Welcome to misalpav.com

नालायकी

लेखक: श्रीगुरुजी | प्रसिद्ध:
सर्व राजकीय संकेत व नीतिमत्त पायदळी तुडवून संपुआ सरकारने जाताजाता अगदी शेवटच्या क्षणी आचारसंहिता लागू असताना व अगदी मतमोजणी सुरू असून स्वतःचा दारूण पराभव दिसत असताना सुद्धा आपल्या समर्थकांवर बंगल्यांची खैरात, आपल्या मर्जीतल्या अनेक अधिकार्‍यांना पदोन्नती व घाऊक बदल्या केल्याचे दिसत आहे. १६ मे रोजी मतमोजणी सुरू असताना चिदंबरम् ने आयकर विभागाच्या महसूल विभागातील तब्बल १४८ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या.


'आजचा भारत' आणि 'नाझी भस्मासुराचा उदयास्त'

लेखक: पगला गजोधर | प्रसिद्ध:
इतिहास म्हणजे भूतकाळात यदृच्छया घडलेल्या, व वरवर पाहता विस्कळित, असंबंधित भासणाऱ्या घटनां असून, त्यामागे काही योजनेचे सूत्र असते; म्हणजे ह्या घटनांत एक साचा, आकृतिबंध (पॅटर्न) असतो; इतिहासात उलगडत जाणाऱ्या ह्या आकृतिबंधात इतिहासाचा ‘अर्थ’ सामावलेला असतो हा आकृतिबंध समजून घेण्यानेच, आपल्याला वर्तमान परिस्थितीचा अर्थ, तिच्यात गर्भित असलेल्या प्रवृत्ती आणि ह्या प्रवृत्तींमुळे जो भविष्य वर्तमानातून अटळपणे उद्‍‌भवणार आहे, तो भविष्यकाळ ह्या साऱ्यांचे आकलन होऊ शकते(संदर्भ: मराठी विश्वकोश) "नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे एक अतिशय


मुंगळा थिअरी

लेखक: स्पा | प्रसिद्ध:
एक मित्र आहे माझा,मैत्रीला वयाचे बंधन नसते म्हणतात तसे,बाबांच्या वयाचा आहे माझ्या,पण मी त्याला अरे तुरेच करतो.कधीतरीच बोलतो,पण भरभरून गप्पा होतात.एकटाच राहतो लग्न झालेले नाही.आई वडील केंव्हाच वारलेले.नातेवाईक सुद्धा जास्त नाहीत. पण पट्ट्या नेहमी आनंदात असतो.भयानक क्रियेटीव आहे.ad agency मध्ये क्रियेटीव डायरेक्टर आहे.डोक्यात सतत नवीन नवीन कल्पना येत असतात.घरी लहान मुलांचे चित्रकलेचे क्लास घेतो.मध्येच विपश्यना काय करून येतो.तो काहीही कधीही करतो.काल बर्याच दिवसांनी बोलणे झाले.त्याला म्हटले तुला एकट्याला कंटाळा नाही का येत?


आपल्या मित्रांनो, आपन थंड राहूया !

लेखक: पगला गजोधर | प्रसिद्ध:
आपल्या मित्रांनो, आपन थंड राहूया ! मित्रांनो, आपल्या इकडे त्याग केला कि तिकडची लोकं 'नौटंकी साला' असं जरी आपल्याला म्हणाली, तरी भव्य सोहोळ्या मध्ये बाणांच्या शय्येवर पडलेल्या पितामहाने, अर्जुनाच्या कृपेने आपणास हि सुखनैव शय्या मिळाल्याचे म्हणताच, अर्जुनच्या डोळ्यात गंगा जमुना अवतरतात हे पाहून, आपन त्यांना 'नौटंकी साला' असं नाही बोलायचं, आपन थंड राहायचं.


अंधाराच्या प्रतिक्षेत सूर्य आणि इतर चोर

लेखक: भृशुंडी | प्रसिद्ध:
लावू नका दिवे येणार अंधाराचे दिवस मुजोर बुलेट्प्रूफ जॅकेटात रेडी सूर्य आणि इतर चोर. तारे ठेवा फ्रिजमध्ये गोठवलेल्या चंद्रावर अंधाराची मालकी येतेय गुरुशुक्र बंडावर बल्ब सुद्धा विझतील असा घनघोर अंधार वळणावर सूर्यालाही चढवा म्हणावं गॉगल जरा डोळ्यांवर सूर्यावरच राज्य आलंय लपाछुपी खेळताना अंधार मात्र करेल भोज्जा खिडकीमागे लपताना गूढ्गोत्री मांडून ठेवा अंधाराची कुंडली सूर्याने साल्या चोरांची मुट्कुळीच बांधली. येणार आहे अंधार असा ट्यूब लाईट लावा राव सूर्यालाही दिसेनाश्या कवींचा मी आहे बाप.


तीन शहाणे

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
तीन शहाणे अतिशहाणे हातवारे करीत होते उगवत्या दिवसाला रात्र ठरवीत होते. ऊन तेजस्वी सहन न झाले बंद खोलीत ते जाऊनी बैसले. अंधारात बत्ती तयांची पेटली युरेका युरेका तिघे ओरडले. ज्या अर्थी अंधार इथे दिवस नाही रात्र असे. आपले तर्क ठरले खरे आनंदी शहाणे नाचले.
टीप : कॉकटेल लाउंज मध्ये, मिसळपाव सोबत, सोमरस प्रश्न केल्याने डोक्याची बत्ती जळेल, कवितेचा उलगडा होईल.


शाही मुरांबा

लेखक: अनन्न्या | प्रसिद्ध:
साहित्यः एक डझन तयार पण घट्ट हापूस आंबे, साखर, लवंगा ४/५, वेलची दाणे( खरं तर या मुरांब्याला हापूस आंब्याचा इतका सुंदर सुगंध असतो की वेलची पण फिकी पडते.) muramba कृती: फोटोत दाखवल्याप्रमाणे आंब्याच्या दोन्ही बाजूचे काप काढून त्यावर उभ्या आडव्या रेघा मारून चमच्याने फोडी काढून घ्याव्यात. तयार फोडी मोजून घ्याव्यात, जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर घ्यावी. साखर, लवंगा, वेलची दाणे सगळे एकत्र मिसळून दोन तास झाकून ठेवावे.


चॉकलेट डे .. खळ्ळं फट्ट्याक !

लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:
आयुष्याने दिलेल्या पचपचीत अनुभवांमध्ये मीठमसाला टाकून त्या किस्सेकहाण्या लोकांना सुनवतोय ! हसतोय आणि हसवतोय ! येण्यार्‍या आयुष्यात काही तरी सुरस आणि चमत्कारीक घडेल, बस्स या आशेवर जगतोय ! पण आज मात्र मी जे सांगायला जाणार आहे त्यात असत्याचा अंश कणभर सुद्धा असणार नाही. जेवढे पिळाल तेवढी त्यातून सत्याचीच धार बाहेर निघेल. आयुष्याने दिलेला एक अनुभव जसाच्या तसा मी आज तुमच्याबरोबर शेअर करायला जात आहे... का? ते मला स्वतालाही ठाऊक नाही... तर हि गोष्ट आहे इसवीसन ..,,..