Welcome to misalpav.com

हितगुज नातवाचे

लेखक: देशपांडे विनायक | प्रसिद्ध:
आबा उठा आबाचा नातू आबाला म्हणाला आबा उठा . SMS बघा आज तुमची MARRIAGE ANNEVERSARY आजीने नवीन कपडे घाला म्हणून सांगितले आहे आईने त्याला SUPPORT केले आहे माझ्या आवडीचा केक मी कालच BOOK केला होता तो आता येईल बाबा OFFICE ला जायच्या आधी तो कापा आपण लंचला बाहेर जायचे आहे आई बाबा DISCUSSING . कुठल्या हॉटेलात जायचे ? आजीला आणि तुम्हाला EVENING फ्री ठेवली आहे --देवळात जाण्यासाठी


NDE बद्दलच्या किरकोळ शंका

लेखक: शुचि | प्रसिद्ध:
एम्ब्रेस्ड बाय लाईट, सेव्ह्ड बाय द लाईट, thi rTee मिनीटस इन हेवन अशा प्रकारच्या पुस्तकांचा फडशा पाडून , तसेच तासन तास 'निअर डेथ एक्सपीरीअन्स"(NDE ) सारख्या साईट्वर घालवून अन त्या प्रकारचे व्हिडीओ पाहून माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्या शंकाकंड्शमनार्थ हा धागाप्रपंच. सगळ्या NDE मध्ये बर्याच सामाईक बाबी आढळल्या. किंबहुना एक स्ट्रक्चरच , एक क्रमच आढळला जो पुढे येईलच व तदनुशंगिक काही शंकादेखील खाली येतील.
सर्वात प्रथम म्हणजे NDEer मृत्युच्या विविक्षित क्षणोपरांत अचानक सीलींगपाशी हवेत तरंगू लागतो. तरंगत असताना खाली स्वत:चा अचेतन मृतदेह ती व्यक्ती पहाते.


अ‍ॅकलेशिया कार्डिया-रोग आणि उपचार -२

लेखक: तिमा | प्रसिद्ध:
अ‍ॅकलेशिया कार्डिया (Achalasia Cardia) हा एक अन्ननलिकेचा व त्याच्या जठरावरील जोडणीच्या मधे जो स्नायुंचा वॉल्व्ह असतो त्याच्या क्रिया नीट न चालण्याचा रोग आहे. साधारणपणे लाखांत एका माणसाला हा होतो. अन्ननलिकेच्या खालच्या व जठरावरच्या वॉल्व्हला Lower Esophagal Sphincter (LES) असे म्हणतात. आपल्या अन्ननलिकेची व या एलईएस ची हालचाल मोटर सेन्सर नर्व्हसमुळे होत असते. म्हणून आपण कुठलीही खाद्यवस्तु चावून गिळली की त्या घासाची अन्ननलिकेतली हालचाल खालच्या दिशेने आकुंचन्-प्रसरण या तत्त्वावर होते. त्याचवेळेस, खालचा वॉल्व्ह उघडतो आणि खाऊन झाल्यावर आपोआप बंद होतो. त्यानंतर जठराचे काम चालू होते.


ब्याचलर्स पाकृ: स्टफ्ड थालीपीट विथ टॅन्गी टमॅटो अ‍ॅन्ड चीज़...

लेखक: सूड | प्रसिद्ध:
नाव कसं हुच्च वाटतंय ना पाकृचं? फार काही नाही टॉमेटोची चटणी भरुन केलेलं थालीपीट आहे. झालं असं की मेस दोन आठवडे बंद असल्याची बातमी आली मग दुपारच्या जेवणाचं काय करायचं याचा विचार करायला लागलो. रात्री टिफीन येतो त्याच्याकडून पहिला आठवडा टिफीन मागवला पण टिफीन एकदाही वेळेवर पोचला नाही दुपारी!! मग त्यानंतरच्या आठवड्यात शेवटी स्वत:च सैंपाकघरात पाऊल टाकायचं ठरवलं आणि काहीतरी वेगळं करायच्या नादात ह्या रेशिपीचा शोध लागला.


