Welcome to misalpav.com

कटरले

लेखक: त्रिवेणी | प्रसिद्ध:
नमस्कार लोक्स, मागच्या आठवड्यातील माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्याचा तुम्ही अभिप्राय दिलात, त्यामुळे मला खूप आनंद झाला. (आणि परत एक पाकृ ईथे टाकावी असे वाटले.) कटरले ही तशी डोंगरात उगवणारी भाजी आहे आणि माझ्या आवडीची सुद्धा. ithe ithe पण पुण्यात मला ही भाजी क्वचित दिसली, या वर्षीही ईथे पुण्यात शोधली पण नाही मिळाली.


मरण झाले स्वस्त

लेखक: Bhagwanta Wayal | प्रसिद्ध:
खरे सांगतो मी देवा तेला एक गोष्ट जीवन झाले महाग आणि मरण झाले स्वस्त ॥ धॄ ॥ महागाईचा आलेख किती वर गेला कसे जगावे देवा सांग तुच मला गरीबाच्या दुखाला नाही कुठे अंत..॥१॥ कर्जापाई शेतकरी हवालदिल झाले कितितरी आत्म्हत्या करुनिया मेले देऊनिया जातात अस्वासने फ्क्त...॥२॥ बाँब स्फोट घातपात येथे घडतात निष्पाप लोक त्यात बळी पडतात काही आपल्या घरामध्ये रहातात मस्त...॥३॥ दोन गाड्यांमध्ये जेंव्हा टक्कर होते बघताबघता बस कधी दरीमध्ये जाते पिऊनिया चालवी गाडी नाही त्याल धास्त..॥४॥ पुर आणि भुकंपाने होई नुक्सान रिलीफ फंडामध्ये जमा करतात धन टाळुवरच लोणी खाऊन करतात फस्त...॥५॥ ................बी.डी.वायळ


"केनी" च्या पानांची भजी

लेखक: चौकटराजा | प्रसिद्ध:
मिपाकर मित्रहो , मिपाचे सदस्य झाल्यापासून पाककृती मधे आमचा हा पहिलाच धागा आहे. तो गोड मानून घ्यावा असे म्हणायची सोय नाही. कारण तो पदार्थ तिखट आहे. आपल्या महाराष्ट्र देशी जास्तीत जास्त साधे सोपे पदार्थ तयार करण्याची महान परंपरा आहे. त्यात भजी नावाचा पदार्थ तर महा लोकप्रिय आहे. कांदा,( यात चकती, गोल, लांब काप असे प्रकार ) बटाटा, वांगे, मिरची, घोसाळे( की घोसावळे), केळे, पालक, चाकवत पाने, मायाळू पाने, ओवा पाने, कोबी ई ई वापरून भजी करतात. ती चवीचवीने खातात. बरोबर पावाची , पुदीन्याच्या चटणीची, लसणीच्या चटणीची साथ घेतात. ( ऐला तोंडाला पाणी सुटायला लागले राव !) .तर असे हे भजी महात्म्य !


पाऊस एक चिंतन

लेखक: मिसळलेला काव्यप्रेमी | प्रसिद्ध:
थोडी प्रस्तावना: पाऊस म्हणजे नेमकं काय? वाट पहाणे? मिलनाचा आनंद? एक अनामिक हुरहुर? एक अविरत सुरु असणारा काळाचा, विश्वाचा अनंत प्रवास? कि आणखी काही? असे अनेक प्रश्न मला नेहमीच पडत आलेले आहेत. या प्रश्नांची उकल करतांना स्वतःच्या बुद्धीच्या मर्यादाही ध्यानात आल्या. मग एक दिवस या तिघीजणी भेटल्या. बहुतेक प्रश्नांची उत्तरे देऊन गेल्या आणि काही नवे प्रश्नही.


रायगड ट्रेक | Fort Raigad Trek

लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
तीर्थक्षेत्री जाण्यासाठी योग यावा लागतो म्हणतात. तसंच काहीसं झालं. ट्रेकिंग ची, गड किल्ल्यांची आवड लागून दोन वर्ष झाली परंतु दुर्गदुर्गेश्वर रायगड ला जाणं झालं नव्हतं. खरं तर जून मधलाच हा प्लॅन होता. पण एक नाही दोन वेळा पुनर्नियोजित झाला होता. शेवटी तो योग आला. रायगडास जाणे झाले, शिवतीर्थाची भेट झाली. a रायगड ट्रेक योजला. तिघांची टीम जमली. आमच्यासोबत पहिल्यांदाच येत असलेला, पण आमचा शाळेपासूनचा मित्र असलेला, आणि आमच्या तिघांपैकी खरंच 'शिवभक्त' असलेला अनिकेत.


पाणी लाऊन हजामत

लेखक: गंगाधर मुटे | प्रसिद्ध:
पाणी लाऊन हजामत

गुदस्ता पाऊस आलाच नव्हता
कुठं पडला, कुठं पडलाच नव्हता
पीक उगवलंच नव्हतं
जे उगवलं ते जगलंच नव्हतं
जे जगलं ते वाढलंच नव्हतं
जे वाढलं ते फ़ळलंच नव्हतं
निसर्गानंच केली होती! हजामत केली होती!! बिनापाण्यानं केली होती!!!

सरकार आलं होतं, मुठभर घेऊन आलं होतं
आमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं होतं
घेन्न! आता कसं वाटsssssते?
आम्ही म्हणालो होतो
मsssssस्त वाटते! गोsssssड वाटते!!

पण एक येडं होतं, सर्वांच्या पुढं होतं