सौंदर्यवती तू ......
- Read more about सौंदर्यवती तू ......
- 10 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 3533 views
असं गं रक्तिम मुख तुझं
जसं मिटल्या लाजाळूचं पान ,
त्यावर टेचात चालणं गं
वळवी वैराग्याची मान !!
मीच थिटा वर्णू कसा
सृष्टीत तूच महान,
सुरमयी कटी सखे
तुझा कुमुदिनीचा वाण !!
एक पाचोळाच मी सखे
ज्याला कुठून देहभान ?
मन आलं दबकत चाखण्या
तुझे ओठ रंगले पान !!
बेहोष गंध तुझा तो
त्यात रेखीव कमान,
बेसावध तुझ्यात तू मात्र
भुंग्यांना त्याची जाण !!
कधी जाण हृदय हेही
खुपसे तुझ्यावर कुर्बान,
मला लाभावं माळण्या
वेणी गजरयाचा मान !!
नजरे नको प्रतारणा आता
तुला मनाचीच आण,
काय आहे गं सृष्टीत ?
समोर लावण्याची खाण !!
श्री. साजीद यासीन पठाण
दह्यारी,
(पलूस, सांगली)
शिव खोरीच्या रस्त्यावर लागणारे रियासी गाव चिनाब नदीच्या तीरावर वसलेले आहे. पीरपंजाल पर्वतरांगा इथे सपाट मैदानाला येऊन मिळतात. त्यमुळे नदीचा प्रवाह सुसाट असतो.