो, ध्रुव ताऱ्यासाठी मी झुरलो. 'ध्रुव' बांधण्या वेशी तुझिया, क्षण क्षण माझे, विकत राहिलो. माथी चढवून अखंड देणे, 'तारा' बनूनी देत राहिलो... तुटत राहिलो.. मिटत राहिलो...