Welcome to misalpav.com

गरुडघरटे

लेखक: स्वाती दिनेश | प्रसिद्ध:
(मागच्या वेळी भ्रमणमंडळ जेव्हा बेरेष्टेसगार्टनला गेले होते तेव्हा खराब हवेमुळे इगल्सनेस्ट ला भेट द्यायची राहिली होती, नंतर जेव्हा जेव्हा त्या भागात गेलो तेव्हा मुद्दाम केहलष्टाइनहाउस ला जाऊन आलो..) ओबेरसाल्झबुर्ग आणि बेरेष्टेसगार्टन! पृथ्वीवरच्या स्वर्गातील एक बाग जणू.. ह्याच ओबेरसाल्झबुर्ग मध्ये केहलष्टाइन हाउसच्या पायथ्याशी लपले आहेत हिटलरचे बंकर्स.. तेथे परत जाउन नव्याने उमगल्या काही गोष्टी..


स्वप्नातली ती

लेखक: चैतू | प्रसिद्ध:
स्वर्गातून अवतरली तु, जणु मदनाची रती, लावण्यवती परी तु, पाहताक्षणी गुंग झाली मती तु येताच पक्षी, गातात स्वागतगीते, दवावरून चालते तु, तेव्हा गवतही शहारते केसांशी खेळत जेव्हा, वारा तुला झोंबी घालतो, मनातल्या मनात तेव्हा, त्याचाही हेवा वाटतो शृंगारासाठी तु एक, टवटवीत गूलाब हाती घेतला, पण सौँदर्य तुझे पाहुन, बिचारा गूलाबही लाजला तु जिथे ठेवते पाऊल, तिथे धरणीलाही प्रेमांकुर फूटतो, आणि तुझ्या बागडण्याने, प्रेमाचा सुगंध दरवळतो चिँब पावसात भिजताना, तु बेधुंद झाली, आणि तुझ्यासमवेत नशा, मलाही चढत गेली दाट धुक्याला लपेटून, हरवून गेली कुठे, वेडे फक्त स्वप्नातच येते, भेटायला सांग येशील कुठे


अर्थसंकल्प-२०१४

लेखक: प्रसाद गोडबोले | प्रसिद्ध:
आज श्री.अरुण जेटली संसदेत बजेट सादर करत आहे . अर्थसंकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा !!


चित्रवीणा

लेखक: मितान | प्रसिद्ध:
बोरकरांच्या कविता नेमक्या कधीपासून वाचायला लागले ते आठवत नाही. त्या वाचलेल्या कविता कधीपासून उमगायला लागल्या ते ही सांगता येत नाही. परवा अचानक बोरकरांची कविता पुन्हा भेटली. ८ जुलै हा बोरकरांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने काही बोरकरप्रेमी मित्रांनी त्यांच्या कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम ठरवला. त्यात मलाही बोरकरांच्या कविता वाचायला बोलावलं आणि हेच निमित्त झालं पुन्हा कविता शोधायला. कवितांचे २ खंड, समीक्षेची पुस्तकं, नक्षत्रांचे देणे आणि मुख्य म्हणजे पु लं आणि सुनिताबाईनी बोरकरांच्या कविता वाचनाचे कार्यक्रम केले त्याचे भाग एवढं सगळं जमा झालं. एकेक कविता वाचायला घेतली.


निवांत

लेखक: भृशुंडी | प्रसिद्ध:
खच्चून भरलेल्या लोकलमागे रिकाम्या लोकलची वाट न बघणार्या लोकांसाठी ही गोष्ट नाहीये. बागेत जाउन उगाच तास दीडतास बसणं ज्यांना शि़क्षा वाटते त्या लोकांसाठीपण ही गोष्ट नाहीये. तासन्तास चहाच्या कपाच्या कडेवर एकच माशी घोंघावताना बघण्याची कल्पनाच ज्यांना भयानक वाटते अशा लोकांसाठीसुद्धा ही गोष्ट नाहिये. ==== तर १९९० सालची गोष्ट. खरं तर असलं काही सांगायची गरज नाही, पण एक गोष्टीचा फील येतो. तर डिसेंबर महिन्याची सकाळ होती. नाही, दुपार. बहुतेक ३ वाजले होते. म्हणजे संध्याकाळच म्हणा ना. अस्सल चहाबाजांची ३रा चहा घ्यायची वेळ. दुकानावर गरदी नव्हती.


मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...

लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:

मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... असे ऐकली कथा अकलेच्या कांद्याची अन् चाळीतल्या बटाट्यांची मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... लवंगी मिर्चीने रंगवली लावणी अन् मामाच्या घरच्या केळ्याच्या शिक्रणी मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...

तर मग ऐक परि, कथन करीन गद्यातूनि, ...

कथा ही एका लाल मिरचीची...

चार एक वर्षापुर्वीची गोष्ट... असाच एकदा एका किराणा मालाच्या दुकानात सामान आणायला गेलो होतो. गर्दी होती म्हणून बाहेर उभा असता नजर पडली एका सुक्या मिर्चांच्या पोत्याकडे.



जडण-घडण...5

लेखक: माधुरी विनायक | प्रसिद्ध:
गिरगावातल्या सेवासदन अध्यापिका विद्यालयातली ती दोन वर्षं कमाल होती. शाळेच्या सातवीपर्यंतच्या शिक्षणानंतर खूप काळाने मनाजोगा कंपू भेटला होता. हो, आता कंपू ची जाणीव होऊ लागली होती. घरापासून अंधेरी स्टेशनपर्यंत बस, तिथून २ नं. प्लॅटफॉर्मवरून सकाळी ८.५७ ची चर्चगेट स्लो लोकल. रेल्वेच्या नियमित प्रवासाचा पहिला अनुभव, तिथे पाच जणींचा एक कंपू. मग विद्यालयात आमचा १० जणींचा मोठ्ठा कंपू. पूर्ण वेळ अभ्यासक्रम, म्हणजे अख्खा दिवस आम्ही सगळ्या सोबत असायचो. पूर्ण वेळ साडी नेसणं अनिवार्य. सवय नसल्यामुळे सुरूवातीला काही मुली विद्यालयात जाऊन कपडे बदलून साडी नेसायच्या, मग हळू-हळू सरावल्या.


अच्छे बिन आने वाले है, लेकिन अच्छे बिन, महंगे होते है !

लेखक: पगला गजोधर | प्रसिद्ध:
वेताळाच्या बेताल बोलण्याकडे दुर्लक्ष करीत राजा विक्रमादित्य भराभरा रेशमाच्या बागेकडे चालू लागला. वेताळाने राजाला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली.. ओसाडवाडीच्या पंचवार्षिक जत्रेत, सकाळी सकाळी अंबादास बाळाजी मानव (अं.बा.मानव) , सर्व दुकानात, त्याला हवे असलेलं डस्टबिन शोधात होता, साध्याच डस्टबिन दिवसेंदिवस खराब होत चालले होत. खिशात फक्त ऐक रुपयाच होता. तोच ऐका दुकानदाराने त्याला हटकल्यावर थांबला. दुकानदार: केम भाया, सु आपु तमे ? काय देऊ तुला ? अं.बा.मानव: चांगले बिन शोधत व्हतो हो, हल्लीच खराब झालं आहे माझं बिन. ऐकुलता ऐक रुपया हाय माझ्याकड.