Welcome to misalpav.com

सुसला / Susalaa

लेखक: टक्कू | प्रसिद्ध:
नव्याने कळलेला पदार्थ, सुसला :) परवा माझ्या मोठ्या काकूने घरी बनवलेल ताजं मेतकूट दिलं. वास्तविक मला मेतकूट ह्या प्रकाराबद्दल फारसं प्रेम नाही. म्हणून मी सहज म्हणाले कि अगं जास्त देऊ नकोस. ती पट्कन म्हणाली कि सुसला करुन बघ. मला हे नावच नविन होतं. माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह बघून तिने लगेच recipe सांगितली. कर्नाटक side ला बनणारा हा पदार्थ. साधी सोप्पी recipe with मेतकूट touch ताबडतोब बनवून चाखला आणि माझ्या आवडत्या पदार्थ यादीत भर पडली :) कदाचित ब-याच जणांना माहित असलेला आणि कदाचित ब-याच जणांना माहित नसलेला सुसला इथे share करत आहे. नक्की करून बघा.


समर्पण

लेखक: सार्थबोध | प्रसिद्ध:
ओढ लागली दत्ताची वाढे गोडी परमार्थाची मिळे स्फूर्ती साधनेची होई पूर्ती आनंदाची ll १ ll मूर्ती साजिरी मायेची प्रेमळ सावली वात्सल्याची उभी पाठीशी कायमची चिंता वाहे भक्तांची ll २ ll घ्यावी प्रचीती दत्तांची चित्तवृत्ती हो पावनतेची सेवा करिता चरणांची मिळे अनुभूती चैतन्याची ll ३ ll दत्तनाम घेता वाची स्वानुभव अष्टांग रोमांची राख होतसे दु:खांची हि किमया दत्तकृपेची ll ४ ll काय चिंता भविष्याची भीती कायसी अशाश्वताची मनी भावना समर्पणाची फिटेल चिंता नि:शंकची ll ५ ll श्री गुरु चरणरज, © www.saarthbodh.com