Welcome to misalpav.com

मंगळ कार्य !

लेखक: साळसकर | प्रसिद्ध:
आज पत्रिका आली एका मंगळ कार्याची. एका मित्राच्या लग्नाची. म्हटलं तर माझा मित्र, म्हटलं तर माझ्या वडीलांचा मित्र. माझ्यापेक्षा बारा वर्षे मोठा तर माझ्या वडीलांपेक्षा बारा वर्षे लहान. जुन्या वाडीतला जुना मित्र. आतासे राहायला आणखी कुणीकडे. लग्न त्याचे आजवर झाले नव्हते हे पत्रिका बघूनच समजले. अन नाही म्हटले तरी धक्काच बसला. अजून झाले नव्हते की एक मोडून हे दुसरे? पहिले कोणाशी झाले, कधी झाले, का मोडले? कि झालेच नाही ! पण मग एवढे उशीरा का? भावांची लग्ने झाली असे कानावर होते. एकाचे सहकुटुंब फोटोही फेसबूकावर बघून झाले होते. मग तीनही भावांत देखणा हा, याचेच कसे राहिले? अवाजवी अपेक्षा?


भारतीय अन्नसुरक्षा...

लेखक: डॉ सुहास म्हात्रे | प्रसिद्ध:
अन्नसुरक्षा कायद्याच्या निमित्ताने मिपावर आणि सर्वच मिडियाभर घमासान चर्चा झाली.


मायमराठी

लेखक: सार्थबोध | प्रसिद्ध:
शब्द अलंकार भंडार, मधाळ अमृतवाणी वदे सुमधुर सिद्ध ऐसी, भाषा माझी मराठी ll १ ll वेदतुल्य मंगल प्रार्थना, आरती ईश्वराची दंड थोपटे गर्जुनी, आरोळी हो पोवाड्याची ll २ ll सुबक डौल लावण्याचा, शृंगारते लावणी तरल मनीच्या भावना, भावगीती रंगती ll ३ ll सजग करण्या जना, बोले फटका झणी ठेचुन काढी दुष्ट रुढी, भारुड कीर्तनातुनी ll ४ ll अभंग कवणे जागविती, सदभाव भक्ती वर्णन करितो विश्वाचे, मुक्तछंद पक्षी ll ५ ll शब्दांची तीक्ष्ण पाती, दंडिते शत्रू लेखातूनी संपन्न सुबत्ता शास्त्र, झळके व्याकरणातूनी ll ६ ll परंपरा नाट्यपदे नाटके, साहित्य श्रीमंती ईश्वर स्वये प्रगटे, ऐकून


जीवनगाणे – ५

लेखक: सुधीर कांदळकर | प्रसिद्ध:
जीवनगाणे - १ जीवनगाणे - २ जीवनगाणे - ३ जीवनगाणे - ४ फ्रॅन्सीस क्रीक फ्रॅन्सीस हॅरी कॉम्टन क्रीक. जन्म ८ जून १९१६ रोजी इंग्लंडमधील वेस्टन फॅवेल, नॉर्दम्टन इथे. हॅरी क्रीक (१८८७ – १९४८) आणि ऍनी एलिझाबेथ क्रीक या दांपत्याचा सर्वात मोठा मुलगा म्हणजे फ्रॅन्सीस क्रीक.


फ़्यंड्री...!

लेखक: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | प्रसिद्ध:
राम राम मंडळी. मंडळी, मिपावर फ्यंड्रीबद्दल उत्तम लिहून आल्यानंतर आणि इतरही ठिकाणी फ़्यांड्रीवर येता जाता चर्चा व्हायला लागल्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सूकता लागली होती. मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे. पारंपरिक चित्रपटापेक्षा काही तरी वेगळे मराठी चित्रपटातून यायला लागले आहे. वास्तवतेवर आधारित सकस कथा, ध्वनी, छायाचित्रण,कलाकार, या आणि विविध अशा बदलांनी मराठी चित्रपट जरा हटके यायला लागले आहेत. मराठी चित्रपटांना विषय फुलवता यायला लागले थेटरात शांतपणे चित्रपट बघायला जावे, इथपर्यंत मराठी चित्रपटांनी भरारी घेतली आहे, असे वाटायला लागले आहे.


मराठी भाषा

लेखक: Bhagwanta Wayal | प्रसिद्ध:
ममराठी भाषादिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी भाषा भाषा किती छान आपुली भाषा किती छान महाराष्ट्राची शान आपुली भाषा किती छान संत महत्मे होऊन गेले मराठी ग्रंथ लिहुन गेले आपुल्यासाठी ठेऊन गेले अद्वयताचे ज्ञान 'आपुली भाषा किती छान कवी लेखक अनेक झाले मराठी साहित्य लिहुन गेले आपल्यासाठी ठेऊन गेले शब्दरत्नांची खाण आपुली भाषा किती छान तिला बोलावी तशी ती बोलते तिला ओळवावी तशी ती वळते परप्रांतीयांना ही सहज कळते वाटे मला अभिमान आपुली भाषा.... माय लेकराचे नाते आपुले ह्रदयामध्ये त्याला मी जपले नाजुक शब्दांमध्ये गुंफले चरणी ठेऊन ध्यान आपुली भाषा किती छान बी डी वायळ


वांग्याची भाजी

लेखक: Pearl | प्रसिद्ध:
साहित्यः ४ वांगी, १ मोठा कांदा, १ छोटा बटाटा, तेल, मोहोरी, हिंग, हळद, केप्र गोडा मसाला, केप्र झटपट उसळ मसाला, तिखट, मीठ कृती: १) कांदा उभा चिरून घ्या. वांगी आणि बटाटाही उभट चिरा. (त्याचे ज्युलिअन्स करून घ्या.) २) एका पसरट कढईमध्ये (किंवा पॅनमध्ये) ४-५ टबलस्पून तेल घ्या. मध्यम आचेवर तेल तापत ठेवा. ३) तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करून घ्या. ४) मग त्यात कांदा टाकून चांगला परतून घ्या. मग त्यात वांगी आणि बटाट्याचे ज्युलिअन्स टाकून चांगले परतून घ्या. ५) गॅस मध्यम आचेवर किंवा त्यापेक्षा थोड्या कमीच आचेवर ठेवा. अधून मधून भाजी परता. भाजी करपणार नाही याची काळजी घ्या.


श्वास लय

लेखक: अज्ञातकुल | प्रसिद्ध:
स्फटिक निर्मळ स्वर अभंग रोम रोमी चाळ ते दूर कोठे गाव माझे अंतरीचे चाळते श्वास लय; अदृष्य सारे लुप्त शब्दी वेधते चांदण्या गर्दीत कांही हरवलेले शोधते त्या आभा भासात अजुनी संभ्रमी मन धावते गोडशी हुरहूर अंगी; स्वप्न नादी लावते पाश मय रागा-स्वरांचे सोसलेले घाव ते चंदनी आनंद त्यांचे बाळकोषी दावते …………… अज्ञात