Welcome to misalpav.com

विरंगुळा

लेखक: अज्ञातकुल | प्रसिद्ध:
नाते नाही मीच एकला श्वासांमधुनी नाद ऐकला कान्हा कान्हा बोले राधा तूच आसरा तू विरंगुळा कोषामधले उमलू पाहे गंध आतला दाटुन आला भेद तरी पण इथला तिथला तूच आसरा यू विरंगुळा मंद कशी ही झाली मेधा अंध मती पथभर मन बाधा न कळे कोणी का लपलेला तूच आसरा तू विरंगुळा ........................अज्ञात


मोठीशी आरोळी

लेखक: वैभव कुलकर्नि | प्रसिद्ध:
मोठीशी आरोळी कोण मारतुया वर. यमाचा आवाज , मला कळली झालर. माझे-माझे आता कोण,सग-सगळे लांबरे. कोणीतरी म्हणेल आता नकोस जाऊरे. अंधार होताहोता,निजू लेगेल झापड. गालाचेही आता होऊ लागेल खापड. किती आले किती गेले याची यमाला कल्पना. आज मला न्यायचे ,त्याने ओकली वल्गना. रेड्यावरती स्वारी बसत, माझ्याकडे आली. रेड्याचे ते डोळे बोले , मित्रा आज तुझी पाळी. चल षडा माझ्याबरोबर,वेळ संपलाय तुझा. पाशवाच्या बंधनातील खेळ संपलाय तुझा. रडारडे होईल मुक्त हंबरडे फुटतील. हातातील हिरवे चुडे, हातात तुटतील कपाळाचे नागडेही आता विद्रूप दिसेल.


बाप.....उर्फ़ वडिल ....!!!!!

लेखक: DTPS | प्रसिद्ध:
मिसळपाव वरील माझे हे पहिलेच लिखाण, चूक भूल माफ असवि. च्याइला आई आणि मुलाच्या नात्या बद्दल सगळेच लिहितात, पण बाप आणि मुलाच्या नात्याच काय हो …। आईशी असलेला नात,ओढ जगजाहीरच कि हो, पण बापाच्या नात्याशी असलेली घट्ट विण कोण जाने….


पर्णोपर्णी

लेखक: सार्थबोध | प्रसिद्ध:
घुमता वात वनावनातून कुजबूज ये पानसळीतून जाता वारा जरा विरून स्तब्ध शांतता वृक्षलतातून ll १ ll धूळ उडे स्थलांतरातून हर पर्ण ये मातीत लिंपून येई जे नभ जलभारून नवसंजीवन कणाकणातून ll २ ll पर्णे गुंतती कळ्याफुलातून काही झुलती फांदी-फांदीतून कोणी सांडती गळती वाळून जीर्ण अमोलिक पुस्तकातून ll ३ ll नव्या कुणास दव गोंजारून ये नवजीवन अंकुरातून कोणी पडला देठ मोडून हेळसांड तयाची पाचोळ्यातून ll ४ ll - सार्थबोध