Welcome to misalpav.com

कहां गये वो लोग?--मंग्या

लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:
हां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई कहां गये वो लोग?--नाथा दहावीची परीक्षा नुकतीच संपली होती.डोक्यावरचे अभ्यासाचे ओझे उतरले होते.आणि वर्षभर पुस्तकात घातलेल्या माना वर झाल्या होत्या.सुट्टीत कोण कोण कुठे कुठे जाणार ह्याचे बेत ठरत होते.एकीकडे उन्हाळा वाढत चालला होता आणि अंगातुन घामाच्या धारा वाहात होत्या. एकदा असाच दुपारचा चहा पीत गॅलरीत


नारकोंडम बेट-- पुढे

लेखक: सुबोध खरे | प्रसिद्ध:
नारकोंडम बेट-- पुढे आमच्या सर्व लोकांच्या गणवेशात आणि बुटात समुद्राचे पाणी भरून ते जड झाले होते. जेमिनी किनार्यावर आणल्याबरोबर नौदलाच्या मुलभूत प्रशिक्षणाप्रमाणे मागे बसलेल्या नौसैनिकाने जेमिनीची मोटर सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण मोटार मध्ये सुद्धा पाणी शिरले होते आणि ती पण चालू होईना.आता प्रेम कुमारला अजूनच टेन्शन आले. कारण वायरलेस बंद होता. जेमिनीची मोटार चालत नव्हती (आणि त्याच्या खिशातील पाकीट आणि घड्याळ भिजले होते.) तो विचारू लागला सर आता परत कसे जायचे? मी का कुणास ठाऊक बेफिकीर होतो. मी त्याला म्हणालो कि जे होईल ते पाहू.


भरले खेकडे

लेखक: जागु | प्रसिद्ध:
पहिला खेकड्यांची थोडीशी माहीती करून घेऊ. खेकडे म्हणजे लहान मुलांचा आवडीचा बाऊ. अगदी त्यांना चालताना पाहण्या पासून ते खाण्या पर्यंत. लहानांबरोबरच मोठ्यांनाही खेकडे म्हणजे आवडते प्रकरणच. त्यात हे खेकडे लाखेने भरलेले असले म्हणजे तर अजूनच चविष्ट गंमत. तर ह्या खेकड्यांचेही अनेक प्रकार आहेत. त्यापैकी मला माहीत असलेले समुद्रातले, खाडीतले व डोंगर-जमिनीतले खेकडे. डोंगरातील खेकडे काळे कुळकुळीत पाठीचे असतात. त्यांना मुठे म्हणतात. इतर खेकड्यांपेक्षा हे जास्त चविष्ट असतात. समुद्रातील व खाडीतीत खेकडे जरा फिक्कट कळापट-करड्या रंगाचे असतात. समुद्रात तर नक्षिदार पाठीचे खेकडेही असतात.


मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांची माहिती हवी (वेब डिझायनर्स /डेव्हेलपर्स)

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
मराठीतील पहिले संकेतस्थळ मायबोलीच्या स्थापनेला जवळपास १८ वर्षे होत आली आहेत. मराठी संस्थळांना तंत्रज्ञान, स्थैर्य आणि आत्मविश्वास प्राप्त करून देण्यामध्ये मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांनी (वेब आर्कीटेक्ट्स/ डिझायनर्स /डेव्हेलपर्स) महत्वपूर्ण भूमीका निभावली आहे. उल्लेखनीय मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांबद्दल आणि मराठी संकेतस्थळे विकासात कार्यरत व्यावसायिक आस्थापनांबद्दल माहिती हवी आहे.


चव

लेखक: भृशुंडी | प्रसिद्ध:
सोडी केशसंभार विखुरला स्तनांवर दृश्य वेड लावी मला नग्न सावळ्या रूपाचे हात वेढले उराशी त्याचे होता युग्मपाश बोटे आतुर धावती तप्त देठांपाशी खोल जाता नाभी-डोही घनदाट होई सृष्टी अंधारात साथ देती तुझे चित्कार चिंब ओल्या पाकळ्यांत होती जिव्हेचेच दंश माझ्या ओठांवर चव तुझ्या अमृताची


कहां गये वो लोग?--नाथा

लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:
कहां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई आमचं ६-७ खोल्यांचं जुनं तिपाखी कौलारु घर होतं.दाराला कड्या घालुन बसण्याची पद्धत अजुन सुरु झाली नव्हती.सगळ्यांची दारं सताड उघडी असायची आणि आम्ही पोरेटोरे दुपारी कुणाही एकाच्या घरी किंवा संध्याकाळी कुणाच्याही वाड्यात खेळत पडीक असायचो.आमचे घर मोठे असल्याने त्यातल्यात्यात आमच्याकडेच दुपारचा अड्डा असे.एकदा असेच एका कुठल्यातरी खोलीत पत्ते वगैरे खेळत असताना घरात चोरी झाली आणि चोराने


पाऊस आलाय...

लेखक: माधुरी विनायक | प्रसिद्ध:
पाऊस आलाय सालाबादप्रमाणे वेड्या आठवणी जागवायला पुन्हा-पुन्हा मला लावतोय माझ्याच मनावर रागवायला वेडा पाऊस, वेडा... वेडावणारा पाऊस वेडा वेड लावतोय, वेडावतोय कृष्णमेघांच्या सावलीमागून आतुर होऊन बोलावतोय भिजायला... हो...भिजायचंय मलाही... पण थोडं थांबावं लागेल... हल्ली असंच करावं लागतं मनात आलं, तसं वागलं, मोकळं झालं, असं होतंच नाही... थांबावंच लागतं आणि मनालाही थांबवावं लागतं पण येणार मी, नक्की... मलाही भिजायचंय ना...


कृतार्थ !..... एक भयकथा !

लेखक: मृणालिनी | प्रसिद्ध:
रुचिता चपलेचा तुटलेला बंद पायाच्या अंगठ्यात आणि त्याच्या शेजारच्या बोटात घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत तशीच फरपटत चालत होती. ‘आत्ता जवळ मोबाईल असायला हवा होता...कोणालातरी घ्यायला तरी बोलावलं असतं. आता मेन रोड पर्यंत चालत जाव लागणार ! मग तिथे रिक्षा मिळेलच....’ कपाळावर आठ्या आणत ती स्वतःशीच पुटपुटत होती. शेजारून एखाद वाहन जाईल, आणि आपण लिफ्ट घेऊन घरी जाऊ ; अस स्वप्नरंजन करत तिने जवळ-जवळ अर्धा रस्ता पायीच पूर्ण केला होता. पण दुर्दैव म्हणजे एकही गाडी या रस्त्यावरून गेली नव्हती. खरेतर, इतक्या रात्री अश्या या आड रस्त्यावरून कोण कशाला प्रवास करेल ?


माउलींच्या पालखी सोबत एक दिवस :- भाग २

लेखक: ज्ञानोबाचे पैजार | प्रसिद्ध:
माउलींच्या पालखी बरोबर एक दिवस - भाग १ साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला| ठायीच मुरला अनुभव|| कापुराच्या वाती उजळली ज्योती| ठायीची समाप्ती झाली जैसी|| मोक्षरेखे आला भाग्ये विनाटला| साधूंचा अंकीला हरिभक्त|| ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी| हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी|| फोटो क्र. ३१ फोटो क्र. ३१ या वारीत अनेक बलुतेदारसुध्दा सामिल झाले होते.