Welcome to misalpav.com

आई

लेखक: कहर | प्रसिद्ध:
आकाश उतरता खाली अस्तित्व नष्ट कराया मी हळूच पांघरून घेतो आईची हळवी माया ती पैलावरती माया ऐलावर होते रात ठेवता उशीवर डोके केसातून फिरतो हात का डोळ्यामध्ये आसू का अंतर्मन व्याकूळ गगनात भारली प्रतिमा अस्पष्ट करतसे धूळ झाकल्या पदराखाली आयुष्याचे कोंदण आईच्या हातावरती एक पिंडीचे गोंदण हातात चंद्र धरून स्वप्नात भेटते आई घेऊन कुशीत मजला गाते अजूनही अंगाई


अ‍ॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव -१

लेखक: तिमा | प्रसिद्ध:
लहानपणी आई मला, 'अकलेचा कांदा' म्हणत असे. पण मोठेपणी या शब्दाशी साधर्म्य असलेला, 'अ‍ॅकलेशिया कार्डिया'(Achalasia Cardia) हा दुर्मिळ रोग होईल याची कधी कल्पना केली नव्हती. गेले वर्षभर मला खाताना गिळण्याचा त्रास जाणवू लागला होता. सुरवातीला एखादाच घास अडकायचा आणि पुन्हा तोंडापर्यंत यायचा. पुढे पुढे हे प्रमाण वाढू लागले. डब्यात कोरडी भाजीपोळी नेली की जेवायला इतरांपेक्षा जास्त वेळ लागायचा. मग, सरबरीत भात-आमटी, रसभाज्या यावर चालू लागले. सुरवातीला अ‍ॅसिडिटी समजून अनेक डायजिन संपवल्या.रात्री-बेरात्री अचानक जाग येऊन, छातीत दुखायचे, पण पाणी प्यायले की ढेकर येऊन ते थांबायचे.


९० डिग्री साऊथ - १३ (अंतिम)

लेखक: स्पार्टाकस | प्रसिद्ध:
http://www.misalpav.com/node/27879 http://www.misalpav.com/node/27873 http://www.misalpav.com/node/27868 http://www.misalpav.com/node/27860 http://www.misalpav.com/node/27855 http://www.misalpav.com/node/27840 http://www.misalpav.com/node/27825 http://www.misalpav.com/node/27813 http://www.misalpav.com/node/27804 http://www.misalpav.com/node/27784 http://www.misalpav.com/node/27774 http://www.misalpav.com/node/27767 http://www.misalpav.com/node/27751 ________________________________________________________________________________ ९० डिग्री साऊथ -


दुस्री

लेखक: आतिवास | प्रसिद्ध:
म्या पास. निम्मी, अंक्या, भान्याबी पास. गुर्जी म्हन्लं "आता दुस्रीत". म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.” आयनं हसून श्येंगदानं दिलं. आज्जीनं गूळ दिला हातात. आण्णा पेन देनार हायेत. गावभर हिंडून दारात बसली. मंग राम्या, मुक्या, सुर्की दिसली. आगावू हायती दुस्रीची पोरंपोरी. कायबी कराया गेलं की "ए पयलीच्या पोरांनो, मागं व्हा" म्हनत्येत. त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत. पन सोताला शाने समजत्येत जादा. म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू.


सिनेमा आणि प्रेम

लेखक: राजेश घासकडवी | प्रसिद्ध:
सिनेमा का कोण जाणे उगीचच बदनाम झालेला आहे. सर्वच उच्चभ्रू लोकांची त्याला येनकेनप्रकारेण नावं ठेवण्याची अहमहमिका लागलेली असते. सर्वसामान्यांना आवडतं त्याला नाकं मुरडल्याशिवाय स्वतःला विचारवंत आणि उच्चभ्रू म्हणवूनच घेता येत नाही. 'सिनेमे बघून मुलं बिघडतात' हा त्यांचा सगळ्यात नवीन शोध. मुलं हे देशाचे भावी आधारस्तंभ असल्यामुळे मुलं बिघडली की समाज बिघडतो, आणि त्यातूनच कॉंग्रेससारख्या पक्षाचं राज्य दशकानुदशकं टिकून राहतं. अर्थात लवकरच हे बदलणार आहे, त्यामुळे मला तर समाज बिघडलेला आहे याची चिंता वाटत नाही. पण तरीही या उच्चभ्रूंचा सिनेमांना नावं ठेवण्याचा उद्योग चालूच असतो.


२०१४ लोकसभा निवडणुक - सर्वेक्षण अंदा़ज, मतमोजणी व निकाल

लेखक: श्रीगुरुजी | प्रसिद्ध:
२०१४ लोकसभा निवडणुकांचे निवडणुकपूर्व सर्वेक्षणाचे अंदाज झी-न्यूज अंदाज http://zeenews.india.com/news/general-elections-2014/bjp-to-emerge-as-single-largest-party-in-lok-sabha-polls-zee-taleem-survey_922122.html http://znn.india.com/Img/2014/4/3/Opinion%20Poll-%20Phase%202%20Report.pdf भाजप - २१५-२२५, रालोआ - २१९-२३२ काँग्रेस - १२१-१३२, संपुआ - १३२-१४९, इतर - १७१-१८१ टाईम्स नाऊ-सी व्होटर अंदाज http://timesofindia.indiatimes.com/tmes-now-cvoter-national-lok-sabha-election-survey/liveblog/30348665.cms भाजप - २०२, रालोआ - २२७ क


दमण बद्दल माहिती

लेखक: कबीरा | प्रसिद्ध:
दमण बद्द्ल कोणाला काही माहिती आहे का? राहण्याचे ठिकाण? खादाडी साठी उत्तम जागा? २-३ दिवस जायचे आहे.


९० डिग्री साऊथ - १२

लेखक: स्पार्टाकस | प्रसिद्ध:
९० डिग्री साऊथ - ११ ३० मार्चला अ‍ॅटकिन्सन आणि कोहेन कॉर्नर कँपवर पोहोचले होते. वाटेत टेडी इव्हान्सची स्लेज त्यांना आढळून आली होती. वा-याचा जोर वाढतच होता. तापमान घसरत चाललं होतं. हिवाळा तोंडावर आला होता. सर्व परिस्थितीचा विचार करुन अ‍ॅटकिन्सनने परत फिरण्याचा निर्णय घेतला. तो म्हणतो, " एखाद्या डेपोवर अथवा कँपवर ते असतील तरच त्या परिस्थितीत त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्यं होतं, अन्यथा त्यांना शोधणं अशक्यंच होतं. आम्ही सात दिवसाची सामग्री कॉर्नर कँपवर ठेवली होती.


आम्हाला सदर कार्यक्रमाच्या जाहिरातीचा मसुदा लिहिण्यास मदत करावी

लेखक: पगला गजोधर | प्रसिद्ध:
ऐका हो ऐका, आमच्या गावी ओसाडवाडीच्या माळरानावर, हर ५ सालाबाद परमाने जत्रेमध्ये, यापावतो दस्तूर खुद्द जादुगार न. म. सरकार यांचे जादूचे शो १६ मे पासून, लागणार हाये हो, जादुगार हे मुळचे रा. मु. पो. ढेबेवाडीचे असून, त्यांचा टुरिंग शिनेमाचा ह. मु. ओसाडवाडीच्या नदीकाठ येथे आहे.