नमो लाटेचे साईड ईफेक्ट

लेखक: वॉल्टर व्हाईट | प्रसिद्ध:
नमस्कार, रालोच्या या दिमाखदार विजयानंतर, सरलेल्या काही महिन्यात नमो लाटेचे साईड ईफेक्ट काय काय झालेत, हे पाहिले तर बर्‍याच रोचक गोष्टी ध्यानात येतात, उदा. महाराष्ट्रात, १. शिवसेनेला जीवदान मिळाले २. मनसेची धुळ्दाण झाली ३. गोपीनाथ मुंडेंसारख्यांच्या खुर्च्या वाचल्या असे तुम्हाला जाणवलेले साईड ईफेक्ट कोणते ? टिपः कृपया साईड ईफेक्ट सांगावेत. उदा. कॉग्रेसच्या घराणेशाहीला दट्ट्या बसला हा साईड ईफेक्ट नाही/नसावा.


भारतीय वकीलातीतला अनुभव

लेखक: मालविका | प्रसिद्ध:
विटेकर काकांचा "एक उद्विग्न करणारा अनुभव"वाचला . खरच खूप चिडचिड झाली . त्यावरून परदेशातील आमचा भारतीय वकीलातीतला अनुभव सांगावासा वाटतो . मला पासपोर्ट वरील नाव बदलून घायचे होते. नवीन नावाने नवीन पासपोर्ट हवा होता . वकिलाती मध्ये सकाळी १० वाजता फोन केला. वेबसाईट वर १० वाजता ची वेळ दिलेली होती त्यानुसार . आधी कोणी फोन उचलला नहि. फोन घेणाऱ्या व्यक्तीने काय हवे विचारले. पासपोर्ट वरील नाव बदलण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात त्याची माहिती हवी म्हणून सांगितले . अत्यंत तुसडेपणाने उत्तर दिले कि वेबसाईट वर बघा . तिला सांगितले कि तिथे अर्धवट माहिती आहे .


कल्पना / प्रस्ताव : मिपाकरांनी ट्रेक ला जाण्याबाबत

लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
नमस्कार! भाईयों और बहनो..... (सॉरी सॉरी. ते मोदींचं भाषण ऐकलं ना नुकतंच टीव्हीवर... ) हां तर आता मोदी सरकार वगैरे सगळं आलंय. अशी बातमीही आली आहे की ५ जून ला मॉन्सून केरळात दाखल होणार आहे. तेंव्हा त्याच्या स्वागताला एखाद्या डोंगरावर नाही गेलं तर मजा काय नाही का! असा विचार मनात आला. गेल्या चार पाच ट्रेक चे वृत्तांत फोटो जेंव्हा मिपावर टाकले तेंव्हा `आम्हाला न नेल्याबद्दल निषेध' वगैरे अनेक शेरे वाचायला लागले. :) तेंव्हा, म्हटलं की या खेपेस त्याची भरपाई करावी. एक सहज प्लॅन डोक्यात आलाय.


<<< हा मिपाचा विजय >>>

लेखक: प्यारे१ | प्रसिद्ध:
आम्ही काही काळापूर्वी http://misalpav.com/node/27418 ह्या काकू द्वारे गणपा खरंच मिपाशेफ बनतील का असा एक सर्व्हे घेतला होता. तेव्हा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात 'गणपा' चा प्रचार काही जणांनी केला. त्यांच्या विरुद्ध देखील काही लोक बोलले. आज ह्या ठिकाणी निकालाच्या प्रसंगी गणपा जिंकून आलेला आहे. सगळ्या मिपाकरांनी गणपा लहरी आहे- आपलं- गणपा लहर आहे हे मान्य केलं आहे. तरी देखील गणपा जिंकला म्हणजे सगळं साध्य झालं असं होत नाही. त्याला बर्‍याच पा कृ शिकायच्या आहेत, बनवून दाखवायच्या आहेत, सुगरणींच्या सल्ल्यांमधून नेमकेपणा आणायचा आहे.


अभिनंदन!

लेखक: राही | प्रसिद्ध:
भाजपला पूर्ण आणि स्वच्छ बहुमत मिळाल्याबद्दल अभिनंदन. देशाला बदल हवा होता, तो मिळाला. आज देशभर उत्सव साजरा होतो आहे. देशभरातच नव्हे तर परदेशातही जिथे जिथे भारतीय आहेत तिथे रात्री जागून लोक दिवाळी साजरी करीत आहेत. पुढील वाटचालीसाठी मोदींना आणि त्यांच्या नवीन सरकारला मनापासून शुभेच्छा.